विठ्ठल... नुसताच देव की समतेचे विद्यापीठ

विठ्ठल... नुसताच देव की समतेचे विद्यापीठ


नवनाथ कुसुम राजाभाऊ जाधव,तांदुळवाडी जि परभणी

असा कुठे देव असतो ?

फक्त दोनच हातांचा
हातात शस्त्र नसलेला
बसायला वाहन नाही
विटेवरच उभा राहतो
असा कुठे देव असतो ?

सोवळं ओवळं न मानणारा
स्त्रियाच काय वेशांनाही अधिकार
अस्पृश्य असो की चांडाळ
सर्वांनाच खुला प्रवेश देतो
असा कुठे देव असतो ?

वनांतराचे सायास नाही
भगव्या कपड्यांचे अवडंबर नाही
कर्मकांड योगयाग विधी नाकारतो
सहजच गीत गाताना सापडतो
असा कुठे देव असतो ?

याला पुरोहित-भटजीही लागत नाही
हा दुध-तुप, खारीक-बदाम खात नाही
भक्तांच्या कन्याच आवडीने खातो
हा सोन्या-नाण्यापेक्षा पानाफुलात रमतो
असा कुठे देव असतो ?

हा जातीच्या नियमाचे कंबरडे मोडतो
धर्मातील पाखंडांचे खंडण करतो
हा कुणाच्याही घरी जेवतो
याला प्रत्येकात माऊलीच दिसतो
असा कुठे देव असतो ?

तपश्चर्या, आराधना, होमहवन काही नको
मुखदर्शनाने पुण्याचा पूरच
एवढंच काय? याचं गाव जरी पाहिलं
तरी हा पातकांच्या राशी जाळतो
असा कुठे देव असतो ?

अवताराची परछाया नाही
की चमत्काराचा लवलेश नाही
तसा हा मंदिरात नसतोच कधी
कष्टकय्रांच्या कामातच सापडतो
असा कुठे देव असतो ?

स्मृती, पुराणे, वेदही दूर सारतो
हा स्वतःचंच तत्वज्ञान मांडतो
सारे भेदभाव गाडून संतांच्या तोंडून
अरे हा तर *संविधानच* बोलतो
अरे हा तर *संविधानच* बोलतो
असा कुठे देव असतो ?
*========================*
पांडुरंगा,
तुला पाहिलंय आम्ही
जनाईच्या गोवय्रा वेचताना
चोखोबासोबत मेलेली गुरे ओढताना
नामदेवासोबत जेवताना
अन् सावताच्या मळ्यात खुरपताना

विठ्ठला,
गोरोबाची मडकी करताना दिसलास
तुकारामाच्या कन्या खाताना हसलास
असा कसा रे तू देव
जनाबाईसोबत दळायलाही बसलास

पंढरीनाथा,
तुकोबाच्या आवलीच्या पायातील काटा तूच काढलास
चोखोबाच्या सोयराचे बाळंतपणही केलेस
सखुबाईच्या घरीही राबराब राबलास
वेशा असूनही कान्होपात्रेला जवळ केलेस

विठुराया,
नाथाघरी आवडीने पाणी वाहिलास
मिराबाईसाठी विष प्राशन केलेस
रेड्यांनाही वेदांचा अधिकार देऊन
तू वेदांनाच आव्हान दिलेस

पांडुरंगा,
आता तुला एवढं करावंच लागेल
पावसाचं पाणी होऊन बळीराजाच्या शेतात मुरावंच लागेल
आता विश्वास नाही राहिला रे इंद्राच्या वरुणाचा
त्यांचा राजीनामा घेऊन सत्ता तुझ्या हाती तुला घ्यावीच लागेल

नरेंद्र हिरालाल पाटील, विमान नगर, पुणे

आपण नुसतंच एक छान काव्य बघितल ज्यात विठ्ठल सर्वांसाठी कासाय हे छान पणे मांडलय.
       अध्यात्माच्या क्षेत्रात विठ्ठल हा हरी आणि हर यांच्यातला भेद नष्ट करतो. विठ्ठलाने डोक्यावर शिव लिंग धारण केलंय. एके काळी या वादात कित्येकांचा जीव ही गेला. त्या दृष्टीने बघितल्यास विठ्ठलाचे अनन्य साधारण महत्व लक्षात येते. विठ्ठलाने खरा अध्यात्म आपल्याला शिकवला. विठोबा आपल्याला कर्मा द्वारे आत्मशुद्धी करून ब्रह्म ज्ञानाची प्राप्ती करून या देवा च्याच स्वरूपात कसे प्राप्त व्हाव हे शिकवलं च नाही तर त्या साठी मार्गदर्शन करण्या करता महाराष्ट्राला एक समृद्ध संत परंपरा देऊन संपूर्ण भारताला उपकृत केले.

अर्जुन(नाना) रामहरी गोडगे,सिरसाव ता.परंडा जि.उस्मानाबाद


          देवदी देव अख्खा महाराष्ट्र मनोभावे श्रद्धेने मानतो तो पांडुरंग..! जेजुरीचा खंडोबा धनगराचा, बाहुबली जैनाचा, जोतिबा मराठ्यांचा, मरीआई मांगाची, सेवालाल बाबा लमानाचा, रोहिदास चांभाराचा, बसवेश्वर वाण्याचा अशी देवाची व संतांची वाटणी जाती धर्मात झाली. पण पंढरीच्या विठ्ठलाचे तसे नाही, सर्वजातीधर्माचे लोक लाखोंच्या संख्येने आषाढि कार्तिकी एकादशीला मोठ्या भक्तीभावाने पांढरी येतात. प्रत्येकला वाटते की आपलाच देव आहे.
           खऱ्या अर्थाने समता निर्माण करण्याचे काम पंढरीचा पांडुरंग करीत आहे. वारीत सहभागी होणाऱ्याला कशाचं बंधन नसतं. गुण्या गोविंदाने सर्वजण सहभागी होतात. वरीसारखा दुसरा उसत्व नाही जेथे धारनिरपेक्ष भावाने लोक एकत्र येतात. विठ्ठलाला बुध्द लोक काना विठया म्हणतात, हिंदू लोक माऊली तर विविध जातीधर्माचे लोक आराध्य दैवत समजतात. काही जरी असले तरी सर्व जातीधर्माच्या लोक माऊलीच्या पायी नतमस्तक होतात, समतेचा संदेश जातो. पांडुरंगाचे भक्तगण विविध जातीधर्माचे लोक होते. सावता माळी माळी समाजाचे, कान्होपात्रा वेश्या, गोरा कुंभार कुंभार समाजाचे असे विविध जातीधर्माचे निस्सीम भक्त पंढरीला न जाता ही त्याच्या बरोबर कायम अजरामर झाले. प्रत्येकाला वाटतो की विठोबा माझंच आहे. दिसायला सावळा दुसऱ्या देवापेक्षा वेगळा हा विठुराया सर्वाना आपल्याचं वाटतो. कोणताही गाजावाजा नाही पाच दहा लाख लोक वारीत सहभागी होतात. एवढे असूनसुद्दा एवढा मोठा समुदाय मोठ्या शिस्तने कसा राहू शकतो हे पांडुरंग करू शकतो.
             जगभरात असा कुठला उसत्व नाही की लोक एवढ मोठ्या एकत्र येतात आणि गुण्यागोविंदाने नांदतात. आपसूकच पंढरीचा विठोबा समतेचे सर्वात मोठे व्यासपीठ बनतो. कोण देव आहे मनो या न मनो अखंड मानवजातीला एका धागात गुंफण्याचे काम पांडुरंग करतो. पांडुरंगा तुझ्या आशीर्वादाने सर्व लोक सुखात नांदू दे ,आपाआपातील हेवेदावे विसरून अखंड मानवजात एक होऊ दे.

रविराज श्याम आकोस्कर,लातूर


पांडुरंग हा श्री विष्णु चा अवतार!!!
आपल्या ला काही न मागणारा सतत फक्त क्रुपा करणारा..
 आपल्या सर्वांना सावलीत आश्रय देणारा....
गेल्या आठवड्यात औरंगाबाद ला जाताना बसमधुन खुप आल्हाददायक असा प्रसंग दिसला --वारीतील सर्व माऊली व व्यवस्थापक यांना एका बहुजन गटाकडून सर्व फराळ व थंड पाण्याची व्यवस्था केली गेली होती ....दुरूनच पाहील खुप आपुलकी आणि प्रेम जाणवत होत ...खरच खुप जवळून त्यांचा एकोपा जाणवला मनाला ..असा कुट्लाच मतभेद किंवा जातीभेद नाही ओ दिसला..दिसली ती फक्त माणुसकी..
आज या वारीला इतकी जुनी परम्परा आहे म्हणूनच आपला महाराष्ट्र खुप सुखात जगत आहे त्यातील एक कारण म्हणजे विठ्ठल....
वरील लेखात सांगीतल्या प्रमाणे प्रत्येकाच्या मनात आपापला देव आहे ...पण विठोबा ते काहिच पाहत नाही किंवा तस पाहण्याची दुर्बुध्ही पण देत नाही ...तो फक्त सामावून घेतो ...
विठोबा च्या सावलीत प्रत्येक जण एकमेकांसाठी फक्त माऊली असतो.तिथे फक्त आपुलकी असते प्रेम अस्त आणि एकी असते ....आणि त्यामुळे आपोआप च आनंद निर्माण होतो आणि तेवढ्या आनंदानं प्रत्येकाला आयुष्य सार्थकी लागल्या सारख वाटत..
म्हणूनच विठ्ठल फक्त देव नसून समतेचे विध्यापीठ आहे ....

