कामगारांच्या घामाची किंमत.... किती खरी आणि किती खोटी.

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
🌱 वि४ 🌿 व्हॉट्सअप ग्रुप 
📄 आठवडा 26 वा 📝


कामगारांच्या घामाची किंमत.... किती खरी आणि किती खोटी.




पी.प्रशांतकुमार
अहमदनगर

   
पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर तरली नसून कष्टकरी श्रमकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे ..अण्णाभाऊ  साठे ..
..
मला वाटत ह्या एका वाक्यातच कामगारांच कामगार दिनाचं महत्व आलेलं आहे..
..
देशाच्या प्रगतीत कामगार वर्गाचं योगदान कुणीच नाकारू शकत नाही.तुमची प्रगती आणि तुमच्या देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरच स्थान हे तुमच्या देशातील किती कुशल आहेत यावरच अवलंबून आहे.
यात संघटित आणि असंघटित अशा दोन्हीही प्रकारचे कामगार आले..
..
भारतात कामगारांची स्थिती कशी आहे. कामगार हितासाठी कायदे किती आहेत. कमीतकमी वेतन किती असावं? आणि इतर
...
मला वाटत भारतातील कामगार हिताचे कायदे हे पहिल्या 30-40 देशांपैकी एक नक्की असतील .. after all we are very good at Law Making.. पण आपला प्रॉब्लेम implantation चा आहे.. आपल्याकडे एकतर कामगार कायद्याकडे कुणी गांभीर्याने पहात नाही किंवा त्या कायद्यांचा गैरफायदा घेतला जातो.
...
आपल्याकडे कामगारांच्या कष्टाकडे तेव्हडस गंभीर्याने पाहिलं जातं नाही..कामगार चळवळी दडपण्याकडेच आपला कल असतो आणि कामगारांच्या दुर्दैवाने बऱ्याच कामगार नेत्यांना 'मांडवली'करून स्वत:च्या तुंबड्या भरण्यात इंटरेस्ट असतो..
    ..
असंघटित क्षेत्रातले कामगार तर आजही वेठबिगारीच आयुष्य जगताहेत..पापी पेट का सवाल है म्हणत.आणि तेही पुरेसं आणि वेळेवर वेतन मिळेलच अस नाही हे माहिती असूनही..
...एक समाज म्हणून आपण दुटप्पी वागतो.. कामगारांच्या काष्टाचे गोडवे खूप गाणार पण शक्य तिथे पिळवणूकही करणार ..
..
निशिकांत देशपांडे म्हणून एका जेष्ट कवी मित्र आहे त्यांच्या कवितेतल्या काही ओळी..
दिन रात राबतो मी थकलोय त्रस्त आहे
भडकून भूक पोटी घालीत गस्त आहे
ना संघटन तयांचे वाली तया न कोणी
आपल्याच मायदेशी झाला परस्त आहे
विकण्यास घाम आहे कवडीत मोल त्याचे
अब्रू खरीदण्याला मंडी समस्त आहे
घेवून फास मेला चिठ्ठी खिशात होती
"
सारे महाग येथे मरणेच स्वस्त आहे."


श्रीनाथ कासे
द.सोलापूर  
आज 1 मे महाराष्ट्र दिन त्याबरोबर कामगार दिन. कामगार हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेत पीडित, शोषित, आणि वेतनासाठी वंचित असतो. कामगारांच्या घामाची किंमत त्याला मिळत नाही.कामगारांच्या अनेक चळवळी जगात उभारल्या गेल्या यामध्ये अनेक नावे तुमच्या परिचयाचे असतील. कार्ल मार्क्स यांनी आपल्या capital या ग्रंथात कामगारांविषयी अनेक मुद्दे मांडलेले आहेत यामध्ये कामगार म्हणजे कोण स्वरूप त्यांच्यावर होणारे अन्याय आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय इ. ची माहिती आढळते. मुळात भांडवलशाही अर्थव्यवस्थेत कामगारांचे पिळवणूक होते तेथे त्यांच्या घामाचे किंमत त्याला मिळणार नाही यामुळे मार्क्स समाजवादी विचार मांडलेले दिसतात. 'आहेरे' आणि 'नाहीरे' वर्ग याबद्दल ते म्हणतात की 'नाही रे' वर्गावर अन्याय आणि अत्याचार होते. महाराष्ट्रात अनेक कामगार चळवळी झाल्या त्याचे केंद्र हे मुंबई हेच राहिले त्यात सर्वात महत्वाचे नाव 'नारायण मेघाजी लोखंडे' हे होत. त्यांना कामगार चळवळीचे जनक असेसुद्धा म्हणले जाते. त्यांनी मुंबईत गिरणी कामगारांसाठी पहिली कामगार संघटना स्थापन केली. भारताचे पहिले मजूर मंत्री (1942-1946) डॉ.भीमराव आंबेडकर हे होते.त्यांनी तेव्हा कामगारांच्या अनेक फायद्याचे योजना आणि उपाय राबवले. मंत्री असताना त्यांनी सेवायोजन कार्यालय (emplyment एक्सचेंज) ची निर्मिती केले. पुढे 15 ऑगस्ट 1936 या दिवशी 'स्वतंत्र मजूर पक्ष' ची स्थापना केली. भारतीय संविधान कामगारांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी सक्षम केली गेली. यामध्ये कामगार कायदा -1926 , वेतन प्रदान कायदा -1936 , कारखाने कायदा -1948, किमान वेतन कायदा -1948, राज्य कामगार विमा कायदा -1948, खाण कायदा -1952, शेती-मळा लागवड कामगार कायदा -1951,  करार मजूर -1970, समान वेतन कायदा -1976 .इ. कायदे दिसतील.
अण्णां भाऊंनी लिहिलेली मुंबईची लावणीही  गाजली. मुंबईचं विविधांगी रूप, त्या शहरातली गरिबी आणि श्रीमंती यांच्यातली विसंगती त्यांनी त्यात टिपली आहे. उदाहरणार्थ,
मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी । कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।
परळात राहणारे । रातदिवस राबणारे ।
मिळेत ते खाउनी घाम गाळती ।।१।।
नारायण सुर्वे नावाचा श्रीमंतांची मुजोरी झुगारणारा नव्या दमाचा समर्थ कवी कामगारांवर लिहिताना म्हणतात
कामगार आहे मी तळपती तलवार आहे,
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे.
वर्तमान स्थितीत अंगणवाडी कर्मचारी, एस.टी कर्मचारीइमारत व इतर बांधकाम कामगार , कंत्राटी कामगार, मॉल्समध्ये स्वच्छता व देखभाल कर्मचारी हे सर्व वेतन वाढीसाठी प्रयत्नशील दिसून येतात.त्यांची स्थिती दयनीय आढळते सरकार त्यांच्या प्रगती आणि विकासासाठी प्रयत्नशील आहे.
डॉ. राहत इंदौरी आपल्या शायरी मध्ये कामगारांसाठी म्हणतात,
कट चुकी है उम्र सारी जिनकी पत्थर तोड्ते,
अब तो उन हाथोंमें कोहिनूर होना चाहिए !
यामधून आशय एवढाच की कामगारांना आपल्या घामाची किंमत मिळावी...

विश्वनाथ कदम जि.हिंगोली
       
प्रस्तुत विषयाचा विचार करत असताना विविध कामगार चळवळिंच इतिहास डोळ्यासमोर उभा रहातो. आर्थव्यवस्तेची एेतिहाशीक मिमंसा करताना सरंजामशाही,भांडवलशाही इत्यादी अर्थव्यवस्ता कालानुरूप विकास पावल्या परंतु कुठल्याही अर्थव्यवस्थेत कामगार आणि वेतन याविषयी समाधानकारक परिस्थीती दिसनार नाही.सरंमजान शाहीत सरंमजानदार हा जमिनचा मालक होता व तो कामगारास जमिन कसन्यास द्यायचा त्यामुळे या कालखंडात कामगारावर आन्याय व्हायचे,नंतरच्या काळात अौघ्योगीक क्रांती झाली आणि समाजात भांडवलशाही आस्तीवात आली,यात झाल येवच कि जे सरंमजार होते भांडवलदार झाले आणि जे जमिन कसनारे होते ते कामकार झाले,याच कालखंडास आहेरे आणि नाहीरे वर्ग म्हुनही समजले जाउू लागले.या काळात नाहीरे वर्ग पुर्न पने आहेरे वर्गावर आवसंबुन होता म्हनुच कि काय या काळात कामगार वर्गाच्या पिळवनुकिस सर्वेच्च बिंदू मिळाला .भांडवलदार वर्ग कामगाराचे मोठ्या प्रमानात शोशन करून मोठ्या प्रमानात नफा कमवायलालागले ,या वषयी अर्थशास्त्रात वेगवेगळे शिद्धांत आस्ती्त्वात आहेत. ह्या कामगारांच्या समस्या सोडवन्या साठी डॅा . बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री आसतांना बरेच कायदे केले .परंतु तेंव्हच काय पन आता सुदा कामगारांचे प्रशन सुटलेसे नाहीत.आजही भारतात आहेरे आणि नाहीरे वर्गाच ,किंवा आर्थीक विषमतेच आस्तीत्व आहे.आाजही भारतात कंट्राटी कामगार,ए.टी .चालक,आंगनवाडी सेवीका, कंपनीतील कामगार वर्ग हा आपले आस्तत्व टिकवन्यासाठी प्रर्यत्न करत आहेत .  
_____________________________________________________________________________________________

*शेकडो वेळा चंद्र आला .तारे फुललें रात्र धुंद झाली*
*
भाकरीचा चंद्र शोधन्यातच जिंदगी बर्बाद झाली*
   औद्योगिक शेत्रात कामं करणार्या जवळ जवळ सर्वच कामगारांची दयनीय अशी अवस्था आहे.
कापड गिरणी कामगार 105 फँरनहिट तापमानात 12 ते 14 तास कामं करतो . उष्ण अशा लूमशेड मधे कामं करण म्हणजे त्याच्यासाठी जिवंतपणे नरक आहे..एवढे करून सुधा त्याला मिळतात महीनाकाठी तीन हजार  ते पाँच हजार फक्त .
हाडाची काडी झाली रक्ताचे पाणी झाले ..अनेकांना त्वचेचे रोग झाले ..नाकात तोंडात बारीक तंतु जावुन श्वसनाचे असाद्य रोग होतात ..पण यांना काय मिळते फक्त दिवसाला 100 ते 150 रु .दहा ते पंधरा वर्षे काम करून सुधा नौकरीची हमी नाही .दहा ते पंधरा वर्षे कामं करून सुधा यांना टेंपररी ठेवले जाते .मालकशाहीला राजकिय आशीर्वाद असल्यानें व दोघे मिळून मलीदा लाटत असल्यानें कामगार मात्र आयुष्यभर कामं करूनही उपासीच .
   
यातून साखर कामगारही सुटलेलें नाहीत .....साखर कारखाने मुख्यत राजकीय पुढारी यांचेच ...शेतकऱ्यांन कडून शेअर्सरूपी पैसे गोळा करायचे ..कारखाने उभारायचे ....पैसा शेतंकर्यानचा , मालक मात्र राजकीय नेते होतात ......त्या कारखान्यात कामाला मुलें शेतकरी सभासद यांची. कामाला घेतांना तीन ते चार हजार रु पगार द्यायचा ...वर्षाला पाचशे ते हजार रु वाढ करने ...सहा महीने कामं बाकीचे दिवसमात्र ब्रेक दिला जातो ..आणि आठ ते नऊ वर्षे राबवायच मग हंगामी करने व नंतर आठ नऊ वर्षानें कायम करने ...कामाला लागल्यापासून जवळ वीसीक वर्षे बेभरवंशिकच.
मुलांचे शिक्षण ..लग्ने,दवाखानें याने अशरक्षापीळला जातो तो...काही काही ठिकाणी तर दोन ते तीन महीने पेमेन्ट न करने अशा प्रकारेही परीस्थीला सामोरे जावावे लागते .....काही बोलावे तर काढून टाकण्याची भिती ....
एकूणच काय की कामगार कुठलाही असो हाल अपेस्टा त्याच्या नशीबी येतेच
आज़ इंजीनियरीग व डिप्लोमा , आय टी आय कारणार्या तरुणाचीही खुप बेकार अवस्था आहे...कमी पैशात 12 तास ते 14 राबवलें जाते ...
कामंगारानच्या श्रमांची खोटी किमत मिळतेय .
________________________________________________________________________________________
 रामेश्वर रोकडे
उस्मानाबाद

कामगार हा शब्द उच्चारताच आपसुकच मनात विचार येतो तो म्हणजे भांडवलदार-कामगार, मालक-चाकर.एक प्रकारचे स्तर निर्माण होतात याचे कारण पाहीले तर थेट ब्रिटिश काळातील कामगारांच्या स्थिती तसेच सरंजामशाही,जमोनदार, हुकुमशाही याचा परिणाम मनाला स्पर्श करून जातो.कामगारांच्या जिवनात नेहमीच संघर्ष आला आहे.त्यात मग फक्टरी अक्ट ने कांही सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला.तसेच ब्रिटिश राजकारणातील मजूर पक्ष यांचे जीवन.भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामगारांच्या जिवनातील सुधारणा महत्त्वाचा ठरल्या.तसेच इंटक, आयटक यासारख्या संघटना कामगारांच्या हक्कासाठी प्रयत्न करतात.भारतातील सर्वात भयानक प्रश्न म्हणजे गिरणी कामगारांच्या व्यथा.स्वतंत्र भारतात देखील कामगारांच्या जिवनात म्हणाव्या तश्या सुधारणा दिसत नाहीत.कामगारांना नेहमीच एकत्र येऊ न देण्यासाठी शासन व मालक वर्ग प्रयत्नवत असतात त्याचाच भाग म्हणजे संघटित व अंसघटित कामगार, कुशल , अर्धकुशल, अकुशल, शासकीय,निमशासकिय, खाजगी  कामगार.तसेच महिला कामगार, पुरूष कामगार, बाल कामगार या प्रत्येकाच्या क्षेत्रात सुधारणा आहेत का? याचबरोबर महिलांविषयक सुरक्षितता,संरक्षण,आरोग्य विषय.सर्व कामगारांना दिली जाणारी वागणूक?बास बाजी? या सर्वांचे मूळ भ्रष्टाचार? शेती क्षेत्रातील कामगार?खाजगी कामगार?असे अनेक प्रश्न आजही सतावत आहेतच.....
_________________________________________________________________________________________

सिमालि भाटकर, रत्नागिरी

मी एक कष्टकरी
गाळतोय घाम करतोय सेवा,
पोटासाठी आता गुलामगिरीच पदरी पडली देवा,
खाल्या मिठाला मी नेहमीच जागतो, पण मिठाची किंमत वाढली,
अन माझं अस्तित्वच खुंटल,
राबराब राबायच तरी जनावरा पेक्षा कमीच माझी किंमत,
गुलामगिरीच्या राज्यात या, दोन घासांचीही नाही मिळकत,
ठेकेदार रोडावला, मालक अलिशान झाला, सरकारच्या सेवकांपाशी तर सोन्याच्या खाणी,
अन कष्टकऱ्यांच्या माथी मात्र रुपयांची नाणी, कोरड्या आभाळाची देणी,
कायद्याची साथ म्हणे रोजगारासाठी देईल हात,
कष्टांच्या मिळकतीवर कायदेही विकत घेतले,
कष्टकरी इथे मात्र आस लावून बसले,
महागाईच्या गर्तेत, ऋण फेडिता फेडिता अवघे जीवन संपले,
बेरोजगारीच्या दुनियेत इथे श्रीमंत श्रीमंत झाले,
अन गरिबीचे आकडे फक्त पुस्तकी कोरले,
दुनियेच्या बाजाराचे मार्ग असे हे वेगळे,
गुलामगिरीच्या विळख्यात कष्टकरी ऋणातच अडकुन पडले, ऋणातच अडकून पडले...
मी एक कष्टकरी
गाळतोय घाम करतोय सेवा,
पोटासाठी आता गुलामगिरीच पदरी पडली देवा,
खाल्या मिठाला मी नेहमीच जागतो, पण मिठाची किंमत वाढली,
अन माझं अस्तित्वच खुंटल,
राबराब राबायच तरी जनावरा पेक्षा कमीच माझी किंमत,
गुलामगिरीच्या राज्यात या, दोन घासांचीही नाही मिळकत,
ठेकेदार रोडावला, मालक अलिशान झाला, सरकारच्या सेवकांपाशी तर सोन्याच्या खाणी,
अन कष्टकऱ्यांच्या माथी मात्र रुपयांची नाणी, कोरड्या आभाळाची देणी,
कायद्याची साथ म्हणे रोजगारासाठी देईल हात,
कष्टांच्या मिळकतीवर कायदेही विकत घेतले,
कष्टकरी इथे मात्र आस लावून बसले,
महागाईच्या गर्तेत, ऋण फेडिता फेडिता अवघे जीवन संपले,
बेरोजगारीच्या दुनियेत इथे श्रीमंत श्रीमंत झाले,
अन गरिबीचे आकडे फक्त पुस्तकी कोरले,
दुनियेच्या बाजाराचे मार्ग असे हे वेगळे,
गुलामगिरीच्या विळख्यात कष्टकरी ऋणातच अडकुन पडले, ऋणातच अडकून पडले...
_________________________________________________________________________________________
       
पूनम देशमुख,अकोला.
    सध्याच्या काळात समाजातील दोन वर्गाच्या लोंकापुढे कठीण व गहन विचार करण्यास भाग पडलेला प्रश्न म्हणजे शेतकरी म्हणत आहे ,कोणासाठी पिकवत आहे मी आणी कामगार म्हणत आहे,कोणासाठी मी गाळतोय घाम?
      'मी कोणासाठी पिकवतोय किंवा घाम गाळतोयं”, हे प्रश्न शेतकरी व कामगारालाही कधीच  पडता कामा नये.देशात जर सन्मानजनक किमान-वेतनदेणारी व्यवस्था असेल तसेच कंपनीसोबत कामगारांचीही आर्थिक प्रगती करणारी न्याय-व्यवस्थाअसेल  तर मुळातूनच हा प्रश्नांची सोडवणूक होवू शकेल.पण त्यासाठी कामगार वर्गात राजकीय-जागृतीपाहिजे व त्यासाठी वाटेल ती किंमत चुकवायला त्यांनी तयार असायला पाहिजे . कोणत्याही  परिस्थितीत या धोरणात तडजोडकामगारांकडून होता कामा नये, तरचं काही व्यवस्था-बदलशक्य आहे.
      
विज्ञानाच्या प्रगतीने नविन यंत्रांच्या शोधाने उत्पादन क्षमता कित्येक वाढली पण कामगारांच्या अस्तित्व धोक्यात आले.ऊन- पावसाचे वार झेलत रात्री- अपरात्रीही कष्टाशी इमान राखत झुंजणाऱ्या ऊसतोड मजुरांना पुरेशी मजुरीही मिळत नाही. ऊसतोडणीसाठी विकसीत झालेल्या हार्व्हेस्टरला टनामागे पाचशे रुपये मोजले जातात;परंतु हेच काम मजुरांनी केले तर हातावर केवळ १९० रुपये देवून त्यांची कुंचबणा केली जाते. त्यामुळे कामगारांच्या आर्थिक उन्नतेची चाके अनेक वर्षांपासून फडातच रुतलेली आहेत.संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभा केला तर आवाज बुलंद होईल अन् मजुरांची फरफटही होणार नाही.(संदर्भ-सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************