पद्मावती

पद्मावती

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

पद्मावती

Source: INTERNET
-क्षितिज गिरी,
सातारा

मलिक मुहम्मद जायसी कृत या महाकाव्या वर हि फिल्म आधारित आहे .हे काव्य कल्पनिक आहे का नाही हा वादाचा मुद्दा आसू शकतो. पण मुळात इतिहासाकड बघण्याचा दृष्टीकोण प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. महाभारताचेच उदाहरण घ्याना कोणी त्यामध्ये अर्जुनाला मोठे केले तर कुणी कर्णाला तर  तर कुणी पितामह भीष्मांला कुणी तर दुर्योधनाला पण केले तर कोण म्हणे हे घडलेच नाही .त्यामुळे मी म्हणतो त्याच पद्दतीने इतिहास दाखवावा हि विचारसरणी चुकीची आहे. या मध्ये वैचारीक विरोध बरोबर आहे पण त्यामुळे भर रस्त्यात उतरून राडा करणे हे चुकीचे आहे तुम्हाला जसा इतिहास वाटतोय तास तुम्ही मांडू शकता भरपूर माध्यमातून तो तुम्ही दाखवू शकता.
              पद्मावत ला मुळात पुरोगामी चा वैचारिक विरोध करायला पाहिजे होता .तसा तो झालाहि पण एवढा नाही.ज्या प्रकारे त्यामध्ये जोहर चा उदो उदो केला होता आणि जातीय वरचस्ववाद दाखवला गेला होता.मला वाटते जर करणी सेनेनि किंवा प्रतागामीनी जर विरोध केला नसता तर नक्कीच पुरोगामीनि विरोध केला आसता .कदाचित तो विरोध होऊ नये म्हणून पण केला असेल विरोध काय सांगावे .
          करणीसेनेचा विरोध कशाला आहे याबद्दल ते बऱ्याच वेळा  कन्फुज होते का उघाचच आपली ताकद दाखवण्या साठी विरोध केला काय माहित त्याचा फिल्म पेक्षा जास्त डोळा संजय लीला भन्साळी वर होता म्हणजे तो जे दाखवेल ते चुकीचेच आहे किंवा तो चुकिचेच दाखवणार आसा जणू समजच करून ठेवला होता . यामध्ये एक सिन मध्ये पद्मावती स्व:ता जाऊन खिलजी च्या इथून  आपल्या पतीला म्हणजे राजाला   सोडवते असे दाखवले आहे .हि तर खुप पराक्रमाची गोष्ट आहे .महाराष्ट्रात तर आश्या प्रकारचे शैय्या गाजवणाऱ्या स्त्रियांना आदराचे स्थान आहे.
फिल्म मध्ये खिलजी व पद्मावती चे काही सीन होते खलजी ला भास होत आहे असे ते काल्पनिक सिन होते पण नंतर ते विरोधकांच्या मागणी वरून काडून टाकले.पद्मावतीला  पूर्ण झाकलेल्या कपड्यात  दाखववे असेही नंतर सूर उमटले  काही ठिकाणी गाण्यामध्ये दाखवलेहि  पण सगळ्या ठिकाणी मात्र दाखवता आले नाही  घुमत गाण्यामध्ये मात्र नंतर एडिट करून पूर्ण कपड्या मध्ये दाखवले म्हणजे स्रियांना पूर्ण संस्कृतीक चौकटीत दाखवावे असे करणी सेनेचे म्हणणे होते नाहीतर आमच्या संस्कृती व परंपरे वर गधा येईल.

मला राजस्थान बद्दल एवढे माहित नाही पण माझ्या वाचनात असे आले कि ज्यावेळेस 19 व्या शतकात सती प्रथेला विरोध होत होता  तेव्हा त्यांनी सती प्रथेचे समर्थन करत मोर्चा काढला होता आणि आताही पद्मावती ला पूर्ण कपड्यामध्ये दाखवली नाही म्हणून त्या रस्त्यावर येऊन आंदोलन केले .वाईट मात्र एकाच गोष्टी चे वाटते राजस्थानी स्त्रियां आपल्या या गुलामगिरीचे सरळ सरळ समर्थन करतात विरोध तर सोडाच .



Source: INTERNET
-संदीप बोऱ्हाडे,
 पुणे

   सध्या 'पद्मावती' सिनेमावरुन बराच वादंग माजलाय.
इतिहासाची तोडफोड केल्याबद्दल उलटसुलट वाद सुरू आहेत, काहीजण तलवारी सरसावून तर काहीजण जिभा सरसावून बसलेत.

