रक्षाबंधन - भावा बहिणीचे बदललेले भावनिक संदर्भ.


वैशाली सावित्री गोरख .पंढरपूर(पुणे)
             रक्षाबंधनाचा अर्थ मी पहिल्यापासून हाच ऐकत आलेय की भाऊ बहिणीच रक्षण करतो म्हणून बहीण भावाला राखी बांधते म्हणजेच धागा जो आयुष्यभर भावाने आपल्या पाठीशी उभे राहावे ह्याच प्रतीक आहे .पण माझ्या बाबतीत हे अतिशय वेगळं आहे मी जेव्हा लहान होते म्हणजे आठवी पर्यंत मी शाळेत कार्यक्रमाला डान्स घ्यायचे तेव्हा माझा भाऊ घरी येऊन आई जवळ खूप तक्रार करायचा एक मोठा भाऊ ह्या नात्यानं मला धाकात ठेवण्याचा तो प्रयत्न होता पण लवकरच आमच्या वेगळ्या आयुष्याला सुरुवात झाली ,जीवनाशी संघर्ष ,शिक्षणासाठी संघर्ष त्यात मला माझ्या भावाने प्रत्येक गोष्टीत साथ दिली ते पण अशा पद्धतीने की मी कधी वैचारिक रित्या स्वतंत्र झाले ते मलाच समजलं नाही .आमच्या घरात आम्ही दोघांनीही काम करून शिक्षण घेतलं त्यामध्ये माझ्या भावाने मला अकरावीच्या अडमिशन घेऊन दिल व सांगितले की इथून पुढचे तुज्या जीवनाचे प्रत्येक निर्णय तुझे असणार मग चुकली तरी त्याला जबाबदार तू स्वता असशील नि हीच माझी खरी सुरुवात होती .नंतर पुण्याला शिक्षणाला आल्यानंतर ही तेच झालं जेव्हा मी पुण्यात पहिल्यादा येणार होते त्यावेळेस मला सांगितल गेलं की एकटी ये ,पुण्यासारख्या शहरात एकटं येण म्हणजे माझ्या साठी खेड्यातील मुली साठी खूप अवघड गोष्ट होती पण मी ते ही धाडस केलं त्यावेळेस मी भैय्याला भांडायचे की तुला माझी काळजी नाही तू मला एकटीला कसा प्रवास कण्यासाठी सांगू शकतोस पण माझ्या लक्षात येत नव्हतं की ते माझं ट्रेनिंग चालू होतं एक सक्षम स्त्री ,बहीण,मुलगी बनण्याचं व त्यामुळे आज मी कुठेही धाडसाने जाऊ शकते .ज्यावेळेस मी मी एकटीने ट्रेक केला त्यावेळेस माज्या भावाला खूप आनंद झाला होता .आजही मी कुठे फिरायला जायचं असेल तर मला घरात कोणाला विचारावं लागत नाही फक्त काळजी नको म्हणून मीच सांगत असते.तो माझ्यापेक्षा तीन वर्षांने मोठा आहे तरीही मी त्याला त्याच्या नावाने बोलावते,हक्काने त्याला घरातील काम सांगू शकते व तो ती त्याची जबाबदारी म्हणून करतो. एक मित्र म्हणून माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी त्याला सांगते व त्याच्या ही सगळ्या गोष्टी विचारून घेते .आमच्या मधील हे नात कधीच भाव नि बहीनिच न राहता एक चांगला मित्र म्हणून तयार झालं आहे मी सामाज्यात पाहते की खूप जास्त प्रमाणात भाऊ आपल्या बहिणींवर नजर ठेवत असतात पण माझा भाऊ मला सांगत असतो हा हा फिल्म खूप छान आहे बघायचा असेल तर बघून ये .त्यानं स्वतःला डेव्हलप केलेली ही एक वेगळी विचारसरणी आहे त्यामुळे मी सक्षम होण्यास प्रयत्न झाला आहे .प्रश्न राहिला रक्षाबंधनाचा,दिवाळीतील भावाची ओवळणीचा ,नागपंचमीचा भावाचा उपवास तर मी ह्या कोणत्याच गोष्टी करत नाही नि आमच्या घरात होत ही नाहीत .माझा भाऊ रक्षण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभा नाही तर मला सोबत घेऊन चालत आहे असे हे आमुचे बदलते भावनिक संबंध आहेत .



अर्जुन (नाना) रामहरी गोडगे,
सिरसाव ता-परंडा जि-उस्मानाबाद

नात प्रेमाचं तुझं अन माझं आहे ..
सय येते बारक्यापाणीच्या दिसाची..!!
गमावलले ते गोड दिवस..
आठवत राहतात आजही..!!
मनी भाव दाटत राहतोय..
हातातल्या राखीसोबत..!!
बंद हे प्रेमाचे नात आहे
ताई हे आपलं जन्मजन्मोचं आहे..!!


*संगीता देशमुख,वसमत*
          आपल्याला रक्षाबंधनाचा इतिहास फार प्राचीन आहे. इंद्राच्या खचलेल्या हातावर त्यांच्याच पत्नीने राखी बांधून पतीचा आत्मविश्वास वाढविला होता तर कृष्णाच्या जखमी बोटावर आपल्या पदराची चिंधी बांधून त्याच्याशी मैत्रीपूर्ण भावाचे संबंध प्रस्थापित केले होते. चित्तोडगढची राणी कर्मावतीने बहादूरशाहपासून  स्वतःच्या रक्षणासाठी मुघल हुमायूँला राखी बांधली होती. याचाच अर्थ असा की,हा सण आपण भावाबहिणीच्या ऋणानुबंधाचा मानत असलो तरी इतिहास पाहता हा सण रक्षणाचा आहे. आपण यास राखीपोर्णिमा म्हणत असलो तरी त्यापेक्षा रक्षणासाठी बांधलेला धागा म्हणून "रक्षाबंधन" हे नाव अधिक समर्पक वाटते. कोणी यास कजरी पोर्णिमा,कोणी राखीपोर्णिमा तर कोणी नारळीपोर्णिमा म्हणतात. रक्षणाच्याच हेतूने बांधले जाणारे हे बंधन,म्हणून रक्षाबंधन!  आज ही प्राचीन परंपरा आपल्यापर्यंत झिरपत आली आहे. कालानुरूप सर्वच बाबी आहे तशा आपण स्वीकारत नाहीत. आपल्या सोयीनुसार आपण काय स्वीकारायचे आणि काय नाकारायचे हे ठरवत असतो. तसाच हा अनेक सणांपैकी असणारा रक्षाबंधनाचा सण! 
            पूर्वी सासुरवाशीण बहीण भावाची आतुरतेने वाट पहायची. त्याला राखी बांधण्यापेक्षाही त्याच्याशी हितगुज साधून माहेरची वास्तपुस्त करणे,माहेरच्यांची सर्वांची ख्यालीखुशाली विचारणे आणि त्यासोबतच आपलेही मन मोकळे करणे घडायचे.  तिच्या साचलेला मनाचा निचरा व्हायचा. माहेरची खुशाली ऐकून अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटायचे. तेवढाच संसाराचा दाह कमी होऊन संसारात नव्याने हुरूप चढायचा. माहेरून येणारी माणसेच काय ती संपर्काचे माध्यम होते. परंतु आजकाल विवाहित मुलींना एकतर पूर्वीसारखा  सासुरवास नाही आणि दुसरे म्हणजे संपर्कासाठी हातात मोबाईलसारखे साधन आले. सर्वात महत्वाचे आजच्या चौकोनी कुटुंबात त्यांचीच सत्ता असल्याने भावनांच दमन होत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे या सण उत्सवात रस वाटत नाही. ज्या आस्थेने हे सण साजरे व्हायचे त्याविरुद्ध आता आस्था जाऊन तिथे दिखाऊपणा आला. आता सण साजरे करण्यामागे प्रतिष्ठा हा हेतू प्रभावी ठरतो आहे. आजकाल इथे पैशाची उधळण,भपकेबाजपणा आला. आई आपल्या घरातल्याच  लेकराला प्रत्यक्ष शुभेच्छा देण्याऐवजी आधी फेसबुकवर शुभेच्छा देऊ लागली. या सोशल मिडियाने माणसामाणसातले भौगोलिक अंतर कमी केले पण भावनिक अंतर मात्र निश्चितच वाढवले आहे. कारण आजकाल दिवस सेलीब्रेशनचे आहेत. प्रत्यक्षात कोणत्या बाबी होवोत अथवा न होवोत परंतु "कालाय तस्मै नम:" प्रमाणे आधी त्या बाबी सोशल मिडियावर अपलोड केल्या जातात. मग याला नाती तरी कशी अपवाद असतील? नातीही अशीच आज हळूहळू कोरडीठाक होत चालली आहेत. नात्यातील ओलावा नात्याच्या मुळांपर्यंत न पोहोचता तो सोशल मिडियावरच्या दिखाव्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. मग त्यात नाती कोणतीही असोत,तीही सवंग आणि उथळ जगात वहावत जात आहेत
कुटुंब अधिकाधिक छोटी होत चालली,घराच्या भिंती रुंदावू  लागल्या तशीच नात्यातील अंतरही रुंदावत आहे. नात्याला घट्ट बांधून ठेवणारी धागे आजकमकुवत झाली आहेत. परंतु भावा-बहिणीच्या नात्याचा घट्ट बांधून ठेवणारा राखीचा धागा मात्र जेवढा कोमल तेवढाच तो जबाबदारीत बांधून ठेवणारा राकट धागा आहे.  परंतु हे बहीणभावाचे नाते काही ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जाऊ पहात आहे.
         पूर्वीची बहीण भावाला प्रेमाने जिंकून घेण्याचा प्रयत्न करायची तर आजच्या काही बहीणी भावाच्या संपत्तीत बरोबरीने वाटा मागून घेत आहेत. कायद्याने अधिकार मिळतो पण प्रेम उरत नाही. त्यामुळे आज रक्षाबंधन जवळ आले की,भावाच्या पायाना  बहिणीकडे जाताना जी ओढ होती त्यात आज थोडी धाकधुक आली,कारण बहीण राखीच्या बदल्यात साडीचोळीच्या रूपात काय मागेल,हे सांगू शकणार नाही. यात बहीण आहे आणि भाऊ सधन आहे,असेही काही नाही. बहीणही सधन असली तरी भावाच्या संपत्तीत तिला वाटा हवा असतो.  पण अशी उदाहरणे फार तुरळक आहेत. अजूनही अनेक बहिणी आपल्या भावाला फार श्रध्देने,आस्थेने राखी बांधतात. माझा भाऊ माझे रक्षण करीलच आणि आपण बांधलेल्या राखीने तो अजून सक्षम होईल,दीर्घायुषी होईल,अशी आशा बाळगतात. पण आजच्या काही बहिणी अशाही आहेत की,ज्या भावापेक्षा अधिक सक्षम आहेत. अनेक ठिकाणी त्याच आपल्या भावाच्या पाठीराख्या म्हणून कणखरपणे उभ्या आहेत. अनेक कमावत्या बहिणी आज अविवाहित राहून भावाच्या संसाराला तोलून धरणाऱ्या आहेत. आजच्या भावालाही आपली बहीण स्त्री म्हणून कमजोर वाटत नाही,तर ती भरभक्कम आधार वाटते. राखी ही  रक्षणाचे प्रतीक आहे. ती कोणी कोणाला बांधली,हे महत्वाचे नसून दोघेही एकमेकांचे रक्षक ठरावेत,एकमेकांना एकमेकांचा आधार वाटावा,हे आज अपेक्षित आहे. मला राखी माझी बहीण आहे तशी या जगातील प्रत्येक मुलगी,स्त्री ही कोणाची ना कोणाची बहीण आहे. माझ्या बहिणीसोबतच तिचे रक्षण झाले पाहिजे. स्त्रीवरचा अन्याय,अत्याचार थांबवता आला पाहिजे,तिच्यावर होणारे बलात्कार थांबवता आले पाहिजे,अशा उदात्त हेतूने भावाने ही राखी आपल्या बहिणीकडून बांधून घ्यायला हवी. मग ही फक्त बहीण भावापुरती राखीपोर्णिमा रहाणार नाही तर ती सुदृढ,निकोप समाजासाठी खरे "रक्षाबंधन" ठरेल. अशाच "जबाबदार  रक्षाबंधना" साठी सर्व बहीण आणि भावाना शुभेच्छा!



