समाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

४०% लोक मत का देत नाहीत ?


४०% लोक मत का देत नाहीत ?

शिरीष उमरे, यवतमाळ

खरेच ६०% लोक मत देतात का ? हो... जवळपास एवढे लोक मत देतात व ह्याचे श्रेय जाते आपल्या संस्कृतीला... लोकशाही फार पुर्वीपासुन रुजली आहे ह्या मातीत !!

जे मत देत नाहीत ह्यामधे माझ्या मते बहुतांशी तीन प्रकाराचे लोक असतात.

एक ज्यांना ह्याचे महत्व कळालेले नसते. त्यांच्यासाठी हा दिवस सुट्टी असते. आळस व निष्काळजी व निरुत्साह ह्यामुळे ह्या सुखवस्तु लोकांना काही फरक पडत नाही कोण निवडुन आले ते !! पैश्याच्या जोरावर आपली सगळी कामे करवुन घेणारी ही तथाकथित सुशिक्षीत जमात अतिशय धोक्याची आहे. भ्रष्टाचार वाढवण्यात ह्यांचाच हात असतो.

दुसरे जे अन्यायाला चिडुन व हतबल होउन बहीष्कार टाकतात.  पुढे ह्यातुन च आत्महत्या वा नक्षलवाद ह्या समस्या उभ्या राहतात.

तिसरे जे इच्छा असुनही मत देऊ शकत नाहीत. ह्यात इलेक्शन कमीशन कार्यालयाचा अनागोंदी कारभार, सरकारचा नविन मतदार फ्रेंडली कायदे बनवण्यात विरोध, प्रसार माध्यमांचे दबाव तंत्र नसणे अशी बरीच कारणे असतात. रोजगारामुळे मत न देऊ शकणार्यांची संख्या लक्षणीय आहे. ह्यातुन डुप्लीकेट वोटींग चे प्रकार घडतात.

मग ह्यातुन मतदार वाढीसाठी काय प्रयत्न व्हायला पाहीजे ?
आधार कार्ड वापरुन गुप्त मतदान  भारताच्या कानाकोपर्यातुन कुठुनही मत देता आले पाहीजे.
सगळ्या उमेदवारांची संपुर्ण माहीती मतदारांपर्यंत पोहचण्याची जबाबदारी इलेक्शन कमीशनची असली पाहीजे. प्राथमिक शिक्षणापासुन च नागरिक घडवला गेला पाहीजे.
जे जाणुनबुजुन मत देत नाहीत त्यांना सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ करण्याची शिक्षा व्हायला हवी. जे नियमीत मत देतात त्यांना सरकारकडुन विमा संरक्षण दिल्या जाऊ शकते. अजुनही बरेच उपाय आहेत... राइट टु रिकॉल व पॉवरफुल नोटा हे कायदे होणे आवश्यक आहे सदृढ लोकशाहीसाठी !! त्यावर चर्चा पुन्हा कधीतरी ..
*=============================*



संगीता देशमुख,वसमत

अनेक वर्षापासून देशात कोणत्याही निवडणुकीत मतदान हे सरासरी ६०-७०% च्या आसपासच  होत आहे. वरवर पाहता हा मुद्दा सहज वाटत असला तरी तो तेवढाच गंभीर आहे. जगात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा उल्लेख होतो. आणि त्या देशात जर ३०-४०% लोक लोकशाही घडविण्यापासून अलिप्त  रहात असतील तर देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. मतदान कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. यात लक्षणीय  बाब म्हणजे निरक्षर,अडाणी,गरीब लोक हे मतदान करण्यात सुशिक्षीतांपेक्षा अग्रेसर आहेत. कारण काल विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे येथे फक्त ४०% मतदान झाले आणि अनेल खेडोपाडी ७०% च्या wअर मतदान झाले. यावरून हे लक्षात येईल.  गरीब,मजूर,कामगार  लोक कामावर जाण्यापूर्वी आवर्जून मतदानास जातात. परंतु बरेचसे नोकरदार तर मतदानाची सुट्टी आहे,याचाच उपभोग घेतात. तेव्हा ते मतदानाला न जाता एखाद्या टुरवर जाणारे महाभागही आहेत. काहीजण सुट्टी आहे,म्हणून मतदानाऐवजी पेंडींग पडलेले कामे करतात. अनेकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नसते. यात महिला अग्रस्थानी आहेत. अशाही अनेक महिला आहेत ज्यांना वाटते की,त्यांच्या एका मताने राष्ट्रउभारणीत फारसा फरक पडणार नाही. अनेक ग्रामीण महिला आहेत की,ज्यानी आजवर फक्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाच फक्त मतदान केले. तर शहरी भागातील अनेक महिलानी वयाच्या चाळीशीपर्यंत मतदान केले नाही.  काहीजणांचे नाव मुळगावी नोंदवलेले असते आणि नोकरी-व्यवसायानिमित्त फार दूरव असतात. अशीही अनेक लोक मतदानापासून वंचित असतात. खरेतर  यावर सरकारने वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे. ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत,यांची निवडणुकीपूर्वी दखल घ्यायला हवी. कारण ही जबाबदारी बी एल ओ ची आहे. ज्यानी सुट्टी असूनही मतदान केले नाही,अशांवर कारवाई व्हायला हवी. ज्या ठिकाणचे मतदान जास्त झाले तिथे शासनाकडून काहीतरी छोटीमोठी योजना पोहोचवावी. जेणेकरून ते उत्साहाने मतदान करून घेतील. जे गरीब,मजूर मतदान करत नाहीत त्यांना राशनसारख्या योजनेचा लाभ नाकारावा. कोणतीही बाब यशस्वी करायची असल्यास  चांगल्याचं कौतुक अन् चुकीला शिक्षा मिळायला हवी.  त्याशिवाय कुटुंब असो, संस्था असो,अथवा ते प्रशासन असो त्यात सुधारणा घडून येत नाहीत. काहीप्रमाणात मतदार यादीतही अनेक त्रूटी असतात,जसे की, लोकांच्या नावात त्रूटी असणे,तिथे इच्छा असूनही मतदान होत नाही.एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी नोंदवलेले असल्यामुळे तो एकाच ठिकाणी मतदान करतो,दुसरीकडे तो टक्का घसरतो.
                  वरील बाबी मतदानाचा टक्का घसरविण्यास जबाबदार असल्या तरी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सरकारबद्दल लोकांची अनास्था असणे. आपण वर्षानुवर्षे मतदान करत आहोत परंतु कोणतेही सरकार ज्याप्रमाणात घोषणाबाजी करतात त्याप्रमाणात त्या बाबी पूर्ण केल्या जात नाही. मग आपल्या मतदानाचा उपयोग काय?हाही प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आजकालची सरकारं ही लोकांच्या मतावर नाहीतर त्याने  निवडणुकीत वाटलेल्या पैशाच्या आणि दारुच्या  बळावर उमेदवार निवडून  येतात. असे दारू आणि पैशाच्या बळावर निवडून येणारे उमेदवार पाहिले की,विवेकी माणूस मतदानाबाबत उद्विग्न होतो. देशात एवढे तरुण सुशिक्षित आणि सक्षम  असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकाना उमेदवारी दिली जाते,तेव्हाही अनेक लोक निवडणुकीपासून अलिप्त रहाणे पसंत करतात. दिवसेंदिवस राजकारणातील वाढत जाणारा  खोटारडेपणा,अविश्वास हे मतदान कमी होण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे याबाबत स्वतः सरकारने जागरूक असणे महत्वाचे आहे. निवडणुकप्रक्रिया पारदर्शक बनवणे,पैसा,दारू हे निवडणूक काळात दूर ठेवूनजनतेची प्रश्न,देशातील गंभीर समस्या, जनतेचा विकास हेच मुद्दे घेऊन निवडणुका लढवायला हव्यात.  जनतेचा विश्वास जिंकणे
*============================*

अनिल गोडबोले,सोलापूर

1. मतदानाबाबत उदासीनता.:- आपण मत दिल काय नाही दिल काय फरक पडतो..

2. मतदान ही गोष्ट महत्त्वाची आहे, हे बिंबवण्यात व्यवस्था कमी पडत आहेत.

3. मतदान प्रक्रिये मध्ये बराच गोंधळ आहे. बूथ सापडत नाही, यादीत नाव नाही, चेहरा एकाचा आणि पत्ता दुसऱ्याचा व नाव तिसर्याचे.

४. मतदान हे आपल्यासाठी असत हे आपल्याला माहीत नाही.

5. काही लोक मूळ गावापासून पोटापाण्यासाठी लांब राहतात.. खरच काही जणांना यायला जमत नाही.

6. सुशिक्षित लोक स्वतःला जबाबदार घटक मानत नाहीत.

7. महिला, आदिवासी, आणि वंचित घटक हे कोणाच्या तरी प्रभावाखाली मतदान करतात. त्यांना मतदान प्रक्रियाच माहीत नसते.

8. काहीजणांचा लोकशाही वर विश्वास नाही. उदा. नक्षलवादी

9. मतदान प्रक्रिया हा एक हत्ती आहे त्याला हलवणे हा खूप मोठा अडथळा आहे.. साधी सोपी सुटसुटीत प्रक्रिया नाही.

10. NOTA चा म्हणावा तसा प्रचार होत नाही. आपल्याला रिजेक्ट करण्यासाठी सुद्धा मतदान करता येत, हा विश्वास नाही. उलट बऱ्याच लोकांनी नकाराधिकार वर चुकीच्या बातम्या पसरवल्या आहेत. म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही वगैरे..


शेवटी;- "कोणीही आला तरी तेच करणार" त्यामुळे मत प्रक्रिया मोडकळीला आली आहे.
*============================*

पवन खरात,अंबाजोगाई

              मतदान करणे हा प्रत्येक व्यक्तीचा फक्त अधिकारच नाही तर ते कर्तव्य सुद्धा आहे. अधिकार मागण्यासाठी आपण कोणत्याही थराला जायची तयारी करतो.मग कर्तव्य पार पाडण्याची वेळ येतो तेव्हा का तोंड लपवून बसायचे.
       "अधिकार मागायची लाज वाटत नाही तर मग कर्तव्य पार पाडायला का लाज वाटते?"
       भारतीय निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. तो फक्त शोभे साठी नाही किंवा त्यांना काम नाही म्हणून नाही तर भारतीय लोकशाही बळकट करायची असेल तर 100% मतदान होणे गरजेचे आहे आणि त्यांची जाणीव प्रत्येक भारतीय नागरिकाला व्हावी यासाठी ते अनेक जन जागृती कार्यक्रम राबावतात आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. पण 60% मतदार आपले कर्तव्य बजावत आहेत मग हे 40% मतदार लोकशाहीत वाढत असलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या वाढीसाठी प्रोत्साहन देत आहेत.असच म्हणावे लागेल.
      जगात अभिमानाने सांगतो की सर्वात मोठी लोकशाही आमच्या भारत देशात आहे, पण मागील तीन निवडणुकीचा विचार केला तर सरासरी 60% इतके मतदान झाले आहे तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे उरलेले 40% भारतीय नागरिक मतदान का करत नाहीत .
हे 40% मतदार खूप छान प्रतिक्रिया देतात,
"मी जर मतदान नाही केलं तर लोकशाहीला काय फरक पडणार आहे?" आज मतदानानिमित्त सुट्टी आहे कुठेतरी फिरायला जाऊ,आपल्याला काय भेटणार आहे मतदान करून. यांना कसे समजेल आपण जर मतदान केले नाही तर आपणच आपल्या लोकशाही चा गळा अवळतो आहे.एक मताची किंमत फक्त एक मताने पराभव मिळालेला उमेदवार नक्कीच जणू शकेल.
एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी मतदान करावे हे गांभिर्याने लक्षात घ्यायला हवे.
फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते.हेच प्रेम आणि राष्ट्रभक्ती जर मतदानाच्या दिवशी जर लक्ष्यात ठेवले तर खरचं भारतीय लोकशाही सक्षम होईल.
*=================================*

वाल्मीक फड,निफाड,नाशिक.

जवळजवळ ६०% लोक मतदान करतात पण ह्या ४०%मध्ये मोडतात ऊच्चभ्रू आणी जास्त करुन सरकारी नोकरीत असलेले कर्मचारी.कारण यांना काय करायचंय मतदान करुन आपला पगार मिळतोय ना बस्स. मतदानाचा दिवस एक सुट्टीचा दिवस म्हणून त्या दिवसी मौजमजा करायची परंतू मतदानाच्या दिवसी मजा करणाऱ्या लोकांना सत्तेवर असणाऱ्या सरकारबद्दल बोलण्याचा सुद्धा काहीएक आधिकार उरत नाही.
मला तर वाटतंय की,मतदान केल्यावर अशी काही व्यवस्थापक असावी की जेणेकरुन मतदान केलेला व्यक्ती ओळखता येईल आणी न केलेला सुद्धा.म्हणजे जर कर्मचारी असेल तर त्याचा एक दिवसाचा पगार सरकारने कापून घ्यावा आणि इतर लोकांना त्या महीन्याचे सरकारी राशनआहे ते देऊ नये .पण ह्या सर्व गोष्टींसाठी शासकीय यंत्रणाही तितकिच सक्षम असायला हवी.
दुसरा पर्याय मतदान झाल्यानंतर ज्यांनी मतदान केले नाही अशा लोकांच्या गाठीभेटी घेऊन विचारणा करावी की,बाबा तु मतदान का करत नाही तुझा लोकशाहीवर विस्वास नाही का?
मि बघतो आमच्याकडील गरीब लोक पण मनाने श्रीमंत असलेले लोक दुसऱ्याच्या शेतात मजूरीला जाण्याच्या आगोदर मतदान करुन जातात.मी काही सांगत नाही की तुम्ही सुट्टीचा आनंद घेऊ नका पण आपले कर्तव्य पार पाडून.
आपण मतदान नाही केले तर असेच कायम हे आंगठेबहाद्दर ,गुंडागर्दी करणारे लोक निवडून जातील आणी जो तळमळ करणारा देशाला वाहून घेतलेला माणूस मागे राहून  जाईल मग विचार करा आणी ठरवा आपला देश कोठे राहील.आजतरी आपल्याला देशभक्त नेत्यांचीच गरज आहे.
माझ्या मते आपण नुसतं लिहून चालणार नाही तर आपआपल्या प्रभागात आपण तो दिवस देऊन मतदान करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं पाहीजे.चुकभूल माफी असावी.
*==========================*

दिपाली वडणेरे,नाशिक.

     सद्या  सगळीकडेच मतदान चालु आहे आणि त्यातच लिखाणानासाठी  निवडलेला  विषय ४० टक्के लोक मत का देत नाहीत ? खरचं विचार करायला आणि लिहायला भाग पाडणारा विषय आहे ..

      खरंतर हा खूप महत्त्वाचा आणि वाचार करण्याला भाग पाडणारा असा विषय आहे. मतदान करणे हा आपला अधिकार  आहे आणि तो आपण स्वतःहून काळजीने ,  जबाबदारीने पार पाडला पाहीजे.  मतदानाच्या दिवशी नोकरदारांना तर सुट्टीच असते वैयक्तिक व्यावसायिक यांना देखिल सुट्टीच  असते असे म्हणायलाही काही हरकत  नाही  काही त्या दिवशी गावे / शहरे ही बंदच असतात. त्या दिवशी जवळपास  सर्वच  जण मतदान करून येतात मोलमजूरी करणारे असो ,  व्यवसायीक वा नोकरदार  सर्वच आपला अधिकार चोखपणे बजावतात.
     आता यत राहिले ते ४०  टक्के  मतदान न करणारे ? आणि   यामध्ये कोणकोण आहेत ?  तर  या ४० टक्क्यांमध्ये वरच्यांमधीलच म्हणजेच नोकरदार ,  व्यावसायिक , मजूरवर्ग , आदी ....
    सुट्टी म्हटली  की जवळपास  बरेचजणांचे हेच विचार की आपण एकट्याने  नही केले मतदान तर कुठे एवढा फरक पडणार आहे . जाऊ दे काय करायचे मतदान ?  आणि इतक्या वेळा  तर केले काय फायदा झाला आपल्याला ?  असा विचार करणारे असतात . एका मताने कुठे कुणाचं काही राहून जाणार आहे ?  तर काहीजण ट्रीप ला जाण्याचे  नियोजन करतात आणि फिरायला  निघून जातात तर काही जण शहराकडे  राहत असतील तर गावाकडे भेटायला  म्हणून निघून जातात / येतात . मोलमजूरी  करणारा  पण तेच काय होणार हे इतक्या वर्षात  नाहि झाल काही अन् आत्ता  काय होईल ? हं काहिच नाही होत त्यापेक्षा  आपल रोजान गेलं तर रोज तरी फिटल असा विचार करून कामाला निघून जातात. एवढचं नाही काही तर असे असतात मला जायलाच जिवावर येतंय अस बोलून टाळतात हो...
    विचार केला तर  खूप काही कारण आहेत 100 %  मतदान न होण्याचे .. पण ....!  जर प्रत्येकाने आपली स्वतःची जबाबदारी व हा आपला अधिकार आहे हा विचार जर केला ना  तर ना कारण शोधावी लागतील ना मतदान न करणारे  शोधवे लागतील.... गरज आहे ति फक्त  एका चांगल्या सकारात्मक  विचारसरणीची  आपल्या मतदानाच्या जबाबदारी आणि अधिकार यांच्या  जाणीवेची.....आपल्याला  काय फायदा  आहे.... इतक्या वर्षांत  काय झाले काय नाही झालीे हा विचार करताय ना  मग तो एकाच बाजूने न करता दुसर्याही बाजूने ही  करून पहा की का नाही झाला काही बदल आपोआप आपले उत्तर  आपल्याला नक्कीच मिळेल .... आणि बदल करण्याची  देश घडविण्याची  जबाबदारी  आपण त्यांना निवडून दिलेयं महणून त्यांची  एकट्याचीच आहे हा विचार सोडून आपणही थोडाफार नाहीकाही जास्त  पण आपली विचारशैली ,  ते करण्याची  पद्धत, इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा  स्वतःत बदल घडवण्याचा  तर नक्कीच  प्रयत्न  करू शकतो...

चला मग लोकशाही असलेल्या भारत देशाचे सुपुत्र,  एक सुशिक्षित , सुजाण नागरिक म्हणून आपला मतदानाचा  हक्क  बजावूया....🙏☺

🙏 चुकभूल माफी असावी .....
*============================*

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि त्याचे समाजावरील परिणाम

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 5⃣0⃣वा 📝 

❤🧡💛💚💙💜🖤💗💓💖

🎊🎉🎊🎉🎁🎈🎊🎉🎊🎉🎈


सुवर्ण महोत्सवी आठवडा

🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2018

💬✍💬✍💬✍💬✍💬✍

  अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि त्याचे समाजावरील परिणाम


शिरीष उमरे, नवी मुंबई


२१ सप्टेंबर १९९५ गणपती दुध पिण्याची अफवेला तत्कालिन शासनाचे मुख्यमंत्री  महोदयांनी श्रध्दा म्हणुन मान्यता देण्याचा प्रयत्न केला होता. जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (स्थापना १९८९) तो हाणुन पाडला तो जागतिक अंधश्रध्दा निर्मुलन दिन मानला जातो.

जागतिक पातळीवरही अब्राहम कोवूरांच्या २२ अंधश्रद्धा आव्हानांपैकी एकही आव्हान एक लाखाचे बक्षीस असतांनाही आजगायत कोणीही स्विकारले नाही.

महाराष्ट्रात समाजसुधारकांचा ४०० हुन जुना इतिहास असतांना समाजकंटकानी श्रध्दा व अंधश्रध्दा ह्यातला फरक सामान्य जनतेच्या लक्षात येऊ दिला नाही.

जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत सोळा वर्षाच्या संघर्षानंतर सरकारने हे विधेयक विधानसभेत मांडले व तिथे ते चौदा वर्षे रखडत राहीले. नंतर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्घुण हत्येनंतर लोकप्रक्षोभाला घाबरुन काटछाट करुन हे विधेयक पास झाले. ह्या गोष्टीलाही आता पाच वर्षे उलटुन गेलीत.

महाराष्ट्र राज्यात नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा ज्याला सगळीकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात तो २०१३ पासून अस्तित्वात आहे.

आजही या कायद्याबद्दल शासनाकडुन जनजागृतीचे काहीही प्रयत्न केले जात नाही. शालेय शिक्षणात ह्याचा अंतरभाव नाही. पोलीस यंत्रणेलाही याची पुर्ण माहीती नाही. त्यांच्या अधिकाराची त्यांना जाणीव नाही. शासनाकडुन त्यांच्या नियुक्त्या नाहीत. राजरोसपणे ह्या कायद्याच्या चिंधड्या फाडणे सुरु आहे.

जोपर्यंत आपण नागरिक जागृत होऊन एकत्र संघर्ष करत नाही तोपर्यंत ह्या कायद्याची अंमलबजावणी शासन करणार नाही.

जागृतीसाठी वाचाल तर वाचाल!!

नरेंद्र अच्युत दाभोलकर
मराठी  विज्ञानवादी व समाजसुधारक ह्यांचे साहित्य

वाचा
१)पुस्तक: समता-संगर
२) पुस्तकः ठरलं...डोळस व्हायचंच!
३) पुस्तक: प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे
(संकलनः संदेश बालगुडे)
४) अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
५) अंधश्रद्धा विनाशाय
६) तिमिरातुनी तेजाकडे
७) श्रद्धा-अंधश्रद्धा
८) भ्रम आणि निरास
९) विचार तर कराल?
१०) प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर)
११) मती भानामती (सहलेखक माधव बावगे)
१२) ऐसे कैसे झाले भोंदू
१३) ठरलं... डोळस व्हायचंय
१४) विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी
१५) झपाटले ते जाणतेपण - सहसंपादक विनोद शिरसाठ
बघा:
 ज्याचा त्याचा प्रश्न (अंधश्रद्धा या विषयावरील नाटक - लेखक : अभिराम भडकमकर). या नाटकाचे ४५०+ प्रयोग
ऐका
दाभोलकरांच्या दहा भाषणांची सी.डी.- प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे - डी.व्ही.डी, निर्माते - मॅग्नम ओपस कंपनी.
==============================

संगीता देशमुख,वसमत 


धर्माच्या व परंपरेच्या नावाखाली युगायुगांपासून  समाजात सामान्य लोकांची आर्थिक,शारीरिक,मानसिक,सामाजिक पिळवणूक ही अत्यंत मोठ्या प्रमाणात होत होती आणि खरेतर ती आजही आहे. याच गर्तेतून सामान्य लोकांना बाहेर काढण्यासाठी
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी घातले. त्यासाठी त्यांना बलिदानही करावे लागले. त्यांच्याच अखंड प्रयत्नांचा विचार करून राज्य सरकारला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर का होईना पण २०१३ मध्येअंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करावा लागला. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर दाभोळकरसमर्थकांना बरचसं समाधान झाले होते. पण आजवर आपल्या देशात असे अनेक कायदे अस्तित्वात आहेत परंतु त्याची अमलबजावणी मात्र शून्य आहे.म्हणून जोवर भारतीय लोकांची मानसिकता बदलत नाही,तोवर कोणतेही कायदे करून उपयोग होणार नाही. याचा अर्थ असा नाही,की असे कायदेच अस्तित्वात आणण्याची गरज नाही. पण जेव्हा कायदे अस्तित्वात येतात तेव्हा अशा कायद्याबाबतची जागरूकता निर्माण करण्याची अपेक्षा  समाजातील सूज्ञ लोकांकडून आहे. आपल्या राज्याचे म्हणा किंवा देशाचे दुर्दैव म्हणा,परंतु ज्यांच्या हातात देशाचे सूत्र आहेत,तेच लोक अशा अंधश्रद्धाचा अवलंब आणि  प्रसार करतात. मग कायदाउल्लंघनाची कारवाई कोणावर करायची आणि देशातील सामान्य लोकांनी अनुकरण कोणाचे करावे? त्यामुळे डॉ. दाभोळकरांच्या बलिदानानंतरही,कायदे अस्तित्वात येऊनही याबाबतीत सुधारणा दिसून येत नाही. सामान्य लोकांचे प्रबोधन व्हावे,त्यांना अज्ञानातून बाहेर काढण्याच्या ऐवजी देशात कट्टर धार्मिकतेच्या नावावर जास्त फूट पाडण्याचे आणि अंधश्रद्धा रुजविण्याचे काम लोकप्रतिनिधींकडूनच सातत्याने होत आहे. डॉ. दाभोळकरांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही,असे जर काही सूज्ञाना वाटत असेल तर सामान्य लोकांना या कायद्याबाबत जागरूकता आणि अंधश्रद्धेच्याबाबत प्रबोधन करून बाहेर काढणे,ही काळाची गरज आहे. अन्यथा असे कित्येक कायदे विनाअमलबजावणीविना  कागदोपत्री अस्तित्वात आहेत.  जर त्याची नोंदच होत नसेल तर या कायद्याचे समाजात चांगले परिणाम दिसून येणार नाहीत.
==============================

किशोर शेळके. लोणंद. जि. सातारा



    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने २०१३ ला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आमलात आणला. अर्थातच हा कायदा धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करीत असल्याने त्याची अंमलबजावणी करणे जरा अवघड काम आहे. पण समाजहितासाठी या कायद्याची अंमलबजावणी करणे खुप गरजेचे आहे.

    या कायद्यामध्ये हिंदू परंपरेतील नेमक्या कोणत्या अंधश्रद्धा समाविष्ट करायच्या यात बरीच मत-मतांतरे झाली. महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडावा म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी महापूजा पासून ते लिंबाला चहूबाजूनी टाचण्या टोचून केलेल्या करणी पर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा होऊ लागली. कारण दाभोळकरांच्या विचारसरणीचा महाराष्ट्र घडविणे म्हणजे झाडावरून आंबा तोडण्याएवढं सोप्पं काम मुळीच नाही. आणि याचं कारण ही तसंच आहे. राज्याचा प्रथम नागरिक जर या गोष्टीला खतपाणी घालत असेल तर अंधश्रद्धा मुक्त महाराष्ट्र हे दाभोळकरांचं स्वप्न स्वप्नच राहणार ना?.

     महाराष्ट्र राज्य शिक्षणाच्या बाबतीत चांगलेच सक्षम झालेले पहायला मिळतेय. अशिक्षीत वर्ग कमी होऊन शिक्षित वर्ग थोड्याफार प्रमाणात का होईना पण वाढलाय. आणि तरीही अंधश्रद्धा कमी होत नसेल तर यासारखं मोठं दुर्दैव नाही.

     एखाद्या स्वयंघोषीत भोंदूबाबाच्या आश्रमासमोर एखादी मर्सिडीस सारखी गाडी उभी दिसली ना, तर माझी तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. आपल्याला चांगलं माहीत असतं की चमत्कार हे विज्ञानाचे अविष्कार आहेत आणि कोणत्याही आजाराचे निदान डाॅक्टरच करू शकतो. हे माहित असूनही आपला सुशिक्षित वर्ग काय विचार करून इथं नतमस्तक होतो, ते त्यांनाच ठाऊक.

        डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाठपुराव्याने त्यांच्या मृत्यू पश्चात का होईना पण या कायद्याची निर्मिती झाली. पण या कायद्या अंतर्गत कारवाई किती जणांवर झाली हे विचारले तर ही संख्या अगदी बोटावर मोजता येईल इतकीच भरेल. पोलिस यंत्रणेतील पोलिस निरीक्षकांच्या वरच्या हुद्यावरील सर्वच अधिकारी नुसत्या संशयावरून ही कारवाई करू शकतात, पण आजपर्यंत त्यांचा नाईलाज माझ्यातरी लक्षात आला नाही.

     महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांचा विचार केला तर अंधश्रद्धेला पूर येण्याचं उगमस्थान हेच. आणि गरीबीने होरपळणारा समाज, अख्ख्या देशाचे बजेट पुर्ण करू शकेल एवढा पैसा दरवर्षी या मंदिरात देतो, आणि स्वतःला आत्मिक समाधान लाभल्याचं ढोंग आणून पूढील पाप करण्यासाठी मोकळा होतो. शिक्षण, विज्ञानवाद, सतसदविवेकबुद्धी किंवा विवेकवाद या गोष्टी मानवी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आज या सर्व गोष्टी माणसाकडे आहेत, पण या गोष्टींचा योग्यवेळी व योग्य ठिकाणी वापर केला जात नाही.

     माझ्या मते, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कायद्याची वाट बघण्यापेक्षा समाजाने जागृत होणे गरजेचे आहे, तरच दाभोळकरांसारख्या विचारवंतांचे बलिदान सार्थकी लागेल.
==============================

शीतल शिंदे - दहिवडी


   अंधश्रद्धा म्हणजे समाजाला लागलेली कीड , अंधश्रधा म्हणजे समाजाला लागलेली वाळवी .ही वाळवी आपल्याला कधी खावून टाकते म्हणजे दारीद्र्याकडे नेते आणी उध्वस्त करते ते कळतही नाही .
          शिवरायांनी त्यांच्या काळात हया गोष्टींचा कधीही महत्व दिले नाही .कारण त्यांचे गुरु संत तुकाराम ह्यांच्या विचारांवर ते चालत होते .त्यांनी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी  कोणतेही होम , हवन , मंत्र , तंत्र पूजा पाठ , विधी केले नाहीत .शिवरायांनी बरेच गड किल्ले अमव्शेच्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून जिंकले .त्यांनी कधी कोणत्याच किल्ल्याला काळी बाहुली , लींबु मिरची बांधली नाही .आपल्या राजाने नाही मग आपण का ?🤔 हा प्रश्न नाही का पडत ह्या रयतेला . ज्या रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी या राजानी आपले प्राणांचे बलिदान दिले .
    शिवरायांच्या साम्राज्यानंतर ह्या देशात स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी ह्या भोळ्याभाबड्या जनतेवर अंधश्रद्धेचे जाळे पसरवले गेले ते अजून काही निघालेच नाही .
          आज विजया दशमी दिन  याच दिवशी सम्पूर्ण जगामधे पसरलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा राजा सम्राट अशोक यांनी आपले हातातील शस्त्र खाली ठेवून जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बौध्द धम्माचा स्वीकार केला की जो
विज्ञाननावर आधारित आहे जेथे अंधश्रध्दा नसून  समता , करुणा , प्रज्ञा आहे. म्हणून हा दिवस विजया दशमी दिन म्हणून साजरा केला जातो . जगातील पहिला समाजकार्य करणारा राजा , युद्ध नको तर (शांती  ) बुद्ध हवा म्हणणारा आणी जगाला शांतीचा संदेश देणारा असा राजा होता .
       यांचे विचारांचे आचरण करणारे संत तुकाराम , शिवराय , राजे संभाजी , ह्याच विचारांचा वारसा पुढे चालवणारे,  ह्या समाज सुधारकांना सुद्धा प्राणांचे बलिदान द्यावे लागले .
    ह्या  समाजाला अंधश्रेतून बाहेर काढानारे दाभोळकर ह्यांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले. 
   भारतीय संस्क्रुतीच्या  नावाखाली आपल्या समाजावर लादलेली अंधश्रद्धा ह्या समाजातील ऊच्य शिक्षित तरुणांनी मोडून काढल्या शिवाय समाप्ती होणार नाही .प्रत्येक तरुणाने आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे अंधविश्वासू , कुकर्म  , पूजा पाठ , जप तप , मंत्र होम हवन , प्राण्यांचे बलिदान , ह्या प्रतांना कडाडून विरोध केला पहिजे .तरच ह्या दरिद्र्याकडे नेणाऱ्या,  बुद्धीला गंज लावणाऱ्या आणी आशीर्वादाने मिळणाऱ्या गोष्टींकडे आशा लावून बसविन्यास भाग पाडणाऱ्या आशा थोतांड गोष्टींना  लाथाडुण  लावले पाहिजे तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वावलंबी होवू .

खरेतर अंधश्रद्धेचे  ग्रहण लावलेल्या या देशाला,
             भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला 26 जानेवारी 1949 रोजीच अंध श्रद्धा मुक्त केले आहे . हे सम्पूर्ण जगाला मान्य आहे फक्त भारतात राहानाऱ्या लोकांना हे मान्य करू दिले नाही काही समाज
कंठकानीं !
        ज्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  या भारत देशाला संविधान रुपी अनमोल ग्रंथ बहाल केला त्याच दिवसापासून भारतामध्ये, , , , 😁😁🤔🤔
   स्वर्गामधूण देवांची येणे जाणे बंदच झाले .त्याआधी सर्व देवी-  देवता स्वर्गामधून मुक्त पणे प्रुथ्वी वर मुक्तपणे संचार करत होते .आता काय टेक्स पडतो काय त्यांना ? 🤔

देवांचे प्रुथ्वीवर अवतार घेणेपण बंद झाले आणी समुद्र मंथन पण बंद झाले की हो ! जटा तून नदी वाहने बंद झाले , मळा पासून नवीन जीव तयार करने बंद झाले पाण्यावर तरंगणारे पूल पण कोण आता बंधू शकत नाही का बरे 🤔 हे व्हायला पहिजे ना आता , मग  का नाही .
आता काही कोण वरदान , शाप देत नाही .आणी आता पहिल्यासारखे देव दानव यांचे हवेतून युद्ध पण होत नाही किंवा प्रुथ्वी निशस्त्र  करणारे शूरवीर पण जन्माला आले नाहीत .
   काय जादू केली बाबासाहेबांनी जादू नाही केली  रात्रं दिवस अभ्यास करून आपले सर्व आयुष्य ह्या जनतेच्या सुखासाठी  संविधानाच्या माध्यमातून सर्वांना स्वातंत्र्य  हक्क ,  अधिकार  आणी सर्वस्व बुद्धी बहाल केली आहे,  आपण फक्त त्याचा वापर करायचा आहे .
  त्याच्याही पलीकडे जावून बाबासाहेबांनी 14 अक्टोम्बर 1956 रोजी  सम्पूर्ण मानव जातीला
तारनाऱ्या आशा बौध्द धर्माचा स्वीकार केला .त्याचे कारण हेच की हा एकच धर्म असा आहे की तो या बहुजन समाजाला या अंधश्रद्धेतून , दारिद्र्यातून , दुखः तून , गलिच्छ विचारातून आणी गुलामगिरीतून बाहेर काढन्याचा एकच पर्याय आहे म्हणून .       

बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते की हा धर्म काही साधा सुधा धर्म नाही ,  समाजाला ह्या  धर्माचे ,   तत्वाचे म्हणजे पालन करने फार अवघड जाईल परंतु माझ्या पुढे दुसरा कोणता मार्ग नाही की तो या भाबड्या समाजाला बाहेर काढेल , समानतेची वागणूक देईल , स्त्रियांचे शोषण थाम्बवेल  .ते म्हणाले

 हळूहळू होईल पालन - कारण मला ह्या शिवाय कोणताहि मार्ग मला  दिसत नाही .
मात्र काही समाज कंठकानीं बौध्द धर्म म्हणजे अमुक तमुक जातीचा असे सांगत वाईट प्रचार केला .

बाबासाहेबांनी हा धर्म का स्वीकारला ते त्यांनी स्वतः  लिहिलेल्या
 "बुद्ध आणी त्यांचा धम्म "
ह्या पुस्तकात त्यांचे विचार सविस्तर मांडलेले आहेत .हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचा .

ज्या दिवशी भारतामध्ये प्रत्येक घरा घरात संविधानाचे पाठ वाचले जातील , महापुरुषांच्या कार्याचे  धडे शिकवले जातील त्या दिवसापासून सम्पूर्ण भारतातील प्रत्येक घरातील प्रत्येक मूल
विज्ञानवादि  , अंध श्रद्धा मुक्त आणी  शास्त्रज्ञ होतील .
"जय भारत जय अंधश्रद्धा मुक्त संविधान "
==============================

निखिल खोडे, ठाणे


            आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे अंधश्रद्धा होय. अंधश्रध्दे मध्ये विविध प्रकार येतात उदाहरण. जादुटोणा, बुवाबाजी, भूत- पिशाच्च, अंगात भूत येणे, तंत्र- मंत्र, नरबळी, अफवा पसरविणे इत्यादी असतात. २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अमलात आणला. परंतु त्याची अंबलबजावणी खऱ्या अर्थाने होते का आणि  जास्त करून ग्रामीण भागात कायद्याची माहीती तरी आहे का? याला कारणीभूत ठरते तो म्हणजे खेड्यातल्या लोकांमधील अशिक्षितपणा आणि बुवाबाजी करणारे संधीसाधू लोक जे गरीब लोकांना देवाचा शाप बसेल वैगरे म्हणून लुबाडत असतात.
  
                उदाहरण म्हणून सांगतोय की  माझ्या गावाजवळून ५ किमी अंतरावर आजणसरा नावाचे गाव आहे. भोजाजी महाराज नावाचे देवस्थान आहे. त्याठिकाणी नवस फेडण्यासाठी वेगवेगळ्या गावावरून आलेले लोक  तिथे येऊन स्वयंपाक करतात. रविवारी आणि बुधवारी जवळपास १०० क्विंटल डाळीचे पुरण पोळ्या बनविल्या जातात. भक्तीच्या नावाखाली अन्नाची नासाडी ही खूप मोठ्या प्रमाणात होते. आणखी एक उदाहरण म्हणजे गिरड म्हणून एक गाव आहे, ज्यांचे कुलदैवत बुवाफरिद आहे ते लोक घरचा कोणताही आनंदाचा प्रसंग उदा. लग्न वैगरे असेल तर त्याआधी गिरडला जाऊन तलावाच्या ठिकाणी बोकडाचा किंव्हा कोंबडीचा बळी दिला जातो. यामुळे तलाव मध्ये प्रदूषण  खुप मोठ्या प्रमाणात होते. या प्रकाराला काय म्हणाव?

                   ढोंगी लोकांमुळे, अशिक्षितपणा मुळे, जुन्या परंपरेमुळे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार लोकांमधील काही गोष्टीबद्दल चा अज्ञानपणा आहे. टेलिव्हिजन वरील मलिका, बातम्या व इतर दाखविले जाणारे कार्यक्रम सुध्दा याला जबाबदार आहे परंतु त्यांना मिळणारा पैसा हा मोठ्या रकमेत असतो आणि लोकांची पसंती अश्याच कार्यक्रमाला जास्त असते त्यामुळे करमणुकीच्या नावाखाली अंधश्रध्दा फैलवणे चालु आहे. हे बंद व्हायला पाहीजे. ह्या उलट ह्या कायद्याचे जास्त प्रसार व प्रचार व्हायला हवा....
==============================

IMAGE SOURCE INTERNET

लोक काय म्हणतील ? म्हणू देत ...

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

लोक काय म्हणतील ? म्हणू देत ...

 

अमोल धावडे,अहमदनगर

लोक काय म्हणतील या विचारानेच आपण आपला अर्धा वेळ वाया घालतो. माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या जीवनात लोकांचा प्रेवेश होतो. मुलगी जन्माला आली लोक काय म्हणतील या सर्व गोष्टी करता करता आपण आपले जीवन जगण्याचे राहूनच जातो.
व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात पण लोक काय म्हणतील या भीतीने त्या समस्याच तशाच सोडून देतात. उदाहरण घ्यायच म्हटलं की एखाद्या मुलीच 20 व्या वर्षी लग्न होत आणि तिचा पती 22 व्या वर्षी मरण होतो तर लोक काय बोलतील या भीतीने ती दुसरं लग्न करत नाही आणि आपल आयुष्य हे एकटाच काढते.
मी लहान असल्यापासून माझी आई मला लोकांचं उदाहरण द्यायची लोक अस बोलतील लोक तस बोलतील नीट वाग लोक नाव ठेवतील अस वागू नको परंतु मला अजूनही समजलं नाही लोकांना पडलं तरी काय दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करून परंतु आपलं आयुष्य सुधारण्यासाठी पण लोक काय बोलतील या भीतीने आपण सुधारत असतो.
मी आज माझे पदवीधर शिक्षण पूर्ण केले आहे एका सामजिक संस्थेत कामही करत आहे मला आईचा फोन आला की ती सांगत असते की अरे ती शेजारीन विचारत होती की तुमचा मुलगा काय करतो. दिसत नाही गावाकडे चांगली नोकरी करतो ना बापरे मी आई ला नेहमी सांगत असतो अग आई त्यांच्या या बोलण्याने मला अजून नवीन काही करण्याची उर्मी येते त्यामुळे ते बोलतात बोलू देत तू नको विचार करत जाऊ.
आपण आपल्या जीवनात लोकांना घाबरण्यात वेळ खर्च करत असतो कोण काय बोलेल याकडे दुर्लक्ष करून आपण भिनदास्त पणे वावरायला शिकलं पाहिजे गंमत पहा ना आपल्याला प्रियशीला किंवा प्रियकर भेटायला जायचं म्हटलं तरी कोण पाहिलं का पाहिलं तर बोलेल का या सर्व गोष्टींचा विचार करत आपला निम्मं मूड इथेच खराब करून टाकतो.
आपण आपलं जीवन जगत असताना स्वतःच्या मनाचा विचार करायला हवा आपल्या मनाप्रमाणे जस एखाद्या पक्षाला आपण पिंजऱ्यात बंद करतो व जेव्हा त्याला पिंजऱ्यातुन सोडून देतो व तो पक्षी भिनदास्त होऊन आकाश भरारी घेतो त्याचप्रमाणे आपण कसलाही विचार न करता जगायला शिकलं पाहिजे. शेवटी ते लोक बोलतच रहाणार😀
==============================

श्रीनाथ कासे,सोलापूर


कुछ तो लोग कहेंगे,
लोगों का काम है कहना !
छोडो बेकार की बातो में बीत ना जाये रैना ....

हे हिंदी चित्रपटातील गाणे ऐकले की लोक काय म्हणतील ? या विषयाचा ताण कमी होतो. माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो समाजामध्ये किंवा समूह करून राहतो. अश्यामुळे बरेच निर्णय, तो लोकांचा समूह कसा विचार करेल ? या भीतीने घेत नाही. घेतला तरी तो निर्णय सर्वमान्य किंवा समाजमान्य असला पाहिजे असा अट्टहास असतो त्यामुळेच भारतात शास्त्रज्ञाची कमतरता जाणवते.
लोकमान्य किंवा सर्वसामान्य विचार करणारे व्यक्ती जास्त असल्यामुळे सृजनशील नवनिर्माण विचार व्यक्त होताना दिसत नाहीत याचे सर्वात मोठे उदाहरण ग्रामीण भागाकडे दिसून येते. तेथील स्त्रिया आणि मुली कपडे कुठले आणि कसे घ्यायचे ? लग्न कुठे करायचं ? पासून सर्व निर्णय परजीवी सारखे घेत असतात. लोक काय म्हणतील या विचाराने त्या समाजासमोर व्यक्त होत नाहीत. या लोक काय म्हणतील ? किंवा चार लोक काय म्हणतील ? या विचाराने भारताचा विकास अडवला असेल का ?असेही कधीकधी विचार मनात डोकावून जातात.
आपण कुठली नोकरी करायला पाहिजे. हेअर स्टाईल, कपडे पासून सर्व गोष्टी दुसऱ्यांना काय वाटेल ? कसे वाटेल ? या गोष्टीवरच ठरत असतात. एकंदरीत आपण समोरच्या माणसाचा आणि त्या चार माणसाचा जास्तच विचार करत असतो.
" कोण कुणाचं नसतं " असेच सर्वजण म्हणत असतात मुळात आपण कोणाचे नसतो. हे त्यांना माहित नसते. लोक काय म्हणतील या विचाराने अनेक प्रेम हृदय तुटतात. अनेक लग्न याच विचाराने तुटतात. याउलट लोक काय म्हणतील म्हणून भ्रष्टाचार करणे सोडत नाहीत. वाईट विचार, चोरी, नालायकपणा सोडत नाहीत. श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजी ची आई, साने गुरुजीना म्हणतात की, "शाम चांगल्या गोष्टी किंवा कष्ट करीत असताना लाजू नको. चोरी किंवा वाईट कृत्ये करत असताना माणसाला लाज वाटायला पाहिजे".
मुळात माणूस गुलाम असतो. आणि त्याचे शारीरिक आणि मानसिक अशी दोन प्रकार आढळतात. शारीरिक गुलामगिरी मध्ये दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार काम करणे आणि त्या कामाचा मोबदला अत्यंत तुटपुंजी मिळणे असे बरेच प्रकार आढळतात. यामध्ये भारतात 50 टक्के लोक आढळतात. ही गुलामगिरी कळून येते पण याविरुद्ध बंड करू शकत नाही.
दुसरी आहे मानसिक गुलामगिरी यामध्ये त्या माणसाला माहीत होत नाही तो गुलाम आहे एखाद्या विचारांचा, व्यसन, श्रद्धेचा, अंधश्रद्धेचा, एखाद्या पक्षाचा, रूढी, परंपरेचा, धर्माचा किंवा एखाद्या जातीचा, लोक काय म्हणतील ? याचा देखील मानसिक गुलामगिरी यामध्ये उल्लेख केला तरी काय हरकत नसावी. माझे तर सांगणे आहे की शक्य होईल तेवढ्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हा आणि स्वतंत्र माणूस म्हणून तुमचा अस्तित्व दाखवून द्या.
धन्य
================================

जयश्री खोडे, मुंबई


लोक काय म्हणतील ? म्हणू देत  या विषयावर जेवढे लिहावे, तेवढे कमीच ! कारण हा विषयच  एवढा विस्तृत आहे.

लोक काय म्हणतील?  हा समाजाचा विकासाचा सर्वात मोठा  अडथळा आहे. याची सुरुवात  आपल्या घरातूनच  होते. आपल्या  घरातीलच  लोक  आपल्याला बोलतात की असे  कपडे घालायचे नाही, केस मोकळे  सोडून नकोस, बाहेर  जास्त जाऊ नको, मुलाशी  बोलू नको, मुलीने सर्वांसमोर  जास्त बोलू नये, लोक काय म्हणतील ?  अश्या बऱ्याच गोष्टी ग्रामीण भागामध्ये आढळून  येते.  एवढंच काय तर तिने जास्त हसू  सुद्धा  नये.  घरातूनच आपल्या विकासाला  काही मर्यादा निर्माण  होतात.  मग आपण  स्वतः  ही  विचार करत असतो की  लोक काय म्हणतील?

लोक  काय म्हणतील  याचा  सर्वात  जास्त  त्रास  मुलींना  सहन  करावा लागतो.  जसे मुलींना  येणारी  मासिक पाळी ही  नैसर्गिक आहे  पण  याचा  चुकीचा  अर्थ  समाजाने  घेतला  आहे. देवाची  पूजा  करू नये,  कोणाला  हात  लावू  नये आणि  तिने देवाला  हात लावला किंवा  मंदिरात  गेली  तर अपशकुन  झाला  आहे  असे समजल्या  जाते.  या गोष्टीचा  खूप मोठा  बाऊ  केला जातो.  २१व्या शतकात ही  या गोष्टींचे  प्रमाण  कमी झाले नाही ह्यामुळे मुलींना दर महीन्याला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते...
         खरं  तर  एक स्त्री च दुसऱ्या स्त्रीची शत्रू  आहे. जसे आई व सासू ह्यांना कायम लोक काय म्हणतील हा प्रश्न पडला असतो यामधून  घरात मोठ्या  प्रमाणात  वादावादी  होत जाते. 

              देश स्वतंत्र  होऊन कित्येक  वर्ष  झाली पण अजूनही  पारतंत्र्यात  असल्यासारखं  वाटत. अंधश्रद्धा, चालत  आलेल्या बुरसट कालबाह्य रुढी परंपरा यामध्ये  आपण  अश्याप्रकारे अडकलो  आहोत की बाहेर निघायचं  म्हटलं की बंड  पुकारल्यासारखं वाटत !

 लहानपणापासून  मनामध्ये  तयार  झालेला  हा सर्वात मोठा  न्यूनगंड ! यामधून  बाहेर पडणे  म्हणजे  खूपच कठीण ! शाळेत ,  कॉलेज  मध्ये जायला सुरुवात केली की पुन्हा तिथे स्पर्धा  सुरु होते. मग एखाद्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आधी  आपण  विचार करतो, आपण चुकलो तर कोणी हसणार तर नाही ना, यामुळे आपण मागेच राहतो, आपल्या मधला आत्मविश्वास ढासळत जातो आणि मग वाढत च नाही.

 पण या सर्वांना मधून  जो बाहेर पडतो,  तो कधी मागे वळून बघतच  नाही. लोक  काय म्हणतील  या कडे  लक्ष  देण्यापेक्षा  आपल्या मध्ये काय कौशल्य  आहे  हे जाणून  घेऊन त्याकडे  लक्ष  दिले  तर आपला शारीरिक ,  मानसिक ,  बौद्धिक  विकास  चांगल्याप्रकारे  होईल. आपण  चांगली  काम  केली तरी त्यामध्ये लोक चुका  शोधत  असतात  म्हणून  स्वतःला जे वाटते ते जर प्रत्येक  व्यक्तीने केले  तर नक्कीच आपल्या समाजाचा  भरपुर विकास  होईल....
==============================

सचिन फड, नाशिक


नोकरी करून कितीशी प्रगती होते व स्वातंत्र्य, श्रीमंती मिळते, सद्या मुलाना काहीही शिकवा, ते कितीही हुशार असुद्या नोकरीची वन-वन करावीच लागतेय, भविष्यात तर परिस्थिती अजून भयंकर होणार, त्या पेक्षा छोटासा का असेना स्वतःचा व्यवसाय कधी ही बराच, लोक काय म्हणतील? म्हणु देत....
मुलांचे ही भवितव्य सुरक्षित राहील व माझेही स्वातंत्र्य मी पहिले पाऊल उचलतोय, लोक काय म्हणतील? म्हणु देत....
कदाचित माझ्या पूर्वजांनी ते उचलले असते तर आज स्थिती वेगळी राहिली असती, मी किमान सुरू करून चालत तरी ठेवेल नंतर मुलं करतीलच की त्यांना हवे तसे बदल व प्रगती त्यांच्या पध्दतीने लोक काय म्हणतील? म्हणु देत....
म्हणूनच बस्स ठरवलं आणि महिना 18 हजार पगाराची ऑफिसर पदाची नोकरी दिली सोडून, लोक काहीबाही बोलू लागले, लोक काय म्हणतील? म्हणु देत....
दुकानात हेल्पर हमाली चे काम केले, लोक नावे ठेऊ लागले, लोक काय म्हणतील? म्हणु देत....
डिलिव्हरी बॉय चे काम केले, लोक हसू लागले, लोक काय म्हणतील? म्हणु देत.... दुकान घरोघरी फिरून वस्तू विकल्या, लोक चेष्टा करू लागले, लोक काय म्हणतील? म्हणु देत....
दिड वर्ष झाले अजून ही काय व्यवसाय करू कळेना, चाचपडतोय, पण ठीक आहे ना योग्य वेळ आल्या वर काही तरी मार्ग सापडेलच की, लोक काय म्हणतील? म्हणु देत.... की मला माहित आहे मी का असं करतोय तर मी त्यांची फिकीर का करावी
==============================

निखिल खोडे, ठाणे


   सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग!!
 या म्हणी प्रमाणे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत व कार्यात अडथळा येतो तो म्हणजे लोक काय म्हणतील? आपण करत असलेले काम चांगले की वाईट यापेक्षा त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतील हे आपल्याला जास्त महत्वाच्या वाटत असतात. कोणतीही एखादी गोष्ट करायची इच्छा असली की लगेच मनात येते की यावर लोक काय म्हणतील....
              
      स्वतःच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, घरच्या आर्थिक परिस्थिती मुळे  लहानपणी डोक्यावर परडी घेऊन नरडे (fried finger) विकणे असो किंवा हातपंप वरुन पाणी भरायचे असो ... लोक काय म्हणतील याचा तितका माझ्यावर परिणाम झाला नाही परंतु जसजसे वय वाढत गेले तसे कळायला लागले की आपण काहीही केले  तरी त्यावर लोक काहीतरी बोलतीलच हे नक्की ! आणि याची जाणीव स्वतःच्या घरातुनच होते उदा. एखादया दिवशी कामाच्या थकव्यामुळे  सकाळी जास्त वेळ झोपलो तर लगेच आई म्हणायची की लवकर उठायच नाहीतर लोक काय म्हणतील. बाकीचे मुल बघ.

            प्रत्येक वेळेस मी गृहीत धरायला लागलो होतो की लोक काहीतरी वाईट म्हणतीलच,  आपण काहीही चांगले काम केले तरी.... अलीकडे सवय कमी झाली आहे.  काम करत असताना या भिती मुळे मनामध्ये खुप न्यूनगंड निर्माण व्हायचा..

        घरची परिस्थिती बिकट असलीे आणि अंगावर जबाबदारी असली तर त्यावेळेस मात्र लोकं काय म्हणतील याचा विचार न करता आपण आपले काम करतो..
तेव्हा वाटते की लोक काय म्हणतील? म्हणु देत! आपल्याला काही फरक नाही पडत..!

 "कुछ तो लोग कहेंगे, लोगोका काम है कहना"
==============================


शिरीष उमरे, नवी मुंबई


सगळ्यात जास्त मते मिळालेला व त्यावर आतार्यंत सगळ्यात जास्त लेख आलेला विषय ... मी काय वेगळे लीहावे ह्या विचारात आत्ता जे काही सुचले ते शब्दात रंगवण्याचा प्रयत्न करतो...