  पद्मिनीच्या बाबतीत खरं काय खोटं काय कळतच नाही. तिची कथा सांगितली जाते ती अशी की, ‘‘ती चितोडच्या रतनसिंग राजाची लावण्यवती राणी!
तिच्या लावण्याची चर्चा देशभर होती. म्हणजे त्या काळची ती मिसेस इंडिया! दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीला तिला पाहायची इच्छा होती. ती तिचं दर्शन आरशातून देते. अल्लाउद्दीन खिलजी तिचं सौंदर्य पाहून वेडावतो. ती त्याला आपल्या जनानखान्यात हवी असते. तो रतनसिंगशी युद्ध करतो. तुंबळ युद्ध होतं. रतनसिंग मरतो. राणी पद्मिनी शेकडो स्त्रियांसह जौहार करते. खिलजी गडावर येतो तेव्हा त्याच्या हाती
पद्मिनीच्या सुंदर शरीराची राख येते.’’

आज सभ्य व सुसंस्कृत भारतीय समाज काल्पनिक राणी पद्मावती ची मान मर्यादा रक्षण करण्यासाठी भन्साली ला सेट वर जाऊन मारहाण करीत होते, त्याचे शिर आणणाऱ्या ला 5 कोटी चे बक्षीस जाहीर करीत केले, अभिनेत्री दीपीका चे नाक कापण्याचे आवाहन करीत आहे.

हाच भारतीय सभ्य व सुसंस्कृत समाज काही वर्षापूर्वी थियेटर मधे फुलनदेवी ला नग्न पाहून टाळ्या व शिट्ट्या मारीत होता.

शेखर कपूर ने फुलनदेवी च्या जीवनावर आधारित बैंडिट क्वीन चित्रपट बनवला होता त्यामधे फुलनदेवी ला किती तरी वेळा नग्न दाखवले होते...! त्या वेळी कोणती सेना आली होती विरोध करण्यासाठी....!!!

फुलनदेवी महिला नव्हती का ?
फुलन देवी कोणाची मुलगी नव्हती का..??
फुलनदेवी देशाची कन्या नव्हती का..???

काल्पनिक पद्मावती ने आपली लाज वाचवण्यासाठी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारला होता...तर फुलनदेवी ने दुर्गेचे रूप धारण करून आपल्या वर अत्याचार करणाराना यमसदनास पाठवले होते. तेव्हा याच शूर वीर समाजातील एका ने त्या विरांगणे ची हत्या केली होती..

या देशात फक्त विशिष्ट महिलांचाच मान सन्मान आहे का ? काल्पनिक पद्मावती ची अभिलाषा धरणारा अल्लाउद्दीन खिलजी नीच होता तर ते लोक कोण होते ज्यांनी फुलनदेवी वर सामूहिक अत्त्याचार केले होते..?

भारतीय समाज स्वतःला कितीही सभ्य, सुसंस्कृत, महिलांचा सन्मान करणारा असल्याचा देखावा करीत असला तरी आतून हा समाज किती सड़लेला आहे..!! आपल्यासाठी महिलांची मान मर्यादा, महिलांचा सन्मान या संकल्पना फक्त ठराविक जाती धर्मातील महिलांच्या साठी च असतात....
प्रत्येक भारतीय महिलेसाठी नव्हे...!!!!

  खिलजीने चितौड जिंकलं १३०३ साली. त्यानंतर दोनशे सदतीस वर्षांनी मालिक महमद जयासी नावाच्या अवध कवीने पद्मावत नावाचं काव्य रचलं. त्यात चितोडच्या पराभवात ही पद्मिनीची कथा टाकली गेली. पद्मिनीबद्दल कुठेही ऐतिहासिक पुरावा नाही.

 आणि आपल भाग्य अस म्हणाव लागेल की संविधानावर देश चालतो...अन्यथा या धर्माच्या ठेकेदारांनी आपल्या धर्मवार देश चालविला असता...

 

Source: INTERNET
-जयंत जाधव,
लातूर

पद्मावती चित्रपटाच्या निमित्ताने भारतात दोन विषयावर सध्या खूप चर्चा झाल्याचे चिञ दिसून येते.ते विषय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची  अतिशयोक्ती व विशिष्ट जातीच्या स्त्रीयांचा सन्मान.
आज ह्या  पद्मावती मुळे देशात जे काही कायदा व सुव्यवस्थेचा व स्त्री सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला    आहे त्याला तीन गोष्टी दोषी आहेत.वादग्रस्त चित्रपट दिग्दर्शक  संजय लीला भन्साळी,सेन्सॉर मंडळ व स्वघोषित संस्कृती रक्षक संघटना. पद्मावतीच्या इतिहासाच्या फंदात मी पडणार नाही.एखाद्या ऐतिहासिक विषयावर चित्रपट तयार करताना मुळ साच्याला धक्का लागू नये. चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून अलीकडे फालतू स्टंटबाजी,शेरेबाजी करण्याचा नवीन फंडा भन्साळी सारख्या माणसांनी निर्माण केला आहे.तू कर रडल्यासारखे मी करतो मारल्या सारखे.स्वतः आग लावायची व नंतर ती विझवण्यासाठी स्वतः पाणी मारायचे.सेन्सॉर मंडळाचे नियम तकलादू  आहे. राजकीय हेतूने प्रेरीत मंडळावरील नेमणूका,जुने नियम इत्यादी ते मोडकळीस आले आहे.सेन्सॉर मंडळाच्या नियमांची पूर्नरचना झाली पाहिजे.विविध अभ्यासू व्यक्तींना मंडळात नियुक्त करायला हवेत.राजकीय ढवळाढवळ थांबायला हवी. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसावे. पद्मावतीमुळे देशात साधनसामग्रीचे नुकसान झाले त्या सगळ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नावाखाली बोंबलणारा संजय भन्साळी असो की राजकीय लोकांच्या हातातील बाहुले असलेले सेन्सॉर मंडळ असो वा संस्कृती रक्षणाच्या नावाखाली कायद्याला आव्हान देणारे स्वघोषीत संस्कृती रक्षक गुंड असो.