अमोल धावडे ,अहमदनगर

बहन का प्यार किसी दुआ से कम नहीं होता,
वो चाहे दूर भी हो तो गम नहीं होता,
माना कि रिश्ते दूरियों से फीके पड़ जाते हैं,
लेकिन भाई-बहन का प्यार कभी कम नहीं होता।।

हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या उदंड आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते त्याचप्रमाणे भाऊ तिच्या संरक्षणासाठी तिला वचन देतो व आयुष्यभर तिचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहतो हे सांगायचे कारण आज काही कामकाजानिमित्त बन पिंपरी या ठिकाणी गेलो होतो. गावाकडील लोकांचे प्रेम म्हणजे यात शँकाच नाही घरात कितीही गरिबी असली तरी घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत मनापासून करतात. आज एका मुलाच्या गृहभेटी दरम्यान चर्चा करत असताना सदर परिवारातील मुलीचा विषय निघाला. तिचे नाव मानसी नाव काल्पनिक किती शिक्षण झाले तर तिने सांगितले ९ वी तुन शिक्षण सोडले व आई वडिलांनासोबत शेतीचे काम करते. वडील दारू पितात पुढे शिक्षण करायचे नाही. वयाच्या १४ व्या वर्षी तिचा साखरपुडा केला. मुलीशी बोलत असताना तिला पुढे शिक्षण कारवायाचे आहे समजले. चहा घेवून झाल्यावर आम्ही निघालो तर मुलगी ओवळणी ताट घेऊन आली ते पाहून मी बोललो हे काय तर तिने सांगितले की दादा रक्षबंधन जवळ आली आहे तर तुम्हला राखी बांधायची आहे. ऐकुण आनंद झाला व मोठा भाऊ म्हणून तिने मला राखी बांधली आणि ओवाळणी म्हणून तिच्या पालकांना संगितले की मुलीचे शिक्षण बंद करू नका तिला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मला निसंकोचपणे फोन लावा. आज मला आणखी एक छोटी बहीण मिळाली. देवाचे आभार. मी ठरवलंय की तिच्या पुढील भविष्यात कोणत्याही प्रकरची मदत लागो ती मी एक मोठा भाऊ म्हणून करण्यास तयार आहे. 
खरच गावाकडील जीवन खुप सुंदर व लोक त्याहूनही प्रेमळ असतात.😍😍
#Thanksमानसी..
सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा💐

20 ऑगस्ट...कधी मिळेल जवाब ?

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿

20 ऑगस्ट...कधी मिळेल जवाब ? 


१)सौदागर काळे,पंढरपूर

या 20 ऑगस्टला नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाला 5 वर्षे होत आहेत.मुख्यमंत्र्याच्या तोंडून 'फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र'असे शब्द खूप वेळा सामान्यपणे बाहेर पडत असतात.तेव्हा त्याच तोंडातून दाभोळकर-पानसरे या महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा पुढे चालवणाऱ्या विचारांचा खुनीचे नाव अजून कसे काय बाहेर पडत नाही!त्यांच्या अभ्यासाची सवय गृह विभागाला पण लागली असेल का?समजत नाही कोणकोणत्या गोष्टीचा जवाब मागायचा?कधीपर्यंत कार्यकर्त्यांनी  संयमाने,विवेकपणे 'who killed Dabholkar?"म्हणत जवाबाची वाट बघायची आणि खुद्द न्यायालयाने पण कधीपर्यंत सरकारला तपास जलद करा म्हणून सुनवायचे?

आता हे #जवाबदो अभियान संपूर्ण देशात सुरू केले आहे. पण सरकार जर नौटंकीपणाचा अभिनय करत असेल तर असे किती वर्षे अभियान चालवायचे? हा पण विचार करावा लागेल.

नरेंद्र दाभोळकर-गोविंद पानसरे यांचा खून करणारे सनातन संस्थेच्या निगडित आहेत ,याचा निर्वाळा काही चालू असलेल्या तपासातून बातम्यांद्वारे समजते.यांच्यावर हा संशय  फक्त  कार्यकर्त्यांचा,विवेक विचार करणाऱ्यांचा नाही तर सर्व सामान्यांचा पण आता दृढ झाला आहे.काही दिवसांपूर्वी मुंबईत याच सनातन साधकाच्या घरात बाँब बनवण्याचे साहित्य सापडते.तेव्हा या संस्थेवर सरकारला अजून कारवाईसाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज आहे  !

ज्यांना आपण जवाब मागतो आहे ते सरकार आंधळेपणाचे, मुकपणाचे , बहिरेपणाचे, पांगळ्यापणाचे नाटक करत असेल तर .....तर सवाल संपणार नाहीत.

२)अर्जुन( नाना) रामहरी गोडगे,सिरसाव ता.परांडा जि.उस्मानाबाद                                                

              महाराष्ट्रातल्या पुरोगामी, विज्ञान आणि विवेकवादी चळवळींचा प्रेरणास्त्रोत असलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज, दि. २० ऑगस्ट २०१८ रोजी पाचवा स्मृतिदिन. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे लोटली, तरी त्यांच्या मारेक-यांचा तपास लागलेला नाही. विचारांचा सामना विचारांनी करणा-या या सज्जन कार्यकर्त्यांचा आणि हजारो कार्यकर्त्यांचे नेतृत्व करणा-या या प्रबोधनकाराचे खुनी पाच वर्षात सीबीआय आणि विशेष गुन्हे शाखेला सापडू नयेत, याची शरम वाटायला हवी. ही बाबच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समजल्या जाणा-या राज्यासाठी लांच्छनास्पद आहे.
          दाभोलकर यांच्यानंतर  कॉम्रेड गोविंदराव पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांचीही हत्या झाली. पानसरे आणि कलबुर्गी यांच्याही हल्लेखोरांना पकडण्यात यश आलेले नाही. समाजाला पुढे नेणारा विचार मांडण्यासाठी स्वत:ची हयात खर्ची घालणा-या समाज सुधारकांच्या एकापाठोपाठ हत्या होतात आणि मारेकरी पकडले जात नाहीत, ही समाजासाठी चिंतेची आणि पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब आहे. सत्तेत कोणताही पक्ष असला तरी तपासातील प्रगती कूर्मगतीनेच सुरू आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात जी काही प्रगती झाली आहे, ती उच्च न्यायालयाने तपासाची देखरेख सुरू केल्यानंतरची आहे. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या झाल्या. न्यायालयाची देखरेख, सामाजिक संघटनांचा पाठपुरावा, जनमनातील अस्वस्थता हे सगळे असूनही दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचा तपास इतक्या संथगतीने चालू असेल, तर सर्वसामान्य माणसावरील अन्यायाला कधी न्याय मिळणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
          सर्वात अस्वस्थ करणारी उदासीनता आपल्या देशातील संघटित दहशतवादाच्या विरोधात काम करण्यासाठी स्थापन झालेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेची आहे. त्यांनी मडगाव बॉम्ब स्पॉटतील आरोपी व अन्य लोकांना पकडले असते तर दाभोलकर, पानसरे , कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या टळू शकल्या असत्या, असे वाटते. सत्तेत पक्ष कोणताही असो; धर्माच्या नावावर दहशत पसरवू इच्छिणा-या शक्तींना अगदी नाइलाज झाल्याशिवाय तपासायचे नाही, हे धोरण या संथगती तपासाच्या मुळाशी असल्याचे दिसते. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी,गौरी लंकेश या चारही हत्या या काही वैयक्तिक अथवा कौटुंबिक कारणांतून झालेल्या नाहीत, हे आतापर्यंतच्या तपासातून आणि आरोपपत्रांमधून स्पष्ट झालेले आहे. पटत नसलेले विचार द्वेषबुद्धीने आणि नियोजनबद्धपणे संपविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे जोपर्यंत हे मारेकरी फरारी आहेत, तोपर्यंत विवेकी विचार मांडणा-या लोकांना कायम धोका राहणार आहे.
           दाभोलकरांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याला उजाळा देत, राज्यभर त्यांचे फक्त स्मृतिदिनी स्मरण होत आहे. राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात डॉ. दाभोलकरांचा दिवसाढवळ्या खून झाला. विचारांचा सामना विचारांनी करणा-या या सज्जन कार्यकर्त्यांचा आणि हजारो कार्यकर्त्यांचे नेतृत्व करणा-या या प्रबोधनकाराचे खुनी पाच वर्षात सीबीआयला सापडू नयेत, याची शरम सरकारलाही वाटायला हवी. डॉ. दाभोलकरांच्या हत्येने सारा महाराष्ट्रच नव्हे, तर देशही हादरला होता.
          डॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांना अटक करा, या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अनेक राजकीय पक्षांची आंदोलने आजही सुरू आहेत. डॉ. दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांना विज्ञान आणि विवेकवादी विचारांची बैठक असल्यामुळेच, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या चळवळीला व्यापक पाठिंबा मिळत होता. ते स्वत: सा-या राज्यभर जनजागरणासाठी अविश्रांत परिश्रम करत होते. महात्मा फुले, राजर्षी छ. शाहू महाराज, आगरकर, डॉ. आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक विचारानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांच्या जोखडातून मुक्त व्हावा, हे डॉ. दाभोलकरांचे स्वप्न होते. त्यासाठीच ते सलग चौदा वर्षे सरकारशी आणि या विधेयकाला विरोध करणा-यांशी झुंजत राहिले. ते उदारमतवादी असल्यामुळेच विचारांचा विरोध विचारांनीच करायला हवा, यावर त्यांचा विश्वास होता. दाभोलकर यांची सनातन्यांकडून हत्या झाल्यानंतर राज्यभरात जो लोकक्षोभ उसळला त्यावरून सरकारने खडबडून जागे होत जादूटोणाविरोधी विधेयकाचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.
           हा निर्णय घेण्यासाठी दाभोलकरांच्या रूपाने विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठ विचारांचा एक बळी द्यावा लागला, ही बाबच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समजल्या जाणा-या राज्यासाठी लांच्छनास्पद आहे.
          अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिलेच पुरोगामी राज्य ठरले. सरकारने केलेल्या या कायद्याचे स्वागतही झाले. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार केलेल्या विधेयकाच्या प्रारूपावर काही धर्ममरतडांनी जोरदार हल्ले चढवत हा धर्मात हस्तक्षेप असल्याचा कांगावाही केला होता. डॉ. दाभोलकर हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचा अपप्रचार काही हितशत्रूंनी केला होता. पण प्रत्यक्षात मात्र उदारमतवादी डॉ. दाभोलकरांना विज्ञानवादी समाजाच्या निर्मितीसाठीचे भक्कम पाऊल म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, असे वाटत होते. हाच त्यांच्या मूलभूत विचारांचा गाभा होता. त्यामुळेच धार्मिक पूजा-अर्चा, धार्मिक विधीला आपला विरोध नाही, अशी भूमिका घेत, सरकारशी चर्चा करून त्यांनी सरकारने तयार केलेल्या या विधेयकाला मान्यताही दिलेली होती. केवळ त्यांच्या समाजप्रबोधनाच्या चळवळीमुळेच महाराष्ट्रात हा कायदा झाला.
          समाजातील दीनदुबळ्यांवर, अशिक्षितांवर, विशेषत: महिलांवर धर्माचा, अनिष्ट परंपरांचा प्रचंड पगडा असून अंधश्रद्धेच्या मार्गातून या जनतेचे मानसिक, आर्थिक, सामाजिक शोषण होत असते आणि ही नवी व्यवस्था समाजात वेगाने पसरते आहे याकडे दाभोलकरांनी लक्ष वेधले होते. दाभोलकर हे काही अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लढणारे एकमेव कार्यकर्ते नव्हते. आपल्या संतांनी चार-पाचशे वर्षापूर्वी समाजातल्या भोळसट, अविवेकी, अज्ञानातून निर्माण झालेल्या रूढींविरुद्ध लढा पुकारला होता. संतांनी सुरू केलेली विवेकवादाची, बुद्धिप्रामाण्यवादाची लढाई दाभोलकर एक परंपरा म्हणून पुढे लढत होते. ही संतपरंपरा आधुनिक कायद्याच्या रूपात यावी यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन खर्च केले होते. पण जसे संतांना काही धर्म पाखंडय़ांच्या रोषातून जावे लागले, तसा रोष दाभोलकर यांनाही सोसावा लागला. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत हिंदू कर्मकांडाविरोधात बोलणा-या ज्ञानेश्वरांना वाळीत टाकण्यात आले होते. विवेकाला आव्हान देणारे तुकारामांचे अभंग इंद्रायणीत बुडवले गेले होते. या संतांचा धर्मपाखंडय़ांनी जो छळ केला होता तशी परिस्थिती दाभोलकरांच्याही वाटय़ाला आली होती. जे काही समाजातील वाढत्या धर्मवादाविरोधात, फॅसिझमच्या विरोधात बोलतात त्यांचा आवाज कायमचा बंद करून टाकणे, ही संस्कृती महाराष्ट्रात महात्मा गांधींच्या खुनापासून रुजवण्यात आली आहेच. तीच संस्कृती दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेतून पुन्हा उफाळून आली.
          दाभोलकरांचे जादूटोणाविरोधी विधेयक केवळ हिंदू धर्माच्या विरोधात नाही, तर ते सर्व धर्मामधील कर्मकांडाच्या विरोधात आहे, हे सत्य नाकारत हिंदू सनातनी दाभोलकर हे हिंदू देवादिकांचे अवमूल्यन करत आहेत, असा विचार पसरवत होते. दाभोलकर खुलेआम चर्चेला आव्हान देत होते, तेव्हा धर्माभिमानी या चर्चेपासून दूर पळत होते. दाभोलकर गावोगावी, गल्लोगल्ली, उन्हातान्हातून, एसटीतून प्रबोधनासाठी वणवण फिरत असताना धर्माभिमानी हिंदू धर्मावर चहुबाजूंनी आक्रमण होत आहे, हिंदूंवर अन्याय होत आहे, असा टाहो फोडत होते. तेव्हा दाभोलकरांना आपल्या जीवाला धोका आहे याचीही कल्पना होती; पण ते नेहमीच निर्धास्तपणे, धाडसाने समाजसुधारणेची लढाई गावागावात जाऊन लढत होते. पोलिसांनी त्यांना झेड सिक्युरिटी देण्याचे कबूल केले, पण हे संरक्षणही त्यांनी नाकारले. कारण आपल्याला संरक्षण मिळेल; पण सामान्य कार्यकर्त्यांचे संरक्षण कोण करणार, असा त्यांचा सवाल असे. अशा मवाळवादी, उदारमतवादी आवाजाचा धर्माभिमान्यांनी धसका घेतला. या धसक्यातून सनातन्यांनी हिंदू धर्माला अधिकाधिक आक्रमक बनवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात सुशिक्षितांची, उच्चशिक्षितांची भरती होत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर आणि अराजकसदृश होत जाणार आहे. दाभोलकर म्हणत, ब्रिटिशांनी तत्कालीन सनातन्यांचा विरोध पत्करून हिंदू धर्मात सुधारणा व्हाव्यात म्हणून सतीबंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करून घेतला होता. आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके होऊनही लोकशाही स्वीकारलेल्या या देशात मूलगामी स्वरूपाचे सामाजिक सुधारणेचे कायदे होत नाहीत, ही खरी चिंतेची गोष्ट आहे. आयुष्यभर धर्माच्या नावाखाली भोंदूबाबांकडून होणारी लूट, नरबळी, जादूटोणा, मंत्र-तंत्र, चेटूक, ढोंगबाजीला कडाडून विरोध करणा-या डॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी मांत्रिक-तांत्रिकांची मदत घेतल्याचे प्रकरणही गाजले.त्यावर जोरदार टीकाही झाली.
लोकशाहीच्या चौकटीत राहून दाभोलकर आपले वेगळे विचार मांडत असतील आणि त्या विचारांची हत्या करणे ही लोकशाहीच्या गाभ्याची हत्या आहे. सर्व प्रकारच्या मागे निश्चिततच घाणेरडे राजकारण करून कधी जाब मिळेल हे सांगता येत नाही. यांचे मारेकरी न सापडणे म्हणजे भारतीय लोकशाहीची दिवसाढवळ्या झालेली हत्या. याचे मारेकरी भारतातील कोणत्याच सुरक्षा यंत्रणा ला सापडत नाहीत. यासारखी अपमानास्पद गोष्टी नाही, मूग गिळुन बसलेले राजकारणी त्यांना काही करून देत नाहीत हे माझ्यासारखं अतिसर्वसामान्य माणसाला पडलेलं कोड आहे. झोपलेल्या झोपेतून उठवता येत पण झोपेचे सोंग करणाऱ्या कसं उठवाच. बाकी सर्व नाटकं समजतात पण मी काहीही करू शकत नाही याचे दुःखही होतंय.

३)शुभम राधेश्याम,  पंढरपूर

    "कानून हात बहुत लंबे होते हे जनाब "  हा घासून पुसुन गुळगुळीत झालेला संवाद आपण आजवर कित्येक हिंदी चित्रपटामध्ये पाहिला आहे आणि ते  'बहुतांश ' सत्यही आहे  ,पण  डॉ. दाभोळकराच्या केसमध्ये 'मारेकऱ्यांचे हात' हे 'कायदा तयार करनाऱ्याच्या' हातापर्यत पोहोचले आहेत आणि हे अदृश्य व अधिक शक्तिशाली हात 'कायद्याची अमलबजावणी' करनाऱ्या तथाकथित 'लांब' हातावर प्रभाव व दबाव टाकतात  त्यामुळे २० ऑगस्टचा जवाब कधी मिळेल हे सांगणे अवघड आहे.

४)किशोर शेळके. लोणंद. जि. सातारा

    आपण 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती' हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचे थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व उभं रहातं. कोणत्याही स्वार्थाशिवाय केवळ समाजप्रबोधन करावे या भावनेतून त्यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो कार्यकर्ते उभे करून एक चळवळ उभी केली. आणि ती चळवळ यशस्वीपणे राबवत असताना काही समाजकंटकांच्या अघोरी वृत्तीला सामोरे जावे लागले. खरंतर या मातीमध्ये अश्या व्यक्तिमत्त्वाला प्रत्येक नागरिकाने वंदन केले पाहिजे पण या मातीचे दुर्दैव असं की दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांसारख्या व्यक्तींना छातीवर गोळ्या झेलून मरण पत्करावं लागलं.

      २० ऑगस्ट २०१३ या दिवशी डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून करण्यात आला याची खंत आहेच पण याहीपेक्षा मोठं दुर्दैव म्हणजे या गोष्टीला पाच वर्षे उलटूनही हे हैवानी कृत्य करणारी राक्षसं अजून मोकाटच आहेत. भारतीय तपास यंत्रणा अजून तरी सक्षम समजली जाते. ज्या गोष्टीला पाच दिवसांचा अवधी पुरेसा होता ती गोष्ट पाच वर्षांत पूर्ण होऊ शकत नसेल तर या यंत्रणेवर विश्वास ठेवावा का?. हा खुप मोठा प्रश्न आहे.

       डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांनी स्वतःला समाजकार्यात वाहून घेतले होते. अनिष्ट प्रथा व अंधश्रद्धा या गोष्टींचा त्यांनी कडाडून विरोध केला. ज्या लोकांना त्यांची ही गोष्ट आवडली नाही त्या लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य बंद पाडावे या हेतूने त्यांचा खून केला. पण त्यांच्या पश्चात हमिद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे असंख्य कार्यकर्ते यांनी डाॅ. नरेंद्र दाभोळकरांचा तो लढा तेवढ्याच जोरात चालू ठेवला आहे.

      डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून म्हणजे त्यांच्या चाहत्यांना व कार्यकर्त्यांना न पचनाराच होता. त्यांच्या खुनाचे मारेकरी शोधण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. या विरोधात कार्यकर्त्यांनी अंहिसेच्या मार्गाने अंदोलन चालू ठेवले आहे. पण तरीही सरकारने याची कोणतीही दखल घेतली नाही. सरकारला जाग यावी यासाठी आणि जाणीवपूर्वक करत असलेल्या चुकीच्या तपास यंत्रणेविरोधात आपलाही थोडा हातभार असावा हीच अपेक्षा.
शब्दमर्यादेमुळे जास्त काही लिहू शकत नाही पण माझे वाचकांना आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने या लढ्यात सहभागी व्हावे.


५)शीतल शिंदे,दहिवडी

      " अंधश्रद्धा निर्मूलन समीती " _  अध्यक्ष  डॉ .नरेंद्र दाभोलकर.हे नाव इतिहासात अमर राहील...
    लोकांना गठरातून बाहेर काढायचे नाही तितेच पडुदयायचे असे झाले आहे आता आणि जर कोणी काडायचे म्हटले तर तो कायदा /देश  चालवनाऱ्याच्या विरोधात काम करतोय असे म्हणावे लागेल. जागृती केली की पोट कसे भरणार.लोकांच्या बुद्धिला तान दयायचा नाहीं नाहीतर बुद्धि चालेल त्यांची.
     पुनः फीरून प्रश्न तिथेच येतो.
           माझ्या दुषकृत्याना माझा भाऊ आड आला तरी मी त्याची गय करणार नाही .असे काहींच्या रक्तातच नाहीतर वंशबिज DNA मधेच आसते,हे डॉ बाबासाहेबांनी  अभ्यास करुण, सिद्ध करून, लिहून ठेवले होते.
 तशी उदाहरणे सुद्धा आहेत इंग्रज काळापासून ते आतापर्यंत.
बघा अभ्यास करुण सर्व समाज सुधारकांना,महापुरुषाना मरणारे अथवा त्यांच्या मारनास  कारणीभूत कोण आहेत. महात्मा गांधी,संत तुकाराम ,संत नामदेव माऊलींचे आई वडील, महात्मा बशेवश्वर,राजा भृहद्रथ,महात्मा फुलेवर कट, बलिराजाचा वध,
शिवराय,संभाजीराजे.
     एकटे माईचे लाल  नरेंद्र दाभोलकर,वागले सोडले तर.
      हत्या करनारांचे हात कायद्यापर्यंत पोहोचलेले नाहीत तर कायदा चलवायला लावणार्याणि एथपर्यंत हात पोहोचवले आहेत.सत्ता कोणाचीही असो कायदा कोनिपन बनवला असो तो चवलनार आम्ही 👍.हे  हात! कायदा हातात घेणारे जोपर्यंत मुळातून उपटून काढले  जाणार नाही तोपर्यंत हे असेच बलि जाणार.
दभोळकरांचे मारेकरी सापडत नाहीत की सापडू  देत नाहित,आणि सापडतील की नाही हे नंतर.मात्र यांचे कार्य पुढे सर्वानी चालू ठेवले पाहिजे. तर च  त्यांचे स्वप्न पूर्ण होईल असे मला वाटते.
     कायदा बनवलाय चांगला पण त्याचा वाइट वापार करायला लावणारी पिलावळ जोपर्यंत थांबंवली जाणार नाही तोपर्यंत असेच चालू राहणार.

  म्हणून खरा इतिहास वाचने खुप गरजेचे आहे.

६)संगीता देशमुख,वसमत जि. हिंगोली

"२० ऑगस्ट २०१३" हा दिवस पुरोगामी महाराष्ट्रासाठी "काळा दिवस"च म्हणावा लागेल. या महाराष्ट्राची जडणघडण ही पुरोगामी म्हणून झालेली आहे. पण आज एकविसाव्या शतकातील स्थिती  पहाता पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल मात्र उलट्या दिशेने होत आहे,हेच लक्षात येईल.ज्या विभूतीने सामान्यजनांसाठी जीवाचे रान करून समाजातील अंधश्रद्धा संपविण्याचा प्रयत्न केला,त्याच सामान्य जणांच्या हाताने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना संपविले. डॉक्टराना संपविणारे हात जरी सामान्यांचे असले तरी त्या हातातील बंदुकीच्या गोळ्या मात्र सामान्य जणांच्या नव्हत्या. त्या गोळ्या होत्या पाताळयंत्री समाजकंटकाच्या! गोळ्या झाडणारी हात सापडली तरी,त्यांना पकडण्याचे धाडस हे शासन करत नाही म्हटल्यावर त्यामागच्या हाताना शोधण्याचे किंवा त्यांना जाब विचारण्याचे धाडस हे शासन करेल का?
             आणि हे हात नेमके कोणाचे होते,हे मात्र सरकारला शोधून काढावेसे वाटले नाहीत. ज्यांना त्यांच्या हत्येचा तथाकथित  रचलेल्या कटाचा शोध आधीच लागतो पण दिवसाढवळ्या भरवस्तीत डॉक्टरांचा खून होतो आणि त्या घटनेचा तपास अजूनही लागत नाही,हे कोणत्याही विवेकनिष्ठ व्यक्तीला पटण्यासारखे आहे का? आज या घटनेला पाच वर्ष पूर्ण होत आहेत.या घटनेचा जाब कोणाही सामान्य माणसालाही  विचारावासा वाटला नाही. ही किती खेदाची बाब आहे! याउलट  डॉ. दाभोळकरानंतर ,कॉ. पानसरे,डॉ. कलबुर्गी,गौरी लंकेश अशा विचारवंतांच्या हत्येची साखळी सुरू केली. या देशात विचाराच्या लढाईला बंदुकीच्या गोळीने संपविल्या जाते आणि गुन्हेगारांना संरक्षण दिल्या जाते. आणि याचं सोयरसुतक कोणालाही नाही. त्या देशाची वाटचाल "तेजाकडून तिमिराकडे" सुरू आहे,असं खेदाने म्हणावं लागतं.
         डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा विरोध हा देवपूजेला किंवा धर्माला नव्हताच. अजूनही सामान्य माणसांपर्यंत त्यांच्या विचारांचा अपप्रचारच केल्या जातो. ढोंगी बुवाबाजी आणि तथाकथित स्वतःला साधुसंत म्हणवून घेणाऱ्या लोकांकडून होणाऱ्या फसवणुकीला विरोध होता. पण  "यथा राजा,तथा प्रजा" या म्हणीप्रमाणे जनताही कधी व्यवस्था म्हणते त्यात किती सत्य आहे,हे पाहण्याचा प्रयत्न करत नाही. कोणीही डॉ. दाभोळकरांचे  विचार वाचण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यांना ऐकण्याचा प्रयत्न करीत नाहीत. याउलट अज्ञानामुळे त्यांच्या हत्येचे समर्थन करणारेही लोक इथे कमी नाहीत. कधीकधी असंही वाटतं की,डॉ. दाभोळकरांचे बलिदान व्यर्थ गेले. कोणासाठी डॉ. दाभोळकरांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवले होते? इथे कोणी कोणाला शिवीगाळ केली की,त्या त्या समाजाचे लोक पेटून उठतात. मग दिवसाढवळ्या होणाऱ्या डॉ. दाभोळकरांच्या हत्येविरुध्द कोणी का आवाज उठवत नाही?
एकामागोमाग एक विचारवंतांच्या हत्या होतात आणि आम्ही हातावर हात ठेवून निमूटपणे बसतो.  डॉ. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांची नावेही बाहेर आली आहेत. ते खुलेआम मोकाट फिरत आहेत.एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन  हे प्रकरण थांबविले जाते.  मागील वर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच संदर्भात "जबाब दो" हे आंदोलन सुरू केले होते. पण त्याचा जबाब कधी मिळेल,किंवा मिळेलच की नाही,हेही सांगता येणार नाही. जर मारेकरी आणि त्यांचे मास्टरमाइंड असेच मोकाट फिरणार असतील तर बाकी विवेकनिष्ठ विचारवंतांनी विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. तुमच्या विचाराच्या लढाईला कसे उत्तर दिले जाईल, याचाही विचार करावा लागेल.  २० ऑगस्ट २०१८ रोजी डॉ. दाभोळकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण  होतील. बाकी विचारवंतांना  विवेकनिष्ठ विचारांची पेरणी करायची की गांधारीसारखी डोळ्यावर जाणूनबुजून पट्टी बांधून घ्यायची? हा ही विचार करावा लागेल! जर विचाराची लढाई खंबीरपणे चालूच ठेवायची असेल तर आधी  डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे  मारेकरी  कधी पकडल्या जातील? त्यांच्यावर कारवाई कधी होणार? हत्येमागचे मास्टरमाइंड कधी शोधणार?  या प्रश्नांचे  जाब विचारणे आवश्यक आहे. २० ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकरांना मूकपणे  श्रद्धांजली देऊन भागणार नाही. तर त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त शासनाला पुन्हा एकदा शासनाला प्रश्न विचारावा लागेल.आणि जवाब मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा लागेल  तरच त्यांचा स्मृतिदिन करण्यात अर्थ उरेल. सहावा स्मृतिदिन येण्यापूर्वी डॉ. दाभोळकर,कॉ. पानसरे,डॉ. कलबुर्गी यांचे मारेकरी पकडले जावेत,अशी इच्छा व्यक्त करून डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!!

७)प्रा. रोहन बाळकृष्ण वर्तक,लोणावळा ता. मावळ.जि. पुणे

20 ऑगस्ट 2011.... सकाळच्या प्रहरी मी रेल्वे स्टेशन उभा होतो आणि माझ्या भावाचा फोन आला आणि सुन्न करणारी बातमी सांगितली... क्षणार्धात मी निशब्द आणि असंख्य विचारांनी गुरफुटून गेलो.
हे का आणि कशासाठी, कुणी केलं असेल हे काम, कसं काय शक्य आहे हे? अनेक प्रश्न मी स्वतःलाच विचारात राहिलो आणि अनुत्तरित होत गेलो....

श्री शिवाजी उदय मंडळ, सातारा ह्या मंडळाचे सक्रिय सदस्य म्हणून खरंतर माझ्या परिवाराची आणि श्री नरेंद्र दाभोळकरांची ओळख, आणि ह्याच मंडळाची लोणावळ्यात स्थापना करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आणि त्यातून त्यांचा लाभलेला सहवास, एवढंच आमचं प्रत्यक्ष नात.
अत्यंत स्पष्ट आणि निःसंकोच आयुष्य जगलेला माणूस आणि सामाजिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने निर्भयपणे उभा केलेला एक विचार. ही माझ्या मनी उभी राहिलेली त्यांची प्रतिमा. कधी वैयक्तिक आयुष्यात भीती हा शब्द जरी उभा राहायचा प्रयत्न केला की दाभोळकर हे नाव मी स्वतःहून समोर सजवतो आणि भीतीला दूर पळवतो.
जनतेच्या मनात अधिराज्य केलेल्या "देव" ह्या संकल्पनेला नेस्तनाभूत  करून वैज्ञानिक दृष्टिकोनाची आस धरणाऱ्या दाभोळकरांचा खून होणे ही आपल्या देशाच्या भविष्याची चिंता वाढविणारी घटना आहे, आणि ह्या चिंतेत भर की काय आज 5 वर्षे पूर्ण होऊनही त्या मारेकऱ्याचा शोध न लागणे होय.
आज बदलत चाललेली समाज रचना, धर्म केंद्रित प्रवृत्ती,  आणि जाती पातीत विरघळून नष्ट होत चाललेली मानवाची नैतिकता या मुळे दाभोळकर यांचा सारखे विचारवंत काळाच्या पडद्याआड होताना आपण बघत आहोतच. यासर्वांकडे कटाक्षाने बघताना मला प्रश्न पडतो की, धर्म संकुचित मंडळी आपल्या पुढील पिढीला प्रतिष्ठे करता का होईना इंग्रजी शाळेत शिकविणारा समाज, आज देखील स्वतःमध्ये बदल घडून देत नसेल तर 20 ऑगस्ट चे उत्तर भेटणे अशक्यच आहे.
सध्याची राजकीय सत्ता त्या सत्तेतील राजकर्त्यांमध्ये मुरलेला मनुस्मृतीचा विचार यामुळे ह्याविषयाकडे बघण्याचा शासनाचा दृष्टीकोन पक्षघाती आहे हे निश्चितच.

आज संध्याकाळी झळकल्या बातमीनुसार औरंगाबाद येथील सचिन अणदुरे हयाने श्री दाभोलकर ह्याच्यावर गोळी झाडली असे CBI ने स्पष्ट केले परंतु ह्याची सत्यता तपासताना शासन कीती कोणापुढे गुढगे टेकटाय ह्यावर वरील प्रश्नचा जबाब अवलंबून राहील.
*=========================*

India is under serious crisis of nature degradation. Every state is the victim of wrath of the nature. This time Kerala, The God’s Own Country. Kerala is facing its worst flood in 100 years. More than 300 people have lost their lives and over 2 Lakh people have been displaced. 12 districts has badly affected.One of MP also shared a fear of lost of 50,000 lives. Around Rs 20,000 crore lost is occurred in the wrath of nature. There was demand of Rs. 2000  crore from Central government. Central Government has sanctioned only Rs. 500 Crore. 


It’s a time for common  people like us to help our brothers and sister from Kerala. Its an urgent need to help the God’s Own Country. The coverage in mainstream media is also hardly there unfortunately. Therefore it is important that common people like us help! You can donate directly to the Chief Minister’s distress relief fund (CMDRF) through the bank account given below. Whatever amount possibleLink: https://donation.cmdrf.kerala.gov.in/



Do good and someone will return the favour in doing good for you too



संविधान जाळणे , हा नेमका कशाचा निषेध ?

संविधान जाळणे हा नेमका कशाचा निषेध?

संदिप बोऱ्हाडे, वडगाव मावळ,पुणे.
             आम्ही भारताचे लोक , या शब्दांनी भारतीय संविधानाची सुरूवात होते. सर्व भारतीय नागरिकांचा गौरव आणि सन्मान ग्रंथ म्हणजे संविधान.
संविधान आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते.

    संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा. आपण ज्या देशाचे नागरिक असतो, त्या देशाचा कायदा आपल्याला पहिल्यांदा मान्य करावाच लागतो.
तो ज्यांना मान्य नसतो, तो माझ्या दृष्टीने देशद्रोहीच.
जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून आपला देश ओळखला जातो ते फक्त आपल्या संविधानामुळेच.

    जात, धर्म, रंग, वर्ण, लिंग कशाच्याही आधारे नागरिकांत भेदभाव करता येणार नाही,
हे संविधानाचं तत्व.. आपला राष्ट्रध्वज, आपले राष्ट्रगीत आणि आपले संविधान हे आपले सर्वांचे तीन मानबिंदू. जशी राष्ट्रध्वजाबद्दल, राष्ट्रगीताबद्दल तशीच आस्था देशातल्या नागरिकांना देशाच्या संविधानाबद्दलही हवी.

     भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संविधानाचा अपमान काही लोकांनी केला आहे.
संविधान जाळणे ही देशातली सगळ्यात दुर्दैवी घटना आहे, या घटनेचा जाहीर निषेधच!
विषय कोणताही असो, तुम्हाला समर्थनार्थ किंवा विरोधात मत मांडण्याचा पुरेपूर अधिकार आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचाही अधिकार आहे, पण संविधान जाळण्याच्या कृतीचं कदापि समर्थन होऊ शकत नाही. पण  संविधान जाळल्यानंतरही
या देशातील जनता जर अजूनही शांत रहात असतील तर हे देशाचं दुसरे दुर्दैव, जाती, जमातीच्या अफुच्या नशेत लोकं 'लोकशाही' ला सर्रासपणे पायदळी तुडवुन अपमान करीत आहेत, ही येणार्या काळात 'देशात अराजकतेची' वाटचाल असल्याची धोक्याची घंटा आहे!

     संविधान जाळण्याऐवजी एखाद्या धर्माचा ग्रंथ जाळला गेला असता, तर त्या धर्मातील लोकं पेटून उठले असते..
काय काय झालं असतं ह्याची प्रचिती सर्वांना आहेच.
मग राष्ट्रीय ग्रंथ जाळल्या गेला तर एकाही न्यूज पेपर ला न्युज चॅनेल नाही कि, उशिरा न्यूज चॅनेल्स वर चर्चा सुरु नाही. कारवाईच तर नाव नाही. अवघड आहे माझ्या देशाच..
   
      जस इतिहास , भूगोल, विज्ञान , गणित टप्याटप्याने शिकवले जाते. तस राज्याची घटना का नाही शिकवली जात....? पण हे कुणाला करायचच नाही, हे जर झाल तर  राजकारण " कस खेळल जाईल. कुणालाच संविधान साक्षरता नको.

शेवटी जर संविधान वाचले तरच देश वाचेल अन्यथा हुकूमशाहीच !!


 

अनिल गोडबोले , सोलापूर.
         लोकशाही मध्ये एखादी गोष्ट पटली नाही की निषेध करण्याचा अधिकार आहे. आणि निषेध करणे हे चांगल्या समाजाचे लक्षण देखील आहे..

पण ज्या नियमामुळे आपल्याला सर्व अधिकार मिळाले आहेत किंवा ज्या संविधानाला बनवायला आपले पूर्वज झटले, जे सर्वात मोठी लोकशाही आणि लिखित स्वरूपात असेलेले संविधान म्हणून प्रसिद्ध आहे. तेच जाळण्यात आले.

आपल्याकडे राष्ट्रीय प्रतीक हे खूप उच्च स्थानी असतात आणि त्यांचा अपमान करू नये यासाठी कायदे देखील आहेत..

