बैलाचे‌ मनोगत


अमोल धावडे,अहमदनगर.

नमस्कार मित्रांनो आज मी बैलाचे मनोगत व्यक्त करत आहार. मित्रांनो श्रावण महिन्याच्या शेवटी श्रावणी पोळा हा सण साजरा केला जातो. हा सण म्हणजे तरी काय हिंदु संस्कृतीमध्ये शेतकरी आपल्या बैलाला देव मानतो बैलांप्रती कृतनता व्यक्त करणारा हा मराठी सण मनाला जातो. वर्षभर तो आपल्यासाठी राब राब राबत असतो असे शेतकऱ्यांना वाटते त्यामुळे बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना मस्त सजवले जाते त्यांना कोणत्याही प्रकारचे काम नसते. या दिवशी बैलांची मिरवणूक काढून घरची मालकीणबाई मस्त पुरण पोळीचा नयवैद्य बैलाला देते व त्याची पूजा करते.
बैलपोळ्याच्या दिवशी त्यांना आराम असतो मस्त त्यांना रानातून चारून आणून त्यांना नदीवर अंघोळ घालण्यासाठी नेले जाते. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. बैलाच्या पाठीवर मस्त नक्षी असलेली झुल,अंगावर ठिपके, शिंगांना बागड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
मी लहान होतो तेव्हाची गोष्ट आमचा बैल राजा त्याचे नाव बैल पोळीच्या दिवशी सकाळपासूनस त्याला सजवले व मिरवणूक रात्री 12 वाजेपर्यंत मग रात्री त्याला पुरणपोळी भरवली परंतु काही दिवसांनी तो खुप आजारी पडला व तो आम्हाला सोडुन गेला त्याच्या आठवणी अजूनही आज मी जपून ठेवल्या आहेत प्रत्येक पोळ्याला त्याला मिस करत असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************