माझा आवडता चित्रपट


Source : INTERNET

-माया सूर्यकांत मुळे 

 उस्मानाबाद



    जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला "थप्पड" च्या निमित्ताने "ती" पुन्हा अधोरेखित केली गेली. 'बस इतनी सी बात'...हो जाता हैं... Just a slap...निमित्त मात्र एवढंच पण, खूप खोलवर रुजलेलं; पिढ्यानपिढ्या....! 

    अनुभव सिन्हा नेहमीच सामाजीक प्रश्नांना आपल्या सिनेमातून मांडत असतात.. या सिनेमाची कथा पण रोजच्या आयुष्यावर बेतलेली पण, खरमरीत भाष्य करणारी आहे. प्रश्न केवळ एका 'थप्पड'चा नाहीये तर पश्नचिन्ह लावलं आहे समाजाच्या मानसिकतेवर....! लिंगभावविषयक दृष्टीकोनावर....! महिला आणि अमुक एक गोष्ट हे पिढ्यांनपिढ्यांच जणू समीकरणच ठरलेलं आहे. स्त्री म्हणून तिला घर सांभाळता आलं पाहिजे, सगळ्या घराची जबाबदारी तिच्यावरच, तिला सर्वकाही सहन करता आलं पाहिजे; तिनं ते शिकलं पाहिजे...नवरा-बायकोत भांडण होणं हे काही नवीन नाही... त्यामुळे तिनं ते सहन केलं पाहिजे, घरेलू हिंसा ही प्रत्येकच घरात घडत असते त्यात नवीन काय....! 

        जेव्हा एक स्त्री लग्न करून नवीन घरी येते तेव्हा ती त्या घराची जबाबदारी सर्वार्थाने स्वीकारते त्यासाठी स्वतः ची ओळख ही मागे टाकते.. तिला पण करिअर, इच्छा-आकांक्षा, महत्वाकांक्षा असतात पण,  कुटूंबापुढे ती या सगळ्यांचा जाणीवपूर्वक विसर पाडून घेते....पण, मग तिला सतत गृहीत धरलं जातं, आपला पार्टनर त्याच्या महत्वाकांक्षेपोटी तिची किती भावनीक, मानसिक फरफट करतो, तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यातून उदभवणाऱ्या ताण-तणावात तिचाच बळी जातो आणि एवढं सारं होऊन देखील त्याला त्याची खंत वाटत नाही उलट तो त्याच्याच अडचणींचा पाढा वाचतो.... it happens...होता हैं...!  हीच भूमिका रेटतो.....

     सर्वांदेखत झालेली हिंसा(अपमान) "ती" ला विचार करायला भाग पाडते, सुन्न करून टाकते, हरवलेल्या "स्व" ची जाणीव तिला पोखरू लागते... ती विचार करायला वेळ मागते मात्र,  'हे नवीन नाही तुला ऍडजस्ट करून घ्यावं लागेल' याच सल्ल्यांचा भडिमार तिच्यावर सुरू होतो.... कायद्याच्या चौकटीत अडकवून तिला नोटीस पाठवून नवरा स्वतः ला सुरक्षित करायचा प्रयत्न करत राहतो मात्र तरीही तो सुशिक्षित, सुसंस्कृत दाखवण्यात आला आहे. घरातील प्रत्येक "स्त्री" (आई आणि सासू) तिलाचं स्त्री असण्याच्या जबाबदाऱ्या सांगत असतात मात्र 'त्याला' त्याच काय चुकलं हे कुणीच बोलत नाही जेव्हा कि याचे चटके त्यांनाही सोसावे लागलेले असतात...

   घरकाम करणाऱ्या बाईपासून ते उच्चशिक्षित, गृहिणी ते नोकरदार या सर्व महिलांचं प्रतिनिधित्व हा सिनेमा करतो. सुशिक्षित घरातही "ती" च उपेक्षीत्व केंद्रस्थानी ठेवून स्त्री जिवनाची रूपं समोर आणलेली आहेत." मुझे गाडी चलानी सिखणी हैं,... तुम पहले पराठे बनाना सिख लो"|  "रिश्ते बनाने में ज्यादा effort नहीं लगती, जीतना निभाने में लगती हैं"|  "पहली बार उसने मुझे थप्पड मारी.. नहीं मार सकता"| "थप्पड इतनी सी बात हैं और मेरी पिटीशन भी उतनी हैं"|  हे संवाद खूप शांत, गंभीरपणे ऐकायला मिळतात. कुठेही आरडाओरडा,  आकरसताळेपणा नाही.. अमरिता शांतपणे, गंभीरपणे मोजक्याच संवादात खूप काही बोलून जाते. तिची घुसमट, अस्वस्थता, स्वतः चा स्वतः शी चाललेला संघर्ष, स्वतः चा आत्मसन्मान टिकवता येत नसल्याची सल... तिच्या मोजक्याच संवादातून मांडली आहे. ज्या नात्यामध्ये प्रेम, आदर, कदर आणि समानतेची वागणूक नाही ते नातं तिला ओढत-ओढत जगायचं नाहीये; नकोच आहे.. ज्यामुळे कुणीच आनंदी राहू शकत नाही... कारण काही गोष्टी या कधीच विसरता येत नसतात... love should not heart...!

 हिंसा ही केवळ शारीरिकचं नसते तर ती मानसिक, भावनिक पण असते... तिला दुर्लक्षित करणं, गृहीत धरनं, अपमानीत करणं, कमी लेखणं, हिणवनं या प्रकारची हिंसा देखील अधोरेखित केली आहे. सासु-सूनेतील नातेसंबंध, मुलांना वाढविणे, स्त्री-पुरुष संबंध, कौटुंबिक हिंसाचार, आधुनिकतेच्या बुरख्यात लपलेल्या गलिच्छ रूढी, परंपरा यांवर जळजळीत अंजन घातलं गेलं आहे. महत्वाकांक्षांमध्ये जशी भावनिक गुंतवणूक असते तशीच ती 'त्याच्यासोबतच्या' आयुष्यामध्ये ही असते..यावर भाष्य केलं आहे.

     खरंतर आपल्याकडे वास्तव हेही आहे की महिला सशक्तीकरणासाठी, सबलीकरणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेले आहेत; होत आहेत मात्र केवळ शिक्षण, स्वावलंबन, आत्मनिर्भरता, आरक्षण, नोकरीच्या समान संधी म्हणजे "ती" चा आदर, "ती" ची समानता होत नाही... sorry हा केवळ एक शब्द नसून ती नात्यांची गरज असली पाहिजे कारण "ती" ला हवं असतं केवळ प्रेम, आदर... Love.... Respect she deserves both...आणि कित्येक पिढ्यांचा "ती" चा मुकेपणा "ती" ला आज बोलायला भाग पाडतो...

    चित्रपटातली गाणी पण खूप अर्थपूर्ण आहेत, त्यात अरजित च्या आवाजाने भावाला न्याय मिळवून दिला आहे. पात्रांची निवड रास्त ठरली आहे... तापसी(अमरिता) rocks again...! प्रत्येक "ती" ला "ती" कुठेतरी, केंव्हातरी मीच आहे असं वाटलं नाही तरच नवल...!!

        



Source : INTERNET

अनिल गोडबोले

सोलापूर


खर तर सगळ्यात सोपा आणि सगळ्यात अवघड प्रश्न. मराठीतील भरपूर फिल्म आवडतात, पाहण्यासारखे आहेत. त्यामुळे एखाद्याचे नाव घ्यावे तर लगेच दुसरं नाव डोळ्यासमोर येत. 


अशी ही बनवा बनवी हा सिनेमा तर मराठी चित्रपटातील हिरा आहे. पिंजरा, सामना, सिहासन पासून अग बाई अरेच्या ते सैराट पर्यंत भरपूर नाव डोळ्यासमोर येऊन गेली.


पण मला आवडलेला चित्रपट या पेक्षा वेगळा विचार मांडणारा चित्रपट म्हणून "मुक्ता" हा चित्रपट आवडतो आणि भावतो देखील.


जात आणि त्याला लागलेली ढोंगी राजकारणी वृत्ती व समोरच्याला संपवण्याचं राजकारण या बाबतीत हा चित्रपट सर्व गोष्टी दाखवण्यात उजवा ठरतो.


गाणी पण छान व मनात रेंगाळणारी आहेत. जब्बार पटेल यांनी दिगदर्शीत केलेला हा एक उत्तम चित्रपट.


बाकी आफ्रिकन- अमेरिकन ची एन्ट्री वेगळाच विचार घेऊन जाते..त्याचे प्रश्न आणि आबासाहेब कणसे पाटील यांची उत्तर कुठेतरी आपल्याला दिल्या प्रमाणे वाटतात...


चोखोबा मंदिराच्या बाहेरच थांबला, हे निरीक्षण आपली जात व्यवस्था अधोरेखित करत हा चित्रपट बरच काही शिकवून जातो




Source :- INTERNET

- अनघा नंदाने


माझा "all time favorite" चित्रपट... "रंग दे बसंती". 

नावाप्रमाणेच हा चित्रपट जीवनाच्या प्रत्येक रंगांनी रंगला आहे. 

यात परंपरांना फाटा देऊन धुंद होऊन जगणारी बेभान तरूणाई आहे, त्याच परंपरेला कवटाळून नव्या विचारांचा विरोध करणारी तरूणाई पण आहे, यांत दोन धर्मांमधे राजकारण्यांनी पेरलेली दुश्मनी आहे, तर गरिबी-श्रीमंती, जात-पात, धर्म, या सर्वांना धुडकावून एकमेकांना जीव लावणारी दोस्ती पण आहे. यात आई वरचं प्रेम आणि प्रेयसीवरचं प्रेमही तितकंच निर्मळ आहे. यांत देशासाठी लढणारा तरूण आहे, त्याच देशाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारे तरूण आहेत,एका राजकीय पक्षाचा सच्चा समर्थक आहे, पण त्याच पक्षाच्या नेत्याला चुकीचं वागताना बघून हातून हादरलेला पण ठामपणे त्याला विरोध करणारा तरूण सुद्धा आहे. 


हे बेभान तरूण एका घटनेने भानावर येऊन एक होऊन अन्यायाला कसे वाचा फोडतात ते या चित्रपटात खूप सुंदररित्या दाखवले आहे.  चंद्रशेखर आझाद,भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अश्फकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल्ल यांची प्रेरणा आणि त्यांच्याचइतका प्रामाणिक लढा या चित्रपटात दाखवला आहे.


पण शेवटी कुठल्याही सत्तेला प्रामाणिक लढा, अन्यायविरोधात कणखर आवाज आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणं नकोच असतं. ते त्यांच्या सत्तेसाठी धोकादायक असतं. मग साम दाम दंड भेद सर्व बेकायदेशीर मार्गांनी हा लढा कायदेशीर रित्या दाबला जातो. त्यांची सत्ता जिवंत राहते, मरतो तो सामान्य माणूस ज्याला कधीकधी आपल्याच हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी "अतिरेकी" म्हटलं जातं. 


"हँप्पी एंडिंग" ची सवय असणाऱ्या भारतीय प्रेक्षकाला हा "रिएँलिस्टिट" एंड आतून बाहेरून हादरून सोडतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************