कालबाह्य होत चाललेली लोककला ...आणि लोककलावंत.


कालबाह्य होत चाललेली लोककला ...आणि लोककलावंत.


झंजाड अतुल तुकाराम
 (पारनेर जिल्हा अहमदनगर)
            लावणी ,तमाशा , भारुडे ही मनोरंजनाची आणि समाज परिवर्तनाची महत्वाची साधने आहेत. पण आज लोककला आणि कलावंत यांना दुय्यम पणाची वागणूक मिळते. यात्रेत होणाऱ्या तमाशा त दगडफेक ,भांडण तंटे होतात.तसेच समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन योग्य नाही. त्याना माणूस म्हणून वागणूक न देता . जातीच्या ,धर्माच्या, बंधनात अडकवल जात. मला वाटतं, कलावंताला कोणती जात नसते. तो त्याची कला सादर करत असतो.                                 "नटसम्राट" या शिरवाडकर नाटकात कलावंत ची उपेक्षा मांडली आहे. किशोर शांताबाई काळे यांच्या  आत्मचरित्रात कोल्हाटी समाजाततील दुःख ,वेदना, मांडल्या आहेत. अशा प्रकारे लोककला वंतांची होणारी उपेक्षा थांबली पाहिजे. समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे. लोककलेच संवर्धन व संरक्षण होणे त्याच प्रमाणे शासन दरबारी लोककलेला मान्यता मिळाली . तर लोककला, आणि कलावंत जिवंत राहू शकेल. 


डॉ. विजयसिंह पाटील. कराड

    आत्ता आत्तापर्यंत, ग्रामीण समाज, हा बलुते, अलुते,  फिरस्ते व मध्यभागी शेतकरी, अशा व्यवस्थेत जगत होता. बारा बलुतेदार, आठरा अलुतेदार, व मागते...  उदा. सुतार लोहार, लाकडी लोखंडी अवजारे बनवून शेतकऱ्यांना द्यावी, व त्याबदल्यात, शेतकऱ्याने धान्य द्यावं, 
    पण मागत्याचा, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपयोग न्हवता. 
देवधर्म, दानधर्म, हे ग्रामीण भागात, समाजकारण इतकं किंबहूना जास्तच महत्वाचे होते. 
   परंपरेने जे देवाधर्माच्या नावाने मागते होते , त्यांना दान धर्म केला तर पुण्य लाभेल, ह्या भावनेतून शेतकरी वर्ग दान देत राहिला.. 
  अजूनही, ग्रामीण भागात, ह्यात फारसा फरक पडलेला नाही ( माझ्या माहिती प्रमाणे, गोंधळी, वाघ्या मुरळी, )...
  नवनवीन मनोरंजन उपकरणे, बदललेली गृह व्यवस्था, ह्यामुळे, मनोरंजक कलाकारांची फार वाईट परिस्थिती आहे...
आता आपण मुख्य लोक कलाकार पाहू..
तमाशा
   तमाशाचे खेळ गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. तमातमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते.
गण
गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. 
गौळण
गण संपल्यावर , गौळणीं...
गोपी, मावशी, श्रीकृष्ण व पेंद्या, ह्यांच्यातील सवांद आपल्यास भरपूर हसवतात.
रंगबाजी. म्हणजे लावणी
वग
वग म्हणजे नाट्यस्वरूप कथा. या कथा पौराणिक, ऐतिहासिक किंवा लोककथा असतात. या कथांमधील संवाद लिखित नसून पात्रांनी ते केवळ स्वतःच्या बुद्दीने म्हणायचे असतात
डोंबारी
  कोल्हाटी समाजाचा ‘डोंबारी’ हा खेळात, वेडयावाकडया उडया मारत  पोट भरतो.
रस्त्यावर दोरीवरच्या उडया,  मध्येच ढोलकीच्या तालावर ठेका धरत एखादी कसरत दाखवणारी ही लोक कला . नाच व खेळ ह्या दोन्ही कला आलटून पालटून दाखवणारी, ही भटकी जमात.
 दोरीवरून चालणं, नाचणं, उडय़ा मारणं वगैरे खेळ करणं आणि भिक्षा मागणं हा कोल्हाटी जमातीचा पारंपरिक व्यवसाय. 
डोंबारी हे गावाबाहेर झोपडया बांधून राहतात.
जिथं-जिथं जत्रा होतात, त्या गावात त्यांचा तात्पुरता मुक्काम असतो. जत्रा झाली की यांचा प्रवास दुसऱ्या गावाकडे सुरू. काही प्रमाणातकोल्हाटी, लावणी या नृत्यकलेकडे वळला. 
कोल्हाटी , फण्या, खेळणी या कलाकुसरीच्या वस्तू बनवून आपली उपजीविका करतात. काही स्त्रिया गोंदण्याचा व्यवसाय करतात. 
   फाटके कपडे, शिळे अन्न रस्त्यावरच कोप-यात बसून खाणा-या या जमातीच्या कसरती बघण्यापेक्षा , आता मनोरंजनासाठी, इतर साधनं उपलब्ध झाल्याने ह्यांच्या पोटावर पाय आलाय.
गोंधळी..
   महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे विधिनाट्य सादर करतात.
  गोंधळी हे देवीचे उपासक असून ते गोंधळ कार्यक्रमद्वारे मंगल कार्याची सांगता करतात. महाराष्‍ट्रात , कदमराई व रेणूराई अशा पोटजाती आहेत.( यांनाच रेणूराव व कदमराव असेही म्‍हणतात. ) रेणुराई हे माहूरच्‍या रेणुकेचे भक्त असून ते रेणुकेचीच उपासना करतात. तर कदमराई हे तुळजापूरच्‍या भवानीचे भक्त असून तिचीच पूजा मांडतात. 
   लग्‍नासारख्‍या विधीत गोंधळास फार महत्त्व आहे. गोंधळ यात  गोंधळी महिलांचा सहभाग कधीही नसतो. गोंधळ्यांची संख्‍या चार किंवा आठ असते. त्‍यातील एक प्रमुख गोंधळी असतो, बाकी त्‍याचे साथीदार असतात. वाद्यांमध्‍ये तुणतुणे आणि संबळ ही प्रमुख वाद्ये आहेत. तर कधी गोंधळी हाच वादकाची भूमिका बजावत असतो. आणि एखादा साथीदार दुसऱ्या वाद्यासह साथ करतो.

