🌱वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप
📄आठवडा 27 वा📝
05 मे ते 12 मे 2018
📄आठवडा 27 वा📝
05 मे ते 12 मे 2018
आसाराम, रामरहीम सारखे अनेक बाबा... नेमकं काय चालवतात... मठ की शोषण?
रामेश्वर रोकडे,उस्मानाबाद.
भारत ही भूमी श्रद्धेची,संकृतीवर विश्वास ठेवणारी,परंपरा जपणारी,देव-धर्म स्वातंत्र्याची आहे.इथ निसर्गाचीही पुजा काली जाते कारण देश हा कृषीप्रधान आहे.भारतात या श्रद्धेलाच भिती व लोभाच रूप देऊन असे बाबा आपली पोळी भाजत आहेत.यातच पुराणकथांचा,अशिक्षित पणाचा फायदा घेऊन गरळ घालत आहेत.कांहीजण सामाजिक सेवाही उत्तम प्रकारे करतात परंतु भोंदुचा बाजारी दिखाऊपणा,प्रसिद्धी,लोभसपणा याला आपले समाजबांधव विशेषतः महिलावर्ग बळी पडताना दिसतो.त्यांचाच प्रभाव वाढताना दिसातो आहे.मोठी अडचण म्हणजे यात एकदा अडकला की मनात येऊन,समजूनही बाहेर पडण कठीण होतं.मुळात हे घडतच अस की विज्ञानवादी युगात असुन देखील,श्रद्धा -अंधश्रद्धा याची जाण असुन देखील अश्या बाबांच्या वाक् चातुर्याने व बगल बच्छ्यांमुळे भावनिक गरळ घालून अडकवल जात.त्यातच दुसरा व महत्त्वाचा भाग म्हणजे मानवाने प्रगती साठी विज्ञानाची कास धरली परंतु स्वतःच्या सुखासाठी भौतिक गोष्टी मिळविण्यासाठी हव्यास मात्र लाचार बनवत गेला.त्यातच जिवनपद्धतीत चालले बदल, व्यसनाधिनता,नोकरीसाठी दूर राहणे,विभक्त कुटुंब पद्धती,एकलकोंडेपणा,आहाराच्या सवयी, धावपळीचे जिवन यामुळे शारीरिक कमजोरी वाढत आहे.तसेच कुटुंबातील,मित्रपरिवारातील,आप्तेष्टांतील संवाद कमी झाल्यामुळे मानसिक कमजोरीपण वाढत चाललेली आहे.याचाच परिणाम काय माणूस असे बाबा बुवांचे सल्ले घेत आहे.बाबा याचाच फायदा घेऊन आर्थिक,शारीरिक,मानसिक शोषण करत आहेत.फक्त स्त्री वर्गच याला बळी पडत आहे असे नाही तर समाजातील सर्वच स्तरातील लोक याला बळी पडताना दिसत आहेत.यामध्ये वासनांध बाबा लैंगिक शोषणामध्ये छळवणूक करत आहेत.बालक-बालीका, स्त्री -पुरूष याचे शिकार होत आहेत.बाबांच्या या मगरूरीला शिकार झालेलेच लोक भिती पोटी साथ देत आहेत.आज कांही बाबा सापडलेत ते शोषणाच्या अती कृत्यामुळेच.असे किती बाबा अजून आपले व्यवसाय चालवत आहेत की जे गुन्हेगार ठरले नाहीत पण ते आजही आपला बाजार मांडून आहेत.याला सर्वस्वी जबाबदार आपणच आहोत.आशा गोष्टी निमुटपणे सहन करतो,बघुनही आवाज उठऊ शकत नाही,त्यांच्या कृत्यात अडकत जातो,धनाने त्यांना मोठे करतोत.या सर्व प्रवृत्ती थांबवण्यासाठी मनान न खचता उघड्या डोळ्यांनी वावरून, लाचारी न पत्करता आवाज उठविण्याचे,तसेच बाबांच्या कारस्थानांच विचार करून निषेध करण्यासाठी मनाने,शरीराने न खचता धैर्य दाखवीले पाहिजे.
नरेश बदनाळे ,लातूर
चंदनम शितलम लोके चंदनादपि चंद्रमा ।
चन्द्र चंदनर्योमध्ये शीतला साधू संगती ।।
या जगात चंदन सर्वात शीतल मानले जाते पण चंद्र हा चंदनापेक्षा शीतल आहे तसेच चंद्र आणि चंदनापेक्षा हि साधू ,सज्जनाची संगत हि सर्वात शीतल असते असे कोणीतरी म्हटले आहे पण खरंच हे संत साधू बाबालोक ह्या लायकीचे आहेत का हो ? संत म्हणजे काय ? मठ, मठाधीश म्हणजे काय हे माहित नाही पण मठाधीश आहेत संत कोणाला म्हणावे स्वतःला देव मानून स्वतःची पूजा करायला लावणाऱ्या आसाराम ला कि राम आणि रहीम दोघांचाहि अवतार मानणाऱ्या रामरहिमला कि नारी शक्तीची प्रतीक म्हणून स्वतःला देवी म्हणून घेणाऱ्या अंबे माँ ला यांना संत म्हणावं..? आपलया थोड्याश्या अन्नातून उपाशी राहणऱ्याला एक हिस्सा देणाऱ्याला संत नाही का म्हणता येणार ? कित्येक रोगिंची सेवा निशुल्क करणार्यांना संत नाही का म्हणता येत पण त्याची कोणी दखल सुद्धा नाही घेत कारण ते समाज दृष्टिकोनातू वेडे आहेत. चांगले पणाचा आव आणणारे हे ढोंगी बाबा लोकांची हे दखल घेतील त्यांच्या पायावर नतमस्तक होतील आणि त्यांच्या तिजोरीची क्षमता अजून वाढवतील पण तिथे त्यांचा हा अंधश्रद्धेतला देव सतसंगत आणि विसंगत यांच्यातला फरकच त्यांना कळू देत नाहीत देशाची २५% आर्थिक मॅकमत्ता हि अशा बाबा,दीदी, माता,यांच्या घशात आहे जी आपणच त्यांना देतोय हे सर्व दिसुनही आपले डोळे मात्र उघडणार नाहीत आपला बाबा हा आपलयासाठी ईश्वरस्थानी आहे . का आपण आपलया घामाची कष्टाची रक्ताची कमाई किंवा वरची कमाई असेल तरी आपणं का एखाद्याच्या चरणावर देव म्हणून ठेवतो ? त्यामुळे भवीष्यामध्ये आपलयावरच वाईट वेळ येणार आहे पण वाईट वेळ आली तरी चालेल पण आपल्या बाबाला काही नाही झालं पाहिजे हि मनस्थिती काही बदलणार नाही पण भारताची पारंपरिक धार्मिक संस्कृती सुद्धा अशा लोकांमुळे ढासाळत चालली आहे आणि आपण जात आहोत त्याच बाबा लोकांच्या समर्थनात गाड्या जाळत काचं फोडत कारण आपलया डोळ्यावर आहे ती अंधश्रद्धेची पट्टी आपण तिला बाजूला सारून पाहायला तयारच नाही ना आणि तिथेच आपण कमी पडत आहोत दोन म्हणले म्हणून कोणी संत साधू महात्मा होत नाही आपलयाकर्मात आपलया कर्तृत्वात आपला देव आपली श्रद्द्धा शोधायला शिका मग तुमचा बाबा ,तुमचे महाराज, तुमची माता यांची तुम्हाला लागणार नाही पण हेच केव्हा होईल काय माहिती पण तो पर्यंत तर हे दुष्टकर्मी लोक स्वार्थ साधून निघत आहेत आणि आपल्या मुळे मोठे होत आहेत पण याचा परिणाम आपलया देशाच्या अध्यात्मिकतेवर आणि आर्थिक बाबींवर होत आहे आणि ते आपलया घातलेलया चुकीच्या चष्म्यामुळे होत आहे आपण आपल्या डोळ्यावरील चुकीचा चष्मा जेव्हा काढू तेव्हा आपणच आपलया देश हिताचे भागीदारी बनू शकतो नाही तर आपलया एवढी दुर्दशा कोणाचीच नसेल कारण ते मठ चालवतात का शोषण म्हणलं तर ते मठाच्या आड शोषण चालवतात पण ते चालवायला आपणचं त्यांना दुजोरा देतोय आणि गुन्हा करणाऱ्या पेक्षा जास्त त्याच्यात त्याची मदत करणारा दोषी असतो आणि त्याची मदत करतो ते आपणच मग दोषी कोण आपणच !
आज देशाला मठाची गरज नाही तर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनालयाची गरज आहे, गरज आहे ती बाल संस्कार केंद्रांची, आज गरज आहे ती व्यसनी होत चाललेलया पिढीला वाचवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांची, एक क्रांती घडवण्याची विचारातून एकता दाखवण्याची कोण कोण पुढे येणार...?
भारत देशामध्ये दर तीन व्यक्ती पैकी एक मानसिक अनारोग्याचा शिकार होतो. हे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे खरे वाटते जेंव्हा या तोतया भोंदु लबाड बदफैली बाबांना लोक देव मानायला लागताता. अंध भक्तीच्या रोज नविन परिसीमा बघायला मिळतात. यावर उपाय एकच.... चांगले खरे शिक्षण !! शिरीष उमरे
उत्तर द्याहटवा