सांस्कृतिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सांस्कृतिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मराठी भाषेला अजूनही अभिजात दर्जा नाही:काय कमी पडत आहे ? राजकीय इच्छाशक्ती की साहित्यिकांचा दर्जा

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

Source: INTERNET
अक्षय पतंगे
आ बाळापुर, जि हिंगोली

    संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे वर्णन 'अमृततेही पैजेसी जिंके' असे केलेे. महानुभाव साहित्य आणि संत वाड:मयाने मराठीला भाषाविश्वात अभिजात स्थान मिळवून दिले. ग्रामीण साहित्यातून शेतकरी समाजाच्या सुख-दु:खाला न्याय मिळाला. स्त्रीयांचे योगदान स्त्रीवादी साहित्याने अधोरेखित करत, "शेतात जास्त कष्ट स्त्री घेते पण सातबारा पुरुषांच्या नावे का" ? असा प्रश्न विचारत करत पुरुषसत्ताक व्यवस्थेला आव्हान दिले. 'मी कामगार आहे,तळपती तलवार आहे', असं म्हणतं कामगार चळवळी उभ्या राहिल्या. दलित साहित्यानं जिंदाबादची गर्जना करत सामाजिक न्यायासाठी संघटन उभे केले. शेतकरी साहित्याने इंग्रजांवर आसुड उगारला.
      
      मुंबई कोणाची ? असा वाद सुरू होता, तेव्हा मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य असावं ही मागणी पुढे आली आणि आपल्या राज्याची स्थापना झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं आपल्याला वाटतं. पण काहीचं साध्य होत नाही कारण यासाठी राजकीय इच्छाशक्ती असायला हवी. भाषेवरून राजकारण चालतं हे खरं पण राजकारणाची भाषा मराठीला अभिजात दर्जा देण्यापासून रोखते आहे, असं मला स्पष्ट वाटतं.
   मराठी साहित्य दर्जेदार आहे, याबद्दल अजिबात शंका नाही पण साहित्यिकांना सुद्धा रस्त्यावर येण्यापासून कोण रोखतं ? असा माझा सवाल आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलनातून काय साध्य होते ? तर एक इव्हेंट, भेटी गाठी, माध्यमांना बातम्या, खवय्यांची गर्दी तर राजकीय पुढाऱ्यांना मराठी साहित्याविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ अन् वादविवादाला उधाण. मग ही 'साहित्य संमेलने म्हणजे रिकामटेकड्यांचा उदयोग' असं कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांचं विधान थेट वादग्रस्त न ठरवता ते का म्हणत असावेत ? यावरही विचार करणे गरजेचे आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधून साहित्यिकांच्या दर्जेदार लेखणीतून सरकारला पत्र लिहायला हरकत नसावी. नाहीतरी आजकाल पत्रांपेक्षा व्यवहार महत्वाचा आहे...!



Source: INTERNET
साईसागर घोरपडे,अहमदनगर

प्रथमता ज्यांनी हा विषय दिला त्यांचे खूप आभार मानतो , कारण हा खूप महत्वचा विषय आज आहे *मराठी भाषेला अजूनही अभिजात दर्जा नाही* सरळ आणि स्पष्ट सांगतो यात ना राजकीय ना साहित्यक इच्छाशक्ती कमी पडते .... यात कमी पडते ती तुमच्या आणि माझ्या सारख्या लोकांची समाज हा राजकीय लोक नाही घडवत , तो घडवला जातो तो समाजातल्या एक एक व्यक्ती ने , ६ व्या शतकात मराठी भाषेचा उदय झाला यैवडी जुनी आपली भाषा आहे तरी आपण आज मराठी बोलायला लाजतो , आज आपण आपलं गाव सोडून दुसऱ्या एखाद्या शहरात गेला तर हिंदी बोलतो ..समोरचा मराठी जरी असला तरी आपण हिंदी मध्ये बोलतो .... आज आमची पीडी हिंदी काव्य वाचते , हिंदी चित्रपट बघते .... मग काशी ही आपली मराठी भाषा आपल्याला प्रिय वाटलं ... खरं राजकीय व इतर लोकांना दोषी धारण्या पेक्षा आवण जर आग्रह धरला तर आज मराठी भाषेचा हा आपोआपच वाढलं ना हा विचार आपण कधी करणार.. सर्वात आधी तर हा विचार करावा आपण की आपल्या पैकी कीती लोकांना मराठी बाराखडी येते.. आम्हाला ABCD....पूर्ण येते आणि आम्ही नवीन पिटी ला A फॉर APPLE बोलायला लावतो आपण का सांगत नाही  *अ* रे *आई* चा पण बोलायला लावला पाहिजेन ...जेव्हा आपण आपल्यात हा बदल घडवण्यासाठी पर्यंत करणार नाही तो पर्यंत हा बदल घडणार नाही , आपण इतर भाषा शिकण्या साठी विविध पदव्या घेतो , का कारण दुसऱ्या देशात जाऊन तिथं काम करण्याची संधी भेटावी.. आपण अस का करू शकत नाही की दुसऱ्या देशातील लोक एक दिवस मराठी शिकण्या
चा आग्रह धरतील . या साठी आदी आपण आपल्या भाषे चा आदर केला पाहिजेन , आपण विविध क्षेत्रात प्रगती केली पाहिजैन ..इतिहास साक्षी आहे मराठी माणूस हा कधीच कमकुवत नव्हता आणि आज ही नाही फक्त तो जोपला आहे आणि त्याला आपल्याला जाग करण्याची गरज आहे ... जेव्हा तो जागा होईल तेव्हा मराठी भाषा ही देशात नाही तर परदेशात ही त्याला दर्जा प्राप्त होईल ...
तर मित्रानो आपण कायम बोलतो शिवाजी जन्मवावा तो दुसऱ्या च्या घरात .. तस न करता जर शिवाजीना  ला आवण जर आपल्यात जन्म दिला तर शिवाजी महराजना  बरोबर संभाजी ही जन्म घेईल .. सुरवात ही आपल्या पासूनच  केली तर दर्जा हा आपोआप भेटलं ..
जय शिवाजी ... जय मराठी



Source: INTERNET
जयंत जाधव,लातूर.

विषय खूपच छान आहे.सर्वप्रथम हा दिवस का साजरा करतात ते पाहू या.आज कविवर्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.दरवर्षी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो.
विषयाला अनुसरून आजच्या मुद्दयाकडे वळू.एक म्हणजे या विषयाची व्याप्ती ही सागराच्या अथांग खोली सारखी आहे.
सध्या आजच्या दिवशी सर्व मराठी भाषिक लोकांच्या तोंडी एकच चर्चा असते ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी मिळणार? याविषयी लातूर येथे एक चालता बोलता लोकांना अभिजात दर्जा म्हणजे काय असे प्रश्न विचारले तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढया कमी लोकांना उत्तरे दिलीत.विशेषतः महाविद्यालयीन युवकांमध्ये देखील याविषयी बोलताना  उदासिनता आढळून  आली.
अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय ?
- ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं ती भाषा अभिजात
- त्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास हवा
- त्या भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
वरील लिहलेला हा एक लहान असा प्रयत्न होता.

मराठी भाषेला अजूनही अभिजात दर्जा नाही:काय कमी पडत आहे? या गहन चर्चत राजकीय इच्छाशक्ती की साहित्यिकांचा दर्जा अशी तुलना केली तर माझे स्पष्ट मत आहे की राजकीय इच्छाशक्ती मराठी भाषाला अभिजात दर्जा मिळवून देण्यात कमी पडत आहे.कारण चार वर्षापूर्वी प्रा.रंगनाथ पठारे समितीने याविषयीचा अभ्यासपूर्ण अहवाल केंद्र सरकारला पाठविला आहे पण महाराष्ट्र शासनाची उदासिनता,कुचकामी प्रयत्न व दुटप्पी भूमिका कारणीभूत ठरत आहे.मराठी भाषा गौरव दिवस आला की आश्वासननांचा पाऊस पाडला जातो पण कृती मात्र शुन्य. दक्षिणेकडील राज्ये मातृभाषेसाठी ज्या शक्तीने आग्रही भूमिका घेतली आहे त्या प्रमाणात महाराष्ट्र सरकार करत नाही.यासाठी तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर सर्वसमावेशक दबावगट निर्माण केला पाहिजे.
महाराष्ट्रातील सरकार व राजकीय पक्षांनी आपले दूतोंडी धोरणे कटाक्षाने सोडावे.महाराष्ट्र सरकारला मराठी भाषेचा खरी काळजी व प्रेम असते तर २६.२.२०१८ सारखी मराठी भाषेचा अपमान करणारी घटना घडलीच नसती.राज्यपालांच्या अभिभाषणाचे अनवाद सभागृहात मराठी ऐवजी चक्क गुजराथी भाषेतून ऐकू येत होते .ही अत्यंत शरमेची बाब आहे.अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारचे मराठी विषयाचे प्रेम म्हणजे 'खायचे दात वेगळे व दाखवयाचे दात वेगळे '.आपल्या मराठी भाषेचा मान सन्मान आपणच करायला हवा.उदाहरणार्थ भ्रमणध्वनीवर ग्राहक केंद्रातून प्रतिनिधीला मराठीततून बोलण्याचा आग्रह करणे व नाहीच बोलला तर त्यांच्या सेवांवर बंद करा.आपण मागितले तरच आपल्याला मिळेल.यासाठी दक्षिणेकडेचा तमिळ,कन्नड ,तेलगू लोकांचे द्राविडी पराक्रमी गुण मराठी माणसाने अंगिकारला पाहिजेच.
मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही मागणी १९३८ पासून होत आहे.आता कुठे २०१८ मध्ये मराठी भाषा विद्यापीठ बँडस्टँड-वांद्रे,मुंबई उभारण्यात येणार असल्याची मान्यता मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांनी दिली आहे पण पूर्ण होईल तेव्हा खरे ?
दुसरा मुद्दा साहित्यिकांच्या दर्जाबाबत तर माझे स्पष्ट मत आहे की महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर-तुकाराम तसेच संत तुकडोजी,बहिणाबाई ते आधुनिक काळातील कुसुमाग्रज,प्र.के.अञे,वि.स.खांडेकर यांच्या सारख्या महान व अतिशय उत्कृष्ट साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य लाभले आहे.
त्यामुळे मराठी भाषेला अजूनही अभिजात दर्जा मिळण्यास राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे पण प्रत्येकाने  आपण स्वतःही आत्मपरिक्षण करावे की मराठी भाषेच्या विकासात  मला काय योगदान देता येईल.चला तर मग मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने आपण शपथ घेऊ या की मी आजपासून शक्य होईल तेवढे मराठीत बोलण्याचा व मराठी साहित्य वाचण्याचा,मराठीत काही ना काही लिहण्याचा प्रयत्न करेनच व हे करताना दुसऱ्या भाषांचाही आदर करेन पण माझे पहिले प्रेम मराठी राहिल."चला सुरुवात करुया,एकजुटीनं प्रयत्न जोडूया,बदल घडूया, माय मराठीला गौरुया."

मराठी नाटकाला प्रेक्षक नाही की प्रेक्षकांना भावणारं नाटक ?

🌱वि४🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून

               Source :Internet
मराठी नाटकाला प्रेक्षक नाही की प्रेक्षकांना भावणारं नाटक ?

