बचत गट- सावकारी की जीवनमान उंचावण्याचे साधन.


शीतल शिंदे ,दहिवडी.
        बचत गट ही संकल्पना खुप चांगली आहे.आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी व्यवसासाठी भांडवल रुपात कर्ज घेवून आपण आपली वृद्धि करू शकतो.
     
   व्यवसाय म्हटले की भांडवल आले. हे खाजगी व्यजाने परवडनारे नसते.मात्र यासाठी बैंक उपयोगी पडते,मग ती खासगी असो वा सरकारी.
खाजगी बैंक मधे तत्काल कर्ज मंजूरी दिली जाते साहजिक व्याजदर जास्त असनारच.त्यांना सुधा नफा हवा असतोच की.
    मात्र घेतलेले कर्ज कोणत्या पद्धतीने उपयोगी आणले जाते, व्यवसाय कोणत्या प्रकरचा निवडला आहे हे ही महत्वाचे आहे.किंवा घेतलेले पैसे कोणत्या कमी लावले हे महत्वाचे असते.उदा.ते पैसे घर बंधन्यासाठी वापरले तर अथवा वैयक्तिक कारण्यासाठी तर ते बुडित भांडवल होणार साहजिकच कर्ज आणि  व्याज वाढणार.
    मात्र  त्या पैशातून फल,भाजी,चाहा नास्ता  वडापाव इत्यादि तसेच कुकुटपालन शेलीपालं स्टेशनरी इत्यादि व्यवसाय निवडल्यास फायदा होवू शकतो.
   कर्ज फेडण्याचे व्यवस्थापन नीट असेल तर हे नक्कीच जीवन मान सुधारण्याचे साधन आहे.
  खरेतर ही संकल्पना फार वर्षापुर्वी उदया ला यायला हवी होती, जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी "  the problem of ruppy "  हे पुस्तक लिहिले.कारन त्याच आधारावर  reserve bank of india   या    bank ची निर्मिती झाली. पण वाचतो कोण हो _ इ थे  नीट पोट भरण्याचे साधन नव्यते मग शिक्षणाचा अधिकार तर लांबच आनी वाचन तर फारच दूर.ज्यानी  लवकर वाचन केले ते ,उद्योगपती झाले.असो उशिरा का होईना आपण एथपर्यंत पोहोचलो.🙏





किशोर शेळके, लोणंद.  जि. सातारा. 
      आजच्या या स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी प्रत्येक जण आपल्याला धावत असलेला दिसतोय. यासाठी रोज वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे काहीतरी साईड इफेक्ट असतातच. आणि त्याला काहीही अपवाद नाही. 

      काहीतरी चांगलं व्हावं यासाठी एखादी योजना राबवली तर त्याच्या दुसर्या बाजूला (साईड इफेक्ट) लक्ष न दिलेलेच बरे. कारण समाजात सर्वच ठिकाणी तशी लोकं सापडतातच की स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्ण सिस्टीम बिघडवून टाकतात. मी इथं दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 

       भारतीय संस्कृती ही पुरूष प्रधान संस्कृती आहे. इथे पुरुषांनी कमावणे आणि स्त्री ने चूल आणि मूल सांभाळणे हा इथला रूजवा, पण बदलत्या समाजप्रबोधनात स्त्रीला समान दर्जाची वागणूक मिळावी, तीनेही पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन कमवावे, तिच्या ही मनामध्ये व्यवसायाची आवड निर्माण व्हावी, आणि अशा अनेक कारणांमुळे महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. यामागे महिलांनी स्वकतृत्वाने पुढे यावे, स्वतःच्या कला-गुणांना वाव देऊन आर्थिक बाजू भक्कम करणं असेच हेतू होते. बर्याच अंशी हा हेतू सफल झाला आहे असं मला वाटतं. 

      आता या नाण्याची दुसरी बाजू बघायची झाली तर, भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा विषय आहे. संस्थाच्या किंवा बॅंकांच्या अधिकारी वर्गापासून ते अगदी बचत गटाच्या अध्यक्ष आणि सचिवापर्यंत भ्रष्टाचार आपल्याला बघायला मिळतो. परिणामी हप्ते वेळेवर भरले जात नाहीत. बचत गट तोट्यात आलेले दिसतात. बंद करावे लागतात. 
   अर्थातच हे माझं वैयक्तिक मत आहे. यामागे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करावे...





