सर्व नात्यांमधील मधुर नाते:मैत्री

सर्व नात्यांमधील मधुर नाते:मैत्री

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

सर्व नात्यांमधील मधुर नाते:मैत्री



Source: INTERNET
-पवन खरात,
अंबाजोगाई

संकट हि आयुष्याला जगण्याच बळ देतात,
माणस सुद्धा संकटातच आपली खरी ओळख दाखवतात !
नातीगोती फक्त रक्ताचीच नसतात,
त्या हि पलीकडे हि मैत्रीची नाती असतात !!
सूर्य ढगाआड गेला कि सर्व काही बदलत,
आपली माणस सुद्धा कधी परक्या सारखी वागतात !
आपल्या डोळ्यातून आसव ढळत असतानाही,
कधी - कधी ती बेधुंद आनंदाने नाचतात !!
दोन पावलं एकट चालल्यावर मला कळलं,
स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडत असते !
किती हि मोठा झाला माणूस तरीही,
शेवटी माणुसकी शिवाय शिल्लक काहीच उरत नसते !!
दोन सेकंदात आता हृदय जग सोडणार होत,
तेवढ्यात एका हाताने मला पुन्हा सावरल होत !
मी तर पूर्णतः स्वतःला संपवलाच होत,
पण थांबलेल्या श्वासाला त्याने पुन्हा का जाग केल होतं ?
मैत्रीच्या नात्याला न रक्ताची गरज असते,
नाही त्याला कोणत्या गोष्टीची हाव असते !
हे नात फक्त दोन हृदयाचा ठाव असते,
खरंच जग संपेल हे कधी ,
पण मैत्रीच नातं हे कधीच संपणार नसते !!

Source: INTERNET
-शिरीष उमरे,
 नवी मुंबई

मैत्री शब्दावरुन आठवतो सुदामा ... जगत्गुरु कृष्णाचा जिवलग दोस्त... निस्वार्थ प्रेमाची अतुट जोड...
आईनंतरचा खरा निस्वार्थ प्रेमाचा धबधबा मैत्रीत च आढळतो.... खासकरुन बालपणातील मैत्रीमध्ये.. जेव्हा मी पणा शिवलेला नसतो... जातपात समजत नसते... हेवेदावे माहीती नसतात... कटकारस्थान कळत नसतात... फक्त आनंद वाटुन घेणे व एकदुसर्याची काळजी घेणे कळते तेंव्हा...
मी बघितली आहे अशी मैत्री माझ्या बाबांची व त्यांचा लंगोटीयार भास्कर काकांची ... पन्नास वर्षे जुनी !! कुठलाही आनंद सोबत शेअर करनारी !! उतार वयात ही अबेकाबे बोलणारी... एकदुसर्याशिवाय न करमणारी...एकदुसर्याला जिवापाड जपनारी .....
आणि जेंव्हा भास्करकाका अचानक निघुन गेलेत समोर तर.... 😥 सैरावैरा झालेले माझे बाबा... क्षणोक्षणी काकाला मिस करणारे त्यांचे डोळे .... नकळत भास्करकाकाला फोन लावुन बोलणारे त्यांचे ओठ... जेवतांना अचानक थबकनारे त्यांचे हात...

तेंव्हा कळाले *मैत्री* काय असते ती !!
मी सुध्दा लकी आहे की मला असे  मित्र आहेत की जे म्हणतात वजन कमी कर भ#©® तिरडी उचलतांना खांदा दुखल आमचा... 😅😜🤩😍☺🤗

Source: INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

आता फार काय बोलायच यावर!
विचार ग्रुप मधील सर्व सदस्य एकमेकांना न भेटता, एकत्र आपले विचार व्यक्त करतात, परस्परांवर विश्वास ठेवतात.... त्यामुळे आपण सर्व एका सुमधुर नात्यात आहोत ते नात म्हणजे मैत्रीचं...!

आम्ही (सो कोल्ड) एडमीन विषय देतो आपण मत व्यक्त करता.... ना अपेक्षा... ना पैसे.. ना अधिकार.. ना हक्क

छान मेसेज म्हणून जेव्हा कोणीतरी मेसेज करत तेव्हा वाटत की आपल्या पाठीवर हात ठेवून म्हणत आहेत.. *कर हर मैदान फतेह*

आपण चक्क एकमेकांवर रागावतो आणि प्रेम पण करतो.. मैत्री शिवाय का शक्य आहे हे सगळे???

माझ्या आयुष्यात काही मित्रच आहेत जे मला सतत जाणीव करून देत असतत् की मी चांगलंच राहील पाहिजे..

भले समोर ते काहीही म्हणोत *तुला कोण पण येड्यात काढतंय बे अन्या*

पण पाठीमागे *हुशार आहे कडू पण दुनियादारी कळत नाही येड्या तोंडाच्याला* अस म्हणत असतात

याला स्तुती म्हणावं की निंदा ... तर फक्त मैत्री

चहा साठी *कोन्ट्री काढ बे फुकट्या* म्हणणारे हात.. पैशाची गरज असताना *पाकितातले घे बे डोकं खाऊ नको* अस म्हणतात..

असो... खूप आहे बोलण्यासारखं
एवढंच.... आपल्या जगण्याला, असण्याला, नसण्याला... एवढंच काय मरण्याला देखील यांच्या शिवाय अर्थ नाही..
शेवटी संगत महत्त्वाची

सर्वाना उत्तम मित्र मिळोत कारण त्यामुळे आपलं चांगलं की वाईट व्हायच हे ठरत असत

सर्व वाचकांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

Source: INTERNET
-शब्दवेडा सचिन पाटील,
जळगाव

तू मित्र तू सखा
तू जिव तू प्राण
माझ्या आयुष्याच्या वहीच
तू शेवटच पानं
       ....शब्दवेडा

            रक्तान अनेक नाती दिलीत पण स्वतःच्या आईचा दुधाचा लिटरने हिशोब मागणारी मुले,मालमत्ते साठी जिवावर ऊठणारी भावंड,प्रणयाच्या लालसेने सैतान झालेले भाऊ...अस बरच काही घडल आणि जणू नात्यांवरचा विश्वास उडाला...पण बालपणात शाळेत एका गोळीचे शर्टच्या सहाय्याने दोन सारखे तुकडे करणारे,ऐन तारुण्यात घरचे परके वाटतांना ज्यांच्या खांद्यावर डोक टेकवत मनसोक्त रडून मन मोकळ होऊन,लढण्याची ऊर्मी पुन्हा जागवणारे..ऊतारवयात आपल्या  पांखरांनीच आपली पंख छाटून वृध्दाश्रमात घातल्यावर...त्या अनाथालयाच्या पायरीवर हसत हसत आपल्या दुःखाचा डोगर पोखरुन,स्मीत हास्य ओठावर फुलवणारे........मित्र....होय मित्रच.

    मुळात मित्र या शब्दातच जणू प्रेम,मातृत्व,धाक,सहवास,धाडस,करुणा,सहानुभूती,आगाऊपणा,चावटपणा,हुशारी,लबाडी,हसणं,लाजण,लफडी.....असे असख्य भाव दडलेले असतात.आणि या भावनांचा सुरेल संगम ज्याच्या सहवासात मिळतो तो असतो आपला सच्चा यार अगदी दुनियादारीतला दिग्या सारखाच,जशाच्या तसा वास्तवात भेटणारा.म्हणालायला लाख नालाईक पण अगदी आपल्या काळजाचा तुकडा..
आयुष्यात खूप मित्र भेटतात पण प्रत्येकाची एक वेगळी छाप जणू मनाच्या राजमुद्रेवर रेखाटली जाते आणि सुरु होते मैत्रीचे साम्राज्य...
या साम्राज्यात जेव्हा आपल्याच तोडीचे आपल्या सारखे आगाऊ चार येऊन भेटतात तेव्हा जन्म होतो कट्टा गँगचा..मग हा कट्टा काँलेजचा असो,दोन मध्ये चार चहा घेत तासभर टाईमपास करु देणाऱ्या कँटीनचा असो,GF च्या गल्लीचा असो,गावातल्या देवळाचा असो की रीकामी काम पार पाडण्यासाठी,जिकडे कुणी फीरकत नाही त्या स्मशान भुमीचा असो...काही फरक पडत नाही.कारण आयुष्याच्या शर्यतीत निखळ आनंदाचा सुंगध पसरविणारे चंदन,पारीजात ईतकच नव्हे तर तंबाखू,गांजाच्या झाडासारखे देखील मित्र आपल्या सोबत असतात.

मैत्री करतांना कधीच जातपात,धर्म,रंग,समाज,पैसा काहीच आडवे येत नाही आणि म्हणूनच एकाच भजीचे चार तुकडे तोंडातुन हिसकवुख खातांना कधी ह्दय एकमेकात गुंतते फरक कळतही नाही.
मैत्री आणि प्रेमात जर काही श्रेष्ठ असेल तर ती असते मैत्री कारण मर्यादेच्या साखळदंडात जखळलेल प्रेम अमर्याद मैत्रीच्या अस्तित्वात नेहमीच कमी पडते.

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केल्यास माणसे जोडण्याची कला आणि ह्दयाचा सच्चेपणा अंगी असल्याने कृष्णासारखी आणि कर्णासारखी अस्सल मैत्रीचा बाणा असणारे भरपूर मित्र मिळालेत आणि मीही त्यांच्या गड्यातला ताईत झालो..

आजवर आईच्या कुशीत जितको रडलो नसेल त्याहुन अधिक मित्रांच्या खांद्यावर मोकळा झालो,बापाच्या पैशाने कैली नसेल ईतकी मजा मित्रांच्या सानिध्यात कैली,प्रेयसीच्या मनात  ठसलो नसेल त्याहुन अधिक मित्राच्या ह्दय सिंहासनावर विराजमान झालो,एकुणच निखळ आयुष्याचा मनसोक्त आनंद हरामखोरांसोबत मिळवला...

बस एकच खंत या नात्याने दिली..की काही काळजाचे तुकडे नकळत कट्यार झाले आणि मैत्रीची कट्यार काळजात घुसली नाही तर रुतली......पण आमावसेच्या ह्या काळ्या रात्रीला  मैत्रीच्या प्रखर प्रकाशाने दुर सारलेच....
तुमच्या सारखे मित्र भेटले हे माझ भाग्य आहे पण माझ्या सारखा प्रेमळ शब्दवेडा तुमचा मित्र आहे हे तुमचे परम भाग्य आहे....

आता तुमची नेहमीच प्रतिक्रिया "अब रुलायेगाक्या पगले......."

शेवटी मैत्रीच्या खजान्यातील अस्सल कोहीनुरांसाठी इतकेच

"मैत्रीचा सातबारा........"

एकाच आईच्या उदरातून जन्म नाही भेटला
पण आपल्या प्रेमाचा झरा कधीच नाहीरे आटला
जुळली नाही नाळ तरी जुळला ह्दयांचा किनारा
अन तुमच्याच नावे दोस्ता,माझ्या "मैत्रीचा सातबारा…”


Source: INTERNET
-संगीता देशमुख,
वसमत
   
          'मैत्री' हा शब्द ऐकून,वाचून अतिशय गुळगुळीत झालेला असला तरी प्राचीन काळापासून तर अद्यापपर्यंत  त्याची थोरवी अथवा महत्व हे यत्किंचीतही कमी झालेले नाही. मैत्री म्हटलं की, कृष्ण-सुदामा,अर्जुन- कृष्ण,द्रौपदी-कृष्ण,राधा-कृष्ण,दुर्योधन-कर्ण, यांच्या आदर्श मैत्रीची उदाहरणे आपल्यासमोर उभी रहातात. आजही  राजकारणात असो अथवा समाजकारणात अशी आदर्श मैत्रीची उदाहरणे बोटावर मोजण्याइतकी का असेनात; पण आहेत. संकटाच्या वेळी ढाल होऊन स्वतः वार झेलणारी तर सुखाच्या प्रसंगी पाठीशी उभी रहाणारी,कधी मायेची ऊब देणारी,कधी प्रेमाची सावली देणारी, कानपिचक्या घेऊन वेळीच दोष दाखवणारी मैत्री सगळ्यांच्याच नशीबात नसते. ही श्रीमंती फार मोजक्या लोकांना कमावता येते आणि अर्थातच टिकवता येते. नाहीतर आज रक्ताची नाती सुध्दा स्वार्थासाठी एकमेकांशी दिखाऊपणा करतांना दिसतात. प्रत्येकाच्या वाळवंटी जीवनात असा मैत्रीचा ओॲसिस असावाच लागतो.
           माणूस नात्याच्या जंजाळाने विणल्या गेलेला आहे. यातील सर्व नाती ही रक्ताने मिळालेली असतात. म्हणून ती कशी असावीत,हे माणसाच्या हाती नाही. परंतु मैत्री हे नातेच असे आहे की,स्वभावाचा कोणता ना कोणता धागा जुळल्याशिवाय ती जुळून येत नाही. बऱ्याचदा दोन मित्रांचे किंवा मैत्रीणीची आर्थिक,सामाजिक,बौद्धिक स्तर हा वेगवेगळा असतो,एवढेच काय पण त्यांच्या सवयी,व्यसने,स्वभावही वेगवेगळे असतात. तरीसुद्धा त्या दोघांना किंवा दोघींना एकत्र बांधून ठेवणारा मनाचा धागा असा जुळून येतो. या  मनाच्या धाग्याची सर आजकाल 'फ्रेंडशिप डे' च्या दिवशी बांधण्यात येणाऱ्या कृत्रिम धाग्याला येणारच नाही. कारण आजचे जग जसे आभासी आहे,तसेच मैत्रीही ही आजकाल आभासीच आहे. फेसबुक किंवा व्हाट्सपवर असणारी आजकालची मैत्री ही फक्त सकाळ,दुपार,संध्याकाळ,रात्र यावेळी न चुकता गुडमॉर्निंग,गुडनू न,गुडइव्हिनिंग आणि गुडनाइटचे सुंदर सुंदर मेसेजेस आणि आदर्शाचे डोस पाठविण्यापलीकडे न जाणारी मैत्री आहे. फेसबुकवर आपल्या पोस्टला लाइक आणि कमेंट देण्यापुरती सीमित असणारी ही मैत्री आहे. एकाच शहरात किंवा गावात राहूनही  प्रत्यक्ष भेटीत ओळखही न देणारी मैत्री म्हणजे फेसबुकवरची मैत्री आहे. मग अशा मैत्रीकडून प्रत्यक्षात सुखदुःखात सामील होण्याची अपेक्षा करणे म्हणजे,दिवास्वप्नच ठरेल.फेसबुकवरच्या मित्रमैत्रिणीपैकी प्रत्यक्षात कोणी भेटले तर त्यातून आपल्या पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येईल की काय,अशी भीती बाळगणारी ही ठिसूळ मैत्रीच्या जगात आज लोक वावरत आहेत. फेसबुकवर ३००० मित्रांची यादी असणारा व्यक्ती स्टेटस अपलोड करून आत्महत्या करतो आणि ३००० मित्र त्याच्या या स्टेटसला गंभीर न घेता लाइक दिल्याच्या घटना घडत आहेत.
             मैत्रीचे अनेक पैलू आहेत. मैत्री ही दोन मित्रामित्रांत असू शकते,मैत्रीणीमैत्रीणीत, मित्रमैत्रिणीत असू शकते,तशी वयाच्या कोणत्याही वळणावर होऊ शकते. काहींची मैत्री ही अगदी बालवयापासून तर आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत असते. तर काहींची मैत्री ही तारुण्यापासून पुढे चिरंतन असते.   काहींची मैत्री ही अल्पायुषी ठरते तर काहींची मैत्री समाजात आदर्श बनून रहाते. पण अशा मैत्रीसाठी असावी लागते, पराकोटीची नि:स्वार्थीवृत्ती,जीवाला जीव देण्याची वृत्ती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक माणूस हा चांगल्या-वाईटाचे मिश्रण आहे,ही जाणीव ठेवून मित्र असो अथवा मैत्रीण त्याच्यातील गुणदोषासह त्याला निरलसपणे  स्वीकारण्याची वृत्ती!
     हळूहळू दिवस बदलत आहेत,तसतसे आपल्या संकल्पना व  दृष्टिकोनही बदलत आहेत. मोठ्या शहरात किंवा उच्चभ्रू समाजात मुलगा-मुलगी,स्त्री-पुरुष यांच्या मैत्रीकडे निकोपपणे पहाण्याची वृत्ती निर्माण झाली,परंतु ही हीच वृत्ती मध्यमवर्गीय समाजात अजून आलेली नाही. भिन्नलिंगी मैत्री म्हटले की, आज एकविसाव्या शतकातही मध्यमवर्गीयांच्या आश्चर्यमिश्रीत नाराजीने भुवया उंचावल्या जातात. समविचारी,समउद्देशी लोक मग ते   स्त्री-स्त्री असू शकते,पुरुष-पुरुष असू शकते अथवा ते स्त्री-पुरुष असू शकते,हा विचार मध्यमवर्गीय करत नाहीत. आजही कितीही पवित्र उद्देशाने स्त्री-पुरुष किंवा मुलगा-मुलगी यांच्यात मैत्री असली तरी समाज मात्र त्याकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पहात असल्याने अशी मैत्री अजून आपल्यात रुजलेली नाही.
              आज जागतिक मैत्रीदिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणाई एकमेकांच्या मनाने जोडल्या गेली  की नाही माहीत नाही. आजकालचे युग हे "सेलिब्रेशन" चे युग आहे. आज नात्याची वीण हळूहळू उसवताना दिसते आणि दुसरीकडे मात्र याच बाबींचे "सेलिब्रेशन" मात्र तेवढ्याच घट्टपणे रुजले आहे. हा विरोधाभास आजच्या मैत्रीदिनाच्या निमित्ताने  एकमेकांना मैत्रीचे प्रतीक म्हणून धागा बांधून मैत्रीदिवस साजरा करण्याच्या योगाने कमी व्हावा,एवढीच शुभेच्छा! आणि प्रत्येकाला जीवनात एकतरी कृष्णासारखा मित्र लाभावा,ही सदिच्छा! कारण जगातील सर्वात सत्य,सुंदर आणि मधुर नाते कोणते असेल तर ते आहे मैत्रीचे!
*=====================*


Source: INTERNET
-रुपाली आगलावे,
सांगोला

"मैत्री" फक्त शब्द जरी उच्चारला तरी ओठांवरती हास्य येत.... कारण मैत्री म्हणजे अस गाव ज्या गावात दुःख नाही, दारिद्र्य नाही की, कसली चिंता नाही.... इथं फक्त आनंद आणि आनंदच असतो....  जो कोणी या गावात येतो अगदी रमून जातो... स्वतःच आयुष्य अगदी मनसोक्त जगतो....
  जन्माला आल्यापासून बरीच नाती बदलत असतात पण मैत्री हे एकमेव नात अस आहे जे कधीही बदलत नाही... आणि बदलणार ही नाही... कारण तेच एकमेव नात अस आहे ज्यात कोणताच स्वार्थ नसतो... ज्यामध्ये निस्वार्थ प्रेमाची भावना असते... आणि अस गाव प्रत्येकाच्या आयुष्यात असावं... आणि प्रत्येकानं ते भरभरून जगावं....

Source: INTERNET
-वैशाली सावित्री गोरख,
पुणे(पंढरपूर)

माझ्या जीवनात मैत्री ल खूप महत्व आहे .मी जेव्हा लहान होती त्यावेळेस माझी आई आम्हांला सांगायची की तुमची मित्र कंपनी कशी आहे त्यावरून तुमची जडणघडण होईल,त्यावरून लोक तुम्हाला ओळखतील नि तुमच्या संगतीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल ह्या तिच्या वाक्याने मी ज्या ठिकाणी जाईल तेथे शांत बसून राहायचे फक्त निरीक्षण करायचे व मला जी मुलगी योग्य वाटेल तिच्याशी स्वतःहून जाऊन मैत्री करायचे. आयुष्यातील थोडे तरी दिवस तुम्ही हॉस्टेल मध्ये राहायला पाहिजे मला माझ्या जीवभावाच्या मैत्रिणी तिथं भेटल्या आम्ही 10 जणी ऐका रूम मध्ये रहायचो आत्ता 10 जणी एका रूम मध्ये राहणं म्हणजे चेष्टा नाही प्रत्येकीचे विचार वेगळे,वेगवेगळ्या भागातून आलेलो ,वेगवेगळ्या वयाच्या आम्ही एवढं जिव्हाळ्याने राहायचो व आत्ता ही वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी तेवढच मनाने एक आहोत,त्यात फक्त मैत्री नव्हती त्यात आईवडिलांचे प्रेम,बहिणीची माया नि प्रसंग पडला तर एखाद्याला धरून बडवण्यासाठी दादा पण झालो ,आनंदात ही तेवढीच सोबत व दुःखात ही एकमेकींना तेवढीच सोबत अशी ही पवित्र मैत्री मी प्रेमापेक्षा पण श्रेष्ठ मानते.आत्ता च्या व्हाट्स अँप,फेसबुक च्या जमान्यात तर सगळ्यात जास्त फायदाकोणता झाला असेल तर त्यामुळे मित्र कंपनी खूप वाढली .आपण एकमेकांना भेटलेलो नसतो,जवळून पाहिलेलं नसतं तरीही आपण अप्रत्येक्ष एकमेकांना ओळखतो ,एकमेकांचे मित्र बनतो ही खूप मोठी गोष्ट आहे. मैत्रीत राग नसतो ,द्वेष नसतो,अहंकार नसतो ती पवित्र आहे व तीच पावित्र्य जपून ठेवणं आपलं काम आहे.
*मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

Source: INTERNET
-देवकर मयुरी रघुनाथ,
सोलापूर

              मानवाच्या आयुष्यामधील सर्वांत मधुर नाते म्हणजे 'मैत्री'....मैत्री हा दोन अक्षरी शब्द कळायला आयुष्य कमी पडते...माणसाच्या जडणघडणीमध्ये मैत्री खूप महत्वाची आहे. रडता-रडता हसवते व हसता- हसता  रडवते ती असते 'मैत्री'... धर्म-जात ,वय,श्रीमंत-गरीब या सर्वांच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाऊन या सुंदर जीवनाचा आस्वाद घ्यायला शिकवते ती 'मैत्री'...
             कोणतीही गोष्ट ,मनातील भावना व्यक्त करायला जेव्हा आपण कधीच विचार करीत नाही ते ठिकाण म्हणजे 'मित्र'..आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरीही तू चल ,आम्ही आहोत असे म्हणणारे मित्र भेटायला खरंच खूप नशीब लागतं. मित्रांच्या फक्त एका शब्दाखातीर जीवाची बाजी लावायला आपण तयार असतो कारण ते असतातच असे कलंदर... कोणतीही गोष्ट हक्काने मागायचे ,बिनधास्त ,बेधडक बोलण्याचे ठिकाण आणि वेळप्रसंगी कान धरणारे हे फक्त आणि फक्त मित्रच असतात...अनोळखी या जगात मैत्रीचे सूर कधी आणि कसे गवसतात हे समजतच नाही...कोणताही आडपडता नसतो,कोणतेही बंधन नसते ती असते 'मैत्री'... खुल्या दिलाने एकमेकांना समजून घेत,समजून सांगत एकमेकांच्या हातात हात घेऊन हे जीवनगाणं गात असतो...
              वैक्तिकरित्या मला तर शाळा सोडताना खूप वाईट वाटत होतं कारण जुने मित्र गमावणार...पण असे झालेच नाही आमच्या गावापासून आम्ही दूर गेलो पण मनात तीच जागा आहे...पुन्हा तेच ...कॉलेजमध्ये नवे नमुने भेटले..😍आणि काय कॉलेजचा शेवटचा दिवस कसा आला ते समजलेच नाही..पुन्हा तीच भीती...आपल्या जिवाभावाच्या दोस्तांना अलविदा कसा करणार....पण आजही तीच मस्ती आहे मैत्रीत.... पुन्हा नोकरीच्या ठिकाणी नवीन  मैत्री...यातून हेच लक्षात आले की,जीवनाच्या प्रत्येक वाटेवर नवनवीन मित्र भेटले पण सगळ्यात एकच गोष्ट समान होती आणि ती म्हणजे 'मैत्रीची भावना' ...आणि हीच भावना जगण्याची उर्मी देते,जिंकण्याचा विश्वास देते... आजपर्यँतच्या माझ्या मैत्रीच्या बागेतील सर्व पुष्पांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐💐

Source: INTERNET
-सिमाली भाटकर,
रत्नागिरी

बंधनात राहून खूप जगलो केंव्हातरी मुक्त स्वच्छंदी, जगून तर पहा
रडता रडता थोडे हसून पहा
हृदयातल्या आठवणी मनाला सांगून तर पहा,
गुलाबी गारवा हवा मग रखरखीत क्षण थोडे सोसून तर पहा दुःखाच्या क्षणी आनंदाच्या क्षणांना आठवून तर पहा,
पैज आयुष्याची जिंकण्यासाठी एक डाव तुम्ही खेळून तर पहा,
हरण किंवा जिंकणं नेहमीच असत,
पण आधी थोडं लढून तर पहा,
आयुष्याच्या प्रत्येक धाग्याला आपलंसं करून नाही पकडता येत,
पण....मनाच्या गर्दीतून, हृदयाच्या निस्वार्थ कोण्यातून त्याच्याशी थोडी मैत्री करून पहा,
जीवन हे असंही थोडं जगून तर पहा आयुष्याच्या संध्याकाळी या आठवणींची सोबत घेऊन तर पहा सुरकुटल्या गालात हसू नक्की उमटेल....
मग जीवन असंही थोडं जगून तर पहा,
एकदा तरी पहा
      मैत्री तर सगळे करतात अगदी ट्रेन न रोज प्रवास करणारे ही एकमेकांचे सखे असतात. कधी पार्क मध्ये फिरणारे शाळेत कॉलेज, अगदी नात्यात पण मैत्री असते आणि असावी.
    पण हीच मैत्री थोडी आपल्या जीवनाशी ही करून पहा रोज असंख्य अडचणी, टेंशन याने आपण आयुष्य जगायचंय विसरतो. कधी आयुष्यात जगताना खुपस काही करायचं असत आणि इतरांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहून जात त्यात कुढुन मग आयुष्य मरगळ होत.
     आज हीच मरगळ मैत्री रूपानं दूर करायची म्हणूनच ही कविता माझ्या आयुष्यात समुद्र किनारा माझा सुख दुःख वाटून घेणारा मित्र ठरला ज्याच्या सानिध्यात असंख्य कविता रेखाटल्या त्याचा साक्षीदार होता तो मावळत चाललेला रविराज आणि एक चांदणी.
      असच प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी नक्की असत ते शोधून काढा आणि भरभरून जगा, हसताना कंजूष पणा नको खळखळून हसा जणू सगळी गुदमरून बसलेली दुःख निघून जातील.
    खास करून माझ्या गृहिणी वर्गासाठी भाजीपाला, जिन्नस, घरकाम रोजच आहे, पण एक टी टाइम तुमचा ही असावा. ज्यात तुमच्यासाठी जगाल.
     वयाच्या 60व्या वर्षी बी ए ची डिगरी घेणाऱ्या साठे मॅडम पहिल्या आणि अपुरी स्वप्ने पूर्ण होऊ शकतात हा विश्वास वाढला.
    म्हणूनच तुम्ही देखील शोधून काढा एक अपूर्ण स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी भरभरून जगा.
कदाचित तुम्हालाही भेटेल वृद्धाश्रमात शाळेतील गोड मैत्रीण, अचानक आलेल्या पावसात भिजताना लहानपणी आईची ओरड, किंवा सोडून गेलेल्या मित्रांसोबत चा टपरीवर चा चहा, असच आयुष्य नव्याने सुरू करा अगदी मोकळं आणि मोकळा श्वास घेऊन त्याच्याशी मैत्री करा
    Mil jaye is tarah do lahere jis tarah fir ho na juda ye wada raha,
    हे गाणं ऐकताना समुद्राच्या लाटांचा होणारा अलगद स्पर्श आणि निरागस मित्र जर मला आयुष्याशी मैत्री करायला लावू शकतात तर तुम्ही मागे का तुम्ही ही करा त्या कोंदट आयुष्याशी मैत्री आणि फुलवा नवं चैतन्य ज्यात तुम्ही थोडं स्वतःसाठी जगाल बाकी टेंशन रोजच आहे.

