आजारी आरोग्य व्यवस्थेवर औषध काय?

🌱 वि४ 🌿

आजारी आरोग्य व्यवस्थेवर औषध काय?

IMAGE  SOURCE  INTERNET 

डॉ. विजयसिंह पाटील,कराड.

आरोग्य सेवेचे दोन भाग होतात, एक शासकीय व दुसरा खाजगी.
येथे मी शासकीय आरोग्य सेवा ह्याबाबत लिहीत आहे. 
शासकीय आरोग्य सेवा आजारी असण्याची कारणे प्रथम पाहू...
(1)..आरोग्यासाठी असलेली अर्थसंकल्पीय तरतूद ही अतिशय कमी आहे. महाराष्ट्र शासन हे, एकूण उत्पन्नाच्या फक्त अर्धा टक्का, आरोग्य सेवेसाठी वापरते.
शासन दरडोई फक्त 840 रुपये खर्च करते...
(2) आरोग्य सेवेतील डॉक्टरांची रिक्त पदे,,, ह्याच प्रमाण जास्त आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची पदे मंजूर आहेत, तिथं किमान एक तरी पद रिक्त असतेच. एकाच डॉक्टर ने, पेशंट तपासायचे, कुटुंब नियोजन चे operation करायचं, भागातील उपकेंद्रांना भेटी द्यायच्या, जि. प.,, पंचायत समितीच्या मीटिंग ला हजर राहायचे व इतर अनेक कामे... त्या मुळे कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतोच..
(3)ग्रामीण/कुटीर/सिविल हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे,,, फिजिशियन, सर्जन, हाडांचे डॉ, इत्यादी जर नसतील, तर तालुका, जिल्हा पातळीवर
दर्जेदार सुविधा उपलब्ध होत नाहीत...
(4) सरकारी डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करणे, इत्यादी
(5)डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था, अगदी वाईट नसली तरी, चांगलीही नाही, मूलभूत सुविधा पण काही ठिकाणी उपलब्ध नाहीत

जनतेला मोफत व चांगली आरोग्य सेवा देणे ही शासनाची जबाबदारी आहे, पण शासनाला ह्याचा विसर पडल्याचं दिसतं

आता ह्यावर उपाय काय ? 

(1) आरोग्यावर, अर्थसंकल्पीय तरतूद, किमान तीन हजार दरडोई करावी, काही राज्यात आहे, उदा, केरळ, गोवा..
(2) डॉक्टरांची रिक्त पदे शासनाने, लवकरात लवकर भरावीत, व हे फार अवघड नाही.
(3) तज्ज्ञ डॉक्टरांची पदे भरावीत, हे थोडे अवघड आहे,(कारण खाजगी प्रॅक्टिस सोडून, शासकीय सेवेत येण्याची शक्यता फार कमी) पूर्ण वेळ डॉ, मिळाले नाहीत तर part time डॉ ची नेमणूक करावी.. सध्या हा प्रयोग चालू आहे व बऱ्यापैकी यशस्वी पण होतोय.
(4)..खासगी प्रॅक्टिस वर निर्बंध आहेच, पण त्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक
(5) डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था ही चांगली च असली पाहिजे, व सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत




IMAGE  SOURCE   INTERNET

संदिप सावंत,

मुंबई


नमस्कार मित्रानो
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानवी जीवन फारच कष्टमय झालेले आहे. त्यातच भरीसभर म्हणून नवनवीन आजार उदयास येत आहेत. निपाह, स्वाइन फ्लू , लेप्टो स्पारोसिस, डेंग्यू इत्यादी शिवाय ह्रदयविकाराचे आजार किडनीचे आजार कर्करोगाचे आजार असे कित्येक भयंकर आजार आहेत. काहींवर उपचार उपलब्ध आहेत काहींवर संशोधन सुरू आहे. पण सर्वात मह्त्त्वाचे म्हणजे या आजारबद्दल असलेली माहीती आणि उपचार पद्धती. लोकांना याबद्दल पूर्ण माहिती नसल्याने खुप मोठी समस्या निर्माण होत आहेत. त्या आजाराची योग्य ती माहिती आणि उपचार जर लोकांना समजली तर मला वाटते नक्कीच जनजागृती आणि यशस्वी पणे आपण अश्या प्रसंगाना सामोरे जाऊ शकतो


IMAGE  SOURCE   INTERNET

सौदागर काळे,

पंढरपूर. 


डॉ.अभय बंग एका व्याख्यानात आरोग्यावर बोलले होते त्यातील एक वाक्य सांगणे महत्त्वाचे वाटते.ते म्हणतात, "पहिली आरोग्य सेवा श्रद्धाराज होती तर दुसरी नोकरराज आणि तिसरी पैसाराज बनली." 

त्यांचे हे वक्तव्य  आपल्याला आजारी आरोग्य व्यवस्थेवर औषध शोधायला लावते.आणि वास्तवता दाखवते.

आपल्या देशातील ग्रामीण व दुर्गम भागातील समाज कुठंतरी अंधश्रद्धामधून
मुक्त होत होत दवाखान्याकडे पाऊल टाकत आहे.पण तिथे आपले दवाखाने त्यांचा विश्वास संपादन करू शकले नाहीत.हे तेवढेच सत्य.याचं कारण अंधश्रद्धेपेक्षा आरोग्य व्यवस्थेच्या अपुऱ्या सोयीमुळे जास्त माणसे दगावली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.उदा.काही महिन्यांपूर्वी गोरखपूर (उ.प्र.) येथे घडलेले ऑक्सिजन अभावी बाल हत्याकांड.

खाजगी दवाखाने मुळातच श्रीमंत लोकांची पसंती आहे.पण तिथे बाह्यवातावरण स्वच्छ असले तरी उपचार स्वच्छ मनाने होईलच याची खात्री नाही.
सरकारी दवाखाने फक्त गरीब लोकांसाठी नावापुरते आहे. थोडक्यात रडक्याचे डोळे पुसल्यासारखे . तिथे जाणारा गरीब माणूस सरकारी दवाखाने दर्जात्मक आहेत म्हणून नव्हे तर पैशाअभावी पर्याय नसतो यासाठी जात राहतो.अन दीर्घकालीन आजाराचे शिकार होत राहतो

मग औषध काय? 
1.वैद्यकीय शिक्षण मोफत करणे.
2.दवाखान्याची पायरीच चढू नये म्हणून निसर्गपूरक आरोग्यदायी वातावरण जिवंत ठेवणे.
3.सरकारने मुळावर घाव घालावेत.म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय योजनेवर लक्ष द्यावेत. उदा.सार्वत्रिक मोफत शुद्ध पेयजल.
4.नागरिकांनी प्रत्येक पक्षाने सदृढ आरोग्य व्यवस्था ही त्यांच्या जाहिरनामाचा प्रथम अजेंठा करावा यासाठी दबावगट करावा.
5.देशातील प्रमुख मंदिरांचा उदा. शिर्डी, बालाजी यांच्या दानपेटीतील निम्मा निधी आरोग्य व शिक्षण व्यवस्थेवर खर्च करणे.


IMAGE  SOURCE   INTERNET


डॉ. दिलीप कदम,

अहमदनगर


सरकारी खर्चा ने चांगले उपचार मिळाले पाहिजेत ही अपेक्षा आज तरी पुर्ण होणे शक्य दिसत नाही.

खाजगी आरोग्य व्यवस्था नफ्याच्या प्रेरणेतुन निर्माण झाली आहे त्यामुळे शोषण हे होणारच.

लोक आणि वैद्यकीय व्यवसायिक यांनी एकत्र येवून सहकारी रुग्णालये सुरु करून कार्यक्षम पद्धतीने चालविणे हा एकमेव पर्याय सध्या तरी उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************