परंतु आपण कायदे पाळतो कुठे? .. संविधानाचा अपमान तर देश चालवणारे पदोपदी करत असतात म्हणून खरतर संविधान जळणाऱ्या पेक्षा ते काही कमी दोषी नाहीत.

संविधान जाळणे हा नेमका भारतीय म्हणून स्वस्तात मिळालेल्या अधिकारांचा निषेध आहे.
माणुसकीचा निषेध आहे.
प्रत्यक्ष कृती करताना त्यांना काहीच वाटले नाही, कारण त्यांना असाच इतिहास सांगितला गेला आहे जो द्वेषमूलक विचाराने प्रेरित आहे.

कायदा मोडणारे, संविधान जळणारे किंवा देशा विषयी उदासीन असणारे किंवा देशाच्या हिताचा निर्णय न घेणारे हे सगळेच देशद्रोही आहेत.

आरक्षणाचा मुद्धा किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा मुद्धा हा निमित्तमात्र आहे.

संविधान आहे म्हणून तर आपण सगळे बोलू शकतो नाहीतर मुंडकीच उडवण्याची पद्धत होती राजेशाही मध्ये..

मला वाटत फक्त मतांसाठी केलेलं राजकारण आहे. मूळ मुध्ये बदलून टाकायचे किंवा भावनिक खोट्या मुध्या मध्ये तरुण वेगळा करायचा आणि मत मिळवायची पुन्हा सगळे जिकडे तिकडे... असा प्लॅन आहे सगळा

कुठल्याच राजकीय पक्षाला विकास आणि मूलभूत हक्कांसाठी काम करायचंच नाही.. त्यांना फक्त या आणि अशाच मुद्यावर विचलित करणे हाच खेळ आहे असं चित्र दिसत आहे..

पण संविधान जाळणे हे निंदनीय कृत्य आहे. त्याच समर्थन कधीच।करता येणार नाही.


 

शिरीष उमरे नवी मुंबई

तसा मी वैश्विक विचारसरणीचा पण आपल्या देशाची संस्कृती व संविधान बद्दल मला खुप अभिमान आहे.

*वसुधैव कुटुम्बकम्* हे प्रत्येक भारतीय मानत असला तरी मानवाने जमीनीवर व परस्परात रेघोट्या ओढुन कीतीतरी भिंती उभ्या केल्यात.  त्या उध्वस्त झाल्या आपल्या संविधान मुळे !!

एकच पृथ्वी आहे आणि आपला देश  वैश्विक विचारसरणीचा पुरस्कर्ता ✨👍🏻 पण काही समाजकंटक परत द्वेषाच्या रेघोट्या ओढुन मनामनात चरे पाडुन आपल्या मध्ये जातीधर्माच्या भिंती उभारण्याच्या  तयारीत आहेत...

यामागील खरे कारण राजकारण .... निवडणुका जवळ आल्या की ह्या जनावरांच्या कटकारस्थानाला सुरुवात होते...
हे दंगली घडवुन आणतील... सातवा वेतन आयोगाचे गाजर दाखवतील... कदाचित शेजार राष्ट्रासोबत युध्द घडवुन आणतील. आरक्षण आंदोलने, पुतळे विटंबना, हींसा, खुन, रेप तर होतच राहतील... कोणता पक्ष कीती वर्ष जुना आहे ह्या ला महत्व नाही... देशसेवेत व विकासात त्यांचे काय योगदान राहीले हे महत्वाचे !!

संविधान जाळल्या गेल्यावर  मिडीया कीती विकल्या गेली आहे हे लक्षात आले. राजकीय पक्ष आपली पोळी भाजुन घेत आहेत...आपण सामान्य माणसे स्वताचे डोके फीरवुन घेतोय.  ह्या विकृत लोकांचा निषेध करुन होणार नाही...

सडेतोड उत्तर द्या ...

 निवडणुकीत जातपात धर्म आणि राजकीय पक्ष न बघता निष्कलंक, निगर्वी, निष्कपटी, भ्रष्टाचारी नसलेला, गुन्हेगार नसलेला, रेपीस्ट/मर्डर/डाका न करणारा, युवा व सच्चा नागरिक असलेल्या उमेदवाराला निवडुन द्या 🙏🏼




प्रविण, मुंबई
           स्वतंत्र भारताच्या सुरवातीला अनेक वर्ष जातीय बंधनात अडकलेला एक मोठा शोषित वर्ग या देशात होता, त्यांना मुख्य प्रवाहात आणण हे मोठ आवाहन या देशासमोर होत. हजारो वर्ष दबलेला समजा, त्याच्या न्याय हक्कापासून वंचित होता आणि मानव असूनही अमानवी आयुष्य कंठीत होता. स्त्री ला कस्पटासमान मानणारा पुरुषप्रधान समाजच त्यावेळी प्राबल्य होत. तिला डावलून देशकार्य करण कठीणच होत. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशासमोर अनेक समस्या होत्या. दलित आणि महिला या वंचित घटकांच्या प्रगतीशिवाय देश प्रगत होणार नाही. याची जाणीव तात्कालिक पुरोगामी नेत्याना होती. त्यामुळे एक सर्वसमावेशक संविधान देण गरजेच होत.

बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तशी एक घटना तयार हि केली. We the people of India ….अशी संविधांनाची सुरवात होते. संविधानाने आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार दिलाय. अधिकारासोबत त्यात अनेक गोष्टींची तरतूद केली गेली आहे कि जेणेकरून शोषित घटकांना न्याय मिळावा, समाजात एक स्थान मिळव आणि एक आदरपूर्वक आयुष्य जगता याव. पण ज्यावेळी घटना तयार झाली तेव्हापासून काही धर्मांध आणि मुलातात्वाद्याकडून सतत संविधानाची अवहेलना केली गेली आणि आजही चालू आहे. ९ ओगस्ट २०१८ ला  जे संविधान जाळण्याच प्रकरण झाल हे धर्मांध शक्तींनी पेरलेल्या द्वेषातून घडल आहे. या घटनेचे बीज हे धर्मांध शक्तीकडून रोवले गेले आहेत. हि धर्मांध बीजे  आपल्या नेहमीच आपल्या समोर अनेक माध्यमातून पेरले जात असतात, कधी ती संघटनेच्या रुपात, कधी बिनडोक नेत्यांच्या भाषणातून, तर कधी सोशल मेडिया च्या रुपात बीजारोपण चालू आहे.
संविधान जाळण हा नेमका कशाचा निषेध होता?

हा निषेध देशाच्या “धर्मनिरपेक्षतेचा” होता.....

हा निषेध देशातील प्रत्येक पुरोगामी लोकांचा, त्यांच्या विचारांचा निषेध होता, ...

हा निषेध लोकशाहीचा होता.....

हा निषेध मानवाला मानव मानणाऱ्या विचारसरनीचा होता......

देशामध्ये अशा घटनेची वेळ नेमकी का आली याचा विचार करणे गरजेच आहे. हा दोष हा त्या २०-२५ लोकांचा, ज्यांनी संविधान जाळले त्यांचा नाही. त्यानी हे कृत्य केल कारण कोणीतरी त्यांना प्रभावित करत होत. या निषेधाला समर्थन होत ते मानुवाद्यांच, कारण मनुवाद जिंदाबाद चे नारे त्यावेळी लावले गेले. या आधी असा प्रकार नाही झाला गेल्या ५ वर्षातील घटना जर पहिल्या तर संविधान जाळण्याचे बीज कसे रोवले गेले हे कळून येईल.

देशात मोठ्या पुरोगामी नेत्यांच्या हत्या झाल्या ...डॉ . दाभोळकर, कॉ पानसरे, कलबुर्गी आणि गौरीलांकेश यांची हत्या धर्मांध लोकांकडून झाली पण तपास शून्य. दोनच दिवसापूर्वी उमर खालीद वर भ्याड हल्ला झाला.

भीडतन्त्रचा वापर करून गोराक्षेच्या नावाखाली अल्पसंख्याकांच्या झालेल्या हत्या
मेडिया ला हाताशी घेऊन जातीवाद, भ्रष्टाचार ला  विरोध करणाऱ्या JNU च्या विद्यार्थ्यांच्य

बनावट चित्रफिती करून त्यांना देशद्रोही करण्याचा झालेला प्रयत्न

सतत हिंदू-मुस्लीम वादावर प्राइम टाइम मध्ये विकलेल्या वृत्तवाहिन्यांकडून दाखवण्यात येणार्या चर्चा (भांडण)

भीमा-कोरेगाव दंगल, त्याचा कुचकामी तपास आणि मेडिया ट्रायल द्वारे पसरवला गेलेला द्वेष

हे सर्व गेल्या चार वर्षात या देशाने पाहिलं त्यामुळे संविधान जाळणे हि घटना आश्चर्य करणारी नक्कीच नाही. शेकडो आश्वासन देणारे आणि ते पूर्ण झाले असे छाती ठोकून सांगणाऱ्या मोदींचा सर्वात मोठा पराभव हा ९ ओगस्ट २०१८ ला झाला. देशाचा अभिमान जाळला गेला.. संविधान जाळल गेल त्याचा निषेध फारच दुर्मिळ वाटला आणि नेहमी प्रमाणे यावरही प्रधानसेवकांची NO COMMENT . इथ मनात विचार आल कि जर एखाद्या धर्माचा ग्रंथ जाळला असता तर काय झाल असत? ....

देशातील बराच मोठा वर्ग आहे (मग तो कोणत्याही जातीचा वा धर्माचा असो) जो आपली सद्सदविवेक बुद्धी  काही नेत्यांकडे गहाण ठेऊन असामाजिक कृत्ये करत आहे. (जर स्वतःची सद्सदविवेक बुद्धी वापरून संविधान वाचल असत तर कदाचित ते  जाळण्याच कुकर्म केलेंच नसत ). स्वतंत्र दिनी अशी अपेक्षा करतो कि अशा वर्गाला उसन्या विचारांकडून स्वतंत्र मिळू दे. देशाला संविधान पुढे नेऊ शकत ना कि कुठला धर्म, पंथ वा जात. १९४७ साली देश राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाला पण सामाजीक परतंत्र तसेच राहिले. या देशा आज गरिबी पासून, उपसामारीपासून, जातीवादापासून आणि उसन्या भडकावू विचारांपासून  स्वतंत्र हव आहे आणि संविधान हाच एकमेव मार्ग आहे. या लेखाद्वारे सर्व भारतीयाना कळकळीची विनंती आहे कि संविधान वाचवा तरच देश वाचले अन्यथा शिल्लक राहील निव्वळ अराजकता ज्यात माणुसकी नसेल.


 
 क्षितीज गिरी,  सातारा.
              दिल्ली मध्ये जंतर मंतर वर भारतीय सविधन जाळले ऐकून मला धक्काच बसला.?का जाळले असेल त्यांनी जगातील सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था असलेले जगानी आदर्श घेतलेले भारतीय  संविधान? त्यांना नक्की सांगायचे तरी काय होते.sc-st अॅक्ट ला विरोध करण्यासाठी त्यांनी चक्क भारतीय संविधान जाळावे ?का मनुस्मुती चा उदो उदो करण्यासाठी?बाबासाहेबांचा विरोध करण्यासाठी संविधान    जाळावे?नक्की काय ठोस कारण असावे की त्यांना हे पाऊल उचलावे लागले.या पाठीमागे त्यांची कोणती नक्की मानसिकता होती.कारण घोषणा तर sc-st अक्ट रद्द करा,आरक्षण रद्द करा,मनुस्मुती जिंदाबाद ,बाबासाहेबांबद्दल अपमानजनक घोषणा दिल्या.
        थोडक्यात सांगायचे झाले तर sc-st act रद्द करा म्हणजे त्या समाजाने संरक्षण नका मागू   अन्याय सहन करा,आरक्षण रद्द करा म्हणजे प्रतिनिधित्व नका मागू,मनुस्मुती जिंदाबाद म्हणजे आमच्या जातीचे वर्चस्व राहू द्या जसे पाहिले होते तसे.आणि बाबासाहेबांना विरोध म्हणजे त्यांच्या समतेच्या विचारांना  विरोध.पण यांची हिम्मत कशी झाली सरळ सरळ विरोध करायची.मागून वार करणारे आज समोर कसे आले.पण जाऊ द्या त्या निमित्त का होईना त्यांची खरी मानसिकता तर आपल्या समोर आली.
       मला तर वाटते मुसलमान तर बहाणा आहे खरा निशाणा इथला बहुजन समाज आहे.तो कधीच सगळ्याच्या बरोबर आला नाही पाहिजे.मागासच राहिला पाहिजे त्याच्या पायाखाली.तरच त्यांना त्यांच्या जातीचा मोठेपणा मिरवता येईल.म्हणजे आमची प्रगती नाही झाली तरी चालेल पण इथल्या बहुजन समाजाची होता कामा नये.अशी अतिशय खालच्या पातळीची विचारसरणी असलेले हे देशद्रोही. असमानतेचा पुरस्कार करणारे भडवे, समानतेचा संदेश देणाऱ्या माहामानवांचा अपमान करणारे कुत्रे,जातीय विष पसरविणाऱ्या हरामखोरांना फाशीची शिक्षा पण कमी पडेल.ती तरी लवकरात लवकर भेटावी इवढीच ती माफक अपेक्षा.




