इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुढीपाडवा : इतिहास ,मीमांसा आणि वास्तव.

🌱 वि४ 🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून


गुढीपाडवा : इतिहास ,मीमांसा आणि वास्तव.

सिमाली भाटकर,रत्नागिरी:
गुढीपाडवा हा एक  हिंदू सण असून तो दिनदर्शिके प्रमाणे  चैञ शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.शालीवाहन संवत्सर शकेचा १ला दिवंत व वेदांत ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहुर्त पैकी हा एक आहे.
तसेच चैञ शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक व आंध्रप्रदेशात चेटी-चांद,उगादी नावाने व वेगवेगळ्या पध्दतीने ही साजरा केला जातो.
जगातील विविध देशांमध्ये काठी पूजन नावाने ही हा सण साजरा केला जातो
उदाहरणार्थ 'इव्हाल्युशन आॕफ गाॕड ' या ग्रंथात ग्रेट अॕलेन यांच्या नोंदी प्रमाणे सायबेरीयातील 'सामो यीडस्' दक्षिण अफ्रिकेतील 'दामारा' या जमाती मध्ये काठी पूजन करण्याची परंपरा होती.
पारंपारिक समजुती प्रमाणे ज्या दिवशी रामाने  रावणावर विजय मिळवून अयोध्यामध्ये प्रवेश केला तो दिवस म्हणजे चैञ शुद्ध प्रतिपदा म्हणून गुढी उभारणी करुन हा दिवस साजरा केला जातो. मग आजच्या घडीला अयोध्येत हा सण का साजरा करत नाही? जेव्हा की ञिपूरा,मणिपूर,राजस्थान इत्यादी राज्यात काठी पूजन केले जाते.
भारतीय व महाराष्ट्रातील उत्सव,सण,परंपरा इत्यादींचा आपल्याला अभिमान असावा पण परंपरेच्या नावाखाली आपण अंधश्रध्देच्या अधीन तर होत नाही ना याचाही कुठेतरी विचार करावाच लागेल.
ज्या बांबूच्या काठीचा वापर आपण गुढी उभारणीसाठी करतो  त्या बांबूच्या शेतीचे आर्थिक फायदे शेतकऱ्यांना आपण समजून द्यायला पाहिजे. तर त्यांचा आर्थिक विकास होऊ शकेल.
प्रत्येक वेळी सणांना परंपराना आधार देऊन अंधश्रध्दा वाढविण्यापेक्षा सणांना-परंपराना श्रध्देचा आधार देऊन आपण ज्ञानाचा प्रसार व समाजाचा विकास करु शकलो तर खरे अर्थाने आपण गुढीपाडवा साजरा होईल असे मला वाटते.
Source: INTERNET
सौदागर काळे,पंढरपूर:
गुढीपाडवा या सणाच्या बाबतीत खूप कथा,आख्यायिका, नोंदी आहेत.त्यात रामाचे अयोध्येत आगमन असेल, ब्रम्हदेव यांनी सृष्टी निर्मिती केलेला दिवस असेल, वेदामध्ये  सांगितलेल्या प्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस  असेल.या गोष्टींकडे पाहण्यापेक्षा इतिहासाच्या नजरेतून याकडे पाहायला हवं.

इतिहास :-
सातवाहन घराण्याची सत्ता महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश ,कर्नाटक, मध्यप्रदेश यांतील काही भागामध्ये होती. सातवाहन राजा शालिवाहन याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली.जशी शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळात शिवशक ही कालगणना चालू केलेली दिसते.म्हणून
शालिवाहन संवत्सरा(शके)चा हा पहिला दिवस म्हणून महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. असं इतिहासातील नोंदीवरून आपल्याला समजेल.त्यामुळे यांची ज्या भागात सत्ता होती,तिथे वेगवेगळ्या भागात वेगळ्या नावाने हा दिवस साजरा केलेला आजही दिसतो.उत्तर भारतात सत्ता नसल्याने गुढीपाडवा साजरा न होण्याचे व रामायणातील घटनेशी याचा संबंध नसल्याने अयोध्येत गुढीपाडवा साजरा न होण्याची पुष्टी मिळते.(अधिक इतिहास जाणून घेण्यासाठी संजय सोनवणी यांचा हा https://sanjaysonawani.blogspot.com/2012/03/blog-post_1734.html ब्लॉग वाचा.)

वास्तवता:
लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक -संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणा-या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे .(source: wikipedia)

यावरून एक समजते की इतिहास काहीही असला तरी निसर्ग निर्मितीचा बदल या सणाशी खूपच तंतोतंत जुळलेला दिसतो.चैत्र सुरू झाला की नवीन मराठी महिना सुरू झाला ,असं आपण म्हणतो. वसंत ऋतूमधील सृजनशीलता आपण अनुभवत असतोच.पण जास्त समजून घेण्यासाठी दुर्गा भागवत यांचे"ऋतुचक्र" वाचायलाच हवं.

मराठी साहित्यात गुढी पाडव्याचा उल्लेख खूप वर्षांपासून आलेला दिसतो.त्यात पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,संत तुकाराम, संत चोखोबा,संत बहिणाबाई या संतांच्या साहित्यात आपल्याला गुढीपाडवा या शब्दाचा उल्लेख आढळतो. संत बहिणाबाई आपल्या "गुढी उभारणी" या कवितेत म्हणतात,

"पडी जातो तो 'पाडवा'                                                  करा माझी सुधारनी                                                    आतां गुढीपाडव्याले                                           म्हना 'गुढी उभारनी'

(पूर्णकविता अर्थासहित http://sudhirdeore29.blogspot.in/2014/05/blog-post.html?m=1)
समाजाला गुढीच्या मनोगतातून संत बहिणाबाई तिचं स्वरूप बदलायला  सांगतात.ग्रामीण भागात आजही या दिवशी परंपरेने पंचांगाच्या आधारे पुढील वर्षाचे पाऊसाचे भविष्य बघितले जाते.आता ते किती खरं होतं हा वेगळा विषय आहे.जसा हवामानखात्याचा.

तिचं स्वरूप आपण आज बदललं आहे का!तेच तिच्याबद्दल मते आहेत जे काल होते.काळानुसार तिचा संबंध जगण्याशी लावायला हवा.
पण सध्या चित्र वेगळेच आहे.

जय महाराष्ट्र या वाहिनीवर " *गुढीपाडवा आणि छ. संभाजी महाराज यांचा हत्येचा संबंध आहे का?* " यावरील चर्चेत बोलताना संजय सोनवणी म्हणतात, ' *गुढीपाडवा आणि धर्माचा काही संबंध नाही"*  यांच्या या विधानावरून त्यांनी गुढीपाडवा हा ऐतिहासिक घटनेशी जोडला आहे.

' *संभाजी महाराजांना मारण्यात आले तेव्हा धर्मांतर हे कारण नव्हतं'* ,असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणतात. त्यामुळे हिंदु अस्मितेचा मुद्दा येण्याचा प्रश्नच नाही.
यावरील सविस्तर चर्चा या लिंकवर  https://youtu.be/kLeKUGdRIwk पाहावी.

खिलाडूवृत्तीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, जर आम्हांला तिथीनुसार येणारी शिवजयंती मान्य नाही.मग संभाजी महाराजांच्या तिथीनुसार येणाऱ्या बलिदानाचा व गुढीपाडवा या सणाचा आपण का संबंध जोडायचा?

दुसरा मुद्दा म्हणजे काही जणांकडून असा प्रचार केला जातो की,"संभाजी राजांच्या बलिदानाचा आनंद म्हणून ब्राम्हणांनी गुढी उभारण्यास सुरुवात केली,"हे सरळ सरळ न पटण्यासारखे आहे कारण शिवरायांच्या काळात सुद्धा गुढी उभे केल्याचे उदाहरणे आहेत.

त्यातील एक संदर्भ-
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा –

“शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात.”(अजून काही संदर्भ-http://www.inmarathi.com/truth-about-sambhaji-maharaj-gudhipadwa-connection/?amp_markup=1)

म्हणून वरील संदर्भ पाहिल्यास संभाजी महाराजांना 11 मार्च 1689 रोजी मारण्यात आलं हे ध्यानात घ्यावं.हे आपल्या विवेकबुद्धीने वास्तव स्वीकारायला हवं.
Source: INTERNET
अजून एक मुद्दा असा की,गुढीच्या काठीला परंपरेने चालत आलेले साडी/लुगडं आणि उलटा तांब्या असे स्वरूप ठेवायचे की त्या गुढीच्या काठीला भगवा ध्वज फडकावयला हवा.असा एक नवीन वाद सद्या चालू आहे.त्यामुळे भगवाध्वज का?याचं उत्तर सामान्य माणसाला दिलं तरच ते परंपरानुसार साजरा करत आलेले गुढीचे स्वरूप बदलतील.तसेच तो भगवा ध्वज हिंदूंचा,शिवरायांचा की वारकरी संप्रदायाचा असेल याचे सुद्धा स्पष्टीकरण द्यायला हवे.उगीच भगवा ध्वज लावा म्हणून पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण करणे हे चुकीचे आहे.त्याची तळागाळात खरी कारणमीमांसा स्पष्ट करायला हवी.

तिथीनुसार पाहण्यास गेले की संभाजी राजांच्या मृत्यूदिवशी म्हणजे ११-३-१६८९ रोजी अमावास्या नसावी,असे दृक्-पंचागाच्या नोंदीवरून दिसते.पंचांग आणि मृत्युदिन बरोबर असतील तर त्या दिवशी पंचमी होती. ज्याचा पंचाग,तिथीवर विश्वास आहे त्यांना पडताळणीसाठी ही लिंक  https://www.drikpanchang.com/panchang/day-panchang.html?date=11/03/1689 (source: वरील लिंक Wikipedia)
या पंचांगाच्या नोंदीतील तथ्य बाजूला सारून किंवा संभाजी महाराज व गुढीपाडवा हा संबंध न जोडता हा सण निसर्गाशी संलग्न आहे.हेच वास्तव स्वीकारून साजरा केला तर प्रसन्नता वाटेल.नाहीतर हिंदू-मराठी संस्कृतीत खूप सण आहेत.फक्त याला सणाच्या दृष्टीकोनातून न बघता वेगळ्या चष्म्यातून बघावं.


Source: INTERNET
पी प्रशांतकुमार,
अहमदनगर:
आजकाल अस्मिता इतक्या टोकदार झाल्यात की व्यक्त व्हायची पण भीती वाटावी.. मी सांगतो ते आणि तेव्हडचं सत्य आहे अस प्रत्येकाला वाटतंय..

...छ. संभाजी म. यांचं निधन या दिवशी झाला का?.
समजा झाला असेल
...तर छत्रपतींचा मृत्यू साजरा करण्यासाठी हा सण सुरु झाला असावा का? नाही मला हा तर्क पटत नाही.. एव्हडा महाराष्ट्र असंवेदनशील आजही नाही आणि तेव्हाही नव्हता.. औरंगजेबाच्या भीतीमुळे गावोगावच्या मराठी माणूस अस काही करेल?? अरे हट शक्यच नाही.. बरं भीतीमुळे हा सण एका 50 किमीच्याच पट्ट्यात साजरा होतो असंही नाही ..

...गुढीपाडवा अर्थात बलीप्रतिपदा..शेतकऱ्यांच पीक यायचा काळ..
बऱ्याच ठिकाणी पुढील वर्षाच्या पाऊस-पीक-पिकांवरील अपेक्षित रोग याचा अभ्यास करण्यासाठी गुढी पाडवा ते अक्षय्यतृतीय हा काळ वापरतात..भेंडवळ म्हणतात खास करून बुलढाणा भागात..

जुने संदर्भ पहाता ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्यापासून बऱ्याच संत साहित्यात गुढीपाडव्याच्या उल्लेख आहे..
..दसरा-दिवाळी पाडवा-गुढी पाडवा आणि अर्धा आखत(अक्षयतृतीया) हे आपल्याकडचे साडेतीन मुहूर्त ..

अर्थात आता कालानुरूप सगळेच बदल झाले..
उंच गुढी जाऊन आता फ्लॅटच्या बाहेर छोटी दिसते..पण तोच उत्साह तरीही आजही खेड्यात ..वाड्या तांड्यावर अजूनही जुनी सर्वात उंच उभारलेली गुढी दिसते.. ..

टीप: संदर्भांसाठी इंटरनेट ची मदत घेतलेली आहे.

Source: INTERNET
R. सागर, सांगली:
गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपलं नववर्ष सुरू होतं. नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. भारतात, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक भागात गुढीपाडव्याचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसं पाहिलं तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो अशी आख्यायिका लहानपणापासूनच ऐकत आलोय. पण अलीकडच्या काळात त्याबाबत नवीनच काही गोष्टी ऐकायला मिळू लागल्या. काय तर म्हणे औरंजेबाने संभाजीराजांची हत्या केली अन् हत्येच्या दुसऱ्या दिवशी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळेपासून आपल्याकडे गुढीपाडवा सणाला सुरुवात झाली.
.
ज्यांचा संतसाहित्याचा अभ्यास आहे किंवा ज्यांना त्याबद्दल पुसटशीही कल्पना आहे त्यांना नक्कीच माहीत असेल की गुढीपाडव्याचा उल्लेख अगदी ज्ञानोबांपासून, तुकोबारायांच्यापर्यंत बहुतेक संत-साहित्यात आहे आणि हे सर्व साहित्य संभाजीराजांच्या मृत्यूच्या आधीचं आहे. त्यामुळं मी तरी हे नाही मान्य करत की संभाजीराजांच्या हत्येचा उत्सव म्हणून गुढीपाडवा सुरू करण्यात आला.
.
*शिवाजी महाराज-शंभूराजेंच्या काळातील तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल विचार करायचा झाला तर कदाचित असं असू शकतं की सततच्या परकीय आक्रमणांमुळे जिथे आपली मंदिरे किंवा आपली श्रद्धास्थानेच सुरक्षित नव्हती तिथे आपले सण-उत्सव म्हणावं तितक्या प्रमाणात साजरे होत नसतील. पुढे शंभुराजेंच्या हत्येनंतर काही वर्षांनी म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा मराठ्यांनी स्वराज्यविस्तार केला तेव्हा आपले सण-उत्सव पूर्वापार चालत आलेल्या रीती-रिवाजांनुसार साजरे करायला पुन्हा सुरुवात केली असेल आणि त्यातूनच गुढीपाडवादेखील पुन्हा मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला असेल..*
.
तसं बघायला गेलं तर गुढीपाडवा म्हणजेच उत्साहाचं, मांगल्याचं, समृद्धीचं प्रतीक. वसंत ऋतूचं आगमन आणि त्या आगमनाबरोबरच नव्यानं सजणारं सृष्टीचं मोहक रूप. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच निसर्गात होणारे बदल सुखावत असतात. शेतातली आधीची कामं संपवून पुन्हा पुढच्या कामाला नव्याने सुरुवात करणारा आपला बळीराजा. नक्कीच या सर्वांचा पिढ्यान-पिढ्यांचा संबंध आहे. त्यामुळे चला.. गुढीपाडवा साजरा करूया..


Source: INTERNET
संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ,पुणे :
महाराष्ट्राच्या आद्य स्वातंत्र्यलढ्यातील विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थ गौतमीपुत्र सातकर्णीने सुरु केलेल्या संवत्सराचा पहिला दिवस... गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्वतंत्र केला तो स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते?

  जगातील प्रत्येक धर्मातील प्रत्येक सणाला एक धार्मिक कथा, आख्यायिका जोडली जाते आणि सांगितलीही जाते . मग तो सण दिवाळी ,दसरा ,पाडवा , रमजान ईद , बकरी ईद , नवरोज , पास ओवर , पतेती , गुड फ्रायडे, इस्टर संडे इ असु. शकतो . यापैकी कोणत्याही सणाचे महत्व सांगणारी आख्यायिका वैज्ञानिक आधारवर टिकत नाही.
भारतात लादलेले असंख्य देव, सण, व्रत, नवस आणी अजूनही २२ व्या शतकात रस्तो रस्ती घरोघरी काल्पनिक देवांचा सुळसुलाट उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. हेच भारत देशाच दुर्दैव आहे. मानव चंद्रावर, मंगळवार पोहचला तरी यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बुद्धीत जात नाही. काल्पनिकता, विज्ञानाला सुद्धा फाट्यावर मारली जाते.

   काही लोक म्हणतात रामाने परशुरामाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत गुढया उभारुन आनंद साजरा केला व तेव्हापासून आपल्या कडे गुढी उभारायला सुरुवात झाली पण मग आज ज्या उत्तर प्रदेश राज्यात अयोध्यानगरी आहे त्या शहरात कुणीच गुढी उभारत नाही मग महाराष्ट्रातच गुढी कशी ?हा प्रश्न अनेकजन विचारत आहेत. काही म्हणतात कृष्णाचे जन्मानंतर गोकुळात गुढी उभारली पण अनेक संताचे वचनात गुढी शब्दांचा उल्लेख सापडतो. उदा.टाळी वाजवावी गुढी उभारावी असे संत चोखोबांचे वचन आहे तर संत तुकारामानी "रोमांच गुढीया डोलविती अंगे"असे म्हटले आहे.
आज ही लोकांना सांगितले जात आहे की, आपले नवीन वर्ष गुढी पाडव्यालाच सुरु होते. अहो,
असेही म्हटले आहे जाते की, याच दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले तेंव्हा म्हणे गुढी उभारली होती? रामायणातील, महाभारतातील काल्पनिक पात्रांचा साधा जन्म मृत्यू कधी झाला याची देखील नोंद नाही. आज ही गौतम बुद्धांचा अस्थि कलश २५०० अडीच हजार वर्षा नंतर सुद्धा अबाधित आहे. यांनी सांगाव ३३ कोटी देवांच अस्तित्व?

    गुढीपाडवा या सणाला विरोध करण्यासाठी संभाजी महाराजाच्या हत्येचा संदर्भ कांही जण देतात. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महारांजांची हत्या झाली. संभाजी महाराजांची हत्या 1689 सालातील पाडव्याच्या अादल्यादिवशी झाली, हे वास्तव आहे. पण त्या दिवसापासूनच पाडवा हा सण सुरू झाला,असे कसे म्हणता येईल ? त्यांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा सणाचा कांहींही सबंध नाही.
धर्मीक प्रथा परंपरेतील शोषणाला विरोध करणे हे योग्यच आहे, पण त्यासाठी वास्तवाचे विपर्यस्त चित्रण नसावे. नाहीतर व्हँलेटाईन डेला विरोध करण्यासाठी कांही वेडे भक्त 14 फेब्रुवारीला भगत सिंगला फाशी दिल्याची धादांत खोटी माहीती मध्यंतरी पसरवत होते. हा तसाच कांहीसा प्रयत्न म्हणावा लागेल.सन 1689 पुर्वीही गुढी उभारली जात असल्याचे अनेक संदर्भ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या लेखनात आढळतात. ईतिहास हजारों वर्षांचा आहे. प्रत्येक दिवशी ईतिहासात कांहीना कांही घडले आहे. अशा लाखो घटना आहेत लाखो प्रसंग आहेत,पण कोणत्याही कँलेंडर मधे दिवस साधारणपणे 355 ते 365 च आहेत.त्यामुळे विविध वर्षातील एकाच दिवशी,तिथीला,तारखेला एखादी आनंदी आणि एखादी दु:खद घटना असू शकते. पण दोन घटनांचा निरर्थक संबध लावणे चुकीचे आहे.