Source: INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद

             पद्मावतीला झालेला विरोध सर्वांनीच पाहिला. इतिहास कसा होता आणि तो कसा दाखवण्यात आला वगैरे गोष्टींशी माझ तरी काहीच देणघेण नाही. पण या चित्रपटाला झालेल्या विरोधातून कुठेतरी एक गोष्ट प्रांजळपणे लक्षात आली ती म्हणजे, आजही ही स्वत:ला एकविसाव्या शतकातली म्हणवणारी पिढी स्त्रियांना एका विशिष्ट चौकटीतच ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. *चित्रपटात एका ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजी फक्त पद्मावती सोबत स्वत:ची कल्पना करतो तर लोकांचा विरोध त्या कल्पनेच्या गोष्टीलाही होतो इथेच आपली स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता किती चुकीची आहे हे लक्षात येते.* पद्मावतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही गोष्ट समोर आली की, पुरुष आजही त्याचा पुरुषी अहंकार मनात बाळगून आहे.
काही चुकल असेल तर क्षमस्व!



Source: INTERNET
-पी.प्रशांतकुमार,
अहमदनगर

...पद्मावतीचा इतिहास पाहण्याआधी आपण थोडा भन्साळीचाही इतिहास पाहू.. देवदासच्या तिसऱ्या रिमेक मधे (आधीचे KL सहगल आणि दिलीपकुमार) निव्वळ TRP साठी मूळ कादंबरीत बदल करून चांद्रमुखी आणि पारूचा एकत्र डान्स घेतला.. सिनेमॅटिक लिबर्टी इथे एकवेळ मान्य करताही येईल
.
पण मस्तानी आणि काशीबाई यांचही एकत्र नृत्य? काशीबाई ह्या एका पायाने अधू होत्या अस बऱ्याच नोंदीत आलेलं असतानाही.. सिनेमॅटिक लिबर्टी की TRP ची लिबर्टी? .. आणि पराक्रमी बाजीराव 'वाट लावली' वर वाचतो?.. ऐतिहासिक सिनेमात नाच-गाणं ठेवायचा अट्टाहास कशासाठी ? ..
... He is a *Typical Bollywood* film director/producer..
.... तो चांगला कलाकार आहे काही चांगले चित्रपट पण दिलेत पण ते कादंबरी/कथांवर..
आता जर हा माणूस शिवाजींवर चित्रपट काढायला गेला तर....?  बापरे विचारही करवत नाही
...
खरतर पद्मावतीचा वाद चित्रपट निर्मात्यांना हवाच होता.. फक्त तो इतक्या टोकाला जाईल अस त्यांना वाटल नाही..
...*बदनाम हुये तो क्या? नाम तो हुआ*.. हे सरळ गणित असत हिंदी चित्रपट सृष्टीत.. फुकटात पब्लिसिटी होते,गाजावाजा होतो..वाद होतात.. चित्रपट चर्चेत राहतो आणि बख्खळ पैसा कमावला जातो.. वादात पडला नसता तर कधी आला आणि कधी गेला समजत नाही

आता राहता प्रश्न करणी सेना आणि त्यांच्या उपद्रवाचा
तर बहुतांश इतिहासकारांच्या मते पद्मावतीची कथा हे एक myth आहे..ती फक्त दंतकथा आहे..
आपण दुटप्पी लोक आहोत ..
खरच...
मी करतो ते बरोबर
इतरांनी तसं केलं तर मात्र चूक..
असो तर पद्मावतीच्या इज्जतीसाठी मानासाठी कोण दंगे करतात तर ते जे स्त्री चा सर्वाधिक छळ करतात

गुजरात/राजस्थानचा  हाच भाग जिथे सर्वाधिक स्त्रीभ्रूण हत्या होतात.. per 1000 सर्वात कमी स्त्री संख्या.. जन्मलेल्या बालकांना (मुलगी) दुधात बुडवून मारतात..अगदी काळ-परवापर्यंत अस व्हायचं..
पडदा पद्धत पाळतात
घराबाहेर लवकर पडू देत नाही
सर्व मार्गाने तिच्यावर अन्याय करताय
आणि आज तेच लोक एका स्त्रीच्या मानासाठी मोर्चे काढतात..

TV वर एकजण तावातावात म्हणत होता अगर यह फिल्म रिलीज हुयी तर आमच्या स्त्रिया थेटर बाहेर जोहार करतील (जोहार=स्रियांनी सामुदायिक सती जाणं)  ..इति करनी सेना

अरे निठल्लो यहा तो तुम कुछ करो ... इथेही बायकांना पुढं करताय...

अरे मुघलांना मुली देऊन/सोयरिकी करून साम्राज्य टिकवलीत आणि तुम्ही पराक्रमाच्या गप्पा माराव्यात
ब्रिटीशांची जी हुजूरी करून आपली राज्य वाचवणारे आज एका काव्यातच अस्तित्वात असलेल्या राणीच्या न झालेल्या अपमानासाठी मुलांच्या बसवर दगडफेक करून, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करून आपल्या शौर्याचे प्रदर्शन करतायत.

थू त्यांच्या जिंदगानीवर...

आणि चार राज्यातील सरकारे त्यांना घाबरून न पाहता बंदी आणतात त्या चित्रपटावर..
खरंतर अशा संघटना बळाचा वापर करून तिथेच शांत केल्या पाहिजे होत्या म्हणजे भविष्यात कुणी समाज कंटक संघटना अशा तोडफोडी करणार नाही वळवळणार नाही.. पण

बाकी मी भन्साळीचा अजिबात चाहता नाही ..देवदास पाहिला नाही आणि नन्तरचे पण…




Source: INTERNET
-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,
उस्मानाबाद

परवाच पद्मावती फिल्म प्रदर्शित झाली, ती प्रदर्शित होण्यापूर्वी झालेला ( मुद्दाम केलेला ) गोंधळ अख्या देशाने पाहीला..
शेवटी व्हायचं तेच झालं, अनेक प्रसंगांना कात्री लावून तो पडद्यावर आणायला परवानगी दिली, यात चित्रपट निर्माते जिंकले की करणी सेना हा मुद्दा गौण आहे. इतिहासात ढवळाढवळ करण्याचा ठेका काही निर्मात्यांनी व इतिहासकारांनी घेतला आहे तसे नसते तर हा वादच उद्भवला नसता, राणी पद्मावती चा इतिहास खरा आहे की खोटा हे सांगण्यात इतिहासकारात मतांतरे आहेत मग आपण कोणत्या तोंडाने त्याचे मूल्यमापन करू शकतो.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विखार पासरावणारी करणी सेना, चित्रपट निर्माते हे दोघेही ठराविक मानसिकतेचे प्रतिनिधित्व त्यावेळी करत होते असं दिसून येतं.
कारण या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वात जास्त शिंतोडे उडवले गेले ते स्त्री च्या कर्तृत्वावर, इथल्या भारतीयांच्या मानसिकतेवर..
स्त्री आमच्या देव्हाऱ्यातील दैवत आहे असे म्हणणारे ठराविक जातीतील, ठराविक धर्मातील व ठराविक प्रदेशातील स्त्रियांना देव मानतात हे या निमित्ताने दिसून आले,
दुसरं म्हणजे देशात पार मुळापर्यंत रोवलेली पुरुषी मानसिकता हि राणी पद्मावती वर झालेल्या टिकेने पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
तिसरं म्हणजे इतिहासात हस्तक्षेप करणं हे आजकाल मोठया निर्मात्यांचा मोठेपणा मिरवण्याचा प्रघात पडत चालला आहे.
करणी सेने सारख्या संघटना म्हणजे कमालीची कट्टरता, द्वेष, हिंसेला खतपाणी पुरवणाऱ्या लोकांचं टोळकं आजही या देशात मोकाट आहेत हे देखील दिसून आलं.
लोकांच्या अस्मितेशी खेळायला काही पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या तथाकथित विचारवंतांना आवडतं हे पण दिसून आलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त आमच्यापुरतं आहे बाकीच्यांना ते नाहीच आशा अविर्भावात लेख, मतं मांडणारी लोकं पण नजरेत आली,
आधुनिकतेचा, नव्या विचारांचा बुरखा घालून भारतमातेला व या भारतीय संस्कृतीचा मानबिंदू असणाऱ्या स्त्रीला शिव्यांची लाखोली वाहणारा स्वतःला उच्च शिक्षित समजणारा ठराविक हरामखोर ( क्षमा असावी ) लोकांचा गट पण या समाजात मोठया दिमाखात नांदतो हे ठळकपणे जाणवलं.

( काहि शब्दप्रयोग नाईलाजाने करावे लागले आहेत त्याबद्दल क्षमा असावी, वरील विषयावर बरीच मतांतरे आहेत त्यामुळे काही आक्षेप असू शकतात त्यावर मला वैयक्तिक सांगून चूक सुधारण्याची संधी द्यावी ही विनंती )


Source: INTERNET
-अभिजीत गोडसे,
  सातारा

       आपल्याकडे कोणत्याही इतिहास कालीन घटनांनव फिल्म निघणे ही चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल . कारण भारताला व त्यातील राज्यांना समृद्ध असा इतिहास लाभला आहे . या इतिहासाची माहिती , घटनाक्रम पुढील पिढीला माहिती होणे हे अत्यंत महत्त्वाचेच आहे .

        कोणताही  इतिहासावर भाष्य करणारा सिनेमा जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा फक्त त्या दिरदर्शकाची मेहनत असते असे नव्हे तर त्या मागे हजारो जनांचे हात कामाला लागलेले असतात. त्यांची मेहनत , श्रम , पैसा , वेळ घालवलेला असतो. पुन्हा हा सिनेमा चालेले की नाही , सिनेमाची जहिरात वगैरे वगैरे असे बरेच प्रश्न त्यांच्या पुढे असतात . असो . चिञपट आणि वाद हे  आपल्याकडे नविन नाही अगदी १९३२ साली मास्टर मिसार हा मुस्लिम कलावंत आहे. म्हणून त्यांने सुरदासाची भूमिका करु नये इत पासुण ते आत्ताचा पद्मावत पर्यत सर्व काही वाद आपल्याकडे होत असतात . अलिकडचे  मराठीतील झेंडा , शिक्षणाचा आयचा घव तसेच हिंदी मधील अलिकडचे उडता पंजाब , बाजीराव मस्ताणी , लिफ्टीक अंडर माय बुरखा , इंदू सरकार आसे खुप वाद झालेले सिनेमे आहेत . ८० वर्षीचा इतिहास आहे या चित्रपट आणि वाद यांना.  मुळातच पद्मावतीचा इतिहास हा ७०० वर्षी पुर्वीचा आहे . ही राजस्थान या राज्यातील  'माता' असे मानले जाते .पद्मावती होती की नव्हती यावर अजून सुद्धा ठोस असा पुरावा नाही. राजपुत करणी सेना यांनी या सिनेमावर अक्षेप घेतला. का तर म्हणे आमच्या माताचा अवमान त्यामधे दाखवला आहे . आमच्या माताचे आणि अल्ला उल्दीन खिलजी यांचे प्रेम संदर्भ रंगवले आहेत . मुळात कोणत्याही सिनेमा मधे ऐक कला म्हणून पहायला हवा . काही गोष्टी प्रत्येकक्षांत नसल्या तरी थोडाफार ऐक अभिनेत्यांच कौशल्य म्हणून आणि सिनेमा चालावा म्हणून अशा घटना, प्रंसग दाखवणे दिरदर्शकाला भाग पडते . आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहेच की ..आपल्याकडे कसे संभाजी मालिका मधे संभाजीनी ऐवढी मोठी गदा उचलली असे दाखवले आहे . पन पत्यक्षात हे शक्य नाही . सामान्य माणुस ऐवढी मोठी गदा उचलने शक्यच नाही .. परंतु असे थोडे फार दाखवावे लागते मालिका बगायला रंगत वाढते संभाजीन प्रती आदर व्यक्त होतो ...असो...असेच काहीसे सिनेमा मधे ही आसतेच ...इतिहास कालीन सिनेमे बनवताना इतिहासात समजावून घेण्यासाठी दिरदर्शक कथा , कादंबरी आभ्यासतात ... मुळात  कादंबरी या तर ईतिहासाची मोडतोड करुण बणवलेल्या असतात ... आणि बरेच इतिहास कालीन सिनेमे अशा कांदबरीवर आधारित असतात... यामुळे मग पुढे अशा प्रकारचे वादंग निर्माण होतात . अलिकडे दिरदर्शक सुद्धा जाणुन भुजून सिनेमा बनवताना इतिहासांचा विपर्यास करततात की काय ? या बद्दल शंका येते कारण असा थोडा फार मजकूर स्टोरी मधे घुसळायचा आणि टि. आर. पी  मिळवायचा असे बरेच सिनेमा मधे अलिकडे पहायला मिळते . सिनेमा येण्या आगोदरच प्रसिद्धी घेयाची हाच नविन ट्रेड पहायला मिळत आहे.