दर्शन जोशी, संगमनेर.
      देशाच्या राज्यकारभाराची माहिती ज्या पुस्तकात असते त्याला त्या देशाचे संविधान म्हणजे constitution  असे म्हटले जाते. प्रत्येक देशाची संसद  , राज्यकारभार करण्याची पद्धत वेगवेगळी असते.

       आपल्या भारताचे वैशिष्ट्य असे की भारताचे संविधान हे जगातील एकमेव प्रदीर्घ व लिखित संविधान आहे. सुमारे 63 लाख रुपये खर्चून संविधानाची निर्मिती झाली आहे. हे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समितीचे अध्यक्ष  डाँ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या समितीतील सदस्यांना 2 वर्षे , 11 महिने व 18 दिवस लागले आहेत.

      परंतु  " जेथे पिकते तेथे विकत नाही " या म्हणीनुसार आम्हां भारतीयांना संविधानाची किंमत कळत नाही. मनुस्मृतीचे दहन करण्यामागची बाबासाहेबांची भूमिका लक्षात न घेता विनाकारण सरसकट ग्रंथांचे दहन करुन सदर ऐतिहासिक प्रसंगाला जातीय रंग देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारत हे सार्वभौम, समाजवादी , धर्मनिरपेक्ष ,लोकशाही गणराज्य आहे या विचाराला स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थासाठी सोयिस्करपणे फाटा देण्यात आला आहे. हे टाळण्यासाठी शासकिय पत्रकातून जात , संवर्ग , प्रवर्ग तसेच तत्सम धार्मिक शब्द यांना बाजूला ठेवून " भारतीय " हा एकच अजेंडा जोपर्यंत ठेवला जात नाही , तोपर्यंत आपल्यासाठी प्रत्येक प्रसंग हा युद्धाचाच आहे , हे नक्की !



 

शीतल शिंदे -दहिवडी.

 " विनाश काले विपरीत बुद्धि"  म्हणतात तसे. संविदान  जाळने म्हणजे संविधानाने लोकांना त्यांचे हक्का नी अधिकार संमजायला लागलेत म्हणून, आमच्या हातून सत्ता जावू नये म्हणून, प्रत्येक जाति धर्मा मधे तेड निर्माण व्हावि म्हणून,आणि मनुवा दाचि पोळी भाजावि म्हणून, पण ज़हाले उलट.आज संविधान जा ळ ले म्हणून सर्वाना दिसले समजले,पण हे काम खुप वर्षा पूर्वीपासून चालू आहे चेहऱ्यावर मुखवटा घालून.हिंदू विरोधी मुस्लिम भांडण लावणे_ ex "गोदरा 
 हत्याकांड" कायदा बदलू पहाने,
sc st obc मुले आम्हाला आरकक्षण नहीं ही भावना हिंदूंच्या मनात भरविने,पण जतनिहाय किती आरक्षण खरे किती मिलते हे कोणी पाहिले आहे काय? आणि बकीच्या  48%मधे नेमके आरक्षन कोण घेते हे  कोण पाहतेय का?
हेच भाड़खाऊ निषेध् करणारे स्वताच्या आई बहिनीला का शिक्षण देतात का पार्लमेंट पर्यन्त का पोहोचवतात,मनुस्मृति च्या गटारी का य दया प्र माने का नाही चुल नी मुल ठेवत. पाठवा की सति करा की मुंडन स्वताच्या घरातील महिलांचे.
      मकडानो तुमचा बाप आला होता काय संविधान लिहायला.तेव्हा तुमची डोकी पानी पित होती काय.सर्वानीआमचेच पाय चाटावेट ही तुमची भावना  आता लोकांच्या लक्षात आली आहेत.
      स्वातंत्र मिळले ते फक्त इंग्रजापासून, मनु शाही तशीच राहिली, श्रेष्ठ शेती आणि कनिष्ठ नोकरी म्हणना रे स्वता नोकरी करतात आणि दुसर्यां ना किसान बना म्हणतात.
     त्यांचे काय चुकतेय म्हणा आपणच बुद्धि ग हा न ठेवली आहे. जन्माच्या अधिपासुन च भविष्य पहयाचे ,त्यांच्या शि वा य पान च हालात नाही आपले .बाघा पंचांग दया मंदी रात दा न
       बकीच्या जातीत ,__मुस्लिम,क्रीचन बौद्ध etc जातीत आपापल्या च लोकांकडून धार्मिक विधि करतात मग काय जिवंत आहेत ना ते लोक, का डिवोस ज़हाले त, आहे ना सर्व ठीक .
      उलट या प्रकारामुळे सर्व भारतीय जागे ज़हाले आहेत .सर्वांना संविधना चे महत्व कळू लागले आहे .ज़ोपलेले जागे केले.
       तुमच्यासार ख्या देशद्रोहिनी हे काम केले म्हणून बाबासाहेबांचे महत्व्व कमी होणार नाही.
      ह्यांच्या पेक्षा पाकिस्तानी बरे एवढे मोठे हे आतंकवादी आहेत आणि सरकार जार पाठिंबा देणारे असेल तर ते महा आतंकवादी ठरेल.


 *केरळ वाट बघत आहे आपल्या मदतीची 🙏🏼*
( Do good and someone will return the favour in doing good for you too.



Note: (All images are taken from internet.)

रागाच्या भरात

रागाच्या भरात

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

रागाच्या भरात


SOURCE:- INTERNET

-अर्जुन(नाना) रामहरी गोडगे
सिरसाव ता.परंडा जि. उस्मानाबाद

          माझ्या राग दिवसागणिक वाढत होता.. करतोय काय करायचं ? करायचं काय हे मला माहित नव्हतं?? नुसती चिडचिड वाढत चालली होती. आई बापाच्या अघोरी कष्टावर जीवन जगत असलेला डोमकावळा अशी माझी ओळख हाय. काहीही काम न करता आयुष्यची सात वर्षे घालवली. तसं म्हटलं तर ज्या गोष्टी केल्या त्यामध्ये कधी यश मिळाले नाही. म्हणून कमालीचे नैराश्य आलं होतं. जगण्याची इच्छाच मेली होती. मी काय स्वतःला दूषणे देत जीवन कंठत होतो. म्हातारे आई बाप ज्या वयात मी त्यांचा आधार द्यावा, त्या काळात मी मात्र सुसंगती लागलो व्यसनी बनलो. नशा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी ठीक असायचो .... एका गोष्टीचे सल मात्र होती आई बाप माझंमुळे काम करत होते.
           अशातच मी माझा मनात मनलो बस्स झालं जगणं आता मेलेलं बरं. " कपाळकरंटा मी" youtube जाऊन वेदना होणाऱ्या आत्महत्याचे व्हिडीओ बगू लागलो, अशी सर्व तयारी जोरात चालली होती. जवळपास महिनाभर हे सर्व चाललं होतं. बैचैन मन मात्र माझ्या मैत्रीनेणं ओळखलं.. मला सांगू लागली मरुन सर्व प्रश्न सुटत नसतात, उलट तुझे मरणही घरच्यांसाठी विशेष आईसाठी तिचंच मरण ठरेल. समाज ही तू मेल्यावर नावं ठेवायला मागपुढे बगणार नाही. तिच फिलॉसॉपी एकूण डोकं सुन्न झालं. ती बोलत होती त्यातला शब्दन शब्द खरा होता. पण मन मात्र काही ऐकायला तयार नव्हतं. जाऊ दे उडत गेली आंगणगाडी ... तिच एकूण घेतलं मी माझं पुढच्या तयारीला लागलो.
           कोणालाही न सांगता मारायचं हाच विषय मनात घोळत होता. नव्हे तर सुसाईड नोट माझं तयार होत्या. माझ्या आत्महत्या मी स्वतः केली आहे तरी यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये.  अशी नोट तयार करुन बस्स झालं जगणं म्हणून होस्टेलच्या चोथ्या मजल्यावर गेलो उडी टाकणार असे पक्क ठरवून गेलो होतो. आपण मारणार अशा शेवटचा मेसेज मैत्रिणीला टाकला. होस्टेलच्या पाठीमागे उडी टाकली. पाठीमागे जास्त कचरा असल्यामुळे मलो नाही पण पाय मात्र मोडला, डोक्यला जबर मार बसला हे मला दवाखान्यात गेल्यावर कळले. रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे चार महिने अंथरुणला खिळून होतो, त्याची सज्जा आजही भगतोय त्या वेळी केलेल्या मूर्खपणा मुळे आता पाश्चाताप होतंय. रागाच्या भरात कोणतेही पाऊल उचलू नये. जेणेकरुन आपल्याला तिची सज्जा दुप्पट भोगावी लागेल. "मनतात ना राग नि भीक माग"  हे आता मला पटलं आहे.

SOURCE:- INTERNET

-किरण पवार,
औरंगाबाद

मी इंजीनीअरींग दुसऱ्या वर्षाला असताना सोडली. घरचे सर्वजण नाराज होणार, हे स्वाभाविकच होतं. पण त्यातही वडीलांची नाराजी इतक्या जबरदस्त रोखात व्यक्त झाली की, ज्यामुळे मी मनातून त्यांचा तिरस्कार करू लागलो. त्यांनी दोन-तीन वेळा मारलही. पण त्यांचे शब्द मारापेक्षा अधिक झोंबले होते. त्या शब्दांमुळे माझ मन पूर्णपणे ढासळल होतं. आजही मी त्यांच्याशी जास्त स्पष्ट बोलू शकत नाही.
               मला शिक्षण घ्यायचं नव्हतं किंवा माझी ती पात्रता नव्हती, असं काहीच नव्हतं. फक्त मला इंजीनीअरींग नको होती. माझा बारावीचा निकाल आला  तेव्हापासूनच मी या गोष्टीला विरोध दर्शवला होता. पण वडील ऐकतील तर शप्पथ! माझा एक नातलग होता. आम्ही बारावी सोबतच ऊत्तीर्ण झालो. त्याचा निर्णय होता, तो इंजीनीअरींग करणार. आणि माझ्या घरच्यांच म्हणणं होतं, त्यानं जे केल तेच मीदेखील करावं. मला या गोष्टीचा भयंकर त्रासही होतं होता आणि रागही आला होता. शेवटी कुणालाच विचारलं नाही आणि सोडलं इंजीनीअरींगच शिक्षण.
              अर्ध्यात शिक्षण सोडल्याने हवं असलेलं शिक्षण घ्यायला सहा महिने जावे लागले. आणि आज मी आनंदाने ते शिक्षण घेतो आहे. मी अगदी जन्मापासून कधीच शेतात काम केल नव्हतं पण या सहा महिन्यात करावं लागल. पुढे शिक्षण घ्यायचय हा विचार ठाम असल्यामुळे मी आनंदाने ते काम केलही. पण "वडीलांच्या आणि समाजाच्या मते मी आता शिक्षण घेऊ नये," अशी कुरकुर सतत माझ्या मागे लागली होती. एकाच घरात राहूण मी वैरी असल्यासारखं वडील वागायचे. कुणा दुसऱ्याचा राग एके-दिवशी माझ्यावरच फुटला. त्यांनी त्या वेळी नकोनको ते शब्द  उच्चारले. या गोष्टीचा प्रचंड तिटकारा आला अाणि मी आत्महत्या करायचं ठरवलं.
            सकाळी कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडलो. लातूरच्या रेल्वेस्टेशनवर पोहोचलो. म्हटलं आता जी गाडी येईल तिच्यासमोर उडी मारून जीव देऊ. मनात विचारांचा गुंता अजूनही सुरूच होता. पण का कुणास ठाऊक, मी स्वतःलाच धीर दिला आणि म्हटलं, काहीही झाल तरी चालेल पण आत्महत्या करायची नाही. आणि संध्याकाळी सुखरूप घरी पोहोचलो. रागाच्या भरात काय करणारं होतो; हे भानावर आल्यावर समजलं. पण भानावर येण्यासाठी मैत्री कामी आली. एक अशी मैत्रीण त्यावेळी आयचष्यात होती जिने मला नैराश्यातून सावरायला खूप मदत केली. खरचं अविस्मरणीय आहे, ते सर्व.

SOURCE:- INTERNET

-श्रीकांत निवल बाभूळगाव जि यवतमाळ

रागाच्या भरात हा अतिशय संवेदनशील विषय आहे.आज कोणाला कश्या गोष्टीचा राग येईल आणि त्याच्या हाताने स्वतःचे किंवा इतर व्यक्तीचे कश्या पध्दतीने नुकसान करेल यांचे पण सांगता येत नाही. जसे पती पत्नी यांच्यातील होणार राग कधी कोणत्या टोकाला जाऊ शकतो अशावेळी पतीने स्वतःच्या कुटूंबातील सर्व व्यक्तीचा जीव घेऊन स्वतः आत्महत्या केल्याचे आपण नेहमीच पेपरला वाचत आलो आहे.पॉपर्टी बाबात भावा भावाच्या भांडणात मारा-माऱ्या झालेल्या व खून झाल्याचे आपण पाहत आहे.बहिणीला छेडले म्हणून जीवानिशी मारून टाकल्याचे पाहतो.एकतर्फी प्रेमातून ऍसिड हला किंवा जीवनी मारल्याचे आपण ऐकून आहोत हे व इत्यादी प्रकार रागाचा भरात होतांनी आपण पाहत अहोत.माझे स्वतः चे सांगायचे झाले तर मी स्वतः 5 व्या वर्गात असताना साधा नवीन कम्पास घेऊन दिली नाही म्हणून गळ फास घेण्याचा प्रयत्न केला होता.परन्तु घर कुडाचे व घराची उंची कमी असल्यामुळे बासा वाकला माझे पाय जमिनीवर टेकले व सुदैवाने मी वाचलो.आज मी कुटूंब समुपदेशक म्हणून काम करीत असताना बऱ्याच व्यक्तींचे रागाच्या भरात तुटनारे कुटूंब जोडीत आहे. म्हणून कोणीही रागाच्या भरात टोकाचे निर्णय घेऊ नये.खूप टेंशन आले असेल तर त्या बाबत आपल्या जवळच्या माणसाशी चर्चा करावी आपल्या मनात घर करून असणाऱ्या गोष्टी कुणाला तरी सांगाव्या जेणे करून मन हलके होते.काही रांगा पासून दूर जाता येईल असे मार्ग शोधावे ,नाहीतर निसकोचपणे मनोविकार तज्ञाची भेट घ्यावी व त्यांचा सल्ला घ्यावा.
धन्यवाद..

SOURCE:- INTERNET

-सुधाकर पार्वती प्रभाकर -
पंढरपूर .

माणूस हा एक सामजिक प्राणी आहे. त्याला फक्त मेंदू आहे आणि तो बोलू शकतो म्हणून तो बाकीच्या प्राण्यांन पेक्षा वेगळा आहे .
आनंद , प्रेम , राग ह्या भावना भावना त्याच्यामधे जास्त प्रमाणत आहेतआणि त्या असणे ही आवश्यक आहे .
आज आपल्यला भवना आहेत म्हणून आपल्या जगण्याला अर्थ आहे . भावनाशुन्य माणूस भेटणे दुर्मिळ आहे . आज या धावत्या व बदलत्या युगात माणूस समाज्याच्या प्रति कही अंशी भवनाशून्य असला तरी कुटुंबा प्रति व स्वतः बद्दल आज ही तो भवनाविवश आहे .
या सर्व भवनामधील राग ही एक भावना. ती असणे हे आवश्यक आहे . परंतु आत्ताच्या परिस्तिथी मध्ये तो प्रमाणापेक्षा जास्त दिसून येतो . परंतू नको त्या वेळी अनावर झालेला राग आयुष्य अंधारात घेवून जातो, नाती तोडतो आणि आयुष्य सुध्दा संपवतो.
परंतू आज रागाच्या वाढत्या प्रमाणाची करणे पाहता असे लक्ष्यात येते की लहानपानापासुन मुलांना प्रेमच्या नावाने प्रत्येक लाड पुरवणे , नको त्या गोष्टी वेळे आधी देणे , हट्टी बनवणे, कोणत्याही गोष्टीला नाही न बोलणे आश्यामुळे मुले हट्टी होतात .परंतू कठिन परीस्थितीत अशी मुले परिस्थीला तोंड देऊ शकत नहित , अपयश पचवू शकत नाहीत , परिणामी ती रागीट बनतात आणि चुकीच्या गोष्टी करतात.
त्यामुळे मुलांना लहानपणापसुन नाही येकायला शिकवणे गरजेचे आहे . त्यांना काही गोष्टींसाठी वाट पहायला लावणे गरजेचे आहे .

SOURCE:- INTERNET

-प्रदिप इरकर
वसई,जि-पालघर

मानवाला असलेल्या अनेक भावनांपैकी राग ही एक भावना आहे.जशा अनेक भावना आजूबाजूच्या परिस्थिती वर अवलंबून असतात त्यांच्याप्रमाणेच राग ही सुद्धा एक भावना आहे.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात रागावर नियंत्रण मिळवणे खूप कठीण झाले आहे.फक्त एकाचा राग दुसऱ्या व्यक्तीवर काढणे हेच चक्र दररोज नियमितपणे सुरू आहे.मुंबईत लोकल मधून प्रवास करताना क्वचितच एखाद्या दिवशी भांडण व शिविगाळ न ऐकता प्रवास होतो नाहीतर कुरबुर ही चालूच असते.
बरं खूप राग येणे हे चांगले लक्षण आहे का?तर नक्कीच नाही.ह्या रागाचे फायदे सोडा पण नुकसान च अधिक होतात.आपल्या जवळच्या व्यक्ती रागामुळे आपल्या पासून दूर जातात हे रागावलेल्या व्यक्तीच्या लक्षात यायला खुप वेळ लागतो.रागामुळे नात्यातही दुरावे वाढतात हे लक्षात घ्यायला हवे.आपल्या जोडीदाराला आपल्याला काही सांगायचे असेल काहीवेळा मन हलके करावयाचे असेल तरी कधी कधी तो किंवा ती ते करू शकत नाही कारण आपला राग त्यांना माहीत असतो.
ज्याप्रमाणे मानवाची कोणतीही भावना अति झाली तर ती हानिकारक ठरते त्याचप्रमाणे राग ही आहे.व प्रत्येक जणांनी राग नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तथागत गौतम बुद्धांनी शांततेचे मार्ग सांगीतले आहे परंतु किती जण त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात?
त्यांचे अनुयायी म्हणवणारे सुद्धा नाही.
योग हा एक दुसरा उपाय आहे.रोज योग केल्याने रागावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे असे मी मध्यंतरी वाचले आहे.परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात किती जण योग करतात हाही प्रश्न च आहे.
जे चांगले विचार विचारवंतांनी सांगितले आहेत,जे आपल्या भारतीय संस्कृती मध्ये फार पूर्वीपासून सुरू आहेत त्यांना काही वर्षांपासून जे अमुक तमुक जाती-धर्मांमध्ये  वाटणी केली आहे ते ही घातक च आहे.

शेवटी रागाबद्दल सांगायचे झालेच तर आपण रागाच्या भरात अनेक नाती तोडून टाकतो व ती जोडण्याचा ही प्रयत्न करत नाही.जर ते नाते महत्वाचे असेल तर आपला राग सोडावा व राग च महत्त्वाचा वाटत असेल तर मात्र ते नाते तुटलेच!

SOURCE:- INTERNET

-करण बायस
जि.हिंगोली

राग, अहंकार, लोभ, मोह या नकारात्मक भावना, जर या भावनांचा परिणाम एखाद्या व्यक्तीवर जास्त झाला असेल तर त्याचं व्यक्तिमत्त्व असंतुलित होते.
आणि जर याच भावना नियंत्रित ठेवले तर व्यक्तिमत्त्व निरोगी राहू शकतं.
राग मनाला अस्थिर करते आणि *निसर्गला अव्यवयस्थितपणा मान्य नाही.* कदाचित हेच कारण असेल राग शरीरासाठी चांगला नसतो.

रागाच्या भरात माणूस समोरच्याला काही विचार न करता बोलतो आणि हे रागात बोललेले शब्द तलवारी पेक्षा जास्त घाव करतात.हेच रागातील शब्द नात्यांमध्ये दुरावा पण आणतो.

रागात माणूस टोकाचे निर्णय घेण्यासाठी मागे पुढे बघत नाही, कधी कधी हेच निर्णय चुकीच्या ठरतात.

राग हा चांगला नसतो हे पूर्णपणे बरोबर म्हणता येणार नाही,थोडा राग पण करावा पण जर माणूस रागाच्या भरात त्याचा विवेक हरवत असेल तर ते काही कामाचे नाही.जर हाच राग जर आपण एक प्रेरक हेतुने वापरलं तर ते कामाचं ठरू शकतो.

SOURCE:- INTERNET

-वैशाली गोरख सावित्री
पंढरपूर(पुणे)

रागाच्या भरात सगळ्यांनी जे जे केलंय ते सगळं मी केलं आहे,रागाच्या भरात घर सोडलं, रागाच्या भरात रडले ,रागाच्या भरात मैत्रिणीशी अबोला धरला,रागाच्या भरात तोंडाला येईल ते बोलले व नंतर पचतावले पण आहे .पण नंतर नंतर लक्षात यायला लागलं की ह्या सगळ्या गोष्टी पेक्षा रागाच्या भरात शांत राहण्याचा प्रयत्न केला तर खूप काही जिंकशील नि सद्या तेच करते .घरात कोणाचा राग आला ,भांडण झाले तर सरळ आपलं आपलं काम करत राहणे,आपल्याला आवडत्या गोष्टी करणे,गाणी ऐकणे ,मस्त फिरणे .व्हाट्स अँप वर कोणाचा राग आला तर क्षणात मित्रमैत्रिणींना ब्लॉक ही करते पण 5-10 मिनिटांनी राग गेलं की लगेच काढते व त्या व्यक्तीला चुकीची जाणीव होई पर्यंत शांत राहते .
      शेवटी रागाच्या भरात खूप काही केल्या नंतर कमी वयात पण चांगला अनुभव आल्यामुळे शांत राहणे हेच योग्य हे समजलं आहे .शेवटी बोलून ,भांडून,रागाला जाऊन नाती तोडण्यापेक्षा शांत राहून जोडलेली जास्त योग्य👍


SOURCE:- INTERNET

-नितीन लेंडवे
पंढरपूर
      खर तर मला शक्यतो राग येत नाही. पण एखादी गोष्ठी मुळे चिडचिड होते. त्यामुळे अकारण ओरडणे होते दुस-यावर. नंतर चुक पण लक्षात येते.
    थोडक्यात रागाला जाऊ नका, आणि दुस-याच्या रागाचे कारण ही नको बना.

SOURCE:- INTERNET

-अनिल गोडबोले
सोलापूर

मला रागाच्या भरात काही करावं लागलं नाही, हे माझं सुदैव.. पण मी जेव्हा जेव्हा रागाला आलो तेव्हा लक्षात आलं की रागाला येन हे चुकीची आहे..

इमोशनल इंटेलिजन्स (भावनिक) याची व्याख्या अशी सांगितली की "ज्या व्यक्तीला योग्य वेळेला योग्य व्यक्तीवर योग्य शब्दात योग्य प्रकारे रागावता येत त्याचा भावनांक जास्त असतो" अस म्हणतात..

पण मला मात्र सामाजिक क्षेत्रात क करावं लागल्यामुळे राग खूप जवळून बघावा लागला.
पेपर वाचताना "रागाच्या भरात... खून' किंवा "रागाच्या भरात... करायला गेला आणि जीव गेला" अशी विधान वाचली की भीती वाटायची.

मला पोलीस टाइम्स वाचतांना भयानक भीती जाणवायची. पण जेव्हा समुपदेशक म्हणून काम करू लागलो आणि रागाला येणारे लोक कळायला लागले..

राग आल्यावर चेहऱ्यावर हसू ठेवणारे बघितले.
राग एकाचा दुसऱ्यावर काढणारे बघितले
रागात अद्वतद्व बोलणारे बघितले.
'बघून घेईन' म्हणून आयुषच्या आयुष्य कोर्टात झगडताना बघितले..

