शिरीष उमरे, यवतमाळ
३०० वर्षांचे उदंड आयुष्य लाभुनही वृध्दावस्थेत स्वत:ची डागडुजी करुन घेत न कुरकुरता मुंबईकरांचे अहोरात्र सेवा करणारे आम्ही ब्रिटीशकालिन दादर !! इंग्रजीमधे दादरला पुल म्हणतात बरे...
आम्हाला निवृत्ती देऊन नव्या दमाच्या पिढीची निर्मिती का होत नाही हे कोडे तेंव्हा उलगडले जेंव्हा आमच्या तब्येतीची नियमीत तपासणी करणाऱ्या इंजिनियर साहेबांची कुजबुज ऐकली. त्यातला एक युवा म्हणत होता की दरवर्षी मेंटनसवर इतका प्रचंड खर्च करण्यापेक्षा नविन ब्रीज बांधणे जास्त योग्य नाही का ?!! त्यावर अनुभवी सिनीयर म्हणाला की ह्यामुळे बऱ्याच जणांची वरकमाई बंद होते. राजकारणी फक्त उद्दघाटनाला फीता कापायला येतात आणि नंतर त्यांना हवी असते मेंटनसच्या तरतुदीतुन लक्षावधी रुपयांची मलाई वर्षानुवर्षे... ती पोहचवण्याची जबाबदारी नोकरशाहीतील भ्रष्टाचारी बाबु लोकांची... आपल्या सर्वेक्षणाला कोण विचारतो ?? आता तर ह्या कंत्राटदारांनी आपल्या लोकांना पण चायपानी ची सवय लावली !!
सामान्य मानुस हा मरण्यासाठीच असतो ... घड्याळीच्या काट्याला बांधलेली ही मुंबाआईची लेकरे अशीच अकारण मरणार व उरलेले डोळे पुसुन परत कामाला लागणार...
ह्या प्रामाणिक जोडगळीची ही हताश चर्चा हृदयाला घर करुन गेली. परत एक छताचा प्लॉस्टर चा पोपडा पडला. त्याकडे विष्षणतेने बघत त्यांचा साहाय्यक शुन्यात पाहत बोलला की मागील पुलाच्या दुर्घटनेने त्याची आई हीरावुन घेतली ह्या सरकारने... गलबलुन आले हो हे उदास शब्द ऐकुन...
एक आशेचा कीरण जरुर दिसला जेंव्हा सैनिकी वेषातल्या काही अभियंतानी विक्रमी वेळेत एवढ्या मुंबईच्या गोंगाटात अहोरात्र परिश्रम घेऊन एलफीस्टन रोड स्टेशनचा ब्रीज नव्याने उभा केला... ती पण मानसेच होती ना !!
फार अभिमान वाटला त्यांचा ! अश्याच काही तरुण अभियंतानी समुद्रातुन बांद्रयाला ब्रीज बांधुन काढला... व्वा ! माणुसकी जीवंत आहे अजुन ... एक श्रीधरन नावाचा ध्येयवेडा माणुस ही मी बघितलाय...
अजुनही आशा कायम आहेत नव्या पीढीकडुन !! नवनिर्मितीचा ध्यास असणारी... सेवावृत्ती असणारी.. पैश्यापेक्षा नितीमत्ते ला कीमंत देणारी !!
गरज आहे अश्या लोकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची !! मी म्हातारा एवढेच म्हणेन संधी हातात आहे... योग्य व्यक्तीला वोट करा जो सामान्याचा विचार करेल व विकासातुन भ्रष्टाचाराला हद्दपार करेल....
___________________________
प्रदीप इरकर,वसई जि-पालघर
परवा खूप वाईट वाटले हो!माझा अजून एक मित्र पडला..आपण तरी काय करणार अशावेळी वय झालेले बिचाऱ्याचे..तो तरी किती वेळ सोसनार होता?एरवी कोणी मनावर नसते घेतले पण जाता जाता 6 जणांचे प्राण व 30 जणांना जखमी करून गेला.इतके वर्ष ज्यांची सेवा केली त्यातील काहीजण होते ह्यात.परंतु गेल्यानंतरही काहीसे बेवारस मरण आलेय त्याच्या नशिबी म्हणजे असा झालेय की BMC म्हणतेय तो रेल्वे चा आहे रेल्वे म्हणते तो BMC चा आहे...असो तुम्हा सर्वांनाच माहित असेल तो कोणाचा होता.
गेल्या वर्षी असाच आमचा अजून एक साथी तो तर पडला नाही परंतु त्याच्यावर झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये अनेक जण गेले म्हणून बिचारा आसवे गाळत होता.तो अगोदर पासून च सांगत होता की 'बाबांनो माझे वय झालेय आता.माझी जागा पण कमी आहे जरा पर्यायी व्यवस्था बघा.' पण आमचे ऐकतो कोण??
