NOTA (मत नाकारण्याचा अधिकार) आणि त्याचे लोकशाही मधील महत्त्व.

शिरीष उमरे, यवतमाळ

NOTA म्हणजे None Of The Above. ... ह्यापैकी नाही ! सुची मधील निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारांपैकी कोणालाच मत नाही !!

 तसा हा अधिकार पुर्वीपासुन आपल्याला होता. तेंव्हा १७ अ ह्या रजिष्टर मधे तशी नोंद करुन सही करण्याची व्यवस्था होती. न्यायालयाच्या आदेशानंतर २०१३ पासुन इविएम मधे तशी व्यवस्था करण्यात आली. त्यात नोटा नावाची बटन असते जी प्रेस केल्यावर मत नोंदवल्या जाते. हे मत कोणत्याच उमेदवाराला जात नाही. ह्याची वेगळी नोंद होते.

 आता आठवण होत आहे कीे जेंव्हा आम्ही राइट टु रिजेक्ट च्या आंदोलनात होतो त्यावेळी काही तरतुदी व बदल करुन सरकारने ह्याला निष्क्रीय कायद्यात रुपांतर केले. ह्यानंतरही निराश न होता आम्ही राइट टु रिकॉल वर काम सुरु केले होते.

राइट टु रिजेक्ट म्हणजे उमेदवार नाकारण्याचा हक्क म्हणजेच नोटा !! ह्यात समजा १,००,००० मतापैकी ५०,००१ मते नोटाला असेल तर परत निवडणुका होतील व दुसऱ्यावेळी नविन उमेदवार राहतील असा हरियाणा कोर्टाचा निर्णय आहे २०१८ चा.

 पण हा नगरनिगम च्या निवडणुकीपुरता मर्यादित आहे. आमदार खासदार निवडणुकीत हा नियम लागु नाही सध्यातरी !!
उलट समजा १,००,००० मतांपैकी ९९,९९९ मते नोटाला असेल तरीही १ मताने उमेदवार निवडुन येऊ शकतो. आहे ना हास्यास्पद ?!!

 मग आपण का नोटाला वोट करायचे ? हा खरा प्रश्न आहे. मी फक्त दोन मुद्दे मांडतोय. बाकीचे तुम्ही मांडा !!

मुद्दा एक की माझे हे गुप्त मतदान असल्याने मी कोणाला मत दिले हे उमेदवारांना कळणार नाही व त्यामुळे सगळ्यांसोबत संबंध चांगले राहतील आणि सोबत राजकारण्यांना हेही कळेल की कीती लोकांनी त्यांना नाकारले आहे !!
पुढे जाऊन कायदा आमदार खासदारासाठी पण लागु होऊ शकतो जर नोटाचे टक्केवारी पहील्या बहुमत असलेल्या उमेदवारापेक्षा जास्त राहीली तर !!

दुसरा मुद्दा हा की मी स्वत: नोटाला वोट केल्याने माझ्या जागेवर दुसरा कोणी वोट करु शकणार नाही. त्यामुळे डुप्लीकेट वा फेक मताची शक्यता राहणार नाही.

चांगला उमेदवार नसेल तर नोटाला वोट करुन तुम्ही विरोध नोंदवु शकता. ह्यामुळे भविष्यात चांगलेच लोक जातील निवडुन !!

तसेच राइट टु रिकॉल वरही आपले मत मांडत राहा. चांगल्या राजकरणासाठी पुढे या ...
*=============================*

जगताप रामकिशन शारदा,बीड
NOTA=None of the above
2013 सालपासून भारतीय निवडणूक आयोगाने उचलेल एक कौतुकास्पद पाऊल. कितीही अपेक्षा ठेवल्या कितीही वेळा दात उगळून थकलो तरीही मतदान करताना मतदान केंद्रावर असणारी उमेदवारांची यादी पाहता हे थोडे चांगले म्हणून नाइलाजाने द्यावे लावणारे मत आता निदान मतदार NOTA ला.तरी देऊ शकतात. भारतीय संघराज्याची घडी बसवताना निवडणूक आयोग त्याला अपवाद ठरवून एक स्वतंत्र व घटनात्मक संस्था निर्माण केली याच श्रेय घटनाकारांच्या दूरदृष्टी ला जात. आज पर्यंत निवडणूक आयोगाने अनेक कौतुकास्पद सुधारणा घडवून आणून सर्वसामान्य जनतेच्या विश्वासार्हतेला पात्र ठरले आहे. निवडणूक आदर्श आचारसंहिता हे एक उदाहरण आणि NOTA हे दुसरे.
 NOTA ला मतदान करणे म्हणजे कोणालाही मतदान न करणे अस नाही तर अनेक राजकीय पक्षांना आपला संदेश देणारे एकमेव मार्ग आहे. कारण NOTA ला प्रभावी माध्यम बनवण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक पाऊले उचलली आहेत. जर यादीत समाविष्ट उमेदवारांपेक्षा NOTA ला आधिक मत मिळाली असतील तर संबंधित क्षेत्रातील संबंधित निवडणूक लढवणारे उमेदवार बाद ठरवून त्या जागी नवीन उमेदवार उभे करुन नव्याने निवडणूक घेतली जावी अशा प्रकारचे प्रयोग निवडणूक आयोगाने याअगोदर च्या निवडणूकांमध्ये लहान स्तरावर केले आहेत.{हरियाणा}. मोठ्या स्तरांवर ही लागू करतील पण त्यासाठी थोडा आवकाश आहे. यासाठी आपण NOTA चा वापर प्रभावी करणे गरजेचे आहे कारण आपल्याकडे काही युरोपियन देशांसारखी लोक प्रतिनिधींना परत बोलवण्याचा कायदा सध्यातरी अस्तित्वात नाही आणि त्याची वाट पण बिकट दिसत आहे म्हणून दिलेल्या साधनांचा प्रभावी वापर करून आपण आपल्या निवडीविषयी जागृत आहोत हे दाखवणे गरजेचे आहे आणि याचाच जर प्रभावी वापर दिसून आला तर राजकीय पक्ष समजून घेऊन जनतेला ग्रहित धरण्याचा समज सोडून देतील आणि स्वच्छ व कार्यक्षम उमेदवारांना उमेदवारी जाहीर करतील
*=============================*

