राजकारण हा विषय अभ्यासक्रमात असावा का ??

राजकारण हा विषय अभ्यासक्रमात असावा का ??

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

राजकारण हा विषय अभ्यासक्रमात असावा का ??

Source : INTERNET
- मनोज वडे
राजकारण हा विषय नक्की असावा कारण ,ही घराणे शाही हठवण्यासाठी  आज आमदाराचे मूले आमदार , सर्व सामान्य चं काय तो कधी येत च नाही ,कारण त्याला दररोज कसे 200 रुपये मिळवायचे हे पडलेले असत,
मग त्याला कधी आमदारांचे स्वप्नं पडावी ,लिहण्या सारखे खूप आहे पण लिहतो वेळ मिळेल तस आज थांबतो. 🙏



Source : INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद

             राजकारण हा विषय अभ्यासक्रमात असणं ही सध्याच्या काळातली गरज आहे; असं तरी माझ वैयक्तिक मत आहे. पण आपण विषयाअंतर्गत विद्यार्थांना काय देणार..?? हा महत्वाचा मुद्दाही लक्षात घ्यावा लागेल. कारण शिकायचं वयं असं असतं की, तिथे मिळणाऱ्या गोष्टी आपल्या पुढील भविष्याचा पाया बनत जातात. आजकाल बऱ्याचवेळा असं आपल्या देशात घडतं की, नेतेमंडळी किंवा सत्ताधिकारी यांच शिक्षण तितकसं नसूनही ते आपल्यावर राज्य करतात. इतकचं नव्हे तर काही जणांवर खटलेही चाललेले असतात. हे चित्र बदलायला जावं तर आपण सहसा पुढाकार घेत नाही. पुढाकार न घेण्यापाठी काही गोष्टी म्हणजे, एक तर आपण घाबरतो दुसरं आपल्याला वाटतं की, कदाचीत आपण चुकीचे ठरलो तर काय..? यांसारख्या बऱ्याच गोष्टी असतात.
          आपल्या देशातल्या तरूणाईला सर्वधर्मसमभाव हा आज सोशल मीडियातून सांगायची वेळ का येते...? आमची तरूणाईला समाजात वावरताना तोच समाज मोठा होताना का चुकीचा भासू लागतो...? यावर तरूणांनीच विचार करणं गरजेच आहे. राजकारण हा विषय देशाला विकसीत, आर्थिकरित्या सक्षम व इतर चांगल्या हितोपयोगी गोष्टी देण्यासाठी तरूणांपर्यंत अभ्यासक्रमातून पोहोचला जावू लागला तर मला वाटतं निश्चितपणे देश घडण्याची तिव्रता वाढेल व देश वेगाने सर्वार्थाने प्रगतशील राष्ट्र होईल.


Source : INTERNET
-करण बायस,
जि. हिंगोली

भारतीय राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. राजकारणात जास्तीत जास्त लोक हे स्वार्थ आणि मोहाच्या पायी उतरतात. आपण स्वतःचा फायदा कसा करून घ्यावा हाच नेमका ध्येय असतो. भारतीय राजकारण हे एका धंद्याप्रमाणे झाला आहे.
जास्तीत जास्त राजकारणी लोकांना देशाच्या विकासाशी घेणंदेणं नाही ते फक्त स्वतःची बाजू आर्थिक दृष्टीने कशी मजबूत होईल ते बघतात.

अशा स्तिथीत भारतीय राजकारणाला एक फक्त शिक्षीत नसलेला तर प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असलेल्या नेत्याची गरज आहे. असा नेता ज्याच्या कामात स्वार्थ नसला पाहिजे, ज्याला जनतेचा पैसा बघून मोह/लालच होता कामा नये.राजकारण हा विषय  अभ्यासक्रमात असला पाहिजे याची गरज वाटत नाही पण खरी गरज आहे प्रत्येकाला समाजाची जाणीव असली पाहिजे.

पण सध्या भारतात चित्र उलटं आहे राजकारणी लोक स्वतः च्या फायद्यासाठी तरुणांना दारूसारख्या व्यसनांना लावतात आणि तरुण आनंदी आहेत. भारतात लोकशाहीची व्याख्या पण बदलली आहे इथे जनता आपला नेता निवडत नाही तर निवडणुकीत उभा असणारा नेता 500-1000 रु देऊन आपलं मतं ठरवत आहे.
आणि हे बघून राजकारनांत येणाऱ्या नवीन तरुण पिढी वर हेच संस्कार पडत आहेत.
तरुण पिढी जात,धर्म वाद,विरोधी पक्षाने स्वतःची सत्ता गेल्यामुळे आंदोलनं भडकवतो जो की विरोधी पक्षाच्या फायद्या साठी असतो आणि तरुण मुलं आपला वेळ घालुन त्यात शमील होतात, खुप चिंताजनक गोष्ट आहे.
*राजकारण हा विषय अभ्यासक्रमात नसला तरी चालेल पण अभ्यासक्रमात माणुसकी शिकवणारा,गरिबांच्या पोटाचा प्रश्न कसा सोडवता येईल आणि कृषिप्रधान देशाचे प्रश्न कशा प्रकारे सोडवता येतील हा विषय नक्कीच असला पाहिजे.*


Source : INTERNET
-मयुरी देवकर,
ता. माळशिरस जि सोलापूर

          भारतीय राज्यप्रणाली 'लोकशाही ' या तत्वावर अवलंबून आहे.आज आपण पाहतच आहे की, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडेच प्रत्येक गोष्टीत 'राजकारण' चालतंय ....आता प्रश्न असा आहे की हा विषय अभ्यासक्रमात असावा का???
          खरंच आजच्या घडीला हा विषय अभ्यासक्रमात आणण्याची गरज आहे. राजकारण, समाजकारण या संकल्पना ,त्यांचे अर्थ खऱ्या अर्थाने विद्यार्थीदशेपासूनच समजले तर फक्त आणि फक्त घराणेशाही,हुकूमशाही यांचे वर्चस्व असणारे सध्याचे राजकीय चित्र पालटेल..... राजकारणाचा अभ्यास करून ,राज्यप्रणालीविषयी सर्व माहिती घेऊन ,त्याविषयीचे ज्ञान घेऊन जर राज्याचा किंवा देशाचा कारभार चालू लागला तर नक्कीच प्रगतीकडे वाटचाल होईल. आपल्या समाजातील सध्याची परिस्थिती ,सामाजिक प्रश्न,विविध योजना,त्यांची अंमलबजावणी कशी करायची या साऱ्यांचा समावेश राजकारण या विषयाच्या अभ्यासक्रमात करावा व फक्त आणि फक्त प्रश्नोत्तरे लिहुन ,गुण मिळवून पूढे न जाता त्यामध्ये प्रात्यक्षिकही असावे....यामधून ढासळत चाललेली नीतिमत्ता,सर्वसामान्य नागरीकांचा लोकशाहीवरील उडत चाललेला विश्वास हे प्रश्न मार्गी लागणं हीच आज काळाची गरज बनली आहे.' प्रत्येक क्षेत्रात राजकारण करण्यापेक्षा राजकारणाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात करायला हवा '. यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे राजकारण म्हणजे काय??आणि यासाठीच राजकारण हा विषय अभ्यासक्रमात असावा…


Source : INTERNET
-समीर सरागे,
नेर

आपल्या भारताची संपूर्ण विश्वात सर्वात मोठा  लोकशाही प्रधान देश अशी ख्याती आहे. कारण या देशात मागील 7 दशका पासून संसदीय लोकशाही प्रणाली अस्तित्वात आहे.  निवडणुका हा या प्रक्रियेचा मुख्य भाग होय. लोकशाही टिकवायची असेल तर राजकारण देखील त्या प्रकारचे असणे गरजेचे असते. केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करणे आणि मध्यावधिला सामोरे जाने म्हणजे राजकरन नव्हे ती सत्ता प्राप्तिची लालसा असून एक प्रकारे संधी साधू पणा होय.  अलीकडे लोकशाहीचे राजकरनातील अस्तित्व बघता प्रत्येक नेता सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष मतदाराना भूरळ घालण्यात आणि आपला हिताचा स्वार्थी अजेंडा चलविन्यात गुंतला आहे. त्या करिता नवनवीन कलुपत्या या मंडळी वापरत असतात. कधी अल्पसंख्याकाना खुश करण्या साठी टोप्या घालने ,कधी बहुसंख्याची मते आपल्या पदरात पाडूंन घेण्या साठी मंदिर दौरा करणे जानवं वैगरे घालने ,एवढेच नव्हे तर विवादास्पद वक्त्वये करुण विशिष्ट समाजाची किंवा धर्माची मते आपल्या पदरात पाडून  घेण्या करिता लांगूल चालण करणे किंवा त्या करिता प्रयत्न करणे वैगरे परंतु याला सोईचे आणि स्वार्थी राजकरन म्हणावे लागेल, कारण ही धडपड करने म्हणजे त्यांचे स्वतःचे अस्तित्व टिकविन्या करिता कलेले शर्थिचे प्रयत्न होय. म्हणजे चांगल्या सामाजिक मुद्यावर किंवा विकासावर, जनतेच्या मूलभूत गरजा वर , जागतिक प्रदूषण , आतंकवाद, ईत्यादी वर खरेतर राजकारण असायला हवे. परंतु इथे मात्र देशाच्या सुरक्षेला व देशाच्या सर्वभौमत्वला एवढेच क़ाय तर देशाचे दिवस रात्र रक्षण करणाऱ्या सिमेवरच्या जवाना वर (सिमेच्या सुरक्षे करिता केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वरुण राजकारण तापविल्या जाते.) म्हणजे संधी साधु लोकानकड़ून  देशहिता सरख्या संवेदनशील मुद्दयला डावलून राजकारण केले जाते. इतके खालच्या स्तराला या देशाचे राजकरण आणि राजकारणी पोहोचले आहे. आणि म्हणून सुज्ञ जनता त्यातही आजची युवा पीढ़ी राजकारणाच्या फंदात पड़त नाही. व चार हात दूर राहन्याचा प्रयत्न करते. आणि हेच चित्र आपल्याला बदलवायचे आहे. आणि अशा खालच्या पातळीवरच्या स्वार्थी राजकारना मुळेच आज आपल्या युवापुढीच्या मनात राजकरना विषयी तसेच राजकरण्या विषयी विशेष घृणा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यात चांगले लोक बोटावर मोजन्या इतके आहे. ज्यांची या सिस्टीम ला बदलविन्याची इच्छा आहे ते एकतर यात टिकत नाही किंवा पुन्हा निवडून येत नाही. या करिता युवकामध्ये राजकारणा विषयी सकारात्मकता आणि त्याचे लोकशाहितील महत्व ,त्याचे गांभीर्य कळले पाहीजे. केवळ राजकारनावर चर्चा व वाद-विवाद घालने म्हणजे  आम्हाला राजकारण समजते असे नाही या उलट आपल्या देशातील 60 टक्के युवा पीढ़ी राजकारणा पासून अलिप्त राहते.(म्हणजे काहीजन तर निवडणुकी सारखा दिवस सुट्टी आणि मनोरंजनाचा दिवस म्हणून पाळतात. व त्या वेळेस मतदानाचा हक्क न बजावता हे संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार आहेत. व हिच राष्ट्रीय कर्तव्य व जबाबदारी ते पार विसरून जातात. आणि हेच लोक पुढे लोकशाही धोक्यात आहे म्हणून किंचाळतात) त्यांना लोकशाहीत घडणाऱ्या घडामोडिशी काही देणे घेणे नसल्याचे निदर्शनास येते. लोकशाही पद्धतितील स्थानिक स्वराज्य संस्था पासून ते लोकसभा पर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेत तरुणांची महत्वाची भूमिका असु शकते कारण हे तरुण सुज्ञ आहेत देश निर्माण करण्याची आणि देशाला महाशक्ति बनविन्याची त्यांच्यात उमेद आहेत एवढेच नव्हे तर त्यांच्या मध्ये योग्य लोकप्रतिनिधि निवडून देण्या इतपत ते  सुज्ञ आहेत. याही पेक्षा भयंकर बाब म्हणजे काही लोकाना तर आपल्याला मिळालेला मतदानाचा हक्क बजवाने देखील कंटाळवाने काम वाटते म्हणून दिवसेंदिवस मतदानाच्या टक्केवारीत घसरन होत आहे. मग हे तरुण राजकारणा विषयी इतके उदासीन का ? हा प्रश्न निर्माण होतो. एखादा चारित्र्य हीन , भ्रष्टाचारी, घोटाळबाज लोकप्रतिनिधि जर निवडून येत असेल तर आपल्याला त्याला बोलन्याचा काही एक अधिकार नाही! कारण आपण आपली जबाबदारी मतदानाच्या वेळी पार पाडली नसते. त्यावेळी आपण मनोरंजन म्हणून ती संधी घालवतो परिणामी संधिसाधु राजकारणी तुमच्या मांनगुटिवर बसतात. आणि आपल्या याच राजकीय अज्ञानामुळे आपण चांगले लोकप्रतिनिधी निवडण्यात चूक करतो.

आपला देश जगात सर्वात तरुण देश आहे कारण या देशातील 60 टक्के जनता  ही तरुण आहेत.
असे म्हणतात की,   *राजकारण हेच कोणत्याही देशाचे भविष्य सुनिश्चित करत असते."* आणि ते 100 टक्के योग्य आहे. म्हणून तरुणानी अधिकाधिक राजकारणात सक्रिय सहभाग घेणे अनिवार्य आहे. जगातील एवढ्या मोठ्या लोकशाही प्रधान देशात लोकशाही अस्तित्वात आनण्या करिता  राजकारणाला केंद्र स्थानी ठेवल्या जात असते. या विषयी व्यापक जनजागृती होने गरजेचे तर आहेच सोबतच या विषयीचे शिक्षण सर्वच अभ्यासक्रमात समाविष्ट करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. ज्या मध्ये राजकरणा विषयी सकारात्मक दृष्टिकोण , देशाला केंद्रस्थानी ठेउनच राजकारण असले पाहीजे, आरोप प्रत्यऱोपाने देशहिताला व देशाच्या सर्वभौमत्वाला बाधा पोहचता कामा नये वैगरे, लोकप्रतिनिधिची कर्तव्ये व जबाबदार्या, राजकारणाचे संसदीय लोकशाहितील महत्व, तरुणांची  भारतीय राजकारनातिल महत्वकांक्षा ,मतदनाचा हक्क व जबाबदरी इत्यादी, परंतु राजकरणांचा
शैक्षणिक  पाठ्यक्रमात समावेश केला म्हणजेच युवा वर्ग आकुष्ट होईल.असे नाही. त्या करिता राजकरना बरोबरच समजकारन ही तितकेच महत्वाचे आहे. त्या करिता प्रत्येकच व्यक्तीला जनसंपर्क वाढवावा लागेल.आणखी एक बाब म्हणजे जसे रोजगार निर्मिती मध्ये शैक्षणिक संस्थाची संघटनांची निर्मिती झाली आहे. विविध क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या गुनवत्तेचा आणि कलेचा उपयोग करुण प्रावीण्य मिळवितात   अगदी तसेच राजकरणा विषयी राजकीय मार्गदर्शन ज्या मध्ये देश निर्मिति व देशाच्या विकास या संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या संस्थाची निर्मिती होने गरजेचे आहे. या उलट पाठ्यक्रमा सोबतच राजकरना संदर्भात विशिष्ट कायदे बनविन्याची सद्याच्या घडिला अत्यंत गरज आहे. जसे नौकरी मध्ये वयोमर्यादा घालून दिलेली असते ज्या प्रमाणे विशिष्ट वय झाले की सेवानिवृत्ति निश्चित असते अगदी त्याच धरतीवर राजकारणात देखील वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता निश्चित कण्यात यावी जेने करून नव नवीन युवा लोकप्रतिनिधि  या राजकारणाचा या संसदीय लोकशाहिचा भाग बनू शकेल व त्यांचे विचार व चांगल्या संकल्पना या देशाच्या सर्वांगीण विकसात ,देशाच्या जड़न घडणा मध्ये, देशाच्या निर्मिति मध्ये उपयोगी पडेल. तसेच राजकारणातील आतापर्यंत चालत आलेली किंवा सद्या अस्तित्वात असलेली घराणेशाही पद्धत व मक्तेदारी काही प्रमाणात होईना संपुष्टात येईल.

चांगले लोकप्रतिनिधि निवडून यायला हवे असे सर्वाना वाटते म्हणून प्रत्येक क्षेत्रातील गुणवंत व प्रख्यात व्यक्तिची राजयसभेवर निवड होत असते. म्हणून त्या करिता राज्यसभा आहे. *(जे लोक उच्च शिक्षित आहेत, जे लोकसभेत  विधानसभेत निवडून येऊ शकत नाही परंतु त्यांच्या गुणाचा व अनुभवाचा फायदा या देशाला , लोकशाहीला , देश निर्मिति मध्ये होऊ शकतो आशा व्यक्तिना ज्यानी आपल्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविले आहे अश्या लोकांच्या गुंणाचा  त्यांच्या अनुभवाचा फायदा देशाला व्हावा म्हणून त्यांची राजयसभेत वर्णी लावल्या जाते. संसदीय लोकशाहितील ही एक बाब अतिशय छान आणि कौतुकास्पद आहे.)*

आपल्या  संसदीय लोकशाहीत एकच एक लोकप्रतिनिधिस निवडून देण्याची पद्धत आहे.यामुळे राज्यकारभारात त्या व्यक्तिला एकाधिकार प्राप्त होऊन याचे रूपांतर मग घोटाळ्यात होते.यावर एकच उपाय म्हणजे  तरुनानी राजकारणात सक्रिय सहभाग घेणे व लोकशाहितील राजकारनाचे खरे महत्व क़ाय हे समजून घेणे देखील गरजेचे आहे. तेव्हाच भौतिक दृष्टया लोकसंख्येने तरुण असलेला देश राजकीय दृष्टया देखील तरुण देश अशी आपल्या देशाची ओळख निर्माण होईल. तसेच आजचे  तरुण हे उच्च शिक्षित असल्याने व ते जिज्ञासु महत्वकांक्षी असल्याने येणारे भारतीय लोकशाहीचे भविष्य नक्कीच उज्वल असेल.


Source : INTERNET
-अमोल धावडे,
अहमदनगर

आपल्या भारत देशात लोकशाहीची परंपरा लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या विकासासाठी तयार केलेली एक सिस्टीम. लोकशाही मध्ये लोक जो नेता निवडून देतील त्याच्या हातात सत्ता पण काय होत चालय हेच लोकांना माहीत नाही सगळीकडे राजकारण राजकारण. ज्या वेळी निवडणूक येतील त्या वेळेला राजकारणी लोकांना जनतेची आठवण येते एकदा का निवडुन आले पाच वर्षे डोकावूनही ही राजकारणी लोक जनतेकडे पाहत नाही मग कसा विकास होणार आपण आपला देश 2020 मध्ये महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे परंतु असे जर राजकारण असेल तर ते शक्य नाही.
मला वाटते की आपण ज्या वेळेस निवडणूक घेतो त्यावेळेस निवडणूक आयोगाने अशी तरतूद केली पाहिजे की योग्य सुशिक्षित व्यक्तीच राजकारणत येऊ शकतो अन्यथा त्याला कुठल्याही प्रकारची संधी नाही. आणि त्यांची परीक्षा घेऊन त्यांना जो त्यात उत्तीर्ण होईल तोच निवडणूक लढाऊ शकतो.
पण आता चालाय काय घराणेशाही खासदारांचा मुलगा आमदार कुणी नगरसेवक तर कुणी सदस्य घरातल्या घरात सर्व पदे त्यामुळे कुठूनही आलं तरी ते आपल्याच घरात येणार असं त्यांचं समज पण हे सगळं थांबुन एक सामान्य जनतेच्या हातात सत्ता दिली तर तो नक्कीच चांगले करण्याचा प्रयत्न करेल.
आपल्या भारत देशात तरुणाची संख्या सर्वात जास्त आहे आणि हे राजकारणी लोक त्यांचा वापर करून त्यांना सोडून देतात.
राजकारण हा विषय  जरी अभ्यासक्रमात आला तरी काय उपयोग जी घराणेशाही सुरू आहे तीच रहाणार आहे फक्त त्यात जर बदल करून त्यांचे शिक्षण तपासून संधी दिली तर नक्कीच बदल होऊ शकतो.
आलेला अनुभव दोन शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो एकदा मी पोलीस निरीक्षक दर्जा असणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितले की हे राजकारणी लोक त्यानं क च ख कळत नाही अशा व्यक्तीला आम्हला सलाम करावं लागतो पण करणार काय लोकशाही लोकांनी निवडून दिलेला नेता. आय ए एस असणाऱ्या व्यक्तीला आमदार खासदार यांना सलाम करवा लागतो एवढे कष्ट करून हे लोक उत्तीर्ण होतात परंतु सातवी पास व्यक्तीला सलाम करावं लागतो त्यामुळे क्वालिटी असणारी लोक जर राजकारणात असतील तर नक्कीच आपला भारत देश महासत्ता होईल.
त्यासाठी अभ्यासक्रमात राजकारण हा विषय घेऊन काय उपयोग जनतेच्या हातात सर्व गोष्टी असतात.
धन्यवाद........


Source : INTERNET
-R. सागर,
सांगली

राजकारण.. शहरी भागाबद्दल जास्त माहीत नाही पण खेड्यापाड्यात अतिशय चवीनं चघळला जाणारा विषय.. राजकीय कट्टरता काय असते हे बऱ्याचदा खेडेगावात गेलं की लगेच लक्षात येतं. कित्येकदा हे राजकारण इतकं टोकाचं असतं की सख्खे भाऊही या राजकारणामुळे पक्के वैरी बनतात तर कधी पक्के वैरीही राजकारणासाठी एक होतात. दुसरीकडे राजकारणात राहून मालामाल होणारे नेतेही बघितलेत आणि त्या नेत्यांच्या मागे फिरून स्वतःच्या आयुष्याची आणि कुटुंबाची फरफट करणारे कार्यकर्तेही बघितलेत. आणि यातूनच राजकारणाचे बाळकडू नवीन पिढीला मिळत आहेत. अशा वेळी राजकारण हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे.
पण फक्त विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करून उपयोग नक्कीच नाही. त्यातून राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोनदेखील बदलला पाहिजे. आणि सध्याचं *सत्तेसाठी काहीही* या पद्धतीचं जे राजकारण सुरू आहे ते बदलून पुढील पिढीला योग्य दिशा देणारं राजकारण सुरू झालं पाहिजे तरच राजकारणासारख्या विषयाचा अभ्यासक्रमातील समावेशाचा उद्देश सफल होईल.


Source : INTERNET
-अक्षय पतंगे,
आ. बाळापूर जि हिंगोली

राजकारण हा विषय अभ्यासक्रमात नसावा असे माझे मत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती सामान्य माणसाच्या हाताबाहेर गेली आहे. राजकारण म्हणजे पैसे गुंतवणे व कमावण्याचा धंदा झाला.
महाराष्ट्राचे 45% शहरीकरण झाले आहे. ग्रामीण भागातून शहरात  नियमित स्थलांतर सूरू आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था विदेशी कंपन्यांच्या हातात गेली. खेडे-पाडे-वाडी-तांडे-शहरे हे मार्केटिंगचे केंद्रे बनवण्यात या कंपन्या यशस्वी झाल्या आणि होत आहेत. पण आमच्या ओट्यावर, पारावर, चौकात , हॉटेलमध्ये राजकारण्याच्या चर्चेत बरेचजण जणू पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखी  त्याच्या पक्षाची बाजू लावून धरतो. पण साध्य काहीचं होत नाही. त्याऐवजी रोजगार, कायमस्वरूपी उपजीविकेचे साधन, ग्रामीण आर्थिक व्यवस्था, सकस आहार, लहान मुलांचे आरोग्य व शिक्षण, शेती , ग्रामीण व शहरी आरोग्य, बाजारव्यवस्था, वृद्धांचे प्रश्न, सेंद्रिय शेती असे विषय अभ्यासक्रमात घेतले तर काहीतरी सकारात्मक परिणाम होतील याची खात्री आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************