पोतराज
कडकलक्ष्मी 'दार उघड बया आता दार उघड' असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागते. या कडकलक्ष्मीला पोतराज असेही म्हणतात. हातातल्या चाबकाने  स्वतःच्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात रस्तोरस्ती फिरणाऱ्या या पोतराजच्या मोकळ्या सोडलेल्या केसांच्याजटा झालेल्या असतात.  कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र नेसलेला, गळ्यात मण्यांची माळ.
   पोतराज मंगळवारी वा शुक्रवारी डफडे वाजवत गावात येतो व गावात मरीआईचा फेरा आल्याची घोषणा करतो. मरीआईने प्रसन्न व्हावे म्हणून पोतराज आत्मपीडनाचा मार्ग अवलंबतो. अंगाला डावी-उजवीकडे डोल देत नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वत:च्या अंगाभेवती मारणे, इत्यादी. मग त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
 पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात. पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते

महाराष्ट्राच्या ह्या लोककला, ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजनाचे प्रमुख साधन. पण कायम उपेक्षित राहिला. प्रतिष्ठा ह्यांच्या वाट्याला आलीच नाही. प्रसिद्धी तर दुरच. बहुतांश कलावंत पाठीवर बिर्हाड घेऊन जगणाऱ्या या कलाकारांचे वृद्धापकाळात फार हाल होतात. थोड्यांना सरकारी अनुदान मिळते. शिक्षण नाही, पैसा नाही, म्हातारपणात काम ही करता येत नाही. मग पडेल ते काम करून पोट भरायची वेळ येते.
   बहुतेक कलाकारांच्या जेवणाच्या वेळा अनियमित, अपुरी झोप व त्यामुळे आजार होतात. बऱ्याच दा, पैशाअभावी दुखणे अंगावर काढले जाते.