प्रदीप इरकर,वसई
माझ्या मते NOTA म्हणजे गोळ्या नसलेली बंदूक होय.
NOTA=NONE OF THE ABOVE
एखाद्या मतदारसंघात उभे राहिलेले सर्वच उमेदवार मत देण्यास लायकीचे नसल्याचे लक्षात आल्यावर NOTA हा पर्याय वापरावा लागतो,
त्यामुळे जर निवडणूकीमध्ये NOTA ला सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळाली तर आपल्याला मतदारांनी नाकारले आहे असा अर्थ उमेदवार गृहीत धरू शकतात,
परंतु त्यानंतर काय?
जर असा झालेच तर त्या मतदारसंघात फेरनिवडणूक होते काय?
जरी झाल्याचं तर ते उमेदवार ज्यांच्या पेक्षा NOTA ला जास्त मते आहेत त्यांना त्या मतदारसंघात निवडणूक लढवायला(काही काळासाठी) बंदी आहे का?

जेव्हा असे काही बंधने येतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणून शकतो की NOTA सक्षम झाला.
तोपर्यंत  आपले NOTA ला दिलेल मत हे वाया गेलेल्या मतासारखेच आहे...
*=============================*



ऋषिकेश जोहरे,डोंबिवली
       भारत एक असा देश ज्यात अनेक विध जाती जमाती भाषा . तेवढ्याच क्षमतेने असलेला प्रांतिक स्वाभिमान .या सगळ्यात देशाची चाललेली लोकशाही अत्यंत जीव कोंडून बसली आहे. कुठल्याही निवडणुका येतोय पहिला मुद्दा तो जात . या सगळ्यांना कंटाळलेले देशातले लोक पण लोकशाही वर अपार श्रद्धा असलेले लोक यांच्या साठी सर्वोत्तम असा पर्याय म्हणजे NOTA . आज अनेक असे लोक आहेत जे राजकारण ऐकला की त्यांची पायाची आग मस्तकात जाते . पण हाच राग व्यक्त करण्याचा प्रभावी तंत्र नव्हे तर शस्त्र म्हणजे NOTA . NOTA माध्यमातून आपण आपला राग व्यक्त करू शकता . कोणताच पर्याय न निवडता तुमची रोक ठोक भूमिका स्पष्ट करू शकता . याने लोकशाही बळकट तर नव्हे पण लोकशाहीत कोणत्या उमेदवाराला कोणत्या पद्धतीने निडवा व याची जान आणि योग्य ते ध्यान नक्कीच जनतेला मिळेल या वर विश्वास आहे .आजच्या राजकारणात नक्की कोणाला आपला प्रतिनिधी निवडावा हे जरी आपल्याला माहीत नसले तरी लोकांची उमेदवार बद्दल ची जागरूकता ही नक्कीच स्पष्ट होईल याबाबत शंका नाही .
*=============================*

पवन खरात,अंबाजोगाई

निवडणुका लागल्या की आपल्या देशात NOTA  (मत नाकारण्याचा अधिकार) या पेक्षा चलनी नोटांचा अधिकाधिक वापर होताना दिसतो.
        जर खरच तुम्हाला भारताचे भविष्य घडवायचे असेल आणि ही लोकशाही टिकवायची असेल तर चलनी नोटा पेक्षा NOTA  (मत नाकारण्याचा अधिकार) जाणून घ्या.
नोटा (NOTA) म्हणजे 'NONE OF THE ABOVE' कोणत्याही उमेदवाराला मत द्यावयाचे नसल्यास 'वरीलपैकी कोणीही नाही' हा पर्याय प्रत्येक मतदात्यासाठी मतदान यंत्रात उमेदवारांची यादीमध्ये सर्वात शेवटी असते. जर 'नोटा' हा पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या ही अधिक असेल तर ती निवडणूक रद्द होते व निवडणूक पुन्हा घेण्यात येते.
       18 सप्टेंबर 2015 रोजी नोटासाठी एक ब्लॅक क्रॉस असलेली एक मतपत्रिका, नोटाचा विशिष्ट चिन्ह सादर करण्यात आले. हे चिन्ह राष्ट्रीय डिझाईन ऑफ अहमदाबाद येथे डिझाइन केलेले आहे.
     नोटा अतिशय महत्वाचा अधिकार आहे, याचा विचार प्रत्येक मतदात्याने विचार नक्कीच करायला हवा.
जे उमेदवार लायक नाहीत त्यांना नक्कीच त्याची जागा दाखवावी आणि आपले मत योग्य आणि निर्णायक असायला हवे.
*=============================*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************