सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रवाहाच्या विरोधात उभे राहणे का गरजेचे आहे?

प्रवाहाच्या विरोधात उभे राहणे का गरजेचे आहे?



अनिल गोडबोले,सोलापूर
पाण्यात पडलेली कोणतीही गोष्ट पाण्याच्या गती बरोबर वाहत जाते त्या प्रमाणे जीवनात माणूस हा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीप्रमाणे चालत असतो.पाण्यात जर एखादा खडक मध्येच आला तर प्रवाहाला थांबवतो.. पाणी जिरवतो.. साठवतो.. व वाया जाणारे पाणी उपयोगाला येते त्याप्रमाणे ... जीवनात जर चुकीचे घडत असेल तर प्रवाह थांबवणे गरजेचे आहे.प्रस्थापित व्यवस्था किंवा सत्ता मानसिकतेचा उपयोग करून प्रवाह निर्माण करतात व त्यात काहीही (काहीही..) सोडतात आणि बाकीचे त्याला धरून वाहत जातात.त्यात फायदा जरी सत्ता करणाऱ्यांचा असला तरी लोकांचे नुकसान होत असते. तेव्हा त्या गोष्टी करण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे.अशा माणसांमुळे तर सुधारणा होत असते. आणि सुधारणांचा लाभ मात्र सगळे लोक घेतात.

किरण पवार,औरंगाबाद
या प्रश्नाच उत्तर द्यायचं झाल्यास एक प्रश्न आणखी हवा तो म्हणजे, प्रवाह कोणता? किंवा प्रवाहाची असलेली दिशा नेमकी काय...? कारण बऱ्याचदा प्रवाह हे मार्मिकतेचे आणि सर्वांगाणे विकसित करणारे असू शकतात.  आणि अशा वेळेस ठरवलचं प्रवाहाच्या विरूद्ध जायचं तर अधोगती झाल्याशिवाय पर्याय नाही. पण काही वेळा नकारात्मकता, अयोग्यता, गुलामी आणि एकाच दिशेत चालणाऱ्या कल्पनायुक्त्या यांना कुणीतरी भेदावचं लागतं. इतिहास साक्षी आहेच त्याखेरीज क्रांती घडत नाही. त्यामुळे नाविन्यपूर्ण आणि जगण्यासाठीच अनुकूल वातावरण आपण आपल्या पुढच्या पिढीला किंवा सोबतच्या समाजाला देण्यासाठी एखाद्या प्रवाहाच्या विरोधात उभ राहणं गरजेच असतं;असं मला वाटतं.  




दिपाली वडणेरे ,नाशिक
     प्रवाहाच्या  विरोधात उभे राहणे म्हणजे वाटते तितके सहज  किंवा सोपे आहे असे नाही पण वाटते तितके जास्त काही अवघड  देखील नाही पण त्यासाठी हवी फक्त स्वतःची मनापासुन कसुन तयारी , स्वतःवर आत्मविश्वास आणि  धाडस आणि आपण बर्याच वेळा कित्येक ठीकाणी करतो देखील पण काही वेळा तिथे आपणच वाईट ठरत असतो. परंतु ; म्हणून काय आपण शांत राहायचं किंवा  प्रयत्न सोडून द्यायचे असे मुळीच नाही करायचे.... आपले प्रयत्न सतत चालूच ठेवायचे कारण कधी ना कधी का होईना यश तर आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि आपण योग्यच करतोय एवढा विश्वास  मात्र आपला स्वतःवर असणे गरजेचे आहे.... विरोधक तर आपले आपण काही करो वा न करो तरीही तयार होतात मग प्रयत्न करून विरोधक तयार झाले तर आपल्यासाठी ते फायद्याचेच ठरेल ना ....विरोधक असतील काहीतरी नविन करायला पण मजा येते आणि उत्साह देखील येतो आणि तेव्हाच  तर आपण स्वतःची नविन ओळख निर्माण केली करायला सुरूवात करतो , स्वतःमध्ये असलेले नविन कलागुण आपल्याला समजतात , जगण्याला एक वेगळे वळण ( दिशा ) मिळत असते .... यशस्वी झालो की आपले विरोधक देखील आपल्याच बाजुने होतात .... आणि म्हणूनच प्रवाहाच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे ......




अर्चना खंदारे,हिंगोली.

होय...
प्रवाहाच्या  विरुद्ध उभे राहणे  गरजेचे आहे कारण त्यामुळे आपल्यामध्ये  असलेल्या क्षमतांची ओळख व किती तरी कला गुणांना वाव मिळेल.पण सुरुवातीला प्रवाह  हा चुकीच्या दिशेने जात तर नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे.कारण जर प्रवाह हा जर योग्य दिशेने जात असेल तर त्या प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहणे हा आपला मूर्खपणा  ठरू शकतो..
आणि जर प्रवाह हा चुकीच्या दिशेने जात असेल  तर मग प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहणे नक्कीच योग्य व फायदेशीर  ठरेल..आणि अस्या चुकीच्या वाहणाऱ्या प्रवाहाला प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे, मग त्यासाठी  त्या प्रवाहातून एकट्यानेच विरोध केला तरी चालेल आणि प्रवाहातून विरुद्ध जाऊन स्वतःचे ध्येय  गाठण्याची जिद्द आणि आत्मविश्वास असणे खूप महत्वाचे आहे...आपल्याला माहित असतानाही आपण जर विरोध केला नाही (विरुद्ध गेलो  नाही )तर मेंढरा मध्ये आणि आपल्या मध्ये फरक काय राहणार..आणि आज करो या मरो अशी स्थिती निर्माण झाली आहे.म्हणूनच इथे, "ज्याच्यात  हिम्मत आहे,त्यालाच किंमत आहे"....
म्हणूनच  प्रवाहाची  दिशा ओळखून प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहणे गरजेचे आहे ...



वैशाली सावित्री गोरख
आपण पाहतोच की जेव्हा पाण्याचा प्रवाह वाहत असतो तेव्हा तो आपल्याबरोबर ,सरसकट पालापाचोळा ही घेऊन वाहत असतो ,पाण्याला समजत नाही की आपण आपल्या प्रवाहाबरोबर काय काय घेऊन  चाललोय .त्याचपद्धतीने आपल्या समाज एक प्रवाह आहे ,त्यात काही गोष्टी ठरवून ठेवलेत किंवा नवीन काही गोष्टी लादल्या जातात नि ह्या सगळ्यातुन चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत नि आपल्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्या वेगळ्या करून ,आपल्या मनाला  नि त्याच बरोबर त्या चुकीच्या आहेत तरीही समाज त्याच समर्थन करतोय तर चुकीच्या गोष्टीचा विरोध करणे ,नि त्या योग्य कशा आहेत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे ,नि हे सगळं करताना तेवढ्याच पद्धतीचा अपमान,निंदानालस्ती ,सहन करण्याची धमक आपल्यात हवी ,ज्या पद्धतीने जोतिबा फुले, सावित्रीबाई  फुले सामाजिक प्रवाहाच्या विरोधात जाऊन मुलीच्या शिक्षणासाठी झटले होते नि त्यांनीही किती तरी मोठया प्रमाणात ह्या समाजाकडून होणारा अन्याय सहन केला पण त्यांनी जिद्द सोडली नाही ,त्याच पद्धतीने आज आपण 21 व्या शतकात येऊन ही त्या दोघांन सारखे प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही करण्याची धमक ठेवत नाही .
    नि आजच्या युगात खूप  काही गोष्टी साठी प्रवाहाच्या विरोधात जाणे गरजेचे आहे ,आज जात नि धर्माच्या नावाखाली जो बाजार उठवला आहे नि सर्वांना एक समान माणूस म्हणून जगण्याचा हक्क द्यायचा असेल तर तरुणांनी जागे होऊन आंतरजातीय विवाह करणे , ह्या साठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे ,हे मी एक उदाहरण दिलं आणखी बऱ्याच आशा गोष्टी आहेत ज्या साठी आपल्याला प्रवाहाच्या विरोधात जावं लागणार आहे पण त्यासाठी आपल्या मनाची पूर्ण तयारी ही हवी .

यातील सर्व संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतली आहेत

गोंधळलेली जनता व राजकारण

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 7⃣0⃣वा 📝 
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒✍📖
 10 मार्च 2019  ते  16 मार्च 2019

गोंधळलेली जनता व राजकारण




सिताराम पवार,पंढरपूर

            लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. पण कधी कधी जनताच चुकीच्या लोकांना निवडून देते त्यामुळे डोकं सुन्न होत.त्याला कारणही तशीच असू शकतात. काही लोक पैशाचा वापर, धाक दाखवून, किंवा सक्षम स्पर्धक नसल्यामुळे निवडून येतात.सध्या मात्र खूपच सामाजिक गोंधळ निर्माण झाला आहे.समाजसुधारकानी जीवच रान करून सामाजिक सुधारणेची पायाभरणी केली पण खलील कारणांमुळे सामाजिक एकोप्याला सुरुंग लागत आहे.
1. वाढताजातीअभिमान
2. जातीवर आधारित आरक्षण व त्यामुळे जातीवर आधारित संघटना स्थापन
3. सार्वजनिक हितासाठी आपल्यातला 'मी'पणा न सोडण्याची मानसिकता.
4. सत्ताधारी विरोधात बोललं की लागेचंच विरोधी पक्षाचाच आहेस अस मानण्याची वाढलेली वृत्ती.
5. महापुरुषांच्या विचारांचा केलेला रिंडगुड.
सध्या जनता स्वतःलादोन विचारातच गुंफू पाहती आहे आणि त्यात तटस्थ लोकांनाही ओढते आहे.
सध्या राजकारणावरील गोधळ खूप हीन पातळीवर गेला आहे.आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वसा यशवंतरावानी दिला आजचे महाराष्ट्रातील राजकारणही  गोंधळलेल्या विचारांत सापडले आहे.कळतच नाही कोणता पक्ष व राजकारणी तत्वानुसार वागतोय. कुणाचा मुलगा एका पक्षाचा खासदार तर सून दुसऱ्याच पक्षाच्या पाठींब्यावर जि. प. अध्यक्ष, तर पुतण्या तिसरीच पक्षाचा आमदार. नवल या गोष्टीच आहे की तत्व, विचार यासाठी सत्तेवर न  लाथ मारता सत्तेसाठी नव्हे तर जाणून बुजून सत्ता आपल्याच घरात प्रस्तापित लोकांनाच मिळावी म्हणून राजकारण्यांनी सामाजिक तत्वे धुळीस मिळवली आहेत.विशेष म्हणजे ही लोकं सामाजिक विषमतेच्या वाढीस पूरक भूमिका घेतात. आशा आहे गोंधळलेल्या राजकारण्यांना गोंधळलेली जनताच गोंधळ( मत)  घालून ताळ्यावर आणील.
*==============================*

संगीता देशमुख,वसमत

             आजकाल सोशल मिडियामुळे लोकांचा एवढा गोंधळ उडत आहे की,काय खरं,काय खोटं याचा ताळमेळ कोणालाच नाही. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापरच जास्त होतो आहे. कुठलेही फोटो,विडिओ एडिट करून आपल्यापर्यंत पोहचत आहेत. आता जेव्हा एअर स्ट्राइक झाला तेव्हा त्याचा लाइव्ह विडिओ व्हायरल झाला. तोच अनेक सुशिक्षितानी अजून पुढे पाठवला. बारकाईने पाहिल्यावर त्यावरची वेळ पाहून कळाले हा विडिओ फेक आहे. तसेच राजकीत क्षेत्राबद्दल सुध्दा घडत आहे. मूळ  विडीओ वेगळाच असतो त्यावरचा आवाज वेगळाच असतो. पण सामान्य म्हणण्यापेक्षा आपल्यासारख्या उच्चशिक्षित लोकांचाही काय खरे आणि काय खरे कळत नाही तेव्हा अतिसाधारण शिकलेल्या लोकांचा गोंधळ उडत असेल? जो तो आपापल्या सोयीनुसार पोस्ट तयार करून टाकतात. त्यात मोठ्या दिग्गजांची नावे टाकून तो पसरवतात. विकास आमटे,विश्वास नांगरे यांच्या नावाने ते पाठवलेली असल्याने लोकांचा त्यावर विश्वास असतो. त्यातून अनेकदा चुकीचीही माहिती पसरविल्या जाते. अनेकदा देवाच्या पोस्ट पाठविणे,त्या इतरांना पुढे पाठवायला सांगून दहशत पसरविणे हे म्हणजे लोकांचा गोंधळ उडविणेच  आहे. सध्या निवडणुकीच्या काळातही असेच जनतेचा गोंधळ उडविणारे सर्वच राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते संदेश पसरवत रहातील,यामुळे जनतेचा गोंधळ उडून दिशाभूल होण्याची शक्यता जास्त आहे.
*================================*


दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम


            मानव हा एक सामाजिक प्राणी आहे तसाच तो समाजप्रिय पण आहेच, समाजात राहताना माणसांनी स्वतः ला काही नियम घालून दिलेले आहेत ते यासाठीच की आपला गोंधळ नको व्हायला म्हणून. पण आजच्या सामाजिक वातावरणात वावरताना कुठला अनुभव येतो तर तो म्हणजे सारा गोंधळात गोंधळ दिसतोय.

जनता ही सारी जनता
नुसतीच वाढलीय घनता
नुसता इथं राजकारणाचा गोंधळ,
जनतेच्या हाती देऊन संबळ।

जनता ही आहे बडी डोकेबाज
मतं विकून करते कसला माज
नको ती मतांची किंमत
नेता करतो मग 5 वर्ष गंमत।

समाज म्हणून पाळावी आपण आपली मूल्ये,
तेव्हाच कुठं चांगलं मिळवतील आपली पाल्ये,
आपलाही नको गोंधळ नको तो राजकारणाचा,
एक पाऊल पुढे टाकून साचा बनवू समाजाचा।

नाही व्हावा गोंधळ कुणाचाच यासाठी,
राज्यघटनेला आपल्या धर्मग्रंथ माना,
तीच उंचविल आपला जगामध्ये बाणा।
*===============================*
Image soucre INTERNET

सागरात बुडणाऱ्या गणेशाचे मनोगत

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

सागरात बुडणाऱ्या गणेशाचे मनोगत 


करण बायस

(बाप्पाला निरोप द्यायची वेळ असते तेवढ्यात सर्वांचे लाडके बाप्पा काही वेळेसाठी त्यांच्या मनातील समाजाबद्दल असणारी खंत व्यक्त करण्यासाठी press conference घेतात.)

*पत्रकार* : नमस्कार बाप्पा 🙏,खुप आनंद झाला भेटून तुमच्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी माझी प्रश्न चालू करतो.

*१)लो. टिळक यांनी सार्वजनीक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती यामागे त्यांचा जो हेतू होता(जाती-धर्मांना एकत्रित आणण्याचा) तो हेतू पूर्ण झाला का ? याबद्दल तुम्हाला काय वाटते?*

-लोकमान्य टिळक यांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा जो हेतू होता त्याचं कारण अस होत की सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित यावं आणि संघटीत होऊन स्वातंत्रेची चळवळ उभी करता यावी. मी गेली कित्येक वर्षांपासून, दरवर्षी येऊन बघत आहे की माणूस दिवसेंदिवस जातीवादी आणि धर्मवादी बनत चालला आहे. काही जातीवादी संघटना उभ्या राहिल्या आणि धार्मिक कट्टरता निर्माण केली,यातूनच आतंकवाद पण तयार झाला.आणि आता तर नवीनच काहीतरी प्रत्येक धर्मातील जात त्यांचा नवीन धर्म बनवण्याच्या तयारीत दिसत आहे.लो. टिळकांचा हेतू हा चांगला होता, पण पुढे लोकांना त्या हेतूंची जबाबदारी घेता जमली नाही.या गोष्टीचा विचार करून फार दुःख होतं(कमी आवाजात).

*२)तुम्हाला आराध्य दैवत म्हणून सुपारी ची पण पूजा केली जाते, आणि हे एक सुपरीत गणपती आहे असं म्हणणाऱ्या आणि ते माणवुन घेणाऱ्या लोकांबद्दल तुमचं मत काय?*
-(हसत) मला पण हे बघून हसू येतं, माणूस हा पृथ्वी वरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे आणि काही फसवणारे स्वतःच्या पोटासाठी थोडी बुद्धी लढवतात आणि लोकांना लुटतात कारण बऱ्याच वर्षांपासून त्या जातीतील समाजाने दुसऱ्या समजतील लोकांना conditioned करून ठेवलं की आम्ही जे म्हणतो ते खरं असते किंवा त्यांनी म्हटलं तस नाही एकल तर वाईट होऊ शकते आणि लोकांच्या मनात एक भीती निर्माण केली. आज मोठं मोठी धार्मिक प्रवचन देणारी काही मंडळी लाखो रुपये त्यांची फीस म्हणून मानधन घेते आणि थोडी फार दान करते,आणि ते दान पण असं की त्यातून सुध्दा त्यांना परत काही फायदा होईल आणि लोकांना असं वाटत की आमचे महाराज खूप दान करतात. आजच्या काळात हा एक चांगला धंदा बनला आहे.

*३)आजकाल देवाच्या नावावर पैसे कमावण्यासाठी कोणी पण महाराज बनण्यासाठी निघत आहे आणि भरपूर पैसे कमवत आहे ?*
- हो,मी हे निरीक्षण केले आहे.जस की मी बोललो एका समाजाने लोकांना conditioned करून ठेवले कदाचित या गोष्टीचा फायदा घेतला जात आहे.आणि महत्त्वच म्हणजे अशावेळेस स्त्रियांना लक्ष्य केलं जातं अशाच कारणांमुळे समाजात स्त्रियांचं शोषण वाढत चाललं आहे. मी बघत आहे देवाच्या नावावर किंवा त्या देवाचा प्रचार करून स्वतः उभा केलेले मठ किंवा मंदिर याबद्दल बऱ्याच गोष्टी बनवल्या जातात आणि लोकांच्या भावने बरोबर खेळ करतात, आणि ज्या वेळेस ते मठ मोठं होत त्याला जास्तीतजास्त मानधन मिळतो त्यावेळेस तिथला मुख्य पुजारी हा फक्त मोठ्या माणसाला म्हणजे पैशाने मोठे असलेल्या लोकांना जवळ बसवतात आणि बाकीच्या भक्तांना दूर ठेवतात हे सुद्धा पैशासाठीच होतं.

*४)प्रत्येक मोठ्या मंदिरांना भरपूर दान येते ते दान तिथले महाराज आणि ट्रस्टचे मेंबर्स खातात,त्याचा वापर कसा केला पाहिजे ?*
-पहिली गोष्ट देवळातल्या दगडाच्या मूर्तीमध्ये देव नसतो हे समाजाने मान्य करायला पाहिजे.लोकांची भक्ती आहे ते जातात योग्य आहे मंदिरात शांतता भेटते आणि मनाच्या शांती साठी मंदिरात जायला हवे.ठीक आहे भक्त आपल्या भक्तीने दान करतात तर त्याचा वापर योग्य तो केला पाहिजे.आज एवढे श्रीमंत धार्मिक स्थळ असून काही लोक उपाशी झोपतात,जर पैशाचा वापर योग्य केला तर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवता येईल,याप्रकारे एकच समस्या नाही तर भरपूर काही समस्या सुटतील पण पुन्हा तिचं गोष्ट येते की हे लोक देवाचा वापर स्वतःचा धंदा करण्यासाठी करत आहे.एकच अपेक्षा आहे, समाजाने असं गृहीत धरू नये की आमच्या समस्या देव सोडवतील,देवाने(निसर्गाने) माणसाला एवढं सक्षम बनवलं आहे की तो त्याच्या सर्व समस्या सोडवू शकतो.

*५)स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांवर होणारे अत्याचार याबद्दल काही मत मंडाल का??*
-प्रत्येक आपल्या सोबतच्या व्यक्तीला एका माणसाच्या दृष्टिकोणाने बघितले तर नक्कीच स्त्री पुरुष समानता असेल. पण हे ऐकून दुःख झाले की आणखी पण स्त्रियांवर अत्याचार होतात.स्त्रीयांना कमी लेखल जाते.खूप दुःख होते जेंव्हा ऐकतो की स्त्री भ्रूणहत्या सारख्या घटना घडतात,दुःख होतं की ज्या दगडाच्या देवाची पूजा करता आणि त्याच मंदिरात बलात्काराच्या घटना घडतात.

*६)गरिबी,बेरोजगारी आणि राजकारणी लोकांकडून सत्तेसाठी होणारी सामान्य माणसाची फसवणूक,यावर सामान्य लोकांनी काय करावे?*
-आमच्या पक्षाला निवडून द्या आम्ही तुमचा विकास करू हे आता छळ करणार धोरण वाटत आहे.तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण द्या जमत नसेल तर  औपचारिक,बेसिक शिक्षण देऊ शकता जेणे करून त्यांची गरिबी दूर होईल.व्यवस्थित नौकरी देऊ शकत नाही तर त्यांना आहे त्या क्षेत्रात व्यवस्थित पैसा द्या आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा.
बेरोजगारी कमी करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे.युवकामध्ये एक learning attitude निर्माण करण्याची गरज, कोणत्या पण गोष्टीत नवीन शिकण्याची त्याची वृत्ती असली पाहिजे.


समाज मला आजपर्यंत खूप दुःखी करत आलं आहे,अपेक्षा आहे पुढच्या काही वर्षात समाज स्वतःला बदलून घेऊन आणि प्रत्येकाला एका मानवाच्या दृष्टीने बघेल.
वर्षातून एकदा माझी जागोजागी मूर्ती ठेवून पूजा करण्याची गरज नाही अपेक्षा आहे तुम्ही समाजाला सोबत घेऊन पुढे यशस्वी व्हावे.
(एवढं बोलून बाप्पा दुःखी 😔होऊन गायब झाले)..
*===========================*

सानप बालाजी,बीड.

           गणपती बप्पा खूप वर्षानंतर या वर्षी जरा जास्त सुखाने आले कारण त्यांची दरवर्षी ज्या मुन्नी बदनाम, नाचायला लागली शालू, अश्या कर्णकर्कश आवाजाने त्यांची जी एन्ट्री व्हायची, आणि त्या मिरवणुकीत तथाकथित भक्त फुल्ल होऊन डान्स करायचे  त्या djवर यावर्षी कोर्टाने बंदी आणलेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी dj वाजवला गेला नाही. त्यामुळे बप्पा काही प्रमाणात का होईना खुश नक्कीच असतील.
            (मी काही djच्या विरोधात नाही पण ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा जरा बाजूला ठेऊन विचार करूया देवासमोर, थोर व्यक्तीसमोर कसलेही अर्थहीन गाणे लावून नाचणे योग्य आहे का...?)
           बऱ्याच ठिकाणी बाप्पासमोर मंडळाचे सदस्य म्हणवून घेणारे कार्यकर्ते बऱ्याच वेळा दिवसभर पत्ते खेळत बसायचे त्याचे प्रमाण देखील खूप ठिकाणी कमी झाल्याचे दिसून येते. असेच  हे प्रमाण वरचे वर कर कमी व्हावे अशी बाप्पा चरणी प्रार्थना.
           आता जो गणपती उत्सव चालू आहे तो पाहून माझ्याच मनाला कधी कधी  प्रश्न पडतो की टिळकांनी खरंच याच गोष्टीसाठी गणपती उत्सव चालू केला का...?
           टिळकांनी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येण्यासाठी/मिळून मिसळून वेगवेगळे कार्यक्रम साजरे करावेत यासाठी या गणेश्योस्तव चालू केला होता. पण आता सध्या *एक गाव एक गणपती* ऐवजी एक गल्ली 4-5 गणपती अशी परिस्थिती आहे.
           गणपती बाप्पा बसवायचे असतील तर त्यापासून प्रदूषण होऊ नये असे इको फ्रेंडली बाप्पा बसवावेत,
           गणपती बाप्पा बसवायचे असतील तर प्रत्येकाच्या मनात बसवावेत,
           गणपती बाप्पा बसवायचे असतील तर प्रत्येकाने आपल्या मुलांच्या मनात आईवडिलांना प्रदक्षिणा घालणारे बाप्पा बसवावेत म्हणजे म्हातारपणी आपली वृद्धाश्रमात होणारी रवानगी तरी टाळता यावी.
           बाप्पा बसवायचे असतील तर आपल्या मनात मनात बसवून प्राणिमात्रांचे रक्षण करावे.आणि जाता जाता बाप्पाना दोन वचन देऊन पठाऊया,
          *1) *मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही आणि करू देणार नाही.*
          *2) बाप्पा तुम्ही गेल्यानंतर मी माझा परिसर स्वच्छ ठेवील, आणि सर्वाना परिसर स्वच्छ ठेवण्यास भाग पाडील.*
          म्हणजे बाप्पा पुढच्या वर्षी लवकर तर येतीलच पण पाऊस, आनंद, हर्ष घेऊन येतील.
*==============================*

संदिप बोऱ्हाडे, वडगाव मावळ, पुणे
   लोकमान्य टिळकांनी समाजाच्या एकत्रीकरणासाठी, सर्व भेद विसरून एकत्र येणाऱ्या समाजाची ताकद निर्माण व्हावी, त्या ताकदीने समाजाला एक विधायक दिशा मिळावी, समाजाचे प्रबोधन व्हावे आणि अशा अनेक अर्थानी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव सुरु केले..!!
काय दिसते आजच्या आमच्या या गणेशोत्सवातून...??
इथे टिळकांचे फक्त नाव घेवून आमच्या श्रद्धेचा बाजार मांडला जातो..

    आपणही त्यांचं अनुकरण करीत मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करायला लागलो, पण आपण त्यातलं सार्वजनिकपण जपलं का? आलो का आपण एकत्र? आणलं का आपण समाजाला एकत्र?
ज्या उद्देशाने ह्या भक्तीच्या उत्सवाची सुरुवात झालेली तो उद्देश जरासा तरी कुठे साध्य झालेला दिसला का हो?

   समाज एकत्र येण्यासाठी सुरू केलेल्या ह्या उत्सवाने आज मात्र खूपच गलिच्छ रूप घेतलेलं दिसून येतंय. गल्लीबोळात स्वतःची मंडळे निर्माण करून गल्लीबोळात राजे निर्माण केले गेलेत. कोणी इकडचा राजा तर कोणी तिकडचा राजा, आणि आपला राजा इतरांपेक्षा वरचढ दाखवण्यासाठी काय ती स्पर्धा? एकत्र यायचं सोडा, पण इथे तर सगळ्याच गोष्टींची वारेमाप उधळपट्टी करून जो तो दुसऱ्या मंडळापेक्षा आपला गणपती कसा मोठा ह्याचं मार्केटिंग करायला लागलाय.

     ह्याच तथाकथित मंडळांनी घोषित केलेल्या राजांसाठी दोन दोन दिवसांच्या रांगा लागायला लागल्या..घरातही तोच, दारातही तोच आणि चराचरातही तोच असून देखील केवळ ह्या राजाचं रूप किती देखणं आणि ह्याचं मंडळाचा राजा कसा नवसाला पावतो ह्या चर्चा ही सर्वदूर पसरवल्या. मग नवसाची रांग वेगळी, दर्शनाची रांग वेगळी, सोनं चांदी दान करायचं असेल तर ती रांग वेगळी, पैसे मोजून मिळणाऱ्या VIP पासची रांग वेगळी.
अरे..... म्हणजे हा धंदाच सुरू केला त्याच्या नावाने. समाज एकत्र यायच्या ऐवजी ह्यातून वाढलेल्या सामाजिक व आर्थिक विषमतेची दरी मात्र प्रकर्षाने जाणवायला लागली. मजल तर तेव्हा गेली जेव्हा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस उपयुक्तांनावर हात उगारला सर्वांनी ही बातमी पाहिली असेलच..जो पर्यंत श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातील फरक न कळणारे, स्वतःला राजाचे भक्त म्हणवणारे बिनडोक, अंधश्रद्धाळु आहेत तोपर्यंत असेच सुरू राहणार. घरात आई बापासारखे दैवत असून बाहेर जाऊन अंधश्रद्धा पोटी स्वतःला त्रास करणे हे खूप वाईट आहे.

      मी फक्त टीका नाही करत पण जे लिहितोय तेच वास्तव आपणाला सुद्धा दिसत असेलच..भ्रष्ट राजकीय नेत्यांची ही मंडळे, त्यांच्या भ्रष्ट पैशाच्या देणग्या, केवळ मनोरंजन साठी होणारे कार्यक्रम आणि त्यासाठी हजेरी लावणारे हे संस्कृतीशून्य कलाकार.. मिरवणुकामधून दारू ढोसून अचकट विचकट नाचणारे मंडळाचे युवा कार्यकर्ते..रात्री त्या गणपती समोर चालणारे जुगाराचे पत्त्याचे खेळ..ह्या अशासाठी गणेशोत्सव असतो ...?? कुठून येतो हा पैसा..?? अशा पैशाने त्या नसलेला गणेशाची केलेली पूजा आणि अशा उत्सवाचे काय होईल.?? जल्लोष कोणत्या प्रकारचा असावा हे लोकांना कळायला हवं. गणपती समोर कोणी DJ लावत का? हीच संस्क्रुती आणि परंपरा आहे का? समोर देव देवाला बसवायचं आणि त्याच्या समोर वाटेल तस दारू ढोसून अश्लील गाणी लावून नाचायचे याचे भान आहे का लोकांना?

   अजून सांगायचं तर काही विधायक व सामाजिक उद्दिष्टे जोपासण्यासाठी सुरू केलेला हा उत्सव आपण मोठ्मोठ्या आवाजातल्या धांगडधिंगा पर्यंत पोहोचवला. पर्यावरणाला हानी पोहोचवत कानठळ्या बसवणारा आवाज... त्यावर सूरु असलेली अचकट विचकट गाणी आणि त्यावर आपलं भान हरपून नाचणं.. नक्की काय करतो आहोत आपण ह्याची आपल्याला ही तरी जाण आहे ना?
आणि ह्यावर कहर म्हणजे तो कणाकणात असूनही आपापल्या मंडळांना श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्याला दिलेलं उंचच उंच रूप..
त्यातून कधीमधी होणारे अपघात, विसर्जनाच्या वेळी होणारी हेळसांड... विसर्जनानंतर उरणारे भग्न अवशेष...

   या उत्सवामधून समाजाला नक्की कोणती दिशा मिळते..? समाजाचे नक्की कोणते प्रबोधन होते..??
हे गणेशोत्सवाचे भरकटलेले रूप पाहताना, आमचा समाज आणि युवक त्या मागे धावताना पहिले की मनाला खूप वाईट वाटते..बाकी आत्ता काहीजण येतील म्हणतील की आमच्या संस्कृतीवर टीका करतो आमच्या धर्मावर टीका करतो पण मी त्यांना सांगू इच्छितो की हेच सत्य आहे आणि जर सत्य टीका असेल तर त्यांनी तसही समजावे..
*=============================*

समीर वि.सरागे,नेर जि. यवतमाळ

माझे नाव  श्री गणेश भगवान शंकराचा द्वितीय पुत्र मला बुद्धिची देवता देखील म्हटल्या जाते. तसे माझे विविध १२ नावे आहेत यातील गणेश हे नाव सर्वात प्रचलित आहे.

 जेव्हा मि आणि माझा भाऊ कार्तिक  आमच्या मध्ये  माझे वडील अर्थात भगवान शंकरानी  पैज लावली की, जो सर्वात आधी पृथ्वीला प्रदक्षिणा  मारेल तो माझा सर्वात लाड़का पुत्र अशी घोषणा भगवान शंकरानी केली. मि लट्ठ असल्याने कार्तिकच जिंकेल हे सर्वाना माहिती होते कार्तिकने पृथ्वीला प्रदक्षिणा मारन्यास सुरुवात केली।  परंतु मि माझ्या आई वडिलांना च प्रदक्षिणा घालन्यास सुरुवात केली,  यावर मि भगवान शंकर आणि माता पार्वती अर्थात माझे आई वडील यांना उत्तर दिले की या पृथ्वीवर असा कोणीच व्यक्ति  नाही ज्याला आई-वडील नाही आणि  म्हणून मि आपल्या भोवती प्रदक्षिणा घातली. यावर भगवान  शंकरानी मला आशीर्वाद दिले. व तूच माझा सर्वात लाड़का पुत्र घोषित केले.

हे झाले माझ्या बद्दल.

. हिंदू संस्कृती मध्ये 33(कोटी) प्रकारचे देव आहेत यात मला सर्वात  मानाचे प्रथम स्थान आहे कोणत्याही शुभ कार्य किंवा  प्रसंगाची  सुरुवात ही माझ्या पूजनाने होते. मि नेहमी मूर्ती रुपात सर्वत्र राहु शकत नाही म्हणून माझ्या एवजी सुपारी ठेऊन  तिची पूजा केली जाते.

अलीकडे दरवर्षी भाद्रपद महिन्यात चतुर्थीला मि प्रत्येकांच्या  घरी भेटिला येत असतो. माझ्या येण्याची  जय्यत तैयारी केली जाते मंडप उभारले जातात  घरोघरी सजावट केली जाते इतके की बरेच जन माझ्या येण्याची वाट आतुरतेने बघत असतात. जेव्हा मि चतुर्थीला येतो तेव्हा जनसागर माझ्या दर्शनासाठी येतो. मग
रोज माझी नित्य नियमाने पूजा अर्चा करतात, हार फूल वैगरे  वाहतात वैगरे माझ्या नावाने अन्नदान वैगरे होते जी खुप छान परंपरा आहे. भुकेल्याला अन्न देणे हे प्रत्येक धर्मात संगीतलेलेच आहे. सर्वाना अन्नदान शक्य होत नाही म्हणून ते आप आपले अल्प योगदान देत असतात. माझ्या करिता सर्वच सारखे आहेत मि कधीही जाती भेद ,उच्च नीच , काळा - गोरा , गरीब -श्रीमंत वैगरे भेदभाव केला नाही सर्वच माझी लेकरे आहे. जे मला पूजतात , मानतात ते आणि जे मला मानत नाही , पूजत नाही, माझ्या वर विश्वास ठेवत नाहीत ते म्हणजे पक्के नास्तिक आहे ते देखील मला प्रिय आहेत. शेवटी ति माझिच लेकरे आहेत.  मि जरी निर्गुण निराकार आहे.  मला आकार नाही परंतु माझ्या शरीराचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला माझ्या प्रत्येक अव्यवाचे महत्व कळेल!

माझ्या पोटाला उदर अर्थात लंबोदर म्हटल्या जाते याचा अर्थ माझ्या उदर म्हणजे सर्व चराचर श्रुष्टि समावलेली आहे. माझे मस्तक म्हणजे ब्रम्हांड होय माझे डोळे सूक्ष्म तीक्ष्ण दृष्टि चे प्रतीक आहे, तसेच माझी सोंड ही महाबुद्धित्वाचे प्रतीक आहे.मला बारा विविध नावाने देखील  ओळखल्या जाते.
असो

जेव्हा गणेशोत्सव दरम्यान  १० दिवस हे धार्मिक उत्सव, आनंद  आणि प्रसन्नतेचे  चे दिवस असतात सर्विकडे रोशनाई वैगरे असते माझे मन अगदी प्रफुल्लित होऊन जाते. परंतु या दरम्यान मि बरेच लोक अशे बघतो जे माझ्या उत्सवला केवळ मनोरंजन म्हणून बघतात  कर्कश आवजात DJ/ Dolby साऊंड वाजवीने ,नाचने वैगरे यामुळे आपण ध्वनि प्रदूषण करत आहो आणि याचा त्रास आपण आपल्याच लोकांना देत आहो याची जाणीव असु द्या. माझ्या दर्शना करिता मंदिरात येताना आपली वाहने अस्तव्यस्त न लावता एका विशिष्ट अंतरावर लाववी जेने करून इतराना  वाहतुकीस अडथळा होणार नाही.
 तसेच मला वाहिलेली फुले हार ही नर्माल्य कलशात टाकून तिची विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच आनलेली साहित्ये काम झाल्यावर  अस्तव्यस्त  न फेकता कचरा पेटितच टाकने मला अभिप्रेत आहे. आणि जमा झालेली वर्गनी ही कोणत्याही समाजिक कार्यात उपयोगात आनावी जेने करून या उत्सवाचे खरे स्वरूप आणि महत्व अजुन द्विगुणित होईल. व याचा मुख्य उद्देश समाजात पोहचन्यास मदत होईल. केवळ माझी पूजा अर्चा केल्याने मि पावेल असे नाही तर तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचे  सामाजिक कर्तव्य जरी  पाळलीत तरी ही देखील माझ्या करिता  एक मोठी भक्ति आणि सत्कार्यच  होईल.

१० वा दिवस मला माझा भक्ताना निरोप देण्याची वेळ या दिवशी मला निरोप देण्याची जय्यत तैयारी करण्यात येते सर्व भक्तकड़ून मि निरोप स्वीकारत असतो आणि त्यांना आशीर्वाद रूपाने सुख समृद्धि देत असतो माझ्या जाण्याने सर्वच भक्तगणाचे डोळे पानावलेले असतात कारण ते माझ्यावर खुप आदर आणि प्रेम करतात . मला देखील त्यांना सोडून कुठे जायचे असते परंतु जसे तुम्ही आयुष्यात येता आणि चार दिवस झाले की जगाचा निरोप घेता अगदी माझे देखील तसेच आहे.  तुम्ही मनुष्य आयुष्य जगता परंतु मि येतो तेव्हा हे १० दिवस तुमच्या  करिता उत्स्व, समृद्धि आणि आनंद म्हणून घेऊन येतो


पुढच्या वर्षी मि जेव्हा आपल्या भेटिला  येईल तेव्हा मि आपल्याला सांगितलेल्या या महत्वाच्या बाबी आपण सर्व भक्तगण याचे योग्य पालन कराल आणि धार्मिक उत्सवा सोबतच  आपण आपली सामाजिक जबाबदारिहि तेवढ्याच ततपरतेने पार पाडाल  अशी मि अपेक्षा करतो
चला आता मला  आपणास सोडून जाण्याची वेळ आली आहे कारण आता मि समुद्राच्या / तलावाच्या आत शिरन्यास तयार आहे.

तुमच्या सोबत गप्पा मरण्यात १० दिवस कसे गेले कळलेच नाही.

माझी आठवण असु द्या तुम्ही मला  या उत्स्वच्या  माध्यमातून दिलेल्या अमूल्य मान सनमाना, भेट वस्तु दिल्या बद्दल मि आपला आभारी आहे.

चला तर मग भेटुया पुढल्या वर्षी

*आपला गणपती बप्पा*
*===================================*

वापरायचा रस्ता ते थेट मानवी मूल्य प्रत्येक बाबतीत.... अतिक्रमण...कशासाठी ?

🌱 वि४ 🌿


वापरायचा रस्ता ते थेट मानवी मूल्य प्रत्येक बाबतीत.... अतिक्रमण...कशासाठी ? 




IMAGE  SOURCE   INTERNET

स्वप्निल चव्हाण ,बुलडाणा


अतिक्रमण हा जितका महत्वाचा मुद्दा वाटतो तेवढाच दुर्लक्षित पण आहे..
खेड्यातच नव्हे तर मोठ्या शहरांमध्ये पण वाहनांसाठी असणाऱ्या रस्त्यावर लोकांची वस्ती दिसून येते......शहरांमध्ये तरी परिस्थिती थोडी आटोक्यात आहे...पण खेडे गावात लोक ती जागा आपल्या मालकीची असल्यासारख वर्तन करतात.....
आणि विशेष म्हणजे प्रशासन या गोष्टीमध्ये थोडं पण लक्ष घालत नाहीये.....

ह्या सध्या गोष्टीपासून सुरूवात केली अणि असंच पुढे गेल्यावर कळून येईल की प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण आढळून येते.....
आता कुठे कुठे होते यावर चर्चा करण्यापेक्षा त्या मागची कारणे अणि पर्याय काय करता येतील हा महत्वाचा मुद्दा आहे.......

बऱ्याच ठिकानी हे अतिक्रमण गरिबी मुळे दिसून येते....आणि तेच एक महत्त्वाचे कारण आहे slum area तयार होण्यासाठी.....अश्या लोकांना योग्य तो रोजगार उपलब्ध करून दिल्यास आणि राहायला विशिष्ट जागा उपलब्ध करून दिल्यास ही समस्या दूर होऊ शकते....हे करताना ते बेघर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असेल......

शेवटी जनजागृती हे एक महत्त्वाचे अस्त्र असेल या गोष्टीसाठी......कारण प्रत्येक गोष्ट प्रशासन करू शकणार नाही .....लोक-सहभाग वाढवून जवळपास सर्व प्रशासकीय अडचणींना दूर करता येऊ शकते अस  माझं मत आहे ....

   साध्या सध्या गोष्टी बघितल्या तर लक्षात येईल की लोकांना एक तर काही फरक पडतचं नाही आणि ज्यांना काही फरक पडतो त्यांचं ऐकायला कोणी तयार नाही.....
अश्या परिस्थिती मध्ये लोकांनी एकत्र येऊन समस्येवर योग्य तो विचार करणे आणि पूरक योजना आखणे गरजेचे राहील.....

हे तर सोडाच पण अवैध पद्धतीने जंगलतोड करून मोठमोठे कारखाने उभे करण्यात येतात .....मान्य करता येईल की त्या मुळे रोजगार उपलब्द्ध होत आहे...पण निसर्गाच्या संपत्तींमध्ये होणारे अतिक्रमण आणि त्यामुळे निसर्गावर होणारे दुष्परिणाम याकडे दुर्लक्ष करता येणार नाही......

अतिक्रमण ही अशी समस्या आहे की जी प्रशासन आणि लोक-सहभाग यांच्या योग्य पर्याय योजनेमुळे दूर होऊ शकते.....

।।।।। धन्यवाद...।।



IMAGE  SOURCE   INTERNET

मयुरी राघुनाथ देवकर 

ता. माळशिरस

      सध्या सभोवताली पाहिलं तर आपल्याला काय परिस्थिती दिसते सगळीकडेच स्वार्थीपणाची प्रवृत्ती वाढत आहे आणि याच प्रवृत्तीमधून जे माझे आहे ते माझे अन जे दुसऱ्याचे आहे ते पण माझेच हि प्रवृत्ती वाढत जाऊन यातूनच अतिक्रमण चा उदय झाला.
      शहर असो वा खेडे अगदी आपल्या घराशेजारी रिकामी जागा असेल तर हळू हळू आपण त्या जागेवर कब्जा करतो.यामध्ये गाडी पार्किंग वगैरेचा समावेश होतो आता हेसुद्धा एक अतिक्रमणच झाले (आपल्याला वाटत नसले तरी.....) आपण प्रवास करताना तसेच रस्त्यावर चालताना रस्त्यावरच गाड्यांचे पार्किंग केलेले दिसते ,त्याचप्रमाणे फुटपाथ तर नावालाच फुटपाथ राहिले आहेत कारण त्याठिकाणी विविध प्रकारचे गाडे,चहाच्या टपऱ्या यांचेच वर्चस्व दिसते... हे सर्व आपण रोजच पाहत आहे परंतु आता यावर उपाय म्हणून प्रत्येकानेच पार्किंगच्याच ठिकाणी पार्कींग करणे गरजेचे आहे आपण स्वतःच जबाबदारीने वागायला शिकले पाहिजे.
आता प्रश्न राहिला तो फुटपाथवरील अतिक्रमणाचा .. हे काम प्रशासनाने मनावर घ्यायला हवे तरंच आपल्याला फुटपाथ म्हणजे कशासाठी असतात हे समजेल.....
         आतापर्यंत आपण जे पहिले ते आपल्याला दिसणारे अतिक्रमण पण सध्या ज्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे ते म्हणजे मानवी मूल्यांचे अतिक्रमण.....जे दिसतही नाही आणि कोणी सांगतही नाही..यामध्ये अगदी घरापासून ते नोकरीच्या ठिकाणी तसेच मित्रांमध्ये असेल,सार्वजनिक ठिकाणी असेल प्रत्येक ठिकाणी आज व्यक्तींच्या मनाचा कोंडमारा होत आहे. भौतिक साधनांनी माणसे जोडली गेली  पण मने मात्र दूर झाली आणि म्हणूनच हा वाढत चाललेला अतिक्रमणाचा भस्मासुर आपण लवकरच नष्ट करायला हवा तरंच मानसिक स्थेर्य लाभेल नाहीतर असं पण आज माणूस कसं जगतोय हेच विसरला आहे पण हीच परिस्थिती कायम राहिली तर जगणंच विसरून जाईल.आणि अशा प्रकारे होणारे अतिक्रमण कमी केले तरंच पुढच्या पिढीला आपण मानवी मूल्ये म्हणजे काय ते सांगू शकेल नाही तर सांगायलाही मानवी मूल्ये राहणार नाहीत…



IMAGE  SOURCE   INTERNET

किरण पवार

औरंगाबाद

                माणसानेच मुळात अतिक्रमणाला लागे बांधे असल्याप्रमाने जवळ केल आहे. अगदी दैनंदिन वापरातल्या मोबालचा हस्तक्षेप आणि अतिवापर असो किंवा मग आजकाल फुटपाथवर केल जाणार अतिक्रमण असो. विषयाच्या ओघाने तरी का असेना पण मानवी मूल्य हा शब्द चर्चेत आला. सध्या मानवी मूल्यांसारख्या विषयाची चर्चा आम्हाला नकोशीच असते. हे वास्तव आहे. पण मानवी मूल्यांचा ऱ्हास न होऊ देता त्यांना जोपासन गरजेच आहे. मानवी मूल्यात अतिक्रमण केलं ते हिंसा, खोटेपणा, भ्रष्टाचार, अविवेक या अशा बाबींनी. कारण स्वनिष्ठा आणि स्वत:शी प्रामाणिकपणा या दोन गोष्टींना आपल्याकडूनच नाहीस केलं गेलं.
             जिथे माणसाचा स्वतःवरचा ताबा सुटला तिथे भला तो माणूस इतर ठिकाणांना मोकळ कसं सोडेल?? म्हणूनच तर वापरायच्या रस्त्याच अतिक्रमण होत गेलं. आपण दैनंदिन जीवणात इतरवेळी म्हटलं तर सतत एखाद्या गोष्टीत दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाला तंत्रज्ञानासोबत जो अहंकार नावाचा आजार जडलाय त्याची ही प्रचीती आहे.एक महत्वाच उदाहरण इथे मुद्दाम नमूद करतो. ते म्हणजे, गोवा-मुंबई रस्ता कोकणच्या बऱ्याच भागातून चौपदरी होणार आहे. हा विकास आहे जो मानवाला हवा आहे. पण यातून कितीतरी वन्यजीव संपत्ती धोक्यात येणार आहे. सोबतच घाट कितीतरी किमीपर्यंत पोखरला जाणार आहे. कोकणच सौंदर्य नष्ट होणार तर आहेच आणि सोबतच झाडांचही प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी होणार. यात फायदा कमी आणि नुकसान अधिक आहे; हेच आजच्या माणसाला समजत नाही.........

IMAGE  SOURCE   INTERNET

अनिल गोडबोले
सोलापूर


भारतीय लोक म्हणून आपल्याकडे जग जेव्हा बघत असत तेव्हा त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा असावा? असा विचार माझ्या डोक्यात आला. एखादा व्यक्ती एखादे मत तयार करताना त्या देशातील माध्यमाकडे बघत असतो.. उदा. वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडिया इत्यादी..

मग त्या देशाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जातो.. भारताला नाग गारुडी यांचा देश म्हणून ओळख होती ती पुसून आता.. बलात्कार, भ्रष्टाचार आणि असंख्य सामाजिक प्रश्न असलेला देश म्हणून बघत नसेल ना?

असो... तर हा मुद्धा एवढ्या साठी की आपल नेमकं काय चुकत? याच मी केलेलं विश्लेषण..

आपण साधं निरीक्षण करू.. पेपरला बातमी येते त्या मध्ये सकारात्मक पणा आणि वास्तविकता किती ? व भावनिक बातम्या, अतिरंजित बातम्या किती?... याच्यावर लक्ष केंद्रित केले तर असे दिसते की प्रत्येक गोष्टी मध्ये स्वतःच्या मानसिकतेचा किंवा मतांच अतिक्रमण...

बलात्कार.. अतिक्रमणच! दुसरं काय? एखाद्या व्यक्तीला पॉवर साठी किंवा विकृतीसाठी वास्तुपेक्षा कमी समजण हा मानव अधिकार साठी अतिक्रमण च आहे...

रेल्वे, बस, ऑटो अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वतः अतिक्रमण करत आहेत किंवा त्या व्यवस्था अतिक्रमणाचा बळी ठरत आहेत..

आपण काय नेसावें, आपण काय प्यावे, आपण काय खावे, आणि या बाबतीत मला काय पाहिजे या पेक्षा आता कुठला ट्रेंड चालू आहे हेच दुकानदार सांगत असतो..
आपले पैसे घालून दुसऱ्याच्या सांगण्यावरून वस्तू घ्याव्या लागतात... अतिक्रमण!

तुम्ही तुमचा राजकारणांचा कोणता दृष्टिकोन ठेवता? हे चार लोकांत मांडा. आणि तो जर पटला नाही तर .. माझा मुद्धा वेगळा आहे एवढं न समजून घेता..
'तुझ्या सारख्या मूर्खामुळे भारत मागे आहे...' अस मत प्रदर्शित करणे हे देखील अतिक्रमण..

पैसे आणि सत्ता या खाली दबलेली न्यायव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था त्यामुळे होणारा सामान्य नागरिकांना त्रास... या अतिक्रमण बदल खूप फिल्म निघाले बॉलीवूड मध्ये..

देव, धर्म आणि धर्माचे ठेकेदार... एवढा भडिमार करत आहेत ना... की देवालाच बोलवायचं की काय... अस वाटत आहे.. आणि हेच लोक देशासाठी, धर्मासाठी एखाद्याचा बळी देतात किंवा आवाज उठवला तर गोळ्या घालतात.. अतिक्रमण

आरक्षण आणि अर्थव्यवस्था यावरील स्वयंघोषित तज्ञ ... बोलूच नये आपण यावर!


नातेवाईक, कुटुंब व्यवस्था आणि आधार व्यवस्था ही तर हक्काने आपल्या जीवनावर अतिक्रमण करते.. म्हणजे भावना अतिरेक खूप मदत किंवा आधार कमी..
फुकट सल्ले देण्याचे अतिक्रमण करत असतात..

लैगिकता काय असावी, पार्टनर कोणाला करावं, कधी लग्न करावं कोणासोबत करावं... एकनिष्ठता ठेवावी की नाही ठेवावी.. हा वरचा तो खालचा.. या सगळ्या बाबतीत ... स्त्री आणि पुरुष यांची होणारी घुसमट आणि त्यामुळे येणारी विकृती व गुन्हेगारी... हे अतिक्रमण केल्याचं उदाहरण आहे...


सगळ्यात शेवटी.. 'रस्त्यावर केलेले अतिक्रमण... भाजी विकून दोन रुपये जास्त कमवावे किंवा माझा माल जास्त ग्राहकाला पोहोचावा म्हणून फुटपाथवर बसलेला भाजीवाला, गाडीवाला, फेरीवाले हे तर सगळ्यात मोठे गुन्हेगार...

तसेच मोठे लोकांनी सरकारी जागेवर केलेले अनधिकृत बांधकाम यांनी म्हणजे पैसे देऊन अधिकृत करायचा मार्ग..

हुश्श...

एक अतिक्रमण ची गाडी यावी आणि त्यांनी वरील सर्व अतिक्रमण उचलून न्यावीत अस स्वप्न मला पडत असत तो पर्यंत... "कामावर जायचं नाही का?...कितीवेळ पसरलेले असता?" म्हणून बायको ने माझ्या सारख्यावर केलेलं अतिक्रमण...
या सर्वांचा मी निषेध करतो..!!



IMAGE  SOURCE   INTERNET

डॉ. विजयसिंह पाटील.. 

MBBS DA।  कराड....


माणूस हा प्रगती साधक प्राणी आहे, भौतिक ज्ञानात आपण प्रचंड प्रगती केलीय. ह्या प्रगतीने माणसाच्या, सुख सोयीत भरपूर भर घातलीय. ह्या बाह्य प्रगतीमुळे, आपल्या, आर्थिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक विचारांत बदल घडवून आणत आहे. जीवनाची पूर्वीची मूल्ये दररोज झपाटयाने बदलत आहेत. (मानसिक अतिक्रमण नं 1 )...
हा बदल जर निरोगी असता आणि जीवन चांगलं करण्यात वापरली गेली असता, तर जगात खरं सुख शांती नांदली असती..
पण असं होताना दिसत नाही.. उलट ह्या मूळ, ह्याचा परिणाम भयानक होत आहे. ह्या बद्दल आपण कधी विचारच करत नाही, कारण या नेत्र दीपक प्रगती ने आपणा सर्वांना भुलवून टाकलं आहे,, जो तो ह्याचा फायदा फक्त स्वतः साठी कसा होईल हे पाहतोय,स्वार्थी वृत्ती फार वाढत चाललीय ( अतिक्रमण 2)
प्रत्येक जण, मोह, लाभ, स्वार्थ, हिंसा, द्वेष, सूड, ह्या भावनांनी ग्रस्त आहे, माणसाचे वर्तन पशुपेक्षा हीन होत चालले आहे.
सध्या सर्व जग भोगवादी व जडवादी झालंय, व आपण हे सर्व नैसर्गिक समजून कळत नकळत स्वीकारत चाललो आहोत ( अतिक्रमण 3)
हे झालं आर्थिक...
अहंकार,,, माणूस, खोट्या अहंकाराच्या ओझ्या खाली दबला गेलाय,  (हेही अतिक्रमण)
सर्व सामान्य माणूस, , भय वा स्वार्थासाठी, राजकीय सत्तेपुढे नमतात. शक्तिशाली राजकर्त्याना मदत करतात, हेच धार्मिक शक्ती ना ही लागू पडते..
ह्या गुलामी वृत्ती मुळे, माणसाचे, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, ह्यावर प्रतिबंध निर्माण होतो (अतिक्रमण4)
धार्मिक बाबतीत---
चर्च, मशिद, मंदिर, यांची परमेश्वराला खरंच गरज आहे का ? देव तिथं असेल तरी काय ?
आपण ग्रंथ, प्रार्थना, सण, दीक्षा, बाप्तिस्मा, या गोष्टींना महत्त्व देतो, हजारो वर्षे हेच चालू आहे, लोक धर्माच्या नावाखाली गळे कापत आहेत ( अतिक्रमण 5)

एकूण च काय तर, संपत्ती,  अहंकार , धर्म, राजकारण, सत्ता
हे सर्व आपल्या मनावरचे, अतिक्रमण, आहेत ...

उदा... फुटपाथ वरील फेरीवाले,, पहिल्यांदा पोटासाठी,,, ते भरलं की समाधान न मानता, मुलाला किंवा नातेवाईकाला, दुसऱ्या फुटपाथवर,,, ह्याला अंत नाही...

जोपर्यंत, सुखाची व्याख्या करण्यापेक्षा, आनंदाची व्याख्या, लोकांच्या मनात बिंबत नाही तोपर्यंत, हे असंच चालू राहणार, उलट वाढत जाणार.... वाईट वाटते ते ह्याच की, आपण वयक्तिक काहीही करू शकत नाही.... 🙏🙏🙏🙏🙏

नक्षलवाद आणि सरकारमधे फसलेला "आदिवासी विकास"

 नक्षलवाद आणि सरकारमधे फसलेला "आदिवासी विकास"


IMAGE SOURCE   INTERNET

संदिप बोऱ्हाडे,पुणे


 नक्षलवाद म्हटले कि आदिवासी समाजाकडे पाहिले जाते नक्षलवाद हीच आदिवासी समाजाची ओळख झालीय. आणि 99% आदिवासी लोक हे नक्षलवादी आहेत हे कटू सत्य आहे ते नाकारता येणार नाही. निसर्गाला देव मानून पूजा करणारा आदिवासी वरून दिसताना अगदीच खडकासारखा कठोर दिसतो....परंतु मनातून तो फणसाच्या बियांपेक्षा
ही गोड असतो. हे आपणास आदिवासी भागात गेल्यानंतर अनुभवायास मिळते. मग असे असताना आदिवासी कसा काय नक्षलवादी बनू शकतो ??

    आज प्रत्येक आदिवासी घरात एक नक्षलवादी आहे हि किती लोकांना माहित आहे आपल्याला नक्षलवादी म्हणजे हातात AK 47 बंदूक , कमरेला हेंड ग्रीनेड , आठ दहा मेगजीन हा पेहराव म्हणजे तुम्हाला नक्षलवादी वाटत असेल तर तुम्ही चुकताय , नक्षलवाद अभ्यासायची प्रत्येकाला गरज आहे असे मला वाटते .! नक्षलवाद म्हणजे फक्त गोळीबार ,बॉंबब्लास्ट नाही, ती एक चळवळ आहे ....आणि हि चळवळ आरक्षण या शुल्लक शब्दासाठी तयार झालेली नाही , हि चळवळ तयार झालीय ती आदिवासी परंपरा , संस्कृती , वनसंपदा वाचवण्यासाठी , वनांचे रक्षण कार्यासाठी आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी आणि आदिवासींचे शोषण थांबवण्यासाठी..

    आदिवासी गरीब.....एक वेळच्या अन्नाची मारामार अशी बिकट अवस्था असताना नक्षलवाद्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे, विस्फोटके यासाठी पैसा कुठून मिळतो? नक्कीच नक्षलवाडी कारवाया जर १००% आदिवासींकडून केल्या जात असतील तर त्यांच्याकडे यासार्वान्साठी लागणारा पैसा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे शक्यच नाही. कारण लोकांना शेतीत उत्पन्न नाही, रोजगाराच्या संधी नाहीत...त्या भागात पैसा मग तो कोणत्याही कारणासाठी असो उपलब्ध होवूच शकत नाही. मग असे असतानाही जर नक्षलवादी कारवायांमध्ये आदिवासी तरुण-तरुणी सहभागी होत असतील तर यागे खूप मोठे राजकीय वा सामाजिक षडयंत्र असू शकते. त्यात नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी जे पोलीस किंवा इतर सुरक्षा अधिकारी नेमले जातात ते सुद्धा आदिवासीच असतात....म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा हा आदिवासीच असतो. कोणी कोणाला मारले हे महत्वाचे नाही.....परंतु मारणारा हा आदिवासी होता किंवा आहे याचे दुख एक आदिवासी म्हणून मला वाटते. आणि ज्या भागात आजही रस्ते ,वीजदेखील नाहीत तिथे गरीब आदिवासी बांधवांकडे अत्याधुनिक हत्यारं आणि दारूगोळा कसा पोहोचतो हे मात्र मला न सुटलेले कोडे आहे.

    देश स्वतंत्र झाल्या नंतरही आजही माझा आदिवासी समाज अजूनही का विकासापासून दूर आहे.आमच्या डोंगरात कधी रस्ता,दवाखाना,शिकण्याची सोय नाही काहीही सुविधा नाही तरीही आदिवासी समाजाने कधीही आंदोलन केल नाही. का तर माझा समाज अल्प समाधानी कधी कोणलाही त्रास न देणारा म्हुणन की काय आज देशाच्या अनेक वर्षानंतर काही मतलबी राजकारणी लोकानी माझ्या समाजाचा संपायचा घाट घातला आहे.वाह.....रे राजकारणी लोकानो तुमच्या राजकारणासाठी आमच्या समाजाचा जर तुम्ही वापर करताय पण कधी या आधी आमच्या समाजाच्या विकासबद्दल भ्र शब्द काढला नाही,तुमच्या मालकीच्या टीवी मीडियावाल्यानी कधीही आदिवासी लोकाची खरी बाजु दाखवली नाही. आदिवासी लोकाची अजूनही सरकार दरबारी उपेक्षाच केली आहे आणि अजूनही करताय.कधी विकासाचा नावाखाली तर कधी नक्षलवादी ठरवून आमचा समाजाचा घात केला आहे.कधीही आमच्या समाजाच हित बघितल नाही पण राजकारण मात्र जोरात सुरु आहे.

   पोलीस किंवा मिलिटरी यांच्या कोणत्याच प्रयत्नातून आजपर्यंत तरी नक्षलवाद कुठे मोडीत निघाल्याचे आपणास ऐकिवात नसेल. मग जर हा नक्षलवाद असाच फोफावत राहिला तर उद्या हे सरकार नक्षलवाद्यांच्या नावाखाली संपूर्ण आदिवासी जमातीला बदनाम करून आपले अस्तित्व संपुष्टात आणण्यास मागे पुढे पाहणार नाही. मी  नक्षलवादाला बिलकुल सपोर्ट करीत नाहीये.आपल्या लोकशाही देशात आपल्याच नागरिकांवर होणारा कुठलाही सशस्त्र हल्ला आणि बंड पुकारणारी चळवळ ही संपवलीच पाहिजे.परंतु,मला त्याला संपूर्ण नष्ट झालेला पाहायचा आहे.आणि हा नक्षलवाद ज्या कारणासाठी तयार झाला ते कारणे देखील समूळ नष्ट होताना पाहायची आहेत.केवळ मुस्कटदाबी नाही तर डेमोक्रॅटिक मार्गानी हा प्रश्न सुटताना पहायचा आहे. आदिवासींची जमीन कारखानदारच काय पण सरकारही घेऊ शकत नाही या सुप्रीम काॅर्टाच्या निर्णय आहे.. आदिवासींना संविधानाने दिलेल्या स्वशासन व जमीनीचा हक्क अश्या अनेक गोष्टी आहेत पण कोणतही सरकार या गोष्टी मान्य करायला तयार नाहीत.




IMAGE SOURCE   INTERNET


    सोनी सोरी या महिलेची नक्षलवादाशी संबंधित कहाणी देखील तुम्ही गूगल वर serach करून पाहू शकता.
काही दिवसांपूर्वीच न्यूटन movie आला त्या picture ला अनेक पुरस्कार देखील मिळाले जरूर पहावा...
संघर्षाच्या अनुषंगाने तिथल्या आदिवासींचे कसे हाल होतात, हे खुबीनं दाखवलं आहे. चित्रपटाचा मुख्य हेतू हाच आहे. लष्कर आणि नक्षलींच्या लढ्यात मूळ आदिवासींना काय हवंय, याचा विचार कोणी करतंय का ? नक्षलप्रश्न खराच पण त्याच्या आड लपून, आदिवासींवर अन्याय करत भांडवलशाहीचं धन करणारी राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे का ? या सगळ्या अतिशय निराशाजनक परिस्थितीत एखादा प्रामाणिक अधिकारी त्रासदायक का होतो ? कर्तव्यपालन, प्रामाणिकपणा हे शब्द मागच्या पिढीतच निर्वतले का ? असे अनेक अनेक प्रश्न हा सिनेमा समोर ठेवतो. अस्वस्थ करतो.
एक फार छान संवाद आहे.

"क्या आप भी इनके जैसे निराशावादी है?"                   
"मैं तो आदिवासी हूं."




                                                                                                             IMAGE SOURCE   INTERNET


शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरात , आपल्याकडे का नको ...! नेत्यांच्या पोरांनी युवा नेता ,भाऊ , दादा , आमदार , डॉक्टर , इंजिनियर , मोठमोठे व्यवसायिक होत आहेत आणि आमच्या आदिवासी समाजाने नक्षलवादी व्हायचे हे मला पचत नाही. कदाचित शब्दांची मर्यादा ओलांडली असेल त्याबद्दल क्षमस्व...

बलात्कारी विकृत लोक.. अशा किती निर्भया वर अत्याचार केल्यावर आपण पेटून उठणार? (भाग-2)

🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप
     📄आठवडा 24वा📝
14 एप्रिल ते 20 एप्रिल 2018

बलात्कारी विकृत लोक.. अशा किती निर्भया वर अत्याचार केल्यावर आपण पेटून उठणार? (भाग-2)

१.समीर सरागे,नेर, जि.यवतमाळ
२.पवन खरात,अंबेजोगाई,जि.बीड
३.प्रविण भिकले,मुंबई
४.प्राची कर्वे, पुणे
५. सिमाली भाटकर,रत्नागिरी.
६. सागर राडे,सांगली
७. नितिन लेंडवे पंढरपुर
८.क्षितिज गिरी,सातारा.
९.पूनम देशमुख,अकोला
१०.संगिता देशमुख,हिंगोली

(यातील सर्व  छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत)

यांचे विचार सविस्तर वाचा:-


समीर सरागे,यवतमाळ
आपल्या देशात बलात्कार, विनयभंग, आणि चिडिमारी(eve Teasing) सारख्या घटना मध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.  किंबहुना होत आहे. हे  काही सभ्य आणि सुसंस्कृत म्हंणवल्या जाणाऱ्या स्त्रीवादी समाजाचे लक्षण तर मुळीच  नाही , सांस्कृतिक  आणि परंपरेचा वारसा असलेल्या ज्या भारत देशाची ओळख  सहिष्णु , त्याग , औदार्य आणि आदराचा देश म्हणून ख्याती आहे त्या देशाची ओळख आता बलात्कारी देश म्हणून उदयास येत आहे. ही बाब अतिशय  लाजिरवानी आणि प्रत्येक भारतीयाची मान खाली घालणारी आहे. अलीकडे स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याच्यारच्या संख्येत  लक्षणीय वाढ झालेली आहे. भारतात दररोज कुठेना कुठे स्त्रियांवर    लैंगिक अत्यचाराच्या घटना घडत आहे. त्यातही लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्यचाराचे प्रमाण जास्त आहे.
अलीकडील काळात जितके लैंगिक अत्यचारच्या घटना घडल्या आहेत त्यात सर्वात जास्त  अत्यचाराचे प्रमाण हे छोट्या मुलांवर झालेले आहेत.

NCRB च्या ताज्या अहवाला नुसार भारत देशात  दरवर्षी  36 हजार बलात्काराच्या घटना घड़तात आणि यात  लहान मुलांचे प्रमाण अतिशय जास्त आहे. महत्वाचे म्हणजे बलात्कारच्या घटनेत 80 टक्के प्रकरणात पीडितेच्या जवळच्या ओळखिचा व्यक्ति, नातेवाईक, किंवा शेजारीच  अशे कृत्य करत असल्याचे पोलीस तपासात  समोर आले आहे.  सन 2012 च्या निर्भया केस पासून तर आज 2018 च्या कठुआ  घटने पर्यंत  भारतात बलात्कारच्या 1,82,850 केसेस रजिस्टर्ड आहेत.

उनाव आणि कठुआ येथील दोन घटना पाहता  या घटना फार दुर्दैवी आहेत ,ज्या चिमुकल्याचे खेळन्या, बागड़न्याचे दिवस आहेत त्या चिमुकल्यावर काही पिशाचानी लैंगिक अत्यचार करून खून केला ही बाबच मुळात मन हेलाऊँन टाकनारी आहे. किती ही  विकृती ? गुन्हेगार कोणीही असो त्याला जात आणि धर्म नसतो, तो केवळ आणि केवळ  गुन्हेगार असतो आसिफा विषयी जे घडले त्या घटने बद्दल  सर्वानाच दु:ख  आहे यात दुमत नाही.  आतंकवद्याचा जसा धर्म नसतो तसाच बलात्कारचा देखील धर्म नसतो आणि त्याला धर्माच्या चष्म्यातुन बघने है देखील योग्य नाही. परंतु ज्या पद्धतीने  मीडिया  हाऊस कडून हे प्रकरण  दाखविल्या जात आहे त्यामुळे समाजात एक वाईट संदेश पसरत आहे.  या प्रकरणाला उगाच जातीय आणि धार्मिक रंग दिल्या गेला आहे तेव्हा हे प्रकरण एका षडयंत्रा कड़े इशारा करत असल्याचे चिन्ह दिसत आहे. केवळ आसिफ़ाचा मृतदेह मंदिरात सापडला , त्यामुळे बलात्कार मंदिरात झाला , बलात्कारी हिंदू होते आणि पीड़ित मुलगी विशिष्ट धर्माची होती. याच तीन बिंदु वर हे प्रकरण तापविल्या गेले आहे. हाच बिंदु  मीडियाने  जास्त ट्रेंड केला ज्यामुळे    एका विशीष्ट धर्मावर चिखलफेक करूण त्या अखिल धर्मलाच जनु लक्ष्य केल्या गेले आहे. आणि सोशल मिडीयावर दाखवील्या जाणाऱ्या संदेशा वर विश्वास ठेऊन जनता आपली मते बनवत आहे. सत्यता वेगळीच आहे.

केवळ आंदोलने मेंनबत्ति मोर्चे काढल्याने किंवा #tag वापरल्याने सत्याची जाणीव होऊ शकत नाही त्याकरिता तपास यंत्रणा आहे न्यायव्यवस्था आहे. मीडिया ने सत्यता न पड़ताळता  स्वतःच न्याय निवाडा करणे  म्हणजे जनतेच्या मनात एकमेकां विरूद्ध द्वेष भावना निर्माण करणे होय, म्हणून सदर प्रकरणात आरोपी कडून  CBI  चौकशीची   मागणी जोर धरत आहे. असो ,इथे कोणाचा पक्ष घेत नाही आहो परंतु देशात जो माहौल आणि वातावरण मीडिया द्वारा तयार करण्यात  आलं आहे किंवा करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे त्याविषयी  है भाष्य आहे.

ज्याना आतंकवाद्याचा टेलीस्कोप लाऊन देखील धर्म शोधता आला नाही अशाना मात्र  बलात्काराचा धर्म शोधन्यास  किंचितही वेळ लागला नाही  हे  येथे विशेष, म्हणजे किती हा दुटप्पी पणा? या अश्या तथाकथित अजेंड्या मुळे जाती- धर्मा मध्ये द्वेश निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. काही महाभाग तर आम्हाला हिंदू असल्याची लाज वाटत आहे असे फलक आणि #tag लाऊन स्वतःची लायकी दाखवत आहे. म्हणजे एका व्यक्तिने गैर  कृत्य केल्यास संपूर्ण धर्मलाच दोषी ठरविल्या गेले.  यात काही सेलिब्रिटी  ज्याणी खुद चित्रपटा मध्ये अश्लील व बोल्ड दृश्ये दाखवून समाज बिघडविन्यात काही अंशी योगदान दिले  ते स्वताच आता या प्रकरणात स्वस्त प्रसिद्धि मिळवून घेत आहेत. असिफाचे प्रकरण जानेवारी 2018 मधले आहे याला एप्रिल महिन्यात म्हणजे 3 महिन्या नंतर उचल्ल्या जावे यात काही तरी षड्यंत्र तर नक्कीच आहे. हे वेगळे संगण्याची मुळीच गरज नाही.


आपल्या देशात सन 2012 मध्ये दिल्ली येथे निर्भया बलात्कार प्रकरणात  निर्भयाला न्याय मिळवून देण्या करिता सर्वात मोठे आंदोलन केल्या गेले होते त्यामध्ये निर्भयाचे नाव कोणाला माहिती नव्हते आणि तिला कोणी बघितले देखील नाही. परंतु आसिफाचा फोटो का म्हणून व्हायरल करण्यात आला?   महत्वाची गोष्ट म्हणजे पीड़ित मुलीची  अश्या प्रकारे फोटो व्हायरल करणे हा कायद्याने गुन्हा आहे.  IPC 228 A कायद्या अंतर्गत मीडिया करिता प्रावधान आहे की, कोणत्याच बलात्कार किंवा लैंगिक अत्यचार झालेल्या  पीडित मुलीचा फोटो मीडिया किंवा सोशल मिडियावर व्हायरल करता येत नाही तो गुन्हा आहे. परंतु आपल्या देशात यां पीड़ित मुलीचा फोटो सर्रास  सोशल मिडियावर  लगातार वेगवेगळ्या पोस्टद्वारे व्हायरल केल्या गेला. प्रथम सोशल मिडियावर एका अजेंड्या द्वारे पीड़ित मुलीचा फोटो ,तिचा धर्म आणि नावासह शेअर करण्यात आला एवढेच नव्हे तर नंतर ती राष्ट्रीय  मिडिया मध्ये वेगवेगळ्या ऐंगलने  रिपोर्ट द्वारे दाखविन्यात आला आणि तिथुनच या घटनेला धार्मिक वळण लागले,  कारण यात धार्मिक ऐंगल त्यांना दिसला  नव्हे तर त्यांनी तो जोड़ण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

बलात्कारच्या अश्या किती तरी घटना देशात दरवर्षी दरमहा घडत असतात परंतु त्याची बातमी होत नाही  तो केवळ आपल्या करिता  एक आकड़ा मात्र राहतो व त्याला इतकी प्रसिद्धि देखील मिळत नाही.
याच महिन्यातील दिनांक 6 एप्रिल आणि 10 एप्रिल रोजिच्या गुजरातच्या सूरत आणि बिहारच्या रोहतास मध्ये घड़लेल्या  बलात्काराच्या घटनेच्या यांच्या निषेधार्थ कोणी आक्रोश करताना आपल्याला दिसलं ?,सोशल मिडियावर कोणी या पीडित मुलींचे फोटोज व्हायरल केलेत ? कोणी कैंडल मार्च -आंदोलने उभी केलीत ? कोण्या बॉलीवुड सेलिब्रिटिनी आम्ही शर्मिंदा आहोत असे हातात फलक घेऊन #tag लाऊन रस्त्यावर उभे असलेले आपल्याला दिसले.? या इतक्या मोठ्या घटनेची कोण्या मिडियाने  साधी दखल तरी घेतली का?  उत्तर आहे नाही. कारण या चिमुकल्याच्या घटने मध्ये धार्मिक आणि राजकीय स्वार्थ त्यांना कुठे दिसला नाही. म्हणून

निर्भया च्या घटने नंतर असे वाटले की आता बलात्कारच्या घटना संपुष्टात येतील पुढे घड़नार नाहीत इतके मोठे ते आंदोलन होते. परंतु त्या नंतर देखील काहीच बदल झाला नाही परिस्थिति जशीच्या तशीच आहे.  दुसऱ्या देशात बलात्कारा करणाऱ्यास अशी सजा आहै ,तीथे  सजा देण्याचे अमुक अमुक कायदे आहेत मग आपल्या कड़े का नाही वैगरे जेव्हा आपण म्हणतो परंतु
जेव्हा अश्या नराधमाना सजा देण्याची वेळ येते तेव्हा काही राजकारणी  मानवाधिकार वाले आणि आपल्यातिलच काही लोक याचा  प्रथम विरोध करतात एवढेच नव्हे तर तो अल्पवयीन आहे त्याला बालसुधार गृहा मध्ये पाठवा,  त्याच्या समर्थनार्थ वृत्तपत्रा मध्ये  लेख  लिहिल्या जातात , मा.राष्ट्रपती मोहोदया पर्यंत त्या अपराध्याची  दया याचिका पाठवींन्याची तसदी घेतली जाते, वेगवेगळ्या माध्यमातून शिफारसी केल्या जातात तो मासूम आहे,  विशिष्ट वर्ग आणि धर्माचा आहे.  असल्यास काही बघायलाच नको! काही डिज़ायनर पत्रकार आणि न्यूज़ चैनल  प्राईम टाइम शो मधून त्यांची मासूमियत ची अक्खी मालिका  चालवितात. अमुक अमुक राजकीय पक्ष त्या इसमाला  उदरनिर्वाहार्थ शिलाई मशीन भेट देतात
तेव्हा त्या निर्भया सारख्या पीड़िताचा आपण एक प्रकारे अपमानच करत असतो यामुळे तिच्या आत्माला किती दु:ख पोहोचत असेल. याची जाणीव आहे का आपल्याला? हें लक्षात घेतले पाहीजे
मग तेव्हा तुमची आंदोलनकारी आणि मोमबत्ती गैंग कुठे लपुन बसते? तेव्हा त्या इसमाला सजा देण्या करिता का मोमबत्त्या जाळल्या जात नाही?
कोणी सेलिब्रिटी  निषेधार्थ फलक घेऊन रस्त्यावर येत नाही ? का मीडिया मध्ये बसलेले या घटनेला ट्रेंड करत नाही ?

चांडाळनो जेव्हा तो कोण्या मुलीवर अत्याचार करतो तेव्हा त्याच्या अल्पवायाचे दाखले देणारे कोणत्या बिळात दडुन बसतात? सजा देताना त्याचे वय तुम्हाला आठवते मग अत्यचार करते वेळी त्याचे वय का आठवत नाही?
मग अश्याने कसा या नराधमावर धाक निर्माण होईल ?  केवळ कायदा आहे म्हणून त्याला शिक्षा होईल है गोड़ गैरसमज प्रत्येका मध्ये असतो परंतु काही पिशाच्य या कायद्याच्या जाळयातून यशस्वी पळवाट काढण्यात सफल होतात. जेव्हा एखाद्या मुलीसोबत चिड़ीमार (eve teasing) सारखे , छेड़ छाड़  किंवा अत्यचारा सारखे प्रकार होतात तेव्हा आंदोलनकारी , बॉलीवूड सेलिब्रिटी , मोमबत्ती गैंग पैकी  हा प्रकार रोखण्या करिता  कोणी  गैंग समोर का येत नाही ? कारण यांचे आंदोलन हे सिलेक्टिव आणि  पोकळ असते.

केवळ आंदोलने , मोमबत्ती मोर्चे काढ़ल्याणे व #tag वापरल्याने  जर बलात्कारच्या घटना थांबल्या असत्या तर कायदे करण्याची गरजच क़ाय असती ?
केवळ ढिगभर कायदे केल्याणे अश्या घटना थांबणार नाहीत उलट प्रत्येकाची मानसिकता ,नियत व स्त्रियांकड़े बघण्याचा दृष्टिकोण बदलने गरजेचे आहे.  जेव्हा कुठे आपल्या समक्ष अश्या घटना होताना दिसतील त्याच क्षणी त्या आरोपिला जाळा म्हणजे मग मेंनबत्या जळण्याची वेळ येणार नाही.  तेव्हाच खऱ्या अर्थाने निर्भया सरख्या , उनाव सरख्या आणि कोपर्डी सरख्या घटना पुन्हा घड़नार नाहीत.

पवन खरात,अंबाजोगाई
आपला देश हा लोकशाही वर चालतो आणि जर लोकशाही टिकवायची असेल तर न्याय व्यवस्था भक्कम असायला हवी.
    आज सद्यस्थितीला भारतीय न्याय व्यवस्था पूर्ण पणे जीर्ण झाली आहे, कारण
" अन्याय अत्याचार कोठेही आज होई
न्यायालयात तरीही आपल्याला न्याय नाही*......"

      नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात दरदिवशी बलात्काराच्या 50 घटनांची नोंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. संपूर्ण सत्य उलगडत नाही. बरेच खटले आहेत, ज्याची नोंद नाही.

      भारतीय लोक हे फक्त जातीयते मध्ये गुरफटलेले आहेत, जर एखाद्या जातीच्या मुलीवर बलात्कार झाला तर त्याला दुसऱ्या जातीच्या लोकांना त्याचा काही फरक पडत नाही, पण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कि आपण माणूस आहोत आणि माणुसकी आपला धर्म. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य तुम्ही करत असाल तर वेळ बदलायला वेळ लागत नसतो.
    आज तुमच्या वर वेळ नाही पण कधी येईल हे सांगता येणार नाही, कारण तुम्ही स्वतः या गुन्हेगारी वृत्ती कडे कानाडोळा करत आहात.
     काल कोल्हापूर मध्ये असिफा ला न्याय मिळावा यासाठी निघालेल्या मोर्च्या मध्ये एक बॅनर पाहिला , त्यावर लिहलेले होते,

" आज जर आमचे शिवाजी महाराज असते तर,
बलात्कार करणाऱ्याचे शीर आमच्या चौकात टांगलेले असते.
राजे तुमची खूप आठवण येते.
  - समस्त मुस्लिम समाज कोल्हापूर. "
         
       हे बॅनर पाहिल्यावर खरंच अंगावर शहारे उमटले आणि क्षणभर वाटले ज्याप्रमाणे शिवाजी महाराज , शाहू महाराज या सारख्या महान राजांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला त्याच प्रमाणे आज ही भारतीय न्याय व्यवस्था बदलने गरजेचे आहे , वेळ आली आहे या बदलाची.
      फक्त हातात मेणबत्या घेऊन आणि मोर्चे काढून न्याय मिळावण्यापेक्षा या बलात्कारी  विकृत लोकांना कायमस्वरूपी आळा घालणे गरजेचे आहे, खरंच अश्या लोकांची शीर भर चौकात कलम केले पाहिजे तरच अश्या गुन्हेगारांना वचप बसेल.

       
प्रविण,मुंबई
भावना कशा व्यक्त करू खरच नाही कळत आहे. दुखः आहे, राग आहे आणि लाज ही वाटत आहे. सलग सहा दिवस एका चिमुरडीवर बलत्कार होतो आणि तेही देवीच्या मंदिरात. खरच यापेक्षा भारताला कोणती लाजीरवाणी गोष्ट असेल. त्या सहा दिवसात त्या तिने काय सहन केल असेल? कहर तर तेव्हा झाला जेव्हा राष्ट्रध्वज घेऊन बलात्काराचे समर्थन केल जात आणि तेही सत्ताधारी पक्षांकडून. मनमोहन सिंगना मुका म्हणणारे आज का मुग गिळून आहेत.

या राजकारणात पडन व्यर्थ आहे कारण बलत्कार हा आता राजकीय भांडवलाचा विषय झाला. आज देशात तर ३० मिनिटाला बलात्कार होत आहेत. नक्की कसली विचारसरणी पसरत चालली आहे. आज भारत बलात्कारी देश म्हणून पुढे यायायला लागला कि काय याची भीती वाटू लागली आहे. यावर काय उपाय करायचा? हा प्रश्न फार सोपा वाटतो पण खरच कठीण आहे.

देशातील जर असे बलात्कार थांबवायचे असतील तर बालात्काऱ्याना भयंकर शिक्षा द्या. असा एक मत प्रवाह आपल्या देशात आहे. सौदी सारख्या देशात अशाच शिक्षा आहेत. पण तरीही त्या देशात गुन्हेगारी कमी नाही झाली. मग दुसरा उपाय काय असू शकेल? कदाचित भयंकर शिक्षा देऊन आपण गुन्हेगार संपवून टाकू पण त्याने त्या बालात्क्रर्याला शिक्षा होईल पण असिफ, निर्भायाला न्याय मिळेल का? बलात्कार ही विकृती आहे आणि त्यावर घाव घालन महत्वाच आहे.

महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन:-

मी समाजसेवा क्षेत्रात गेले चार वर्ष आहे. महिलांची मानसिकता किंवा त्याचं समाजातला स्थान आजही तुच्छ आहे. आजही ग्रामीण भागातील महिला आपल्या नवऱ्याला “मालक” म्हणतात. अगदी गेल्या एक दोन वर्षात लग्न झालेल्या मुलीसुद्धा. महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी गावात गेलो कि गावातीलाच नेते मंडळी म्हणतात “या बायकांकडून काय नाही होत हो, यांच काम उबरठ्या पर्यंत” .  जितक्या महिला सरपंचाना भेटलो त्यातील सर्वच सरपंच या नामधारी आणि कारभार त्यांचा सो काल्ड “मालक” करत असतो.

अशा बुरसटलेल्या विचारांचा समाज असेल तर इथे निर्भया असिफा बळी जाताच राहणार. कारण कायदा हा शिक्षा देतो पण गुन्हे थांबवण हे त्या समाजाच्या विचारसरणीवर अवलबून आहे. महिला  सक्षमीकरण चे कार्यक्रम आता खूप झाले. जर महिलेला सुरक्षित आणि सन्मानित आयुष्य जगयाच असेल तर “पुरुष सक्षमीकरण” व्हायला हव. कोणी समर्थन केल ? का केल ? कोण विरोध करतोय ? हे प्रश्न गौण आहेत. खरा चिंतेत टाकणारा प्रश्न आहे कि “पसरत चाललेली विकृत बलात्कारी मानसिकता”. त्याल बांध घालणे

सामाज माध्यामांचा यात काय भूमिका असेल?

एका रिसर्च नुसार वयवर्ष ३ ते १८ या कालावधीत मुल TV वर ३०००० बलत्कार आणि ७०००० खून पाहतात. म्हणजे जर याला आधार मानल तर जी विकृती या समाजात पसरली आहे ती घरातूनच. आजच्या लोकासात्तालाच बातमी आली होती पोर्न साईट वर “video of katua rape” असे सर्चिंग होत आहे. ही विकृती कॅन्सर सारखी समाज पोखरू लागली आहे. प्रत्येक स्त्री मनात या विकृतीची व्यथा आहे उद्या याची प्रथा नाही व्हायला हवी.

शेवटी एकच म्हणेन हा बलत्कार हा आसिफा वर नाही तर भारतीय संकृतीवर आणि विश्वासावर झाला आहे.
धन्यवाद


प्राची कर्वे (देहूरोड) पुणे
             एका चिमुर्डिवर अनेक जण अनेक वेळा बलात्कार करतात किती क्रूरता आहे ही . पाशवी पणाची सीमा आहे. खेळण्या बागडन्या चे वय सरले नव्हते आपण स्त्री आहोत हे कळण्याआधीच तिची विटम्बना केली .
    मेणबत्या जाळून आणि आंदोलन करून  काय  होणार .त्या  कोवळ्या जीवाने जे सहन केले त्याची भरपाई कशी करणार ते नुकसान कधीच भरून येणार नाही . फाशीची शिक्षाच मला योग्य वाटते कारण त्या नराधमांना परत समाजात स्थान नको आणि इतराना दहशत बसावी .
      यापूर्वीही एका  नर्सवर वयाच्या अठराव्या वर्षी बलात्कार झाला. त्या धक्क्याने ती कोमात गेली . त्या बलात्कार्याला सात वर्ष शिक्षा  झाली बाहेर आल्यानंतर त्याने नाव  बदलले नोकरी  लग्न केले . पण ती कोमात  गेलेली तिच्या वयाच्या पासष्ट व्या  वर्षी कोमातच मरण पावली काय  उपयोग झाला न्याय मिळून आणि कोणाला ?
    स्त्रीयांकडे पाहण्याचा  द्रुष्र्ट्टिकोन बदलला पाहिजे .स्त्री ला सन्मानाने वागवले पहिजे  शिवजी महाराजांचे फक्त पोवाडे गाऊन जयंती साजरी न करता त्यांची शिकवण अंगिकारून केली पहिजे .
 जेव्हा स्त्री मोकळेपणाने सुरक्षित फिरू शकेल तेव्हाच खरे स्वतंत्र्य मिळाले असे मी म्हणेन .

सिमाली भाटकर,रत्नागिरी
१. “बंधनातील पाखरु”

रखरखीत ऊन खूप झेलले
पावसात मात्र चिंब भिजले
स्वतःसाठी जगायचे राहून गेले
               अंगात कला होत्या फार
               पण बंधनाच्या जाळ्यात
               झाल्या सगळ्या स्वार
               मन नेहमी पुस्तकात गुंतलेले
               वाटलं शिक्षणाच्या प्रकाशानं
               आयुष्य होईल मस्त सजलेलं
कुणास ठावे आपल्याच मनात होत
काळबी पसरलेल
परक्याच धन म्हणे
बरं असत डोइवरच वझ लवकर उतरेल
जबाबदारीच मुल्य होत
लहानपणीच शिकवलं
अन् सहनशिलतेचा तर
दगडान ठेचून अंगी भरलेल
                मनाला घालून आळा
                जीवन गृहस्थाश्रमात रमल
                इथून पुढ आयुष्य असेल
                ऐकनच उतरलेल
परंपरेच्या विळख्यात अडकवल
हाती पायी वेसन घातलं
पायदळीची धुळ समजून
हातांनी इकडून तिकडून उडवलं
                 बदलेल ही स्थिती म्हणत
                 मनास समजावलं
                 रोजचा दिन नवा म्हणत
                 गुदमरत आयुष्य जगलं
बदलाची वाट बघत एक दिवस
श्वासांनी दिशांनाच बदललं
अन् मन अनंतात विलीन झालं
                  साखळदंडानी जुंपलेलं पाखरु
                  मुक्त होवूनी आसमंनती विराजलं
                  आतातरी बदला अन्
                  कुणीतरी थांबवा अस म्हणत
                  मुक्या डोळ्यांनी
                  जगाला सांगून गेलं
                  जगाला सांगून गेलं........