    कितीही बेरजा केल्या तरी आयुष्यात बाकी शून्य आहे.

Source: INTERNET
-वैशाली खरात/गोरे,
पंढरपूर

    मैत्री कोणाशीही केली जाते मग ते निसर्ग ,पुस्तक ,आई वडील ,बहीणभाउ,पतीपत्नी लहानमोठा जातपात ,रंगरूप  मुलगामुलगी काहीच पाहीले जात नाही आपण स्वतः बरोबर पण करू शकतो हे एक अतूट नात आहे. ज्यच्या जवळ आपल्या मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही. हे न तुटनार बंधन आहे. संकटाच्या वेळी आपल्या बरोबर आसते ती मैत्री यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो मैत्री ही आपल्याला सुधारते किंवा बिघडवते  ती आपल्या करण्यावर आसते एखादा मित्र वाईट मार्गाला जात असेल त्याला समाजावण्याचा रागावण्याचा हे मैत्री मधे आपण हक्काने सांगू शकतो.कोणत्याही महापुरुषांच्या जीवनात त्याला घडवण्यात त्यांच्या मैत्रीचाही वाटा मोलाचा आसतो शाळा कॉलेज मध्ये मैत्री चा दिवस साजरा केला जातो एकमेकांना फेडशीप बेल्टस् बाधून मैत्री व्याक्त करण्यासाठी मैत्री दिनाची गरज नसते जीवनातल्या प्रतेक क्षणाची गरज असते मैत्री ही दिखाऊ नसावी टिकाऊ असावी मैत्री मध्ये स्वर्थ नसावा.
Source: INTERNET
-सानप बालाजी,
बीड

संकटकाळात जे मदतीला धावून येतात तेच खरे मित्र असा आपण का विचार करतो...?
त्या मित्राचे सुद्धा काही प्रॉब्लेम असतील असा आपण का नाही विचार करत, त्याची आपल्याला मदत करायची इच्छा असूनसुद्धा तो काही कारणामुळे जर करू शकत नसेल तर आपण त्याच्यावर का विनाकारण नाराज व्हायचे....?

मैत्री
मैत्री म्हणजे कोणतेही बंधन नसणारे नाते,
मैत्री म्हणजे सुख दुःखात साथ न सोडणारे नाते,
मैत्री म्हणजे प्राण, सखा, सोबती,
मैत्रीला जातीचे बंधन नसते,
मैत्रीमध्ये कोणी श्रीमंत नसतो,
मैत्रीमध्ये कोणी गरीब नसतो.
ज्या नात्याला कशाचीही सीमा नसते असे नाते म्हणजे मैत्री.



Source: INTERNET
-प्राची सोनवणे,
अहमदनगर

"किस्मत वालों को ही मिलती है
पनाह दोस्तों के दिल में,
यूँ ही हर शख्स जन्नत का हक़दार नहीं होता….?"