चेंगराचेंगरी झाल्यावर आसवे गाळत विचार करत होता आता माझे रुंदीकरण होईल माझ्यासारख्या अनेक जणांचे विस्तार होतील अनेक मुंबईकरांना सुद्धा ही भोळीभाबडी आशा होती परंतु तुम्हा लोकांना कसे मूर्ख बनवायचे हे तुमच्यातील काही जणांना अतिशय उत्तम प्रकारे येते. जिथे ही चेंगराचेंगरी झाली ना आता तिथे उपाय म्हणून त्या स्थानकाचे नाव बदलण्यात आले आहे.
असेच आमचे कित्येक बंधू एकामागून एक गेले जायच्या अगोदर ऊर बडवून सांगत होते परंतु त्यांचं कुणी ऐकलं नाही....
आम्हाला आमच्यापैकी कोणी पडतो ह्याचे जितके दुःख होते त्याहीपेक्षा जास्त दुःख तुमच्या चूकीमुळे तुमचीच माणसे आमच्या मार्फत मारली जातायत ह्या गोष्टीचे जास्त दुःख वाटते......
असो सर्वांनी सावधान राहा व आमच्या मार्फत तुमचे होणारे "खून" थांबवण्यास आम्हाला सहकार्य करा.
----------------------------------------------
जगताप रामकिशन शारदा,बीड.
मुंबई मध्ये पडणाऱ्या पुलांनी आपल्या कोसळलण्याने दोष द्यायचा कोणाला? कारण पूल कोसळा कारण गर्दी जास्त होती. पूल कोसळला कारण तो जर्जर झाला होता. अहो गेल्या महिन्यात तर सरकारी अधिकारी येऊन मी ठणठणीत असल्याची पावती मुख्यालयात सापडली अस बोलतात पण शास्त्रीय पध्दतीने कोणी माझी शहानिशा केली अस तरी माझ्या स्मरणात नाही. मग मी फक्त राजकीय पक्षांनी, सामाजिक कार्यकत्र्यांनी मला जनजागृती किंवा स्वतः च्या प्रचारासाठी केलेली आकर्षक रंगरंगोटी केलेली पाहून तो तपास आधिकारी फसला वाटत. आणि मी ठणठणीत असल्याचा अहवाल सादर केला. अहवालच की तमाम मुंबई करांच्या अनिश्चित मरणाचे प्रमाणपत्र.
दगडांनाही पाझर फुटतो पण काय करावे तो इतका सहजासहजी दिसून येत नाही. अखंडपणे ओझे वाहून वाहून आम्ही वजनदार आणि टणक बनलेले असतो. विचार करा दररोजच्या लाखो लोकांची वाहतूक करुन आम्ही किती टणक बनत जातो. मध्यंतरी ऐकण्यात आल होत भक्तांच्या हाताच्या स्पर्शाने विठ्ठलाचे पाय झिझू लागले आहेत मग विचार करण्यासारखे आहे की पुलाच्या दगडांची काय अवस्था होत असेल.
अंगात कणकण असतानाही कामाचा व्याप सहन नाही झाला की कोलमडताना तसच आम्ही ही कोलमडतो कायमचे.मग चालू होत दोष द्यायला. दबणाऱ्या माणसांच्या अस्फुट किंचाळ्या तुमच्या कानापर्यंत कधीही येत नाहीत पण त्या खोलवर घुसतात आमच्या ऱ्हदयात.दलबदलू माणस पुलांना दोष देऊन मोकळी होतात. मेलेल्यासाठी दोन मिनिटं शांत उभी राहतात मतदानाच्या वेळ विकएंड साठी थंडहवेच्या पर्यटन स्थळी घालवतात आणि पुन्हा एखादी दुर्घटना घडली की येतात दोन मिनिटांसाठी.सोयीसाठी बांधल्या जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाचा त्रास यांना तो कसा बांधला जातोय याची तिळमात्र काळजी कोणाला नसते. आणि सरकारी यंत्रणा कुचकामी असल्याची दार्पोटी करायला मोकळे. कधी ऐकलय का की सजग नागरिक संघाने केलेल्या परिक्षणात एवढे पूल धोकादायक आढळले आहेत. आहो ते इंग्रज आजही आमच्या स्थिती बद्दल माहिती देत आहेत पण तुम्ही एवढे निष्काळजी की काय स्थिती आहे हे पण लक्षात घेत नाहीत. कोसळणारे पुल हे जूने झाले म्हणून नाही तर दुर्लक्ष केल्याने कोसळत आहे. अजुन किती लोकांचा जीव घेणार हा प्रश्न अजून किती लोकाचा बळी देणार तुम्ही असा विचारा.
----------------------------------------------
प्रवीण, मुंबई
*खरच* *राव* *कोणी* *वालीच* *नाही* *उरल*
मी अनेक वर्षे दिमाखात उभा होतो, प्रत्येक प्रवाशांचा आधार होतो. अगदी सुटबुटातल्या प्रवाशाला ते अनवाणी धावपळ करणाऱ्या गरीब मजुराला पण इथे एकच मान होता. अनेक वर्षे मी इथे उभा होतो. पावसात भिजनार, उन्हाने तापलेला, मी असाच इथे उभा होतो. .सर्व प्रवाशांचा आधार असणारा मी मात्र निराधार होतो. मी थकलोय
कोणी वालीच नव्हता मला. माझी अवस्था ही सरत्या वयात पोरानं घराबाहेर काढलेल्या म्हाताऱ्या बापासारखी झाली आहे. दोन्ही पोर बापाची जबाबदारी एकमेकांवर ढकलतात तसच रेल्वे आणि BMC करत आहेत. ना मला रेलवे ने पाहिल ना BMC ने डागडुजी केली, म्हणून दोघांना जोडणारा मीच कोलमडून पडलो आहे.