           या पद्मावतीला सेन्सॉर बोर्डने काही अक्षेपहार्य  मजकूर वगळून म्हणजेच ३०० वेगवेगळे  बदल करुन परवानगी दिली ,  पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली तरी सुद्धा अस्मितेच्या नावा खाली फुटकळ रजपुत सेना, संघटना फोफावली आणि घालायचा तो गोंधळ घातला सर्वीच्च   न्यायालयाने परवानगी देऊन सुद्धा ही संघटना धुमाकुळ माजवत होती ..शंका येते या माघे काही राजकीय हात आहे काय ?  काल परवा पर्यत या संघटनेला कोणी ही ओळखत सुध्दा नव्हते ती संघटना सर्वीच्च न्यायालयाचा आदेश पाळत नाही ही खेदाची बाब आहे . सेन्सॉर बोर्डने येवढे सर्व भाग कट करुन सुद्धा ही सेना विरोध करत होती ..भौतेक येणाऱ्या लोकसभा , विधानसभा याची तयारीच चालली असनार या संघटनेची ....तिकडे राजस्थान मधे उच्च वर्गीय लोक देश विदेशात आहेत आणि येथे राहणारे हे तरुण युवक  अस्मितेच्या नावा खाली तोडफोड करत आहे . तिकडे राजे राजवाडे हे ऐतिहासिक आहेत तिथे पर्यटक छोटी कपडे घालून येतात हे चालते , राजस्थान मधे उच्च वर्ग माँडर्न कपडे घालतात  कोणिही राजस्थानी पोषाख घालत नाही ....आणी बिनाकामाची या तरुण संघटनांना  दिपीकाची कंबर दिसते हे वौशिष्ट म्हणावे लागेल .

       महत्त्वाचे म्हणजे  सर्वोच्च न्यायालयाने पद्मावतीला परवानगी देऊन सुद्धा  चार - पाच राज्यात धुमाखुळ घातला या सेनेने आणि कोणी सुद्धा राजकीय व्यक्ती बोलायला तयार नाही ..हे सर्व मतानंसाठी  आणि निवडणूक  डोळ्यासमोर ठेऊन केले की काय असे म्हणायला वाव आहे . ऐकवीसाव्या शतकात आपण जात असताना स्वताःला महासत्ता बनवत  असताना सुजान नागरिकांनी या आजूबाजूला होणाऱ्या किंवा घडवत असलेल्या घटना डोळसपने पाहने महत्त्वाचे आहे..


Source: INTERNET
-रविराज आकोसकर,
लातूर

पद्मावतीच्या संदर्भात जो काही देश पेटला त्याला फक्त फितूर लोकांचा शहाणे  पणा कारणीभूत आहे.इतकी तीव्र भावना भडकावून त्यानी त्यांचं ध्येय पूर्ण केल असच म्हणाव लागेल.भारतातला लाभलेली संस्क्रुति एका पिक्चर साठी पणाला लागली आणी ती बेचिराख पण झाली ..अत्यंत घाणेरड्या युक्त्या वापरून समाज भावना ठेचल्या आणी हवं ते मिळवलं..आता यात निर्मात्यांनी किती भर घातली हे लक्षात घेणं गरजेचं....


Source: INTERNET
-समीर सारगे,
नेर
जि यवतमाळ

हल्ली वादग्रस्त चित्रपट बनविन्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. एखाद्या समाज जीवनावर, इतहासा वर चित्रपट बनवायचा आणि त्याला  विरोध प्रदर्शना द्वारे आपोआपच अमाप प्रसिद्धि मिळवून द्यायची असे काही चित्र अलिकडील काळात पहावयास मिळत आहे. प्रख्यात दिग्दर्शक  संजय लीला भंसाली याचा पद्मावती हा चित्रपट रिलीज व्हायच्या आधी पासुनच वादाच्या भोवर्यात सापडलाआता  चित्रपटाचे मूळ नाव बदलून पद्मावत करण्यात आले असले तरीही सत्यता आणि इतिहास बदलू शकत नाही. असो, वादाचे  मुख्य कारण होते पद्मावती नावाच्या एका  राजपूत (स्त्री)राणी पद्मवतीचे क्रूर शासक अल्लाउद्दीन खिलजीशी प्रेम संबंध दाखविन्यात आले आहेत. अलाउद्दीन खिलीजी किती उदार होता, किती दानशूर होता , किती प्रेमळ आणि पूजनीय होता हे दखविन्याचा केविलवाना प्रयोग या दिग्दर्शकला कारायचा आहे का?  वास्तविक पाहता  इतिहास वेगळाच आहे. राणी पद्मवतीने कधीच खिलजिला आपल्या अंगाला स्पर्श करु दिला नाही. उलट अलाउद्दीन खिलजी जेव्हा चित्तौडगड़ावर आक्रमण केले तेव्हा शेकडो स्त्रियांनी  स्वताला जालून घेतले कोणी विहिरी मध्ये उड़ी घेऊन स्वताला जल समाधी दिली. कितीतरी पुरुष, स्त्रिया ,लहान मुले , याची सर्रास कत्तल करणाऱ्यां खिलजिला संजय भंसाली हीरो दाखवत आहेत , इतिहासाची मोडतोड़ करून केवळ मनोरंजन म्हणून चित्रपट काढून भारतीय प्रेक्षकांच्या समाज मनावर यांना क़ाय बिम्बवायचे आहे. मग या माध्यमातून होणाऱ्या  विरोध आणि त्यातुन निर्माण होणाऱ्या हिंसेला बळी पडणारी निष्पाप जनता , सार्वजनिक मलमत्ताचे होणारे नुकसान , कायदा व सुव्यवस्था चा निर्माण होणारा प्रश्न या सर्वाला जबाबदार कोन ? या चित्रपटाच्या प्रदर्शना च्या आधी करणी सेनेने  घेतलेल्या हिंसक प्रवुत्तीला चित्रपट गृह मालकानी चित्रपट दाखवीन्यास नकार  दिला परंतु  ज्याणी  विरोध दर्शविला त्यांचे नुकसान त्यांना सोसावे लागले. आता पद्मावत चित्रपटाने 100 कोटी रूपयाचा गल्ला ज्मवल्यावर चित्रपट निर्माते संजय लीला भंसाली याला कंठ फूटने स्वाभाविक आहे.

