🌱 वि४ 🌿
वापरायचा रस्ता ते थेट मानवी मूल्य प्रत्येक बाबतीत.... अतिक्रमण...कशासाठी ?
IMAGE SOURCE INTERNET
स्वप्निल चव्हाण ,बुलडाणा
अतिक्रमण हा जितका महत्वाचा मुद्दा वाटतो तेवढाच दुर्लक्षित पण आहे..
खेड्यातच नव्हे तर मोठ्या शहरांमध्ये पण वाहनांसाठी असणाऱ्या रस्त्यावर लोकांची वस्ती दिसून येते......शहरांमध्ये तरी परिस्थिती थोडी आटोक्यात आहे...पण खेडे गावात लोक ती जागा आपल्या मालकीची असल्यासारख वर्तन करतात.....
आणि विशेष म्हणजे प्रशासन या गोष्टीमध्ये थोडं पण लक्ष घालत नाहीये.....
ह्या सध्या गोष्टीपासून सुरूवात केली अणि असंच पुढे गेल्यावर कळून येईल की प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण आढळून येते.....
आता कुठे कुठे होते यावर चर्चा करण्यापेक्षा त्या मागची कारणे अणि पर्याय काय करता येतील हा महत्वाचा मुद्दा आहे.......
बऱ्याच ठिकानी हे अतिक्रमण गरिबी मुळे दिसून येते....आणि तेच एक महत्त्वाचे कारण आहे slum area तयार होण्यासाठी.....अश्या लोकांना योग्य तो रोजगार उपलब्ध करून दिल्यास आणि राहायला विशिष्ट जागा उपलब्ध करून दिल्यास ही समस्या दूर होऊ शकते....हे करताना ते बेघर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असेल......
शेवटी जनजागृती हे एक महत्त्वाचे अस्त्र असेल या गोष्टीसाठी......कारण प्रत्येक गोष्ट प्रशासन करू शकणार नाही .....लोक-सहभाग वाढवून जवळपास सर्व प्रशासकीय अडचणींना दूर करता येऊ शकते अस माझं मत आहे ....
साध्या सध्या गोष्टी बघितल्या तर लक्षात येईल की लोकांना एक तर काही फरक पडतचं नाही आणि ज्यांना काही फरक पडतो त्यांचं ऐकायला कोणी तयार नाही.....
अश्या परिस्थिती मध्ये लोकांनी एकत्र येऊन समस्येवर योग्य तो विचार करणे आणि पूरक योजना आखणे गरजेचे राहील.....
हे तर सोडाच पण अवैध पद्धतीने जंगलतोड करून मोठमोठे कारखाने उभे करण्यात येतात .....मान्य करता येईल की त्या मुळे रोजगार उपलब्द्ध होत आहे...पण निसर्गाच्या संपत्तींमध्ये होणारे अतिक्रमण आणि त्यामुळे निसर्गावर होणारे दुष्परिणाम याकडे दुर्लक्ष करता येणार नाही......
अतिक्रमण ही अशी समस्या आहे की जी प्रशासन आणि लोक-सहभाग यांच्या योग्य पर्याय योजनेमुळे दूर होऊ शकते.....
।।।।। धन्यवाद...।।
IMAGE SOURCE INTERNET
मयुरी राघुनाथ देवकर
ता. माळशिरस
सध्या सभोवताली पाहिलं तर आपल्याला काय परिस्थिती दिसते सगळीकडेच स्वार्थीपणाची प्रवृत्ती वाढत आहे आणि याच प्रवृत्तीमधून जे माझे आहे ते माझे अन जे दुसऱ्याचे आहे ते पण माझेच हि प्रवृत्ती वाढत जाऊन यातूनच अतिक्रमण चा उदय झाला.शहर असो वा खेडे अगदी आपल्या घराशेजारी रिकामी जागा असेल तर हळू हळू आपण त्या जागेवर कब्जा करतो.यामध्ये गाडी पार्किंग वगैरेचा समावेश होतो आता हेसुद्धा एक अतिक्रमणच झाले (आपल्याला वाटत नसले तरी.....) आपण प्रवास करताना तसेच रस्त्यावर चालताना रस्त्यावरच गाड्यांचे पार्किंग केलेले दिसते ,त्याचप्रमाणे फुटपाथ तर नावालाच फुटपाथ राहिले आहेत कारण त्याठिकाणी विविध प्रकारचे गाडे,चहाच्या टपऱ्या यांचेच वर्चस्व दिसते... हे सर्व आपण रोजच पाहत आहे परंतु आता यावर उपाय म्हणून प्रत्येकानेच पार्किंगच्याच ठिकाणी पार्कींग करणे गरजेचे आहे आपण स्वतःच जबाबदारीने वागायला शिकले पाहिजे.
आता प्रश्न राहिला तो फुटपाथवरील अतिक्रमणाचा .. हे काम प्रशासनाने मनावर घ्यायला हवे तरंच आपल्याला फुटपाथ म्हणजे कशासाठी असतात हे समजेल.....
आतापर्यंत आपण जे पहिले ते आपल्याला दिसणारे अतिक्रमण पण सध्या ज्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे ते म्हणजे मानवी मूल्यांचे अतिक्रमण.....जे दिसतही नाही आणि कोणी सांगतही नाही..यामध्ये अगदी घरापासून ते नोकरीच्या ठिकाणी तसेच मित्रांमध्ये असेल,सार्वजनिक ठिकाणी असेल प्रत्येक ठिकाणी आज व्यक्तींच्या मनाचा कोंडमारा होत आहे. भौतिक साधनांनी माणसे जोडली गेली पण मने मात्र दूर झाली आणि म्हणूनच हा वाढत चाललेला अतिक्रमणाचा भस्मासुर आपण लवकरच नष्ट करायला हवा तरंच मानसिक स्थेर्य लाभेल नाहीतर असं पण आज माणूस कसं जगतोय हेच विसरला आहे पण हीच परिस्थिती कायम राहिली तर जगणंच विसरून जाईल.आणि अशा प्रकारे होणारे अतिक्रमण कमी केले तरंच पुढच्या पिढीला आपण मानवी मूल्ये म्हणजे काय ते सांगू शकेल नाही तर सांगायलाही मानवी मूल्ये राहणार नाहीत…
IMAGE SOURCE INTERNET
किरण पवार
औरंगाबाद
माणसानेच मुळात अतिक्रमणाला लागे बांधे असल्याप्रमाने जवळ केल आहे. अगदी दैनंदिन वापरातल्या मोबालचा हस्तक्षेप आणि अतिवापर असो किंवा मग आजकाल फुटपाथवर केल जाणार अतिक्रमण असो. विषयाच्या ओघाने तरी का असेना पण मानवी मूल्य हा शब्द चर्चेत आला. सध्या मानवी मूल्यांसारख्या विषयाची चर्चा आम्हाला नकोशीच असते. हे वास्तव आहे. पण मानवी मूल्यांचा ऱ्हास न होऊ देता त्यांना जोपासन गरजेच आहे. मानवी मूल्यात अतिक्रमण केलं ते हिंसा, खोटेपणा, भ्रष्टाचार, अविवेक या अशा बाबींनी. कारण स्वनिष्ठा आणि स्वत:शी प्रामाणिकपणा या दोन गोष्टींना आपल्याकडूनच नाहीस केलं गेलं.जिथे माणसाचा स्वतःवरचा ताबा सुटला तिथे भला तो माणूस इतर ठिकाणांना मोकळ कसं सोडेल?? म्हणूनच तर वापरायच्या रस्त्याच अतिक्रमण होत गेलं. आपण दैनंदिन जीवणात इतरवेळी म्हटलं तर सतत एखाद्या गोष्टीत दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाला तंत्रज्ञानासोबत जो अहंकार नावाचा आजार जडलाय त्याची ही प्रचीती आहे.एक महत्वाच उदाहरण इथे मुद्दाम नमूद करतो. ते म्हणजे, गोवा-मुंबई रस्ता कोकणच्या बऱ्याच भागातून चौपदरी होणार आहे. हा विकास आहे जो मानवाला हवा आहे. पण यातून कितीतरी वन्यजीव संपत्ती धोक्यात येणार आहे. सोबतच घाट कितीतरी किमीपर्यंत पोखरला जाणार आहे. कोकणच सौंदर्य नष्ट होणार तर आहेच आणि सोबतच झाडांचही प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी होणार. यात फायदा कमी आणि नुकसान अधिक आहे; हेच आजच्या माणसाला समजत नाही.........
IMAGE SOURCE INTERNET
अनिल गोडबोले
सोलापूर
भारतीय लोक म्हणून आपल्याकडे जग जेव्हा बघत असत तेव्हा त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा असावा? असा विचार माझ्या डोक्यात आला. एखादा व्यक्ती एखादे मत तयार करताना त्या देशातील माध्यमाकडे बघत असतो.. उदा. वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडिया इत्यादी..
मग त्या देशाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जातो.. भारताला नाग गारुडी यांचा देश म्हणून ओळख होती ती पुसून आता.. बलात्कार, भ्रष्टाचार आणि असंख्य सामाजिक प्रश्न असलेला देश म्हणून बघत नसेल ना?
असो... तर हा मुद्धा एवढ्या साठी की आपल नेमकं काय चुकत? याच मी केलेलं विश्लेषण..
आपण साधं निरीक्षण करू.. पेपरला बातमी येते त्या मध्ये सकारात्मक पणा आणि वास्तविकता किती ? व भावनिक बातम्या, अतिरंजित बातम्या किती?... याच्यावर लक्ष केंद्रित केले तर असे दिसते की प्रत्येक गोष्टी मध्ये स्वतःच्या मानसिकतेचा किंवा मतांच अतिक्रमण...
बलात्कार.. अतिक्रमणच! दुसरं काय? एखाद्या व्यक्तीला पॉवर साठी किंवा विकृतीसाठी वास्तुपेक्षा कमी समजण हा मानव अधिकार साठी अतिक्रमण च आहे...
रेल्वे, बस, ऑटो अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वतः अतिक्रमण करत आहेत किंवा त्या व्यवस्था अतिक्रमणाचा बळी ठरत आहेत..
आपण काय नेसावें, आपण काय प्यावे, आपण काय खावे, आणि या बाबतीत मला काय पाहिजे या पेक्षा आता कुठला ट्रेंड चालू आहे हेच दुकानदार सांगत असतो..
आपले पैसे घालून दुसऱ्याच्या सांगण्यावरून वस्तू घ्याव्या लागतात... अतिक्रमण!
तुम्ही तुमचा राजकारणांचा कोणता दृष्टिकोन ठेवता? हे चार लोकांत मांडा. आणि तो जर पटला नाही तर .. माझा मुद्धा वेगळा आहे एवढं न समजून घेता..
'तुझ्या सारख्या मूर्खामुळे भारत मागे आहे...' अस मत प्रदर्शित करणे हे देखील अतिक्रमण..
पैसे आणि सत्ता या खाली दबलेली न्यायव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था त्यामुळे होणारा सामान्य नागरिकांना त्रास... या अतिक्रमण बदल खूप फिल्म निघाले बॉलीवूड मध्ये..
देव, धर्म आणि धर्माचे ठेकेदार... एवढा भडिमार करत आहेत ना... की देवालाच बोलवायचं की काय... अस वाटत आहे.. आणि हेच लोक देशासाठी, धर्मासाठी एखाद्याचा बळी देतात किंवा आवाज उठवला तर गोळ्या घालतात.. अतिक्रमण
आरक्षण आणि अर्थव्यवस्था यावरील स्वयंघोषित तज्ञ ... बोलूच नये आपण यावर!
नातेवाईक, कुटुंब व्यवस्था आणि आधार व्यवस्था ही तर हक्काने आपल्या जीवनावर अतिक्रमण करते.. म्हणजे भावना अतिरेक खूप मदत किंवा आधार कमी..
फुकट सल्ले देण्याचे अतिक्रमण करत असतात..
लैगिकता काय असावी, पार्टनर कोणाला करावं, कधी लग्न करावं कोणासोबत करावं... एकनिष्ठता ठेवावी की नाही ठेवावी.. हा वरचा तो खालचा.. या सगळ्या बाबतीत ... स्त्री आणि पुरुष यांची होणारी घुसमट आणि त्यामुळे येणारी विकृती व गुन्हेगारी... हे अतिक्रमण केल्याचं उदाहरण आहे...
सगळ्यात शेवटी.. 'रस्त्यावर केलेले अतिक्रमण... भाजी विकून दोन रुपये जास्त कमवावे किंवा माझा माल जास्त ग्राहकाला पोहोचावा म्हणून फुटपाथवर बसलेला भाजीवाला, गाडीवाला, फेरीवाले हे तर सगळ्यात मोठे गुन्हेगार...
तसेच मोठे लोकांनी सरकारी जागेवर केलेले अनधिकृत बांधकाम यांनी म्हणजे पैसे देऊन अधिकृत करायचा मार्ग..
हुश्श...
एक अतिक्रमण ची गाडी यावी आणि त्यांनी वरील सर्व अतिक्रमण उचलून न्यावीत अस स्वप्न मला पडत असत तो पर्यंत... "कामावर जायचं नाही का?...कितीवेळ पसरलेले असता?" म्हणून बायको ने माझ्या सारख्यावर केलेलं अतिक्रमण...
या सर्वांचा मी निषेध करतो..!!
IMAGE SOURCE INTERNET
डॉ. विजयसिंह पाटील..
MBBS DA। कराड....
माणूस हा प्रगती साधक प्राणी आहे, भौतिक ज्ञानात आपण प्रचंड प्रगती केलीय. ह्या प्रगतीने माणसाच्या, सुख सोयीत भरपूर भर घातलीय. ह्या बाह्य प्रगतीमुळे, आपल्या, आर्थिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक विचारांत बदल घडवून आणत आहे. जीवनाची पूर्वीची मूल्ये दररोज झपाटयाने बदलत आहेत. (मानसिक अतिक्रमण नं 1 )...
हा बदल जर निरोगी असता आणि जीवन चांगलं करण्यात वापरली गेली असता, तर जगात खरं सुख शांती नांदली असती..
पण असं होताना दिसत नाही.. उलट ह्या मूळ, ह्याचा परिणाम भयानक होत आहे. ह्या बद्दल आपण कधी विचारच करत नाही, कारण या नेत्र दीपक प्रगती ने आपणा सर्वांना भुलवून टाकलं आहे,, जो तो ह्याचा फायदा फक्त स्वतः साठी कसा होईल हे पाहतोय,स्वार्थी वृत्ती फार वाढत चाललीय ( अतिक्रमण 2)
प्रत्येक जण, मोह, लाभ, स्वार्थ, हिंसा, द्वेष, सूड, ह्या भावनांनी ग्रस्त आहे, माणसाचे वर्तन पशुपेक्षा हीन होत चालले आहे.
सध्या सर्व जग भोगवादी व जडवादी झालंय, व आपण हे सर्व नैसर्गिक समजून कळत नकळत स्वीकारत चाललो आहोत ( अतिक्रमण 3)
हे झालं आर्थिक...
अहंकार,,, माणूस, खोट्या अहंकाराच्या ओझ्या खाली दबला गेलाय, (हेही अतिक्रमण)
सर्व सामान्य माणूस, , भय वा स्वार्थासाठी, राजकीय सत्तेपुढे नमतात. शक्तिशाली राजकर्त्याना मदत करतात, हेच धार्मिक शक्ती ना ही लागू पडते..
ह्या गुलामी वृत्ती मुळे, माणसाचे, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, ह्यावर प्रतिबंध निर्माण होतो (अतिक्रमण4)
धार्मिक बाबतीत---
चर्च, मशिद, मंदिर, यांची परमेश्वराला खरंच गरज आहे का ? देव तिथं असेल तरी काय ?
आपण ग्रंथ, प्रार्थना, सण, दीक्षा, बाप्तिस्मा, या गोष्टींना महत्त्व देतो, हजारो वर्षे हेच चालू आहे, लोक धर्माच्या नावाखाली गळे कापत आहेत ( अतिक्रमण 5)
एकूण च काय तर, संपत्ती, अहंकार , धर्म, राजकारण, सत्ता
हे सर्व आपल्या मनावरचे, अतिक्रमण, आहेत ...
उदा... फुटपाथ वरील फेरीवाले,, पहिल्यांदा पोटासाठी,,, ते भरलं की समाधान न मानता, मुलाला किंवा नातेवाईकाला, दुसऱ्या फुटपाथवर,,, ह्याला अंत नाही...
जोपर्यंत, सुखाची व्याख्या करण्यापेक्षा, आनंदाची व्याख्या, लोकांच्या मनात बिंबत नाही तोपर्यंत, हे असंच चालू राहणार, उलट वाढत जाणार.... वाईट वाटते ते ह्याच की, आपण वयक्तिक काहीही करू शकत नाही.... 🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा