2050 नंतरचे विश्व आणि भारत.

2050 नंतरचे विश्व आणि भारत.

IMAGE SOURCE:INTERNET

प्रदिप इरकर,वसई जिल्हा-पालघर

सण 2050..
तेव्हा परिस्थिती कशी असेल?
आता जसे जगात रेल्वे चे जाळे पसरले आहे तसे बुलेट ट्रेन चे पसरले असेल काय बरं?
सार्वजनिक ठिकाणी चढावे लागणारे जिन्यांऐवजी सगळीकडे उद्धवाहक(lift) की escalator असतील सगळी कडे?
2020 मधेच चीन जपान मधील काही बँकांनी सर्व कार्यालय रोबोट च्या हवाली केलं आहे तर 2050 मध्ये आपल्याला सर्वच बँकांमध्ये रोबोट च दिसतील काय?
मानवाची आपली वस्ती चंद्रावर बसवण्याचे स्वप्न कुठपर्यंत आले असेल बार तेव्हा?
जगातील देशांनी किती क्षमतेचे क्षेपणास्त्र विकसित केले असतील?
कोणीतरी दोन माथेफिरू प्रमुखांमुळे तिसरे महायुद्ध झाले असेल काय?
जर झालेच तर मनुष्य हा प्राणी पृथ्वीवर जिवंत राहील काय?

आता ह्या सर्वात भारत पण असेल काय स्पर्धेत की फक्त *इंडिया* च असेल?
डॉ.कलाम ह्यांनी म्हटलेलं 2020 पर्यंत राहील 2050 पर्यंत तरी महासत्ता होईल काय?
महासत्ता होणे म्हणजे नक्की काय बरं?आपल्या देशाच्या आर्मी ला सर्व देशांनी घाबरले पाहिजे की देशातील *सर्व* नागरिकांचा राहणीमान सुधारले असले पाहिजे व सर्व नागरिक आनंदी असले पाहिजेत?

जी गरीब श्रीमंत दरी आहे ती भरली असेल काय?

गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेले वातावरण असेल राहून देशात अराजकता माजलेली असेल काय?
आपल्या मताविरुद्ध मत मांडले तर तेव्हाही *देशद्रोही* हा ठपका ठेवलेला असेल काय?
सहिष्णुता उरली असेल काय बरं?
काश्मीर प्रश्न सुटलेला असेल काय?
पानसरे,कुलबर्गी ह्यांचे मारेकरी गजाआड असतील काय?
मनुष्य हा सामाजिक प्राण्याऐवजी रानटी प्राणी झाला असेल काय बरं??
मुख्य म्हणजे

तेव्हा माणूस माणसासारखा वागत असेल काय??
IMAGE SOURCE:INTERNET

शिरीष उमरे,नवी मुंबई

जवळपास बत्तीस वर्षानंतरचे जग कसे असेल याचा विचार करायचा म्हणजे बघुया बत्तीस वर्षापुर्वी काय स्थिती होती...
१९८६ ला भारतात वायफाय मोबाईल टॅब तर सोडा साधा पेजर व कॉम्प्युटर पण कीत्येक लोकांना माहीती नव्हते. एसटीडी फोन, झेरॉक्स, रोलवाले कॅमेरे ह्यांची सुरुवात होती. टुव्हीलर व फोरव्हीलर चे लिमिटेड ऑप्शन होते. एलईडी एलसीडी चे नाव पण नव्हते... नुकतेच कलर टीव्ही बाजारात आले होते. चाळीस वर्षा अगोदर अाण्विक शस्त्राच्या वापराने जागतिक युध्दविराम व शितयुद्ध सुरु होते. इंदिरा गांधी हे वादळ शमुन त्यांचा मुलगा जो व्यावसायिक पायलट होता त्याने प्रधानसेवक म्हणुन देशाची सुत्रे हातात घेतली होती.

आत्ता मागे वळुन बघितल्यावर लक्षात येते की व्यापाराचे जागतिकरण व विज्ञान प्रगतीमुळे भौतिक सुबत्ता वाढुन निसर्ग र्हास कसा भयानक होत गेला ...
आज लक्षात येते की पाण्यासाठी तिसरे महायुध्द होऊ शकते. जागतिक आर्थिक महत्वाकांक्षा पायी इराक सिरिया सारखे देश बेचिराख केल्या जातात. जागतिक कंपन्या विकसनशील देश चालवतात. भेसळ व भ्रष्टाचार ईतका वाढलाय की पुढच्या पिढीचे आयुष्य व भविष्य धोक्यात आहे. आफ्रीकन देशाच्या नागरिकांची विकासाच्या नावाखाली गिनीपिग म्हणुन कत्तल केली जाते. शस्रात्रे विकल्या जावी यासाठी स्वत:च्या देशावर हल्ल्याचा कट करवुन आपलेच नागरिक मरवल्या जातात. आतंकवादाच्या नावाखाली धार्मिक उन्माद माजवल्या जातोय.

एक छोटीशी चुक पुर्ण जगाला काही क्षणात राखेच्या ढीगात परिवर्तित करु शकते. जर हा वासनेचा स्वार्थाचा भस्मासुर थांबवला नाही तर २०५० तर दुरची गोष्ट झाली... २०२० सुध्दा बघणे शक्य होणार नाही.

ह्या घाणेरड्या राजकारणात बदल घडवायचा असेल तर चांगल्या माणसांची सक्त गरज आहे ह्या जगात... एक तर चांगले बना कीॅवा चांगल्यांना सपोर्ट करा. खरा विकास हा माणुसकी चा व निसर्गाचा गरजेचा आहे. बाकी सब बकवास
 IMAGE SOURCE:INTERNET

अभिजीत गोंडसे,सातारा

         आपल्या भारताची लोकसंख्या एवढी अफाट वाढत आहे की ११ जुलै २०१८ नुसार १३५ कोटी लोकसंख्या झाली आहे. या माणसाच्या गर्दीत रोजची जगण्याची लढाई करताना सकाळी उठलेला माणूस संध्याकाळी कायमची जागा रिकामी करुण जगाचा निरोप घेतो की काय ! अशी अवस्था आहे. यातच उद्या काय होणार हे सांगणे कठीणच ! तर मग २०५० च्या नंतर काय असेल. कशा पद्धतीने माणसाला जगण्यासाठी स्पर्धा करावी लागेल हे सांगणे म्हणजे फार कठीणच. तरी थोडाफार अंदाज लावू शकतो आपण .

           तसे पाहिले तर शंभर वर्षीनी जगाचा इतिहास बदलत असतो. जगाचा इतिहास बदलण्यासाठी प्रमुख देश हे अगदी शित युद्धा पासून किंवा त्याच्याही अगोदर राहिले ते म्हणजे अमेरिका आणि रशिया. अमेरिका हा आपण केंद्र बिंदू माणला तर जे काही अजून तिस एक वर्षीने होईल ते अमेरिकाच घडवून आणू शकेल. कोणताही देश महासत्ता झालेल्या देशाचे अनुकरण करत असतो. पण याच जोडीला रशिया आणि उत्तर कोरिया यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण असणार हे नक्कीच. सध्या बड्या देशांचे अध्यक्ष हे हुकूमशाही असल्या सारखे वागताना दिसून येते. उत्तर कोरिया तर अनु युद्धाची भाषा बोलताना दिसत आहे. तसेच एका बाजूला असलेला इसिस सारख्या संघटनेचे प्रश्न आहेतच. इराक , इराण हे तेल सम्राट देश यांची ही भूमिका महत्त्वाची राहणार आहे. जर युद्धाची ठिणगी पडली तर 'तेल' हाच युद्धाचा क्रेंद बिंदू असू शकतो. जगातील व्यापार पाहता आयात - निर्यात , वेगवेगळ्या होणाऱ्या जागतिक परिषदा आणि त्या अनुषंगाने होणारे करार हे घटक ही त्या - त्या देशात मोठ्या प्रमाणात बदल करु शकतील. याच बरोबर 'पुथ्वी' वाचवण्यासाठी आणखी आधुनिक पद्धतीने बदल होत राहतील. संरक्षण सामुग्री , वेगवेगळ्या प्रकारची क्षेपनास्ञे यात निश्चित बदल होत आहेत. आता या सर्वात आपला भारत कुठे आहे ? तर तो आहे.

           जरी आपण विकसनशील असलो तरी ती आपली ओळख लवकरच पुसत जाताना दिसत आहे. नव्हे तर पुसनारच आणि एक 'विकसीत' झालेलो देश .अशी आपली ओळख संपूर्ण जगात होईल. महासत्ता होणारच किंवा त्या मार्गावर लवकर असनारच हे मात्र नक्कीच ! खरा बदल भारतात झाला तो १९९१ ला हे साल भारतासाठी खुप महत्त्वाचे आहे. उदारीकरण , खाजगीकरण , जागतिककरण ( उ खा जा) हे धोरण भारताने राबवले. सर्व क्षेत्रात भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केली. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. म्हणजे अगदी आत्ता - आत्ता फक्त ७० वर्षे झाली. त्या माणाणे खुप प्रगती झाली. आणि ती वाखण्याजोगी आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अंगाने भारत प्रगती करत आहे. संध्या आपला आर्थिक विकास दर ६.७ आहे. नक्कीच हा विकास दर वाढत जाताना दिसत आहे. अगदी मागील दहा- पंधरा वर्षीचा विचार केला तर दिसून येईल. की फारसे कोणाकडे मोबाईल फोन नव्हते , हे फेसबुक , ट्टीटर अशी माध्यमे नव्हती. आज ती सर्वांनकडे आहेत. हाच तर मोठा बदल झाला. डिजीटल युगात प्रवेश केला. आज इतर देशा प्रमाणे आपल्याकडेही निवडणूका या सोशल मिडीया वर लढवल्या जात आहेत! सांगायचा उद्देश हाच की बदल हा किती झपाट्याने होत आहे. अजून तिस एक वर्षी ने हे चित्र बदलेल घरातच मोबाईलवर ओटींग करता येईल. अजूनही काही भाग आपल्याकडे दारिद्रय रेषे खाली आहे. ही रेषा मुक्त होईल. सरकार कुणाचेही असो. आज भारतचा शिक्षणाचा टक्का वाढतोय बाहेरच्या देशात शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थीची संख्या झपाट्याने वाढत आहे. आणि याला सरकारी योजनाचे पाठबळ ही आहे. गेल्या चार - पाच वर्षीत सरकारने काही धाडसाने मोठ- मोठे करार केले , गुंतवणूक केली , अंतर्गत गुंतवणूक केली किंवा इथुन पुढे होईल याची फळे येणाऱ्या काही वर्षीत नक्कीच चाकायला मिळतील. त्या अनुषंगाने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून येतिल. संध्या भारताला जगात एक विशेष स्थान आहे. हे आपल्या सर्व सरकारच्या धोरणाची मुळ आहेत. हे नाकारता येत नाही. आपल्या देशातील 'लोकशाही' ही इतर देशासाठी मोठी प्रेरणाच आहे. परराष्ट्रीय धोरण आपले वाखण्याजोगे आहे. पर्यावरण , प्रदुषण , प्लास्टिक अशा घटकांनव तोडगा निघेल. दहशतवाद , अंतर्गत नक्षलवाद , शेजारी पाकिस्तान सारखे देश , जम्मू - काश्मीर , आरक्षण अशा मुद्दावर भारत नक्की मात करेल. थोडक्यात भारत हा तरुण अवस्थेत आहे. त्या अनुषंगाने प्रगतीची वाटचाल चालू राहील. अमेरिकेच्या 'न्यू वल्ड वेल्थ' च्या अहवालानुसार भारत जगात सहावा श्रीमंत देश आहे. तो पहिल्या तिन मध्ये नक्कीच आलेला दिसेल. तसेच २०१७ च्या 'विश्व आनंदी अहवाल' यादीत भारताचा क्रमांक १२२ आहे . तो नक्कीच पहिल्या ५० मध्ये येईल. २०५० नंतर विश्व आणि भारताचे वेगळे चिञ पहायला मिळेल.

                  अशा एकंदरीत चांगल्या वातावरणात आपण आहोत. की ज्या देशात गांधी , नेहरु , पटेल , आंबेडकर इ. राष्ट्रपुरुष होऊन गेले. येवढ्या जाती , धर्म , पंत , परंपरा आहेत. तरी आपण सर्व 'एक आहोत'. हेच काय ते आपले यश आहे. हेच आपल्याला २०५० नंतर देखील उपयोगी पडेल आणि त्याच वेळी आपण नक्कीच जगाच नेतृत्व करण्यासाठी पुढे असू .
IMAGE SOURCE:INTERNET 

सौदागर काळे,पंढरपूर

2050 नंतरचे जग आणि विशेषतः भारत कसा असेल! हे हातात नाही पण कसे असायला हवे? हा विचार करणं तरी हातात आहे.

1.ऑलिपींक मध्ये सुवर्णपदक तालिकेत भारत टॉप 5 मध्ये असलेले हवे.

2.देशाचा काश्मिर प्रश्न अहिंसा मार्गाने सुटलेला असायला हवा.

3.गरीबी हटाव ,अच्छे दिन,प्रत्येकी 15 लाख खात्यावर अशा भूलथापांना न भुलवण्याएवढा समाज साक्षर झालेला असावा.

4. अन्न, वस्त्र,निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत मानवी गरजांच्या समस्यांचा सामना करण्यासाठी जगातील सर्व देश एकत्र दिसायला हवेत.

5. ‎देशाच्या सुरक्षा यंत्रणेवरील खर्च कमी झालेला दिसावा.
IMAGE SOURCE:INTERNET

सचिन पाटील(शब्दवेडा),जळगाव

"अमेरीकन राष्ट्राध्यक्षांचा भारतासोबत मैत्री व्हावी म्हणून म्हसोबाला नवस"
ही बातमी सकाळी सकाळी आणि रात्रीच भेटलेल्या Fuck and forget relationshipची डील झालेल्या भौतिक प्रेयसीच्या कुशीतून बाहेर आलो...
आजही 2015 ते 2020 चा कालखंड आठवला की मनात आनंदाच्या लहरी ऊठतात आणि 1990 च दशकाच्या आठवणी तर जणू स्वर्ग सुखच आहे. पण आज 2050 साली काळ पुरता बदललाय...2020 साली महासत्ताक होण्याच स्वप्न पाहणारा माझा भारत खूप जवळचा वाटला पण मागच्या तीन दशकाच्या प्रवासात भारत महासत्ता झाला पण पूर्णतः नव्या रुपात समोर आला..
 आज गीतेच्या पारायणासाठी आम्ही जपानमध्ये जातो,तर म्हसोबाच्या यात्रेला अमेरीकेत..आपण तंत्रज्ञानात जगाचे बाप झालो पण आपलच तत्वज्ञान मागे सोडून आलो.अमेरीकन महीलामंडळ नऊवारीत भारतात आल आणि शाँर्ट कर्ट घातलेल्या भारतीय महीलांनी त्यांच जोरदार स्वागत केल..आज भौतिक सुखात लोळत असतांना अगदी घरातली देवपुजाही रोबोट करुन घेतोय आणि आई वडीलांचा आशिर्वादही online प्राप्त होतोय.
आज 2050ला देशात काय चाललय,तर भारत जागतिक महासत्ता होऊन दशक ऊलटलय,जगाला क्षणात नष्ट करण्याच बटन पंतप्रधानंच्या हातात आलाय आणि दहा वर्षापूर्वी नेस्तानाबूत झालेल्या केनियाच्या अध्यशांची आत्मा आपल्या पंतप्रधानांच्या अंगात आलीय..जगात सर्वाधीक लोकसंख्या असलेल्या भारताची लोक ही चंद्रावर भाड्याने राहताय आणि नव्याने सांपडलेल्या ग्रहाला देशाचे माजी पंतप्रधान नरेद्र मोदिंच नाव द्याव की स्वर्गीय राहुल गांधीच हा नवा राजकीय वादाने सरकार ब्लाँगच्या चव्हाट्यावर आलाय.मराठा क्रांती मोर्चाने आपल्या मराठा समाजाच्या सर्व टेक्नाँलाजी ब्लाक करुन सरकारला कोंडीत धरलय तर एका 22 वर्षीय तरुणावर होय तरुणावर झालेल्या बलात्काराने दिल्ली धगधगतेय. मुंबई हवाई कारच्या प्रदुषणाने धारावी ऊच्च वर्गीय मध्यम श्रीमंत बेरोजगारांनी रोजगार उपलब्धीचे मानवी कार्य मिळणार आहे.
2050 च्या युगात भारतासोबत विश्वाचा विचार केला तर भारतीय संस्कृतीच्या अस्तित्वाचे हुबेहुब दालन ऊभे केलेय,दक्षिण आफ्रिकेतील भव्य गीता मंदिराची पायाभरणी झालीय तर दुसरीकडे पाकिस्तानने महासत्ताक भारताला घाबरत युनोच्या माध्यमातून स्वताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषीत केलय.भारत महासत्ता झाला पण आपली संस्कृती-साहीत्य-कला-संगीतचा लोप करुन गेला असा खेद युनोने व्यक्त केला.
खरतर नवे ते हवे असल तरी जुने ते सोने याचा विसर जणू भारताला झालाय.2050 चा भारत आणि विश्व हा प्रवास भौतिक प्रगतीचा तर वैचारिक ,सांस्कृतिक अधपतनाचा ठरलाय.एकवेळ पाकीस्तान धर्मनिरपेक्ष होऊ शकतो पण भारतातला अंतर्गत कलह मात्र संपणारा दिसत नाही.
मग हा शब्दवेडा कवि जेव्हा ह्या अंगाने वास्तविकतेचा विचार करतो तेव्हा हेच म्हणावस वाटत.....
2050 च्या भारतात
तंत्रज्ञान वरचढ झालं
पण भारताच्या पंरपरेला
आपल्यांनीच पोखरुन नेल.

घर-संसारात मदतीला
गूगल झाला राजी
पण कुठेतरी हरवुन गेली
गोष्ट सांगणारी आजी

फेसबूक,whats app,Insta ने
सार जग जवळ आलं
पण तुमच्या आमच्या ह्दयातल
अंतर मात्र वाढत गेल...

आध्यात्म ,संस्कार आणि संस्कृती
विसरुन सारी पाळमूळ
तंत्रज्ञानाचा जग आलं फसवं
असच काहीस असेल
2050 चा भारत आणि विश्व,
IMAGE SOURCE:INTERNET

सानप बालाजी,बीड

          2050 साली भारत एक भारत एक महासत्ता झालेला असेल,
पण सध्या भारताची जी एक ओळख आहे ती भारत विसरलेला असेल ती ओळख म्हणजे संपूर्ण जगाची *अध्यात्मिक राजधानी*.
सध्या भारतीय स्त्रिया आणि पुरुष पाश्चिमात्य लोकांचे अनुसरण करण्यात लागलेले आहेत,त्याचेच प्रकट रूप (विस्तारित रूप) आपल्याला येत्या काळात दिसेल असे मला वाटते. याचे उत्तम उदाहरण पहायचे झाल्यास ते खालील प्रमाणे आहे,
           1)सध्याची परिस्थिती पाहता *अमेरिकेच्या 70% विद्यापीठामध्ये भगवद्गीता शिकवली जाते* त्याउलट भारतामध्ये तसा प्रयोग होऊ लागला तर सरकारवर टीका होते.
          2)देश विदेशातील लोक भारतामध्ये आल्यावर किंवा त्यांच्या देशामध्ये धोती-कुर्ता, साडी इत्यादी भारतीय गोष्टींचे अनुकरण करत आहेत याची कितीतरी उदाहरणे माझ्याकडे आहेत, त्याउलट भारतामध्ये भारतीय नागरिक जीन्स, मिनी स्कर्ट, आणखी कशाचा कशाचा वाफर होऊ लागला.
          (इतकंच नव्हे तर माझ्या एका मित्राच्या कॉलेजमध्ये *be a professional* या ब्रीदवाक्याखाली विद्यार्थ्यांना भर वर्षभर विशेषतः संपूर्ण उन्हाळ्यात सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 पर्यंत *ब्लेझर* नावाचा प्रकार घालून दिवसभर घामामध्ये भिजत राहावं लागत आहे. मग ते ब्लेझरच वतातवरण भारतीयांना पोषक असो किंवा नको फक्त आणि फक्त पाच्छात्यांचे अनुकरण.)
          (आणि जे भारतीय लोक धोती, कुर्ता, पायजमा, नेहरू शर्ट, साडी इत्यादी घालतात त्यांच्याकडे वेगळ्या(तुच्छतेने) पाहणारेही काही नग भारतात आहेत)
          3)विदेशात आयुर्वेदावर रिसर्च चालू आहेत, आपण आपल्याच पूर्वजांच्या रिसर्च ला विसरून नको त्याच्या नादी लागत आहोत.
          भारत 2050 साली महासत्ता होणार यात तिळमात्रही शंका नाही पण,
माझ्यामते भारत आपली जुनी आणि खरी ओळख न विसरता व तंत्रज्ञानाच्या मदतीने 2050 साली जगातील 1 नंबरचा देश व्हावा अशी इच्छा.
IMAGE SOURCE:INTERNET

समीर सरागे,नेर,जि. यवतमाळ

आज आपला भारत देश विकसनशील देश , व्यापारी आणि औद्योगिक आणि कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु ईथुन 50 वर्षा नंतर भारत देशाची ओळख सर्वात लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखल्या जाणार आहे., कारण लोकसंख्याच्या बाबतीत भारत येत्या काळात चीन ला देखील मागे टाकेल , तेव्हा भारताची लोकसंख्या 160 कोटीच्या वर पोहोचलेली असेल

 वाढत्या लोकसंख्ये मुळे लिंग अनुपात बिघड़ला आहे. उत्तर प्रदेश बिहार आणि दक्षिण भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. 2017 मध्ये भारताची लोकसंख्या 119 कोटी 80 लाख नोंदविल्या गेली होती तर येणाऱ्या सन 2026 पर्यंत भारताची लोकसंख्या ही 38 कोटीने वाढेल

 ताज्या आकंड़ेवारि नुसार भारताची लोकसंख्या 130 करोड़ आहे ती सन 2050 पर्यंत 165 करोड़ ईतकी होईल व चिनची लोकसंख्या तो पर्यंत 142 करोड़ वर स्थिर होऊन जाईल.
लोकसंख्या ही जरी कोणत्याही देशाची ताकत असली तरीही तिचे राष्ट्रला नुकसान देखिल तेवढेच आहे. म्हणून चीनने कोणत्याच दबावाची पर्वा न करता एक परिवार एक मूल हा कायदा अमलात आनला. परंतु आपल्या देशात देशहितार्थ असे काही करण्याचा प्रयत्न झाला तर संविधान धोक्यात किंवा अमक्या अमकयाच्या धार्मिकते वर गदा अशे बालिश प्रश्न काही वचाळवीर बुद्धिजीवी आणि पुरोग़ाम्या कडून सतत होत राहील तेव्हा भारतात सद्या तरी हा कायदा नितांत गरज असून देखील होऊ शकत नाही.

भारताचे नेमके इथेच चुकले अन्‌ त्याचेही ‘परिणाम’ जगासमोर आहेत... जग-7.6 बिलियन, चीन 1,415,196, 638 आणि भारत 1,354,463,160.... युनायटेड स्टेट्‌स, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, नायझेरिया, बांगलादेश, रशिया, जपान... हे लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या दहात मोडणारे देश संख्येत तुलनेने खूप मागे आहेत. आजघडीला भारताची लोकसंख्या चीनच्या तुलनेत जराशी कमी वाटत असली, तरी लोकसंख्या ‘वाढी’च्या दरातील तफावत मात्र भारताला चीनची संख्या पार करायला पुढची काहीच वर्षे लागणार असल्याचे दर्शवते. त्यांच्या 0.39 च्या तुलनेत भारताचा 1.59 चा लोकसंख्या दरवाढीचा दर त्याच धोक्याची घंटा वाजवतोय्‌. वाढीचा घसरत चाललेला दर आणि प्रत्यक्षातील घटती लोकसंख्या, तरुणांच्या कमी होत चाललेल्या संख्येमुळे ‘म्हातार्‍यांचा देश’ ठरण्याची उद्भवलेली परिस्थिती, त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरते आहे. तर नेमकी त्याच्या उलट परिस्थिती भारताची आहे. हे खरे आहे की, गेल्या काही वर्षांत, वाढत्या महागाईमुळे म्हणा, कमालीच्या स्पर्धेमुळे म्हणा, की बदललेल्या परिस्थितीमुळे म्हणा, पण ‘एक दाम्पत्य-एक मूल’ असे सूत्र तर खुद्द नागरिकांनीच स्वीकारून टाकले आहे, सरकारच्या कुठल्याही बंधनाशिवाय! त्याचा स्वाभाविक परिणामही सर्वदूर दिसतो आहे. पण, तरीही हे नियंत्रण आणि त्यावरचे उपाय ही देशहितासाठीची ‘काळाची गरज’ न उरता काही लोकांच्या भावनिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा भाग झाल्यानेही काही प्रश्न इथे उद्भवले आहेत.


 जगाच्या तुलनेत भारत देशाचा विचार केल्यास दर वर्षी भारताची लोकसंख्या ही ऑस्ट्रेलिया देश निर्माण करते.

तसेच वाढत्या लोकसंख्ये बरोबर भूख , गरीबी आणि महगाई ची समस्या देखील यक्षप्रश्न निर्माण करेल.

 एवढ़या मोठ्या वेगाने जर लोकसंख्या वाढत राहिली तर भारतातील नैसर्गिक संसाधन अपूरे पडतिल आजच आपल्याला पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत आहे.तसेच दिवसें दिवस अन्न धान्याची उधभवनारी कमतरता ही महत्वाची समस्या असेल.कारण तेव्हा शेती करण्या करिता पाहिजे तितकी जमीन उपलब्ध नसणार. आजच्या घडिला इतकी वाहनांची संख्या वाढली आहे की, आत्ताच आपल्या महानगर आणि शहरातील रस्ते जाम झाले आहेत. ट्रैफिक हे चालत नाही तर रांगत असलेले आपल्याला दिसून येईल. इतकी वाहतूक कोंडी आहे. 2050 पर्यंत पेट्रोल - डीजल सारखे इंधनाचे स्त्रोत समपुष्टात येईल व त्यांची जागा इलेक्ट्रिक वाहने घेतिल, परंतु हे झाले परिवर्तन परंतु या सोबतच मानुष्याचा मृत्यदरात वाढ होईल.

 तसेच पेट्रोल डीजल ची वाहने समाप्त होऊन त्यांची जागा मेट्रो आणि विजेवर चालणाऱ्या गाड्या घेतिल ज्यामुळे प्रदूषण तर होणार नाही उलट त्या पर्यावरणाला खुप पूरक असेल. भारतातील शिक्षण व्यवस्था तोपर्यंत इतकी बदललेली असेल की, पुस्तक आणि विषयां एवजी एनिमेशन द्वारे पाठ्यक्रम शिकविल्या जाईल. आज सर्वाना इंटरनेट चे जसे वेड आहे तसेच वेड तेव्हाही असेल. त्यावेळी प्रत्येक जन डिजिटल वर्क करेल व तेव्हा चांगल्या चांगल्या तकनीक विकसित होईल जी आपल्याला उपयोगा करिता अत्यंत लाभदायक असेल.

2050 पर्यंत सरकारी नौकरी लागने फार दुरापस्त होऊन जाईल कारण एका आकडेवारी नुसार तेव्हा केवळ 15% लोकच सरकारी नौकरी करु शकतील बाकी लोकाना प्रायव्हेट जॉब करावा लागेल.

 सन 2050 ची जगातील बाकी राष्ट्रानी आता पासुनच तैयारी केली आहे. चीन , अमेरिका, यूएई आणि यूरोप सारख्या देशानी तर , प्रदूषण , ऊर्जा , वाहतूक ,ईंधन या करिता पर्याय शोधने सुरु केले आहे. व यावर काम देखील सुरु आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे यूएई सरकार ने तेथील कच्चा तेलाच्या विहिरी येणाऱ्या काळात संपनार आहेत असे जाहिर केले आहे.याचा अर्थ त्यांनी इतर देशाशी उदारमत वादी आणि आर्थिक धोरनात कमालीचे बदल केले आहेत. या कट्टर धार्मिक देशाने पर्यटन विकसावर लक्ष केंद्रित केले आहे म्हणून तेथील हुक़ूमशाह अब्दुल रेहमान शेख यांनी त्यांचे कट्टर धार्मिक कायदे शिथिल केलेले आहे. तीथे महिलांना वाहन चलविन्याचा परवाना नुकताच देण्यात आला तसेच महिलांना फुटबॉल सामने पाहण्याची परवानगी नुकतीच देण्यात आली आहे जी या पूर्वी नव्हती. तीथे भगवान श्री.कृष्णाचे भव्य मंदिर , बुर्ज खलीफा पेक्षा ही आकर्षक व ऊंच टॉवर उभे केले जाणार आहे. ज्या मुळे त्यांच्या पर्यटन व्यवसायात अधिक भर पडेल. व इतरही प्रकल्प राबविल्या जात आहे.

भारताने देखील अश्या प्रकारचे भविष्यतिल धोके लक्षात घेऊन यावर काम करणे गरजेचे आहे.
*=========================*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************