गळाभेट... 2019 ची चाचपणी की आताच्या सरकारची सत्त्वपरीक्षा.

गळाभेट... 2019 ची चाचपणी की आताच्या सरकारची सत्त्वपरीक्षा.

     (Source : Internet )
अर्जुन (नाना) रामहरी गोडगे
सिरसाव ता. परंडा जि. उस्मानाबाद

          परवा जो अविश्वास ठराव संसदेत मांडला त्यावेळी विरोधला सुद्दा माहीत होते की आपण तो जिकणार नाही, पण त्यांनी मोठ्या विश्वासने भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यास ते यशस्वी झाले. अविश्वास ठरवावेळी पालकांवर 326 विरुद्ध  126 असे आकडे झळकल्यानंतर मोदी सरकारला यकिंचित धोका नाही असे सिद्द झाले. सर्व मोजमाप आकडयात करणे चुकीचे ठरते. काही वेळा अविश्वास ठराव सरकारला एक पाऊल मागे घेयला, खिंडीत धरायला मदत करते. ह्या अविश्वास ठरावाने मोदी सरकारचे हात बळकट केले हे म्हणणे म्हणजे बावळटपणाचे ठरेल. हा अविश्वास ठराव 27 वा होता.  मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी वगळता,अविश्वास ठरावाचा कोणत्याही सरकारवर परिणाम झाला नाही. आकड्यांमध्ये हरणार हे त्यांनाही माहीत असते. पण भारतीय लोकशाही मधील ते एक आयुध आहे त्याच्यातुन विरोधाच्या हातात काही गोष्टी गवसतात. राहुल गांधी बोलायला उभे राहिल्यावर हेटाळणीच्या स्वरांत 'हिंदी मध्ये बोला', 'पप्पू' , 'अब भूकंप अनेवाला है'  अशी विषशने लावून भाजपा खासदारानी जी टर उठवली ती पूर्वनियोजित कारस्थान वाटतं होत . यावेळी मात्र राहुल गांधी काहीही हातात न घेता 35 मिनिटाचे भाषण दिलं . त्यामध्ये अमित शाह च्या मुलाचा घोटाळा , राफेल घोटाळा त्यामुळे हमेशा राहुल गांधींवर हषणार्या भाजपा खासदाराचे चेहरे लाल झाले.  
           काय होत या भाषणात कोणताही कागद हातात नव्हता, आकडेवारी गणित नव्हते , सर्वसामान्य ला कळेल अशी भाषा होती. राफेल असो वा अमित शाह पुत्रावरील आरोप वा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा प्रत्येकावर दोन तीन वाक्यच बोलले पण ते बोलणं शैलीदार होते. त्यालाच भाजपाचा झालेला कडवा विरोध यात रोमँटिक गाण्याला संगीत दिल्यासारखं वाटतं होतं. यावेळी भाषण झाल्यानंतर राहुल गांधी नी मोदीला मारलेली मिठी .. याला काही जण "जादूची झप्पी "असेही म्हणाले पण असे काहीही नव्हते. या मिठीचा अर्थ सरळ होता . मोदीजी कॉग्रेसप्रेनित लोकांचा जो तिरस्कार करत आहात तो करू नये.तुम्ही नेहमी कॉग्रेसची नफरत करत असता, तुम्ही माझा तिरस्कार करत असता. माझ्याविषयीं नकारात्मक राजकारण सोडून द्यावे. तुमि आजपर्यत भाजपा वतीने छुप्या पदतीने राष्ट्रीय स्वयसेवक संघ, बजिरंग दल, विश्व हिंदू संगठना या संगठना पाठबळ देता समाजामध्ये तेढ निर्माण करता , हे समाजविघातक आहे, ही असली कुटील कारस्थाने सोडून घ्या असे त्यांना सागव्याचे आहे.  तुह्मी गांधी चा नेहरू चा जो अनादर करता ते चुकीचे आहे. कॉग्रेस हा अहिंसावादी पक्ष आहे.  भाषणाच्या शेवटी त्यांनी मोदीला त्यांनी मिठी मारली , डोळा मारुन त्यांनी सर्व कामावर पाणी फिरवले अशी टीका होऊ लागली.
         गळाभेट वर ज्या पदतीने टीका झाली ती पूर्ण चुकीची आहे. आजपर्यंत मोदीने किती जणांना गळाभेटी दिल्या त्या पूर्ण चुकीच्या मनव्या लागतील. राजकारणात "आपलं तो बाबू दुसऱ्याच ते कार्ट" अशी प्रवृत्ती बळावली आहे. मोदी बराक बराक आशी हाक मारली होती की. 2014 मध्ये तर मोदीने किती जणांना मिट्टया मारल्या होत्या त्या सर्व चुकीच्या मानणे बरोबर नाही.  भाजपच्या द्वेषाचा राजकारनाला कॉग्रेसने प्रेमाने दिलेले उत्तर आहे. त्यावर मोदीही बोलले 2014 मध्ये मोदीला साऱ्या देशाने मिठी मारली ह्याला आज अक्कल आली आहे. असं बोलणं चुकीच आहे . या सर्व प्रकारात राहुल गांधी यांनी केलेलं आरोप योग्य होते हे भाजपा खासदाराच्या लालबुंद वागण्यावरुन दिसून येते. बाकी 2019 ची निवडणूक भाजपासाठी सोपी राहिलेली नाही, मागच्या वेळीचा "पप्पू ब्रँड" या वेळी काम करण असे वाटत नाही. राजकारण हा प्रतिमांचा खेळ आहे हे मोदीने जाणले आहे,संसदेच्या पायरीवर डोकं ठेवणं ,स्वतःला सेवक म्हणणे आता जनतेला चकवणे सर्व काही झाले आहे. ह्या डाव आता राहुल गांधी खेळले तर ते पूर्ण चुकीचे म्हणने बरोबर नाही. "नौटंकी का जबाब नौटंकी से" एवढेच राहुल गांधी यांनी केले, पप्पू ब्रँड मोदी विकू शकत नाहीत दाखवून हे अविश्वास प्रस्ताव आणून.  ह्या सर्वात मध्ये मोदी शाह जोडी यांना वाटतं असलेल्या "सदैव अजिंक्य" या प्रतिमेला तडा देण्यास राहुल गांधी काही प्रमाणात यशस्वी झाले. पण ही गळाभेट निश्चितचं मोदी सरकारची सत्वपरीक्षा असणार आहे... सर्वात  महत्त्वाचे म्हणजे मोदी हे चरूर राजकारणी आहेत. पण राहुल गांधी ही हुशार होत असल्याची झलक त्यांनी दाखवून दिली.


   (Source : Internet )
ज्ञानेश्वर तात्या टिंगरे
उस्मानाबाद.
मो.९७६७१७८०५२

मध्यंतरी काही कारणांनी ग्रुपवर कार्यरत राहता आलं नाही त्याबद्दल अगोदर सर्वांची माफी मागतो..🙏

मोदी सरकारच्या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने चर्चेसाठी एक विषय एडमीन टीम ने निवडला त्याबद्दल त्यांचे आभार ,कारण की या निमित्ताने लेखकाच्या मनातील राजकीय पैलूंवर प्रकाश पडेल व त्याचा इतरांना फायदा होईल असा त्यामागचा हेतू असेल, असो...

अविश्वास ठरावाच्या निमित्ताने जे काही घडले ते काही नवीन नव्हते.. सारा देश लोकशाहीच्या दरबारातील खेळ उभ्या डोळ्याने पहात होता, ज्यांना जे दिसलं त्यांनी ते मांडलं किंवा व्यक्त केलं. मला जे वाटलं ते मी खालील मुद्यांच्या आधारे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे..

१. ज्यांना वाटलं की गळाभेट हि आपुलकीची किंवा माणुसकीची कृती होती त्यांनी संसदीय लोकशाही मध्ये वावरताना घातलेल्या नियमाकडे दुर्लक्ष केले आ7हे हे दिसून येते , स्पीकर नि त्याचवेळी सांगितले होते की He is not Narendra Modi, He is a Prime minister. पण याकडे सर्वानी दुर्लक्ष केलं.

२. गळाभेट घेणं हे वाईट नाही पण एका विशिष्ट हेतूने ते करणं आणि नंतर डोळा मारणं ह्याचा अर्थ सुज्ञ माणसांना सांगायची गरज नाही. मोदींनी बाहेर कोणालाही गळाभेट घेतली असेल तो देशाच्या रणनीतीचा भाग असतो त्याचा संबंध इथे जोडणं म्हणजे चुकीचे ठरेल.

३. काँग्रेसचे युवराज राहुल गांधींनी केलेलं भाषणं त्यांच्यातील राजकीय सुप्त गुणांची होत असलेल्या वाढीचे निदर्शक आहे पण त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण पण डोळ्यात अंजन घालणारे होते हे पण विसरता कामा नये.. ( आता सदस्यांच्या गोंधळात कोणाला ऐकायची इच्छा झाली नसेल तो भाग वेगळा ).

४. ज्या राजकीय पंडितांनी छातीठोकपणे सांगितले की इथुन पुढे मोदी सरकार सत्तेवर येणार नाही अशा सर्वांची बोलती आपल्या कार्याने बंद करून सुध्दा काही महाभाग अजूनही मोदींबद्दल गैरसमज पसरवत असतील तर त्यांची किव येते.

५. ज्या मोदींनी हिंदुत्ववादी संघटनांना हाताशी धरून द्वेष पसरवला तो कमी करावा ह्या हेतूने राहुल गांधी यांनी मिठी मारली असा युक्तिवाद जे करत आहेत त्यांना एकच सांगावेसे वाटते की या देशात द्वेषाची बीजे कोणी रोवली याचा इतिहास पहा.

६. मोदी सरकारची सत्त्वपरीक्षा आहे ती पुढील काळात, गेली कित्येक वर्षे ज्यांनी उभं आयुष्य एकमेकांना शत्रू समजून वागणूक दिली व सत्ता भोगली असे सत्तापिपासू लोक एकत्र आले म्हटल्यावर थोडे कष्ट घ्यावे लागतील.

७. थापा मारण्याचा प्रकार देश स्वतंत्र झाला तेव्हापासून सुरू आहे ( गरिबी हटाव ) तो आजपर्यंत लोकांना पचला देखील फक्त मोदींना बदनाम करून त्यांना आपल्या सारखेच दाखवून देण्याचा प्रयत्न चालू आहे..

मुद्दे भरपूर आहेत फक्त शब्द मर्यादा येतात त्यामुळे थांबतो.

जय हिंद..

   (Source : Internet )

शिरीष उमरे नवी मुंबई

एक सत्य त्यांचे, ज्यांना गळाभेट वाटते २०१९ ची चाचपणी !

दुसरे सत्य त्यांचे, ज्यांना गळाभेट वाटते आताच्या सरकारची सत्वपरिक्षा !! 

असे कीतीतरी प्रकाराचे, रंगाचे, ढंगाचे सत्य !!!!!!!!!

त्यातच एक सत्य हे की गळाभेट झाली याची जाणीव नसणारे भारतिय नागरिक जे पिढ्यांपिढ्या आपल्या कुटुंबाच्या प्राथमिक गरजांचा डोंगर सकाळपासुन संंध्याकाळपासुन राबराब राबुन हलवुन क्षणात रात्री उपाशी पोटी झोपी जाणारे .... ते नागरिक ज्यांना त्यांच्या हक्कांची माहीती नाही.... आणि ते, ज्यांना आपल्यावर अन्याय होतोय ह्याची जाणीव नाही... ते सुध्दा, ज्यांना आपले शोषण व वापर होत आहे हे कळत नाही... 

हे जळजळीत सत्य ज्यांना उमजत नाही, बोचत नाही, कळत नाही, समजवुन घ्यायचे नाही, हृदयात दुखत नाही अश्या कणखर, लोकशाहीचे मुखवटे लावणारे, वेगवेगळे रंगाचे झेंडे नाचवणारे, वेगवेगळ्या धर्माच्या अफुच्या गोळ्या बनवणारे, विकणारे, खाणारे,  विकृतीला राजमान्यता मिळवुन देणारे व ती मानणारे समस्त उच्चशिक्षीत भारतीय नागरिकांना माझा 🙏🏼🇮🇳


   (Source : Internet )

प्रविण, मुंबई

अविश्वासाचा ठराव हा सत्ताधारी पक्षासाठी खूपच महत्वाचा होता, जरी त्यांच्याकडे संख्याबळ होत तरीही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण रास्त होत. हा ठराव राहुल गांधी च्या भाषणाने गाजण्यापेक्षा त्यांच्या “बचाकाना” गळाभेटीने गाजला. मोदींच भाषण हे नेहमी प्रमाणे प्रभावी होत पण अर्ध सत्य सांगून असत्याला सत्य दाखवण्याचा एक यशस्वी प्रयत्न. हा प्रयत्न यशस्वी होता कारण बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी गळाभेटी ला पहिल प्राधान्य दिल जेणेकरून राहुल गांधींच्या आक्रमक भाषणावरून सर्व वाहिन्यांनी गळाभेटीवर आपले कॅमेरे फिरवले. त्यामुळे लोकांपर्यंत यावेळीही पूर्ण सत्य पोहचल नाही.
काही ठराविक मुद्द्यावर मला प्रकाश टाकायचा आहे.
पूर्ण भाषण हे फक्त भावनांचा “जुमला” होता. सतत “१२५ करोड जनाताने ....” अस म्हणून चेंडू जनतेच्या कोर्टात टोलवायाचा हे मोदिनी गेल्या चार वर्षात अनेकदा केलाय.
या भाषणात सुद्धा कॉंग्रेस चा इतिहास काढलाच. जेव्हा वर्तमान रिकामा असतो तेव्हा इतिहासात डोक खुपसाव लागत.
राफाल करार, शेतकऱ्यांच वाढीव उत्पन्न, १८००० घरात पोहोचलेली वीज, UGC मधले बदल यावर जे काही मोदी बोलले ते किती विश्वासाहर्त होते हे त्यानंच ठावूक.
२०१४ नंतर वाढलेला जातीवाद ह्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही पण तरीही मोदिनी जो जातीविरहित राजकारण चा केलेला दावा केविलवाणा होता.
मुळात मोदी सरकार आणि त्यांचे मेडियातले विकाऊ आणि सामान्य जनातेतले भोले भक्त त्यांच्या चुका मान्य करत नाही. हे पुन्हा एकदा दिसून आल.

आता ही गळाभेट पुढच्या निवडणुकांची चाचपणी असेल का? कदाचित असेल कारण यावेळी कॉंग्रेसला आणि इतर विरोधक पक्षांना “राफेल” चे खाद्य मिळाले आहे. असाच खाद्य “बोफोर्स” नावाने याच कॉंग्रेस विरुद्ध वापरलं गेल होत. कदाचित त्याचीच पुनारावृत्ती असेल आता. आणि बीजेपी कडे नेहमीचे राम मंदिर, हिंदू-मुसलमान आणि हल्लीचे भिडतंत्र असेल. पण तरीही NDA ची बाजू बळकट वाटते कारण “चेहरा” महत्वाचा आहे, जो NDA ने “मोदींच्या” रुपात दिलाय आणि कॉंग्रेस.....
शेवटी एकाच म्हणेन देशाचे मूळ मुद्दे बाजूलाच राहतील आणि जनता सुद्धा या मात्तबर पक्षांनी उठवलेल्या मुद्द्याला आपला मानून आंधळेपणाने मतदान करील.


   (Source : Internet )

*R. सागर, सांगली*
.
परवा संसदेत विद्यमान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झाला. अपेक्षेप्रमाणे तो बहुमताने फेटाळला गेला. सत्ताधारी NDA कडे असणारं संख्याबळ बघता हे अपेक्षितच होतं. त्यामुळं सरकारची सत्त्वपरीक्षा वगैरे गोष्ट इथे कुठेच जाणवली नाही. पण त्याचवेळी अविश्वास प्रस्तावापेक्षा चर्चा झाली ती राहुल गांधी-नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीचीच..
.
एक प्रकारे ही 2019ची चाचपणीच होती असं म्हणायला हरकत नाही. गेल्या काही वर्षात राहुल गांधींबद्दल जी पप्पूची प्रतिमा निर्माण केली जाते आहे त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मिळालेली ही एक संधी होती. अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यानच्या आपल्या भाषणात विविध मुद्द्यांना स्पर्श करून त्यांनी ती संधी बऱ्याच प्रमाणात साधायचा प्रयत्नही केला. पण दुधात मिठाचा खडा पडावा तसं त्यांच्या गळाभेटीनंतरच्या डोळा मारण्याच्या कृतीतून घडलं. आणि याच गोष्टीची ढाल करून आपल्या सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या मुद्द्यांना मुद्देसूद उत्तरं न देताच त्यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानली.
.
तरीही यातून एक गोष्ट निश्चित झाली. अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान इतर अनेक पक्षातील नेत्यांनी आपापल्या भाषणातून सरकारवर टीका केलेली असतानाही मोदींनी आपला जास्तीत जास्त वेळ हा राहूल आणि काँग्रेसवर टीका करण्यातच घालवला. याचाच अर्थ असा होतो की विरोधक जी महाआघाडी करायचा प्रयत्न करत आहेत त्या महाआघाडीचं नेतृत्व राहूल गांधींनी करावं असं भले विरोधकांना वाटत नसलं तरी राहूल आणि काँग्रेस हेच आपले 2019 साठीचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत हे मोदींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मान्य केलंय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************