         व्यंगचित्र:अभिजीत गोडसे,सातारा

संगीता देशमुख,हिंगोली:
पूर्वी करमणुकीची साधने नाटक,नृत्य हीच होती.दिवसेंदिवस त्यात बदल होऊन सिनेमा आला. खरेतर सिनेमा आल्यापासूनच प्रेक्षकांचे लक्ष नाटकाकडून कमी झाले होते. पण आजच्या एवढे परिणामकारक नव्हते. आज मात्र आपल्याकडे माहितीचा आणि मनोरंजनाचा अफाट सागर इंटरनेटच्या स्वरूपात उपलब्ध आहे. नाटक जेवढे करमणुकीचे साधन होते तेवढेच त्यातून सामाजिक विषय हाताळल्याने प्रबोधनही होत असे. वास्तविक पाहता आजच्या नाटकातूनही अनेक ज्वलंत विषय हाताळलेली आहेत. विनोदही आहे,प्रतिभाही आहे,कलाविष्कारही आहे परंतु मला वाटते,आज सर्वकाही घरबसल्या पहाण्याची सुविधा झाल्याने नाटके प्रेक्षकांना भावणारी असली तरी  प्रेक्षकवर्ग कमी झालेला आहे. हे नाटकाचे दुर्दैव म्हणावे लागेल.

           Source :Internet
डॉ.अजय N:
मराठी नाटक हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून तो गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, मराठी नाटकांना राजाश्रय व लोकाश्रय मिळणं कठीण झाले आहे. बालगंधर्व येणाऱ्या पिढीला माहित असतील का ? हा माझा प्रश्न आहे.

          Source :Internet
राजश्री,मुंबई :
  मराठी रंगभूमीला शतकांचा इतिहास आहे . विष्णुदास भावे यांनी सादर केलेल्या पहिल्या नाटकापासून , बालगंधर्व , पणशीकर , आचार्य अत्रे , श्रीराम लागू , जब्बार पटेल , तेंडुलकर , एलकुंचवार अशी अनेक नावे ज्यांनी मराठी रंगभूमी आणि मराठी जगणं समृद्ध केलं .मराठी नाटक म्हणजे ' आशयघन' अशी ओळख खरतर दबदबा निर्माण केला . संगीत नाटक , पौराणिक , ऐतिहासिक , नर्म विनोदी , शोकांतिका अशी नवरस युक्त नाट्ये रंगभूमीवर अवतरत गेली . कीर्तन , दशावतार , राम लीला , जाखडी हे प्रकार अजून वेगळे . रात्र रात्र चालणारे खेळ .. पुन्हा पुन्हा आळवली जाणारी पदे  ( आजचे वन्स मोअर ) , पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन आस्वाद घेणे ..हा काळही रंगभूमीने अनुभवला .
यात कलाकारांच रंगभूमीवरील प्रेम , निष्ठा होती .

          Source :Internet
सखाराम बाईंडर ला कडवा विरोध होत असतांनाही आहे तेच नाटक पुढे सुरू ठेवण्याचा तेंडुलकरांचा आग्रह , स्त्री असून सुद्धा , जोखीम पत्करून सादरिकरण करणाऱ्या लालन सारंग , त्यांना पाठिंबा असलेले कमलाकर सारंग यांचे खरतर अनंत उपकार आहेत.. त्यांनी पुरोगामी विचार केला म्हणून आज आम्ही वैचारिकतेचा टेंभा मिरवू शकतो आहे . घाशीराम कोतवाल , हमिदाबाईची कोठी , पुरुष अशी कितीतरी नाटके त्या त्या कलाकारांनी जपली , प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे .
तेंडुलकरांची  नाटकं आणि वाद हे तर समानार्थी शब्द पण तरी प्रयोग तुफान चालायचे.. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे नवीन काहीतरी लिहिण्यास लेखक उत्सुक असायचे , निर्माते नवीन प्रयोग रंगभूमीवर आणण्यास बिचकत नव्हते आणि कलाकार अभिनयाचा मनमुराद आनंद घेऊ शकत .
आज नाटके कसदार नाही असे म्हणताना आजच्या प्रेक्षकाच्या
मानसिकतेला  आपण विसरतो आहोत . पूर्वीसारखी आशयघन नाटके आणली तरी ते झेपणारा सुजाण प्रेक्षक आहे कुठे ? चेतन भगत पुढे ज्यांचे वाचन नाही , त्यांना आमचे तेंडुलकर कळणार कसे ? एलकुंचवारांचे वाडा चिरेबंदी बघून डोक्याला येणाऱ्या झिणझिण्या ज्यांना मान्य नाही किमान त्यांनी तरी नाटकाच्या आशयाबद्दल बोलू नये . रोजच्या रगाड्यातून सुटका हवी म्हणून नाटक बघणारा एक वर्ग आहे , किंबहुना मोठा वर्ग आहे , त्यांना विनोदी नाटक हवे असते . मुंबई बाहेर तर नाटक विनोदी असेल तरच थेटर लवकर मिळते . प्रेक्षकांच्या डोक्याला किक बसेल असं यात काही नसतं , मग त्याच त्याच विनोदावर बळजबरी हसायचे ( काय करणार , तिकीट महाग असतात..) आणि पूर्वीसारखी मजा नाही म्हणत परत यायचे .
 मी नथुराम गोडसे बोलतोय , या नाटकाला होणारा विरोध आता जरी मंदावला असला तरी तो नाहीसा झालेला नाही . असे असूनही या नाटकाचे १००० च्या वर प्रयोग करण्याचं धाडस त्या नाटकाची टीम करू जाणे . हि बाजू प्रेक्षकांसमोर जायला हवी असे मानणाऱ्या स्व. विनय आपटे यांना कोटी कोटी नमन . चौकात उभ राहून जर नथुराम गोडसे की जय म्हटलं तर संध्याकाळच जेवण कोठडीत अशी ' लोकशाही 'जिथे आहे तिथे नथुराम गोडसे ची बाजू मांडणं एव्हरेस्ट सर करण्यापेक्षा कमी नाही .
 घाशीराम कोतवाल ला झालेला विरोध , अगदी तयार झालेले सिनेमे आपल्याला त्या त्या समूहाला दाखवावे लागतात या अशा काळात प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी ओळखतो आहोत आपण ? पोलिसी बंदोबस्तात देखील लोक प्रयोग बघण्यास तयार नाहीत , आणि अशांसाठी जीवाची पर्वा न करता आशयघन नाटके का यावीत ?
         Source :Internet
 गावोगावच्या नाटय गृहांची अवस्था अतिशय दयनीय . ( प्रेक्षकांच्या सुजाणत्वाशी स्पर्धाच जणू ) . मेकअप रूम नाही , असलीच तर गळकी , खिडक्या तुटलेल्या , डास चिलटे , चोर यांचा सुळसुळाट , तुंबलेली स्वच्छतागृहे , रंगमंचावरील नसती उठाठेव करणारी मंडळी , गावात प्रयोग असेल तर कलाकाराला हैराण करून सोडणारी नेते मंडळी आणि त्यांची मंडळी या सगळ्यांचा सामना करत कलाकार कला सादर करतो तर तेव्हाही शिस्त किंवा सौजन्य म्हणून लोक पूर्ण प्रयोग बघत नाही , कुणाची मूल रडत आहेत , कुणाचा मोबाईल वाजतो आहे , कुणी घरगुती चर्चासत्र चालवत , कुणी चक्क ब्रम्हानंदी टाळी .. तरी कलाकारांनी नाटक मात्र आशयघन च दिले पाहिजे . तुमच्या गावात पाऊल  टाकल्यापासून गाव सोडेपर्यंत अशा अनुभवांचा सामना करावा लागला तर केवळ कलेवरील प्रेमाखातर म्हणून नाटक कंपनी कितीवेळा परत येईल ? कला सादर करणं , अभिव्यक्ती स्वातंत्र्य , कलाकाराला आवश्यक अशी स्पेस देणं या गोष्टी आपल्या खिजगणतीतही नाही , नाटक कसं होत या पेक्षा अभिनेता / अभिनेत्री सोबत फोटो काढला की खुश होणारे आपण , आपल्याला खरच आहे हक्क चांगली नाटके होत नाही म्हणून ओरडा करण्याचा ?
            Source :Internet
चला तर आधी प्रेक्षक म्हणून , माणूस म्हणून आपले वाचन वाढवू , मनाच्या कक्षा रुंदावू , कलाकृती समजून घेण्याआधी विरोध करणं टाळू  , कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊ , आणि माणूस म्हणून त्याला त्याच्या कर्मभूमीत पुरेशा सुविधा आहेत की नाही याची पोच घेऊ ...
असे झाले तर रंगभूमीचे सुवर्णयुग अगदी जवळ...
हे काय आलेच...
तिसरी घंटा झालीच..

        फोटो:जयंत जाधव

जयंत जाधव,लातूर:
विषय खुप छान आहे हा.आपल्यालापैकी बरेच जणांनी शाळा,महाविद्यालये इत्यादी मंचावर नाटकं पाहिली असतीलच किंवा काम केलेले असेलच.मी सुध्दा एक कलावंत आहे.शाळेत,महाविद्यालयात व सामाजिक कार्य करत वेगवेगळ्या विषयावर जनजागृती करताना माझा पथनाट्ये व नाटकं यांचे शी संबंध आला आहे.

Source :Internet
"नाटक म्हणजे एक ठरवून दिलेली चौकट किंवा संहिता नसते, कलाकाराने त्यात व्यक्त होणे अपेक्षित असते".नाटकाचा एक  संदेश-मुद्दा ठरलेला असतो.मग तो सामाजिक,आर्थिक,राजकीय कुठल्याही विषयावर असू शकतो.सध्या सगळीकडे ओरड सुरू आहे की मराठी नाटकांना प्रेक्षक नाही.मध्यंतरी परिस्थिती होती तशी.पण आता नाही सध्या मराठी नाटकं यांना चांगले दिवस आले आहे.मुळातच प्रेक्षकांना हवे हवे वाटणारे विषय जर आले तर पाहणारे प्रेक्षक आपोआप आकर्षित होतात.हे अलिकडच्या मराठी नाटकांना झालेल्या गर्दीवरुन दिसून येते.मुळात, नाटकांना प्रेक्षक नाही हा मुद्दाच नाही असं नाट्यनिर्मात्यांचं म्हणणं आहे.चांगली, दर्जेदार नाटकं असतील, नाटकात मोठे कलाकार असतील तर प्रेक्षक त्या नाटकांना गर्दी करतात.अनेक दर्जेदार नाटकं चांगली चालत असून, काहींनी तर ७५, १००, १५० प्रयोग असा पल्ला गाठला आहे.‘वाडा चिरेबंदी’ ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकांचे संयुक्तपणे सव्वादोनशे प्रयोग मे महिन्यातच पूर्ण झाले.सिद्धार्थ जाधवची धमाल कॉमेडी असलेल्या ‘गेला उडत’नं १५० प्रयोगांचा टप्पा अलीकडेच ओलांडला.मंगेश कदम आणि लीना भागवत या जोडीच्या ‘के दिली अभी भरा नही’चा शंभरावा प्रयोग  झाला होता.त्यानंतर सव्वाशेवा प्रयोग  पुण्यात झाला.म्हणजे १०० ते १२५ हा टप्पा या नाटकानं अवघ्या २८ दिवसांतच पूर्ण केला.
प्रेक्षक खुप चाणाक्ष असतात.जोपर्यत त्यांना नवीन काही पाहायला मिळत नसेल तर काय चांगले काय नाही हे कसे ठरवता येईल.त्यामुळे पारंपारिक प्रयोग सोडून नाटकांमधे नवीन प्रयोग होणे गरजेचे आहे.नाटकाचा प्रेक्षक सुजाण, चौकस असतो.जे चांगलं आहे त्याला लोक प्रतिसाद हमखास देतात.मनोरंजनाची माध्यमे बदलली पाहिजे.नाटकाचा प्रसार-प्रचार सोशल मिडियावरुन करणे,विविध विषयांना स्पर्श करणे,मुलांना नाटके दाखवण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन देणे इ.उपाय करण्यासारखे आहे.मराठी नाटकं पुढे यावं यासाठीच्या अनेक  पध्दती बदलल्या तरच  कलाका व प्रेक्षकांचं रंगभूमीवरचं प्रेम नाटकाला पुढे आणेल यात शंका नाही.

        Source :Internet
किरण पवार,औरंगाबाद:
            काही बाबतीत जर गांभीर्याने विचार केला तर वरील दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. मराठी नाटकाला प्रेक्षक नाही कारण स्वत: नाटककार सध्या तेवढ्या आत्मियतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा दुसर महत्त्वाच कारण म्हणजे प्रेक्षकाला प्रत्येक वेळी करमणूकच हवी आहे. पुर्वीचा प्रेक्षक आणि सध्याचा प्रेक्षक यांच्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये बरीच तफावत असलेली पहायला मिळते. सध्या आपण नाटकांकडून जी अपेक्षा ठेवतो ती अपेक्षा बऱ्याच वेळा अवास्तव असते.

             Source :Internet
आपण दिलेली प्रत्येक चांगली गोष्ट प्रेक्षकांना हमखास आवडते. *कधीकधी आपण नाटककार काही प्रमाणात चुकीचे असू शकतो, शेवटी प्रत्येक माणूस चुकतोच.* पण म्हणून प्रेक्षकांनी नाटकं चांगली राहिली नाहीत, असा शिक्का मारणही चुकीच आहे. *जर महाराष्ट्राचा विचार केला तर आजही कोकण विभागात छोट्या छोट्या गावांमध्ये नाटकं होत असलेली आपल्याला पहायला मिळतात आणि त्यांना प्रतिसादही उत्तम मिळतो. "दशावतार" हे आपल्याला परिचित असलेल उदाहरण आहे.* थोडक्यात जर दुसरी बाजू मांडली तर मराठवाडा, विदर्भ वा इतर भागात त्या प्रमाणात नाटकं होतच नाहीत. मग प्रश्न असा उभा राहतो की, *जर नाटक प्राथमिकतेच्या उभारल्या जात नसेल तर पुढे चालून नाटकांसाठीचा प्रेक्षक तयार होणार कसा?* त्यामुळे कुठेतरी कलाकारांच्या किंवा शाळकरी नाटकांची परिस्थिती बदलायला हवी. शाळकरी नाटकातही गावागावात कलाकारांची कमतरता भासते आणि बऱ्याच वेळा नाटकं रद्द करावी लागतात. या अशा गोष्टी नाटकाच्या भविष्यावर खूप मोठ संकट उभारतात.
               *सांगायचा मुद्दा एवढाच की, नाटकांसाठी व्यासपीठं तयार करा, संघटीत व्हा, पालकांनी मुलांना त्याकरता प्रोत्साहन द्या, गावातील बंद पडलेली नाटकं तरुणांनी पुढाकार घेऊन चालू करा आणि या गोष्टी कराल तर नक्कीच मराठी नाटकाला प्रेक्षक भेटेल आणि प्रेक्षकांना भोवणार नाटकही हमखास तयार होत राहील. नाटक केवळ संस्कृती म्हणून नाही तर जगण्याची नवी उमेद म्हणून त्याकडे पहा.*

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************