लव, सेक्स आणि अश्लीलता या कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे ?

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

लव, सेक्स आणि अश्लीलता या कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे ?

IMAGE SOURCE  INTERNET

शिरीष उमरे, नवी मुंबई

प्रेम, शारिरीक संबंध व अश्लीलता ह्याच्या परिवाख्या कालानुरुप बदलत आहेत...

💝प्रेम हे निस्वार्थी असतच पण त्यात अपेक्षाचे रोप उगवायला लागले की त्याला तडा जायला लागतात... 💔

प्रेम आईचे, मावशीचे, बहीणीचे, भावाचे, बाबाचे, मित्राचे, प्रियसीचे, पत्नीचे व मुलामुलीचे आणि सरतेशेवटी नातवंडांचे ह्या इंद्रधनुष्यी छटातुन 😍🌈व्यक्त होते. काही निसर्गप्रेमी, वाचनप्रेमी, क्रीडाप्रेमी, प्रवासप्रेमी, धनप्रेमी वैगेरे प्रकार पण आहेत. 🤩 ह्यातला व्यक्तीप्रेमी हा प्रकार भयंकरच असतो 😅 जसे चित्रपटातले नायक नायिका वा क्रीकेट फुटबॉलचे खेळाडुचे चाहते ...

शारिरीक संबंध हा अजुनही कुजबुज करण्याचा विषय !! तशी ह्याला राजमान्यता व जनमान्यता पुर्वीपासुन आहे. संयुक्त कुटुंब पध्दत तर शिवकालीन... त्यानंतर रामायणातील बहुपत्नीत्व ब्रह्मचरित्व तसेच महाभारतातील विवाहपुर्व व विवाहपश्चात शारिरीक संबंध, बहुपतीत्व आणि राजा शिखंडी चे नपुसंकलिंगी पात्र व गणिका व्यवसाय हे दर्शवते की आपली संस्कृती कीती प्रगल्भ होती. ह्या विषयावर वात्सायनाने लिहीलेला कामसुत्र हा अभ्यासपुर्ण ग्रंथ कींवा  मध्यप्रदेश मधील खजुराहो मंदीरातील अप्रतिम शिल्पकला वा गडचिरोली मधील आदिवास्यांची गोटुल ही मुक्तसहवासाची सहजिवनाची शैली असो... आपली संस्कृती ह्या विषयाच्या ज्ञानाने समृध्द होती.

 आता मात्र कुटुंबनियोजनाचे अज्ञानामुळे वाढणारी अनिर्बंध लोकसंख्या व त्यातुन निर्माण होणार्या समस्या, असुरक्षित संबंधांमुळे होणारे असाध्य रोग, शालेय शिक्षणात अंतर्भाव नसल्याने होणारे गैरसमज, शरीर रचनेचे अर्धवट ज्ञान, शारिरीक व मानसिक स्वच्छता नसणे व ह्यातुन होणारे विनयभंग बलात्काराचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. आज पुरुषप्रधान संस्कृती मुळे स्त्रीला उपभोगाची वस्तु समजणार्यांचा कडाडुन विरोध करणे व त्यावर कडक कार्यवाई होणे हे अत्यावश्यक आहे.

राहीला प्रश्न अश्लीलतेचा तर तो उदभवतो अशिक्षणामुळे व अनैतिकतेला मिळत असलेल्या बेकायदेशीर राजमान्यतेमुळे. विकृती जन्म घेते ह्यातुन व हा मानसिक रोग मिटवण्याची सामाजिक ईच्छा च दिसत नाही त्यामुळे शिक्षण अत्यावश्यक... जागतिक आरोग्य संघटनेचा अहवालानुसार दर पाच भारतियांपैकी एक हा मानसिक रोगी असतो 😳🤔 ह्यावर विचार होणे गरजेचे ...अर्थात सगळेच विकृत नसतात. ह्यात दैनंदिन जीवनशैलीमुळे होणारे ताणतणावाचे शिकार ह्यांचे प्रमाण ९०% असते. 😅



IMAGE SOURCE  INTERNET

डॉ. विजयसिंह पाटील,
 कराड

प्रेम हा मनाचा आविष्कार,,, सेक्स(कामजीवन)ही शरीराची गरज,,, व अश्लीलता ही मनाची विकृती व त्याला शरीराने दिलेली साथ, असं मी म्हणेन..

