मला सुचलेली लघुकथा


रौप्य महोत्सवी आठवडा
मला सुचलेली लघुकथा



यावर,

१.सौदागर काळे,पंढरपूर

२.संगीता देशमुख वसमत जि. हिंगोली

३.यशवंती होनमाने,मोहोळ

४.पी.प्रशातकुमार,अहमदनगर

५.किरण पवार,औरंगाबाद

६.जयंत जाधव,लातूर

७.अनिल गोडबोले,सोलापूर

८.निकिता गडाख,अहमदनगर


यांची मते



सौदागर काळे,पंढरपूर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

....मग आपलं गाव कोणतं?

आई त्या चांदण्या खाली कधी येतात का ग!त्या इतक्या जवळ का राहतात .तरीही बघ ना!थटतच नाहीत एकमेकांना.अन दिवसा एकट्या सूर्याला भिऊन कुठं लपतात.माहीत आहे का तुला?"नाही माहीत,झोप आता . उद्या सांगेन."
आज मला सांगिल्याशिवाय नाही झोपणार.आमच्या शाळेतील बाई म्हणाल्या तो चांदोबा ना,आपला मामा असतो.खरं आहे का हे. तू बोलत का नाही.उठ उठ आभाळात बघ,ती चांदणी पडली बघ.
जाऊ दे, तू बघेपर्यंत विझली.आई ती देवाघरी गेलेली माणसं म्हणे आभाळात जातात,खरं आहे का?त्यात आपले बाबापण आहेत ना!"आता तू झोप नाहीतर खूप मारेन माकडा.तुला सांगितलं ना, उद्या सांगेन"
हे असं रोजचं चाललेलं असतं.मी हतबल आहे.हा काहीही प्रश्न करतो.मला उद्याची चिंता.तर याला जग जाणून घेण्याची धडपड.पटांगणात आभाळाकडे बघत झोपला की त्याच्या अंगात खगोलशास्त्रज्ञ  शिरतो.

आता तो पहिलीच्या वर्गात आहे.बाई वर्गात बाराखडी शिकवत होत्या.बाई म्हणाल्या,"अ अ अननसाचा,आआ आईचा,......." घरी आला मला म्हणाला, अननस म्हणजे काय?तो कोठे असतो?मला तो हवा आहे? आता त्याला कसं समजावं तो बाराखडी शिकण्यासाठी आहे, आपल्यासारख्याना खाण्यासाठी नाही.

गावात सप्ताहानिमित्त देवळात कीर्तन होतं. कीर्तनकार संत तुकारामांचा अभंग सांगत
होते,"आम्ही जातो आपुल्या गावा| आमचा राम राम घ्यावा||" आई हे तुकाराम कोण?राम का घ्यावा?ते कोणत्या गावाला गेले?मग आपलं गाव कोणतं?...शांत मी.

एका पाहुण्याने लाडाने याला 10 ची नोट दिली.नोट बघत बघत म्हणाला, हा आजोबा कोण?टकल आहे, माझ्यासारखे केस नाहीत.अन आमच्या शाळेच्या भिंतीवर तर
काठी घेऊन का चाललेले दिसतात?....आता याला कसं समजावं याच्याच काठीचा देशाला टेकू आहे.

किती सहज आणि सोपे प्रश्न आहेत याचे. तरीही मला देता येत नाहीत.इतके अवघड आहेत का उत्तरे!येणाऱ्या काळावर ढकलत असते मी.उद्या हा मोठा होईल तेव्हा याला आभाळतल्या चांदण्या पुस्तकात सापडतील,चांदोमामा चंद्र होईल,ती विझलेली चांदणी नसून धूमकेतू होता हे समजेल,बाराखडी समजून घेईन पण जगणार नाही,तुकाराम विद्रोही होता हे समजेल.नोटेवरचा आजोबा देशात विकल्याशिवाय खरेदी-विक्री होणार नाही हे समजेल.तेव्हा तो फक्त महात्मा गांधी नसून ती आपली काठी आहे हे पण त्याला समजलेले असेल.

पण त्याच्या एका प्रश्नाचे उत्तर मी,पुस्तक,समाज आणि येणारा काळ लवकर देणार नाही.म्हणून तो भटकत राहील..शोधत राहील...जगत राहील...विचारत राहील ..मग आपलं गाव कोणतं?
_________________________________________________________________________________


संगीता देशमुख वसमत जि. हिंगोली
ती जन्मली....शिकलीसवरली..... बाई म्हणून घडली.....  आणि "बाई"पणाच्या कळा आयुष्यभर भोगत राहिली.

_________________________________________________________________________________

आम्बा रंगाची साडी,....
तीच आणी त्याच ब्रेकअप झाल्यापासून ती हळवी झाली होती.कशात तीच मन लागत न्हवत.तशी दिसायला नाकी डोळे छान होती फक्त थोडीशी तब्येत जास्त होती.ती साडी मध्ये खुप छान दिसते अस तो नेहमीच म्हणायचा.तीला खुप छान वाटायच.पण .......त्यांचा घस्फोस्ट झाला आणि सगळंच समाप्त झालय अस तीला vatatayala लागल.सणवार आले की हौसेन नटून तयार होणारी ती आज साधसूध तयार होईना.असच एक दिवस तिच्या मैत्रीण च लग्न ठरले असा तीला निरोप मिळाला.घस्फोस्ट झाल्यापासून तिने बाहेर कार्यक्रम ला जाणे सोडले होते पण आत्ता काही कारण सांगून उपयोग झाला नसता .कारण लग्न जवळच्याच मैत्रिणी च होत आणि तिच्या लग्नाला त्यांच्या कॉलेज चे सगळे फ्रेंड्स येणार होते.हिने पण मनाची तयारी केली आणि लग्नाला जायचे ठरवले.
आणि लग्नाचा दिवस उजाडला.हिने मस्तपैकी आम्बा रंगाची पैठणी नेसली.आधी जशी छानपैकी तयार होत होती तशीच आज पण तयार झाली होती.नथ ,चंद्रकोर टिकली ,लिपस्टीक ,कानात मोठे झूम्के ,हातात हिरव्या बांगड्या असा मेकअप करून गेली लग्नाला.सगळे बघतच राहिले तिच्याकडे.खुप दिवसांनी तीला स्वतःला पण छान वाटत होत.ती मांडवात गेली,मैत्रिणी ला भेटली ,त्यांच्या सगळ्या ग्रूप ला पण भेटली.सगळे गप्पा मारत असताना कोणीतरी हळूच तिच्या कानात बोलले की खुप सुंदर दिसतेस या आम्बा रंगाच्या साडी मध्ये......आणि ती नखशिखांत मोहरून गेली....
त्या दिवसापासून ती साडी तीला खूपच आवडायला लागली .....
यशवंती  होनमाने.
मोहोळ
_______________________________________________________________________

व्यथा....

दोन-तिन बहिणी आणि एकच भाऊ .. आणि तोही मतिमंद ..  4-6 महिन्यांपूर्वी आई वारली .. काय करू प्रशांत तुच सांग .. कुणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही .. बहिणी विषय टाळतात..  आई गेली तेव्हा पाहुण्यासारख्या आल्या आणि 2 दिवसात गेल्या.. चार महीने भाऊ माझ्याकडे आहे .. मी आईसारखी सेवा नाही करू शकत रे.. त्यात इन मिन अडीच रुमचा फ्लाट दोन मुल कस संभाळू सगळं?
.. काहीच समजत नाही रे त्याला.. रोज पन्नास पोळ्या करते तरीही 5 वेगळ्या लपवून ठेवाव्या लागतात .. हा जेवायला बसला की डबा संपेस्तोवर जेवतच राहील आणि मधे दोन दोन दिवस हात लावणार नाही अन्नाला .. मला समजत नाही किती आणि कसा स्वयंपाक करायचा.. रोज नवऱ्याला लपवून वाया तरी कस घालायच.. नवरा बायको काही पर्सनल बोलत बसलो तर हा चार वेळा मधे येणार ... नवरा तसा चांगलाय माझा.. अजून काही बोलला नाही पण त्याच्या चेहरयावरचे नाराजीचे भाव सांगतात रे सर्व .. मग मी तरी कडेलोट व्हायची वाट कशी पाहू ?
.  .. एका बहिणीच घर मोठ आहे गावी 5-6 खोल्या ..शेतीवाडी..तिला म्हटल की भावाला तुझ्याकडे याव वाटतय तर म्हणाली..की मग तू पण ये ना सुट्टीला 4 दिवस म्हणजे  तुला पण चार दिवस आराम मिळेल आणि त्याच्यापण यायचा जायचा प्रश्न नाही येणार ( तुझ्याबरोबरच येईल आणि तुझ्याबरोबरच जाईल ).. आत्ताशी 37-38 वर्षांचा आहे रे तो म्हणजे अजुन 20-25 वर्ष नक्की जगेन.. त्याच्या मरणाची वाट पहातेय जणू मी? .. पण मी काय करू रे .. नवरा कसाय माझा तुला माहीत आहे ..नशीब अजुन शांत आहे .. मी थकलेय रे या सगळ्यांना प्रशांत तुच सांग मी काय करु? सोडव यातून .. बोर्डिंग सारखा ऑप्शन नको वाटतो .. लोक म्हणतील आई जावून वर्षपण नाही झाल अजुन ..कधी ना जीव द्यावा वाटतो या सगळ्यापेक्षा ...
... आता मी तरी काय सांगू तिला .. मी ही एव्हडा हुशार नाहीये... God knows …

पी.प्रशातकुमार
अहमदनगर

_______________________________________________________________________
जेलमधून तिच पत्र आल. का? का सुरू केला मी अशा अनोळखी खूनीबरोबर पत्रव्यवहार? मीही तसा एक खूनीच ना! मग अडचण काय तिच्याशी सलोखा साधण्यात? अडचण नाही पण आता मनाची फार घुसमट होऊ लागली आहे. आज ना उद्या एकतर ती अथवा मी पण दोघांपैकी एक किंवा दोघेही सुळावर जाणार हे निश्चित. फाशीची शिक्षा तिची कदाचित कमी केल्या जाईल. मग मी मेल्यावर ती खुशालीच पत्र कोणाला लिहीणार? जवळपास  सात-आठ वर्षे तुरूंगात एकटीनेच घालवल्यानंतर कुठे योगायोगाने तिला एक मित्र भेटला होती. आणि माझंही काहीसं तसंच पण मी गेली सोळा वर्षे या लोखंडी गजांच्या आड आहे. तिच नाव होतं- कल्पना. आणि मी माझा परिचय करून देतो. माझ नाव आयुष.
                ती ज्या खुनाच्या आरोपाखाली गजाआड झाली त्यात मला तरी तिची फारशी काही चूक वाटत नव्हती. पण आपल्या हातून नकळतं का होईना गुन्हा झालाय, याची सल मात्र तिच्या मनात कायमची ठसून गेली होती. माझं काय? मी तर गुन्हा ठरवून केला होता. त्यामुळे माझ्या मनात हुरहूर वगैरे असं काही नव्हतं. पण पंधरा वर्षांच एकटेपण माझ्या मनाला पुरतच पोखरत चालल होतं. आणि अशात कितीतरी मैल दूर अंतरावरून एक पत्र आलं. ते पत्र कुणासाठी नावाने आल नव्हतं पण इथल्या कैद्यांपैकी ते कुणीच न स्विकारल्यामुळे मी ते घ्यायच ठरवलं. मिळालंही. उघडल आणि वाचायला सुरुवात केली.
............
                तुम्ही जी कोणी व्यक्ती हे पत्र वाचत असाल, एक विनंती करते; या पत्राच उत्तर जरूर कळवा. मी आतुरतेनं वाट पाहते आहे. अनोळखी व्यक्ती आहात; म्हणून मायना तसाच कोरा ठेवला. माझ नाव कल्पना. मी इकडे गोवा कारागृहात असते. माझ्या हातून खून झाला त्याला आता बरीच वर्षे ऊलटून गेली. असो. पण मी आज खूप एकाकी पडले आहे. मला एकटीच जगणं नकोस झालंय. आयुष्याची इतकी मौल्यवान वर्षे वायाला गेली; ही खंत स्वतःला अस्वस्थ करते आहे. असं वाटतं अजूनही की, आयुष्य अजून भरपूर बाकी आहे तर इतक्यात हार का माना? पण एकांतात काहीच सहणं होत नाही. तुमच्यासोबत असं काही घडलंय का? मी खूप विचीत्र मनस्थितीत आहे. मला काही मदत कराल....?
                 आपली स्नेहांकित ......................


              पत्र वाचून मी चाट पडलो. असं असतं का..? हो असच असतं आणि हे प्रत्येक कैद्याबरोबर घडू शकतं. पत्र वाचून मला माझी काही वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली. क्षणभर आठवणी डोळ्यातून अश्रूंच्या स्वरूपात वाहून गेल्या. कारण काही वर्षांपूर्वी माझ मीच स्वतःला सावरलं होतं. आता एखाद्या अनोळखी मुलीला/ स्त्रीला दिलासा देणं आणि महत्वांच म्हणजे तिच्या मनात जगण्यासाठी कारण निर्माण करणं तेही एकटेपण बाजूला सारून हे माझ्यासाठी एक आव्हान होतं. आणि माझ्या आयुष्यात आजवर मला पडलेला सर्वात मोठा कठीण प्रश्नही हाच होता.

( ही लघुकथा मला प्रसिद्ध लेखिका गिरीजा कीर यांच जन्मठेप हे पुस्तक वाचल्यानंतर सुचली आहे. काही चुकल असल्यास मी क्षमस्वी आहे.)
किरण पवार
औरंगाबाद

_______________________________________________________________________ 


           दुपारची वेळ.हळूहळू सुर्य महाराज संध्याराणीची भेट घेण्यासाठी एक एक पाऊल सावकाश टाकणे चालू होते .तीन वाजता सुजल शाळेतून घरी परत आला.सकाळी त्याच्या वडिलांनी सुजल टि.व्ही.चे रिमोट तोडल्याबद्दल खूप रागावले.सुजल खूप रडला.अशावेळी घरातील फिश टँकमधील मासे हेच त्याचे सोबती. सुजल हा त्यांचेशी गप्पा मारायचा.रडत रडत सुजल माशांना म्हणाला तुम्ही किती सुखी आहात.ना कोणी रागावणारंं   ना कोणी हुकूम गाजवणारे.अचानक फिश टँकमधील मासा सुजलला म्हणाला,तू रडताना तुझे अश्रू तरी दिसतात ते पाहून आई तुला समजवाते,तुझा राग घालविण्याचे प्रयत्न करते.जगात एकमेव दुःखी प्राणी आम्ही मासे आहोत कारण आमच्या डोळ्यांतून निघणारे अश्रू कोणालाच दिसत नाही?आम्ही कुणाला तक्रार करणार.त्यामुळं आहे त्यात आनंदी राहायला शिक....!

जयंत जाधव,लातूर.
_____________________________________________________________________________

"साहेब तुम्ही सांगा फक्त मी जेवढं जमेल तेवढा प्रयत्न करते" अस तोडक मोडक मराठी बोलत होती ती.
मला कन्नड भाषा येत नव्हती आणि तिने उभ्या आयुष्यात मराठी बोलली नव्हती.

नवरा एड्स च्या आजाराने गेला होता.. पोटात 3 महिन्याचं बाळ होत... सासरच्यांनी घराबाहेर काढलेली... भावाने घरात न घेतलेली...तिच्या जन्म दिलेल्या आई ने "वस्तीवरच्या घरात" जागा दिलेली... त्यात TB ची लक्षण दिसत होती... गोळ्या सुरू होत्या..

आणि मी शिकलेला सोशल वर्कर... हिला काय सांगायचं ते पुस्तकी पाठ केलेलं... गोळ्या बद्दल आणि काळजी घेण्यासाठी समुपदेशन करणारा...

पण भाषा अडचण... एक मराठी तुन कन्नड भाषांतर करणारी सिस्टर.. अस सगळं चालू असताना... पगार मिळत असून हतबल झालेला..

पहिल्यांदा कळलं की परिस्थती आणि अनुभव सारखा गुरू नाही..

आता..

परवा भेटलेली तीच... उत्तम मराठी... मुलगा पहिली मध्ये...उत्तम आरोग्य.. त्याला HIV ची लागण नाही..वेळेवर गोळ्या घेऊन आरोग्य ठेवलेली..

दिराने अर्धा हिस्सा काढून ठेवलेला... ही भावाच्या घरात... माहेरी एका बचत गटाची अध्यक्ष...

मी अजून सोशल वर्करच !!!!

बाई आणि त्या पेक्षा एक आई काहीपण करू शकते

अनिल गोडबोले
सोलापूर
_______________________________________________________________________

सकाळचे पाऊन सहा -सहा दरम्यानची वेळ,
सूर्यही हळू हळू डोके वर काढतोय.
त्याची किरणे आकाशाला भेदून वर येत आहेत
सफाई कामगारांचे सफसफाईचे काम चालू
त्याच रस्त्यावरून एक तरुणी कानात हेडफोन घालून जॉगिंगला जातिये .
तिच्या हातात तिरंग्याचा बँड आहे ,
त्या रस्त्याच्याच एका बाजूला गांधीजींचे स्मारक आहे त्या स्मारका जवळच एक असह्य,शरीराने कृंश असलेला,अंग धुळीत माखलेले,केसांच्या जटा तयार झालेल्या,कपड्याच्या चिंध्या चिंध्या झालेल्या। अंगावर छिद्र पडलेली शाल घेऊन,अंगची मेटी-कुटी करून तो माणूस झोपलेला।
त्या तरुणीच रोजच तिथल्या लोकांकडे लक्ष्य असे, अश्या वेळेस तो उठून बसलेला असे पण आज तो काही उठत नव्हता। झाडून घेणाऱ्या मावशी ही त्या ला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो उठला नाही मग बऱ्याच लोकांनी तिथे गर्दी केली व कळेल की तो मृत घोषित केले, त्याचे प्रथिरव नेमकी कुणाकडे देयचे हा प्रश्न उभा राहिला, मग त्याच्या जवळ असणाऱ्या सामानाची आणि त्याची तपासणी केली असता त्याच्या गळ्यामध्ये जिजस चे लॉकेट होते मग खिर्षचन धर्मगुरुणा बोलावले. ते आले त्यांनी त्याच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ बघितली ते चटकन उठले आणि म्हंटले हा तर हिंदु आहे।
माणसांनी अजून बघितले असता कळले की हा तर शीख आहे, त्यांच्या त्यांच्या मध्ये वादविवाद सुरू झाले हा आमचा नाही तुमचा आहे..तेवढ्यात तिथे पोलीस ची व्हॅन आली त्यांनी त्या प्रथिरवा ला सॅल्युट केले व्हॅन मध्ये घेतले कारण तो माणूस एक देशसेवक होता, गुप्तहेर पोलीस। सगळी लोक आप आपल्या कामाला निगुन गेली पण ती मुलगी जरा वेळ थाम्बली आणि विचारत पडली,माणसातील माणूस पण हरवलंय की जाती धर्माच्या पलीकडे माणसाला विचारच करायचा नाहीय।

निकिता अशोक गडाख
अहमदनगर
_______________________________________________________________________ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************