२.“वेडी आशा”

धुंद होती भावना,वेडी होती आशा….
कधी ना कळली कुणा मनाची भाषा….
             मन पाखराचं होतं,आकाशी स्वैर उडणारं
             एका बाणात प्राण घेतला
             मुक टाहो कुणी न ऐकणारं….
कर्ण असूनी बहिरे झाले….
तेजस्वी नयनाचे आंधळे झाले….
हळव्या मनाचे शब्द मुकेच सगळे….
             कंठी होता आवाज परी कुणी ना वदले….
             न्यायरुपी देवतेला पैशांत मोजले….
             फित काळी नयनावरी तरी

             न्यायाची आशा बाळगून ऊरी….
विकली गेली भरल्या बाजारी….
पदरी निराशा तरी मनी विजयाची आशा….
कुणी तरी दाखविल किरणांची दिशा….
            धुंद होती भावना, वेडी होती आशा….
            कधी ना कळली कुणा मनाची भाषा….


            
     मला माझ्या दोन कवितेच्या माध्यमातून ऐवढेच निर्देशनास आणायचे आहे की ह्याला जबाबदार कोण?याचे उत्तर प्रत्येकाची मानसिकता असच आहे.त्याचप्रमाणे आपली शासनव्यवस्था १०-१० वर्षे  एक केस चालते कोर्टात,खूपच कमकुवत आहे आपली न्यायव्यवस्था व किव येते न्याय देणाऱ्याच्या बुद्धिमत्तेची.
          राहिला प्रश्न स्त्रीचा तिने स्वतःला खंबीर बनविले पाहिजे.आपण घरातून सुरुवात केली पाहिजे.मुळात स्त्रीला काचे ऐवजी दगडाचा दर्जा दिला तर जास्त बरं होईल.कारण काच फुटल्यावर त्याची चर्चा व मार्केटिंग सगळीकडे होते.त्यामुळेच दगडाचा दर्जा द्या म्हणजे फुटण्याचा प्रश्नच येत नाही.अर्थातच मुलींना ऐवढे धीट बनवा कि ती स्वतःचे संरक्षण स्वतः करेल.
           एकीकडे नारी मुक्ती नारी शक्ती असे नारे लावले जातात व दुसरीकडे तिच्या शक्तीलाच नहीसे केले जाते.मुळातच ही विकृतीच नष्ट केली पाहिजे.निर्भयांना आपणच न्याय दिला पाहिजे आणी हे करताना त्याला जातीचे लेबल लावून त्यांचे वाभाडे काढू नये.
            आता प्रश्न विकृतीचा मानसशास्त्रीय भाषेत सांगायचे म्हणजे माणसाच्या विकृत भावना लगेचच निर्माण होत नाही.हळूहळू निर्माण होते व जेव्हा तिचा स्फोट होतो तेव्हा हे  कठुआ व उन्नाव सारखे प्रकरण घडतात.त्यामुळे असे बदल जर आपल्या मुलांमध्ये दिसले तर हसण्यावरी व शांत न राहता गांभीर्याने घ्यावे.त्यावर मानसिक उपचार करुन नाहीसे करता येईल.
             म्हणूनच माणसाची प्रवृत्ती,मनोवृत्ती व विकृती याचा अभ्यास करुन आपण ती विकृती नष्ट केली पाहिजे.
आपण स्त्रीयांना खूप त्रास होतो प्रत्येक ठिकाणी पण आपण त्याला लगेच विरोध करत नाही.कदाचित परिस्थिती,भीती यामुळे होत असावे पण आपण विरोध करायला पाहिजे.स्वतःच्या बाबतीत असो वा दुसऱ्या आपण एकत्र येवून सामना केला पाहिजे.मेणबत्ती हाती घेऊन मोर्चा काढण्यापेक्षा न्यायव्यवस्थेला एक  खरमरीत पत्र लिहून ठणकावून प्रकरणाचा लवकर छडा लावायला सांगा. अमुक अमुक टक्के आरक्षण मागायला पुढे मग बलात्कार पिडितेला न्याय देण्यात मागे का?
तसेच स्वतःच्या वागण्यात पोशाख करण्यात थोडं धरबंध असावा समोरची व्यक्ती एकदम उसळून उठेल अस वागणं टाळावं, कारण या अशा वागण्यातून केंव्हा केंव्हा अति प्रसंग ओढवतात. एखाद्याने दिलेली स्तुतीपर वाक्य किंवा वागणं हे तिथेच थांबवावं ना की ती गोष्ट हसण्यावारी नेऊन सोडून द्यावे. स्पर्शाची भाषा मनाला कळते त्यामुळे प्रेम आणि वासना यातला फरक समजणे गरजेचे आहे.
              विकृती कितीही असली तरी ती थांबवता येते. पुरुषांनी व स्त्रीयांनी प्रत्येकानेच आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.न्यायव्यवस्थे विरुध्द पेटून उठा म्हणजे कागदाच्या ढिगा-याने पडून असलेल्या केसेस पटकन सुटतील.मानसिकता बदला जग आपोआप बदलेल.

R. सागर (सांगली)
आज आपल्या देशात स्त्री सुरक्षित नाही. मग ती कुठल्याही वयाची असो. हल्ली दररोज सकाळी कुठल्याही वर्तमानपत्रात बघा, बलात्काराची कमीतकमी एखादी बातमी तरी असतेच असते. पीडितांच्या यादीत अगदी 6 महिन्यांच्या बालिकेपासून थेट 60-70 वर्षांच्या वृद्धेचाही समावेश होतो. आणि इतकं सगळं घडत असताना आपण काय करतो.? आपण पेटून उठतो का? तर हो. आपण पेटून उठतो.. पण फक्त सोशल मीडियावर.. एखादी निषेधाची पोस्ट केली, एखादा दिवस निषेधाचा dp ठेवला की आपली जबाबदारी संपली.
.
खरंच इतकं केल्यावर आपली जबाबदारी संपते का? गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात 4 हजारपेक्षा जास्त बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीचा आधार घेतला तर एकट्या मुंबईत गेल्या 3 महिन्यात तब्बल 123 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झालाय. ही फक्त नोंद झालेल्या तक्रारींची संख्या आहे. प्रत्यक्षात बदनामीच्या भीतीने म्हणा किंवा अन्य कारणाने, कित्येक प्रकरणांत तक्रार दाखल केलीच जात नाही.
.
इतकं झाल्यावर आपल्याकडे निषेध व्यक्त होतो तोही मेणबत्त्या पेटवून. ठीक आहे निषेध केला पाहिजे. पण ह्या निषेध करणाऱ्यातलेच कित्येक जण जेव्हा त्याच घटनेचा व्हिडिओ google वर शोधतात तेव्हा त्यांची मानसिकता लक्षात येते.
.
बऱ्याच वेळा अशी घटना घडल्यावर मुलींच्या, स्त्रियांच्या कपड्यांबद्दल बोललं जातं. पण त्यांच्या कपड्यांबद्दल बोलण्यापेक्षा लोकांच्या बदलत्या मानसिकतेकडे बघा ना. तसंही याबाबतचे आपल्याकडचे कायदे म्हणावे तितके कडक नाहीतच. त्यासाठी आधी कायद्यात आवश्यक ते बदल व्हायला पाहिजेत. परवा कुठल्यातरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांचं सरकार 12 वर्षांखालील वयाच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद करणार. घोषणेचं नक्कीच स्वागत आहे. पण त्यामध्ये वयाचा प्रश्न येतोच कुठे? पीडितेचं वय कितीही असो आरोपीचा गुन्हा एकच आहे ना? मग शिक्षाही तशीच कठोर पाहिजे. दुसरी गोष्ट आरोपीच्या वयाची. निर्भया प्रकरणामध्ये 1 आरोपी 16 वर्षाचा होता. म्हणून त्याच्या गुन्ह्याची तीव्रता माहीत असूनही त्याला शिक्षा नाही होऊ शकत.
.
अशा घटना घडल्यानंतर आम्ही इतकं पेटून उठतो की आम्हांला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षेची आठवण येते. त्यावेळेसारखीच आरोपीचा चौरंगा करायची शिक्षा असावी असं वाटू लागतं. तशी चर्चाही आपण सोशल मीडियावर करतो. पण परस्त्रीला मातेचा दर्जा देणारे शिवाजी महाराजांचे विचार मात्र आम्ही सोयीस्करपणे विसरतो. जोपर्यंत स्त्री ही एक उपभोग घेण्याची वस्तू आहे हा आपला विचार बदलणार नाही तोपर्यंत स्त्री कितीही योग्य वागली तरी ती सुरक्षित नाही राहू शकणार. आणि म्हणूनच असेल कदाचित पण देशातलं मुलींचं प्रमाण कमी होत असताना तिच्या सुरक्षिततेच्या काळजीमुळेच मुलगी जन्माला यावी पण शेजाऱ्याच्या घरात हाच विचार प्रबळ होतोय..

नितिन लेंडवे पंढरपुर.
 "कामातुरा ना भय ना लज्जा" हे जे म्हटले आहे ते सद्यपरिस्थितीत वर्णन चपखल लागु पडते. विकृत लोक हे बलात्कारी नसतात पण बलात्कारी लोक हे हमखास विकृत असतात. कारण सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक संभोग, योनि मार्गात विविध वस्तु टाकणे, देहाची विटंबना काय नि काय.
            रोजचे वृत्तपत्र उघडले की हे दोन-चार बातम्या हटकुन असतातच. ( वृत्तपत्र की बलात्कारपत्र म्हणावे हा प्रश्न पडावा)
            गुन्हेगाराला जात, धर्म , लिंग, वर्ण असा काही ठराविक आकृतिबंध नाही.  एखादा समाज अशा विकृताला समाज संरक्षण देत असेल तर तो समाज लबाडच म्हटला पाहिजे. असे असले तरी काही ठराविक समाज ( उदा.अल्पसंख्यक : [याचा अर्थ ज्या प्रदेशात जो समुदाय अल्प असतो तो. शब्दभ्रम झाला की बुद्धिभ्रम नको] ) जाणीवपुर्वक लक्ष्य केलेले दिसुन येतात.
             अशा घटना लोकलज्जास्तव उजेडात येण्याच प्रमाण ही अत्यल्प. यातुन या गुंडापुंडांची हिंमत वाढते. आणि या टोळधाडी नव्या सावजाची शिकार करायला मोकळेच. आणि बलात्कारा विषयक जी विधाने होतात ती देखील लोक फार बेजबाबदारीने करतात. सत्ताधारी पक्षाचे एक लोकप्रतिनिधी म्हणतात की "तीन मुले असलेल्या बाईवर कोण बलात्कार करेल" आता इथे ९० वय वर्षे असणारी आजीबाई सुरक्षित नाही. निर्भयाच्या आईच्या समोर एक डीजीपी असणारा माणुस(?) म्हणतो की, "या वयात निर्भयाची आई एवढी सुंदर दिसते तर निर्भया किती सुंदर दिसत असेल. आता हे बलात्का-यापेक्षा कमी विकृत आहेत का?
         यात अजुन एक वेगळाच प्रकार. जातपंचायती. मध्यंतरी नागपुर का कुठे बलात्का-याला या जातपंचायतीने काय शिक्षा दिली तर त्याने सर्व समाजाला "मांसाहारी" जेवण द्यावयाचे म्हणजे त्याच्या दुष्कर्माचे परिमार्जन झाले. दुसरी घटना त्यावर कढी करणारी. बलात्का-याला शिक्षा काय तर प्रती बलात्कार.
  आता वरील बाबी पाहिल्या तर समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे. हे सांगायला कशाला भविष्यवेत्ता पाहिजे.
 बलात्कार  होण्याची कारणे:
        याचा विचार करताना अनेक शक्याशक्यता असतात. महिलाविषयक अनादर, महिलेकडे उपभोग्य वस्तु म्हणुन पाहणे, दहशत निर्माण करणे, पुरुषप्रधान संस्कृती, मानसिक खच्चीकरण करण्यासाठी, पुरुषत्व सिध्द करण्यासाठी ( उपमर्दच हे ठरतात),लैंगिक वासना शमविण्यासाठी(दडपलेल्या लैंगिक भावना), लैंगिकविषयक कुतूहल, काही प्रमाणात बीभत्स वा अतिरंजित माहिती  इत्यादी.
      बलात्कारांचे मिथक: उत्तान कपडे परिधान केल्याने बलात्कार होतात, रात्रि अपरात्री मुलींचे बाहेर भटकणे, अश्लील चित्रपट पाहिल्याने, मुलांशी मैत्री केल्याने इ.
    आपल्या पातळीवर यावर निश्चितपणाने पायबंद घालता येऊ शकतो त्याला पुरक गोष्ठी करता येतील. त्या अशा.महिलांचा आदर करणे,मुलगा व मुलगी भेद मानु नये, योग्य ते लैंगिक शिक्षण द्यावे, आपणास जशी आजी, आई, बहिण, बायको, मुलगी हे असतात तसेच इतरांना असतात हे लक्षात असु द्यावे.

                
क्षितीज गिरी ,सातारा
2013 च्या भारत सरकारच्या  आकडेवारी नुसार भारतामध्ये सरासरी दर तासाला 4 स्त्रीयांवर बलात्कार होतात .हे फक्त नोंद झालेले बलात्काराचे गुन्हे आहेत कितीतरी गुन्ह्याची नोंदही होत नाही .त्यामुळे अश्या किती तरी निर्भया श्राद्ध आसिफा .....येतात व जातात .काही प्रकरणे फक्त प्रकाशझोतात येतात ती पण धर्माची आणि जातीची लेबले घेऊन आंदोलने केली जातात त्याचा फायदा घेऊन काही राजकीय पोळ्या पण भाजल्या जातात.प्रत्येक वेळी जखमेवर औषध लावले जाते (काही वेळा मिठ पण चोळले जाते)पण नवीन जखमा होतच राहतात.गरज आहे जखम होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची .
        ज्या जातीच्या व धर्माच्या नावाने मोर्चे व आंदोलने झाली.त्याच जातीतले /धर्मातले बलात्कारी निघतात.आणि ते किती देतात आपल्या घरातील स्रियांना समतेचे स्थान हा प्रश्न तर अनुत्तरितच राहतो .अश्या मोर्च्यांनी बलात्कार थांबणार नाही आणि तो थांबलाही नाही .कारण काही अपवाद वगळता या कोणत्याच मोर्च्यांन मध्ये वैचारिक पद्धतीचे विद्रोही बंड नव्हते फक्त जखमेवर मालमपट्टी करा यासाठीच ते मोर्चे.
            भारतामध्ये बलात्काराच्या घटना का घडतात यामध्ये बरेचशे विचारप्रवाह पुढे येतात.यामध्ये काही कपड्याना दोष देतात तर काही कायद्याला पण खोलात जाऊन विचार केला तर ज्या देशामध्ये बुरख्या सारख्या प्रथा आहेत. बलात्काराला भर चौकात गोळ्या मारल्या जातात त्या देशात पण कमी अधिक प्रमाणात बलात्काराच्या घटना घडतात.शेवटी बलात्कारासारख्या घटना का घडतात याचे उत्तर मात्र सापडेनासे होते .
         माझ्या मते भारतीय स्रियांवर बलात्कार फक्त एकाच कारणामुळे होतात आणि आतापर्यंत होत झालेले आहेत .ते कारण म्हणजे भारतीय स्त्री ही मानसिक गुलाम आहे .हो हो बरोबर ऐकले तुम्ही .भारतीय स्त्री एक मानसिक गुलाम आहे.(काही अपवाद वगळता).स्रियांवर होत असलेल्या शोषणाचे स्रिया उघडपणे समर्थन करतात .रूढी, परंपरा ,संस्कृती ,धर्म या आणि यासारख्या गोंडस नावाखाली.
         शनी मंदिरात स्रियांना पुरुषांबरोबर अधिकार मिळावा म्हणून चाललेला लढा हा स्रियांना उधळून लावण्याचा प्रयत्न केला .बुरखा व तिन तलाख सारख्या केलेल्या कायद्याला विरोध हा स्रियांनीच केला .जणू त्या स्व:ता सांगत होत्या आम्हाला काळ्या कपड्या मध्ये कैद करा.आपल्यावर होत असलेल्या शोषणाचे उघडपणे समर्थन करत होत्या .भारतीय इतिहासाकडे पाहिले तरी आपल्याला हीच परिस्थिती बघायला मिळेल .स्रियांना वारसाहक्क, संपत्तीचा ,लग्न करण्याचा ,घटस्फोटाचा अधिकार मिळण्यासाठी बाबासाहेबानी हिंदू कोड बिल संसदेत मांडले व संसदेच्या बाहेर स्रियांनि मोर्चा काडून या बिलाला कडाडून विरोध केला.अमेरिके मध्ये स्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून खुप मोठे आंदोलन केले.पण तेथील कोणत्या स्रियांना या आंदोलनाला  विरोध केला नाही .कारण त्या सगळ्यांना आपला इतिहास माहीत होता.

        महिलांनी कधी आपला इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला आहे का कारण ज्याला आपला इतिहास माहीत नसतो त्याचा वर्तमान आणि भविष्यकाळ हा अंधारातच असतो .चूल आणि मूल यामध्ये असणाऱ्या महिला एव्हड्या उंचीवर कश्या गेल्या?चार भिंतींच्या आता मधून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत स्रियांच्या झेपेसाठी वेळोवेळी ज्या  रनरागिनींनी ,महापुरुष्यानी आपले जीवन वेचले त्यांची थोडीशी तरी जाणीव स्रियांनी ठेवली आहे का.कसा माफ करेल काळ मग तो सूड उगवल्याशिवाय राहणारच नाही.
   ज्या सावित्रीबाई फुलेंनी अंगावर शेण ,चिखल ,गटारात घाण ,दगडे ,अपमान सोसून स्रियांना शिकवले .स्त्रीमुक्तीचा गाणे गायल्या.स्रियांवर लिहिले कविता केल्या .स्रियांच्या प्रगतीसाठी आपले जीवन वेचले त्या माऊली साठी स्रियांनी काय केले.त्या सावित्रीची तेवढी  आठवण ही तुम्हाला येत नाही जेव्हढी आठवण  विद्येची देवता सरस्वतीची येते.फक्त शुभेच्या दिल्या म्हणजे झाले नाही(काही तर त्या पण देत नाहीत).त्यांच्या विचारांचा  जागर केला का .वास्तविक प्रत्येक चौका चौकात स्रियांनि या वाघिणीची जयंती साजरी केली पाहिजे.एवढे उदात्त कार्य केले आहे त्यांनी स्त्रीयांसाठी.
      ज्यावेळेस एखादया समाजावर प्रसंग ओढवतो तेव्हा त्या समाजाचा प्रतिनिधी त्याची भूमिका स्पष्ट करतो किंवा त्याला विचारले जाते .पण स्रियांवर बलात्कार किंवा तत्सम  घटना घडतात तेव्हा कोणाला विचारतात ?जात आणि धर्म प्रतिनिधीला ?का?इथेच मुळात खरी मेख आहे .स्रियांच्या हक्कासाठी कोणती हल्लाबोल करणाऱ्या, जागृत  विद्रोही ,पुरोग्रामी,स्त्री पुरुष समानच्या विचारावर चालणाऱ्या संघटना आहेत का .तर उत्तर हो मिळते .नक्की आहेत .स्त्रीयांसाठी महिला आयोग पण आहे.पण स्रिया त्यांच्या हक्का प्रति किती जागृत असतात हा खुप गंभीर व चिंतेचा विषय आहे.
         प्रत्येक वेळेस कशाला नुसती सहानभूती मिळवायची प्रत्येकाची .कुणाला तरी आपली दया येईल मग आपल्याला न्याय मिळेल .ही भाबडी आशा तरी का ठेवायची.स्रियांच्या निम्मी लोकसंख्या असूनही संपत्तीचा ,मतदानाचा,बाकी सर्व हक्क असूनही राजकीय दबदबा का कमी आहे .याचे कधी आत्मपरीक्षण केले आहे का?आणि ज्या काही स्रियां प्रमुख पदी बसल्या आहेत त्यांची मानसिकता बघायला हवी.स्त्रीयांच्या विकासासाठी त्या किती तत्परतेने पावले उचलत हे पण बघायला.
        स्रियांना जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य भेटत नाही तोपर्यंत हे मानसिक शारीरिक शोषण होतच राहील.त्यासाठी गरज आहे सर्व स्रियांनि एका छताखाली येऊन धर्म ,जात, पंत, भेद बाजूला ठेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची.
       प्रत्येक समाजातील महिलांवर बलात्कार झाल्यावर तो समाज विरोध करतो .महिला नाही समाज विरोध करतो .कारण महिलांनी त्यांना तो अधिकार दिलेला असतो किंवा आहे.म्हणजेच स्रिया प्रत्येक वेळी अवलंबून असतात कोना दुसऱ्यावर .का?जोपर्यंत त्या स्व:ता आपल्या छोट्या-छोट्या हक्काचे रक्षण करण्यासाठी एकत्र येणार नाहीत संघर्ष करणार नाही तो पर्यंत या बलात्कायासारख्या घटना कमी होणार नाहीत.नुसते कायदे करून काही एवढा फरक पडणार नाही.
   प्रत्येक वेळेला बलात्कार झाल्यानंतर आपण खाडकन जागे होतो.मुळात  तसे होऊ नये म्हणून तसेच  भविष्यातील धोके ओळखून योग्य ती उपाय योजना का केली जात नाही?कायदा कडक करून लवकरात लवकर निकाल का लावला जात नाही?एखाद्या गोष्टीचा एवढा अंत का बघितला जातो?का असल्या मुद्द्यांनवर घण्यारडे राजकारण केले जाते.कायदा स्रियांना आरक्षण देऊ शकतो मग संरक्षण का नाही देऊ शकत .का यांची अजून तशी मानसिकता होत नाही .यांना फक्त असल्या मुद्द्यांवर राजकारण करायचे असते.लोकांना पेटवण्यासाठी वेळो वेळी हे मुद्दे मुद्दाम उखडून काढले जातात.आणि बाकीच्या विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
        शेवटी एवढेच सांगेन  समानता ही आपल्या विचारांमध्ये,वागण्या बोलण्यामध्ये दिसली पाहिजे.फक्त आपल्यावर वेळ आली की समानतेचा पुरस्कार करणारे पन महाभाग आहेत.काही स्रिया जातीभेद मानतात पण त्याच तत्वाने स्त्री-पुरुष भेद मानला तर मात्र त्यांना खटकतो.आणि या असमनतेच्या वतावरणामुळेच घडतात बलात्कारा सारख्या घटना.त्यामुळे बदल हा फक्त वरवर नको तो मुळापासून झाला पाहिजे कायमचा .

पूनम देशमुख,अकोला.
आजही आपल्या समाजात महिलांवर रोज अनेक प्रकारचे बलात्कार होत असतात.पावलो पावली वासनागंध नजराना रोज सामोरे जावे. माझे वय लहान आहे.मला एक समजते जिवंत असेपर्यंत तिच्यावर बलात्कार झालेला असतो पण तिच्या मृत्यूनंतर तिच्या चरित्राचे अक्षरशः धिंडवडे काढले जातात. माझी एकच विनंती आहे-

१. भारतातील न्यायव्यवस्थेलाकि जी काही  बलात्कार केसेस आहेत त्या सर्व फास्ट ट्रेक कोर्ट द्वारे ९० दिवसाचे निकाली काढावे.मेणबत्ती,मोर्चा काढणे हे प्रकरणाची जाणीव करण्यासाठी ठिक आहे पण अंतिम उपाय नाही. मला अभिमान आहे आमिरखान यांचा.

२. मागे काही वर्षे आधी एका टि.व्ही. मालिकेच्या माध्यमातून त्यांनी लहान मुलांना ‘चुकीचा स्पर्श’म्हणजे काय हे समजावून सांगून त्याचा विरोध कसा करायचा हे शिकवले होते.त्यावेळी मी ५वर्षाची होती.सर्व पालकांनी त्यांच्या मुलांना हे शिकवावे,ही विनंती. आणखी एक मुलींना मेकअप,मेंहदी क्लासेस,ब्युटी पार्लर इ.शिकवण्यापेक्षा शिवाजी महाराज यांच्या काळातील तलवारबाजी,दांडपट्टा,कराटे शिकवा म्हणजे तिच्याकडे कोणी वाईट हेतूने पाहायची हिम्मत करणार नाही.

३ मी शाळेत जात असताना माझे मामा मला शिकवत होता की अनोळखी माणूस चुकीचे स्पर्श करत असेल तर त्याला हाताने बोखारायचे,त्याच्या मेन पाँईटवर लाथ मारणे,मोठ्याने आरोळी मारणे  हे शिकवले होते.

संगीता देशमुख,हिंगोली
         "हृदयी पान्हा,नयनी पाणी,
          जन्मोजन्मीची कहाणी,
          स्त्री ही बंदिनी....."
काळ बदलला,युगं बदललीत,अश्मयुगातून  विज्ञान आणि तंत्रज्ञानयुगात पोहोचलोत,परंतु स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टिकोन हा समाज बदलू शकला नाही. युगानयुगापासून तिच्या वेदनेला हुंकार फुटले पण ते हुंकार थांबू शकले नाहीत.  चार भिंतीच्या आत होती तेव्हा लोकांच्या नजरेला स्त्रीदर्शन हे अतिशय दुर्लभ होते. लोकांना वाटायचे,तिचे दर्शन दुर्मिळ म्हणून ती कधीतरी बाहेर पडल्यावर तिच्याकडे पुरुषाच्या वखवखलेल्या नजरा पडतात. ही विकृत पुरुषी मनाची लंगडी समर्थने आजही  कधी ती तोकड्या कपड्यात म्हणून,कधी ती स्वैराचारी म्हणून,कधी तिचा उत्तानपणा म्हणून सांगितली जातात. उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे पहाण्याचा युगानयुगाचा शाप ती स्त्रीत्वासोबत घेऊन आली आहे. ती चार भिंतीत होती तेव्हाही सुरक्षित नव्हती आणि आजही नाही. ती  दिल्ली,मुंबईसारख्या महानगरातील निर्भया असो,पत्रकार असो अथवा ग्रामीण भागातील श्रध्दा,असिफा असो,तिच्याकडे माणूस म्हणून न पहाता फक्त स्त्री म्हणूनच पाहिल्या जाते. आणि म्हणूनच ती शिकलेली असो,निरक्षर असो विकृत नजरेला ती बळी पडते. काही दिवस त्याची खरपूस चर्चा होते,वादविवाद घडतात,टीव्ही चॅनेल्सवाल्यांचा टी आर पी वाढतो,वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरून जातातकॅंडल मार्च होतात,मूकमोर्चे होतात.  क्षणभर वाटते,ही बलात्काराची  देशातील शेवटची घटना असेल पण असे कधी घडलेच नाही. आणि सध्याच्या स्थितीवरून ते भविष्यातही घडेल,असे वाटत नाही. सात वर्षाच्या निरपराध मुली पासून तर सत्तर वर्षाच्या हतबल स्त्रीवरही इथे  बलात्कार होतो.
              असे का घडत रहाते?बलात्काऱ्याला या  बलात्कार करताना कायद्याची,समाजाची भीती वाटत नाही?  यात महत्वाचे कारण म्हणजे,आम्ही जनता  पेटून उठत नाही. एक दिवस कॅंडल मार्च करून,मोर्चे काढून निषेध नोंदवणे म्हणजे पेटून उठणे नव्हे. जेव्हा एखाद्या चिमुरडीवर बलात्कार होतो,तेव्हा कोणताही वकील आरोपीची  ती केस न घेता पेटून का उठत नाही?देशातील प्रत्येक मुलीचा बाप त्यात धर्म,जात, आरोपीचा पक्ष न पहाता का पेटून उठत नाही?देशाच्या कोण्यातरी कोपऱ्यात घडलेली घटना माझ्याही जीवनात,माझ्याही मुलीच्या बाबतीत घडू शकते,हे प्रत्येक मुलीच्या बापाला का वाटत नाही? एखाद्या चिमुरडीवर होणाऱ्या बलात्काराला ती कोणत्या धर्माची आहे,कोणत्या जातीची आहे आणि आरोपी कोणत्या राजकीय पक्षाचा आहे,त्यानुसार त्या घटनेला रंग दिला जातो.  अशाही घटनेत राजकारण करण्याइतके राजकीय लोक आणि त्यासोबत आपणही निर्ढावलेले आहोत का?   बळी गेलेल्या चिमुरडीचे वय,तिची बलात्कार झाल्यानंतरची निर्घृण  अवस्था,तिच्या आईवडिलांची अवस्था काहीच आपल्या डोळ्यासमोर न येण्याइतपत आपण संवेदनाहीन झालेले आहोत का?

          पूर्वीपासून कोणाचाही सूड घ्यायचा झाला तर त्यासाठी प्रतिस्पर्ध्याची मुलगी,आई,बहीण किंबहुना त्यासाठी स्त्रीच लक्ष्य केल्या जाते.  हा सूड घेतांना माझ्याही घरातील स्त्री अशी कधीकाळी बळी पडू शकते,असा विवेकी विचारही करू न शकण्याइतके आपले भावनिक,सामाजिक पतन झाले आहे का?  एखादी स्त्री जेव्हा बलात्काराचा आरोप करते तेव्हा त्यात काही कावा असूही शकतो. तेव्हा त्या घटनेत  नक्कीच शहानिशा केल्याशिवाय व्यक्तीवर आरोप ठेवून शिक्षा करणे,धोक्याचेच ठरेल. परंतु जेव्हा एखाद्या निरपराध,कोवळ्या  चिमुरडीवर बलात्कार होतो तेव्हाही  आपली  न्यायव्यवस्था,समाजव्यवस्था त्यात पळवाटा का शोधते? त्यात आरोपीला वाचवण्याचा समाज आणि वकीलही का प्रयत्न करतात? अशावेळी सगळा देश बळी गेलेल्या  मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी का पेटून उठत नाही. दिल्ली ते गल्लीचे हे अमानुष लोण स्वत:च्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत आपण असेच हातावर हात ठेवून, आरोपीला वाचवण्याचे मार्ग शोधत राहूत का?

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************