एन्काऊंटर ताबडतोब न्याय की व्यवस्थेचे अपयश झाकण्याचा प्रयत्न?



🌱वि४🌿 या व्हाट्सअप ग्रुपवरून




Image :- Internet

चैतन्यकुमार देवकर


खरंतर एन्काऊंटर हे आत्मसंरक्षणाचा शेवटचा उपाय

म्हणून पोलिसांनी वापरण्याचं शस्त्र असताना आज-काल अनेक एन्काऊंटर होत असतात.

खरंच इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार किंवा आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करतात का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

तसं पाहिलं तर एन्काऊंटर म्हणजे न्यायव्यवस्थेचा अपमान असंच म्हणावे लागेल परंतु तरीही अगदी अटीतटीच्या वेळी वापरण्यासाठी त्याची परवानगी आहे. आपली न्यायव्यवस्था धीम्या गतीने चालते आहे हे खर आहे आणि त्यामुळे एन्काऊंटर ची मानसिकता सामान्य लोकांनाही लगेच न्याय मिळाला असं वाटणं साहजिक आहे. आपल्या न्यायव्यवस्थेत ही सुधारणा होऊन लवकर कार्यवाही पूर्ण होणे आवश्यक आहे.

एखाद्या आरोपीचा एन्काऊंटर झाला म्हणून लगेच अमुक अमुक ला न्याय मिळाला असं म्हणून सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवले जाते. परंतु बहुतांश वेळा आरोपी हे गुन्हेगार असल्याचे सिद्ध झालेलं नसतं आणि यातून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचा हा प्रकार असतो.

सत्ता किंवा पैसे यांचा वापर करून एखादी बडी असामी गुन्हा करणार आणि त्या बदल्यात कोणा अन्य माणसाचाच एन्काऊंटर करून ती केस बंद होणार. 

विकास दुबेच्या प्रकरणात सुद्धा तेच झालं असावं. कुठलंही एन्काऊंटर हे विनाकारण होत नसतं ज्यावेळी गुन्हेगाराला जिवंत पकडल जातं आणि  होणारे खुलासे हे सिस्टिमला, व्यवस्थेला अडचणीत आणणारे ठरणार असतील तर मग त्याचा एन्काऊंटर करावा लागतो. त्याशिवाय गुन्हेगारांचे आश्रयदाते सुरक्षित कसे काय राहू शकतील?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या माहितीनुसार 1 जानेवारी 2015 ते 20 मार्च 2019 या कालावधीतच 211 फेक एन्काऊंटर समोर आले. त्यामध्ये आंध्र प्रदेश अव्वल स्थानी तर उत्तर प्रदेश द्वितीय स्थानी होते.

शेवटी एवढेच म्हणावे लागेल , की व्यवस्थेच्या अपयशा ला झाकणं म्हणा किंवा अक्षमतेमुळे एन्काऊंटर सारख्या प्रकाराला खतपाणी मिळत आहे.




Image :- Internet

जगताप रामकिशन शारदा.

बीड.


कानपूर, हैदराबाद, बाटला हाउस, मुंबई, अंडरवर्ल्ड, चकमकफेम,दया नायक,प्रदीप शर्मा, रेगे मराठी चित्रपट अशी मराठी शब्दांची यादी ही एन्काऊंटर या शब्दाशिवाय अपूर्ण.


एन्काऊंटर शब्द ऐकताच डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतो तो रिव्हॉल्व्हर ताणलेले पोलीस जीव वाचवण्यासाठी पळणारे गुन्हेगार किंवा पोलिसांना प्रतिउत्तर गुन्हेगार. थोड्याफार फरकाने प्रसंग असाच असतो.


एन्काऊंटर हा सुरवातीपासूनच वादग्रस्त विषय राहिलेला असून याला सर्वोच्च न्यायालयाने 'कायद्याच्या चौकटीबाहेर केलेल्या हत्या".असे ताशेरे ओढलेले आहेत.एन्काऊंटर केल्याने ताबडतोब न्याय मिळतो का? किंवा परंपरागत न्यायव्यवस्थेत असणारे गुण दोष झाकले जातात का? हे न्यायव्यवस्थेचे अपयश आहे का? अंतिम निर्णयावर येण्यासाठी काही गोष्टी समजणे गरजेचे आहे.


    भारतीय संविधानात जीवन जगण्याचा हक्क कलक्ष २१ अंतर्गत सर्वांना बहाल केलेला आहे आणि तो मुलभूत हक्क असल्याने कोणत्याही परिस्थितीत तो हिरावून घेतला जाऊ शकत नाही अपवाद न्यायालयिन प्रक्रियेचा अवलंब करून जर कोणी समाजामध्ये अवमानवीय काम केले असेल किंवा केलेला गुन्हा हा अतिदुर्मिळातील दुर्मिळ अशा पध्दतीचा असेल तर त्याला देहदंडाची शिक्षा सुनावली जाते. या पध्दतीशिवाय इतर कोणत्याही पध्दतीने माणसाला मारणे हे गुन्हा आहे तर मग प्रश्न पडतो कि एन्काऊंटर मध्ये याला सुट आहे का तर नाही पण पोलिस आधिकाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर स्वरक्षणासाठी करणे कायद्याच्या चौकटीत बसते पण त्याला कारणही तसेच भक्कम असावे लागते. उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी एक तरुण राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय आणि बिहारी यांच्याविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा राग मनात धरून मुंबई मध्ये आला आणि तो शस्त्र सज्ज होता. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना धमकावत राज ठाकरेंच्या निवासस्थाकडे बस घेऊन जाण्याचा आदेश देत होता संबंधित बातमी मुंबई पोलिसांना समजली आणि ते घटनास्थळी दाखल झाले. त्या तरुणाला करत असलेल्या गुन्हाची जाणीव व  होणारे परिणाम यांची माहिती देऊन शरण येण्यास सांगितले पण तो काही ऐकला नाही परिणामी पोलिसांशी चकमक करताना तो मारला गेला. परिणामी विविध राज्य विरुद्ध महाराष्ट्र असा वाद पेटला पण पोलिसांनी केलेली कामगिरी हि परिस्थितीला सुसंगत होती आणि त्यात कोठेही विसंगती नसल्याने तणाव लवकरच निवळला नाही तर एन्काऊंटर झाला लागली मागे चौकशी, झाल्या कोर्टाच्या वाऱ्या चालू अशाही गोष्टी कमी नसतात. या प्रसंगात जर तुम्ही म्हणाल एन्काऊंटर ताबतोब न्याय अथवा परंपरागत न्यायव्यवस्थेचे अपयश का? तर दोन्ही गोष्टी नाही फक्त वेळेची गरज. पण बऱ्याच वेळा एन्काऊंटर हे विशिष्ट उद्देशाने केले जातात जसे की विरोधी टोळीचा दरारा कमी करण्यासाठी एका टोळीकडून दुसऱ्या टोळीतील गुंडांची टिप दिली जाते, काही वेळा आपले पितळ उघडे पडू नये म्हणून पोलिसांना हाताशी धरून एन्काऊंटर केले जातात परिणामी बोगस चकमक आणि एन्काऊंटर मुळे अनेक जण तुरुंगात गेलेले आहेत.


आता आपण न्यायव्यवस्थेकडे येऊ. 1993 चा बॉम्बस्फोट असो नाही तर साधारण जमीनीच्या वादाचे प्रकरण किंवा कसल्याही कायदेशीर कामकाजाचा फेरा येण्याची शक्यता वाटली की लहानथोरांपासून सगळ्यांना देव आठवतात कारण त्या प्रक्रियेला लागणारा वेळ. उशिरा मिळालेला न्याय हा केलेला अन्याय असतो असेही म्हणतात पण गोष्ट न्यायव्यवस्थेवर ठपका ठेवून चालणारी नाही कारण प्रलंबित असणाऱ्या खटल्यांची संख्या आणि अस्तित्वात असणारे न्यायालये वआवश्यक कर्मचारी यांच्यात जो जमीन आसमानचा फरक आहे तो कसा दूळ करणार हे आपण कधीही विचारत नाही. न्यायव्यवस्था कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आहे पण कायदे करण्याचा आधिकार आपण संसदेला दिलेला आहे म्हणून आपण न्यायव्यवस्थेला दोष देऊ शकत नाही.कारण कायद्यातील पळवाटांचा उपयोग करून कशाप्रकारे विलंब लावता येऊ शकतो हे आपण दिल्लीच्या निर्भया खटल्यामध्ये पाहिलेले आहे म्हणूनच याला न्यायव्यवस्थेच अपयशही मानता येत नाही हे खर तर लोकशाही अपयश आहे . घटना घडल्या नंतर कायद्यात सुधारणा करणे किंवा नविन कायदा आणणे आणि वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम हे न्यायालयाचे नाहीये आणि भावनेच्या आहारी जाऊन निर्णय देणे हे न्यायव्यवस्थेचे काम नाही.




Image :- Internet

पवन खरात,

अंबाजोगाई.


एन्काऊंटर शब्द हि कानावर पडला की आठवतो आत्मसंरक्षण. आत्मसंरक्षण करताना झालेली हत्या पण या नाण्याला सुद्धा दोन बाजू आहेत. एक एन्काऊंटर घडणे आणि दुसरी म्हणजे एन्काऊंटर घडवून आणणे. महत्वाचे आहे यामध्ये नेमकं कोणाचा बचाव केला जातो पोलिसांचा कि गुन्हेगारांचा. सर्वच एन्काऊंटर खोटे आहेत असं नाही पण नक्कीच खऱ्या एन्काऊंटर पेक्षा फर्जी एन्काऊंटर चे प्रमाण वाढत तर नाही ना ? याचा हि विचार होणे गरजेचे आहे. गुन्हेगारीच्या या विशाल वृक्षाला अनेक गुन्हेगार हे नवनवीन फांद्या फुटल्याप्रमाणे वाढत असतात आणि याला मिळत असलेल्या राजकीय खत पाण्यामुळे ते अधिकच फोफावत चालले आहेत. किती हि गंभीर गुन्हा असला तरी राजकीय वरदहस्त गुन्हेगारांना वाचवत आले आहेत आणि जर गुन्हेगार पोलिसांच्या हाती आले तर राजकीय क्षेत्रातील नावे उघड होऊ नयेत म्हणून पोलिसांना सोबत घेऊन ही गुन्हेगारांचे एन्काऊंटर करून या फांद्या गुन्हेगारी वृक्षापासून वेगळ्या केल्या जातात आणि आपल्याला वाटत एन्काऊंटर झाला म्हणजे ताबडतोब न्याय झाला. जर तुम्ही झाडाच्या फांद्या तोडत बसलात तर त्याची जागा पुन्हा दुसरी फांदी घेतेच म्हणून ते झाडच मुळापासून उपटून टाकावं. एन्काऊंटर ला माझा विरोध नाही पण एन्काऊंटर हे पोलिसांच्या आत्मसंरक्षणासाठी असावे त्याचा गैरफायदा घेऊन गुन्हेगारांचे संरक्षण करू नये. जर असंच घडत राहील तर ताबडतोब न्याय तर मिळणारच नाही पण व्यवस्थेचे अपयश अतिशय उत्तमरित्या झाकलं जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************