लहाणपणापासुन च मी बंडखोर वृतीचा... कुतुहलापायी जे काही उपद्याप करायचो त्यामुळे सगळे धाकात राहायचे की हा आता काय नविन प्रकरण करतो... मला धाकात ठेवण्याचा असफल प्रयत्न वडीलांनी व गुरुजींनी केले. त्यातुन कोडगेपणा हा दुर्गुण  जो चिपकला तो आजगायत कायम आहे... ह्या च स्वभावामुळे  लोक मला काय म्हणतील हा विचार च मनाला शिवला नाही उलटपक्षी हा कार्टुन काय म्हणेल हा धाक लोकांना निर्माण करण्यात बराच यशस्वी झालो.

हे काय ? कसे ? केंव्हा ? कुठे ? का बरे ? अश्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्नाच्या सरबत्तीमुळे कंटाळुन मला लवकर शाळेत पाठवल्या गेले. पण पालकांचा डाव शिक्षकांच्या लगेच लक्षात आला. कशीबशी माझ्या प्रश्नातुन सुटका करुन घेण्यासाठी शिक्षक च जास्त अभ्यास करायला लागले.
बुरसट कालबाह्य शिक्षणपध्दतीचे बुरखे मी तेंव्हाच टराटरा फाडले. सुदैवाने आखरे वैद्य रानडे सारखे गुरु लाभल्याने आणि वाचन व प्रवासाच्या आवडीने मी थोडा स्थीर झालो.

भिंगाने सुर्याच्या कीरणाचा वापर करुन कागद पेटवण्याच्या नादात फक्त न्युजपेपर च नाही तर बाबांचे ऑफीस कागद व एक नोट जाळण्याला ते विध्वंसक वृत्ती म्हनायचे तर माझ्या मते ती प्रयोगशीलता होती. नंतर ही मैदानी खेळांमध्ये खोटारडेपणा केला म्हणुन दुसर्या टीमसोबत शाब्दीक वादावादी ते बचावासाठी मी केलेला शारिरीक प्रतिकार ह्यामुळे मी हींसक ठरलो पण माझ्या दृष्टीने तो सत्याचा आग्रह होता.
नंतरही कॉलेज मध्ये भ्रष्टाचाराविरोधात मी मारलेल्या बोंबांमुळे काही लोकांना धाक पडला होता की त्यांना लोक काय म्हणतील ...
हा सरळमार्गी प्राणी नाही आहे ह्याची खात्री झाल्याने लोकांनी मला काही म्हणायचे सोडले.

ह्या वरील निरर्थक बडबडी मागे काही आयुष्याचे अमुल्य विचार लपले आहेत...

# ह्या जगात चांगले शिकण्यासारखे इतके काही आहे की लोक काय म्हणतील याचा विचार करायला सुध्दा वेळ नाही आपल्याजवळ...
# तुम्हाला स्वत: बद्दल इतकी खात्री हवी की तुम्ही जे करणार ते चांगल्यासाठी च करणार. ह्यात यशस्वी झालो तर छान च कीवा काहीतरी नविन शिकलो याचा आनंद घ्या. लोकांच्या कोल्हेकुईकडे लक्ष च जाणार नाही.
# वाचन वाढवा खास करुन आत्मचरित्र वाचा जेणे करुन लक्षात येइल की जेवढे यशस्वी लोक आहेत त्यांनी टीकेला स्वत:च्या विकासाची संधी व आव्हान म्हणुन स्विकारले होते...

लोक काय म्हणतील त्याला एका कानाने ऐकुन दुसर्या कानाने सोडुन द्या ...
==============================

  

हरिदास यादव,मु.पो. मारापूर, ता.मंगळवेढा जि.सोलापूर

 मी आत्ताच गृपमद्धे सहभागी झाल्याने माझा पूर्ण परिचय दिला आहे.
   असो, लोक काय म्हणतील म्हणु देत,हा खुपच छान विषय इथे निवडलेला आहे.
 लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देवून आपल्या ध्येयापासून विचलित होणारी व्यक्ती यशास्वी होत नाही, याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास नेहमी पहायला मिळतात.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देवून आपले कार्य थांबवले असते तर आज शिक्षणाचा प्रसार एवढया प्रमाणात झालाच नसता.

अशी अनेक उदाहरणे देता येतील, पण म्हणतात ना "हाती चले बजार, कुत्ते भुंके हजार", त्याप्रमाणे आपण नेहमी आपल्याला मनापासून आवडनारे चांगले कार्य सतत चालू ठेवले पाहिजे, मग लोक काय म्हणतील? म्हणु देत.
==============================

 किरण पवार, औरंगाबाद


       
 लोक काय म्हणतील? या एका प्रश्नामुळे कितीतरी आयुष्ये उद्ध्वस्त झालेली आपण प्रत्यक्षात पाहतो. मात्र त्याच गांभीर्य कुणाच्याच लक्षात न आल्याचा आव बनवत आपण समाजात वावरतो. मुलं ज्या वयात वेल मॅच्युअर नसतात तिथून आपल्या समाजाचा त्यांच्यावर बोलण्याचा पराक्रम सुरू होतो. हा असाच आहे, तू तसंच का केलं, हे विषय घे, हे तुला जमणार नाही. एक दिवस कंटाळतो अगदी आपण या सगळ्या प्रश्नांना. अरे बाबा तुझं आयुष्ययं तुझ्या जीवणात डोकं घाल ना. आमचं आम्ही बघू काय करायचयं ते. तुम्हाला प्रचीती आजवर आली असेल नसेल मला माहित नाही पण मला आलेला एक अनुभव सांगतो.
                 एका मित्राला बैंगलोरमधे एका ठिकाणी एक मैत्रीण भेटली. ती आली होती तिथे मैत्रीणीसोबत पण परत जाताना ती एकटी असणारं होती. आणि हा मित्रही त्याच दिवशी निघणार होता. तो मित्र लातूरचा. पण मुलीला मुंबईला जायचं होतं. तेव्हा तो तिला सहज सोबत घेऊन लातूरला त्याच्या घरी घेऊन गेला. आणि पुढे जो राडा झाला तो सांगण अवघडचं. त्याला सर्वजण घरातले बोलू लागले, कोणती मुलगी? तुझ्यासोबतच कशी, काय व का आली? तू हे चुकीच केलसं वगैरे.... वगैरे. घरचे हे सर्व बोलतं होते; कारण त्यांना भिती होती, शेजारीपाजारी त्यांचे नातलग व इतर काय म्हणतील? मुलगा त्याच्या जागी योग्य होता. ठाम राहीला. नंतर मुलीला मुंबई रवाना करून तो रिकामा झाला. पण यात बारकाईने विचार केला तर प्रश्न असाही उद्भवतो की, लोकांच्या अशा तऱ्हेवाईकपणामुळे आज मुली खरचं आपल्याला सुरक्षीत ठेवता येत आहेत का?
                लोक काय म्हणतील? दोन वर्षे वाया गेली. पुढचं कायं? धडाधड प्रश्नमंजुषा सुरू झाली. पण मुद्याच कुणी बोललच नाही की, तुझं काय? तुला का असा निर्णय घ्यावासा वाटला. किंवा तू पुढचं शिक्षण कितपत योग्यरित्या पूर्ण करू शकशील? नामोहराम झालयं हे असं सगळं विधायक स्वरूपातलं बोलणं. का? कारण आम्ही राहतो तो समाज भले आम्हला जगण्यासाठी एक रूपया देत नसेल तरी आम्ही त्याला काय वाटतं याची पर्वा करायची? अरे का? जगा ना बिनधास्त. अडवलयं कुणी? लोक आज एक बोलतात, ऊद्या दुसरं. त्यांना फक्त विषय हवा असतो. त्यांची लगावट तुमच्याशी नसतेच मुळी कधी. त्यामुळे लक्षात राहू द्या. लोक काही म्हणतील, म्हणू देत.......
==============================

अर्जुन (नाना) रामहरी गोडगे, सिरसाव ता.परंडा जि. उस्मानाबाद


जगणं सोडलंय माझ्यासारख्या अनेकांनी
का तर लोकांना काय मनतील....

मन मानेल ते न करता
खूळचट विचार घेऊन जगतो
आवडीचे काम न करता
समाजामन मी जपतो

काळोखात जीवन जगताना
स्वतःचे अस्तित्व विसरतो
भीती मज विद्रोही मनांना
गंड समाजात मी वावरतो

अब्रू ला घाबरतो मी
लोक समजतात गब्रू घाबरला
समाजचा विचार करतो मी
विळख्यात अडकवतो स्वतःला

मी अजूनही जिवंत आहे
तरी समाजमन बुरसटलेले आहे
जिवंतपणा अजूनही शिल्लक आहे
मन मात्र कोमेजलेले आहे

विद्रोह करावा वाटतो समाजाच्या विरोधात
पण मनही मानत नाही
शेवटी समाजाच्या कलाने चालता चालता
जळून खाक झालो बदनाशिबी मी

जीवन किती सरल किती उरलं
हा व्यर्थ हिशोब कशाला
जीवन तुज आहे तुझ्यासाठी
चिंता विवंचना कशाला

व्यर्थ ताण नको मनाला
समजामुळे तू विसरतो हास्यला
हे कशालाही हसतील
फक्त काबूत ठेवा रागाला

जीवन जगताना एक लक्षात ठेव
हत्ती चालते है कुत्ते भूकते है
व्यर्थ ताण नको मनाला
समाज आहे सर्वांची देखभाल करायला..


आयुष्यात पहिल्यादा कविता केलीय अडमीन साहेब चुकलं असेल क्षमा असावी....
==============================

शिरीष मेढी

लोक काय म्हणतील, म्हणू देत ; पण पाँल बँरन नावाचे विचारवंत काय म्हणतात ते बघा.                                       पाँल बँरन लिखीत प्रदिर्घ अवलोकन या पुस्तकातून  ###########                             वास्तव व सारासारविवेक यांमधिल संघर्ष कुठल्याही प्रकारे काल्पनिक वा बौध्दिक संकल्पना नाही. माणसाचे माणसाद्वारे शोषण केल्या जाणाऱ्या कुठल्याही वर्गभेदावर आधारित समाजातील शोषक वर्गाचे हीत अस्तित्वातील सामाजिक संबंधांचे अस्तित्व टीकवून ठेवण्यात असते आणि म्हणूनच शोषकांच्या वर्गाद्वारे फक्त असे बदल मान्य केले जातात की ज्यांच्यामुळे शोषण करण्याच्या अधिकारावर बाधा येत नाही. समाजाच्या विकासक्रमात असा काळ अटळपणे येतो की जेव्हा समाजातील व्यक्तींच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अस्तित्वांतील व पुढील संभाव्य शक्यतांचा बळी समाजातील प्रभूत्व असणाऱ्या वर्गाच्या हीताचे संरक्षण करण्यासाठी व अस्तित्वांतील समाज व्यवस्था टीकवुन ठेवण्यासाठी दिला जातो व हा काळ असा असतो की जेव्हा शोषक समाजाच्या हीतासाठी संपूर्ण समाजाच्या हीताचा बळी बळी दिला जातो. वास्तव आणि सारासारविवेक (तर्कनिष्ठता) यांमधील संघर्षाच्या ऐतिहासिक प्रसंगी अस्तित्वातील समाजव्यवस्थेची तर्कहीनता सारासारविवेकद्वारा उघडी पाडली जाते व मार्क्सच्या म्हणण्यानुसार या संघर्षाचे रूपांतर जे काही अस्तित्वात आहे, त्या सर्वांवर निर्दयपणे टीका करण्यामध्ये होते व निर्दयपणाचा अर्थ असा होतो की स्वतःवरिल टीकेच्या निष्कर्षांपासुन वा सत्ताधाऱ्यांवरिल टीका करण्यापासुन अलिप्त होणे अशक्य केले जाणे व *त्याचप्रमाणे हा संघर्ष संपूर्ण समाजाच्या व्यवहारिक गरजांची बौद्धिक अभिव्यक्ती आहे आणि विशेषतः बहुसंख्य असणाऱ्या शोषितांच्या शोषणाविरूध्द हा संघर्ष एक अटळ आवश्यकता असते.
==============================

377 चा निर्णय आणि समाजात उमटत असलेल्या प्रतिक्रिया

377 चा निर्णय आणि समाजात उमटत असलेल्या प्रतिक्रिया

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

377 चा निर्णय आणि समाजात उमटत असलेल्या प्रतिक्रिया


अनिल गोडबोले
सोलापूर

सुप्रीम कोर्टाचा 377 कलम वरील समलैंगिक संबंध हे गुन्हेगारी आरोपातून वगळावे हा ऐतिहासिक निर्णय वाचला आणि त्यावर सगळी कडे विविध प्रकारची चर्चा होऊ लागली.(या आधी होत नव्हती असं नाही.. पण आता वेगळ्या पद्धतीने होऊ लागली).
एक जण म्हणतो..."पण कितीही झालं तरी ते अनैसर्गिक च आहे ना..!"
"यांना बरं करण्यासाठी काही उपाय नाही का?"
"हे काय खूळ अजून.. आधीच मॉडर्न च्या नावाखाली काय पण चाललंय आता कायद्यांने मान्यता पण.."
"आता भारतीय संस्कृती होती नव्हती तेवढी सम्पून जाईल.!"
चर्चेचा सूर असा तर..
व्हाट्सअप वर .. विविध जोक.. त्याची भाषा.. असो
तर मूळ मुद्धा असा आहे की .. हे का झालं?..
तर विज्ञानाने हे सिद्ध केलेले आहे की.. समलैंगिक ता ही विकृती नाही. प्राण्यामध्ये पण समलैंगिक संबंध होत असतात.. आणि या मध्ये गुन्हेगारी तर अजिबात नाही.
अनैसर्गिक संभोगाचा कायदा.. असं ज्याला मानलं जायचं त्यावर कोर्टाने असे संबंध अजिबात गुन्हेगारी नाहीत हे मान्य केलेले आहे(भारतीय मानसिक शास्त्र संस्था)
पण आपण ज्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने हर जग बघून उपयोग नाही..
या साठी माणूस सेक्स का करतो? हे समजून घेतलं पाहिजे.
माणूस हा प्राणी फक्त प्रजनन साठी सेक्स करत नाही. सेक्स आनंद मिळवण्यासाठी करतात, सेक्स सहजीवन जगण्यासाठी करतात, जीवनातील या अमाप चिंता आहे त्या घालवण्यासाठी देखील सेक्स करतात.
कोणी कोणाशी सेक्स करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे(मी अजिबात असुरक्षित संबंध मान्य करत नाही.. ज्यातून लैंगिक आजार होण्याची शक्यता आहे त्यांनी योग्य खबरदारी घ्यावी)
एखादा व्यक्ती शरीरातील बदलामुळे, हार्मोनल बदलामुळे, किंवा आवड म्हणून तसेच वर्तन बदलांमुळे समलैंगिक होऊ शकतो.. (बदल आणि विकृती या मध्ये फरक आहे).
तर त्या मध्ये नैतिकता आड येतच नाही मुळात.. ज्याला त्याला आनंदी होण्याचा अधिकार आहे.
या वर बाहेरील देशात आधीच खूप जनजागृती झालेली आहे.. भारतात आता होत आहे..
आता पर्यंत हे संबंध चोरी छुपे होत होते. सुरक्षितता नव्हती, भीती होती, अपमान होता.. आणि योग्य मार्गदर्शन करणारे कमी लोक होती..
आता ही दरी मिटून जावी ही अपेक्षा..
LGBTQ नावाची समूदाय असणारी माणस या निर्णयाने हॅपी आहेत.. आणि कोणाचा काही तोटा नाही त्यामुळे फार संस्कृती जोपासण्यात अर्थ नाही(आधी एड्स ने बरच चित्र स्पष्ट केलं।आहे)
तर शेवटचा मुद्धा.. याना बर करायच म्हणजे काय करायच?.. आजार आहे का तो?..तुम्हाला पटत नसेल तर समजून घ्या .. मी पुरुष सारखा राहतो ही जशी प्रकृती आहे तशी ट्रान्स जेंडर (हिजडा) ही पुरुषाच्या शरीरातील बाई आहे.. हे जेवढं लवकरात लवकर मान्य करू तेवढं सुदृढ समाजासाठी चांगलं आहे..
लेस्बियन आणि गे लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत.
बाय सेक्सउल आणि ट्रान्स जेंडर च्या समस्या दूर व्हाव्यात ही देखील इच्छा आहे..
तर आपण खरच मॉडर्न किंवा प्रगत मानव होणार असू तर या बाबी समजून घेतल्या पाहिजेत.
अर्थात कोणताही बदल लगेच होत नाही.. पण सुरुवात नक्कीच चांगली आहे.



-करण बायस
जि. हिंगोली

भारतातील आयपीसी 377 नुसार समलैंगिकता हा गुन्हा होता. पण भारतीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानुसार समलैंगिकता हा गुन्हा नसून प्रत्येकाला त्याच्या मर्जी नुसार जगण्याचा अधिकार आहे.प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा विचार करून हा कायदा रद्द केला आहे.
 हा  एलजीबीटी व्यक्तीसाठी हा एक ऐतिहासिक आणि दिलासा देणारा निर्णय आहे.आपल्या समाजाची मानसिकतेनुसार हे आजपर्यंत अनैसर्गिक मानलं जायचं आजपर्यंत हे लोक कायद्याच्या नजरेत गुन्हेगार आणि समाजात दुय्यम मानले जायचे पण मानवतेच्या दृष्टिकोनातून हा योग्य निर्णय झाला,आता भारतातील समजला पण हा निर्णय मानवतेच्या दृष्टिकोनातून बघायला हवा.
समलैंगिक संबंधांना जवळपास बऱ्याच देशांमध्ये मान्यता आहे आणि भारतात हे आजपर्यंत एक कायदेशीर गुन्हा होता पण आता कायद्यानुसार हे सुद्धा मान्य केले.
आता गरज आहे समाजाने स्वतःची मानसिकता बदलायची, गरज आहे या निर्णयाला स्वीकारायची आणि या लोकांना समाजात सन्मान देण्याची आणि हे होत नसेल तर कमीत कमी त्यांना कमी लेखू नये.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************