राज इनामदार 
पंढरपूर 

   लोककलेंची निर्मिती लोकसमुहातुंन , लोकांच्या एकत्रिकरणातुंन निर्माण होते .....प्राचीन युगात मनुष्य भटकंती अवस्थेत असल्यानें ..त्याला अन्न,  वस्त्र , निवारा या गोष्टी शोधण्यात वेळ जात असे .त्यामुळे लोककला त्यावेळेस अप्रगत अवस्थेत होती ..नंतर मनुष्य आपल्या बुद्धीचा वापर करून विविध शोध लावू लागला ...शेती करण्याची पध्दत त्याला माहीत झाली .शेतीसाठी लोकं एकत्रित राहू लागली ...मनुष्य समूहाने राहू लागला . शेतीमुळे अन्न , वस्त्र , निवारा या गरजा त्याच्या भागू लागल्या मग नंतर तो लोकं कलेकडे वळला ...म्हणजेच काय तर समाज्याचा लोकं कलेवर प्रभाव पडत असतो हे नक्की .जो  समाज सुधारलेंल्या अवस्थेत असतो तिथे लोककला सुधा प्रगत अवस्थेत असते . लोककला ही राज्यश्रय यामुळे वाढली .गुप्तकालीन राज्यकाळात लोककला भरभराटीला आलेली होती . लोककला ही करमणूक व ज्ञानाचे आदानप्रदान करण्याचे उत्तम साधन आहे .स्वातंत्र चळवळीत सुधा लोककलेंच्या माध्यमातुन लोकांनमधे देशप्रेम जागरूक करून स्वातंत्र्य चळवळीचा भाग बनविले जाई .लोककलेच्या माध्यमातून जनजागृती केली जाई ..जत्रा गावातील उर्स या वेळी लावणीचा  कार्यक्रम असल्याशिवाय तो कार्यक्रम पार पडत नसे ...पण सध्या काळ बदलत चाललाय .समाजखूप सुधारलाय पण त्याच्यातील आस्वादकता कमी होत चालली आहे .रसीकता न राहिल्यानें हळूहळू लोककला लोप पावत आहे . लोक घड्याळाप्रमाणे पळत आहेत .कामाचे तास वाढले ..मिळणारा थोडा वेळ whats app व facebook वर जावु लागला ..या social media च्या जमान्यात लोककला मात्र दम तोडत आहे .

सिताराम पवार
पंढरपूर

   खरं तर "जुने ते सोने, नवे ते हवे" यानुसार नव्या कला आत्मसात करायला हवे ,कारण कला जेव्हा लोकांमध्ये पावन होते,लोकांचा प्रतिसाद दिला की ती लोककला होते.पण आपल्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कला अस्तित्वात आहेत, आणि काही विशिष्ट समूहापुरट्या मर्यादित आहेत. कलेतून लोकजागृती केली जाते .भेदी गाणी यामध्ये एकेक विषयावर स्पर्धा चालते, शिव का विष्णू असे विषय चर्चिले जातात.पोवाडा, धनगरी ओव्या, आदिवासी नृत्य, लावणी, तमाशा, वग,गोंधळ या कला सादरीकरयामागे खूप हेतू होते.आजही पोवाडा अंगावर शहारे आणतात. पहिल्या तामशमध्ये गण घौलन आणि वग असायची पण आता तामशमध्ये फक्त गाणी, dj सिस्टीम, असा प्रेक्षकांना अनुसरून बदलत आहे. आज लावणी मात्र प्रसिध्द आहे, dhulkine  लावणीचा रंग वाढवला. पण काही कला प्रेक्षकांच्या प्रतिसाद नाही मनुन ओस पडत आहेत,तर काही कलावंत नसल्याने.पण अपल्या कला जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी करावे लागेल, करण पेंग्विन साठी पैसे खर्च होतो, पण कलावंतांना मानधन मिळत नाही.लावणी नाचनारीला,तमाशा करणारहाला समाज वेगळ्या नजरेने पाहतो, त्यांना कसे वाटेल की,आपल्या मुलांनी यात करियर करावं. गावच्या यात्रेत तमाशा अनु नका मानून काही लोक सांगतात पण स्वर्गात पण अप्सरा आहे हे विसरतात. काही ठिकाणी कलावंतांनी मोर्चे काढले मानधन मिळावं यासाठी, यशवंतराव चव्हाण यांनी नाटकावरील tax रद्द केला होता नाटक चालावी मनुन. पण आता मात्र कालावताची उपेक्षा होत आहे ."कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला" हा वाद आपण पहिला पण ,मला असे वाटते जीवनातील सुख दुःख अनुभवासाठी ,कला ही पाण्यात पोहता न येणाऱ्यासाठी आधार आहे, कोणासाठी भास तर कोणासाठी आभास आहे पण कला व कलावंत टिकला पाहिजे.

