गुरुपौर्णिमा: समृद्ध अशी एक भारताची परंपरा

गुरुपौर्णिमा: समृद्ध अशी एक भारताची परंपरा

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

गुरुपौर्णिमा: समृद्ध अशी एक भारताची परंपरा

Source: INTERNET
-शिरीष उमरे
नवी मुंबई

जगातील पहीले विद्यापीठ व दहा हजार वर्षाचा गुरुकुल शिक्षण पध्दतीची गौरवशाली परंपरा असुनही आजकाल भारतीय इतिहासात डोकावण्याची भीती वाटायला लागली आहे.
राक्षसांच्या गुरुंनी आपला शिष्य बळीराज्याला वाचवण्यासाठी गमावलेला डोळ्याची कीमंत कशी मोजणार ?
एकलव्याचे गुरु वाचले तर काळजाला चर्रे पडतात....
शिवाजी महाराजांच्या खर्या खोट्या गुरुंच्या याद्या वाचल्या की हसावे की रडावे हे कळत नाही !!
ह्याउलट भारत रत्न भीमसेन जोशींच्या कीत्येक गुरुंवर्णनात  भावविभोर होतो आपण....
आता तर ट्युशन व युनिवर्सीटी संस्कृती त गुरु हा शब्द च अयोग्य वाटतो...
पण उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्याने मला आठवुन गेले माझे सगळे गुरु ज्यांनी निस्वार्थपणे मला घडवण्यात कष्ट घेतले.  रामा गुरुजी म्हणजे माझ्यासाठी शिक्षण क्षेत्रातले गाडगे महाराज 🙏🏼 त्यानंतर मंत्रमुग्ध होऊन सातवीत जागतिक पातळीवरचे शिकणे असे अमृतशिंपण करणारे आखरे सर, स्वत:चा आदर्श समोर ठेवुन जगण्याचा मार्ग दाखवणारे वैद्य सर, गणित सुलभ करणारे रानडे सर व इंग्रजीला सोपे करणारे अब्राहम सर ह्या सगळ्यांना साष्टांग नमस्कार ...
त्यानंतर ही व्यावसायीक जीवनाच्या अडीच दशकांमध्ये भेटलेल्या सगळ्या गुरुंच्या आठवणींनी मन उंचबळुन येत आहे. ह्या सगळ्यांना माझ्याकडुन असलेल्या अपेक्षापुर्तीची जाणीव आहे मला.  कृतज्ञता व्यक्त करुन प्रयत्नशील राहण्याचा वसा सोडुन लेखणी थांबवतो आता 🙏🏼


Source: INTERNET
-अर्जुन दत्तात्रय बर्गे
  अहमदनगर

आज गुरू पौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस।।आपल्या गुरुबद्दल आपण शब्दात पण ऋण कितीही व्यक्त केले तरी नाही व्यक्त करू शकत।।। ज्या व्यक्तीमुळे आपण घडलो त्यात आई वाडीलानंतर कोणाचा सिहाचा वाटा असेल तर ते आपले गुरू असतात।।।
आतापर्यंत इतिहासात रामायण महाभारतापासून गुरू संबंध येतो याना सगळ्यांना घडवण्यात गुरूचा वाटा आहे।।जस महाभारतात अर्जुननाला घडवण्यात द्रोणाचारय्या चा वाटा आहे।।।कर्णाला घडवण्यात परशुरामाचा वाटा उचलला।।होता हे महायोध्ये घडवले गेले कारण त्यात त्यांना घडवणारे हे त्यांचे गुरू त्यांच्या सोबत होते होते।।।
आणि आजही आपल्याला बाहेरच्या जगतात जगायच कस हे शिकवणारे आपले शिक्षक असतात।।माझ्या साठी प्रत्येक व्यक्ती ही गुरू। कारण येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मला काहीतरी शिकून गेलाय।।।आपण प्रत्येकाकडून कळत नकळत आपण काहीतरी शिकत असतो।।।
हा देश घडवण्यात शिक्षक काचा वाटा असतो।।।कारण आज ही बाल हे उद्याचे तरुण पिढी हे देशाचे भविष्य आहे।।।शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असतो।।।।
आज कोणताही व्यक्ती घेतला तरी त्याने मागे वळून बघितलं तर शिक्षकांनी लहानपणी जे बाळकडू पाजलेत त्याची नक्की आठवण
झाल्याशिवाय राहणार नाही।।
शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नसतो तर पुस्तकी ज्ञान देता देता आपल्याला जगण्याची कला शिकऊन जात असतात।।।।
राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल.

परत एकदा मला घडवणाऱ्या शिक्षकांचे मनापासून आभार
🙏🙏🙏😊


Source: INTERNET
-अनिल गोडबोले
सोलापूर

भारतात सुमारे 3500 वर्षापासून गुरू पौर्णिमा साजरी केली जाते अस म्हणतात.
महर्षी व्यास यांच्या जन्मतिथी नुसार ही गुरू पौर्णिमा साजरी केली जाते, असे म्हणतात.
भारतात हिंदू धर्म नुसार गुरू हा देवपेक्षा श्रेष्ठ मानला जातो.
मोक्ष मिळवण्यासाठी तसेच वाईट प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी गुरुची गरज असते असे हिंदू मानतात..
गुरू कोण?..
जो एखाद्या व्यक्तीला गुणाने आणि रूपाने(कर्तृत्वाने)उजळून टाकण्यासाठी मदत करतो तो गुरू.. अस माझ्या वाचनात आलेलं आहे.
आताचे शिक्षक, क्लास टिचर, प्राध्यापक, प्रशिक्षक, कोच, बॉस सगळ्यांना आपण गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो..
सगळ्या परिस्थितीत आपल्या मागे खंबीर असलेल्या व्यक्ती, मित्र.. मानणारे, आधार देणारे हे आपले गुरू असू शकतात..
आपल्याकडे व्यक्ती पूजक परंपरा आहे त्यामुळे ही परंपरा अजूनही चालू आहे.
बुद्धिस्ट परंपरे नुसार सारनाथ इथे बुद्धांनी आज च्या दिवशी पासून *बुद्धधम्म संघीनी* सुरू करून उपदेश सुरू केला होता. वर्षावास मध्ये ते एके ठिकाणी राहत असत. त्यामुळे बुद्ध परंपरे मध्ये देखील गुरू पौर्णिमा आहे.
आजचे पैसे घेऊन पुस्तक शिकवणारे गुरू या प्रकारात येतात का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
आई आणि वडील देखील गुरू स्थानी असू शकतात(असतातच असा दावा केला नाही कारण.. ती देखील माणसे आहेत, चुकू शकतात)
पण आपला जन्म आणि अस्तित्व यासाठी हे झगडत असतात त्यामुळे ते गुरू आहेतच..
बुवा आणि बाबा ... हे अध्यात्मिक गुरू आहेत, त्यांना गुरू का म्हणायच? हा वेगळा प्रश्न
लोक आज देवळात जातात.. पण गुरू तर देवा पेक्षा श्रेष्ठ आहे ना.. मग तो देवळात सापडतो का?
गुरूला आपण शुभेच्छा द्यायच्या की वंदन करायचे?.. आपण तेवढ्या योग्यतेचे असतो का?..
चेष्टा उडवणारे मेसेजेस गुरूचा अपमान नाही का? ही तर परंपरा नाही आपली!
जो आपल्याला काही न काही न काही शिकवतो तो गुरू या तत्वात बसणाऱ्या सगळयांना आपण गुरू म्हणायला तयार आहोत का?
द्रोणाचार्य अर्जुनाच्या विरुद्ध लढले होते.. पण देवाच्या सपोर्ट मुळे हरले होते.. अस आपण ऐकतो, वाचतो... मग गुरू श्रेष्ठ की देव??
खूपच प्रश्न झाले..
चांगल्या गोष्टी पुढे नेणें, आदर देणे,  नम्र होईन ज्ञान घेणे, सत्याची कास धरणे आणि संघर्ष करताना मार्गदर्शन करणे आणि जमेल तेवढा आधार देणे या गोष्टी गुरूच्या कर्त्यव्यात येतात.. अस मला वाटत..
आणि या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीला गुरू म्हणतात अस मला वाटत..
माझ्या आयुष्यात अशा पद्धतीने भेटलेल्या सर्व व्यक्तींना मनापासून वंदन..
चांगल्या गोष्टी पुढे नेणें आपले कर्तव्य आहे.


Source: INTERNET
- नवनाथ कुसुम राजाभाऊ जाधव
तांदुळवाडी जि. परभणी 9421269723

गुरुपौर्णिमा हा दिवस मुलत: बौद्ध परंपरेशी संबंधीत आहे. तथागत बुद्धांना वैशाख पौर्णिमेला बोधी प्राप्त झाली. बोधी प्राप्त झाल्यानंतर तो संदेश इतरांना सांगायचा की नाही, याबद्दल त्यांच्या मनात संदेह होता, त्यांचे मन द्विधा अवस्थेत होते, पण नंतर धम्माचे ज्ञान इतरांना सांगायचे या निर्णयापर्यंत ते पोचले आणि आपल्या पाच सहकाऱ्यांना धम्माचा पहिला उपदेश केला. ज्यादिवशी त्यांनी धम्माचा पहिला उपदेश केला तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमा होय. त्या दिवसापासून या पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ असे संबोधले जाते. त्या दृष्टीने ही परंपरा समृद्ध आहे. बुद्धांनी जन्माने नव्हे तर ज्ञानाने मनुष्याचे श्रेष्ठत्व ठरते, असे प्रतिपादन केले. त्यामूळेच नाभिक समाजातील उपालीला बौद्ध धम्मातील महत्त्वाचा मानला गेलेला ‘विनयपिटक’ हा ग्रंथ अधिकृत करण्याचा अधिकार मिळतो.
दुसऱ्या बाजूला गुरुपरंपरेची वाटचाल विषमताधिष्टित असल्याचे दिसून येते. एकलव्याचा शिक्षणाचा अधिकार केवळ जन्मावरुन नाकारण्यात येतो. जो द्रोण हा अधिकार नाकारतो, तोच गुरुचा हक्क सांगून त्याचा अंगठा कापून घेतो. हे त्याच्या नसलेल्या गुरुत्वाला कलंकीत करणारं आहे.
‘गुरु तो सकळासी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहिन ।
तरी तयासीच शरण, अनन्यभावे असावे ।।
या जन्मावर आधारीत गुरुपरंपरेचाही एक काळाकुटृ इतिहास आहे. शिवाय या गुरुपरंपरेत गुरुला विलक्षण महत्त्व देण्यात आल्याचे पाहवयास मिळते. याच अहंगंडांतून शिवाजी महाराजांच्या गुरुपदी अनैतिहासीक अनेक गुरु बसवून त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे श्रेय लाटण्याचे विकृत प्रयत्न करण्यात आले. या परंपरेमूळेच संत तुकारामांनी बाजारबुणग्या गुरुपरंपरेवर हल्ले चढवले. याबाबतीतले त्यांचे अनेक अभंग आहेत. स्वत: ते पांडुरंगालाच गुरु मानतात.
‘माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु’ किंवा ‘तुका म्हणे वाट दावूनी सद्गुरू, राहिला हा दुरू पांडुरंग’
अशाप्रकारचे अनेक अभंग आहेत.
गुरुकूलात जन्माने शुद्र असणाऱ्यांना प्रवेश दिला जात नव्हता. हे लांछनास्पद आहे. या परंपरेचा आपल्याला अभिमान बाळगता येणार नाही. हे निश्चित.
गुरुचं महत्त्व आहे, ते समतेवर आधारलेलं असावं, कोणत्याही प्रकारचा दुजाभाव नसावा. आजच्या काळातही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता गुरुंनी आपलं योगदान द्यावं.
मला माझ्या आयुष्यात उभं राहण्यासाठी घडवणाऱ्या आई-वडिल सर्व गुरु यांना नमन करुन थांबतो.


Source: INTERNET
-नवनीता (शैलेश भोकरे)
आळंदी (दे), जि. पुणे
8805881583

तुम्ही आर्थिक, सामाजिक, वैचारिक, भौतिक वा आणखी कोणत्याही प्रकारची असेल ती प्रगती करता.. पण एक विशेष लक्षात असू द्या, एक देवमाणूस असा आहे जीवनात की ज्याच्या हातभारामुळेच तुम्ही जे काही आहात ते आहात.  एका आत्मज्ञानी, शरीराने वृध्द पण अंतरमनाने तरुण महात्म्याने वागावं तसं तो तुमच्याकडून, तुमच्यामागे कवडीचीही अपेक्षा ठेवत नाही; इर्षा, द्वेष हे म्हणजे काय? याबद्दलही तो अनभिज्ञ, म्हणजेच बोली भाषेत आपण ज्याला जळणं म्हणातो आजकाल, ते देखील या बहाद्दराला कोणत्या झाडाला येतं ठाऊक नाही.
कधीकधी वाटतं कृष्णाने गीता अर्जुनाला नव्हे यांनाच सांगितली असावी. तो श्लोक सर्वपरिचित आहेच की... कर्मण्ये वाधिकरस्त्ये...
अर्थही माहितीच आहे की आपल्याला,
पण एक सांगू? ही व्यक्ती आणि ह्याच्या सारखे अनेक,
खऱ्या अर्थाने तो अर्थ जगत असतात, आयुष्यभर आणि कदाचित त्यानंतरही....
अपेक्षा म्हणून काहीच नसतात तुमच्याकडून त्यांच्या.
वेळ मिळाला तर नजरेच्या पल्याड पाहण्याचा प्रयत्न करा,
तुम्हाला आढळेल तो भरून आलेला ऊर.
तुम्हाला पाहून ओसंडलेला पुर,
आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात न गवसलेला सुर!
वेडा असतो हा माणूस खरंच. आयुष्यभर झाडं लावतो पण फळं त्याला खायचीच नसतात. त्या फळांना परत तो उर्जित पाहून आणखी पेरतो आणि जंगलात भर घालत राहतो. नेत्रसुख त्याला मात्र आवडतं....
त्याचं नकळत ध्येयच असतंय ते. तुम्ही त्याला माझं हे पुराण ऐकवलंत तर तो हेही म्हणेल की, काहीही लिहिलंय. मी माझं काम करतोय, त्यात काही विशेष नाही.
पण त्यांना मग तुम्ही, त्यांच्या आयुष्यातल्या अशाच एका देवमाणसाबद्दल विचारा, मग पहा ते कसे नतमस्तक होतील, माझे शब्द त्यांना खऱ्याने कळतील आणि वळतीलही...
असा हा देवमाणूस जीव ओतून रोपटी लावत असतो आयुष्यभर, त्याला फळाची चव आवडायला तो खातंही नाही कधी.
त्याचा अत्यानंद कशात समावलाय माहितीये?
खालील वाक्य उच्चारणात... जेव्हा तो दुनियेला ओरडून सांगतो...

*तो, तो पहा माझा विद्यार्थी!*


Source: INTERNET
-अमोल धावडे
अहमदनगर
9604389472

*॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर
गुरु साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥*
गुरुपौर्णिमा- गुरू म्हणजे तरी काय आपल्याला ज्या व्यक्तीमुळे ज्ञान प्राप्त होते. आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वर्षभरामध्ये ज्या काही पौर्णिमा येतात त्यामध्ये आषढ महिन्यात जी पौर्णिमा येते त्या दिवशी आपण गुरू प्रती असणारा आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतो. आपला गुरू हा महान असतो त्याचा आदर त्याच दिवशी नसून आपण तो रोज  व्यक्त करायला हवा.
हिंदु धर्मांत महर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. म्हणुनच गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.
आपल्या गुरूना आपण देवाचा दर्जा दयला हवा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थपना केली त्यांनीही आपल्या गुरुस्थानी रामदास स्वामी यांना ठेवले होती व त्यानं गुरू मानत असे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्याने आपल्या गुरूला गुरुदक्षिणा देण्याची प्रथा आहे. गुरुदक्षिणा म्हणजे आपण मोबदला किंवा बक्षीस समजतो परंतु जे गुरूकडून आपल्याला ज्ञान मिळते त्या ज्ञानाचा उपयोग करून समजसाठी आपण काहीतरी केले पाहिजे तेव्हा आपण आपल्या गुरुचे समाधान केले असे म्हणायला हरकत नाही.
लहणपणापासून आपले वेगवेगळे गुरू असतात आपला जन्म झाला तेव्हा आपले आई-वडील हे गुरू असतात कारण आपण त्यांच्या बोटाला धरून चालायला शिकतो. पुढील जीवनात आपले शिक्षक व सर त्यानंतर नोकरीच्या ठिकाणी आपले बॉस हे आपले गुरू असतात कारण या व्यक्तींकडून आपण नवीन काहीतरी शिकत असतो व त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला होत असतो. गुरू शिष्य ही परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे.  अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य–द्रोणाचार्य, आगरकर–गांधी, सचिन तेंडुलकर–रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील.
गुरू शिष्यला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य मार्ग दाखवतो परंतू आजच्या स्थितीमध्ये योग्य गुरू न मिळाल्याने  लोक भोंदूबाबा, बुआलोग यांच्या आहारी जातात.
गुरू शिष्याचे नाते हे प्रेमळ असायला हवे. गुरू हा नेहेमी आपल्या शिष्याचे कसे चांगले होईल याचा विचार करतो. गुरू शिष्यबद्दल कधीही वाईट विचार करत नाही.

*या जीवनात मला जगायला शिकवल,*
*लढायला शिकवल*
*अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे*...
*असेच माझ्या पाठीशी उभे रहा*...
*माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे,*
*मग तो लहान असो वा मोठा,*
*मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकल आहे..*
*अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून नमस्कार.!*
*प्रत्येकाच्या जीवनात एकतरी गुरू असतो माझ्या जीवनातील सर्व गुरूंना सादर प्रणाम.

Source: INTERNET
-प्राची सोनवणे
अहमदनगर

वेळोवेळी या विषयावर अनेकजण व्यक्त होत असतात आणि गुरूंविषयी आपल्या भावना व्यक्त करतात.. खरंच किती सुंदर संकल्पना आहे ना गुरुशिष्यांची.. एखादी अनुभवसंपन्न व्यक्ती आपल्याकडे असलेलं अनमोल ज्ञान निःस्वार्थपणे पुढल्या पिढीला देते अन तितक्याच विश्वासाने ती पिढी ज्ञान ग्रहण करते .. अशा या देवाणघेवाणीतूनच गुरू शिष्याचं नातं दृढ होत जातं..
म्हणजे ना, आपल्या आयुष्यात विशेष असा एखादा व्यक्तीच कधीच गुरू नसतो.. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळत आपल्याला काहीतरी देऊन जाते..
आपले हे गुरू ना आपल्याला अचूक हेरतात आणि आपल्यातल्या उणिवा भरुन काढण्याचं काम करतात.. याचं एक सुंदर उदाहरण माझ्याकडे आहे.. शाळेत असताना मी वर्गात उत्तरं द्यायला घाबरते हे माझ्या वर्गशिक्षिकांनी अचूक हेरलं होतं.. जाणून बुजून त्या मला उभं करायच्या अन मला उत्तरं सांगायला लावायच्या.. बरं एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर मी दुसरीत असताना त्यांनी मला वक्तृत्त्व स्पर्धेत भाग घ्यायला लावला अन माझ्याकडून तयारी देखील करवून घेतली.. त्या स्पर्धेत मी जिंकणारच होते कारण माझ्या गुरूंनी माझी तयारी करून घेतली होती.. तोही दिवस होता गुरू पौर्णिमेचा अन मी गुरूशिष्य परंपरेची महती सांगणारी शिष्य कल्याणची गोष्ट सांगितली होती.. मी स्पर्धा जिंकल्याचं ऐकून माझ्या बाईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं हे मी आजही विसरू शकत नाहीये..
त्यांनतर जीवनात अनेक गुरू भेटत गेले परंतु त्या बाईंची जागा कोणीच घेऊ शकलं नाही.. अन आजदेखील ती जागा रिकामीच आहे..
माटी से मूरत गढ़े, सद्गुरु फूंके प्राण।
कर अपूर्ण को पूर्ण गुरु, भव से देता त्राण।।
आजच्या काळात जरी डिजिटल गुरू असले तरी गुरूंचा उद्देश मात्र एकच आहे आणि तो म्हणजे ज्ञान दान करणे.. तेव्हा आयुष्यातील सर्व लहानमोठ्या गुरूंना त्रिवार वंदन..


Source: INTERNET
रविराज आकौसकर लातूर ..

खरंच आपला भारत अशा सुंदर  खूप रुढी आणिग परंपरेने नटलेला आहे .त्यातली एक परंपरा म्हणजे गुरुपौर्णिमा.
आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती देणारी व्यक्ती म्हणजे गुरु.त्याच गुरु च्या शिक्षणाची परतफेड आपण गुरुदक्षिणा देऊन करतो .
गुरुपौर्णिमेला आपण त्यांना वंदन करतो. त्यांचा आपल्यावर असलेला आशीर्वाद अनुभवतो..हाच तो दिवस जेव्हा आपण पूर्णपणे गुरु ला शरण जातो त्यांना खरी गुरुदक्षिणा देतो.
म्हणून तर शिष्य आणि गुरु यांचं नातं सर्वश्रेष्ठ मानलं जातं.
गुरु आहे तर सर्व ठीक आहे असा आपला विश्वास आहे .
या सर्व परंपरेमुळे बाहेर देश सुध्दा आपल्या देशांकडे आकर्षित झाला आहे .हे जग आपले अनुकरण करू लागले  आहे ..आपण खूप समरूध्ह होत चाललो आहोत.


Source: INTERNET
-यशवंती होनमाने
मोहोळ

     गुरूपूर्णिमा ,काय महत्व असेल हो याच ???गुरुपौर्णिमा म्हणजे असा एक दिवस की ज्या दिवशी आपण आपल्या गुरुजनांना वंदन करतो,त्यांचे पूजन करतो पण मला एक प्रश्न नेहमी पडतो की गुरु कोणाला म्हणायचे ???ज्यांनी आपल्याला विद्या दिली ते की ज्यांनी शिकवले  ते ??? आत्ता तुम्हाला वाटेल की यात काय फरक आहे दोन्ही पण एकच की.नाही फरक आहे की विद्या म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान आणि शिकवले म्हणजे जगायला,ज्ञाना चा उपयोग करायला,जग समजून घ्यायला.
     जीवन जगत असताना आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरु च असते कारण ती आपल्याला काही ना काही तरी शिकवत च असते.आपण आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार करतो पण व.पु.च्या तू भ्रमत आहसी वाया या कादम्बरी मध्ये सांगितले की जो व्यक्ती आपल्याला त्रास देतो त्यालाच गुरु माना.त्यामुळेच आपल्याला जग कसे आहे ते कळते.म्हणून आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरूच असते.ती आपल्याला नेहमीच काही ना काही तरी शिकविते.
       अशा सगळ्या गुरु ना माझे नेहमीच वंदन असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************