सीमाली भाटकर, रत्नागिरी
         सरकारने महिलांच्या व्यावसायिक दर्जात सुधारणा व्हावी त्यांना स्वतःच आर्थिक पाठबळ असावं म्हणून गावोगावी बचत गटांची स्थापना केली.
      वेळोवेळी त्यांना आर्थिक पुरवठा केला. फिरता निधी स्वरूपात महिलांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना या निधीतून एखादा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु आज हे चित्र सगळीकडे दिसत नाही काही बँका यातून डबघाईला आल्या तर व्यावसायिक कर्जाच्या नावाखाली सरकारला लुटण्याची मोहीमच जणू सुरू झाली. काही भागात महिला खरंच प्रामाणिक पणे काम करून स्वतःचा व्यवसाय दर्जा उंचावत आहेत पण ही स्थिती सार्वत्रिक नाही.
          कारण बऱ्याच ठिकाणी या बचत गटांच्या माध्यमातून व्याजी पैसा बाहेर तसेच इतर गरजू स्त्रियांना दिला जातो व त्यातून व्याजाच्या माध्यमातून त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. या कल्पनेने त्या गटातील स्त्रियांना गरजेसाठी पैसे मिळतात पण काही ठिकाणी त्याचा दुरुपयोग देखील होऊ लागला बँकेच्या माध्यमातून मिळणारे बिनव्याजी कर्ज वार्षिक 12% म्हणजे महिना 1% व्याजदर न घेता तो 2% महिना म्हणजे वार्षिक 24% दराने महिला बचत गट गटातील महिलांना देतात यातून त्यांना फायदा होतो, त्यांना त्यांच्या परीने हळूहळू कर्ज फेडले जाते पण काही ठिकाणी महिला याची दलाली करू लागल्यात 10%व्याजदर लावून पैसे देने असे प्रकार याच गटांच्या माध्यमातून घडतात त्यांची सरकारला जाणीव देखील नाही. 
        आणि अशिक्षित महिलांना हे कळत नाही की 10 % म्हणजे वार्षिक120% व्याज. 
सरकारने दिलेल्या व्यावसायिक तेचा असा उपयोग होतो आहे मग यात जीवनमान सुधारणा घडवून आणली जाते की जीवन उध्वस्त होते ही विचारकरण्या योग्य गोष्ट आहे नाही का?
        ही व्यावसायिकता की व्याजी पैशाचा बाजार. याहूनही पुढे एखादा उद्योग सुरू केला तर कामापेक्षा भांडणे जास्त प्रमाणात. मग सरकारने घेतलेले निर्णय अयोग्य नाहीत तर ते अमलात आणणारी महिला चुकीच्या हा फार मोठा प्रश्न आहे? 

  •         भगिनींनो तुम्ही व्यावसायिक व्हा स्वतःच्या कुटूंबाला हातभार लावा आपल्या सोबत इतरांना घ्या आणि प्रत्येकाचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न करा.
आज अशीही उदाहरणे ज्या महिलांनी स्वतःच्या गटातून एक व्यवसाय सुरु केला आणि बचतगट ही सरकारी संकल्पना खऱ्या अर्थाने यशस्वी केली. 
       पण काही ठिकाणी जाऊन पाहिले तर बचतगट हे भानगड गट म्हणून देखील ओळखले जातात आणि ही फारच चुकीचे मत आपण स्वतः विषयी करून घेतले. 
      त्या ऐवजी सरकारने दिलेल्या संधी च सोन करा आणि एक व्यावसायिक म्हणून नावारूपाला या.


प्रविण, मुंबई 

     सर्वप्रथम “बचत गट” हे नावच चुकीच आहे. त्याच नाव “स्वयंसहायत्ता गट” ज्याला इंग्रजी मध्ये self-help group म्हणतात. महाराष्ट्रात याचे सुरवात माविम ने केली. काही  जणांनी स्वयंसहायत्ता गट या विषयावर लिहिलेले लेख वाचले. मी स्वतः स्वयंसहायत्ता गट या संकल्पनेवर रिसर्च केला आहे गेले ३ वर्ष या संकल्पनेवर काम करीत आहे. जे लेख मी वाचले त्यातून काही गोष्टची  प्रकर्षाने जाणीव झाली ती म्हणजे “स्वयंसहायत्ता गट” या संकल्पाने बद्दल असलेले गैरसमज आणि त्याच्या उद्देशाबद्दल ची जाणीव. या लेखात मी प्रयत्न करेन कि “बचत गट” ची खरी संकल्पना मांडण्याचा.

गैरसमज –

1. स्वयंसहायत्ता गट हा व्यवसाय चालू करून देण्यासाठी चालू करण्यात आले आहेत असा एक समज आहे. पण प्राथमिक उद्देश हा सावकारी संपवण्याचा आहे. जेव्हापासून हे गट सक्रीय झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात सावकारी दर हा २०% वरून ३ % पर्यंत खाली आल आहे. व्यवसाय उभारणे, सामाजीक कार्य करणे हे हि उद्देश आहेत पण ते प्राथमिक नाहींत.

2. स्वयंसहायत्ता गट हा सावकार आहे.  वरील एका लेखात अस म्हटलं होत कि बँक कडून 1% दराने कर्ज येत आणि गट २% परतफेड करतो. अगदी बरोबर आहे. पण हे सावकारी वाढवण्यासाठी नाही आहे. मुळात जो जास्तीचा 1% असतो तो गटाच्या खात्यावर कोर्पस फंड म्हणून ठेवायचा असतो.  ज्याचा वापर गरजेवेळी करत येतो, तो फंड हा सदयांमध्ये कर्ज स्वरुपात फिरवता येतो  किंवा त्याचे एफडी करता येते. याला सामुदायिक बँकिंग (community banking) म्हणतात. तमिळ नाडू, केरळ या राज्यात रु. १०-२० लाखांत व्यवहार करणारे अनेक गट आहेत.