खरंय ना हे अगदी.. इतकं सोप्पं नसतं खरे मित्र मिळणं.. आणि खऱ्या मित्रांची ओळख आपल्या कठीण परिस्थितीत होत असते हे ही तितकंच खरं आहे.

हरिवंशराय बच्चन म्हणतात ते अगदी खरंच की..

"गिरना भी अच्छा होता हैं,
औकात का पता चलता हैं..
बढते हैं जब हाथ उठाने को,
अपनोंका पता चलता हैं.."

अन हे जे अपने असतात ना, हेच तर आपले खरे मित्र असतात.. माणसानं जगात हजारो नाती बनवावीत, पण त्या हजारो नात्यांत एक नातं असं असावं ज्यावेळी हजारो लोक आपल्या विरोधात असतील तेव्हा त्या एक नात्यानं आपल्या पाठीशी उभं राहावं..

शाळेत असताना हे नातं कट्टीबट्टीचं असतं अन पाहता पाहता कधी या नात्यांची दिल दोस्ती दुनियादारी होते समजतही नाही.. आपले मित्र हेच आपले जग होऊन जातात.. आयुष्यातले अनेक अवघड निर्णय घेताना हे मित्र आपल्या पाठी सावलीसारखे उभे राहतात.. अगदी नैराश्याने आपण ग्रासलेले असतो, अन आपला जिवलग मित्र आपल्या एका स्माईलसाठी धडपडतो.. अन आपणही आपलं दुःख विसरून फक्त मित्राच्या धडपडीसाठी आपलं मन मोकळं करतो.. आपल्या अडचणी मांडतो.. अन मग त्या अडचणींवर मात करण्यासाठी मित्राकडून येते सोल्युशन्सची यादी.. यातले अनेक सोल्युशन्स तर ऐकूनच हसू येतं अन आपले प्रॉब्लेम्स कुठं पळून गेले हे आपल्यालाही समजत नाही..

हे मित्र म्हणजे ना अजबच रसायन असतंय बघा.. आपल्या जीवनाला सुंदर बनवणारे आणि जगण्याची मजा वाढवणारे हेच तर कार्टून्स असतात.. आणि मुलांनी फक्त मुलांशी मैत्री करावी, मुलींनी फक्त मुलींशी मैत्री करावी असंही काही नसतं बरं का.. एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा या मैत्रीच्या नात्याला सुंदर न्याय देऊ शकतात.. खासकरून कॉलेजेस आणि ऑफिसेसमध्ये अशी सुंदर मैत्री नेहमी पाहायला मिळते..

या नात्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, अनेक कवी, लेखक या सुंदर नात्याचं वर्णन करताना थकत नाहीत.. तर अशा या जानसे भी प्याऱ्या दोस्तांना माझा सलाम आणि सर्वांना मैत्रिदिनाच्या शुभेच्छा..

Source: INTERNET
-यशवंती होनामाने,
मोहोळ

दोस्ती का नाम जिंदगी ....जिंदगी का नाम दोस्ती ......मेल्यावर आपल्या पिंडाला कावळा कधी शिवेल हे घरच्या लोकाना नाही तर फक्त मित्रांना माहित असेल अशी ही मैत्री.....
मैत्री......मैत्री बद्दल लिहायला लागले तर शब्द भांडार कमी पडेल ....जगात आपण कुठे ही जाऊद्या आपल्या सोबत राहते फक्त मैत्री....माझा अनुभव आहे,दोन तीन वर्षापुर्वी मी खूप टेन्शन मध्ये होते,माझ्या आयुष्यात खूप चढ़ उतार चालू होते मला घरच्या किंवा नातेवाईक लोकांनी फारशी साथ दिली नाही.मला वाटायचे की माझ सगळ समाप्त झालय,मी आत्ता आयुष्यात काहीच करू शकणार नाही,msw करून नौकरी करत होते तरी पण वाटायचे की आपण आत्महत्या करावी,प्रयत्न ही केला,पण .....मी जगले.आज मी जी काही आहे ती फक्त माझ्या मित्र आणि मैत्रिणी मुळेच.खूप आधार दिला त्यांनी.ते सगळे होते म्हणून मी जगले ...आणि फक्त जगलेच नाही तर जगण्याची मज्जा घेतीय....आय लव माय फ्रेंड्स.....
अशी ही मैत्री आमची.,....
सुटेल कारे हात दोस्तीचा,नाय नाय नाय .....
ही दोस्ती टूटायची नाय....
सगळ्याना मैत्री दिनाच्या शुभेच्छा !!!!!💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************