मुंबईकरांचे आयुष्य पण जवळून पाहिलं आहे मी. . पहाटे पहाटे पहिली ट्रेन मिळावी म्हणून धावणाऱ्या चाकरमान्यांचा धावपळीच्या आवाजाने माझी सकाळ होत होती, मग दिवसभर फेरीवाला आपलं पोट भरण्यासाठी बेंबीच्या देटाने वस्तू विकायला ओरडायचा, मग कोणीतरी एखादी बाई अर्धवट हिंदीत त्याच्याशी वाद घालत किमतीवर घासाघीस करून वस्तू विकत घ्यायची,"अगेन मंडे" अशा निराशेने कामावर जाणार आणि वीकएंड ला प्लॅन बनवत घरी जाणार मुंबईकर मी पहिला आहे, कोणाच्या चेहऱ्यावर बॉस ने दिलेल्या शिव्यांचा प्रभाव दिसत होता, तर कोण नोकरी मिळाली या खुशीत असायच, संध्याकाळी अनेक प्रेमीयुगल माझ्यापाशी यायची,.... असा पूर्ण दिवसभर गोंधळ, गडबड, भावनांची भेळ असायची.
त्यादिवशी सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होत, काहीतरी विपरीत घडेल असा भास होत होता, कोणीही माझ्याजवळ येऊ नये असच वाटत होत.
मी आता थकलो होतो, हरलो होतो आणि अचानक धीर खचला. पाठीचा कणा मोडल्यावर जे होत तेच झालं, खाडकन आवाज झाला , कोलमडून पडलो आणि जिकडे तिकडे धुळीच साम्राज्य पसरलं होत.डोळ्यासमोर येत होता तो मुबईकर, फेरिवाला, अर्धवट हिंदीत बोलणारी बाई, बॉस च्या शिव्याखाऊन वैतागलेला तरुण, नवीन नोकरीच आनंदनाने घरी जाणार मुलगा, प्रेमात आकंठ बुडालेले जोडपे......
आता ये काहीच उरल नव्हतं, उरली होती जखमांतून येणारी किंकाळी, भयाण शांतता आणि माझा निपचित पडलेला देह. गर्दी होती पण माणसांची नाही तर जखमांची, मूडदयांची, स्वतःच्या माणसांना पाहायला आलेलं नातेवाईक आणि अंबुलन्स ची पण त्या गर्दीत पण माझा देह एकटा पडला होता.
विचार करत होता नेमकं चुकलं कोणाच , जीव गेलेल्या प्रवाशांचा, BMCच, रेल्वेच की कोणचं वाली नसलेल्या माझं.
--------------------------------------------
विकास येवले ,पुणे.
नका बघू ना रे माझ्या कडे अशा संशयाच्या नजरेन...! काल कोसळलो जरी खाली ते ही तुमच्या हलगर्जीपणाने. माझी शारिरीक स्तिथी खराब होती, मी किती वेळा ओरडून सांगितल. तुम्ही तुमच्या सोईन आलात पाहणी करून गेलात, चार पांढरी कागद काळी करून गेलात दोन सह्या, चार शिक्के मारुन माझ्या दीर्घ आयुष्यावरच जणू मोहरच मारून गेलात. त्या नव्या कोऱ्या फायलींना नेहमी प्रमाणे रद्दीत धूळ खायला फेकून गेलात. यात माझा काय रे गुन्हा...! नव्हता रे घ्यायचा जीव कधीच कोणाचा मला. म्हणून सांगत होत तोडून टाका काही वाईट घरण्या आधीच मला. ठाउक आहे हे ही गुन्हा नव्हताच त्या चिरडलेल्या एकाही निष्पाप जीवाचा, पण मी तरी काय करू पेलवणास झाला होता भार मला माझ्याच जीवाचा. अरे छाताडावर भार झेललाच ना रे तुमचा...? कित्येक वर्ष मी एकही शब्द न बोलता. मग काय मिळेल सांगा मला माझ्याच निर्मात्याचा जीव घेऊन. कलंक लागेल की हे सार करून.
तुम्ही व्हाल बोलून आज मोकळे जीव घेतला याच निर्जीव पुलाने पण कस सांगू मन माझं ही धजातच होत न व्हावी माझ्या हातून दुर्घटना. जे घडायचं होत ते घडल या घटनेंन साऱ्यांचच मन हळवळल माझ्या प्रत्येक भागाला ही जाणवलं. आता तरी घ्याल का यातून काही बोध, अरे माणसा-माणसा तुझ्यातल्या त्या माणुसकीला शोध...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा