करिश्मा डोंगरे,पंढरपूर.
एकदा मूलगी म्हनते.....
बाबा हे झाड आपण बागेत लावले तर,
छान येईल.
बाबा विचारात पडतात?
मूलीला म्हणतात........
आग वेडे हे चार वर्ष जुने झाड आहे.
बागेतल्या मातीमध्ये कसे येईल.
खूप अवघड जाईल.
मुलगी बाबांना म्हनते.....
बाबा अजुन एक बावीस वर्षाचं झाड आहे.
ते नवीन जाग्याला कसे येईल?
मुलीच मन ओळखले बाबांनी.
आणि हसत -हसत म्हनाले...
मुली अगं स्रियांजवळ अशी शक्ती आहे,
की एका झाडापेक्षा कमी नाही.
नविन वातावरणात राहून दुसऱ्याची सेवा
करण्याचं काम
एक स्रीच करू शकते.
मूलीपासूनच एक आई,बहीन,बायको बनतात.
स्री आहे म्हनूणच आपण सगळे आहोत.
हे सगळे समजनारा एक बापच असतो.
पवन खरात,अंबाजोगाई
बाप
बाप मरून नुकते आठच दिवस झाले होते,
बालपण आतापर्यंत आनंदांत गेले होते ।
हसत खेळत घास भरवणारा अचानक गेला
भाकरीसाठी मोतल नियतीने कसा घात केला ।
हे मतलबी जग सुद्धा किती सुंदर वाटायचं
खांद्यावरून बापाच्या भुरळ घालत असायचं ।
बाप आता फक्त त्याच्या मनातच हसायचा
वाटेवरचा काटा पायात अनेकदा रुतायचा ।
जे मिळल ते आपल बाकी नशिबावर सोडून द्यायचा
एक रुपयाच्या चॉकलेटसाठी कितीदा झुरायचा ।
रुसायचा हक्क ही कधीच हिरावला होता
न मागता देणाराही आता दुरावला होता ।
भाकरीच्या उपकारांच ओझं जड झालं होतं
उरलं तर काहीच नाही होत तेही गेलं होतं ।
बापाचं छत्र हरवून तो पोरका झाला होता
पावलापावलावर मरून ही जगू लागला होता ।
जिवंत असताना बापाची किंमत कळणार नाही,
पण लक्ष्यात ठेवा हे कवच पुन्हा मिळणार नाही ।
हीच वेळ आहे त्याला प्रेमाने घट्ट मिठ्ठी मारायची,
वाट का बघायची पुन्हा आयुष्यभर पश्चाताप करायची ।
तुझ्या मध्येच तो स्वतःच जग पाहत असतो,
तुझ्याचसाठी एक वेळ उपाशी राहत असतो ।
नंतर आसवं ढाळून काही उपयोग होणार नाही,
तू आहेस काळजाचा तुकडा पण
तो राहणार नाही ।
राहुल आनपट,मंगळवेढा.
घरातली अर्थव्यवस्था सांभाळून
मोडून गेला त्याचा कणा
फाटक्या बनियनला रफ्फु करून
घरातल्या अर्थव्यवस्थेचा बळकट करायचा कणा.....
काय लागत नाही शिक्षणासाठी
कमी काही दिलं नाही देताना
मला कळून चुकतंय कुठंतरी
माझा बाप समजून घेताना....
उभ्या निरभ्र आभाळाखाली
दाणे विश्वासाने पेरतो
येतात ढगही दाटून
थेंब थेंब पावसाचा तो उभ्या उभ्या झेलतो....
माया धरित्रीवर त्याची
करी जीवापाड कष्ट
येता पीक तरारून
होई कधी निसर्ग ही दुष्ट.....
कधी नाही खचला बाप
डोंगराएवढ्या दुःखाला पाहून
साऱ्या देशाचं सुख - दुःख
नेतो पाठीवर वाहून.....
आडा-कुडाचं घर त्याच
नाही झोपडीला दार
येता मृगाचं वारं
घर दार घेऊन जाई सारं....
माझ्या बापाची कमाई
सर्जा राजाची जोडी
त्याच्या हातच्या भाकरीला
येतेय मधाची गोडी....
त्याला नाही मिळाला
त्याच्या कष्टाचा मान
स्वतःच्या कष्टाचं देतो
दुसऱ्याच्या झोळीला दानं.....
चुकतो आम्ही कधी कधी
बापाची व्याख्या देताना
कुठंतरी चुकतंय आमचं
बाप समजून घेताना.......
बाप समजून घेताना......
वाल्मीक फड, नाशिक.
बाप काय असतो,बाप किती गुप्त प्रेम आपल्या मुलाबाळांवर करतो,किती त्याची धडपड मुलांचे आयुष्य सुकर करण्यासाठी असते हे मला अक्षरशः बाप झाल्यानंतरच कळाले.त्याला कारण म्हणजे अगदी लहान वयात असताना आमचे वडील गेल्याचे सांगतात.तेव्हा बाप अगोदर काय समजणार आम्हाला?
परंतु जसजसे दिवस सरकत गेले तसे आम्ही मोठे झालो लग्न झाले तसा आम्हाला बाप काय असतो ते कळायला लागले. खरंतर अनेक व्याख्याने ,पुस्तके ह्या गोष्टिंतून कधीच म्हणावा असा उल्लेख बापाचा कधीच झाला नाही.ऊलट आईचे केलेले कौतुक आपल्याला प्रत्येक क्षेत्रात वाचायला पहायला मिळेल पण बापाचे शक्यतो नाहीच.
आज स्वतः बाप असल्याने ह्या जाणीवा क्षणाक्षणाला होत असतात.कदाचित आपलाही बाप आज जिवंत असता तर आज आपण जी तळमळ,काळजी आपल्या मुलाबाळांची वाहतो आहोत तशीच आपल्या बापाने आपलीही घेतली असती.जसे की आपला मुलांनी उच्च शिक्षण घेऊन काहीतरी इतिहास घडवावा वगैरे वगैरे.
बाप हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे.आई मायेची सावली असेल तर बाप हा वडाच्या सावलीप्रमाणे विस्तृत सावलीचा वर्षाव करत असतो परंतु त्याचं प्रेम हे गुप्त स्वरुपाचं असतं ते अनेक मुलांच्या लक्षात येत नाही आणी ज्या वेळेस लक्षात येतं त्यावेळेस बाप नावाची ही सावली ह्या जगातून लोप पावलेली असते. मला बापाबद्दल इतका काही लिखान कोठे सापडलं नाही परंतु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज एका अभंगात बापाबद्दल वर्णन करताना दिसले.."जगी ऐसा बाप व्हावा ।ज्याचा वंश मुक्तीस जावा।"."जगी बाप होता गुणी । तैसे आम्ही लागलो ध्यानी।".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा