सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश.. तरुणांसाठी काय करत आहे?



अनिल गोडबोले , सोलापूर.

        सर्वात जास्त तरुणांचा देश तरुणांसाठी नवीन नोकरीच्या संधी, शुक्षणानुसार काम, बिझनेस साठी अनुकूल वातावरण, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन यंत्रणा आणि नवनवीन शिक्षणाच्या व संशोधनाच्या संधी...

प्रत्यक्षात काय मिळत आहे?
            गटा- तटात आणि जाती धर्मात विभागणी, राजकारण, अतिरंजित मीडिया, वर्चस्ववादी प्रशासन, मजबुरी, व्यसनी वातावरण, एकसारखे शिक्षण आणि कमी नोकरीच्या संधी, बिझनेस पेक्षा गुलाम बनवणारी विचारसरणी, संशोधन आणि नवीन शिक्षण ... हे संस्कृती ला धरून कसे नाही..

सगळ्यात जास्त धोकादायक..
     टेक्नॉलॉजी फक्त... टाईमपास करण्यासाठी
यातून तरुण यांनी शिकावं आणि बाहेर पडावे.



शिरीष उमरे नवी मुंबई

        देश काय करत आहे हे तेवढेच महत्वाचे आहे जेवढे तरुण देशासाठी काय करत आहेत !!
      देशातील सरकार (जुने व नवे ) ह्यांनी तरुणांसाठी आवश्यक असा शिक्षणाचा व जीवन कौशल्याचा विकासाचा विचार च केला नाही. ह्यामुळे बेकार असलेेले इंजिनियर व डॉक्टर्स ह्यात वाढ होत आहे. सगळ्यांनाच जबाबदारी कमी असलेली सरकारी नोकरी हवी आहे. खाजगी कंपन्यांच्या मनमानी मुळे पिळवणुक वाढली आहे. फारच कमी कार्पोरेटस् नोकरीची सुरक्षा देतात. स्वयंमरोजगारबद्दल नवीन उद्यमी साठी काहीही दुरदृष्टी नाही. 
     काही राजकीय पक्ष अश्या बेरोजगारांना स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन घेतात. खेळ व कला ह्यामधल्या सरकारी अधिकारी व राजकीय हस्तक्षेपामुळे त्यातही तरुण निराश होत चाललेले आहेत. 
         असे असुनही काही तरुण आशेचे कीरण बनुन ईतरांना प्रोत्साहीत करत आहेत. त्यांना तरी देशाचा आधार मिळाला पाहीजे. त्यांच्या धाडसाचे कौतुक व्हायला पाहीजे. ह्यासाठी सरकार ची गरज नाही आहे. आपण एक नागरिक म्हणुन स्वयंमफुर्तीने हे करु शकतो .



रविराज अकोस्कर, लातूर .

          हो हे खर आहे की आपल्या भारत देशात खूप तरुण वर्ग आहे ...इतकी मोठी लोकशाही आहे त्यामधे या तरुणांना खूप खूप chances आहेत स्वतःला सिध्द करण्यासाठी....
        पण मूळ गोष्ट ही आहे की जे तरुण सरकारी योजना नीट समजून घेत नाहीत किंवा जे तरुण सरकारी फर्मान यांच्याकडे पाठ फिरवतो तो कधीच पुढे गेला नाही ...
     सरकार ला आपण नाव नाही ठेऊ शकत...सरकार कोणतंही असू द्यात ते तरुणांना सक्षम बनवत आलंय .आणि पुढे पण हे होणार ..फक्त गरज आहे ती सकारात्मक द्रुश्टिकोनाचि ....
         तरुणांनी आपल्या सद् सद् विवेक बुध्हीचा योग्य उपयोग करून आपला विकास करून घ्यावा ...