   आता महत्वाचा प्रश्न असा कि सातवाहन राज्यांच्या या सणाचा आणि ब्रह्माचा, विष्णूचा , रामाचा संबंध आला कुठून ? राजकारणात नेहमी एक पहायला मिळते. एखादा व्यक्ती लोकप्रिय असला की त्याला आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे स्वबळावर जनाधार मिळविण्यापेक्षा, जनाधार असलेल्या लोकप्रिय नेत्याला जवळ करणे. गेल्यावर्षी केंद्रात आणि राज्यात झालेल्या निवडणुकीत हे आपण सर्वांनी पाह्यले आहे. धर्मकारणही असेच आहे.महाराष्ट्राचा विचार करता महादेव, खंडोबा, भैरोबा, अंबाबाई, येडाई ई. दैवते ईथली लोकप्रिय दैवते. ब्रह्मा, विष्णु, राम ई. दैवतांना जनाधारच नव्हता. यामुळे घडले असे की, शालीवाहनाच्या विजयाचा हा सण समाजात गेल्या हजारो वर्षाच्या सातत्यामुळे प्रचंड लोकप्रिय झालेला होता. पुराणातल्या काल्पनिक देवतांना समाजात लोकप्रिय करू पाहणाऱ्या धर्मपंडितीनी, लोकप्रिय सणाची महती त्यांच्या काल्पनिक देवतांच्या कर्तृत्वाच्या आधारे सांगणे चालु केले. ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, राम रावणाला मारून अयोध्येत आले, अशा निरर्थक बाबी पसरवून या सातवाहनांच्या त्या विजयी दिनाच्या कर्तृत्वावर, लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला.

   गुढीपाडवा आपल्याला शालिवाहन शकाची आठवण करून देतं. परकीय शकांची सत्ता उलथवून लावत महाराष्ट्रात राहणा-या सातवाहनांनी स्वराज्य उभं केलं, त्यांना कसं विसरायचं? पुराणांमधला अर्थ शोधला तर ज्यांनी पुतळ्यांसारख्या बनलेल्या माणसांमधे प्राण फुंकले. शांत बसलेल्यांना देशासाठी लढायला शिकवलं. त्या सातवाहनांना कसं विसरायचं?



Source: INTERNET
समीर सरागे,नेर जि. यवतमाळ:
आपल्या हिंदू धर्मा मध्ये सन, उत्सव , व्रत समारंभ यांना अनन्य साधारण महत्व आहे सन ,उत्सव हे आपल्या धर्माचीच नव्हे तर आपल्या संस्कृतिची ओळख देखील आहे. सन साजरे करतांना त्यातून चैतन्य निर्मिती होत असते. आणि आपल्या हिंदू धर्मातील असाच एक प्रारंभिक सन म्हणजे गुडीपाडवा वर्षारंभ अर्थात वर्ष प्रतिपदा होय.

वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदा याचा उद्धता वेद आहे .वेद हे अतिप्राचीन वांड:मय आहे वेदाने सांगितले म्हणून ते साऱ्या जगाने मान्य केले. वर्षारंभचा प्रारंभ दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. ज्योतिष शास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपतावर येतो म्हणजे यावेळी हवामान समशीतोष्ण असते शिशिर त्रुतुत झाडांची पाने गळलेली असतात तर पाडव्याच्या सुमारास झाडाना नवी पालवी येते अक्खी वृक्षवल्ली टवटवित दिसते. पाडव्याच्या दिवशी कुटुंबातील वडिलधारी मंडळी आपल्याला कडूनींबाची पाने खायला लावतात यामागे शास्त्रीय कारण देखील आहे.या कडूनींबाच्या सेवनाने पाचन क्रिया सुधारते ,वरुन कडु असणारी ही वनस्पति आरोग्य वर्धक, आरोग्यदायी आणि रोगनाशक आहे. पाचन क्रिया सुधारने, पित्तनाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील किड नाहीशी करणे असे अनेक गुन या कडूनींबा मध्ये आहेत म्हणून वर्षारंभच्या वेळेस याचा वापर करतात.

याचे ऐतिहासिक महत्व म्हणजे प्रभु श्री. राम रावण वधा नंतर अयोध्येला परत आले त्या दिवशी प्रभु श्री. रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रम्हध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उच्च असते म्हणून गुढी उभी केली जाते.

गुढी पाडव्याच्या या दिवशी सुरु होणाऱ्या नववर्षाची सुरुवात  उगवीणाऱ्या  सूर्याच्या देजोमय दिवसाने होते. पाश्चात्य संस्कृति नुसार नववर्ष ३१ डिसेंबरला सुरु होते. आपले सन ,उत्सव हे निसर्ग नियमाला धरून असतात  ,निसर्ग नियमशी पूरक असतात तर विरुद्ध केलेल्या गोष्टी या मानवाला हानिकारक असतात म्हणून पश्चात्य संस्कृति नुसार १ जानेवारी हा नव्हे तर गुडीपाडवा नववर्षारंभ हाच साजरा करणे आपले खरे हित आहे.

*खोटा अपप्रचार :-* सन उत्सव ही हिंदू संस्कृतिची ओळख आहे  ओळखच नाही तर आमची ति बलस्थाने देखील आहेत. या गोष्टी नष्ट करायच्या असतील तर  त्या त्या सनांचा संबंध  महापुरुषांच्या हत्येशी किंवा मृत्यशी जोडूंन दयायचा असाच सन  वर्षारंभ:-चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडवा सन  हा सन जवळ आला की, काही बरगधी किड्यांचे अति वळवळने सुरु होते या सनाचा संदर्भ इतिहासातील महापुरुष   यांच्या हत्येशी जोडण्यात येतो जे धांदात अतिशय खोटे आहे. गुड़ी वर असलेला गड़वा उलटा ठेवणे म्हणजे हे संभाजी राजांचे शिर आहे असा  सरार्स खोटा अपप्रचार सुरु आहे.

वास्तविक गुडीपाडवा हा सन  रामायण काळापासून निरंतर सुरु आहे. मग याचा इथे हत्येशी संबंध तो क़ाय ? यात काही एक अर्थ नाही. गुड़ी हा ब्रम्हध्वज आहे. गुड़ीवर तांब्याचा गड़वा उलटाच का ठेवतात स्वताला न्यूटन ची औलाद समजनारे ,बुद्धिवादी म्हणवनारे यांना सांगू इच्छितो की, गड़वा उलटा ठेवला तरच तो त्यावर राहु शकेल एवढं साध त्यांना समजत नाही? मंदिरा वरील कळस देखील उलटाच असतो का तोही बघितला नाही ? अश्या प्रकारचे विकृत , बालिश प्रश्न ते मंडतात व हे देखील आजच्या हुशार तरुण पिढीला समजू नए ? प्रभु श्री.राम आणि कृष्ण जन्मलेच नाही , त्यांचे अस्तित्व दाखवा वैगरे असे चघळून चघळून चोथा झालेले प्रश्न ते विचारत सुटतात आणि भ्रम पसरवितात ,१० हजार वर्षे झालेल्या पौराणिक रामयनाला आणि रामयनातील ऐतिहासिक वास्तुला येथील अबुद्धिजीवी काल्पनिक ठरवतात ज्याना रामसेतु, आणि अयोध्येतिल वास्तु बद्दल ज्याना जान नसावी,(जाणून घेण्याची लायकी नसावी) श्रीलंके मध्ये आजही रावणाचा खंडर झलेला महल आहे  तसेच दगड़ावर हनुमानाच्या पायाचे खोल ठसे देखील आढळलेले आहेत, जे रामायण घडल्याची वा प्रभु श्री.रामाच्या अस्तित्वाची सदैव साक्ष देतात. तरी याकडे  हे महाभाग साफ दुर्लक्ष  करतात समाजात अफवा व गैरसमज परवितात कारण समाजात असे गैरसमज पसरविण्या करिता  त्यांना कुठून तरी पैसे मिळतात.(कोणी तरी पैसे पुरवितो) एका जातीला दुसऱ्या (उच्च)जाती -धर्मा विरुद्ध भड़कविने  हेच यांचे प्रभावी अस्त्र आहे जे यांचे पूर्वी पासूनचे  षड्यंत्र राहिले  आहे. आणि हे एका अजेंडाखाली नियोजनबद्ध रित्या केल्या जात आहे.कारण हिंदू धर्माला ,नष्ट किंवा खिळ खीळी करायचे असेल तर येथील युवकाना त्यांच्याच जाती, धर्म, संस्कृति , सन, उत्सव, परंपरा यांचे  विरुद्ध  भड़कवायचे खोटा प्रचार करायचा आणि इतिहासाची मोड़ तोड़ करुण आपल्या सोई सुविधे नुसार इतिहासाची मांडणी करायची , खोटी पुस्तके प्रकाशित करुण  खोटी व्याख्याने सजवून त्या द्वारे येथील युवकांच्या मेंदू मध्ये बौद्धिक आतंक निर्माण कारायचा. माथी भडकवायची अश्या प्रकारचे षड्यंत्ररूपी कारस्थान अलीकडे  सर्रास पाहायला मिळत आहे. आणि हेच तरुण पीढ़ी उद्या आपल्याच धर्मला ,संस्कृति , सन ,उत्सव व परम्परेला शिव्याची लखोळी वाहतिल आणि हेच यांना अपेक्षित आहे. म्हणजे यांना ३१ डिसेंबर रोजी रात्री दारू पिऊन धांगड़ धींगा घालनारे पुरोगामी , सुधारनवादी  आधुनिक वाटतात परंतु हेच महामूर्ख(स्वताला बुद्धिजीवी म्हणवनारे परंतु बुद्धि मुळीच नसलेले) निसर्गरूपी  ,निसर्गाला पूरक असलेल्या सन ,उत्सव ,वैदिक जीवन पद्धति मध्ये अंधश्रद्धा शोधतात. आणि सर्वात मोठे  दुर्देव म्हणजे याला बळी पडतात ते आजचे युवक ज्याणी कधीच आपल्या उत्सव व  संस्कृति आणि परम्परे बद्दल असलेल्या इतिहासा विषयी जाणून घेतले नाही. किंवा जाणून घ्यायची इच्छा नाही याची अतिशय  खंत वाटते. आणि अशे नतब्रष्ट लोक ज्यांच्या या धर्म व संस्कृतिशी काहीच देणे घेणे नाही ते यावर भाष्य करतात  खोटे अज्ञान पसरवितात, स्वताला सुधारनावादी व बुद्धिजीवी संबोधतात म्हणजे किती हा महामूर्ख पणा ?  मला तर कधीच आठवत नाही की, हिंदू धर्मातील असा कोणताच सन ,उत्सव ,संस्कृति नाही ज्याला यांनी कधी तरी चांगले म्हटलं असेल ?  कारण  यांची सगळी शक्ति या सर्वाला टोकाचा विरोध करण्यातच वाया जाते. आणि हो आपल्या धर्मातील सन, उत्सव ,  व संस्कृतिला या सर्वाना नाव ठेवल्याने यांना समाजात बुद्धिजीवी व चिकिस्तक म्हणून ओळखल्या जातात.(आजकाल अश्या प्रकारचा फार जोरात ट्रेंड सुरु आहे) यामुळे फुकटची प्रसिद्धि तर मिळते वरुन समाजसुधारक असल्याचे लेबल लावले जातात. पुरस्कार वैगरे मिळतो.