-अश्विनी खलिपे, तोंडोली(सांगली).
          महाराष्ट्र हे पूर्वीपासून सांस्कृतिक वारसा असलेलं राज्य आहे. आदिम काळापासून माणसांना एकत्र कळप करून राहायची जगायची सवय आहे. त्यामुळे मनोरंजनासाठी लोककला उदयास आली. लोककला अनेक प्रकारात आढळून येते. लावणी, लेझीम, पोवाडा, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, डोंबऱ्याचे खेळ, वासुदेव आदी प्रकारांचा समावेश लोककलेत होतो.
          खासकरून नागरीकरण न झालेल्या(आदिवासी) भागातील व ग्रामीण भागातील कलेसाठी लोककला असा शब्द बहुतांशी वापरला जातो. दैनंदिन जीवनाशी संबंधित कलात्मक आविष्काराला लोककला म्हणून ओळखलं जातं.
          समाज्यात वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, स्त्रीपुरुष भिन्नता हे सारं मोडून काढण्यासाठी अनेक संतांनी मराठीच्या माध्यमातून मार्मिक लिखाण केले. मराठी भाषा जपण्याचे काम संतांबरोबर समाजसुधारकांनी तसेच लोककलावंतांनी प्रामुख्याने केले आहे. लोककलावंतांनी मराठमोळ्या भाषेबरोबरच आपल्या लोककलेचा प्रसार आणि प्रचार केला. गोंधळ, पोवाडा, तमाशा, भारूड यांच्या सादरीकरणात रांगडेपणा दिसून येतो. यातून गायल्या जाणाऱ्या रचना पुढे प्रयोगशील झाल्या. गीते, नृत्य नट्यांच्या माध्यमातून सादर होऊ लागले. खऱ्या अर्थाने लोककलावंतांनी मराठी भाषा जपण्याचे काम केले. लोककलावंतांनी आणि शाहीर मंडळींनी हातात डफ, तुणतुणे घेऊन लोकांच्या मनोरंजनाबरोबर लोकांचे प्रबोधन केले.
          पण आज पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे लोककला मोडकळीस चालली आहे. सध्याच्या काळात समाजातील प्रत्येकजण एकच विचार करतो, आम्हाला मनोरंजनासाठी ज्याची गरज आहे ते मिळतंय की नाही. आजची परिस्थिती पाहता, मनोरंजनाची गरज भागविण्यासाठी मल्टिप्लेक्स, दूरचित्रवाणी त्याचबरोबर कम्प्युटर, मोबाईल आदी साधने उपलब्ध आहेत. हे सगळं सोडून रस्त्यावरच्या किंवा मंदिरातल्या लोककला पाहणं हे मूर्खपणाच लक्षण मानलं जातं. त्यामुळे लोककला जपल्या जात नाहीत आणि याच कारणाने लोककलावंतांना मिळेल ते काम करून पोट भराव लागतं. वृद्धापकाळात लोककलावंतांचे खूप हाल होतात कारण सरकारकडून कसलीही पेन्शन नाही आणि त्यांना त्या वयात कुठं कामही करणे शक्य नसते त्यामुळे लोककलावंत आता संपत चालले आहेत.
          लोककला समाजापर्यंत कशी पोहोचेल, यासाठी शासनाने व लोककलावंतांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी ज्या सरकारी योजना आहेत त्या कागदोपत्री न राहता त्यांची अंमलबजावणी व्हायला हवी.कारण लोककला ही अद्याप आर्थिक रेषेखाली आहे.
          लोककला जगवाची असेल तर लोककलावंतांना जगवायला हवं, त्यांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण यासाठी सर्वांनी पावले उचलायला हवीत. त्यांच्या कलेचे सादरीकरण आकाशवाणी, दूरदर्शनवर व्हायला हवे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत लोककलावंतांसाठी फिरती ओपीडी तसेच फिरती शाळा करण्याचा प्रयत्न चालू आहे. यातून विद्यापीठ जिथे तमाशा चालू असेल तिथे जाऊन मोफत उपचार करणार आहे. लोककलावंत हे फिरस्थी असल्याने त्यांच्या मुलांना शाळेचं दर्शनही कधी घडत नाही त्यासाठी फिरती शाळा करून त्यांना साक्षर करण्यात येणार आहे, तसेच लोककलेचा अभ्यास, संशोधन आणि त्यांचे कल्याण अशा तीन पातळींवर विद्यापीठ काम करणार आहे. लोककलावंतांसाठी ट्रॅव्हलिंग मॅप तयार केला जात आहे, राज्यात कोठे तमाशा सुरू आहे ते ठिकाण माहीत होण्यासाठी याचा उपयोग होईल आणि याद्वारे लोककलावंतांपर्यंत फिरती ओपीडी व फिरती शाळा पोहोचवणे शक्य होईल.



सिमाली भाटकर,  रत्नागिरी

      कला म्हटले की पु ल देशपांडे यांचे सुंदर विचार डोळ्यासमोर येतात " एखाद्या तरी कलेशी मैत्री करा कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी असलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल" 
      पुलं चे हे प्रेरणादायी विचार आजच्या लेखात मला कलेविषयी लिहिण्यास प्रेरित करतात. 
     महाराष्ट्र म्हणजे कलेचं दालन इथे हजारो कलाकार घडले. मराठी मातीतल्या कला मग कोंकण चा दशावतार, कोल्हापुरी तडफदार लावणी किंवा आदिवासींच्या पाड्यातील वारली नृत्य, शेतकरी नृत्य, सकाळच्या समयी संपूर्ण आसमंत मोहून टाकणारा वासुदेव असो किंवा तुकडोजी चे अभंग अशा अनेक कला या मराठी मातीत रुजल्या उमलल्या आणि फुलल्या. 
         आज जग बदललं माणसं 21व्या शतकात खूपच धावत जीवन जगू लागली आणि माझा कलाकार मातीतील कला जपता जपता माती मोल ठरू लागला. गरज आहे त्याला सावरण्याची आणि कलेचा वारसा जपण्याची. 
      समाजात हिप्पोप, वेगवेगळ्या प्रकारचे पाश्चिमात्य नृत्य प्रकार आज आपण टीव्ही रियालिटी शो ला पाहतो त्यात फारच अभावाने आढळते भारतीय राज्यातील विविध सांस्कृतिक कला, कारण मुलांना मायकल जॅक्सन tv वरती कळतो पण आपल्या मातीतील कला, संस्कृती ही आपण सांगणार असतो आणि त्यातूनच घडतो कलाकार आणि जपली जाते ती लुप्त होणारी कला. 
        अनेक ठिकाणी कथकली भरतनाट्यम सारखेक्लास चालतात पण लोककला ही कुठे शिकवली जात नाही तर ती जपावी लागते. 
        विविध  प्रकारातील नृत्य सादर करणाऱ्यां एक विनंती कधीतरी आपल्या मातीतील कलेला जपण्यासाठी आणि जगाला कळावं म्हणून आपली संस्कृती आणि कला यातलं काही सादर करा आणि कलेला जिवंत राहू द्या. 
       कोंकण सारख्या भागात नमन, दशावतार, पालखी सोहळा हे खूपच कमी होऊ लागले. शिमगोत्सव साठी ओसंडून वाहणारा उत्साह, समजू दे संपूर्ण जगाला. 
   मला इतकंच सांगायचं की कलाकार जगला तर कला जिवंत राहील आणि कलेतून संस्कृती जपली तर वारसा पुढे जाईल. 
    लावणी ही खूप सुंदर प्रकार पण लोकांनी त्याला नकोत ते लेबल लावले आणि लावणी हरवुन गेली. 
         आज अशा कलाकार मंडळी साठी आणि कले साठी उपक्रम राबविले पाहिजे 
      फार काही नको पण 4 पाश्चिमात्य नृत्यामध्ये एक तरी संस्कृती जपणार असावं. 
     फक्त महाराष्ट्र भारतात नाही तर संपूर्ण जगाला कळायला पाहिजे भारतातील नाना कला आणि ते जपणारे मायबाप कलाकार आणि साथ देणारे उत्साही प्रेक्षक.
      धन्यवाद


-जयंत जाधव,लातूर.
         आज अनेक लोककला व लोककलावंत शेवटच्या घटका मोजत आहेत.यासाठी कलावंता संबंधीचे शासनाचे नकारात्मक धोरण कारणीभूत आहे.लोक-कलावंतांना सरकारी मानधन मिळण्यासाठी अक्षरशः मंत्रालयात खेटे घालावे लागतात,मानधन तर भेटत नाही मात्र मृत्यू भेटतो. ‘मी कलाकार आहे’, असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगावे लागते किंवा  कागदी घोडा नाचवत मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.
लावणीचा अतिरेकी लाड ?
    लावणी म्हणजे  महाराष्ट्राचा सांस्कृतिक चेहराच असा सर्वत्र समज करुन टाकला आहे.उदा. सुरेखा पुणेकर हिने ‘नटरंगी नार’ सुरू केले. महाराष्ट्रातील राजकीय नेते यांचे  ‘लावणी’वर असलेले प्रेम लक्षात घेता लावणीला शासन दरबारी लाडक्या सूनेसारखे नाते किंवा स्थान मिळाले .अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये लावणी सादर होत असल्याने ‘ सिनेमांमधून विशेषत: लावणीचे सर्व प्रकार प्रसिद्ध झाले आणि सामान्य प्रेक्षकही लावणीप्रेमी झाला. शासनाच्या ह्या लावणीच्या अतिरेकी प्रेमामुळे महाराष्ट्रात अस्तित्वात असलेले आदिवासी, धनगरी तसेच इतर नृत्यप्रकार सध्या कोणत्या अवस्थेत आहेत याची साधी चौकशी करण्याची तसदी राज्याचे सांस्कृतिक खाते यांनी घेतली नाही.एक प्रकारे हे खाते पांढरा हत्ती ठरले आहे 
    महाराष्ट्राची संस्कृती ‘लावणी’च्या पलीकडे देखील आहे हे शासकीय कर्मचार्‍यांच्या डोक्यात प्रकाश केंव्हा पडणार?
लोककलाकारांना राजाश्रय मिळाला पाहिजे-
   लोककलाकार जगले तरच लोककला टिकेल उपाशी राहून कोणीही कलेचा अविष्कार करू शकत नाही. शासनाच्या  अनेक सामाजिक योजना आहेत पण त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही.  खेडोपाडी लोककलावंतांचे जाळे आहे.उदाहरणार्थ झाडीपट्टीतील नाटके. त्यांच्या कामाचे योगदान लक्षात घेता शासनाने त्यांच्या कलांचा उपयोग करून घेतला पाहिजे.  ‘एचआयव्ही एड्स जनजागृती’, ‘स्वच्छ भारत’ यांसाठी स्थानिक लोककलाकाराची ब्रँड अॕबेंस्डर म्हणून नियुक्ती करावी. यामुळे  जनतेच्या कल्याणाची माहिती अधिक तळागाळापर्यंत पोहोचवली जाईल, तसेच या आधारे लोककलांचे जतन आणि प्रसारही होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************