 मयुरी देवकर , ता. माळशिरस

             2020 साली भारत महासत्ता होणार हे स्वप्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम सर यांनी पाहिलं ते फक्त आणि फक्त तरुणांच्या ताकदीवर... यामध्ये तरुणांची शैक्षणिक, बौद्धिक, सामाजिक ,राजकीय व शारीरिक ताकत महत्वाची आहे...आज आम्हाला काय परिस्थिती दिसते???आम्ही मोठया दिमाखात सांगतो की सर्वांत जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश माझा देश आहे...पण....आम्हाला फक्त तरुण लोकसंख्या असलेला न्हवे तर तरुण विचारांचा देश निर्माण करणं गरजेचं आहे आणि तरंच आपला देश महासत्ता होईल.
आज प्रश्न असा आहे की,सगळ्यात जास्त तरुणांची लोकसंख्या भारतात आहे...या तरुणांची शैक्षणिक प्रगतीही आज वाढत चालली आहे...प्रत्येक क्षेत्रात आज दिवसेंदिवस तरुणांची संख्या वाढत आहे,पण या शिकलेल्या तरुणांना रोजगाराच्या किती संधी उपलब्ध झाल्या आहेत???आज शिकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे हे सरळसरळ दिसत असतानाही नोकऱ्यांमध्ये कपात,भरतीबंदी हे सगळे प्रकार चालू आहेत....तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि परिणामी त्यांचे मानसिक खच्चीकरण होत चालले आहे....या सर्व तरुणांच्या हाती काम देण्यासाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणं,नवनवीन उद्योगधंद्यांची निर्मिती करणं हीच खरी आज काळाची गरज आहे.....



रुपाली आगलावे, ता. सांगोला, जि. सोलापूर

       सर्वात जास्त तरुण ज्या देशात आहेत तो देशच तरुण असं म्हंटल तरी काही हरकत नसावी. आणि सध्या तो देश म्हणजे आपला भारत देश... आपला भारत देश... पुन्हा पुन्हा आपला म्हणतेय करण सध्या फक्त नावापुरताच आपला आहे... कारण तो देश आपल्यासाठी(तरुणांसाठी) आपलं म्हणावं अस काहीच करताना दिसत नाही.... या देशात दररोज 1.5 GB डेटा मोफत मिळतो.. अँड्रॉईड फोन 1000रु. मध्ये मिळतो & तिथंच बाकीच्या जीवनावश्यक वस्तूवर महागाईचा शिक्का मारून त्या अधिका-धिक महाग होत चाललेत...   म याचा तरुनांवर कसा परिणाम होतो... तर... आजचा आपल्या देशातील तरुण 1.5 GB data दिवसात संपवण्यात एवढा गुंतला आहे की त्याला आजच भयाण वास्तवच दिसेना झालय... तो फक्त इकडचा मेसेज तिकडं & तिकडचा इकडं यातच दिवस घालवत आहे.... & यातूनच परत गुन्हेगारी वाढताना दिसतेय व आजचा तरुण चुकीच्या मार्गाने जाताना दिसतो... म याला जबाबदार कोन??????




नरेंद्र हिरालाल पाटील, पुणे

           देशे नेमकं कोण? मला तरी वाटतं.... देश म्हणजे आपणच नव्हे का? मग हा देश आपल्या साठी काही करण्या ऐवजी आपण या देशात राहून काय करतोय हे महत्त्वाचे. आज देशात आपल्या साठी (तरुणांसाठी) सर्व काही उपस्थित आहे. महाविद्यालये, एमपीएससी, यूपीएससी करून देशा साठी व चांगल्या जीवन शैली साठी संधी... इंटनेटद्वारे महान माहितीचा स्त्रोत... व्यवसायासाठी अनेक संधी व योजना सुद्धा... मी स्वतः एक व्यवसायच करतोय. म्हणून तरुणांनी देशा साठी रडण्याचे काम तरी निदान म्हाताऱ्या जनतेवर सोडू नव्हे का? म्हणजे आपण (देश) तरुणान (आपल्या) साठी खरंच काहीतरी जबरदस्त करू शकतो. आणि नव्हे खऱ्या अर्थाने देश बनू शकतो. आणि त्या साठी आपल्या कडे राजकारण व शेती असे दोन आव्हानात्मक मार्ग पण निवडू शकतो. हा शोकांतिका अशी आहे की आजचा तरुण वर्ग यातल्या शेतकरी या अंगाला अक्षरशः नाकारतोय(तो एक वेगळा विषय होऊ शकतो चर्चे साठी). 
   तर मी काय म्हणतोय च्या मायला करूनच दाखाऊ या देशा साठी काही तरी... म्हणजे आपला तरुण देश तरूना सारखा तळफदार होऊन साऱ्या जगात हव्वा करेल!!! राजकारणीव्यवस्था यात तर काळानुसार बदल येतच राहील.



सिताराम पवार, पंढरपूर.

         अस मानतात स्वच्छतेची सुरवात स्वतापासून करा म्हणजे घर,गाव, तालुका, जिल्हा, राज्य अस करत देश स्वछ होईल. तसंच तरुणांनी देशासाठीकाहीतरी करावं की देश आपोआपच विकसित होईल, य दोन्हीही संकल्पना लहाणातून मोठायकडवे अशी आहे ,पण या दोघांचाही परिणाम,एकदम चांगला होतो. आता तरुणांनी देशासाठी कष्ट करण्याची तयारी, शिक्षण, कृषी या ठिकाणी दाखवली आहे. जास्त तरुणांच्या शक्तीचा वापर करून घेणे मात्र देश चालवणार्याच्या,धोरण निर्मिती करण्याऱ्याच्या हाती आहे.आज रोजगार निर्मितीचा दर खूप कमी आहे.आज कृषी क्षेत्रातील तरुणांची मानसिकता पहा, कशाला दर आहे? 100gm लोखंडपसून 100 gm वस्तू तयार होत नाही, पण ज्या शेतात100gm  बियापासून कितीतरी जास्त उत्पन्न काडून काय उपयोग!  सरकारची निर्यात, आयात धोरण, हमीभाव, साठेबाजी, रुमालाखाली हात घालून दर ठरवणारी हट्टा पद्धत, दुधाचे दर 3.5फॅट दूध शेतकऱ्याकडून 17 रु. तोच पॅक 42 रु.विकतात. कृषी विद्यापीठाणे काढलेला खर्च सुद्दा निघत नाही. आता संकरीत भाकड गाई कुणी संभाळायच्या?  कारण गोहत्याबंदी फक्त देशी गायीला लागू करायला पाहिजे होती. आता जीएम पिकाबद्दल योग्य धोरण नाही, आपण अमेरिकेतून सोयाबीन तेल आयात करतो ते तेल जीएम सोयाबीन पासून तयार केलेले असते ते चालते आणि आपल्या शेतकऱ्यांना जीएम सोयाबीन लागवडीसाठी बंदी हे काय ??? तरीपण आमचा तरुण शेतकरी तांब्याने सोयाबीन ला पाणी घालताना आपण फोटो पहिला असेल किती दुर्दम्य इच्छाशक्ती!! आता असाच उसाच बघा, ब्राझीलमध्ये उसापासून इथेनॉल निर्मिती केली जाते तेथे साखर byproduct आहे,70-८0% ते पेट्रोलियम पदार्थात मिसळतात, प्रदूषणही कमी होत.पण आपली धोरण पहा,10-12% इथेनॉल मिसळतात,मुळात इथेनॉल निर्मीतिला डायरेक्ट परवानगी नाही, मग जादा साखर उत्पादनन होत, मग दर कमी,पेट्रोलियम कंपन्यांच्या दबावाखाली हे केलं जातं अस म्हणतात, ऊस उत्पादक तरुण नाइलाजाने देश चालवणार्याच्या विरोदात आंदोलन करतो.कुठं दिसतेय कृषी क्षेत्रातील तरुणांसाठी देशाने केलेले नियोजन, धोरण !  अशी शेती असणाऱ्या तरुणांनाच्या शेतात भूमिहीन शेतमजूर तरुणानं करावंतरी काय?  कृषी च जर जास्त सांगितलं कारण आपल्या देशाची आर्थिक सायकल शेतीपासून सुरू होते. शिक्षण क्षेत्रात सुद्दा बऱ्याच अनागोंदी आहे. बारावी,पदवी, पदवीउत्तर, phd ,सेट नेट  पुन्हा वशिला! आता भज्जी विकण्याचा गाडा टाकव तर मोक्याच्या जागा राजकीय लोकांच्या ताब्यात ,सारे त्यांचेच कार्यकर्ते, नाहीतर हफ्ता ध्या. कासाय सवसारची गाडी चालण्यासाठी जशी (नवरा व बायको) दोनही चाकाची गरज असते, (येथे तरुण व देश) एक चाक असून उपयोग नाही तर आज झाले आहे ,देश (देश चालवणारे) नावच चाक आपलं अंग काढून घेत आहे असं वाटतं....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************