आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय नागरिकाचा दर्जा…

अंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय नागरिकाचा दर्जा...

🌱 वि४🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय नागरिकाचा दर्जा…


Source:- INTERNET
-स्वप्निल चव्हाण,
 बुलडाणा

।। यापुढे जे मी चर्चेत आणणार आहे त्या आधी हे सांगायला चांगलं वाटत आहे की ...संबंधित विषयमध्ये जो भारतीयचा दर्जा हा उल्लेख केला आहे....हा विषयच मुळात दर्जेदार आहे.........

तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जर कोणत्याही देशाच्या नागरिकाचा विचार केला तर एकंदरीत ज्या गोष्टी वर लक्ष केंद्रित होत ते म्हणजे
"विकास",आता ही गोष्ट थोडी  पटण्यासारखी वाटत नाही पण त्या व्यक्तीच्या नागरिकत्वावरून त्याचा दर्जा ठरवला जातो....कारण या गोष्टीमध्ये तेवढ तथ्य वाटत नाही की एखाद्या देशाचा प्रत्येक नागरिक सारखाच असेल.......प्रत्येक पाकिस्तानी हा आतंकवादी नाहीये......त्यामुळे देशाच्या नावावरून किंवा देशाच्या status वरून जर कोणाचा दर्जा ठरवणे चुकीचे राहील असा मला वाटत......

जेव्हा आपण तालुका स्तरावर असतो तेव्हा आपण आपल्या गावचे असतो.......जिल्हा स्तरावर आपण आता तालुक्याचे होतो.......विभागावर जिल्ह्याचे तर....राष्ट्रीय पातळीवर विभागाचे......आणि असंच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण भारतीय होतो......म्हनून भारतीय म्हनून आपण फक्त देशाच्या बाहेर ओळखले जातो.....त्यामुळे आपण प्रत्येक छोट्या स्तरावर जसा आपला दर्जा सांभाळण्याचा प्रयत्न करतो ...तसाच प्रयत्न आपला एक भारतीय नागरिक म्हनून पण असावा........
भारताकडे विकसनशील देश म्हणून बघितले जाते.......
छोट्या तोंडी मोठा घास घेतोय पण जोपर्यंत विचारांची वृद्धी होत नाही तोपर्यन्त दर्जा टिकवणे कठीण होईल असे मला वाटते....फक्त विकास हा आर्थिक असून चालणार नाही सामाजिक आणि वैचारिक विकास किती झालय हे जास्त महत्वाचे राहील दर्जा बघताना.........

एक मुद्दा या ठिकाणी मांडतोय.....एक foreigner भारतामध्ये visit साठी आला होता.....त्याला देवावर बिलकुल विश्वास नव्हता...एकदम नास्तिक......1 महिना तो फिरला भारतामध्ये.....नंतर तो वापस गेला आणि तो देवावर विश्वास करू लागला.... याचं कारण हे नव्हतं की आपली संस्कृती वगैरे.....तो म्हटला जर अशे लोक असताना भारत देश सुरळीत चालतोय म्हणजे नक्की देव असलाच पाहिजे......आता खरंच ही विचार करण्यासारखी बाब आहे.....की आपला दर्जा भारतीय म्हणून काय आहे....??
शब्द मर्यादे मुळे थांबतोय......पण लोकांच्या विचार करण्याची पद्धतीमध्ये सुधार केल्याशिवाय दर्जा टिकून राहील अस मला वाटत नाही.......

Source:- INTERNET
-शिरीष
 नवी मुंबई

संयुक्त राष्ट्संघ हा १९३ (तसे १९५ देश आहेत जगात) देशांना सदस्यता मान्यता देतो व यापैकी भारतीय नागरिक ५९ देशात विना विसा जाऊ शकतो. जागतिक पारपत्र शक्ती अनुक्रमामध्ये 🇮🇳 भारताचा ७५ वा क्रमांक आहे.  याचा अर्थ संमिश्र निघतो.

तो असा की भारतीय नागरिकाला पुर्ण छानणी पडताळणी केल्याशिवाय १३४ देश त्यांच्या देशात प्रवेश देत नाही आणि ह्यात जवळपास सगळे विकसीत देश येतात. विरोधाभास हा की असे असले तरी हे देश काही विशिष्ट वर्गाला खुप मान देतो ह्यात अतिश्रीमंत, हुशार नोकरवर्ग, तल्लख बुध्दीचे व्यावसायीक लोक मोडतात.

ह्याचेच विश्लेषण असे निघते की ७० वर्षानंतरही संविधानाची मुल तत्त्वे अंमलात आली नाही. भारतात नागरिकांना समान दर्जा मिळत नाही हे जळजळीत सत्य आहे. मग जगाला का दोष द्यायचा ?!!

आज ईतर देशात एशियन म्हणुन ओळखणार्या भारतीयांपैकी काही विशिष्ट वर्ग च  इतर देशात जाण्याचे धाडस करतो. ह्यात कॅनडात स्थिरावलेले पंजाबी शिख समुदाय असो कींवा हाँगकाँग मधील सिंधी व्यावसायिक असो वा युके मधील गुजराथी असो... त्या देशात जाऊन तिथले नागरिक बनुन ही आपली भारतीय संस्कृती टीकवण्याचा प्रयत्न करतात. जगप्रसिध्द केरळच्या नर्स ह्या भारतीय सेवावृतीचे प्रतिनिधीत्व करतात. अरब देशात कीतीतरी भारतीय त्या देशांच्या विकासासाठी जीवतोड मेहनत घेतात. आफ्रीका मध्ये तर गुजराथी व्यवसायिकांची ही चौथी पीढी... ह्यात मराठी माणसे वैद्यकीय व औषधी, अवकाश अभ्यास व संगणकीय सॉफ्टवेअर विकास आणि विज्ञान शास्त्रज्ञ म्हणुन उच्च शिक्षण घेउन तिकडेच स्थिरावले. आज जवळपास सगळ्या देशात थोड्या फार प्रमाणात भारतीय आहेत. जे गेलेत त्यांनी स्वत:चा दर्जा उंचावुन तिथले झालेत पण जे भारतात आहेत त्यातले फारच थोडे दक्ष नागरिक म्हणुन स्वत:च्या व देशाच्या विकासासाठी झोकुन देतात... ह्यासाठी प्रत्येक नागरिकाने अधिकारासोबत कर्तव्ये व जबाबदार्या समजावुन घ्यावी लागणार आहे. आपल्या बद्दल चे जागतिक मत बदलवायला मेहनत घ्यावी लागणार आहे. सुवर्णाला सुध्दा टाकेचे घाव सोसावे लागतात.


Source:- INTERNET
-डॉ. विजयसिंह पाटील…
कराड

मला वाटतं, ह्या विषयाचे दोन भाग होतील,, एक म्हणजे, परदेशात राहणारा भारतीय व दुसरा म्हणजे, पर्यटक भारतीय...
मी स्वतः कधी परदेशी एका वेळी  दहा दिवसांच्या पेक्षा जास्त राहिलेलो नाही..
पण पर्यटक म्हणून जे काही मी परदेशी फिरलोय, राहिलोय , भारतीय म्हणून, ह्या आठवणी फार आल्हाददायक आहेत असे म्हणायचं धाडस मी करणार नाही..
आंतरराष्ट्रीय पातळीवर, भारतीय पर्यटक नागरिक हे दुय्यम अथवा तृतीय, समजले जातात ही वस्तुस्थिती.. हे कोणी बोलून दाखवत नाही, पण आपल्याला समजतं...
एक उदाहरण देतो, दुबई त , 90 टक्के टॅक्सी ड्रायव्हर, पाकिस्तानी (जो आपला विरोधी देश आहे) आहेत,, त्यांना भारताबद्दल आकर्षण आहे, ममत्व आहे, ते आपली काळजी चांगली घेतात...
ह्या उलट, अमेरिकेत बहुसंख्य टॅक्सी ड्रायव्हर भारतीय आहेत, पण का जाणे, त्यांचं वर्तन, फार सौख्याच , निदान मला तरी जाणवलं नाही...
ह्याचं काय कारण असेल ??
हा प्रश्न मी माझ्या, अमेरिका मधील मित्राला विचारला असता, त्यानं दिलेलं उत्तर मला , धक्का देऊन गेलं.. तो म्हणाला " अरे आम्ही इकडे फक्त व फक्त पैसे कमवायला च येतो,, येथे असलेल्या नातेवाईकांची आमची गाठ भारतातच पडते, इथे नाही,,
आम्ही फक्त कामाला च, प्राधान्य देतो" ..
मी त्याला विचारले, " अमेरिकन लोक, आपल्या भारतीय लोकांना कसं वागवतात ?"
तो म्हणाला " मी डॉक्टर आहे म्हणून बरंय,,, बाकी लोकांचं विचारूच नको,, अरे, आमच्याकडे नोकरीला असलेल्या, अमेरिकन कामगाराला, मनात का होईना, उच्च वर्णीय असल्याचा अभिमान वाटतो" ...
एक मात्र खरं, जिथं एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला, भारतात समान वागणूक देत नाही, तेंव्हा, इतरांकडून, समान वागणुकीची अपेक्षा, आपण ठेवू शकतो का ??


Source:- INTERNET
-जयंत जाधव,लातूर.

भारतीय बुध्दीमत्तेला आंतरराष्ट्रीय पातळीवर तोड नाही किंवा भारतीयांनी अनेक क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय पातळीवर अटकेपार प्रगतीची शिखरे पादाक्रांत केलेली आहे हे निर्विवाद सत्य आहे.त्यासाठी मी काही उदाहरणे स्पष्ट करु शकतो.आंतरराष्ट्रीय पातळीवर नासाने एके काळी भारतीय संशोधन संस्था ईस्त्रोवर ती कुचकामी,निकृष्ट असल्याचे सांगत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.आज तीच नासा ईस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या अफाट बुध्दीमत्ता व वेगवेगळ्या शोधाने अक्षरशः लोटांगण घालत ईस्त्रोचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे.पण जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय नागरिकाचा दर्जा हा विषय चर्चेला येतो तेव्हा खरोखरच भारतीय नागरिकाचा दर्जा दुय्यम वाटतो.त्यासाठी भारतीय नागरिकांचे काही अवगुण कारणीभूत ठरतात असे माझे मत आहे. आपल्याच लोकांबद्दल दुसऱ्या देशांतील नागरिकांशी बोलताना वाईट मतप्रदर्शन करणे,पाय मागे ओढण्याची कुपमंडूक प्रवृत्ती,एखाद्याने स्वदेशी नागरिकांने खरंच काही यश संपादन केले असेल तर त्याचे कौतुक करणे सोडून त्याची फजिति कशी होईल ते करणे इत्यादी. माफी असावी पण ही वस्तुस्थिती आहे.मला आपल्या नागरिकांची प्रतिमा मलिन करायची नाही.पण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय नागरिकाचा दर्जा आपल्याला खरच सुधारणा करायचा असेल तर आपण जपानच्या नागरिकांचा आदर्श घ्यावा लागेल.कित्येकदा जपानवर आपले अस्तित्व गमावण्याची वेळ आली पण जपानी नागरिकांनी प्रचंड मेहनत करुन आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरुन देशाला प्रगतीच्या शिखरावर नेले आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला नागरिकाचा दर्जा श्रेष्ठ केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************