*वास्तविकता*:- सन ,उत्सव ,संस्कृति ही आपल्या धर्माच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. अनादी काळा पासून सन उत्सवाचे महत्व वेळोवेळी अधोरेखित झालेले आहे. भारतीय समाज हा पूर्वी पासुनच निसर्ग  पूजक राहिला आहे. निसर्गाच्या प्रत्येक त्रुतुत होणाऱ्या बदलाचे एक धार्मिक महत्व आहे. प्रत्येक त्रुतुत आपण त्या निसर्ग बदलाचे पूजन करत असतो,  याच्यतहि काही बुद्धिभ्रष्ट अंधश्रद्धा शोधतात वास्तविक ही  अंधश्रद्धा नसून तो निसर्गा प्रति असलेली आपली कृतज्ञता होय. परमेश्वर निर्गुण-निराकार असल्याने निसर्गालाच देव मानून आपण त्यांना पूजत असतो म्हणून हिंदू धर्मातील सर्व सन हे निसर्गाशी पुरक आहेत.   जे आपल्यातिल प्रत्येकाला या श्रुष्टितिल वृक्ष, पशु , जल, वायु धरती या सदैव प्रति कृतज्ञ आणि आदर  करणे शिकविते म्हणून हिंदू धर्मातच  वृक्ष, पशु, जल, वायु धरती हे पूजनिय मानले जातात. व शुभ कार्य हे पूजन करूणच सुरु होते.

म्हणून  अलीकडे खोट्या अपप्रचारला बळी न पडता आजच्या युवकानी व भावी पिढीनी आपल्या संस्कृति,सन उत्सव  व परम्परा  जी आपली जीवनशैली बनलेली आहेत या सर्वा विषयी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. .व कश्या प्रकारे  या सर्वांचे आपल्या समाज जीवनात शास्त्रीय , वैज्ञानिक, व आरोग्य दृष्टया अनन्य साधारण महत्व आहे  हे  देखील जरूर जाणून घ्या व त्यांचा नेहमी आदर करा.



क्षितीज गिरी ,सातारा:
श्री.राम रावनाचा वध करून अयोध्येत परत आले या आनंदात मध्ये गुडया उभारल्या जातात. किंवा या दिवशी ब्रमाने सुष्टी निर्माण केली असे म्हणले जाते. तर दुसऱ्या बाजूला  अयोध्ये मध्ये का अश्या प्रकारे सन साजरा केला जात नाही .फक्त महाराष्ट्र किंवा त्याच्या आसपास का हा सन साजरा केला जातो. याचा नक्की इतिहास तरी काय आहे. मग पुढे संभाजी महाराजांची हत्या झाल्यामुले हा सन साजरा केला जातो किंवा गुडया उभारल्या जातात असे म्हणले जाते .पण पुरावे तर संतानंच्या  काळातले पण मिळतात .मग हि परंपरा चालू कशी झाली. व फक्त महाराष्ट्र व कर्नाटक मध्येच का आहे. पण मी हा प्रश्न बाजूला ठेऊन एका वेगळ्या मुद्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयन्त करतोय . बहुदा विषय भरकटलेला असू शकतो.
         हिंदूंमध्ये प्रत्येक सणाला घेऊन वाद निर्माण होतो.रामाला देव का मानायचे.त्याच्या कोणत्या विचारांच्या व कृतीचा आदर्श घ्यायचा .इथून प्रश विचारला जातो. ते रावणाचे दहन का करायचे ती तर आमची देवता आहे इथे नेऊन थांबतो .मागे रावणाचे दहन करण्यासाठी आदिवासींनी विरोध केला होता. कारण रावण हि त्याची देवता आहे .ती त्याचे पूजन करतात. हिंदुनमध्ये एकाचे देवत दुसऱ्याचे दुष्मन कसे .विष्णू हि उच्च जातीची देवता मानली जाते. व शिव हि थोड्या हलक्या जातीची देवता मानली जाते. असा देवा देवा मध्ये फरक का आहे .
               हिंदूंना विरोध जास्त प्रमाणात हिंदूच का करतात. हिंदूंमध्ये एवढे टोकाचे मतभेद का आहेत. या सर्वांचे मुळात एकच कारण आहे .त्यामुळेच आपल्या वर मुघल इंग्रज आणि सगळ्यांनी राज्य केले .आणि प्रत्येक सणाला या ना त्या कारणांनी होणारा विरोध पण या साठीच आहे. ते कारण म्हणजे हिंदून मध्ये असलेली जातीव्यवस्था.
हिंदू नक्की एक आहे का ?आणि आहे तर प्रत्येकाची संस्कृती थोडी अधिक प्रमाणात वेगळी का आहे? हिंदू हिंदून मध्ये रोटी बेटी व्यवहार का चालत नाही ?त्याला एवढा विरोध का होतो ?हिंदूंच्या जातीमध्ये संपत्तींचे एवढे असमान वाटप का आहे? हिंदू समाजामध्ये प्रत्येक जातीची सामाजिक प्रतिष्ठ सारखी का नाही ?हिंदूंच्या सर्व जातींना राजकारणा मध्ये व त्या राजकीय पदामध्ये का स्थान नाही ?त्यांना यासाठी आरक्षणाचा आधार का घ्यावा लागतो ?हिंदून मध्ये ठराविक जातीच का अल्पसंख्याक आहेत ?हि सामाजिक आथिर्क राजकीय मानसिक समानता हिंदून मध्ये केव्हा येणार ?त्यासाठी काही हिंदुत्तवादि संघटना काही प्रयत्न करतात का ?का त्यांना हा विभागलेला असमान वाटपाचा हिंदू पाहिजे ?मग आम्ही कोणत्या गर्वाने म्हणायचे गर्व से काहो हम हिंदू है ?का आपल्याला या सर्व गोष्टी माहित असून पण आपल्यावर तर वेळ आली नाहि ना. किंवा आपल्याला तर उच्च किंवा मध्यम स्थान आहे ना. म्हणून आपण चुकिच्या गोष्टीचे समर्थंन करतो .सर्व माहिती असून पण आपण प्रबोधनकार ठाकरे किंवा नरेंद्र दाभोलकर का होत नाही? आपल्यात हिम्मत नाही का सत्य स्वीकान्याची .का स्वीकारून पण आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो .का आपला त्यात फायदा आहे म्हणून या शोषणकारी व्यवस्थेचे आपण उघड उघड समर्थन करतो .किंवा म्हणावा तेवढा विरोध करत नाही ?????