पॅरा लीगल वोलेंटीआर म्हणून काम करताना जिल्हा कारागृहात कैदी बघितले.
मी गुन्हा केलाच नाही उगाचच आत टाकले आहे म्हणून रागारागाने तनंतनून बोलणारे बघितले..

सगळ्यात जास्त वाईट वाटले तेव्ह जेव्हा 302 चे कैदी सांगत होते..'तेवढी दोन मिनिट गेली असती तर साहेब मी इथे नसलो असतो' असे अनुभव सांगताना.. अतिशय भावणावश होऊन रडताना बघितलं आहे..


तर मला वाटत आपण (भारतीय... आणि त्यातल्या त्यात मराठी माणूस) सगळ्या भावना एकाच भावनेत व्यक्त करतो..
प्रेम, ईर्षा, दुःख, आनंद, उदासी.... सगळं एकाच भावनेत दाखवतो आणि ते म्हणजे राग..


राग नसावा का? ... तर माझ्या मते नसावा... पण आपल्याला रागच नसेल तर आपण निर्लज्ज बनू.. तेव्हा राग असावा ... पण तो योग्य प्रकारे व्यक्त करता आला पाहिजे..

तर रागाला येण्यापेक्षा राग कामातून यशस्वी होऊन किंवा प्रयत्नातून दाखवून देणे आवश्यक आहे.

SOURCE:- INTERNET

-नवनीता (शैलेश भोकरे)
आळंदी

(या लेखातील सर्व ओळी अनुभवातून अवतरल्या आहेत. कृपया कल्पनाविलास समजू नये!)

रागाच्या भरात....
काहीच उरत नाही मागे...
अगदी काहीच नाही...
पश्चात्तापाशिवाय.

भडाभडा ओकल्यावर आणखी होणार तरी काय? साचलेली घानच ती. वेळोवेळी बाहेर पडली तर एकवेळ परवडलं. कितीतरी क्षण खर्ची करून,  'कधीच साथ सोडायाची नाही अश्या आणाभाका खाल्लेलं' नातं काही क्षणात मातीमोल होऊन जातं.
उरतो फक्त, त्या क्षणांचा सांगाडा आणि ओकताणाच्या स्मृती...
कधीकधी तर विनाकारण लहरी माणूस जे नको बोलायला ते बोलून जातो.
शब्दांना पाहिजे तसं वापरून जातो.
पुढचा नाजूक दिलाचा समंजस खेळाडू असेल तर बिचारा हवालदिल होऊन जातो या विचित्र खेळामुळे.
त्याच्या चुकांची मग तो गिनती करण्यात मग्न होतो.
भले तो चुकलेला असो वा नसो.

ओकणारा मात्र ओकताना मोकळा होत असतो; कधीही खाली केलं जाणार नाही असं ओझं पुढच्याच्या मनात भरत.

काही मनं तर इतकी प्रांजळ पाहिलीत मी जी, गरज नसताना रडत सुटतात. आणि रडताना पुढच्याला दोष न लावता, सरळ स्वतःच्या प्राक्तनाला भलं भुरं सूनावून मोकळे होतात. मग ते बिचारं प्राक्तन शून्यात नजर लावून बसतं, स्वतःच्या चुकीचे पाढे मोजत. या कामात ते एवढं गर्क होऊन जातं की प्रांजळ मनाकडे त्याचं लक्ष देणं राहून जातं. मग ते मन ढसाढसा रडत सुटतं, कधी या झाडाला कवळी मारतं, तर कधी त्या झाडासोबत जाऊन बडबड करत बसतं.
त्याला अगदी सुचनं बंद होऊन जातं,
नेमके घडलं काय?
घडतंय काय?
आणि या सर्वात माझा दोष तो कोणता?

तो ओकणारा मात्र स्वतःच्या मिशीला पिळी मारत मांडीवर मांडी मांडून बूट हलवत बसतो. कशी अद्दल घडवली म्हणत.

जेव्हढं ते प्रांजळ मन बावरतं, तेवढं याचं अंतर्मन असुरी सुखात बागडतं.
कसा धडा शिकवला..... म्हणत स्वतःची पाठ थोपटतं. गगनभरारी घेत या गावाला जाऊन सांगतं तर कधी त्या गावाला. त्याची बाजू उजळ वाटेल असा जो त्याचा गैरसमज झालेला असतो तो त्याला हे सर्व करण्यास उद्युक्त करतो. गाव मात्र फक्त टाळ्या घेतं, तोंडावर याच्याशी आणि पाठीमागे गाववाल्याशी.  
आणि जसजसा मग या ओकणाऱ्याचा गैरसमज गळून पडू लागतो तसतसा तो थंड होऊ लागतो.

संवेदनशील मनाचा धनी असेल तर थोडा उलटखेळ रंगतो खरा, नाहीतर नालायक असेल तर सगळं विसरून पुढे सरकतो. एक मात्र खास, ते म्हणजे नालायकाला बहुदा प्रांजळ मनाची पुन्हा गरज वाटत नाही. आणि आठवणंही येत नाही. पण खरं सांगू, त्याच्या या असुरी आनंदात जाणून घेण्यासारखी अशी काही बात नाही.

खरा खेळ पाहण्यात मजा येते ती संवेदनशील मनाच्या धन्याची.
स्वतःचा अहं अजून जागा असतो त्यामुळे पुढचा माणूस जरी त्यावेळी महत्वाचा वाटत नसला तरी स्वतःची त्याला कुठेतरी लाज वाटू लागते. आपण एवढे क्रूर झालोच कसे? आपण असं बोलू शकतोच कसं? या सर्वांची कारणमीमांसा क्षणाचाही अंतर न ठेवता सुरू होते. न थांबण्याचा वादा करून ती आलेली असते तसेच भंडावून सोडण्याचाही प्रण. त्या ओंगळवाण्या स्मृती मग त्याला जाळू लागतात. जाळ एवढा भयावह नसला तरी तो सहन करणं मात्र अवघड होऊन जातं. एका मागून एक ओकत्या क्षणांची रिळ पटलावर सरकते. जी काही ठळक क्षणांवर येऊन थांबते आणि आणखी लाजिरवाणं करून जाते.

आपण जे केलंय ते खरंच बरोबर नाही. ..
हे करणं खरंच मानवीय नाही. ..
असा विचारांचा मारा मग सदसदविवेकबुद्धी जेव्हा करू लागते तेव्हा तोल सांभाळणं अवघड होऊन बसतं. सवय असेल तर ठीक, नाहीतर माणूस सरळ डोळे झाकून झोपी जातो आणि आवडणाऱ्या गोष्टींची स्वप्न रंगवू लागतो.

सवय असणारा मात्र एक एक पाऊल पुढे सरकतो. हाताला हात लाऊन छेडून पाहतो. दहा वेळा झिडकारलं तरी रागावत नाही. प्रयत्न थांबवत नाही. वाट पाहतो कधीतरी तो क्षण येईलच याची.
उद्या पुन्हा प्रयत्न करू म्हणत व काय केलं पाहिजे, याचा विचार करत झोपी जातो. त्या प्रांजळ मनाच्या सुखासीन क्षणांची चलचित्रं स्वप्नात पाहतो. सकाळी उठून पुन्हा कवळी घालतो, आणि मग बऱ्याच कवाळ्यांनंतर पुढचा पाजळतो आणि हसत गळेभेट घेऊन क्षितिजाच्या पलिकडे चालत जाऊ अश्या गप्पा मग पुन्हा सुरू होतात. गावाला एक आदर्श उदाहरण बनून दाखवण्याचा टाळ्या घेत.

पण कधीकधी हा असा पुढाकार न घेणारे, घरात निपचित पडून राहतात. आधी असलेला त्यांच्या खोलीतील अंधार मग हळूहळू आणखी गडद होत जातो. इतका, की मग तो गिळून टाकतो ओकणाऱ्याला त्या विध्वंसक सवयीमुळे......

SOURCE:- INTERNET

-सीमाली भाटकर,
रत्नागिरी

       रागाच्या भरात विषय फारच छोटा पण गंभीर आहे. कारण या जगात राग कसला कुणाला कधी केंव्हा कुठे कशा पद्धतीने येईल याचा अंदाज येऊ शकत नाही आणि खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.
      समाजशास्त्र च्या भाषेत सांगायचे झाले तर माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि साहित्यिक म्हणावे तर राग हा एक रस आहे. त्यामुळे या जगात अस कुणी नाही ज्याला राग येत नाही आणि तस असेल तर मग पाहिले त्याला प्रणाम. तर असा हा राग प्रत्येकाला येतो. फक्त प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या विचार करण्याच्या बुद्धिमक्ततेचा कौल लावता त्याची पातळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात असते.
      त्यातून कधी गुन्हा घडतो तर कधी स्वतः जबाबदार समजुन ती व्यक्ती जीवन त्यागते एकूणच काय जीवन उध्वस्त होत एक तर स्वतःच आणि इतरांचं देखील. म्हणुन रागाला थोडा आवर घालून या रागातून काही चांगल्या गोष्टी घडू शकतात हे लक्षात घेता आला पाहिजे.
      या जगात कितीतरी स्त्रिया आहेत त्यांच्यावर अन्याय होतात. हुंडाबळी, रेपकेस, कौटुंबिक हिंसाचार असे अनेक आणि कित्येक ऑफिसात बॉस नावाचा पात्र हे राग येण्या जोग असत. पण त्या रागाच्या भरात आपल्या हातून खूपच चुका होतात आपल्या बहिणीच हुंडाबळी जाण यातून भाऊ त्याचा बदला घेतात. पण कुणी कधी हा विचार करत का माझी बहिण गेली इतर कुणाची जाऊ नये म्हणून प्रयत्न व्हावा.
     ऑफिसमध्ये होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी बॉस नावाचा प्राणी नसावा पेक्षा सामंजस्य साधणार व्यक्तिमत्त्व असावा हा प्रयत्न केला तर.
        जातीयवादी आंदोलक म्हणून उभे राहण्यापेक्षा मुळात रागाने जाती धर्म मनातून काढून टाकले तर. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच खूप प्रश्न आणि गुन्हे कमी होतील मित्रानो. फुटपाथ वर राहणार्यांना भाकरीचा तुकडा आणि मायेची पाखर हवी कारण दरोडा आणि चोरी जन्मजात नसत काहीवेळा परिस्थिती, संस्कार, आणि शिक्षण हे जबाबदार ठरत.
         शादी मे जरूर आना ही फिल्म कुणी पहिली तर लक्षात येते प्रेमात फक्त बलात्कार होत नाही तर कधी कधी व्यक्तिमत्त्व देखील बदलत. आणि माणूस शिपाई वरून आयएएस होतो.
        फक्त तिथे कस लागतो तो तो तुमच्या माझ्या विचार आणि बुद्धी चा. एखादया क्षणी आपण जितका चांगला विचार करून पाहू आपण तितके चांगले घडतो. परिस्थिती प्रत्येक माणसाची वेगळी आणि अडचणी वाद हे नेहमीच असतात पण त्या काळात तुम्ही किती आणि कसा विचार करता यातून तुमचं भवितव्य ठरत.
       शब्दाची अट आहे म्हणून इतकंच सांगेन राग वाईट प्रवृत्ती चा करा, जागा जमीन पैसा यातून फक्त नाती तुटतात साध्य काहीच नाही. बलात्कार प्रवृत्ती वरती फक्त मोर्चे नको मनातून त्या विकृती चा राग करा आणि काढून टाका ती राक्षसी वृत्ती.
      जाती पेक्षा माणुसकीला मान द्या जातीय तेचा द्वेष करून मनातून काढून टाका.
        गरीब श्रीमंतीच्या माज आणि गरवापेक्षा आपुलकीचा शब्द ठेवा.
       म्हणजे रागाच्या भरात घडणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्ती ला आणि गुन्ह्यांना आळा बसेल. कारण या जगात परिस्थिती फार मोठी गुन्हेगार आहे ज्याला ती सांभाळता आली तो तरला नाही तो गुन्हेगार ठरला.
   खूप महत्त्वाचे आयुष्यात विचार करायला, माफी मागायला आणि माफ करायला शिका अर्धेअधिक प्रश्न त्यातूनच सुटतील.
       म्हणून रागाच्या भरात राग नसावा लोभ असावा आणि अगदीच अनावर झाला अंकरूपी कोंदणात आपल्या प्रियजनांना आठवा आणि रागाला मिटवा.
  धन्यवाद,

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************