नक्षलवाद आणि सरकारमधे फसलेला "आदिवासी विकास"

 नक्षलवाद आणि सरकारमधे फसलेला "आदिवासी विकास"


IMAGE SOURCE   INTERNET

संदिप बोऱ्हाडे,पुणे


 नक्षलवाद म्हटले कि आदिवासी समाजाकडे पाहिले जाते नक्षलवाद हीच आदिवासी समाजाची ओळख झालीय. आणि 99% आदिवासी लोक हे नक्षलवादी आहेत हे कटू सत्य आहे ते नाकारता येणार नाही. निसर्गाला देव मानून पूजा करणारा आदिवासी वरून दिसताना अगदीच खडकासारखा कठोर दिसतो....परंतु मनातून तो फणसाच्या बियांपेक्षा
ही गोड असतो. हे आपणास आदिवासी भागात गेल्यानंतर अनुभवायास मिळते. मग असे असताना आदिवासी कसा काय नक्षलवादी बनू शकतो ??

    आज प्रत्येक आदिवासी घरात एक नक्षलवादी आहे हि किती लोकांना माहित आहे आपल्याला नक्षलवादी म्हणजे हातात AK 47 बंदूक , कमरेला हेंड ग्रीनेड , आठ दहा मेगजीन हा पेहराव म्हणजे तुम्हाला नक्षलवादी वाटत असेल तर तुम्ही चुकताय , नक्षलवाद अभ्यासायची प्रत्येकाला गरज आहे असे मला वाटते .! नक्षलवाद म्हणजे फक्त गोळीबार ,बॉंबब्लास्ट नाही, ती एक चळवळ आहे ....आणि हि चळवळ आरक्षण या शुल्लक शब्दासाठी तयार झालेली नाही , हि चळवळ तयार झालीय ती आदिवासी परंपरा , संस्कृती , वनसंपदा वाचवण्यासाठी , वनांचे रक्षण कार्यासाठी आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी आणि आदिवासींचे शोषण थांबवण्यासाठी..

    आदिवासी गरीब.....एक वेळच्या अन्नाची मारामार अशी बिकट अवस्था असताना नक्षलवाद्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे, विस्फोटके यासाठी पैसा कुठून मिळतो? नक्कीच नक्षलवाडी कारवाया जर १००% आदिवासींकडून केल्या जात असतील तर त्यांच्याकडे यासार्वान्साठी लागणारा पैसा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे शक्यच नाही. कारण लोकांना शेतीत उत्पन्न नाही, रोजगाराच्या संधी नाहीत...त्या भागात पैसा मग तो कोणत्याही कारणासाठी असो उपलब्ध होवूच शकत नाही. मग असे असतानाही जर नक्षलवादी कारवायांमध्ये आदिवासी तरुण-तरुणी सहभागी होत असतील तर यागे खूप मोठे राजकीय वा सामाजिक षडयंत्र असू शकते. त्यात नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी जे पोलीस किंवा इतर सुरक्षा अधिकारी नेमले जातात ते सुद्धा आदिवासीच असतात....म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा हा आदिवासीच असतो. कोणी कोणाला मारले हे महत्वाचे नाही.....परंतु मारणारा हा आदिवासी होता किंवा आहे याचे दुख एक आदिवासी म्हणून मला वाटते. आणि ज्या भागात आजही रस्ते ,वीजदेखील नाहीत तिथे गरीब आदिवासी बांधवांकडे अत्याधुनिक हत्यारं आणि दारूगोळा कसा पोहोचतो हे मात्र मला न सुटलेले कोडे आहे.

    देश स्वतंत्र झाल्या नंतरही आजही माझा आदिवासी समाज अजूनही का विकासापासून दूर आहे.आमच्या डोंगरात कधी रस्ता,दवाखाना,शिकण्याची सोय नाही काहीही सुविधा नाही तरीही आदिवासी समाजाने कधीही आंदोलन केल नाही. का तर माझा समाज अल्प समाधानी कधी कोणलाही त्रास न देणारा म्हुणन की काय आज देशाच्या अनेक वर्षानंतर काही मतलबी राजकारणी लोकानी माझ्या समाजाचा संपायचा घाट घातला आहे.वाह.....रे राजकारणी लोकानो तुमच्या राजकारणासाठी आमच्या समाजाचा जर तुम्ही वापर करताय पण कधी या आधी आमच्या समाजाच्या विकासबद्दल भ्र शब्द काढला नाही,तुमच्या मालकीच्या टीवी मीडियावाल्यानी कधीही आदिवासी लोकाची खरी बाजु दाखवली नाही. आदिवासी लोकाची अजूनही सरकार दरबारी उपेक्षाच केली आहे आणि अजूनही करताय.कधी विकासाचा नावाखाली तर कधी नक्षलवादी ठरवून आमचा समाजाचा घात केला आहे.कधीही आमच्या समाजाच हित बघितल नाही पण राजकारण मात्र जोरात सुरु आहे.