पद्मावती

पद्मावती

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

पद्मावती

Source: INTERNET
-क्षितिज गिरी,
सातारा

मलिक मुहम्मद जायसी कृत या महाकाव्या वर हि फिल्म आधारित आहे .हे काव्य कल्पनिक आहे का नाही हा वादाचा मुद्दा आसू शकतो. पण मुळात इतिहासाकड बघण्याचा दृष्टीकोण प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. महाभारताचेच उदाहरण घ्याना कोणी त्यामध्ये अर्जुनाला मोठे केले तर कुणी कर्णाला तर  तर कुणी पितामह भीष्मांला कुणी तर दुर्योधनाला पण केले तर कोण म्हणे हे घडलेच नाही .त्यामुळे मी म्हणतो त्याच पद्दतीने इतिहास दाखवावा हि विचारसरणी चुकीची आहे. या मध्ये वैचारीक विरोध बरोबर आहे पण त्यामुळे भर रस्त्यात उतरून राडा करणे हे चुकीचे आहे तुम्हाला जसा इतिहास वाटतोय तास तुम्ही मांडू शकता भरपूर माध्यमातून तो तुम्ही दाखवू शकता.
              पद्मावत ला मुळात पुरोगामी चा वैचारिक विरोध करायला पाहिजे होता .तसा तो झालाहि पण एवढा नाही.ज्या प्रकारे त्यामध्ये जोहर चा उदो उदो केला होता आणि जातीय वरचस्ववाद दाखवला गेला होता.मला वाटते जर करणी सेनेनि किंवा प्रतागामीनी जर विरोध केला नसता तर नक्कीच पुरोगामीनि विरोध केला आसता .कदाचित तो विरोध होऊ नये म्हणून पण केला असेल विरोध काय सांगावे .
          करणीसेनेचा विरोध कशाला आहे याबद्दल ते बऱ्याच वेळा  कन्फुज होते का उघाचच आपली ताकद दाखवण्या साठी विरोध केला काय माहित त्याचा फिल्म पेक्षा जास्त डोळा संजय लीला भन्साळी वर होता म्हणजे तो जे दाखवेल ते चुकीचेच आहे किंवा तो चुकिचेच दाखवणार आसा जणू समजच करून ठेवला होता . यामध्ये एक सिन मध्ये पद्मावती स्व:ता जाऊन खिलजी च्या इथून  आपल्या पतीला म्हणजे राजाला   सोडवते असे दाखवले आहे .हि तर खुप पराक्रमाची गोष्ट आहे .महाराष्ट्रात तर आश्या प्रकारचे शैय्या गाजवणाऱ्या स्त्रियांना आदराचे स्थान आहे.
फिल्म मध्ये खिलजी व पद्मावती चे काही सीन होते खलजी ला भास होत आहे असे ते काल्पनिक सिन होते पण नंतर ते विरोधकांच्या मागणी वरून काडून टाकले.पद्मावतीला  पूर्ण झाकलेल्या कपड्यात  दाखववे असेही नंतर सूर उमटले  काही ठिकाणी गाण्यामध्ये दाखवलेहि  पण सगळ्या ठिकाणी मात्र दाखवता आले नाही  घुमत गाण्यामध्ये मात्र नंतर एडिट करून पूर्ण कपड्या मध्ये दाखवले म्हणजे स्रियांना पूर्ण संस्कृतीक चौकटीत दाखवावे असे करणी सेनेचे म्हणणे होते नाहीतर आमच्या संस्कृती व परंपरे वर गधा येईल.

मला राजस्थान बद्दल एवढे माहित नाही पण माझ्या वाचनात असे आले कि ज्यावेळेस 19 व्या शतकात सती प्रथेला विरोध होत होता  तेव्हा त्यांनी सती प्रथेचे समर्थन करत मोर्चा काढला होता आणि आताही पद्मावती ला पूर्ण कपड्यामध्ये दाखवली नाही म्हणून त्या रस्त्यावर येऊन आंदोलन केले .वाईट मात्र एकाच गोष्टी चे वाटते राजस्थानी स्त्रियां आपल्या या गुलामगिरीचे सरळ सरळ समर्थन करतात विरोध तर सोडाच .



Source: INTERNET
-संदीप बोऱ्हाडे,
 पुणे

   सध्या 'पद्मावती' सिनेमावरुन बराच वादंग माजलाय.
इतिहासाची तोडफोड केल्याबद्दल उलटसुलट वाद सुरू आहेत, काहीजण तलवारी सरसावून तर काहीजण जिभा सरसावून बसलेत.

  पद्मिनीच्या बाबतीत खरं काय खोटं काय कळतच नाही. तिची कथा सांगितली जाते ती अशी की, ‘‘ती चितोडच्या रतनसिंग राजाची लावण्यवती राणी!
तिच्या लावण्याची चर्चा देशभर होती. म्हणजे त्या काळची ती मिसेस इंडिया! दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीला तिला पाहायची इच्छा होती. ती तिचं दर्शन आरशातून देते. अल्लाउद्दीन खिलजी तिचं सौंदर्य पाहून वेडावतो. ती त्याला आपल्या जनानखान्यात हवी असते. तो रतनसिंगशी युद्ध करतो. तुंबळ युद्ध होतं. रतनसिंग मरतो. राणी पद्मिनी शेकडो स्त्रियांसह जौहार करते. खिलजी गडावर येतो तेव्हा त्याच्या हाती
पद्मिनीच्या सुंदर शरीराची राख येते.’’

आज सभ्य व सुसंस्कृत भारतीय समाज काल्पनिक राणी पद्मावती ची मान मर्यादा रक्षण करण्यासाठी भन्साली ला सेट वर जाऊन मारहाण करीत होते, त्याचे शिर आणणाऱ्या ला 5 कोटी चे बक्षीस जाहीर करीत केले, अभिनेत्री दीपीका चे नाक कापण्याचे आवाहन करीत आहे.

हाच भारतीय सभ्य व सुसंस्कृत समाज काही वर्षापूर्वी थियेटर मधे फुलनदेवी ला नग्न पाहून टाळ्या व शिट्ट्या मारीत होता.

शेखर कपूर ने फुलनदेवी च्या जीवनावर आधारित बैंडिट क्वीन चित्रपट बनवला होता त्यामधे फुलनदेवी ला किती तरी वेळा नग्न दाखवले होते...! त्या वेळी कोणती सेना आली होती विरोध करण्यासाठी....!!!

फुलनदेवी महिला नव्हती का ?
फुलन देवी कोणाची मुलगी नव्हती का..??
फुलनदेवी देशाची कन्या नव्हती का..???

काल्पनिक पद्मावती ने आपली लाज वाचवण्यासाठी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारला होता...तर फुलनदेवी ने दुर्गेचे रूप धारण करून आपल्या वर अत्याचार करणाराना यमसदनास पाठवले होते. तेव्हा याच शूर वीर समाजातील एका ने त्या विरांगणे ची हत्या केली होती..

या देशात फक्त विशिष्ट महिलांचाच मान सन्मान आहे का ? काल्पनिक पद्मावती ची अभिलाषा धरणारा अल्लाउद्दीन खिलजी नीच होता तर ते लोक कोण होते ज्यांनी फुलनदेवी वर सामूहिक अत्त्याचार केले होते..?

भारतीय समाज स्वतःला कितीही सभ्य, सुसंस्कृत, महिलांचा सन्मान करणारा असल्याचा देखावा करीत असला तरी आतून हा समाज किती सड़लेला आहे..!! आपल्यासाठी महिलांची मान मर्यादा, महिलांचा सन्मान या संकल्पना फक्त ठराविक जाती धर्मातील महिलांच्या साठी च असतात....
प्रत्येक भारतीय महिलेसाठी नव्हे...!!!!

  खिलजीने चितौड जिंकलं १३०३ साली. त्यानंतर दोनशे सदतीस वर्षांनी मालिक महमद जयासी नावाच्या अवध कवीने पद्मावत नावाचं काव्य रचलं. त्यात चितोडच्या पराभवात ही पद्मिनीची कथा टाकली गेली. पद्मिनीबद्दल कुठेही ऐतिहासिक पुरावा नाही.

 आणि आपल भाग्य अस म्हणाव लागेल की संविधानावर देश चालतो...अन्यथा या धर्माच्या ठेकेदारांनी आपल्या धर्मवार देश चालविला असता...

 

Source: INTERNET
-जयंत जाधव,
लातूर

पद्मावती चित्रपटाच्या निमित्ताने भारतात दोन विषयावर सध्या खूप चर्चा झाल्याचे चिञ दिसून येते.ते विषय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची  अतिशयोक्ती व विशिष्ट जातीच्या स्त्रीयांचा सन्मान.
आज ह्या  पद्मावती मुळे देशात जे काही कायदा व सुव्यवस्थेचा व स्त्री सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला    आहे त्याला तीन गोष्टी दोषी आहेत.वादग्रस्त चित्रपट दिग्दर्शक  संजय लीला भन्साळी,सेन्सॉर मंडळ व स्वघोषित संस्कृती रक्षक संघटना. पद्मावतीच्या इतिहासाच्या फंदात मी पडणार नाही.एखाद्या ऐतिहासिक विषयावर चित्रपट तयार करताना मुळ साच्याला धक्का लागू नये. चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून अलीकडे फालतू स्टंटबाजी,शेरेबाजी करण्याचा नवीन फंडा भन्साळी सारख्या माणसांनी निर्माण केला आहे.तू कर रडल्यासारखे मी करतो मारल्या सारखे.स्वतः आग लावायची व नंतर ती विझवण्यासाठी स्वतः पाणी मारायचे.सेन्सॉर मंडळाचे नियम तकलादू  आहे. राजकीय हेतूने प्रेरीत मंडळावरील नेमणूका,जुने नियम इत्यादी ते मोडकळीस आले आहे.सेन्सॉर मंडळाच्या नियमांची पूर्नरचना झाली पाहिजे.विविध अभ्यासू व्यक्तींना मंडळात नियुक्त करायला हवेत.राजकीय ढवळाढवळ थांबायला हवी. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसावे. पद्मावतीमुळे देशात साधनसामग्रीचे नुकसान झाले त्या सगळ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नावाखाली बोंबलणारा संजय भन्साळी असो की राजकीय लोकांच्या हातातील बाहुले असलेले सेन्सॉर मंडळ असो वा संस्कृती रक्षणाच्या नावाखाली कायद्याला आव्हान देणारे स्वघोषीत संस्कृती रक्षक गुंड असो.