लेखात काहीही चुक झाली असेल तर क्षमस्व !!!!!

मयुरी देवकर ,ता.माळशिरस, जि. सोलापूर


            संपूर्ण जगात भारत हा आपल्या संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे.यामध्ये पंढरपूरला विठुरायाचरणी नतमस्तक होऊन लिन होऊन,एकरूप होऊन तहान ,भूक विसरून भक्तिरसात पूर्णपणे न्हाऊन निघण्याचे भाग्य वारकरी पंथालाच लाभले आहे आणि हि सर्व त्या 'विठूमाऊलीची ' कृपा....
            वर्षांनुवर्षे एका विटेवर कर कटेवरती ठेवून भक्तांसाठी थांबलेल्या या माऊलीच्या दर्शनासाठी आषाढ महिना आला की पंढरीचे वेध लागतात मग या वेडापुढे संसार तो काय?? संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालत असताना या वारीमध्ये सर्वजण लहान-थोर,जातीभेद ,श्रीमंत-गरीब हे सर्व विसरून फक्त आणी फक्त विठूमाऊलीच्या भेटीने आतुरतेने भजनात तल्लीन होऊन सोबत च भारुडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून विविध वाद्यांच्या जयघोषात पालखीसोबत मार्गक्रमण करत असतात...हे सर्व केले जाते ते त्या विठूमाऊलीवर असणाऱ्या श्रद्धेमुळे,भक्तांच्या प्रेमामुळे...सर्व भेदभाव विसरून एकरूपतेच हे वरदानही देते हीच विठुमाऊली... आयुष्य जगत असताना अशाप्रकारे विविध संकटांचा सामना करून जगण्याचा आनंद कसा लुटावा हे या माऊलीच्या दर्शनाने समजते....म्हणून हे सर्व या माऊलीमुळेच शिकायला मिळते म्हणूनच 'विठ्ठल' नुसता देवचं न्हवे तर आहे समतेच विद्यापीठ....

सौदागर काळे,पंढरपूर


जगण्यासाठी काय लागतं. पोटासाठी भाकर.तीच भाकर विठोबाच्या मस्तकावरच्या टिळ्यासारखी दिसते.जो समतेचा केंद्रबिंदू आहे असं वाटतं.आजही सर्वात प्रथम देवाला नैवद्य दाखवतात.नंतर स्वतःची पोटपूजा करतात.पण विठ्ठलाचे तसे नाही."आधी पोटोबा मग विठोबा" अशी म्हण रूढ झाली ती विठ्ठलाच्या समर्पण भावनेने.तेव्हा विठ्ठल जणू मला घरात सगळ्यांच्या शेवटी जेवण करणाऱ्या आईसारखा वाटतो.मग विठ्ठलाची विठामाई केव्हा होते समजतच नाही. आता कुठंतरी 'फिरता दवाखाना',' फिरते ग्रंथालय'अशा संकल्पना रुजू लागल्या.पण त्याअगोदर कितीतरी शेकडो वर्षे पंढरीची वारी हे "फिरते विद्यापीठ" कित्येकांच्या पिढ्या घडवत आले असेल, न जाणो.

शासनाने बनवलेल्या आधार कार्डच्या कित्येक शतके विठ्ठल हाच आमचा आधार होता.आजही आहे , उद्याही कित्येक कार्डे आली, तरीही,"माझे माहेर पंढरी,आहे भिवरेच्या तीरी" ही ओळख बदलणार नाही.

विठ्ठल नावाच्या विद्यापीठाने काळ्याकुट्ठ अंधारातही वारकऱ्यांना (शेतकरी, कामगार,मजूर इत्यादींना) स्थिर उभे राहून मुकाबला करण्यास शिकवले.तो देव आहे की नाही माहीत नाही पण
संकटकाळी मानसिक आधार देणारा दोस्त नक्की आहे.

सिताराम पवार, पंढरपूर


महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वरापासून संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्वांनी वारकरी संप्रदायाद्वारे सामाजिक एकोप्याचे कार्य केले. या सर्वांचे दैवत म्हणजे विठोबा.विठोबाला केंद्रस्थानी मानले पण कर्मकांड, अंधश्रद्धा, जातीभेद, वर्गभेद दूर केला. तुकाराम महाराज म्हणतात"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।" तसेच "उच्च निच्च कोणी नाही भगवंता।तिष्टे भावभक्ती देखोनिय"। अशाप्रकारे सर्वप्रकारच्या भेदाभेदला दूर लोटले, आज त्यांच्या या अभंगाची क्षणोक्षणी आठवण करून द्यावी वाटते धर्ममार्तंडांना. तशेच संतांनी विज्ञानाची कास धरायला सांगितली,"नवसाने जर पोर होती।तर कशाला करणे लागतसे पती।"हा तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला. तसेच कुंभमेल्याववर लिहताना" अली सिहस्थ पर्वणी।न्ह।व्याभठा झाली झणी।वरी वरी दांडी बोडी।पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण।" अशाप्रकारे त्यांनी प्रत्यक्ष तत्वानुसार वागा, आचरण करा असे सांगितले. सांसारिक लोकांना तुकाराम महाराज मनतात"जोडोनिय धन उत्तम व्यवहारे।उदास विचारे वेचं करी।उत्तम तोचि एक गती सोडेल ।उत्तम भोगील जीवखणी। आज राजकीय लोक, जे धर्माचा ठेका घेतला त्यांनी हवं ऐकावे.
अशाप्रकारे संतांनी समतेची शिकवण दिली.वारीमध्ये कोण लहान कोण मोठा नसतो"एकमेका लागतील पायी हो". आज मांस खान्यावरन खूप काही चाललंय पण एका अभंगात"मीराबाई साठी घेतो विषप्याला। दामाजीचा झाला पडीवार।सजन कासया विकू लागे मांस।माळया सवत्यास खुरपू लगे।पुढलीकसाठी अजून तिष्ठत।तुका ह्मणे मात धन्य त्याची।अशाप्रकारे विठुरायाची थोरवी वर्णिली आहे.लोकांनी आपले दररोजच वागणं, सत्य, नीती, इमानदारी, धन कमावणे,कष्टाचं महत्व, परस्त्री बहिणीबरोबर मानणे, व्यसन न करणे इत्यादी.
अशाप्रकारे सर्व संतांच्या अभंग, विचार, ओव्या, भारुड याद्वारे वारकरी संप्रदाय उभा असून सर्वाना एकत्र ठेवण्याचं ,गुंफण म्हणजे विठोबा आहे.

किरण पवार,औरंगाबाद

                 मानवाने अलीकडे निर्माण केलेली देवाची प्रतिमा पाहून तरी हे गणित मला थोडंस चुकीच वाटतं. कारण समता म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एकजुटीने राहणे; हे जवळपास काहीस असं. पण आज कितपत समाजात हे पहायला भेटतयं...?? तुमचं म्हणणं आहे की, विठ्ठल हे समतेच विद्यापीठ आहे कारण विठ्ठल या नावात जी काही शक्ती आहे ती महाराष्ट्रातल्या तसेच इतर ठिकाणच्या विविध जातीधर्माच्या लोकांना एकत्रीत घेऊन येते. होतं हे सर्व मान्ययं. पण आपण दरवेळी देवाची लिंक एखाद्या गोष्टीशी जुळवली गेलीच पाहिजे का...??? *आषाढीला एकत्र आलेला वर्ग विठ्ठलात लिन झाल्यावर जशा इतर गोष्टी विसरतो तसा दैनंदीन जीवणात तो कितपत जातीभेद बाजूला ठेऊन जगतो...?* आणि समजा नसत जगेल तर मग विठ्ठलाने शिकवलेली समता जाते कुठे...?? आपण देवाला अमूकतमूक प्रतिक लावत बसतो आणि *मंदिरच्या मंदिरं ऊभी होत राहतात.* फक्त मंदिरं म्हणजे आपला विकास खरचं आहे का...?? विठ्ठल स्वत: सांगतो की, देव त्याच्यासोबत असतो जो स्वत: आपल्या कामात मग्न असतो. संत तुकारामांनी हे सांगितलयं; हे आपण सर्वच जण जाणतो.

बाकी भक्त भक्तीत लिन
जयाचे जे ते कर्म.....
वागे मुर्तीसंगे जो भ्रष्ट
देई निसर्गच जो तो मर्म....!!

नवनीता (शैलेश भोकरे)

कधी न दिसशी
कधी तू असशी
गरीब आम्हा
सदैव पुसशी

कधी न टिपका
कधी तू घटका
गरीब आम्हा
आधार लतिका

कधी न अत्तर
कधी तू उत्तर
गरीब आम्हा
मदत तत्पर

कधी न येशी
कधी तू खाशी
गरीब आम्हा
सदैव तारिशी

कधी न आला
कधी तू झाला
गरीब आम्हा
पालक लाला

कधी न टाळा
कधी तू सोहळा
गरीब आम्हा
सांभाळ बाळा

कधी न भ्याला
कधी तू भोळा
गरीब आम्हा
उद्धार भाळा

कधी न वारा
कधी तू पारा
गरीब आम्हा
तूच सहारा...

वि४ या व्हाट्स अॅप ग्रुप च्या सदस्या प्रा. श्रीमती. संगीता देशमुख मॅडम यावी बनवलेले अभंग👇🏻



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************