जीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जगावे... का आणि कशासाठी...?

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
📄 आठवडा 5⃣8⃣वा 📝
अभिमानाचे आणि यशस्वितेचे एक वर्ष
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒
09डिसेंबर ते 15 डिसेंबर 2018

जगावे... का आणि कशासाठी...?


अनिल गोडबोले
सोलापूर


जन्माला आलो आहे म्हणून जगावं लागत आहे.. एवढंच खर तर याचं उत्तर आहे. पण माणूस हा बुद्धीचा वापर करणारा प्राणी आहे, त्यामुळे असे बरेचसे प्रश्न माणसाला पडत जातात.

आपण आपल्या माणसांसाठी जगतो, आपल्या स्वप्नासाठी जगतो, झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी जगतो. ध्येय पूर्ण करण्यासाठी जगतो, आयुष्यात काहीतरी करून दाखवू म्हणून जगतो.

आनंदी राहण्यासाठी जगतो, दुसऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी जगतो. प्रेम करण्यासाठी जगतो तर काही ठिकाणी प्रेम मिळवण्यासाठी जगतो.

तर जे काही आपण विचार करतो त्या पद्धतीने जगतो. कधी कधी विचारशक्ती खुंटते आणि त्रास व्हायला लागतात तेव्हा, त्रास संपावण्या ऐवजी माणूस स्वतःलाच संपवण्याचा प्रयत्न करतो.

या सगळ्या मध्ये माणूस स्वतः साठी आणि या जगासाठी जगतो का? हा खरतर प्रश्न आहे. आपल्या जगण्याचा आनंद घेताना दुसऱ्याला त्रास होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसं करत आहोत का?.एखाद्या साठी निर्व्याज काही करत आहोत का? या प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर योग्य मार्गावर आहोत आपण..

आपल्या आयुष्यात आपण अशा काही गोष्टी करू शकतो का? ज्यामुळे इतिहास, विज्ञान, नागरिकशास्त्र आपला उल्लेख भविष्यात सतत करत राहील.

जीवनातील काही उदात्त हेतू ठेवून मानवजातीच्या कल्याणासाठी काही करू शकत असेल तर ते करावं.. .
प्रेम करावे.. भरपूर करावं आणि मनापासून जगावं.... आनंदी जगावं.. या पेक्षा वेगळं काही आयुष्य नसावं, असं माझं मत आहे.

श्रीनाथ कासे, सोलापूर

माणूस का जगतो ?... प्रेमासाठी ? जन्म व मृत्यू या दरम्यान तो ज्या गोष्टी करतो. ते माझ्यामते मुद्दामहून करत असतो. जगण्यासाठी अनेक कारण असतात. मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.


असेच आठवावे कधी तुला मुद्दामहून
बघावे निरखून त्या खुणा मुद्दामहून..

आठवणीत तुज्या मी हरवून जावे मुद्दामहून
नजरेतून माझ्या तू नजर मिळवावे मुद्दामहून..

तुझ्या सोनेरी लटा कानामागे सावरून
मला बघावे, बघून तू हसावे मुद्दामहून..

गालावरील खळी किंचित खूलावे बावरुन
ओठावरील लाली किंचित रूसावे मुद्दामहून..

माझे विचार, तुझे विचार घ्यावे जरा जुळवून
स्वप्नसुंदरी, तुझेच प्रेमगीत मी गावे मुद्दामहून..

जगावे, प्रेम करावे, मरावे सर्वकाही मिळवून
रडावे, प्रेम वाटावे, हसावे, सर्वकाही मुद्दामहून..

ऊमलुन फुलावे, कोमेजून माती व्हावे, नव्याने रुजवून ..
आठवावे, त्यात तुला स्मरावे, प्रेम व्हावे नव्याने मुद्दामहून..

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.


मी शाळेत असताना आमच्या शाळेच्या भिंतीवर अनेक सुविचार लिहिलेले होते त्यातील एक सुविचार होता तो म्हणजे " जगावे परी कीर्तीरूपी मागे उरवे " तसलाच जगणं प्रत्येकाला अपेक्षित असते का बरं?

तर माझ्या बाबतीत कुठल्या प्रकारची कीर्ती निर्माण करावी ह्या बाबत थोडा गोंधळच असतो कारण वेळेनुसार बदल होत जातच आहे माझ्यातही साहजिकच आहे तो सर्वांमध्ये होतच असतो पण माझ्या बाबतीत इतरांना तो जास्तच जाणवतो...असो. मी नेहमी सुखी प्राणी आहे असं माझ्या अप्तांचे म्हणणे आपल्याकडे म्हण आहे " निर्लज्जम् सदा सुखी " तसही काही नाही बरं का.

सर्वांच्या मनामध्ये जगण्याचे अनेक हेतू असतात जसे सैनिकाला देशसेवा साठी जगावे वाटते, डॉक्टर ना रुग्णसेवा, पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था तर गुंडांना त्याच कायदा आणि सुव्यवस्थेचा बिमोड करण्यासाठी असं प्रत्येकाचं जगणं ठरलेलं असत.

पण मला जगावं वाटतं अगदी " तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा " या वाक्याप्रमाने कारण आपल्या एकट्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देतात ही सर्व आजूबाजूची मंडळी.

शेवटी जगावे अपार प्रेमासाठी, सेवेसाठी ( वर नमूद आणि इतर ), किर्तीसाठी बस एवढंच...

संगीता देशमुख,वसमत

इथे प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे.प्रत्येक सजीवाने जगलेच पाहिजे. पण इतर सजीवांमध्ये आणि मानवामध्ये एक फरक आहे. तो म्हणजे माणूस जन्माला येताना अनेक ऋण घेऊन जन्माला येतो. त्यामुळे त्याचे जगणे हे एकट्यापुरते मर्यादित रहात नाही. जीवनात ब्रम्हचर्याश्रम,गृहस्थाश्रम,संन्यासाश्रम,वानप्रस्थाश्रम, यातून जाताना त्याच्या आयुष्याची परिपूर्ती आपोआप होते. अशावेळी अनेक संकटे,दु:ख,अडथळे त्याच्या जीवनात आली,जीवनात जीवावर बेतणारे प्रसंग आले,क्षणभर धीर सुटला तरी त्याला एकच मनावर बिंबवावं लागते की,माझ्या जीवनावर जेवढा माझा अधिकार आहे,तेवढाच अधिकार इतरांचाही आहे. अशी भूमिका आपण जेव्हा जीवनात घेतो,तेव्हा आपल्याला आपण "जगावे... का आणि कशासाठी?" याचे उत्तर मिळून जाते.
जगताना निराशा येणे किंवा खचून जाणे एवढेसेही कारण मरण्यासाठी पुरेसे असते परंतु जगावे कशासाठी? याला मात्र अनेक कारणे आहेत. आपल्या नात्यांची गुंतवणूक, आपली इतराना असणारी मानसिक,शारीरिक,आर्थिक,भावनिक,सामाजिक गरज,आपली समाजाप्रति,कुटुंबाप्रति असणारी कर्तव्ये,ही जगण्याची मुख्य कारणे आहेत. पण यातील खूप मोठे सत्य हे आहे की,माणूस प्रेमाशिवाय जगू शकत नाही. प्रेमाशिवाय तो फक्त मरूच शकतो. जीवनात कोणाचेच प्रेम मिळत नसेल तर माणूस मरणाचा विचार करतो. पण अशावेळी आपण धीर देणारी मित्र बनवली असतील तर तीच मित्र तुमच्या जगण्याचे मुख्य कारण बनू शकतात.मला मरण्यासाठी एखादे कारण असले तरी जगण्यासाठी मात्र अनंत कारणे असतात. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी,"जगणे अर्थपूर्ण बनले पाहिजे तसे मरण सुध्दा अर्थपूर्ण बनले पाहिजे." नाहीतर किड्यामुंग्यांचं जीवन तर कोट्यवधी लोक जगत आहेत.


*जगावे का आणि कशासाठी?*


"आज जगून घे..."
कवी अनिकेत कांबळे

आज जगून घे
उद्या तुझी पावलं स्वतः येतील स्मशानात..
तुला विद्युत यंत्रावर जाळलं जाईल..
रडायला चार माणसे भाड्याने बोलावली जातील..
तू जगून घे आजच...
दोरी हुडकू नको,
ना फिनाईल ना झोरोमाईन...!!
सलाईन लावायची वेळ येईल एवढं करू नकोस, तडफडू नकोस..
कारण हरामी माणूस
खाटावर पडलेल्या मड्यावर वर कमी आणि जिभेवर जास्त जीव लावतो...
तुला भावनेच प्रेमाचं टॉनिक नाही भेटणार,
आजच्या हायब्रीड हॉस्पिटलमध्ये..
घरी गेलास च बरा होऊन तर
तर मला इच्छामरण द्या अस सहजच म्हण...
किती डोळे भिजतात बघ..
आणि भिजलेच तर खुशाल जग..
नाही तर जिवंतपणी मरण बघ...
आज हे सगळं जगून घे..
जगून घे...

अर्जुन गोडगे , सिरसाव ता.परंडा जि.उस्मानाबाद


डोळे पुसायला कुणीतरी असेल तर
रूसायला बर वाटत...

ऐकणारे कुणीतरी असेल तर मनातल
बोलायला बरे वाटते..

कौतुक करणारे कुणीतरी असेल तर
थकेपर्यंत राबायला बर वाटत..

आशेला लावणार कुणीतरी असेल तर
वाट बघायला बर वाटत..

आपल्यासाठी मरणार कुणीतरी
असेल तर
मरेपर्यंत जगायला बर वाटत..

आपल्यासाठी कोणी असेल कोणीच
नसेल तर
आयुष्य गंडल्यागत वाटत..

कोणी असो वा नसो जीवन तर
सर्वाना जगावच लागतं.


विशाल कांबळे. सांगली


   जगणं...

स्वतःसाठी जगणं हे कधीच जगणं नसतं.
ते फक्त स्वतःचा स्वार्थ जपणं असतं..
खरं जगणं तर ते असतं जे दुसर्‍यांसाठी असतं..

स्वतःच्या सुखदःखात गुरफटून जाणं हे कधी जगणं नसतच. ...
खरं जगणं तर ते असतं जे दुसर्‍यांच्या सुखदःखात सामिल होणं असतं....

स्वतःच्या ईच्छा आकांक्षा पूर्णत्वास नेणं हे तरं जगणं
असतच....परंतु..
दुसर्‍यांच्या ईच्छा आकांक्षा पूर्तीत आपला वाटा निर्माण करणं हे खरं जगणं असतं .....

अर्चना खंदारे,हिंगोली

प्रत्येक माणसाचा जन्म झाल्यावर काही कालांतराने त्याला एक प्रश्न पडतो जगावे का आणि कशासाठी? कारण प्रत्येकाचा जन्म हा सारख्याच ठिकाणी होत नाही किंवा प्रत्येकजण हा मानसिक ,शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या सारखा नसतो. प्रत्येकालाच आपल्या जन्म पासून विविध अवस्थांमधून जावे लागते आणि या सर्व अवस्थांमधून जात असताना त्याला आपल्या कुटुंबामध्येही विविध प्रकारच्या भूमिका पूर्ण कराव्या लागतात.

तसेच प्रत्येकाची कोटुंबिक आर्थिक स्थिती हि योग्य असते असे नाही.त्यामुळे जीवन जगत असताना त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे तरुणांना हा प्रश्न पडतो म्हणजेच कोणी व्यसनाच्या अधीन जातो,कोणी आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे मानसिक ताणास बळी पडतो तर कोणी एखाद्या रिलेशनशिप मध्ये अडकून जातो मग आपण जगावे का आणि कशासाठी ? या विचाराने त्रासून जातो. अस्या परिस्थितीला बळी न पडता त्या परिस्थितीशी झगडून त्यातून मार्ग काढणे महत्वाचे ठरते.
मग जगावे.....का आणि कशासाठी ? हा प्रश्न निर्माण होणार नाही.....
Image source Internet..

बदलती जीवनशैली... हानिकारक की लाभदायक!

बदलती जीवनशैली…हानिकारक की लाभदायक!

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

बदलती जीवनशैली... हानिकारक की लाभदायक!



Source:- INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

आपण आज ताण तणाव असलेल्या आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी असलेल्या जीवनशैली मध्ये आहोत.
लहानंतल लहान मूल देखील 'टेन्शन आलाय' अस म्हणत. आपण जरा या जीवनाची 50 वर्षांपूर्वीच्या जीवनशैली सोबत तुलना करून बघुयात. एवढंच कशाला.. 20 वर्षा पूर्वीची जीवनशैली आठवा, एवढी स्पर्धा एवढं राजकारण, एवढी भीती आणि मोठेपणाची हौस बाळगून आपण जगतो आणि पैसे कमावतो... पुढे त्या पैशाचा उपयोग्य किती होतो आणि दुरुपयोग किती होतो... हा एक वेगळा संशोधनाचा मुद्धा.
तर जीवनशैली आपली चुकीची आहे... म्हणजे नेमकं काय? हे जरा आपण बघू.....

आपल्या कडे तंत्रज्ञान आलं आणि त्याने खूप सुखसोयी आणल्या, पण त्या सुखसोयीच्या आपण किती आहारी गेलो... ते आपल्यालाच कळलं नाही..
आपण सकाळी उठतो, प्रातर्विधी आटोपले की चहा घेतो, जो सकाळी सकाळी आपल्याला तरतरी देतो... तरतरी म्हणजे काय?.. टॅनिन नावाचं विष आहे जे रक्तात मिसळत त्यासोबत साखर शरीरात एकदम घेतली जाते.. जी खरतर आवश्यक नाही कारण पुन्हा जास्त झालेली साखर कमी करण्यासाठी लगेचच इन्सुलिन तयार करावे लागते.. पुन्हा डायबेटीस .. होण्याच्या करणामधील एक कारण.
त्यानंतर सोशल मीडिया(या बद्दल बोलेल तेवढं कमी आहे) इतर ताण तणाव... त्या मध्ये नाष्टा (जो संतुलित असणं अपेक्षित आहे.. आपल्या आहारात पिष्टमय पदार्थ सोडले आणि कॅलरीज सोडल्या तर बाकी पोषण काही मिळत नाही)
त्या नन्तर ऑफिस मध्ये काम (😳) असत खूप आपल्याला... जे शारीरिक पेक्ष्या मानसिक रित्या दमावणार असत.
दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, बिस्किटे रात्रीच (लाईट) जेवण या मध्ये आपण "संतुलित आहार" किती आणि कस घेतो!हे सांगताच येत नाही.
पुन्हा व्यसन असतील बोलूच नका.. रात्री टिव्ही उशिरा झोप आणि उशिरा उठणे... पुन्हा दुसरा दिवस..
यात आपण जीवन कुठे जगत आहोत?? आपले आनंद आपले छंद यावर काही काम करतो का?.. मित्र(व्यसन लावणारे नव्हे) आपल्या बाजूला किती असतात आणि स्वार्थी लोक किती असतात?
राजकारण, पैसे, रोजचे प्रश्न , आरोग्य, शिक्षण, महागड्या वस्तू, गाड्या अशी बरीच लिस्ट आहे जी मिळवण्याच्या किंवा ओरबाडून घेण्याचा नादात आपण आपलं जीवन एन्जॉय करत आहोत का?
जर वरील प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थी असतील तर मला अस वाटत की नक्कीच आपलं काहीतरी चुकतंय....
तेव्हा विचार करा आणि बदल घडवा



Source:- INTERNET
-संगीता देशमुख,
हिंगोली

"बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे", "बदल ही काळाची गरज आहे", असं म्हटल्या जाते. पण तो बदल योग्य की अयोग्य हे त्याचा मानवाच्या जीवनावर होणाऱ्या परिणामावर अवलंबून आहे. मानवाचा इतिहास पाहता आजची बदलती जीवनशैली ही मानवास अतिशय घातक अशी बनलेली आहे. माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा आपल्या जीवनात अतिवापर केल्याने त्याचा मानवास फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होत आहे. मानवाची आजची बदलती जीवनशैली मानवाच्या मानसिक,शारीरिक,सामाजिक विकासास घातक अशी ठरत आहे.
          पूर्वीच्या काळी सकाळ ही  ४ते ५ च्या दरम्यान व्हायची. घरातील स्त्रीपासून तर बाकी सर्व आबालवृद्ध ही एकामागोमाग सूर्योदयापूर्वीच उठायचे. स्वच्छ,निरोगी,शुद्ध हवा सगळ्यांना मिळायची आणि सकाळच्या सर्व कामातून सगळ्यांना योग्य तो व्यायाम आपोआपच व्हायचा. पूर्वी सकाळी शौचास बाहेर जाणे,हे सुध्दा नैसर्गिकपणे मॉर्निंग वॉक व्हायचा. आणि आज यंत्राचा वापर इतका वाढला की,चार पावले सुध्दा आजकालची  मुलंमुलीच नाहीतर स्त्रिया सुध्दा बाइकचाच वापर करत आहोत.घरात वॉशिंग मशीन,मिक्सर,ग्राइंडर,ओव्हन या सर्व यंत्राच्या वापरामुळे लठ्ठपणा ही घराघरातील आजची मुख्य समस्या बनली आहे. तसेच आजची पिढी अतिशय कमी वयातच मधुमेह,रक्तदाब अशा आजाराला बळी पडलेली आपल्याला दिसत आहेत.प्लास्टिकचा वापरही इतका वाढला की,कॅंसरसारखा आजार तर तीन घरापैकी एका घरात आढळतो. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आजूबाजूची हवा,पाणी,माती,यात भयानक असे प्रदूषण वाढले आहे. आज ग्रामीण भागातील लोकसुद्धा वॉटर फिल्टरचेच पाणी पिताना  आढळून येतात. आपल्या शरीराला मिळणारे क्षार आपण असे कमी करून हाडांचा ठिसूळपणा करून घेतला. आज तरुणाईतील व्यसनाचे वाढते प्रमाण हाही एक चिंतेचा विषय आहे. आजचे व्यसन ही तरुणाईची फॅशन झाली आहे. आणि याला आवर घालण्यात आजकालची पालक असोत अथवा शिक्षक हे हतबल ठरले आहेत. त्यात आपल्याला विशेषतः शहरातील लोकांना मिळणारा भाजीपाला,फळे ही सुद्धा रासायनिक खतांचा,औषधींपासून,पावडर पासून पिकवलेली मिळत आहेत. पण आजची मुलंमुली ही इंटरनेटवर रात्री उशीरापर्यंत जागतात आणि सकाळी दहा वाजेपर्यंत झोपतात. घरचे जेवण घेण्यापेक्षा सकाळपासूनच फास्टफूडवर नास्तापासून तर रात्रीच्या  जेवणापर्यंत दिवस संपतो. शीतपेयांचा वापरही अतिप्रमाणात वाढलेला आहे. याचे व्हायचे ते दुष्परिणाम दृश्यरूपात आहेतच.
                   विज्ञान असो अथवा तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रासारखे आहे. मानवी विकासासाठी त्याचा आपण सदुपयोग करून घ्यायला हवा. पण त्याचा दुरुपयोगच आपल्याला जास्त दिसून येतो. आज एका वर्षाच्या लेकराच्या हातात आपण मोबाईल देत आहोत. त्याच्या कोवळ्या डोळ्यावर आणि मेंदूवर काय विपरीत परिणाम होत असेल,याचा सुध्दा विचार आपण करत नाही. ऑफिसमध्ये कंप्युटरचा वापर हा अनिवार्य आणि हिताचा आहे परंतु सोशल मिडियामध्ये व्हाट्सॅप,फेसबुक यावर तरुणांचा किती वेळ वाया जातो! तरुणांची सर्व शक्ती व वेळ हा यातच जातो आहे. त्यात आपण नागरिक इतके अडकलो की,देशात बेरोजगारी किती वाढली,हेही रवीश कुमारसारख्या पत्रकाराला लक्षात आणून द्यावे लागते. दिवसाला दिला जाणारा १.५ जीबी मोफत डाटा हा तरुणांना दिशाभूल करत आहे.  पण याचे भान ना युवकांना आहे, ना सरकारला.... ही किती खेदाची बाब आहे!
                  आज माणूस भौतिक सुखाच्या अधीन झाल्याने झटपट पैसा कसा कमावता येईल,यासाठी तो प्रयत्न करतो आहे. त्यापायी मानसिक स्वास्थ्यही तो गमावून बसला आहे. आजचा काळ म्हणू म्हणू घरातील थोरामोठ्यांचा आदर,प्रेम या बाबी क्षुल्लक ठरत आहेत. चौकोनीच काय पण त्याही पुढे जाऊन आज त्रिकोणी कुटुंबपद्धती आली.  त्यातूनच वृध्दाश्रम आणि पाळणाघर यांचे नको तितके पेव फुटले आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे एक किंवा दोनच लेकरांचे निकोप संगोपन करणे कठीण होऊन बसले आहे. मोठी पालकच आपल्या लेकरांच्या मन:स्वास्थ्याला जपायचे म्हणून लेकरानाच भिऊन रहात आहे. माणूस माणसाच्याच प्रेमाला पारखा होत चालला आहे.  शेवटी माझ्यासारख्या सामान्य बाईच्या डोक्यात प्रश्न येतो,आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ वाचवायचा असे म्हणतो,तेव्हा वाचलेला वेळ आपण कोठे वापरत आहोत?वाचलेल्या वेळातून आपण ना समाजविकास साधत आहोत ना आत्मविकास! चौकोनी कुटुंबातील चौघांचे तोंड चार दिशेला झाली आहेत. चिडचिड,पाल्यांकडून अवास्तव अपेक्षा,पाल्यांचा उद्धटपणा,यात आईवडिलांची कुचंबणा! मग एवढे धावायचे तरी कशासाठी? हे सर्व पाहत, बदलत्या जीवनशैलीचा मानवी जीवनावर किती विपरीत परिणाम होतो,हे सुज्ञांस सांगणे न लगे.

Source:- INTERNET
-श्रीपाद वडे,
सोलापूर

हा विषयास अनुसरून खरंच जेवढी लाभ दायक आहे तेवढी तोट्याची आहे पण माझ्या दृष्टीकोनातून खूप हानिकारक आहे .असं मला वाटत खरंच आपण Social मीडियाचा खूप अति वाईट हेतूने वापर करत आहोत असं मला वाटत ह्या मुळे बरेच आजर जडताण दिसत आहे.
आणि फार कमी दृष्टीने त्याचा वापर होताना दिसतो
जास्त प्रमाणात सर्वाना च हेच वेसण लागलेलं दिसत
त्यामुळे बद्दलणारी जीवन शैली ही लाभकारक न म्हणता हनिकरकच आहे..मी एका विषयास धरून बोललो पण असे खूप विषय आहेत की बद्दलणारी जीवन शैली तोट्याचीच आहे…


Source:- INTERNET
-महेश देशपांडे,
ढोकी
जि. उस्मानाबाद

सर्वप्रथम, हा विषय निवडला त्याबद्दल मी एडमिन टीम चे आभार मानतो..🙏🏻

खर पाहिल तर बदलती जीवनशैली हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी आहे. आपण कोन आहोत? आपल्या अस्तित्वाच नेमक प्रयोजन काय आहे? हे दाखवून देणारी आहे. अस्तित्व यासाठी की, दैनंदिन जीवनात आपली स्वतःची मूल्य संभाळुन आपण खरच जगु शकतो का? याच उत्तर जर होय असेल तर लाभदायक आणि जर नसेल तर हानिकारक. उदाहरण द्यायच झाल तर अगदी साध घ्या सकाळी उठल्यावर आपण आई वडिलांना नमस्कार करतो का? ज्यांच्यामुळे आपल अस्तित्व आहे त्या व्यक्तिना आपण रोज नमस्कार केला पाहिजे हे एक जगण्याच मूल्य आहे ना... मग जर नसेल करत तर का नाही याचा शोध जाने त्याने घ्यावा...
दूसर उदाहरण द्यायच झाल तर, आपल्या आरोग्या बाबतीत घ्या... प्रत्येकाची शरीर पकृति वेगळी असते, मग त्यानुसार प्रत्येकजन काळजी घेतो का? या whatsapp वर असंख्य मेसेजेस येत असतात शरीर स्वास्थ्यसाठी काय चांगल आहे, काय नाही किंवा Do's and Dont's येत राहतात...
पण कधी स्वतःच्या शरीराशी संवाद साधला आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खर आहे की तुम्ही तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट अनुभवु शकता... जर तेवढे ध्यानमग्न झालात तर.. आणि मग नियंत्रित सुद्धा करू शकता.... कोणी लक्ष देत नाही.. अरे खरच बघा एकदा प्रयत्न करून शरीराशी संवाद करून..
नात्यांच्या बाबतीत ही गोष्ट अगदीच संवेदनशील झालीय. म्हणजे नव्या नवरिचे नउ दिवस अस आपण आजकाल वागतो आहोत का? एवढी माणस झालीत की कोनाकोणाल वेळ द्यायचा हाच प्रश्न पडतो... मग आपल मोबाईल घ्यायचा आणि चालू मेसेजेस. मोबाईल दिवसातुन किती वेळ वापरायचा हा एक गंभीर प्रश्न झालाय.. Addicted झालोय अस म्हणालात तरी चालेल.... ज्यांना जमत ते राहतात नियंत्रित.
अजुन बऱ्याच गोष्टी आहेत, समजजीवन, मानसिक आरोग्य, येणाऱ्या पीढिसमोरिल आदर्श... ही यादि न संपनारी आहे.
या सगळ्या गोष्टिंचा विचार केलात, तर काही बाबतीत बदलती जीवनशैली लाभदायक वाटेल, तर काही बाबतीत हानिकारक...

शेवटी गाण्याच्या दोन ओळी आहेत

*जीवन गाणे गातच राहावे, पुढे पुढे चालावे ।*
*रुसवे फुगवे विसरून जावे, पुढे पुढे चालावे।*


Source:- INTERNET
-पवन खरात,
अंबेजोगाई

माणसाच्या उप्तत्ती पासून माणूस स्वतःला गरजे नुसार बदलत गेला आहे. विज्ञानाच्या जोरावर अनेक सुख सोयी निर्माण करून अथांग प्रगत झाला.
 आयुष्याची शंभरी गाठणारा एकेकाळचा माणूस आज क्षणभंगुर झालेला आहे. कारण आज माणूस आज भाकरीच्या तुकड्यात समाधानी राहिलेला नाही. दारू ,सिगारेट,ड्रग्स या सारख्या गोष्टीच्या आहारी गेला आहे. त्याचा बरोबर खानपानातील बदलामुळे एक वेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल पण औषध मात्र घ्यावीच लागतात.
   बदलत्या काळानुसार गरजा सुद्धा बदलत गेल्या . घरातील वयस्कर माणसाला घरात उच्च स्थान असल्याचे कारण त्यावेळी त्याला त्यांची गरज असायची . पण आज घरातील वयस्कर माणसांची गरज फक्त वृध्दाश्रमांना राहिली आहे, कारण स्वतःची मुलं जन्मदात्याला घराबाहेर हकालताना सुद्धा विचार करत नाहीत.
   माणूस आज खूप सुखी आहे फक्त इंटरनेट व मोबाईलच्या आभासी जगात . चार मित्राचं बोलणं ,भेटणं तर व्हाट्सअप्प ने कधीच बंद केले आहे, कारण समोरासमोर बसले चार मित्र सुद्धा एकमेकांना बोलण्या पेक्षा मोबाईल मध्ये जास्त बिझी असतात.
पण जेव्हा या खऱ्या दुनियेशी ओळख होते,एकटेपणा जाणवतो ,तेव्हा मात्र आत्महत्या शिवाय पर्याय उरत नाही.
आज या गोष्टीची खात्री पटली कि,
" पूर्वी माणूस माणसं जपायला आणि पैसा वापरायला शिकला,
आणि
आज माणूस पैसा जपायला आणि माणसं वापरायला शिकला । "


Source:- INTERNET
-जयंत जाधव,
 लातूर

  ज्या वेगानं विज्ञानाने प्रगती करुन आपल्याला वेगवेगळ्या सुख सुविधा निर्माण करुन दिल्या आहे.पण त्यात वेगानं असंख्य प्रकारच्या आजार व रोगांनी माणसाच्या शरीराला स्वतःच्या हक्काचे वस्ती बनविली आहे.नैराश्य व मानसिक तणाव,मधुमेह,हृदयरोग,अस्थमा इत्यादी रोग हे आधुनिक जीवनशैलीची देणग्या आहेत.सर्वात गंभीर बाब ही लैंगिक समस्या कित्येक जणांचे जीवन खराब करत आहे .
सामाजिक मुल्यांमध्ये झपाटयाने होणारा बदलाचे परिणाम म्हणजे लग्नाच्या पूर्वी लैंगिक संबंध ही रोजची साधी बाब बनली. लैंगिक स्वैरपणामुळे एच.आय.व्ही,सिफिलीस सारखे गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
आजची तरुण पिढी करियर बाबतीत खुप विचारी आहे.त्याला प्रचंड महत्त्व दिले गेल्यामुळे लग्ना आधी लैंगिक संबंध व नंतर गर्भ राहू नये यासाठी वापरल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेकी वापर यामुळे मुले होण्यात खूपच समस्या निर्माण झालेल्या आहे.
कित्येक सलग तास संगणकावरील कामाने हृदयविकार,उशिरा पर्यंतच्या पार्टी मधील धुम्रपान,दारु इ.मुळे नपुंसकता तसेच स्त्रीयांमध्ये मॕनोपॉज सारखे मासिक पाळी संदर्भातील आजाराच्या समस्या वाढत आहे.
उद्योग धंद्याच्या स्पर्धेत बहुराष्ट्रीय कंपनीच्या कामाची आधुनिक  पध्दतीने माणसांची जीवनशैली खूप प्रभावित झाली.दिवसाचे स्वरूप रात्रीत तर रात्रीचे दिवसात बदल झालाय.धावपळ वाढली.प्रत्येकाला पुढे जाण्याच्या घाई लागली. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण शॉटकटची मदत घेवून काही पण करण्यास तयार आहे.इंटरनेट व मल्टीनॕशनल कंपनीच्या मायाजाळाने तर जीवनशैलीला फारच बदलून टाकले.फास्ट-जंकफुड हे खाण्यास पोषक तर नसतात पण सर्वात महत्त्वाचे अस्वच्छ असतात.त्यातून अनेक रोगांची भीती असते.भारतात १०ते २५ वयोगटातील  सुमारे २३ लाख युवा दर वर्षी अकाली मरण पावतात.त्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत.युवा म्हणजे देशाचा आधारस्तंभ व ऊर्जा असते.पण तेच असे पंगू झाले तर त्या देशाचे भवितव्य अंधारातच राहिल?(संदर्भ -जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद केले)
भारतात एकूण लोकांच्या ६५% हे ३५ वयोगटा खालचे आहेत.सर्वात मोठी अडचण युवकांच्या आरोग्य साठी परिणामकारक  असे धोरण नाही.त्यामुळे युवा भारता ऐवजी आजारी भारत म्हणून आपल्याला ओळखले जाऊ लागू शकते.



Source:- INTERNET
-समीर सरागे,
नेर
जि यवतमाळ

विज्ञानाने जस जशी प्रगति केली तस तशी आपल्या जीवन शैलित देखील बदल होत गेले , पूर्वी आजच्या सारखी भरपूर वाहने नव्हती तरी देखील प्रत्येक व्यक्ति वेळेवर पोहोचत असे, आजच्या सारखे प्रगत वैद्यकीय उपचार नव्हते तरी देखील कोणी आजारी पड़त नसे , आजच्या सारखे माहिती तंत्रज्ञानाचे युग नव्हते तरीही प्रत्येकाचे समाजमन एकमेकांशी जुळलेले असायचे ,आजच्या सारखी प्रगत शैक्षणिक व्यवस्था नव्हती तरीही प्रत्येकाला शिक्षण मिळत असे, आजच्या सारखा औद्योगिक विकास नव्हता तरीही प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होत असे, वैगरे असो
आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. सगळीकडे वैज्ञानिक प्रगति झाली आहे. त्यामुळे मनुष्यजीवनात सुख सुविधाची फार मोठ्या प्रमाणात रेल चेल वाढली आहे.
आज प्रत्येक मनुष्य पैशाला केंद्रस्थानी ठेऊन आपले जीवन जगत आहे. म्हणजे पैसा भरपूर कमावला किंवा भरपूर संचय केला की आपला येणारा भविष्य काळ हा सुखात जाईल, असे वाटन्यात काही गैर नाही कारण सर्वानी आपल्या करिता सुखाची आणि समृद्धिची अपेक्षा करणे स्वाभाविक आहे.
परिस्थिति नुसार मनुष्याला बदलावे लागते आपल्या सवयी ,स्वभाव , कामाच्या पद्धति राहनीमान ,जीवनमान  यात कालांतराने बदल होत गेले आणि होत देखील राहणार कारण बदलाव हा निसर्गाचा आणि जगाचा नियम आहे. अलीकडे आपल्याला शहरी जीवन पद्धति कड़े बघितल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जानवेल की, शहरी भागातील जीवनमानात आजकाल अतिशय विरोधाभास आपल्याला दिसून येईल , शहरी भागाचा विचार करता आज तेथील प्रत्येक व्यक्ति रोजच्या धावपळी च्या व्यस्त दिनचर्येत  कर्तव्या बरोबरच स्वतःच्या कुटुंबच्या उदरनिर्वाहचा डोंगर देखील वाहत असतो रोज सकाळी कर्तव्यावर जाने तेथील कामाचा व्याप, वाहतुकीची पायपिट, कौटुंबिक जबाबदार्या या सर्वांच्या विवंचनेत त्याची मानसिक पातळी इतकी खालावून जाते की, त्याला डिप्रेषन, हाइपर टेंशन सारख्या व्याधीने तो ग्रस्त होऊ लागतो कारण कोणाच्यही जीवन कार्यात सुख हे केंद्रस्थानी असते आणि या सर्व गरजा भागविन्या करिता पैसा हा घटक महत्वाचा आहे. मुलांना चांगले शिक्षण द्यावे, आपल्यासारखे हाल-अपेअष्टा माझ्या मुलांच्या नशिबी नको , म्हणून बरेचसे पालक हल्ली आपल्या पाल्याणा दुचाकी वाहन, मोबाईल, लैपटॉप वैगरे वस्तु खरेदी करून देतात आणि खरेदी करुण देणे यात काही गैर नाही परंतु आपल्या पाल्याला  त्याने कष्टाच्या पेशाने कमाऊंन दिलेल्या या वस्तु तो गरज किंवा आवश्यकता म्हणून त्याचा वापर करतो की नाही याची शाहनिशा आजकालच्या सुज्ञ पालक वर्गाने करणे अनिवार्य आहे. माहिती तंत्रज्ञाना च्या या युगात नवनवीन उपकरणें हाताळने वा त्याचा वापर करणे योग्य आहे.परंतु केवळ मनोरंजन म्हणून त्याला उपयोगात आणने आणि आपला बहुमूल्य वेळ दवडने हे आजच्या तरुण आणि सुशिक्षित पिढीकड़ून कदापिही अपेक्षित नाही.
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धति अस्तित्वात होती किंबहुना आजही काही अंशी ती नावा पूरती अस्तित्वात असेल असो, या संयुक्त कुटुंब पद्धति मध्ये कुटुंबात एक प्रौढ़ व्यक्ति कुटुंब प्रमुख म्हणून असायची आणि या व्यक्तीचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर असायचा (कारण कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या काही कर्तव्ये आणि जबबदरया असायच्या) त्यांच्या वर सामाजिक जबाबदारी देखील असायची ,सर्व कुटुंबातील मंडळी त्यांच्या आज्ञा चे पालन करायचे लहान मुले आणि नातवंडावर त्यांचे प्रामुख्याने लक्ष असायचे कारण यांचेच संस्कार रूपी शिक्षण भविष्यात त्यांना ऊपयोगी पड़त असे,  सर्व आपापली कामे चोख करायची ,कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण असायचे , संवादाच्या माध्यमातून एकमेकांशी जिव्हाळा आणि प्रेम राहत असे परंतु कालांतराने एकल कुटुंब पद्धति अस्तित्वात आली वाडयाची हस्त्या खेळत्या घराची जागा फ्लैट ने घेतली , जिव्हाळा आणि प्रेम हे प्रसंगावधान ठरू लागले आणि वडीलधारी मंडळी वृद्धाश्रमात धाडल्या जाऊ लागली याचे मुख्य कारण म्हणजे तशे संस्काररूपी शिक्षण आम्हला मिळणेच आता कायमचे बंद झाले आहे. आणि कॉन्वेन्ट व पाश्चात्य संस्कृतिचा प्रभाव दिवसेंदिवस आमच्यावर होत चालला आहे.
आजकाल ज्या पद्धतीने समाजाचा विकास झाला आहे त्यात संयुक्त कुटुंबाची जागा एकल कुटुंबाने घेतली आहे यामुळे आजच्या तरुण पिढीला ते वातावरण मिळत नाही  पूर्वी घरच्या मंडळी सोबत भोजन करतानी गप्पा ,गोष्टीच्या माध्यमातून वेळ घालवून प्रत्येकाला एक स्वस्थ जीवनशैली मिळत असे, परंतु एकल कुटुंबातिल व्यक्ति फार कठिन परिस्थितीत  किंवा क्वचितच एकमेकां करिता वेळ काढतात आणि आपला एकटेपना घालविन्या करिता ते पार्टी, पब किंवा बार याचा सहारा घेतात परिणामी ,दारू, सिगारेट, ड्रग्स,कोकेन सारख्या मादक पदार्थांच्या आहारी जाऊन आपले स्वास्थ्य बिघडवून घेतात. यात बहेरगावाहुन शिक्षण आणि रोजगारच्या शोधात  येणाऱ्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
कॉल सेंटर ,इंटरनेट नंतर आता सोशल मिडियानेही आपली जीवनशैली  बदलून टाकली आहे. रात्रभर जागरण करणे, मग उशिरा उठने आणि त्यानंतर  कामाला जाने हेच अलीकडे आपल्या सर्वांचे जीवन होऊन बसले आहे. यातही आजचे तरुण रोजगार आणि करिअरच्या शोधात इतरत्र भटकंति करत असतात यामुळे वेळी अवेळी खान-पान करणे फास्टफूड , डब्बाबंद किंवा होटेलातील खाने, कोल्ड्रिंक्स चा अतिवापर याकड़े आजचा तरुण वर्ग आकुष्ट झाला उलट ती एक फैशन बनली आहे. अलीकडे आपल्याला हर एक चौकात ,चायनीज , तळलेले पदार्थ असलेल्या स्टॉल वर तरुणांची गर्दी सहजच दिसून येईल, जिभेचे चोसले पुरविन्या करिता आपण हे पदार्थ खात असतो परंतु असले पदार्थ पोषनवीहिन तर असतातच सोबतच ते अनेक रोगाचे माहेरघर देखील असतात. परिणामी असले न-पचनारे पदार्थ खाऊन वजन वाढ, लट्ठपणा(Obecity) जे अनेक रोगांचे मुख्य कारण देखील आहे. खऱ्या अर्थाने हा रोग कुपोषणा पेक्षाही भयंकर आहे, यामुळे हृदयरोग, मधुमेह, कंबर आणि घुटने दुखी, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे प्रमाणात वाढ, अनिद्रा वैगरेची संभावना अधिक प्रमाणात असते. मग यावर मात करण्या करिता तरुण वर्ग वेगवेगळ्या औषधिच्या आहारी जातात यात अनिद्रे  करिता झोपेच्या गोळ्या घेणे, मधुमेह कमी करण्या करिता इन्सुलीनचे इंजेक्शन वैगरे घेणे ,पैन किलर आणि एंटीबायोटिक यांचा अतिवापर यामुळे शरीरातील इतर अवयवा वर विपरीत परिणाम होऊन अधिक स्वास्थ्य बिघडवून घेतल्या जाते.
पूर्वी  घरातील स्त्रियां पहाटे उठायच्या  तेव्हा पासून त्यांची कामाची दिनचर्या सुरु व्हयची ते अगदी रात्री पर्यंत चलायची स्त्रियां सतत घरकामत असल्याने त्यांना त्यांना व्याधि आणि आजार होत नसत किंवा झाले तरीही ते क्वचितच होत कारण त्यांच्या या घरकाम करण्यामुळे एकप्रकारे व्यायाम होत असे परंतु आजची परिस्थिति बघता बऱ्याच कुटुंबात आपल्याला घरकाम करणाऱ्या स्त्रियां किंवा पुरुष नजरसे पडतिल
एवढेच नव्हे तर बाळाला जन्म देणाऱ्या मातेला देखील तिच्या स्वतःच्या बाळा करिता वेळ नसतो मग  त्या बाळाच्या संगोपन व पालनपोषणा करिता या महिला आया (Sarogate Mother) ठेवतात मग क़श्या प्रकारे त्या मुलांवर मातृत्वाचे -पितृत्वाचे संस्कार होतील ? म्हणजे यांना  मोबदला देऊन Sarogate Mother ठेवणे चालतील परंतु घरामध्ये वडिलधारी वृद्ध मंडळी नको आणि ती असतीलही एक तर वृद्धाश्रमात नाहीतर मग दूर गावी, आणि हीच पद्धत व आधुनिक जीवनशैली मग कायमची परंपरा बनत जाते  परिणामी वृद्धाश्रमा मध्ये अलीकडे आपणास वृद्धाचिं संख्या वाढलेली दिसून येत आहे व भविष्यात अधिक प्रमाणात दिसून येईल. कारण ही पद्धत अनुकरणीय होऊन जाईल ,आणि यात नवल वाटायला नको.
असो ,
प्रत्येकाने आपाआपली जीवनशैली ,राहनिमानाचा दर्जा ,सवयी आपल्या सोईनुसार व काळानुरूप  बदलून घेतल्या आहेत किंवा बदलने अनिवार्य आहे. आजचे २१ व्या शतकातील युग हे धावपळीचे आणि स्पर्धेचे आहे. त्यानुसार प्रत्येकाने आधुनिक जीवनशैलित आपल्या सवयी व कामाच्या पद्धति देखील बदलवायला हव्यात
बदल होने हा नियम जगाला, श्रुष्टिला  व तंत्रज्ञानाला देखील लागू आहे. त्याच प्रमाणे तो मनुष्यला देखील लागू आहे  यात दुमत नाही , परंतु या बदला बरोबर आपली नीति मूल्य , आपलेपन,प्रेम- जिव्हळा , नाते व संवाद या बाबी जपने देखील तितकेच महत्वाचे ठरते. या धकधकीच्य तनावपूर्ण जीवनात ज्ञान धारणा (Maditation), योगासने, प्राणायाम इत्यादिने आपण आपले कामाचा तान- तनाव दूर करु शकतो या आधुनिक जीवनशैलित या उपरोक्त बाबी दररोज अमलात आणल्यास आपण एक स्वस्थ जीवन तर  जगूच त्यासोबतच सामाजिक स्वास्थ्य टिकुण ठेवन्यास देखील तितकीच मदत होईल व ती काळाची गरज आहे.

जीवनात काटेरी डंख आहेत डोळे उघडुन पहा ते तर फुलपाखरांचे पंख आहेत..!

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून


जीवनात काटेरी डंख आहेत डोळे उघडुन पहा ते तर फुलपाखरांचे पंख आहेत..!

(यातील सर्व फोटो गुगलवरचे आहेत)

आशितोष तरडे,खेड,पुणे:

वी-हवीशी वाटणारी माणसे जीवनाच्या चढ-उताऱ्यात हळू-हळू आपल्याला नको-नकोशी वाटू लागतात.कारण ते त्यांच्या वागण्यानं आपल्याला जाता-येता हर्ट करत असतात आणि आपलं ’हार्ट’ बिच्चार ’हर्ट’ होत राहतं.एखाद्या व्यक्तीच्या "विनोदबुद्धीला" आपणही जणु विंचवान डंख मारल्यासारखं मनावर घेतो आणि त्याच्या वेदना मनात रुतून बसतात.खरंच आपले काही मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीय इतके वाईट आहेत का? आपल्याला छळायचंच असं ठरवून सतत मुद्दाम अडवतिडव बोलतात का? कुणी काहीही म्हणो, काहीही सांगो, आपण आपले तिरक्यातच घुसून मोकळे...

थोडं काही झालं की, आपण लगेच ’हर्ट’ होतो. एक गोष्ट तर आपण कायमचं अनुभवतो. आपल्या पासून दूर असलेले आपले काही मित्र-मैत्रिणी अचानक भेटतात. मग त्यांचा पार्टीचा बेत ठरतो, ते खूप एन्जॉय करतात आणि नंतर हे सगळं आपल्याला कळतं. त्यांचे सोशल मीडियावरचे फोटो पाहून किंवा त्यातला त्यात एखाद्या बिन महत्त्वाच्या मित्रांना त्यात पाहून तर आपण जाम ’हर्ट’ होतो. मुळात ते सगळे ठरवून तुम्हाला सांगत नाही असं नाही. तर कदाचित ते सहज बोलता-बोलता एकत्र आले असतील आणि गडबडीत सांगायचं राहून गेलं असेल, हे आपल्या डोक्यातचं शिरत नाही.

कधी असंही होतं कि, आपली जवळची व्यक्ती काळजीपोटी आपल्याविषयी दुसऱ्याला काहीतरी सांगते आणि आपण ते चुकून ऐकतो. बस्स, आपण लगेच हर्ट होतो. वाटतं, जे काय माझ्यात चूक आहे, ते मलाच सांगायचं ना, माझ्यामागे माझी गाऱ्हाणी, टिंगल करायची काय गरज आहे? आपण इतकं मनाला लावून घेतो की, मग विचारालायच नको...

कुणी काहीही म्हणालं तरी आपल्या भावना लगेच दुखावतात. इतक्या का नाजूक झाल्या आहेत आपल्या भावना? येता-जाता सहज दुखावल्या जातात. एक लक्षात घ्या, अशा गोष्टी आयुष्यात होतचं राहणार आहेत. कुणी काही बोललंच तर, आपण बोलावं तिथल्या तिथं हिशेब करून मोकळं तरी व्हावं, किंवा घडलेल्या घटनेमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न तरी करावा. नाही तर ज्या कानानं ऐकलं त्याच कानानं सोडून तरी द्यावं. उगीच हर्टबिट होतं, भळभळत्या जखमा घेवून जगण्यात काय मज्जा?नकरात्मक काटेरी जीवनातही गुलाब म्हणून जगता आलं पाहिजे.लाईफ एन्जॉय करता आलं पाहिजे.मग कळेल कि हे काटेरी डंख नसून फुलपाखराचे पंख आहेत....

अक्षय पतंगे,हिंगोली:
      तसं पाहायला गेल्यास काट्यांशी फुलपाखरांचा रोजचाचं संबंध पण त्याला काट्यांची किंवा काटेरी डंखाची अजिबात चिंता वाटतं नाही पण फुलांच्या अन् त्याच्या निरागस मैत्रीत मात्र अजिबात उणे  राहत नाही. एक-दुसरा-तिसरा सर्व फुलांशी फुलपाखरू मैत्री करतं. त्यांचे परागकण घेत सर्जनशील आयुष्याचा आनंद घेतं. माणुसकी किंवा मानवता हे शब्द त्याच्या कोसोंदुर असतात. प्रसन्न आयुष्य हा त्याचा जणु मुलमंत्र असतो. उन्हाळा,पावसाळा,थंडीची त्यास तमा नसते, तर आनंदी जगणं हा त्याचा ध्यास असतो.
            माणसांचं जीवन मात्र फुलपाखरांपेक्षा किती तरी जास्त काळ असतं, पण आपण फुलांपेक्षा डंखाचा आपण विचार जास्त करतो त्यात जास्त वेळ घालवतो. आपण फुलपाखराकडं पाहतो क्षणभर डोळ्यांना बरं वाटतं. ते नजरेआड झालं की, विचार सुरू होतो जीवनाचा मग मला प्रश्न पडतो माणुस जगतो कशासाठी ? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत राहतं. मग डोळ्यासमोर येत फुलपाखरू स्वत: ची वाट शोधत आनंदी होण्यासाठी आणि या जगण्यासाठी-जन्मावर शतदा प्रेम करण्यासाठी...
किरण पवार,औरंगाबाद:
 या ओळीनुसार लक्षात घ्यायच झालं तर बरच काही समजून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं होतं की, एखादी गोष्ट आपल्याला विशिष्ट पद्धतीत विचार केल्याने चुकीची वाटून जाते. किंवा आपण त्या गोष्टीबद्दल साशंकता बाळगतो. एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण देतो.
            आपण तरूण वयातली मुलं खूप वेळा आई‌वडीलांशी छोटेसे मतभेद होत असले तरी बऱ्याच वेळा आपण त्यांच्याशी अगदीच टोकाची भूमिका घेऊन वागतो. आपल मत नोंदवताना त्यांना अस वाटत नाही की एकदा घरच्यांशी स्पष्टपणे बोलायला हवं, असो.
            अशी खरतर बरीचशी उदाहरन आपण वेगवेगळ्या साच्यात, वेगवेगळ्या बंधनात अडकलेली पाहतो. पण आपण एखादा गुंता स्पष्ट आणि *समोरासमोर विचार* करून न सोडवता खोट्या गोष्टींचा आधार घेऊन तो वाढवतो. त्यामुळे वास्तवतेत असलेले फुलपाखराचे पंख हे आपल्याला काटेरी डंख वाटतात.
         शेवटी एवढंच मत मांडतो की, जर जीवन खरच नेटकं व सुंदर बनवायच असेल तर वास्तवतेच्या जगात थोडा *खऱ्याचा आणि स्पष्टपणाचा* आधार घ्या.
         ‎
अजय नरवडे,लातूर:
जीवनाच्या दुनियादारीत अडकल्यावर काटेरी झुडपं खुप येतात, पण संकटांवर स्वार होण्याचं भाग्य काही फुलपाखरांनांचं मिळत.

अमर चिखले,पुणे
जीवन ही अशी गोष्ट आहे की वि.दा.करंदीकर सांगतात की सांगा कसे जगायचे कन्हत कन्हत की गाणे म्हणत
म्हणजे चांगले जगलो तर जीवनाला अर्थ आहे नाही तर व्यर्थ आहे. जगताताना असे जगावे की साऱ्या दुनियेला आदर्श ठरावे .मग आपल्याला ते काटेरी डंख नाही तर फुलपाखराचे पंख वाटतील.
   

सोमनाथ आदमिले,पंढरपूर
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष  अटळ आहे ,अडचणी तर आहेत परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर निश्चितच त्यातून मार्ग निघत असतो त्यामुळे वरील शीर्षक योग्य ठरते .

जीवन जगत असताना काटेरी डंख आहेतच त्याकडे उघड्या डोळ्याने पहिले  आणि सकारात्मक विचार केला तर ते आपल्याला फुलपाखरांचे पंख वाटतील आणि त्यावर स्वार होऊन आपण आपली प्रगती निश्चितच करू शकतो .

स्वामी विवेकानंद म्हणतात की,   'जेवढा मोठा संघर्ष तेवढा विजय मोठा असणार .
आपण जीवन जगत असताना आपले मित्र ,नातेवाईक आणि समाजातील लोक यांच्याबरोबर बऱ्याच वेळेला गैरसमज होत असतात ते जर आपण समजूतदारपणे समजून घेतले किंवा दुर्लक्ष केले तर बरेच वाद टाळले जातात .

त्यामुळे जीवन जगत असताना आपल्या मार्गातील अडथळे दूर करून किंवा दुर्लक्षित करून  भविष्याचा वेध घ्यावा आणि आपले जीवन समृद्ध करावे.
राज इनामदार,पंढरपूर

बाँसुरी से सीख ले सबक ए ज़िन्दगी,
छेद हैं कितने सीने में फिर भी गुनगुनाती है|

मानवी आयुष्य हे अनंत अडचणी , दुःखे , अशा गोष्टींने  भरलेलें जरी असलेना मित्रांनो तरी सुद्धा या गोष्टी जीवनात येणे सुधा गरजेचं असत .आयुष्यात अपमान , अपयश आणि पराभव हेही गरजेच आहे ,कारण यामुळेच पेटुन उठतो आपला स्वाभिमान जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो आपल्यातील खंबिर आणि अभेद माणूस.  जिराफच्या पिलाला जन्म घेतां ना कदाचित तुंम्ही बघितलं सुधा असेल .की हे पिलू मातेच्या गर्भाशयातूंन अंदाजे दहा ते बारा  फुट ऊँचीवरून जमिनीवर पड़ते .या पिलाला त्याची माता पाच मिनट पाजते व चाटते .व नंतर अचानक आक्रमक रूप धारण करते या नवजात पीलाला धडाधड लाता मारायला चालु करते .पहिल्या लाथेला हे पिलू दूर फेकले जाते .मात्र जमिनीवर पडून राहते .परत लाथ बसल्यावर उठून उभा राहण्याचा प्रयत्न ते पिलू करू लागत .
ज्या वेळी असंख्य लाथा खाल्यावर हे पिलू स्वतच्या पायावर उभे राहत .तेव्हा त्या पीलाची आई त्याला परत चाटते व पळायला लागते तेंव्हा हे पिलू सुधा आईच्या माघे पळू लागते .
ती आई त्याला या साठीच लाथा मारीत असते की .हे पिलू स्वतच्या पायावर जन्मताच उभा राहावे व हिँस्रश्वापदा पासून त्याचे संरक्षण झाले पाहिजे त्याला पळता आले पाहीजे . ही नियती सुधा जेव्हा आपल्या आयुष्यात नवीन संकटे , आव्हाने , अपयश घेवुन येते तेंव्हा ऐक प्रकारे आपल्याला ती सामर्थ्यवानच बनवत असते.भर दरबरात विष्णुगुप्त पंडिताचा अपमान राजाने केला.त्या अपमानातूंन पेठुन उठून आचार्य चाणक्य झालें.
Dr .APJ कलाम वैमानिक या पदासाठी मुलाखत देण्यास गेलें  असता .त्यांना सोडून सर्व उमेदवारास घेण्यात आले.dr.कलाम मनातून नाराज झाले .तेंव्हा मठातील ऐका गुरुंनी त्यांना सांगितल की,  कलाम कदाचित नियतीला मान्य नसावे की तु वैमानिक व्हावे .तुझ्या हातून मोठ काहीतरी कामं करून घ्यायचं असेल परमेश्वरास.त्या जिद्दीतुंन अग्नी मिसाईल निर्माण होवून. missile man ह्या नावाने सार जग त्यांना Dr.कलाम यांना ओळखू लागल.सुंदर गाणाऱ्या पक्षाला सुधा जेव्हा काळजात काटा घुसतो तेंव्हाच मधुर आवाज़ निघतो .
कारण काटेरी डंक जो पर्यंत होत नाही तोवर ओठांनवर मधुर गीत येणं अशक्य आहे.

असे जगावे छातीवर लावून आव्हानाचे अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

तेजस्विनी जाधव,पुणे:
फुलपाखराचं आयुष्य किती लहान  असतं तसेंच आपल्या अडचणीचे,दुःखाचे असते, जे आज आहे तर उद्या नसते पण आपण मात्र त्या दुःखातच एवढे गुंग होऊन जातो की आपल्याला आनंदी क्षणाचा विसर पडतो.

अशी आपल्या आयुष्यात एखादी एक तरी घटना घडते ज्यामुळे  आपल्याला एखादी गोष्टी खुप दुख:दायक वाटते ,काटेरी डंक सारखी त्रासदायक वाटते आणि आत्मविश्वास पूर्ण पणे खचून जातो समजत नाही काय करावे ........आणि त्या गोष्टीबद्दल एक भीती मनात निर्माण होते ,माझ्या आयुष्यातील एकघटना म्हण्जे लहानपणी उंच उडीचा खेळ खेळताना मी पडले होते माझा पायाला खूप लागले किती दिवस तरी मला चालता नव्हते येत मला आणि त्यानंतर अजुन परत तो खेळ मी नाही खेळला, अजुनही माझी मानसिकता नाही झाली परत तो खेळ  खेण्यासाठी.

आता मी खूप लांब आहे खेळांपासून..... ही भिती म्हण्जे एक काटेरी डंकच आहे जो मी दूर करायला पाहिजे आणि त्या फुलपाखराच्या पंखारखी माझी भीती दूर करून अस आयुष्यातत आनंदाने जगायला पाहीजे. मी नकीच प्रयत्न करेल..
       जगतांना माणसाचा आयुष्यात अडचणी असणे पण आवश्यक आहे ,आयुष्यात सगळंच सहज मिळत असतें तर आनंददाची किंमत कोणालाच समजली नसती.
आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्याचावर मात करून जगायला शिकलं पाहिजे ,एखादी गोष्ट मागे राहिली जगताना तर  हसतहसत दुसरी गोष्ट मिळवा मग बघा आयुष्य किती सुंदर होतंय!!

रविराज अकोस्कर,लातूर:
हो खर आहे..
आपल्या आयुष्यात खुप असे क्षण असतात जेंव्हा आपण दुखावले जातो.स्वतला त्रास इजा करून घेतो पण आपल्याला हे ठाऊक नाहीये की नेमकं चुकतय काय ?
प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा केवळ 2 गोष्टी नी शुद्ध राहू शकतो -
1)चांगले विचार
2)चांगले वाचन ...
म्हणून मला वाट्त ह्या काटेरी जीवनाचा विचार न करता ह्या सोनेरी पंखांचा वापर करून घ्यावा.

कृष्णकांत राईलकर,डहाणू
परिवर्तन हा सृष्टीचा नियमच आहे.या न्यायाने चौऱ्यांशी लक्ष जीवयोनींचा अभ्यास केला तर असे लक्षात घ्यावयास हवे की प्रत्येक सजीवाला  अगदी जन्मापासून स्थित्यंतराना सामोरे जावे लागत असते.
प्राथमिक अवस्थेत कोणतिही गोष्ट ही अपरिपक्वच असते.कालांतराने जसजशी प्रगती होऊ लागते जसजसे बाह्यसंस्कार , अतर्संस्कार घडत जातात तेव्हा काटेरी सुरवंटाचे फुलपाखरु होण्यास वेळ लागत नाही.आणि संपूर्ण जिवस्रुष्टीला हा नियम लागू होतोच .ती समस्त प्राणीमात्राची व सृष्टीची अपरिहार्यता आहे.
त्याची येथे दिलेल्या उदाहरणा दाखल जी फुलपाखरू बनण्याची फलश्रुती आहे ती परिपक्वतेची तीच निसर्गदेवतीची  अप्रतिम,सुखद् अशीच कलाकृती होय.


पवन खरात,अंबाजोगाई:

पंखात बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं...
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं..
  
खरंच जे बाळ आई वडिलांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे  जपलेले असते . स्वतःच्या सर्व इच्छा , अपेक्षा एवढच काय तर कुठलाही परतीच्या मोबदल्याची शंका सुद्धा मनात आणलेली नसते. तेच बाळ जेव्हा तरुण होते, करते होते, स्वतःच्या पायावर उभा राहतं, तेव्हा मात्र स्वतःला फुलपाखरं सारखी जपणारे तेच आई वडील सांभाळायची वेळ येते तेव्हा मात्र ते काटेरी निवडुंगा सारखी वाटतात.

आई वडील यांचे प्रेम माया आणि राग या गोष्टी कधीही अनेक युवकाला खूप त्रास दायक वाटत.त्या समजून घ्या कारण जीवनात हेच फुलपाखरचे पंख असतात , जे अनेकांना काटेरी डंक वाटतात.

क्षितीज गिरी,सातारा
पैसा म्हणजे सुख हे गणितच झाले आहे आपले ते पहिल्यादा चुकीचे आहे असे मला वाटते। लहान लहान गोष्टी मध्ये पण आपल्याला आनंद शोधत आला पाहिजे कितीही दुःख असले तरी हसत हसत आयुष्य जगाता आले पाहिजे
आयुष्यात कोणत्या घटनेला किती महत्व देतोय यावरून तिची किंमत ठरत असते त्यामुळे कोणाला किती महत्त्व देयचे हे आपल्याला कळले पाहिजे.

     

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************