Source: INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद

             पद्मावतीला झालेला विरोध सर्वांनीच पाहिला. इतिहास कसा होता आणि तो कसा दाखवण्यात आला वगैरे गोष्टींशी माझ तरी काहीच देणघेण नाही. पण या चित्रपटाला झालेल्या विरोधातून कुठेतरी एक गोष्ट प्रांजळपणे लक्षात आली ती म्हणजे, आजही ही स्वत:ला एकविसाव्या शतकातली म्हणवणारी पिढी स्त्रियांना एका विशिष्ट चौकटीतच ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. *चित्रपटात एका ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजी फक्त पद्मावती सोबत स्वत:ची कल्पना करतो तर लोकांचा विरोध त्या कल्पनेच्या गोष्टीलाही होतो इथेच आपली स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता किती चुकीची आहे हे लक्षात येते.* पद्मावतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही गोष्ट समोर आली की, पुरुष आजही त्याचा पुरुषी अहंकार मनात बाळगून आहे.
काही चुकल असेल तर क्षमस्व!



Source: INTERNET
-पी.प्रशांतकुमार,
अहमदनगर

...पद्मावतीचा इतिहास पाहण्याआधी आपण थोडा भन्साळीचाही इतिहास पाहू.. देवदासच्या तिसऱ्या रिमेक मधे (आधीचे KL सहगल आणि दिलीपकुमार) निव्वळ TRP साठी मूळ कादंबरीत बदल करून चांद्रमुखी आणि पारूचा एकत्र डान्स घेतला.. सिनेमॅटिक लिबर्टी इथे एकवेळ मान्य करताही येईल
.
पण मस्तानी आणि काशीबाई यांचही एकत्र नृत्य? काशीबाई ह्या एका पायाने अधू होत्या अस बऱ्याच नोंदीत आलेलं असतानाही.. सिनेमॅटिक लिबर्टी की TRP ची लिबर्टी? .. आणि पराक्रमी बाजीराव 'वाट लावली' वर वाचतो?.. ऐतिहासिक सिनेमात नाच-गाणं ठेवायचा अट्टाहास कशासाठी ? ..
... He is a *Typical Bollywood* film director/producer..
.... तो चांगला कलाकार आहे काही चांगले चित्रपट पण दिलेत पण ते कादंबरी/कथांवर..
आता जर हा माणूस शिवाजींवर चित्रपट काढायला गेला तर....?  बापरे विचारही करवत नाही
...
खरतर पद्मावतीचा वाद चित्रपट निर्मात्यांना हवाच होता.. फक्त तो इतक्या टोकाला जाईल अस त्यांना वाटल नाही..
...*बदनाम हुये तो क्या? नाम तो हुआ*.. हे सरळ गणित असत हिंदी चित्रपट सृष्टीत.. फुकटात पब्लिसिटी होते,गाजावाजा होतो..वाद होतात.. चित्रपट चर्चेत राहतो आणि बख्खळ पैसा कमावला जातो.. वादात पडला नसता तर कधी आला आणि कधी गेला समजत नाही

आता राहता प्रश्न करणी सेना आणि त्यांच्या उपद्रवाचा
तर बहुतांश इतिहासकारांच्या मते पद्मावतीची कथा हे एक myth आहे..ती फक्त दंतकथा आहे..
आपण दुटप्पी लोक आहोत ..
खरच...
मी करतो ते बरोबर
इतरांनी तसं केलं तर मात्र चूक..
असो तर पद्मावतीच्या इज्जतीसाठी मानासाठी कोण दंगे करतात तर ते जे स्त्री चा सर्वाधिक छळ करतात

गुजरात/राजस्थानचा  हाच भाग जिथे सर्वाधिक स्त्रीभ्रूण हत्या होतात.. per 1000 सर्वात कमी स्त्री संख्या.. जन्मलेल्या बालकांना (मुलगी) दुधात बुडवून मारतात..अगदी काळ-परवापर्यंत अस व्हायचं..
पडदा पद्धत पाळतात
घराबाहेर लवकर पडू देत नाही
सर्व मार्गाने तिच्यावर अन्याय करताय
आणि आज तेच लोक एका स्त्रीच्या मानासाठी मोर्चे काढतात..

TV वर एकजण तावातावात म्हणत होता अगर यह फिल्म रिलीज हुयी तर आमच्या स्त्रिया थेटर बाहेर जोहार करतील (जोहार=स्रियांनी सामुदायिक सती जाणं)  ..इति करनी सेना

अरे निठल्लो यहा तो तुम कुछ करो ... इथेही बायकांना पुढं करताय...

अरे मुघलांना मुली देऊन/सोयरिकी करून साम्राज्य टिकवलीत आणि तुम्ही पराक्रमाच्या गप्पा माराव्यात
ब्रिटीशांची जी हुजूरी करून आपली राज्य वाचवणारे आज एका काव्यातच अस्तित्वात असलेल्या राणीच्या न झालेल्या अपमानासाठी मुलांच्या बसवर दगडफेक करून, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करून आपल्या शौर्याचे प्रदर्शन करतायत.

थू त्यांच्या जिंदगानीवर...

आणि चार राज्यातील सरकारे त्यांना घाबरून न पाहता बंदी आणतात त्या चित्रपटावर..
खरंतर अशा संघटना बळाचा वापर करून तिथेच शांत केल्या पाहिजे होत्या म्हणजे भविष्यात कुणी समाज कंटक संघटना अशा तोडफोडी करणार नाही वळवळणार नाही.. पण

बाकी मी भन्साळीचा अजिबात चाहता नाही ..देवदास पाहिला नाही आणि नन्तरचे पण…




Source: INTERNET
-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,
उस्मानाबाद

परवाच पद्मावती फिल्म प्रदर्शित झाली, ती प्रदर्शित होण्यापूर्वी झालेला ( मुद्दाम केलेला ) गोंधळ अख्या देशाने पाहीला..
शेवटी व्हायचं तेच झालं, अनेक प्रसंगांना कात्री लावून तो पडद्यावर आणायला परवानगी दिली, यात चित्रपट निर्माते जिंकले की करणी सेना हा मुद्दा गौण आहे. इतिहासात ढवळाढवळ करण्याचा ठेका काही निर्मात्यांनी व इतिहासकारांनी घेतला आहे तसे नसते तर हा वादच उद्भवला नसता, राणी पद्मावती चा इतिहास खरा आहे की खोटा हे सांगण्यात इतिहासकारात मतांतरे आहेत मग आपण कोणत्या तोंडाने त्याचे मूल्यमापन करू शकतो.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विखार पासरावणारी करणी सेना, चित्रपट निर्माते हे दोघेही ठराविक मानसिकतेचे प्रतिनिधित्व त्यावेळी करत होते असं दिसून येतं.
कारण या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वात जास्त शिंतोडे उडवले गेले ते स्त्री च्या कर्तृत्वावर, इथल्या भारतीयांच्या मानसिकतेवर..
स्त्री आमच्या देव्हाऱ्यातील दैवत आहे असे म्हणणारे ठराविक जातीतील, ठराविक धर्मातील व ठराविक प्रदेशातील स्त्रियांना देव मानतात हे या निमित्ताने दिसून आले,
दुसरं म्हणजे देशात पार मुळापर्यंत रोवलेली पुरुषी मानसिकता हि राणी पद्मावती वर झालेल्या टिकेने पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
तिसरं म्हणजे इतिहासात हस्तक्षेप करणं हे आजकाल मोठया निर्मात्यांचा मोठेपणा मिरवण्याचा प्रघात पडत चालला आहे.
करणी सेने सारख्या संघटना म्हणजे कमालीची कट्टरता, द्वेष, हिंसेला खतपाणी पुरवणाऱ्या लोकांचं टोळकं आजही या देशात मोकाट आहेत हे देखील दिसून आलं.
लोकांच्या अस्मितेशी खेळायला काही पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या तथाकथित विचारवंतांना आवडतं हे पण दिसून आलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त आमच्यापुरतं आहे बाकीच्यांना ते नाहीच आशा अविर्भावात लेख, मतं मांडणारी लोकं पण नजरेत आली,
आधुनिकतेचा, नव्या विचारांचा बुरखा घालून भारतमातेला व या भारतीय संस्कृतीचा मानबिंदू असणाऱ्या स्त्रीला शिव्यांची लाखोली वाहणारा स्वतःला उच्च शिक्षित समजणारा ठराविक हरामखोर ( क्षमा असावी ) लोकांचा गट पण या समाजात मोठया दिमाखात नांदतो हे ठळकपणे जाणवलं.

( काहि शब्दप्रयोग नाईलाजाने करावे लागले आहेत त्याबद्दल क्षमा असावी, वरील विषयावर बरीच मतांतरे आहेत त्यामुळे काही आक्षेप असू शकतात त्यावर मला वैयक्तिक सांगून चूक सुधारण्याची संधी द्यावी ही विनंती )


Source: INTERNET
-अभिजीत गोडसे,
  सातारा

       आपल्याकडे कोणत्याही इतिहास कालीन घटनांनव फिल्म निघणे ही चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल . कारण भारताला व त्यातील राज्यांना समृद्ध असा इतिहास लाभला आहे . या इतिहासाची माहिती , घटनाक्रम पुढील पिढीला माहिती होणे हे अत्यंत महत्त्वाचेच आहे .

        कोणताही  इतिहासावर भाष्य करणारा सिनेमा जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा फक्त त्या दिरदर्शकाची मेहनत असते असे नव्हे तर त्या मागे हजारो जनांचे हात कामाला लागलेले असतात. त्यांची मेहनत , श्रम , पैसा , वेळ घालवलेला असतो. पुन्हा हा सिनेमा चालेले की नाही , सिनेमाची जहिरात वगैरे वगैरे असे बरेच प्रश्न त्यांच्या पुढे असतात . असो . चिञपट आणि वाद हे  आपल्याकडे नविन नाही अगदी १९३२ साली मास्टर मिसार हा मुस्लिम कलावंत आहे. म्हणून त्यांने सुरदासाची भूमिका करु नये इत पासुण ते आत्ताचा पद्मावत पर्यत सर्व काही वाद आपल्याकडे होत असतात . अलिकडचे  मराठीतील झेंडा , शिक्षणाचा आयचा घव तसेच हिंदी मधील अलिकडचे उडता पंजाब , बाजीराव मस्ताणी , लिफ्टीक अंडर माय बुरखा , इंदू सरकार आसे खुप वाद झालेले सिनेमे आहेत . ८० वर्षीचा इतिहास आहे या चित्रपट आणि वाद यांना.  मुळातच पद्मावतीचा इतिहास हा ७०० वर्षी पुर्वीचा आहे . ही राजस्थान या राज्यातील  'माता' असे मानले जाते .पद्मावती होती की नव्हती यावर अजून सुद्धा ठोस असा पुरावा नाही. राजपुत करणी सेना यांनी या सिनेमावर अक्षेप घेतला. का तर म्हणे आमच्या माताचा अवमान त्यामधे दाखवला आहे . आमच्या माताचे आणि अल्ला उल्दीन खिलजी यांचे प्रेम संदर्भ रंगवले आहेत . मुळात कोणत्याही सिनेमा मधे ऐक कला म्हणून पहायला हवा . काही गोष्टी प्रत्येकक्षांत नसल्या तरी थोडाफार ऐक अभिनेत्यांच कौशल्य म्हणून आणि सिनेमा चालावा म्हणून अशा घटना, प्रंसग दाखवणे दिरदर्शकाला भाग पडते . आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहेच की ..आपल्याकडे कसे संभाजी मालिका मधे संभाजीनी ऐवढी मोठी गदा उचलली असे दाखवले आहे . पन पत्यक्षात हे शक्य नाही . सामान्य माणुस ऐवढी मोठी गदा उचलने शक्यच नाही .. परंतु असे थोडे फार दाखवावे लागते मालिका बगायला रंगत वाढते संभाजीन प्रती आदर व्यक्त होतो ...असो...असेच काहीसे सिनेमा मधे ही आसतेच ...इतिहास कालीन सिनेमे बनवताना इतिहासात समजावून घेण्यासाठी दिरदर्शक कथा , कादंबरी आभ्यासतात ... मुळात  कादंबरी या तर ईतिहासाची मोडतोड करुण बणवलेल्या असतात ... आणि बरेच इतिहास कालीन सिनेमे अशा कांदबरीवर आधारित असतात... यामुळे मग पुढे अशा प्रकारचे वादंग निर्माण होतात . अलिकडे दिरदर्शक सुद्धा जाणुन भुजून सिनेमा बनवताना इतिहासांचा विपर्यास करततात की काय ? या बद्दल शंका येते कारण असा थोडा फार मजकूर स्टोरी मधे घुसळायचा आणि टि. आर. पी  मिळवायचा असे बरेच सिनेमा मधे अलिकडे पहायला मिळते . सिनेमा येण्या आगोदरच प्रसिद्धी घेयाची हाच नविन ट्रेड पहायला मिळत आहे.

           या पद्मावतीला सेन्सॉर बोर्डने काही अक्षेपहार्य  मजकूर वगळून म्हणजेच ३०० वेगवेगळे  बदल करुन परवानगी दिली ,  पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली तरी सुद्धा अस्मितेच्या नावा खाली फुटकळ रजपुत सेना, संघटना फोफावली आणि घालायचा तो गोंधळ घातला सर्वीच्च   न्यायालयाने परवानगी देऊन सुद्धा ही संघटना धुमाकुळ माजवत होती ..शंका येते या माघे काही राजकीय हात आहे काय ?  काल परवा पर्यत या संघटनेला कोणी ही ओळखत सुध्दा नव्हते ती संघटना सर्वीच्च न्यायालयाचा आदेश पाळत नाही ही खेदाची बाब आहे . सेन्सॉर बोर्डने येवढे सर्व भाग कट करुन सुद्धा ही सेना विरोध करत होती ..भौतेक येणाऱ्या लोकसभा , विधानसभा याची तयारीच चालली असनार या संघटनेची ....तिकडे राजस्थान मधे उच्च वर्गीय लोक देश विदेशात आहेत आणि येथे राहणारे हे तरुण युवक  अस्मितेच्या नावा खाली तोडफोड करत आहे . तिकडे राजे राजवाडे हे ऐतिहासिक आहेत तिथे पर्यटक छोटी कपडे घालून येतात हे चालते , राजस्थान मधे उच्च वर्ग माँडर्न कपडे घालतात  कोणिही राजस्थानी पोषाख घालत नाही ....आणी बिनाकामाची या तरुण संघटनांना  दिपीकाची कंबर दिसते हे वौशिष्ट म्हणावे लागेल .

       महत्त्वाचे म्हणजे  सर्वोच्च न्यायालयाने पद्मावतीला परवानगी देऊन सुद्धा  चार - पाच राज्यात धुमाखुळ घातला या सेनेने आणि कोणी सुद्धा राजकीय व्यक्ती बोलायला तयार नाही ..हे सर्व मतानंसाठी  आणि निवडणूक  डोळ्यासमोर ठेऊन केले की काय असे म्हणायला वाव आहे . ऐकवीसाव्या शतकात आपण जात असताना स्वताःला महासत्ता बनवत  असताना सुजान नागरिकांनी या आजूबाजूला होणाऱ्या किंवा घडवत असलेल्या घटना डोळसपने पाहने महत्त्वाचे आहे..


Source: INTERNET
-रविराज आकोसकर,
लातूर

पद्मावतीच्या संदर्भात जो काही देश पेटला त्याला फक्त फितूर लोकांचा शहाणे  पणा कारणीभूत आहे.इतकी तीव्र भावना भडकावून त्यानी त्यांचं ध्येय पूर्ण केल असच म्हणाव लागेल.भारतातला लाभलेली संस्क्रुति एका पिक्चर साठी पणाला लागली आणी ती बेचिराख पण झाली ..अत्यंत घाणेरड्या युक्त्या वापरून समाज भावना ठेचल्या आणी हवं ते मिळवलं..आता यात निर्मात्यांनी किती भर घातली हे लक्षात घेणं गरजेचं....


Source: INTERNET
-समीर सारगे,
नेर
जि यवतमाळ

हल्ली वादग्रस्त चित्रपट बनविन्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. एखाद्या समाज जीवनावर, इतहासा वर चित्रपट बनवायचा आणि त्याला  विरोध प्रदर्शना द्वारे आपोआपच अमाप प्रसिद्धि मिळवून द्यायची असे काही चित्र अलिकडील काळात पहावयास मिळत आहे. प्रख्यात दिग्दर्शक  संजय लीला भंसाली याचा पद्मावती हा चित्रपट रिलीज व्हायच्या आधी पासुनच वादाच्या भोवर्यात सापडलाआता  चित्रपटाचे मूळ नाव बदलून पद्मावत करण्यात आले असले तरीही सत्यता आणि इतिहास बदलू शकत नाही. असो, वादाचे  मुख्य कारण होते पद्मावती नावाच्या एका  राजपूत (स्त्री)राणी पद्मवतीचे क्रूर शासक अल्लाउद्दीन खिलजीशी प्रेम संबंध दाखविन्यात आले आहेत. अलाउद्दीन खिलीजी किती उदार होता, किती दानशूर होता , किती प्रेमळ आणि पूजनीय होता हे दखविन्याचा केविलवाना प्रयोग या दिग्दर्शकला कारायचा आहे का?  वास्तविक पाहता  इतिहास वेगळाच आहे. राणी पद्मवतीने कधीच खिलजिला आपल्या अंगाला स्पर्श करु दिला नाही. उलट अलाउद्दीन खिलजी जेव्हा चित्तौडगड़ावर आक्रमण केले तेव्हा शेकडो स्त्रियांनी  स्वताला जालून घेतले कोणी विहिरी मध्ये उड़ी घेऊन स्वताला जल समाधी दिली. कितीतरी पुरुष, स्त्रिया ,लहान मुले , याची सर्रास कत्तल करणाऱ्यां खिलजिला संजय भंसाली हीरो दाखवत आहेत , इतिहासाची मोडतोड़ करून केवळ मनोरंजन म्हणून चित्रपट काढून भारतीय प्रेक्षकांच्या समाज मनावर यांना क़ाय बिम्बवायचे आहे. मग या माध्यमातून होणाऱ्या  विरोध आणि त्यातुन निर्माण होणाऱ्या हिंसेला बळी पडणारी निष्पाप जनता , सार्वजनिक मलमत्ताचे होणारे नुकसान , कायदा व सुव्यवस्था चा निर्माण होणारा प्रश्न या सर्वाला जबाबदार कोन ? या चित्रपटाच्या प्रदर्शना च्या आधी करणी सेनेने  घेतलेल्या हिंसक प्रवुत्तीला चित्रपट गृह मालकानी चित्रपट दाखवीन्यास नकार  दिला परंतु  ज्याणी  विरोध दर्शविला त्यांचे नुकसान त्यांना सोसावे लागले. आता पद्मावत चित्रपटाने 100 कोटी रूपयाचा गल्ला ज्मवल्यावर चित्रपट निर्माते संजय लीला भंसाली याला कंठ फूटने स्वाभाविक आहे.

आणि आता त्याला अभिव्यक्ति स्वतंत्र्याची आठवन वैगरे ती याच प्रकारची आहे पूर्वीच्या तत्कालीन सरकारने एक विशिष्ट समाजाच्या हिंसक दाबावाला बळी पडून पुस्तकावर ,चित्रपटावर, व्यक्तिवर  बंदी आणली तेव्हा या भंसाळीचे तोंड उघडले नाही तेव्हा याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य वैगरे धोक्यात आले नाही. म्हणजे जाणून बुजुन अशे चित्रपट कढायाचे आणि त्याला विरोध झाला की मग आमचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात आहे म्हणून गळा फाडून ओरडायचे आणि सरकारला देखील आपल्या सडक्या मान सिकतेच्या जोरावर गुन्हेगार ठरवून टाक़ायचे अलीकडे 'सेक्सी दुर्गा ', 'बाजीराव मस्तानी'अश्या वाहियाद प्रकारचे शीर्षक देऊन चित्रपट प्रकाशित झाले, तिथेही वाद उतपन्न झाला तेव्हा या हरामखोर आणि मुजोर असलेल्या या दिग्दर्शक कंठ फाडून माध्यमान समोर ओरडू लागला की माझ्या अभीव्यक्ति स्वतंत्र्या वर आघात होत आहे. मला चित्रपट बनवन्यचे देखील स्वातंत्र नाही या मुद्याला  काही वामपंथी  भाड़ोत्री मीडिया न्यूज़ चैनल ने अमाप प्रसिद्धि दिली आणि सरकारच्या विरोधात रनशिंग फुकण्याचे काम केले मग जेव्हा विरोध तीव्र झाला तेव्हा  खुलासा करण्यात आला की या चित्रपटात अशे काहीच नाही ज्याने एका धर्माची वा समाजाची बदनामी होईल , त्या चित्रपटात  नायिका एका वाहनाला लिफ्ट मागते आणि त्यात तिच्यावर  झालेल्या अतिप्रसंग व अत्यचारा विरोधात ती कश्या प्रकारे प्रतिकार करते यावर तो चित्रपट आहे. मग  या चित्रपटात काही सेक्सि दृश्ये नसताना या नक्षली मानसिकतेच्य नालायक दिग्दर्शकला चित्रपटास  सेक्सी दुर्गा हेच नाव का द्यावेसे वाटले ? त्यात  तो एखादे दूसरे नाव देऊ शकला असता  ,शूरवीर दुर्गा , सहनशील दुर्गा , पराक्रमी दुर्गा  वैगरे पन नाही . सडक्या डाव्या विचार सारणीच्या मान्सिकते शी प्रेरित असलेली ही पिलावळ  त्यांच्या कडून दूसरी कोणती अपेक्षा  करु शकतो!

दूसरे म्हणजे शुर पेशवा बाजीराव यांच्या जीवनावर , त्यांच्या शौर्यावर , पराक्रमावर चित्रपट काढण्या एवजी हे नतद्रष्ट  शहरी नक्षली बाजीराव व  मस्तानी यांचे प्रेम प्रकरणवार चित्रपट काढतात आणि भंसाळी ची हीच मानसिकता होती  म्हणजे इतिहास ईतका विकृत आणि विद्रुप करुण माडण्याचा प्रयत्न करतो की बघता क्षणी अपल्याला लाज वाटेल ,  हेच या शहरी नक्षल्यांचे काम आहे , स्वताला स्त्रीवादी म्हनवनाऱ्या संजय लीला भंसाळी याची ही व्याख्या आहे का स्त्रिवदाची ? यावरून डाव्या सडक्या विचारसरणीच्या दिग्दर्शकाना लढ़व्या ,पराक्रमी वीर योद्धाप्रति असलेल्या  इतिहास सोडून  असले शीर्षक (Title) देऊन  चित्रपट खपवत आहेत.

या देशाला लाभलेला गौरवशाली इतिहास मलिन करण्याचे आणि देशाच्या अस्मितेला मातीत घालण्याचा हे षड्यंत्र सद्या जोरात सुरु आहे.

आणि यांच्या असल्या कृत्याला काही बेरोजगार असलेले अभिनेते व अभिनेत्री समर्थन करतात
जेने करून एखाद्या चित्रपटाचे दान आपल्या पदरात पडेल व आपली बेरोजगारी दूर होईल, म्हणून ही घानेरडी वक्त्वये केली जातात.
 यांच्या म्हनन्या नुसार  संजय भंसाळी ने चित्रपटा मध्ये जोहर दृश्य दाखवायला नको होते , बलात्कारा नंतर ही स्त्रिला आयुष्य असते की नाही, की तीने संपूर्ण आयुष्य योनिचे पावित्र्य , संरक्षण , आणि स्वताच्या प्राणांची आहुती यातच  राखन्यात खर्च करायचे. म्हणजे खिलजिला स्पर्श नको म्हणून राणी पद्मावती सह हजारो राजपूत स्त्रीयानी जे संकट आले यातन्या झाल्या त्या निमुटपने सहन करावे ,भोगावे , स्त्रिच्या सक्षमी करणाची याहून घानेरडी व्यख्या दूसरी क़ाय?   जी व्यक्तिमत्वे महान असतात त्यांचे आकलन सर्वसमान्याना होत नाही त्यांचा एकेक पैलु विशाल व महान असतो तेव्हा , कलावंत, विचारवंत, आणि बुद्धिवंताची गरज भासत असते  आणि ज्यांच्या कड़े ही विचारसरणी आणि विवेकबुद्धि असेल तोच खरा  कलाकार ,विचारवंत आणि बुद्धिवादी असतो. यात भंसाळी सारखे नक्षली मुळीच बसत नाही.



Source: INTERNET
-निकिता गडाख
अहमदनगर

एक वेळेस आकाशाला सीमा असू शकतात पण माणसाच्या कल्पकतेला नाही_* . पद्मावती हा सिनेमा आहे हे लोकांना माहीत असून सुद्धा त्यांनी त्याला विरोध दर्शवला आणि कदाचित त्याना माहीत ही असेल की सिनेमा म्हणजे काय...जर सिनेमाच्या माध्यमातून लोकांना इतिहासाबद्दल कळत असेल तर त्यात वाईट काय? खर तर मलाही माहती नव्हते की पद्मावती नावाची कुणीतरी राणी होऊन गेलेली आणि असे अनेक लोक असतील कदाचित त्याना पण माहित नसेल पण चित्रपटा मूळे कळले असेल आणि राहीला प्रशन ज्या लोकांना असे वाटतय की आपला इतिहास बदलाय वैगरे तर ज्यांना खरच माहीती करून घायची आहे ते कादंबरी वाचतील की...एखादा दोन ते तीन तासाचा सिनेमा जेंव्हा पडद्यावर येतो त्यामागे प्रचंड मेहनत पेसा असतो(मी तर असे ऐकले की रणवीर सिंग ला त्या रोल मधून बाहेर येण्यासाठी पाच महिने psychiatrist कडे उपचार घ्यावे लागले)....बघणार्याला  फक्त ग्लॅमर्स वाटत त्यामागे किती कष्ट घेण्यात आले असतील याचा पण विचार करावा...तो सिनेमा फेमिनिस्ट होता म्हणून पण विरोध करू शकतात...जर तुम्हाला विरोध करायचाच असेल तर पोरोनिग्रपिक साईट्स ना करावा भारता मध्ये सर्वे नुसार 18 च्या आतील मुलांनि पॉर्न फिल्म बघणाऱ्या मुलांनाच प्रमाण 94% आहे मग ही बातमी जेंव्हा पेपर ला अली तेंव्हा काय सगळे झोपलेले होते का...तेंव्हा का कुणी विरोध केला नाही...भारतच झालेलं कसे आहे राजकारण करता करता काय आपल्या साठी चांगलं आहे आणि काय वाईट हेच विसरून चाललेत फक्त सत्ता हवी...
पद्मावती ला विरोध झाला त्यामागे राजकारण होतो नव्हतं माहीत नाही पण फिल्म ची पब्लिसिटी मात्र झकास झाली मूवी ब्लॉकबस्टार झाली एवढा विरोध होऊन सुद्धा....सगळ्या जगाला आपल अभिव्यक्त स्वतंत्र बघायला मिळाले.... (social networking साईट्स वरून कळेलच असेल ).
      
              

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************