3. स्वयंसहायत्ता गट हे फक्त आर्थिक स्वरूपाच आहे. मुळात याला अनेक अंग आहेत ज्याची जाणीव खुद्द महिला सदस्यांन नाही. प्राथमिक उत्पादक गट जो एकाच प्रकारचे व्यवसाय करणार्यांचा गट आहे. adolosent girl health group – ह्यातून वयात आलेल्या मुलींचा गट बनवून त्याद्वारे आरोग्यावर मार्गदर्शन केले जाते. तसेच शेतकरी गट आहेत त्यातून सामुहिक मार्केटिंग केली जाते.

4. MFI (Micro-Finance Institution) – हे सामायिक जबाददारी समूह आहेत पण यालाही लोक बचत गट म्हणतात.

खरी संकल्पना

स्वयंसहायत्ता गट हे आर्थिक साक्षरतेच, महिला नेतृत्व उभारनीच व्यासपीठ आहे. २५-३० गटांच संघ आणि ६-८ संघांचा महासंघ करून तालुका पातळीवर गट प्रभावशाली पद्धतीन काम करत असतात. या संकल्पनेला federated SHG म्हणतात. हि गट महासंघाशी जोडलेली असतात आणि हा महासंघ ट्रस्ट कायद्याखाली नोंदणीकृत असतो. संपूर्ण महासंघाच व्यावास्थापान हे ११ महिला करत असतात. प्रत्येक संघात ११ सदस्यचे कार्यकारी मंडळ असते त्यातून महासंघाची कार्यकारिणी निवडली जाते. 
याच महासंघाद्वारे सरकारी धोरणांवर, योजनांवर, सामाजीक समस्येवर काम केली जातात. याची सुरवात MYRADA या कर्नाटक मधी संस्थेन केली त्यानंतर DHAN Foundation ने संपूर्ण दक्षिण भारतात याचे जाळे पसरवले. केरळ सरकारने कुटुंबश्री या नावाने या संकल्पनेत भर घातली आणि महाराष्ट्रात माविम ने हि संकल्पना राबिवली.
याचे फलित म्हणजे आज तमिळनाडू मध्ये गटांनी स्वताचे इस्पितळ चालू केलेत. ( मदुराई येथेतर cancer  चा इलाज हि होतो ) तसेच शाळा आहेत, कॉलेजेस आहेत. केरळ मध्ये तर जितक्या महिला सरपंच आहेत त्यातील ५०% सरपंच या कुटुंबश्री च्या आहेत. 


महाराष्ट्रची स्थिती 
महाराष्ट्रात बरेच ठीकानी बचत गट विस्कळीत दिसतात. त्याची काही विशिष्ट करणे आहेत.

1. उदासीनता – हि संकल्पना आजही अनेक महिलांपर्यंत पोहचली नाही आणि जिथे पोहचली तिथे याबाबत उदासेनीता दिसली आहे. माझ्यामाहिती प्रमाणे सोलापूर आणि बीड येथे धान फौन्डेशन, पुणे मध्ये मासूम फौन्डेशन आणि चैतन्या फौन्डेशन सोडले तर कुठेही मोठ काम दिसत नाही. 

2. पुरुष हस्तक्षेप – या गटांमध्ये आजही पुरुषांचा हस्तक्षेप दिसत आहे. त्यामुळे विस्कळीत पण अधिक आहे.

3. MFI चे वाढते प्रास्त – MFI (Micro-Finance Institution) – महिला याच्या जाळ्यात पूर्णतः अडकलेल्या दिसतात, हे कायदेशीर सरकार आहेत. यांचे joint liability group असतात ते स्वयंसहायत्ता गट नसतात पण महिला बळी पडताच राहतात.

4. MSRLM – केंद्र सरकारचा अत्यंत चांगला उपक्रम पण भ्रष्ट तालुका अधिकारी आणि CRP (पुस्तक लिखाण करणाऱ्या सेविका) यामुळे पूर्णपणे फसलेला उपक्रम. फिरता निधी हे अनुदान आहे असे सांगून त्याचा खरा उद्देश लपवून ठेवला जातो आणि प्रत्येक निधी मागे 3000 ची लाच उकळली जाते. बँक चे व्याज हे ०% आहे असा सांगून टार्गेट पूर्ण केल जात आणि त्याचा जास्त त्रास बँक ला होत असतो. २०१४ साली १००० करोड चे बुडीत कर्ज होत.
यावर बरेच काही लिहिता येईल पण शब्द्मर्यादा आहे म्हणून जास्त लिहिता येणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************