ही पाळी महिलांना त्रासदायक का?पॅडमॅनच्या निमित्ताने
🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून
"ही पाळी महिलांना त्रासदायक का?पॅडमॅनच्या निमित्ताने"
Source: Internet
-रविराज आकोसकर, लातूर
मासिक पाळी ही नैसर्गिकरीत्या महिलांना येते.शरीर व त्याच्या क्रिया व्यवस्थित चालवायला पाळी ची मदत होते..पण दुर्दैवाने समाजात खूप गैरसमज आहेत पाळी विषयी.
मुख्य कारण -त्या विषयाबद्दल कोणी मन मुक्त बोलू नाही शकत आणी लाज संकोच या मुळे हे गैरसमज भयंकर वाढत गेले.त्या मुळे महिलांना भीती पण वाढत गेली॥ आणी मग नाही नाही ते महिलांच्या वाटेला येऊ लागले..
आता पाळी का त्रासदायक??
तर महिलांना प्रवासात किंवा ऑफीस मध्ये काही ऑप्शन्स नाही उरत आणी त्या निमुट पणे स्वतःला सावरताना दिसतात..पण या आधुनिक काळात नक्कीच या विषयी प्रबोधन होईल ही आशा आहे ..
आपण पण नागरिक म्हणून यात थोडं योगदान देऊ शकतो ..आणी हे गैरसमज सम्पवु शकतो ..
लिहिताना भावना दुखावले असतील तर माफी असावी..
Source: internet
-अभिजित गोडसे,सातारा
पहिल्यांदाच आपल्या समाजात महिलाच्या "पाळी" या संवेदनशील विषयावर बोलल जाताय . त्याला निमित्त आहे अक्षय कुमारचा सत्य घटनेवर आधारलेला भहूचरर्चीत चिञपट "पँड मँन" हा चिञपट पद्म पुरस्कार भेटलेले "मुरूगनाथम" यांच्या आयुष्यवर आहे. आर . बल्की दिग्दर्शक हे अनेक चांगले चित्रपट देत असतात . असाच ऐक सामाजिक चिञपट देऊन समाजातील महिलांच्या पाळी या विषयावर समज - गैरसमज दुरकरण्यासाठी , या विषयावर चर्चा होते आहे. आणि या संपूर्ण विषयावर अक्षय कुमारने शिवधनुष्य पेलल आहे. समाजातील अशा संवेदनाशील विषयाला हात घातला . सुदैवाने याला कोणीही विरोध केला नाही . या विषयावर लोक बोलते होत आहेत .यासाठी प्रथम "पँड मँन" ची संपूर्ण टिम कौतुकास पाञ आहे.
मुळातच पाळी या विषयावर आपल्याकडे बोलायच म्हणजे जणू काही मोठा गुणाच करत आहे .किंवा शेलक्या शब्दांत सांगायचं झाल तर नालायक , घानेरडा व्यक्ती असे सहज बोलल जात .किंबहुना असा समजच आहे आपल्याकडे . घरात , शाळेत , काँलेज तसेच समाजातील ऐकूनच सर्वच विभागात कोणीच उघड- उघड बोलताना दिसत नाही .अशी चर्चा , ऐकादे लेक्चर किंवा कार्यक्रम या विषयावर आहे असे काही कुठे आयकल नाही. आणि हीच तर आपली शोकांतीका आहे. वर्षीनुवर्षे चालत अलेल्या रुढ प्रता आपण पुढच्या पीढीत सुद्धा रुजवत आहोत. मासिक पाळीचे ते चार - पाच दिवस त्या स्त्रीला हीन वागणूक देणे तिला धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही , घरात ऐकादे शुभ कार्य असेल तर सहभागी होऊ दिले जात नाही तसेच घरातील किचण , देवघर , अन्न , विशिष्ट वस्तू अशानां स्पर्श कुरु दिला जात नाही . ऐवढच काय तर तिला सरळ सरळ त्या दिवसात बाहेर झोपण्यास सांगितले जाते . किंवा खोलीत कोंडून ठेवले जाते. अतिशय वाईट अशा प्रथा ,परंपरा आपल्याकडे पूर्वी पासून चालत अलेल्या आहेत . अशा घटना घडत असताना त्या स्त्रीला काय यातना भोगाव्या लागतील याची कल्पना करने अवघडच . ऐकिकडे देश प्रगतीपतावर जात असताना स्त्रीया आणि ऐकूनच समाज अशा अविचारी प्रथामधे आडकुण पडला आहे. हे खेद जणक आहे. ज्या मासाकि पाळी मुळे तुम्ही -आम्ही जन्माला आलो त्याच गोष्टीसाठी नाव ठेवली जातात. संपूर्ण पृथ्वी तलावर ऐकमेव सुंदर आणि आनंददाई काय असेल तर "ऐकाद्या स्त्रीने बाळाला जन्म देने". त्यासाठी प्रथम पायरी असते ती म्हणजे "पाळी" आणि याच पाळी साठी तिला "त्या" दिवसात हिन वागणूक दिली जाते . आणि महत्त्वाचे म्हणजे तिला सुद्धा आता या सर्व गोष्टीची सवयच झाली आहे . बरेच देशात "प्रथम पाळीचे" जोरदार स्वागत केले जाते . पेढे वाटून , केक कापून , तिला वधु असल्यासारखे सजवूण तसेच पै- पाहुणे बोलावून स्वागत केले आजे . पण आपल्याकडे जेवढी घाणेरडी प्रथा आहे तेवढी किंबहुना दुसरीकडे कोठेच नाही . यासाठीच पँड मँन आला.
"पाळी आणि स्वच्छता" हे खुपच महत्त्वाच आहे. कारण महिलांन मधे स्वच्छता "त्या" काळात नसल्यामुळे अनेक आजारांना , व्याधीनां सामोरे जावे लागत आहे . अनेक महिला मळलेले कपाड , राख , माती अशा वस्तूचा वापर करत असातात असे दिसुन आले आहे . बाजारात मिळत असलेले "पँड" घेण्यासाठी परवड नसल्यामुळे बरेच जन अशा वस्तूचा वापर करत आहेत . ग्रामीण आणि अदिवासी भागात लहान मुली आणि स्त्रीया अशानां पाळी आणि स्वच्छता या विषयावर माहिती नसल्यामुळे कशाचाही म्हणजेच कोणत्याही कापड किंवा वस्तूचा वापर करतात अणि आजाराला सामोरे जातात . ऐवढच नव्हे तर शहरी आणि स्वतःला उच्च शिक्षीत म्हणूऊन घेणाऱ्यान मधे ही अस्वच्छता असते . त्या सुद्धा प्रथा परंपरा पाळत असतात .
आपल्याकडे या विषयावर असंख्य सारे प्रश्न आहेत . ते कमी करण्यासाठी पँड मँन सारखा चिञपट मदत करत आहे . लैंगिकता हाच विषय महत्त्वाचे म्हणजे कोणी बोलत नाही . ठराविक वयात आल्या नंतर मुलाला किंवा मुलींना त्याच्या आई वडीलांनी त्याच्यात होत असलेले बदल सांगणे गरजचे आहे . बरेचदा मुली मोठ्या झाल्यावर सुद्धा मासिक पाळीची त्यांना पूर्णतहा माहिती नसते. तसेच आपल्याकडे शाळेत या विषयावर शिकवणे खुप महत्त्वाचे आहे . २००० साली आठवी आणि नववि वर्गात या विषयावर सहा महीण्याचे कोर्स घेतले गेले. पन मुळात शिक्षकच असे विषय बोलायला कचरत होते. त्या पुढे विद्यार्थी काय बोलनार . घरात शिक्षण मिळत नाही शाळेत शिक्षण मिळत नाही तर ही लहान मुल - मुली समाजात या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि चुकीची माहिती मिळवून तसेच समज - गैरसमज मनात कोरुन बसतात . देशात पाळी आणि स्वच्छता या विषयावर काम करणारे बरेच जन आहेत . महाराष्ट्राचा विचार केला तर माझ्या माहिती नुसार पुण्यातील "प्रवीण निकम" हा तरुण तसेच चंद्रपूर मधे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे यांची सून "पल्लवी आमटे" हे बरेच वर्षे झाली मासिक पाळी वर काम करत आहेत जनजागृती करत आहे . प्रवीण यांनी आपली रोशणी ही संस्था काढून त्या द्यारे त्यांच काम करत आहेत . तसेच पल्लवी या अदिवासी भागा मधे मोठ्या प्रमाणात काम करत आहेत . सोमनाथ कँम्प चंद्रपूर मधे त्यांचे मासिक पाळी विषयावरचे अनुभव कथन करत असताना आनंदवन मधील "विशेषमुली" यांचे काय परिस्थिती असते सांगितले होते. अक्षरश मासिक पाळी शाप आहे की वरदान असे वाटले होते . आपल्या महाराष्ट्र सरकारने नुकतीच ऐक "अस्मिता योजना" घोषीत केली आहे . जागतिक महिला दिनापासून ही योजना चालू होणार आहे . ग्रामीण भागात ११ ते १९ वयोगटातील मुलींना "सँनिटरी नँपकीन" फक्त पाच रुपयात उपलब्ध करुण देणार आहे . तो ५० ते ६५ रुपये मधे मिळतो. अशा मुळे आरोग्य आणि स्वास्थ चांगले राहण्यास मदत होणार आहे .मुलींच्या शाळाचा ही प्रश्न आहे " या" चार पाच दिवसात वर्षीतील ५० दिवस त्यांना शाळा बुडवावी लागत आहे . या सर्व प्रकारे विचार करुन शासनाने चांगला निर्णय घेतला आहे . आशाचे प्रकारे बाकीच्याही राज्यांनी नँपकेन देऊन त्यावर विशेष सुट द्यायला हवी.
या "पँड मँन" चिञपटामुळे नक्कीच या संवेदनाशील विषयाची चर्चा चालू झाली आहे . २००१ साला पासून "अरुनाचलम मुरुगानंद्म" हे या विषयावर काम करत आहेत . न लाजता , न लपता , कितीही संकटे आली असताना सुद्धा ते या विषयावरुन माघे सरकले नाहीत . हाच धागा पकडून आपणही या विषयाला गांभिर्यपणाने घेतले पाहीजे.
_मदर स्ट्राँग, सिस्टर स्ट्राँग , वायफ स्ट्राँग द्यान ओपनली कंन्ट्री स्ट्राँग_

-जयंत जाधव,लातूर
मासिक पाळी ह्या विषयाबाबतीत भारतात अजूनही ग्रामीण व शहरी भागातही बरेच गैरसमज आहेत.पॕड मॕनच्या निमित्ताने ह्या विषयावर चर्चा सुरु झाली ही अतिशय चांगली गोष्ट आहे.मासिक पाळी हा विषय निघाला की डोळ्यासमोर फक्त स्त्री दिसते.पण पुरुषांची पण जबाबदारी येते ना.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याविषयाचा आणी पुरुषांचा काय संबंध ?
निसर्गाने प्रत्येकाला काही वेगवेगळ्या वैशिष्ट्ये देऊन निर्माण केले आहे.मासिक पाळी हा विषय निश्चितच स्त्रीला एक विशेष पणा देऊन जातो.आज जगामध्ये एखाद्या स्त्रीला मातृत्व येणे-आई बनने हा एक विलक्षण असा आनंद आहे.हा आनंद लाभतो तो मासिक पाळी मुळे मग ही मासिक पाळी किळसवाणी अथवा ञासदायक कशी असू शकेल?
एक वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता नात्याने मला आलेला एक अनुभव येथे आपल्या सोबत व्यक्त करत आहे. २०१४ मध्ये मी एका सामाजिक संस्थेत प्रकल्प समन्वयक म्हणून काम करत असताना संस्थेच्या हाॕस्पिटलमध्ये एक नर्स काम करत होती आणि एक दिवस तिच्या वागण्यात अचानक बदल झाला होता. तीला पिरियडस् सुरु झाले होते . तिने औषधी दुकानात जावून स्वच्छतेच्या कपड्याची सॕनिटरी पॕडची विचारायला लाज वाटली आणि त्या वेळी वयस्कर मावशी कोणीही सोबत नव्हते.अशा वेळी मी समस्या ओळखली आणि सॕनिटरी पॕड परिचारिकेला आणून दिले. तिला एक मानसिक आधार दिला. अशावेळी गप्प राहणे सोडून दिले आणि या विषयावर बोलता झालो.नंतर या घटना माझ्या बरोबर बरेच वेळा घडल्या आहेत.एक पुरुष म्हणून मी माझी भूमिका व कर्तव्य ओळखले व पार पाडले.आज प्रत्येक पुरूषांकडून अशीच अपेक्षा करतो.घरातील महिला पुरुषांसोबत या विषयावर बोलायला लाजत-शरमत असतील तर पुरुषांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासोबत मोकळे बोलले पाहिजे.
या काळात महिलांचा आहार, स्वच्छता या विशेष काळजी घेण्याचे काम पुरुषांचे आहे. तसेच महिलांना काही त्रास असल्यास, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणे, त्यांची तपासणी करणे हीदेखील पुरुषांची जबाबदारी आहे. जोपर्यंत पुरुष स्वत: आपली जबाबदारी, आपला भूमिका ओळखून ही गप्प राहण्याची सवाय सोडणार नाही, तोपर्यंत याविषयी जगजागृती होणे अशक्य आहे. आतापर्यंत दुर्लक्षित झालेला पण आज आवश्यक आहे हा पुरुषांचा कल. हा अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येकाने तो ओळखावा.
ह्या विषयावर कु.स्नेहल चौधरी संचालित आमची सामाजिक संस्था "क्षितिज फांऊडेशन" वाशिमयांनी एक मोहिम सुरु केली आहे #bleed the silence,मी संस्थेचा लातूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून स्वच्छता माहवारी प्रंबंधन मासिक पाळी यावर जनजागृतीचे काम करत आहे. Please change this red days in to green days.
Source: Internet
-समाधान गजरे
मित्रहो....
जरा स्पष्टच बोलतो;
मी दहावीत होतो त्यावेळेस, ओठाच्या वर नुकतच मिसरूड फुटलं होतं, थोडंस कळायला लागलं होतं,पण का कोणास ठाऊक अति शहाणं झाल्यासारखं वाटत होतं....
तसा हुशार होतो मी,प्रेम ही भावना चांगलीच जागृत झाली होती, कधीतरी tv आणि picture बघण्याचा योग् येत होता म्हणून प्रेम ही भावना वाडीस लागली होती; आणि तसा ट्राय सुदधा मारत होतो....
बहुदा शारीरिक आकर्षणच होत ते...
एक दिवस वर्गात एक विचित्र प्रसंग घडला;आणि विशेष म्हणजे तो आमच्या नजरेस पडला;आणि मग आमचा ग्रुप तो बघून फिदी फिदी हसू लागला....
झालं काय होतं; तर एक मुलगी वर्गातून बाहेर चालली होती;ती स्वतः ला लपवत चापून चुपुन बाहेर निघाली होती पण शेवटी एक गोष्ठ आमच्या नाठाळांच्या नजरेतून सुटली नाही ती म्हणजे त्या मुलीचा परकर माघून ओला झाला होता;ती मुलगी खूप गोंधळली होती आणि ती लपत लपत एका हाथाने परकर सावरत घरी निघाली होती आणि हे सर्व पाहत आम्ही स्वतःला शहाणं समजत तिचा मजाक उडवत होतो....
काही दिवस गेले;मी वर्गात हुशार होतो ...कितीही मोठं उत्तर असू द्या माझं ते तोंड पाठ असायचं
दहावीचा शेवटचं काही महिने होते.. एक दिवस संधर्भा सहित स्पष्टीकरणाचा प्रश्न सरांनी मला विचारला...
तो अगदी तोंडं पाठ होता माझा..
पण मी
काय झाले कोणास ठाऊक
एक विचित्र प्रकारचा आवाज माझ्या तोंडातून निघू लागला...
सर्व मुलं मुली
माझ्याकडं बघून हसू लागली..
मलाच कळत नव्हतं नेमकं काय घडतंय ते....
आवाज फुटून जरा विचित्रच झाला होता, माझीच मला लाज वाटत होती....
मी आपला लहान आवाजाच्या पट्ट्यात बोलू लागलो..
शारीरिक बदलाची त्यावेळेस कल्पना नव्हती ....
बारावीत आल्यानंतर मानसशास्त्र या विषयात या बाबत डिटेल अभ्यास करावयास मिळाला आणि तेव्हा कळलं मासिक पाळी म्हणजे काय ते...?
ती मुलगी मधूनच घरी का गेली..?
ते अगदी 2 वर्षाने समजले...शहरी भागात ठीक आहे पण ग्रामीण भागात याची जागृती करणे गरजेचे आहे...
आज ही येथे महिला व मुलींना घरा बाहेर बसवले जाते ते ही 5 दिवस...
तिला स्पर्श ही केला जात नाही...
तिच्याच हाथचे खाल्ले जात नाही...
आज ह्या गोष्टी विसरून या मागचे शास्त्र समजावून देने गरजेचे आहे...
मासिक पाळी हे नैसर्गिक आहे हे वयात यायच्या आधीच दोन वर्षे मुलींना कळलं पाहिजे...
तरच प्रभोदन होइल...

-अनिल गोडबोले,सोलापूर
तर मुळात पाळी हा शब्दच मला खटकतो. लहान पाणी आईला कावळा शिवला अस सांगितलं जायचं... कावळा शिवला तर 3 दिवस बाहेर का बसायचं?.. या प्रश्नाचं उत्तर अस मिळायचं की...अजून तू लहान आहेस.. मोठा झाला की कळेल हळूहळू..
त्या नंतर असाच एक प्रसंग.. आठवी मध्ये होतो तेव्हा हायस्कूल मध्ये आरोग्य तपासणी शिबीर होते.. आणि कोणीतरी अफवा उठवली की डॉक्टर "ती" जागा तपासत आहेत. मुलगे असून आम्ही खूप टेन्शन मध्ये होतो आणि एक मुलीला चक्कर आली... त्या नंतर आम्हाला काहीं कळायच्या आत रांगेत 5 ते 6 मुलींना चक्कर आली.. कारण चक्कर आलेल्या मुलीला डॉक्टर तपासत नव्हते.. दोन दिवसांनी अस कळलं की ज्या मुलींना चककर अली होती त्यांना "मासिक पाळी" चालू होती... अजून डोक्यात विचार सुरू झाले... मग आमच्यातल्या एक माहितगार मित्राने अस सांगितलं की " बाई शरीरात घाण रक्त तयार करते आणि ते नंतर 3 दिवस बाहेर पडते" म्हणून ते देवाला चालत नाही त्या काळात बाहेर बसवच लागत...."
त्या नंतर आमच्या गावात एक जोडप होत ज्यांना 8 वर्ष लग्न होऊन मुलं झाली नव्हती.. आणि त्या बाईला देवाने याची शिक्षा दिली होती।की.. ती एकदा बाहेर बसलेली असताना देवघरात गेली होती... कोकणात त्याला ',आपडी ची आसा..." अस म्हणायचे.. घरात शिवाशिव चालत नाही त्यामुळे सगळ्यांना त्रास होतो... आशा वातावरणात वाढल्या नंतर कॉलेज मध्ये जेव्हा गेलों तेव्हा खूप 'ज्ञान' मिळाले.. विशेषतः पिवळ्या पुस्तकातून
जेव्हा bsc ला आलो तेव्हा कळलं खर शास्त्र काय आहे ते.. पण ते पुस्तकात ठेवायचं असत ना हे शिकलेलो होतो.
जेव्हा msw ला आलो तेव्हा मासिक पाळी त्याच्या समस्या आणि त्या विषयी असलेलं अगाध अज्ञान या वर चर्चा करायला कोणच तयार होत नसे....
एकमेव महिला शिक्षिका पण त्यांना काही यात फारसा रस नव्हता... उलट त्यानाच।कधी कधी रुड वागताना बघितलं .. असो तो विषय दुसरा आहे...
नंतर मी जेव्हा मेडिकल सोशल वर्कर म्हणून काम करताना घरात थोड, सोशल वर्क करण्याचा प्रयत्न केला.. पण मी आता सोलापूर मध्ये राहत होतो तिथे फक्त "सणवार च्या महिन्यात आणि देवाधर्माच्या वेळी आम्ही पाळतो... एरव्ही नाही" असं अभिमानाने सांगितलं जातं असे
नंतर मी खूप मुलींशी, गावातल्या महिलांशी देखील या विषयावर बोललो काही प्रशिक्षण मध्ये भाग घेतला... इतरांना दिले.. तेव्हा हा केमिकल लोच्या.. हार्मोन झोल.. गर्भ धारनेची पूर्व तयारी वगैरे वगैरे.. कळू लागले
बाकीचे सर्व पॅड मॅन मध्ये दाखवलं आहेच..
जेव्हा जेव्हा स्त्री शिक्षणाचा किंवा आरोग्याचा प्रश्न उभा राहतो तेव्हा एकच प्रश्न उभा राहतो 'तुम्हा पुरुषांना काय करायचं आहे? किंवा काय कळतंय... बाईच दुःख .. नुसतं बोलायला काय जात' अस देखील ऐकलं .
घरातील देवा धर्माच्या काळात कितीतरी महिलांना गोळ्या घेऊन पुढे तारीख ढकलण्याचा प्रयत्न करताना बघितले.. देह विक्री करण्याऱ्या महिलांच्या संस्थेत काम करताना तर व्यवसाय म्हणून वाटले सुद्धा सॅनिटरी नॅपकिन...
कामाचा भाग म्हणून "कंडोम" सोबत पॅड ची विचारणा होऊ लागली .. तेव्हा एका महिले कडून अस उत्तर मिळाले की " साहेब तेवढं एकच अवयव आहे ज्याच्या जीवावर आम्ही कमावतो"... काय बोलणार आता ..
पण नंतर परिस्थती बदलत आहे .. मानसिकता देखील बदलत आहे थोडी थोडी..
*पण माझा मूळचा प्रश्न असा होता की "पाळी" हा शब्द कीती चपखल बसतो ना मराठीत..*
खरच किती लपवा छपवी, आजारपण, आणि न्यूनगंड करावी लागते अजूनही काही स्त्रियांना..
आता पॅड देखील मेडिकल दुकानातुन मॉल मध्ये आलेत
पण नजर नाही बदलली.. मुलगे चेष्टेत.. "पॅड लावून आला का बे" अस एखाद्याला चिडवतात किंवा "पोटात दुखत" अस एखादी महिला कामावर सुट्टी घेत असेल तर.... झाली यांची नाटक सुरू.. दर महिन्यात बोंबाबोंब यांची.. आणि म्हणे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावणार आहेत या' अशे ताशेरे ऐकले की आम्ही "सुशिक्षित" हा शब्द शिवी सारखा वाटतो..
आता पाळी हा विषय आणि पॅड हा विषय देखील वेगळा वेगळा आहे .. काहीजण म्हणतात कि खूप मोठं अर्थ शास्त्र आहे किंवा मार्केट मारलं जात आहे या माध्यमातून.. सॅनिटरी पॅड पेक्षा पर्यावरण राखणारे आणि सुरक्षा देणारं कापड आहे अस म्हणतात.
पण काही झालं तरी "पाळी" काही सुटत नाही..मानसीक पातळीवर त्रास होत असतात, मूड स्विंग होत असतात ते वेगळे , मेनो पॉझ चा प्रॉब्लेम वेगळा..
शेवटी एकच प्रश्न *"ही पाळी पुरुषावर आली असती तर... पुरुष सत्ताक पद्धत तरी अली असती का?*

खुप उदबोधक माहिती
उत्तर द्याहटवा