विकासात्मक राजकारणासाठी काय करावे लागेल ?

विकासात्मक राजकारणासाठी काय करावे लागेल ?

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

विकासात्मक राजकारणासाठी काय करावे लागेल ?


Source:- INTERNET

-किरण पवार,
औरंगाबाद
जेव्हा आजकालचे सुशीक्षित तरूण मुल मी पाहतो तेव्हा हमखास एक चित्र पहायला मिळतं. ते म्हणजे, ही मुलं म्हणतात *सिस्टीमचा भाग व्हाव लागतं* (अर्थात भ्रष्टाचार करावा लागतोच ) अन्यथा जगण मुश्कील होतं. पण मग सत्य आणि न्यायासाठी आम्ही किंवा या देशान मागणी कुणाकडे म्हणून करायची? प्रत्येक अन्यायाच्या ठिकाणी आमचा तरुण गप्पच असतो. फक्त एखाद-दुसरं मोठ प्रकरण कुठे नजरेस पडलं की निघालो आम्ही रस्त्यांवर मोर्चे काढायला, त्यापेक्षा टमाटे फेकायला, लाखो लिटर दूध रस्त्यांवर ओतायला आणि बसेस फोडायला. *जर तरूणाने आज प्रत्येक छोट्याछोट्या गोष्टीचा जाब योग्य वेळी सरकारला विचारला असता तर कधी गरजच नसती पडली अशा मोर्च्यांची.* पण आमच्या सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या तरुणाकडे ती दुरदृष्टीच नाही.
जे झाल ते काल. पण आज आणि उद्या काय? हा विचार प्रत्येकानच करण गरजेच आहे. *प्रत्येक वेळी सरकारला दोष देताना जरा स्वत: कोणत्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आपण? हा प्रश्न स्वत:ला विचारा.* सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, विकासात्मक राजकारणासाठी तरुण सुशिक्षितांनी पुढे यावं. आपण दरवेळी फक्त भाषणांमधून हेच ऐकत आलोय; की तरुण नेतृत्व देशाला घडवू शकतं. *पण प्रत्यक्षात मात्र आजवर तरी एखादा इंजीनीअर मला राजकारणात आलेला पहायला मिळत नाही.* जरी एखादा असला तरी आकडा नगण्यच. आणखी महत्वाची बाब सांगायचीच म्हटलं तर तुमचा *causal approach* ( गोष्टीच गांभीर्य लक्षात न घेणं ) हा विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करतो.........
एम.पी.एस.सी. सारख्या इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरूणांनी जर ठरवलं तर विकासाच राजकारण ते सहज स्वबळावर निर्माण करू शकतात. कारण त्यांच्याकडे एखाद्या *राजकीय नेत्यापेक्षाही जास्त ज्ञान असतं.* पण हीच पोर जेव्हा *सहजरीत्या बोलून जातात ना की, ते आपल काम नाही.* तेव्हा मात्र वाईट वाटतं. मी असं अजिबात म्हणतं नाही की, ठरावीक क्षेत्राशीच निगडीत असलेले राजकारणात या पण किमान आता प्रयत्न करायला तर सुरुवात करा ना. एकविसव्या सदीचे नव्याचे नऊ दिवस संपले आता. *हीच वेळ आहे. पुन्हा संधीही नसेल अन् बदलाची अपेक्षादेखील.*
( काही चुकीच वाटलं तर क्षमस्व )



Source:- INTERNET

-अभिजीत गोडसे ,
 सातारा
खर तर राजकारण हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. रोजच आपला राजकारणाशी प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष संबंध येत असतो. कोणत्याही विषयावरील चर्च्या नंतर शेवट हा राजकारणा वरतीच येऊन थांबतो ! आपल्या देशात जर सहा महीण्याला कोणती ना कोणती निवडणूक असेतेच असते . छोट्या - मोठ्या राजकीय पक्षांचे उदंड पिक आपल्याकडे आहे. यांच्या जोडीला चळवळी , संघटना आहेतच. याचाच परिपाक म्हणून राजकारण हाच एक केंद्र बिंदू माणला तर काही वावगे ठरणार नाही . पण प्रश्न राहतो विकासात्मक राजकारणाचा. सत्तेवर कोणताही पक्ष असो . सरकारी धोरणाचा शेवटच्या माणसाला जर फायदा होत नसेल तर नक्कीच संबंधित सरकार किंवा पक्ष विकासात्मक राजकारणापासून आणि चांगल्या धोरणापासून लांब आहे असे म्हणायला काहीच हरकत नसावी .

विकासात्मक राजकारणासाठी काय करावे -


१) सर्वात महत्त्वाचे पक्षांची चिन्हे काढून टाकावी. घटनेत सांगितले आहे 'व्यक्तीने' निवडणूक लढवावी . समूहानी नव्हे. होते असे की ठराविक पक्षाचे किंवा सरकार चालवत असलेल्या पक्षाचे कोणत्याही निवडणूकी आगोदर जास्त प्रस्त असते. त्यांचा समूह बनलेला असतो. याचा फटका प्रत्यक्ष मतदान करताना बसतो. आपल्या मतदार संघात नक्की कोण उमेदवार उभा राहीला आहे याची माहिती न घेताच बरेच जण मतदानाच्या मशिनवर असलेल्या चिन्हावर मतदान करुण येतात. जरी 'त्या' चिन्हाचे पक्ष चांगले असले. सरकार चागले असेल. पण आपल्या मतदार संघात किंवा भागात संबंधित पक्षाचा काम करणारा उमेदवार हा चांगला असेलच असे नाही . म्हणून जर पक्षांची चिन्हे निवडणूक विभागणे हटवली तर समूहाने निवडणूक लढवली जाणार नाही .तर व्यक्तीने लढवली जाईल. पक्षाच्या चिन्हा एवजी संबंधित उमेदवाराचा फोटो लावता येवू शकतो. जेणे करून जनतेला समेजेल हा उमेदवार चांगला आहे का ? गुन्हेगार आहे का ? याची वर्तवणूक कशी आहे ? हे विचारात घेऊन जनता मतदान करेल. यातून चांगले उमेदवार राजकारणात जाण्यासाठी मदत होईल तसेच ठराविक समूह नष्ट होतील.

२) तरुणांचा देश आहे खरा .पण तरूण जास्त राजकारणात दिसत नाहीत.गुणवत्ता असून देखील मात्तबर मंडळी अशा तरूणांना अलगद बाहेर काढते. माञ एखाद्या नेत्यांचा , ज्येष्ठ राजकीय व्यक्तीचा नुकताच मिसरुट फुटलेला(अशिक्षित ) तरुण राजकारणात सहभागी होतो . जाहिर सत्कार करुण यांचे पक्षात आगमन करून घेतात. हे अशे तरुण राजकारणी ना समाजासाठी काही करत , ना युवकांनसाठी काही करत. युवकांची धोरणे पण अशांना माहिती नसतात. केलेच तर मिञ मंडळीचे वाढदिवस , समुद्राच्या ठिकाणी व्यायाम शाळा वगैरे .अशांन पेक्षा खरा युवा कार्येकर्ता राजकारणाची जाण असणारा मागे राहतो. घराणेशाही फक्त प्रत्येक पिढ्यानंवर सत्ता गाजवते.

३) राजकीय व्यक्ती घडवण्यासाठी किंवा राजकारणात करियर करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे.

४) पंचायत सभापती , उपसभापती , झेडपी अध्यक्ष नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष हे स्पर्धा परिक्षांन मार्फत भरल्यास युवकांना सद्धी मिळेलच याच बरोबर गुणात्मक व्यक्ती राजकारणात जाऊन नवनवे प्रयोगही करेल.

५) आमदार आणि खासदार ह्या जबाबदार पदांना शैक्षणिक अट ठेवावी.

६) राजकीय व्यक्तीना दिलेली कामे , ठराविक काळात पूर्ण केली का . हे पाहण्यासाठी स्वतंत्र यंञना तयार करणे गरजेचे आहे.

७) पंन्नास टक्के आरक्षण मिळवून राजकारणात उतरलेल्या स्त्रीच्याच्या नवरोबांचा हस्तक्षेप बंद करणे गरजेचे आहे. तसे आढळ्यास संबंधित स्त्रीयांचे एक वर्षेभरा साठी पदभार काढून घ्यावेत.अशी तरतुद असणे गरजेचे आहे.

८) साठ टक्केच्या वर आपल्याकडे मतदान होत नाही . हे वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी जणजागृती करणे गरजेचे आहे. बरेचदा ओरड असते ग्रामीण भागात पैसे घेऊन , जेवनावळी करून मतदान केले जाते. हे बरोबर आहे आपल्याकडे निवडणूक ही दिवसापेक्षा राञीची जास्त रंगते. हे प्रकार बंद होणार नाहीत ! पण खेद हा शहरी लोकांचा आहे. मतदाना दिवशी सुट्टीचा फायदा घेऊन ही मंडळी पर्यटन करत असतात. स्वतःचा हक्क बजवत नाहीत. वरून आणखी सरकार कसे चांगले नाही , हे असे झाले पाहिजे आपल्या देशात , तसे झाले पाहिजे फक्त सचूणा देतात. स्वतःची अल्प बुद्धी पागळवतात काही तर मोठ मोठे लेख लिहून सरकारी धोरण कुठे चूकते ते सांगतात. अशांची किव करू वाटते. ग्रामीण भाग बरातरी मतदानाचा हक्क बजावतात. ते कसे का असेणा पण भारतभुमीला विसरत नाहीत.

9) निवडणूक वेळेस 'नोटा' हे बटन नविन केले मशीन वर . जास्त मते नोटाला पडली तर निवडणूक पून्हा घेण्यात यावी. याची अमंलबजावणी होने गरजेचे आहे.

१०) प्रादेशिक पक्ष मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. संबंधित विभागाणे नियमावली कडक करणे गरजेचे आहे.

११) भ्रष्ट नेते व धार्मिक तेड निर्माण होईल असे विधाने करणारे नेते यांना दहा वर्षीसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी.तसेच शिक्षाही व्हावी.

१२) आमदार आणि खासदार या लोकनेत्यांनी सभागृहात पाच वर्षीत कोणते प्रश्न विचारले हे संबंधित मतदारसंघाला कळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठमोठे फ्लेक्स लावावे. यासाठी एखादी यंञना असावी .

१३) शालेयस्थरावर पाचवी ते दहावी वर्गाला वर्षीतूण एकदा संबंधित मतदार संघातील नेत्यांनी कोणते प्रश्न मार्गि लावले. यासाठी किमाण दहा मार्कांचा प्रोजेक्ट सादर करण्यास सांगावे.जेणे करून विकासात्मक राजकारणाची आवड मुलांन मध्ये रुजेल.

१४) माघे कोणत्यातरी पक्षाने निवडणुका व्हायच्या आदी तिकिट देण्यासाठी उमेदवरांची परीक्षा घेतली . तसाच प्रयोग सर्व निवडणूक वेळेस करावा.

१५) राजकारणात ठराविक समाजाची लाँबी तयार होऊ नये म्हणून पहानी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी .

राजकीय व्यक्तींना आपल्याकडे प्रमाणापेक्षा जास्त माण-सम्माण दिला जातो. मुळात आपल्या कामासाठी ते आहेत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आज नागरिक सर्वच आहेत . पण प्रत्येकाने 'सुजाण नागरिक' होणे गरजेचे आहे. असे जर झाले तर विकासात्मक राजकारण होण्यासाठी वेळ लागणार नाही .



Source:- INTERNET

-डॉ. दिलीप कदम,
अहमदनगर
1) प्रथम विकासाची व्याख्या नीट समजावून घ्यावी लागेल.
2) भारतीय संविधानाची मुलतत्वे आत्मसात करावी लागतील.

युवा मित्रांनी विषय विचार विस्तार करणे अपेक्षित🙏




Source:- INTERNET

-वैष्णवी सविता सुनील,
सातारा
*मुळात विकासात्मक राजकारण असं म्हणण्याची वेळ का यावी याचा विचार केला गेला पाहिजे .कारण राजकारण हे देशाच्या विकासासाठी आहे.पण सध्याची परिस्थिती पाहता विकासात्मक राजकारण ही नवी संकल्पना उदयाला येण्याची गरज वाटू लागली आहे.त्यासाठी सर्वात आधी आपण म्हणजे या देशाच्या तरुण पिढीने राजकारणावर नुसती चर्चा, टीकात्मक वक्तव्य करण्यापेक्षा स्वतः राजकारणात उतरायला हवं. राजकारणाबद्दल देशाच्या युवा पिढीने उदासीनता दाखवणे हे देशाच्या प्रगतीचा मार्गातील अडथळा आहे.....त्याचबरोबर देशात पक्षीय राजकारण फोफावू न देणे गरजेचे आहे.सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला दिसून येईल की पक्षीय राजकारण कशा पद्धतीने चाललंय......आणि जर हे वेळीच थांबलं नाही तर धर्म ,जात ,पंथ,लिंग,भाषा,वर्ण यांच्या आधारावर जसा भेदभाव होतोय तसाच पक्षाच्या आधारावर भेदभाव होण्यास वेळ लागणार नाही आणि तेव्हा मात्र आपल्याला चर्चेसाठी खरं राजकारण म्हणजे काय हा विषय घ्यावा लागेल.......



Source:- INTERNET

-पवन खरात,
अंबाजोगाई
जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ,तेव्हा या गोष्टींचा सुद्धा उल्लेख करावा लागेल की....
एकविसाव्या शतकात ज्यावेळेस कोरिया,अमेरिका सारखे राष्ट्र hydrogen bomb चे परिक्षण करत होते.......
जपान ,फ्रांस,ऑस्ट्रेलिया सारखे राष्ट्र technology च्या दुनियेत super power बनत होते......
चीन दर वर्षी स्वत: च्या नागरिकांना 1.25 crore नोकऱ्या देत होते .....
त्यावेळेस माझ्या भारत देशात नागरिकांना गाय,गोबर,गोमूत्र,मंदिर,मज्जिद,तलाक, लव-जिहाद,गोहत्या,नोटबंदी,blackmoney ,GST, योगा, वंदे मातरम् ,भारत माता की जय , आदि गोष्टींमधे गुतवुन राजकारणी सत्तेची खीर खाऊन आनंद साजरा करत होते.....

स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतर प्रश्न तोच आहे , आपला देश नक्की प्रगती करतो आहे की पावलं उलट्या दिशेने टाकतो आहे??????
सर्वधर्मसमभाव, समानता, धर्मनिरपेक्षता, एकात्मता या गोष्टी भारतीय संविधानाचा प्राण आहेत, या उलट आज धार्मिकता ,आर्थिक व मानसिक विषमता, घराणेशाही, गुन्हेगारी , दडपशाही हि या गचाळ राजकारणाची ठळक वैशिष्ट्ये बनली आहेत.


*जाती पातीचं राजकारण बस झालं कि आता*,
*पैसा चालवून तुम्ही काबीज केलीय हि सत्ता* !

*सत्ता मिळाली कि एकदा विसरता सारे आश्वासने* ,
*भरायला स्वतःचे खिशे निवडून दिले का जनतेने* ?

*तसं चुकलं नाही तुमच्या हाताने*,
*पैसा घेताय एक एक मताने* !

विकासात्मक राजकारणासाठी
1. मतदान आपला हक्क आहे , तो बजावलंच पाहिजे पण आपलं मत पैशापायी विकू नका .
2. मतदान हे पक्षाकडे बघून न करता उमेदवाराचे कर्तृत्व पाहून करा.
3. पोकळ अश्वासनांना बळी पडू नका, प्रत्येक राजकीय पक्ष नेहमीच अशी आश्वासने देत असतो फक्त सत्ता मिळे पर्यंत.
4. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि योग्य उमेदवार निवडा.
5. तरुण वर्गाने राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा.
6. राजकारण करत असताना आपण संविधानापेक्षा मोठे नाहीत याचे भान ठेवा.
7. आपल्या देशात जर लोकशाही टिकवायची असेल तर जाती पातीच , पैश्याच्या जोरावर राजकारण करू नका, जर कोणी करत असेल तर तुम्ही त्यांना मदत करू नका.
8. विकासात्मक राजकारण हेच आपल्या देशाला तारू शकेल अन्यथा लोकशाही मोडखालीस नक्की येईल.


Source:- INTERNET

-R. सागर,
सांगली
ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत प्रत्येक ठिकाणी उमेदवारासाठी त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी, सामाजिक क्षेत्रामधलं त्याचं कार्य, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याचा विकासाचा दृष्टिकोन या सर्वांवर आधारित पात्रतेचे निकष असायला हवेत. त्यानुसार तो उमेदवारीसाठी पात्र आहे की नाही हे ठरवायला पाहिजे.
बऱ्याचदा मतदारसंघातील जातीय-धार्मिक परिस्थितीचा अभ्यास करून त्यानुसार त्या विशिष्ट जाती-धर्माच्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. किंवा अलीकडच्या नव्या trendनुसार निवडून येण्याची क्षमता(जातीय-धार्मिक-आर्थिक) हा निकष लावून उमेदवारी दिली जाते. तसं न करता जी व्यक्ती खरंच आपल्या कर्तृत्वाने विकास करण्याची क्षमता ठेवते अशा व्यक्तीलाच उमेदवारी दिली पाहिजे.
प्रत्येक ठिकाणी नेते, त्यांचे कुटुंबीय, सगे-सोयरे यांनाच संधी न देता कधीतरी ज्यांना लोकांच्या समस्यांची जाणीव आहे अशांना संधी दिली पाहिजे.
.
शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही हेही खरंच आहे. या सगळ्या परिस्थितीला मतदारही थोड्याफार प्रमाणात जबाबदार असतात.
.
एकतर आपल्याकडे मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्याने मतदानाची टक्केवारी कमी राहते. जिथे मतदानाची टक्केवारी कमी आहे तिथे प्रस्थापितांनाच बहुतांश संधी मिळत राहते. हा आपल्या समाजाचा-जातीचा-धर्माचा आहे त्यामुळे ह्यालाच मत दिलं पाहिजे ही मानसिकता अजूनही (विशेषतः खेड्यात) आढळते.
काही मतदार चलबिचल अवस्थेत असतात. मत कुणाला द्यायचं हे त्यांना मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यावर ठरवतात. अशा स्थितीत विकासात्मक राजकारण होऊ शकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************