   पोलीस किंवा मिलिटरी यांच्या कोणत्याच प्रयत्नातून आजपर्यंत तरी नक्षलवाद कुठे मोडीत निघाल्याचे आपणास ऐकिवात नसेल. मग जर हा नक्षलवाद असाच फोफावत राहिला तर उद्या हे सरकार नक्षलवाद्यांच्या नावाखाली संपूर्ण आदिवासी जमातीला बदनाम करून आपले अस्तित्व संपुष्टात आणण्यास मागे पुढे पाहणार नाही. मी  नक्षलवादाला बिलकुल सपोर्ट करीत नाहीये.आपल्या लोकशाही देशात आपल्याच नागरिकांवर होणारा कुठलाही सशस्त्र हल्ला आणि बंड पुकारणारी चळवळ ही संपवलीच पाहिजे.परंतु,मला त्याला संपूर्ण नष्ट झालेला पाहायचा आहे.आणि हा नक्षलवाद ज्या कारणासाठी तयार झाला ते कारणे देखील समूळ नष्ट होताना पाहायची आहेत.केवळ मुस्कटदाबी नाही तर डेमोक्रॅटिक मार्गानी हा प्रश्न सुटताना पहायचा आहे. आदिवासींची जमीन कारखानदारच काय पण सरकारही घेऊ शकत नाही या सुप्रीम काॅर्टाच्या निर्णय आहे.. आदिवासींना संविधानाने दिलेल्या स्वशासन व जमीनीचा हक्क अश्या अनेक गोष्टी आहेत पण कोणतही सरकार या गोष्टी मान्य करायला तयार नाहीत.




IMAGE SOURCE   INTERNET


    सोनी सोरी या महिलेची नक्षलवादाशी संबंधित कहाणी देखील तुम्ही गूगल वर serach करून पाहू शकता.
काही दिवसांपूर्वीच न्यूटन movie आला त्या picture ला अनेक पुरस्कार देखील मिळाले जरूर पहावा...
संघर्षाच्या अनुषंगाने तिथल्या आदिवासींचे कसे हाल होतात, हे खुबीनं दाखवलं आहे. चित्रपटाचा मुख्य हेतू हाच आहे. लष्कर आणि नक्षलींच्या लढ्यात मूळ आदिवासींना काय हवंय, याचा विचार कोणी करतंय का ? नक्षलप्रश्न खराच पण त्याच्या आड लपून, आदिवासींवर अन्याय करत भांडवलशाहीचं धन करणारी राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे का ? या सगळ्या अतिशय निराशाजनक परिस्थितीत एखादा प्रामाणिक अधिकारी त्रासदायक का होतो ? कर्तव्यपालन, प्रामाणिकपणा हे शब्द मागच्या पिढीतच निर्वतले का ? असे अनेक अनेक प्रश्न हा सिनेमा समोर ठेवतो. अस्वस्थ करतो.
एक फार छान संवाद आहे.

"क्या आप भी इनके जैसे निराशावादी है?"                   
"मैं तो आदिवासी हूं."




                                                                                                             IMAGE SOURCE   INTERNET


शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरात , आपल्याकडे का नको ...! नेत्यांच्या पोरांनी युवा नेता ,भाऊ , दादा , आमदार , डॉक्टर , इंजिनियर , मोठमोठे व्यवसायिक होत आहेत आणि आमच्या आदिवासी समाजाने नक्षलवादी व्हायचे हे मला पचत नाही. कदाचित शब्दांची मर्यादा ओलांडली असेल त्याबद्दल क्षमस्व...

1 टिप्पणी:

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************