आ बैल मुझे मार… माझा अनुभव

आ बैल मुझे मार… माझा अनुभव
🌱वि४🌿 या व्हाट्सअप ग्रुपवरून

आ बैल मुझे मार… माझा अनुभव


Source:- INTERNET
अनिल गोडबोले
सोलापूर

कधी कधी आपण शांत बसलेले असतो आणि आपण अस काहीतरी करतो की आपल्याला वाटत .."आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला".

तस ते माझ्या आयुष्यात सारखच घडत असतं.. स्वभाव .! दुसर काय?

काल काउंटर च्या पलीकडे चावी घ्यायला गेलो. चावी येईना हातात म्हणून थोडा जोर लावला चावी तर आली.. पण मागे जाताना अक्खा 60- 70 किलो चा काउंटर पायावर पडला.

दोन दिवस आधी मी एअर स्ट्राईक बद्दल बोलत होतो.. काय हवाई दलाची कारवाई होती. व्हिडीओ पाहून भारी वाटत होतं..   तर एकजण म्हणाला" आता तरी मोदींच कौतुक करा.!" मला काहीच कळलं नाही. पण दुसरा म्हणाला, " इंदिरा जी यांनी मिराज आणली म्हणून उडवलात ना...!".... आणि झाला की वाद.. तेव्हा पण असच वाटलं की  .. आ बैल मुझे मार.. पण सोडव बाबा.

एका मित्राला सल्ला दिला की ' बिझनेस महत्त्वाचा.. नोकरी पेक्षा कधीही बिझनेस जास्त नफा देतो. तर तो मला म्हणाला ,"किती कमावतो? बिझनेस करून... फुकट सल्ले देऊ नको.. माझे बाबा क्लार्क आहेत .. मी फॉरचूनर घेऊन फिरतो आहे.. !"

बायकोला म्हणालो, प्रोटीन युक्त आहार पाहिजे... तर ती मला म्हणाली,  "खावा ना वडा पाव... घरात भाजी आणा म्हणून सांगितलं तर जळकी भाजी आणता.. आणि प्रोटीन पाहिजे..!"  शप्पथ .. पुन्हा बोलणार नाही.

शेजारच्या विक्याला म्हणालो, "शाळा जे प्रोजेक्ट देते ना.. ते तुम्ही प्रोजेक्ट करता करता शिकावं म्हणून असतात.. तयार प्रोजेक्ट घेऊन तू कधी शिकणार." तर ते कार्ट मला म्हणत कसं, "काका(हल्ली काका ऐकवत नाही.. पण असो) ते आपण केलेल्या प्रोजेक्ट ला मार्क नसतेत ओ.. टीचर च बोललेत.. Xxx दुकानातून आणा .. आणि त्यात काय शिकायचं.  उगीच डोक्याला ताप. त्या पेक्षा तुम्ही द्या की करून.. सांगतो टीचर ला.. तुम्ही दिल म्हणून.. नापास होणार नाही. एवढा भारी पाहिजे बघा.."

एकंदरीत काय.. हल्ली बऱ्याच वेळा अस वाटत की "आ बैल मुझे मार..

आणि हो... मी विचार चा अडमीन देखील आहे. आता या वाक्याचा आणि विषयाचा काही संबंध नाही असल्यास केवळ योगायोग समजावा. (उपहासात्मक)


Source:- INTERNET
नितिन लेंडवे पंढरपुर

कालच्या १८ फेब्रुवारीचा अनुभव.    
        
            शाळेत शिकवण्याचे सोडुन सर्व कामे करावीत असे सध्या शिक्षण विभागचे धोरण दिसते आहे. अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नयेत असे कित्येक वेळा सांगुनही अशा कामांचा पिच्छा काही केल्या सोडवत नाही. त्यातल्या त्यात पुन्हा निवडणुकांचा काळ म्हटले की काय सांगता सोय नाही.

       मतदारांचे नवीन form भरणे, मयत वगळणे, फोटो बदलणे इ अनेक कामे असतात. त्यासाठी जि प चे शिक्षक नेमले जातात. बैठकावर बैठका. आज हे उद्या ते.

         तर विषय असा, आमच्या शाळेवरचे एक शिक्षक B L O आहेत. ते असे सर्व काम पाहतात. ज्या मतदारांच्या निवडणुक ओळखपत्रात दुरुस्ती होती त्यांचे ओळखपत्र आले होते. सरांनी ते संबंधितांना दिले.

          नवीन मतदारांचे ओळखपत्र यायला अजुन ४-२ दिवस लागणार होते. मात्र माझे ओळखपत्र का आले नाही म्हणुन एका मद्यपी गावक-याने सरांना शिवराळ भाषा शाळेत येऊन वापरली. सरांनी बरेच समजावुन सांगितले. "येईल बाबा, आले की लगेच देतो". पण तो ऐकायला तयार नाही.
  
        सरांना शिवीघाळ तसेच तुझी गाड़ी फोडेन, तुला मारेन वगैरे वगेरे. मी त्याला समजुन सांगितले तरी त्याची मनस्थिती मध्ये काही फरक नाहीं.

          त्याने सरांजवळची कापडी पिशवी ही हिसका देऊन फाडली. व सरांना अडवुन ठेवले. सरांना काही निमित्ताने जायचे होते बाहेर. पण हा गाडी सोडायला काही तयार नाही. मग मी त्याला पकडुन ठेवले व सर गेले.

              सर तर गेले खर पण हा पुन्हा माझ्या मागे लागला. तुझ्या मुळे ते गेले तुला पाहुन घेईन मी. अशी धमकी देऊ लागला. सोडणार नाही. मी म्हटले बाबा तुला काय पाहायचे ते पाहा. शेवटी तो मद्यपिच. तो दुपारी जो आला त्याने आम्हाला नुसते हैराण करुन सोडले.
   
         त्याचे ते मोठे बोलणे, दंड थोपटणे, बोटाने चुटक्या काय वाजवणे, उड्या काय मारणे, हातवारे करुन काय बोलणे. मला नुसता त्याचा अगदी वैताग आला होता. शेवटी त्याच्या भावाला पाचारण करुन ती ब्याद घालवावी लागली.

              रात्रि जेव्हा मी विचार केला तेव्हा उगीच मी त्या वादात पडुन स्वतः ला नाहक मनस्ताप करुन घेतला असे वाटले. ( आणि एका शाळेत सहकारी शिक्षकास असे कोणी विनाकारण त्रास देत असताना आपण हातावर हात ठेवुन गप्प बसलो असतो तर ते ही अयोग्य ठरले असते😊)

Source:- INTERNET
-संगीता देशमुख,वसमत

     मला कार्यक्रम घेण्याची आणि त्यातही दर्जेदार कार्यक्रम घेऊन ते यशस्वी करण्याची भारी हौस! कोणतेही काम अतिउत्साहाने करते. पण या हौसेची फारमोठी किमत मोजावी लागली. एकदा आमच्या शाळेत विदेशी पाहुणे फार कमी वेळासाठी येणार होते. म्हणजे फक्त धावती भेट देणार होते. संयोजकाने सुचवले की,हा कार्यक्रम कार्यालयातच घ्यावा. पण मी अशी हौशी! मी म्हटलं,"पाहुणे कितीही कमी वेळासाठी येत असले तरी छोटाच कार्यक्रम मात्र दर्जेदार घेऊ आणि तो सभागृहातच शोभून दिसेल. संयोजकानी मान्यता दिली. अगदी काही वेळातच पूर्ण जय्यत  तयारी केली आणि पाहुण्यांची वाट पहात बसलोत. पाहुण्यांना वेळ होता थोडा यायला म्हणून एका पथनाट्याची प्रॅक्टिस घेत होते. तेवढ्यात पाहुण्यांचे आगमन झाले.... पाहुणे गाडीतून उतरले आणि आम्ही धावतपळत स्वागताला हजर झालोत. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम आमच्या दृष्टीने यशस्वी झाला. पण संयोजकाला काय वाटले,किंवा कोणी काय सांगितले माहीत नाही,परंतु "आम्ही पाहुणे येण्यापूर्वीच का हजर नव्हते" एवढ्या कारणावरून संयोजकाने आम्हाला पत्र देऊन खुलासा विचारला. मला एवढा पश्चाताप झाला की,मी सुरुवातीला उत्साह दाखवला नसता तर ही जबाबदारी माझ्यावर आली नसती आणि संयोजकाची आयुष्यभरासाठीची  नाराजीही ओढवून घेतली नसती. या" आ बैल मुझे मार" प्रसंगाने चांगलाच धडा शिकवला.
      विशेष गरजू महिलांना मदत व्हावी म्हणून बचतगट काढला त्यात गरजूच महिलेने मला विश्वासात घेऊन मोठी रक्कम उचलली आणि नंतर ती बईमान झाली. त्यातही ते नुकसान माझ्या एकटीच्याच बोकांडीवर पडले. गरजूंची मदत करणे माझ्याच पथ्यावर पडले. हे प्रसंग माझ्या आयुष्यावर काही वेळ का होईना फार विपरीत परिणाम करून गेलेत. पण खंबीरपणा असल्याने सावरले. हेच सविस्तर लिहायचे होते पण वेळेअभावी तूर्तास एवढेच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************