आणि आता त्याला अभिव्यक्ति स्वतंत्र्याची आठवन वैगरे ती याच प्रकारची आहे पूर्वीच्या तत्कालीन सरकारने एक विशिष्ट समाजाच्या हिंसक दाबावाला बळी पडून पुस्तकावर ,चित्रपटावर, व्यक्तिवर  बंदी आणली तेव्हा या भंसाळीचे तोंड उघडले नाही तेव्हा याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य वैगरे धोक्यात आले नाही. म्हणजे जाणून बुजुन अशे चित्रपट कढायाचे आणि त्याला विरोध झाला की मग आमचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात आहे म्हणून गळा फाडून ओरडायचे आणि सरकारला देखील आपल्या सडक्या मान सिकतेच्या जोरावर गुन्हेगार ठरवून टाक़ायचे अलीकडे 'सेक्सी दुर्गा ', 'बाजीराव मस्तानी'अश्या वाहियाद प्रकारचे शीर्षक देऊन चित्रपट प्रकाशित झाले, तिथेही वाद उतपन्न झाला तेव्हा या हरामखोर आणि मुजोर असलेल्या या दिग्दर्शक कंठ फाडून माध्यमान समोर ओरडू लागला की माझ्या अभीव्यक्ति स्वतंत्र्या वर आघात होत आहे. मला चित्रपट बनवन्यचे देखील स्वातंत्र नाही या मुद्याला  काही वामपंथी  भाड़ोत्री मीडिया न्यूज़ चैनल ने अमाप प्रसिद्धि दिली आणि सरकारच्या विरोधात रनशिंग फुकण्याचे काम केले मग जेव्हा विरोध तीव्र झाला तेव्हा  खुलासा करण्यात आला की या चित्रपटात अशे काहीच नाही ज्याने एका धर्माची वा समाजाची बदनामी होईल , त्या चित्रपटात  नायिका एका वाहनाला लिफ्ट मागते आणि त्यात तिच्यावर  झालेल्या अतिप्रसंग व अत्यचारा विरोधात ती कश्या प्रकारे प्रतिकार करते यावर तो चित्रपट आहे. मग  या चित्रपटात काही सेक्सि दृश्ये नसताना या नक्षली मानसिकतेच्य नालायक दिग्दर्शकला चित्रपटास  सेक्सी दुर्गा हेच नाव का द्यावेसे वाटले ? त्यात  तो एखादे दूसरे नाव देऊ शकला असता  ,शूरवीर दुर्गा , सहनशील दुर्गा , पराक्रमी दुर्गा  वैगरे पन नाही . सडक्या डाव्या विचार सारणीच्या मान्सिकते शी प्रेरित असलेली ही पिलावळ  त्यांच्या कडून दूसरी कोणती अपेक्षा  करु शकतो!

दूसरे म्हणजे शुर पेशवा बाजीराव यांच्या जीवनावर , त्यांच्या शौर्यावर , पराक्रमावर चित्रपट काढण्या एवजी हे नतद्रष्ट  शहरी नक्षली बाजीराव व  मस्तानी यांचे प्रेम प्रकरणवार चित्रपट काढतात आणि भंसाळी ची हीच मानसिकता होती  म्हणजे इतिहास ईतका विकृत आणि विद्रुप करुण माडण्याचा प्रयत्न करतो की बघता क्षणी अपल्याला लाज वाटेल ,  हेच या शहरी नक्षल्यांचे काम आहे , स्वताला स्त्रीवादी म्हनवनाऱ्या संजय लीला भंसाळी याची ही व्याख्या आहे का स्त्रिवदाची ? यावरून डाव्या सडक्या विचारसरणीच्या दिग्दर्शकाना लढ़व्या ,पराक्रमी वीर योद्धाप्रति असलेल्या  इतिहास सोडून  असले शीर्षक (Title) देऊन  चित्रपट खपवत आहेत.

या देशाला लाभलेला गौरवशाली इतिहास मलिन करण्याचे आणि देशाच्या अस्मितेला मातीत घालण्याचा हे षड्यंत्र सद्या जोरात सुरु आहे.

आणि यांच्या असल्या कृत्याला काही बेरोजगार असलेले अभिनेते व अभिनेत्री समर्थन करतात
जेने करून एखाद्या चित्रपटाचे दान आपल्या पदरात पडेल व आपली बेरोजगारी दूर होईल, म्हणून ही घानेरडी वक्त्वये केली जातात.
 यांच्या म्हनन्या नुसार  संजय भंसाळी ने चित्रपटा मध्ये जोहर दृश्य दाखवायला नको होते , बलात्कारा नंतर ही स्त्रिला आयुष्य असते की नाही, की तीने संपूर्ण आयुष्य योनिचे पावित्र्य , संरक्षण , आणि स्वताच्या प्राणांची आहुती यातच  राखन्यात खर्च करायचे. म्हणजे खिलजिला स्पर्श नको म्हणून राणी पद्मावती सह हजारो राजपूत स्त्रीयानी जे संकट आले यातन्या झाल्या त्या निमुटपने सहन करावे ,भोगावे , स्त्रिच्या सक्षमी करणाची याहून घानेरडी व्यख्या दूसरी क़ाय?   जी व्यक्तिमत्वे महान असतात त्यांचे आकलन सर्वसमान्याना होत नाही त्यांचा एकेक पैलु विशाल व महान असतो तेव्हा , कलावंत, विचारवंत, आणि बुद्धिवंताची गरज भासत असते  आणि ज्यांच्या कड़े ही विचारसरणी आणि विवेकबुद्धि असेल तोच खरा  कलाकार ,विचारवंत आणि बुद्धिवादी असतो. यात भंसाळी सारखे नक्षली मुळीच बसत नाही.



Source: INTERNET
-निकिता गडाख
अहमदनगर

एक वेळेस आकाशाला सीमा असू शकतात पण माणसाच्या कल्पकतेला नाही_* . पद्मावती हा सिनेमा आहे हे लोकांना माहीत असून सुद्धा त्यांनी त्याला विरोध दर्शवला आणि कदाचित त्याना माहीत ही असेल की सिनेमा म्हणजे काय...जर सिनेमाच्या माध्यमातून लोकांना इतिहासाबद्दल कळत असेल तर त्यात वाईट काय? खर तर मलाही माहती नव्हते की पद्मावती नावाची कुणीतरी राणी होऊन गेलेली आणि असे अनेक लोक असतील कदाचित त्याना पण माहित नसेल पण चित्रपटा मूळे कळले असेल आणि राहीला प्रशन ज्या लोकांना असे वाटतय की आपला इतिहास बदलाय वैगरे तर ज्यांना खरच माहीती करून घायची आहे ते कादंबरी वाचतील की...एखादा दोन ते तीन तासाचा सिनेमा जेंव्हा पडद्यावर येतो त्यामागे प्रचंड मेहनत पेसा असतो(मी तर असे ऐकले की रणवीर सिंग ला त्या रोल मधून बाहेर येण्यासाठी पाच महिने psychiatrist कडे उपचार घ्यावे लागले)....बघणार्याला  फक्त ग्लॅमर्स वाटत त्यामागे किती कष्ट घेण्यात आले असतील याचा पण विचार करावा...तो सिनेमा फेमिनिस्ट होता म्हणून पण विरोध करू शकतात...जर तुम्हाला विरोध करायचाच असेल तर पोरोनिग्रपिक साईट्स ना करावा भारता मध्ये सर्वे नुसार 18 च्या आतील मुलांनि पॉर्न फिल्म बघणाऱ्या मुलांनाच प्रमाण 94% आहे मग ही बातमी जेंव्हा पेपर ला अली तेंव्हा काय सगळे झोपलेले होते का...तेंव्हा का कुणी विरोध केला नाही...भारतच झालेलं कसे आहे राजकारण करता करता काय आपल्या साठी चांगलं आहे आणि काय वाईट हेच विसरून चाललेत फक्त सत्ता हवी...
पद्मावती ला विरोध झाला त्यामागे राजकारण होतो नव्हतं माहीत नाही पण फिल्म ची पब्लिसिटी मात्र झकास झाली मूवी ब्लॉकबस्टार झाली एवढा विरोध होऊन सुद्धा....सगळ्या जगाला आपल अभिव्यक्त स्वतंत्र बघायला मिळाले.... (social networking साईट्स वरून कळेलच असेल ).
      
              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************