प्रथम प्रेम म्हणजे काय ते पाहू,,,
प्रेम म्हणजे, स्नेह, आपुलकी, जिव्हाळ्याची, तळमळीची तीव्र भावना...
प्रेमाचे काही प्रकार,,, नर नारी प्रेम,,, अपत्य प्रेम,,, कौटुंबिक प्रेम,,, पशुप्रेम इत्यादी..

वयानुसार ही प्रेमाची नावं बदलतात.. लहानांबाबत स्नेह.. समान वयोगटातील प्रेम, उदा, पत्नीप्रेम, बंधू/भगिनी प्रेम, मित्र प्रेम इत्यादी.. आपल्याहुन वयाने जेष्ठ व्यक्ती साठी आदर...
मातेचे अपत्यावर असणारे प्रेम--ममत्व..
भक्ती हे प्रेमाचे परमोच्च रूप
प्रेमाची ही स्वरूपे फक्त मनुष्य प्राण्यात च आहेत असं नाही.. अपत्य प्रेम हे आपण सर्व प्राण्यांच्या त पाहतोच...
थोडक्यात प्रेम हे वैश्विक आहे व त्याला कसल्याही मर्यादा नाहीत

सेक्स /कामजीवन
आता, कामजीवन/ सेक्स ह्याबाबत पाहू...
काम  वा सेक्स ही शंभर टक्के शारीरिक गरज आहे, माणूस असो अथवा प्राणी, प्रत्येकाला सेक्स ची गरज असतेच असते. काही प्राण्यांत उदा, कुत्रा, ही भावना वर्षातून एकदाच येते ( ह्यामागचं कारण असे की, मादीला वर्षातून एकदाच पाळी येते, त्यालाच आपल्या कडे, मादी हीट वर आली अस म्हणतात).
मनुष्य प्राण्याचं तसं नाही,  काम क्रिया ही दैनंदिन जीवनातील एक गोष्ट आहे
कामक्रीडा/सेक्स ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यात एकमेकांच्या आवडीचा विचार महत्वाचा आहे, त्याबद्दल बोललं पाहिजे, एकमेकांच्या मतांचा आदर ठेवला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्या टाळायला पाहिजेत.
व जेंव्हा संभोगासाठी, दोघांच्या मनाची व शरीराची तयारी होईल, तेंव्हाच संभोग करणे योग्य

अश्लीलता...

अश्लीलता म्हणजे, माणसाचे काम इंद्रिये, नग्नता, व लैंगिक वर्तन, यांचा साहित्य, कला, व सार्वजनिक जीवनात, व्यक्त होणारा असभ्य ओंगळ, व्हलगर, आविष्कार होय. तो आक्षेपार्ह व अवैध असतो.
अश्लीलतेची कल्पना सामाजिक, कौटुंबिक व वयक्तिक नितीशी संबंधित आहे. ती संस्कृती शी निगडित असते. उदा. एका देशातील अश्लीलता, ही दुसऱ्या देशात अश्लीलता असेलच असे नाही.
अश्लीलता ही आक्षेपार्ह आहे हे साधारणपणे मान्य आहे. पण अश्लील म्हणजे काय, हे ठरविणे अवघड आहे.
विवस्त्र शरीर , लैंगिक वर्तन व विकृती, या अत्यंत खासगी गोष्टींचे प्रदर्शन केल्याने, लैंगिक वासना चाळवल्या जातात, . त्याच अनुकरण केल्यानं नैतिक अधःपतन होते, असं नितीवाद्यांना वाटतं.
तर दुसरा विवेकवादी गट, असभ्य व कामोत्तेजक (पोर्नोग्राफी), ह्यात फरक करून, कामोत्तेजकतेला आक्षेपार्ह मानतो.
अश्लीलता विषयक, प्रतिबंधक कायदे भारतात आहेत.
अश्लील साहित्य, नाटक, चित्रपट, प्रदर्शन, ह्यांना कायदेशीर मनाई आहे.
एक खटला गाजला, प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर, यांच्या काही कवितांवर अश्लीलतेचा खटल्यात (1947), त्यांना दोषमुक्त करण्यात आले.


IMAGE SOURCE  INTERNET

मयूर डुमणे ,
उस्मानाबाद

लव्ह / प्रेम
प्रेमासारखी सुंदर गोष्ट या जगात दुसरी नाही . इतर व्यक्तींप्रती  असलेला आदरभाव ,आपुलकी, काळजी म्हणजे प्रेम . मुलाला साधं खरचटल तरी आई चा जीव खाली वरी होतो ते आई च प्रेम असत . भूक लागलेल्या वासराने हंबरडा फोडल्याक्षणी गाई वासरांकडे धावून येते ते गाई च प्रेम . प्रेमाला जात, धर्म, प्रांत,देश अशा कोणत्याही चौकटी नसतात . भारतीय असलेली सानिया पाकिस्तानी असलेल्या शोएब वर प्रेम करू शकते तिथे देशाच्या शत्रुत्वाच बंधन आड येत नाही . या जन्मावर आणि या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे मंगेश पाडगावकर सांगून गेले . इतरांवर प्रेम करण्याआधी व्यक्तीने पहिल्यांदा स्वतःवर प्रेम केले पाहिजे . स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय ? स्वतःमध्ये काही सुप्त प्रतिभा दडलेली असते त्या प्रतिभेवर आपण प्रेम केले पाहीजे .स्वतःच स्वतःचा आदर केला पाहिजे आपण आपल्या "स्व" वर प्रेम केलं पाहीजे . एकतर्फी प्रेमातून आत्महत्या अशी बातमी जेव्हा कानावर येते तेव्हा त्या व्यक्तीने खरच प्रेम केलेले असते का ? असा प्रश्न मला आवडतो म्हणून  पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करणे मला महत्वाचे वाटते .  द्वेष हा प्रेमाचा शत्रू आहे .द्वेषातून हिंसाचार जन्माला येतो तर प्रेमातून शांतता जन्माला येते . मानवतेचा धर्म वाढविण्यास, जोपासण्यास प्रेम मदत करते . साहित्य, कला, संगीत, विज्ञान अशा आवडत्या विषयां मध्ये झोकून देणे हे त्या विषयांप्रती असलेले आपले प्रेम च असते . द्वेषाने माणसे तोडली जातात तर प्रेमाने माणसे जोडली जातात .

सेक्स -
सेक्स ही मानवी शरीराची गरज आहे . अपत्य जन्माला घालणे हा एकमेव सेक्सचा उद्देश नाही . सेक्स ही वयात येणाऱ्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाची समान गरज आहे . वयात येत असताना स्त्री आणि पुरुषाच्या शरीरात हार्मोन्समुळे वेगवेगळे बदल होतात , त्यामुळे सेक्स ची जाणीव निर्माण व्हायला मदत होते .सेक्स करून बघण्याची इच्छा मनात निर्माण होते . लग्नाशिवाय सेक्स करता येत नाही असं सामाजिक बंधन समाजाने घालून दिले आहे अशावेळी masturbation हस्तमैथून करून सेक्स ची भूक भागविली जाते या मध्ये काहीही गैर नाही . लग्नाआधी सेक्स करण्यात मला काहीही चुकीचे वाटत नाही . शारीरिक भूक भागविण्यासाठी परस्पर संमतीने सुरक्षित रित्या लग्नाआधी सेक्स करणे यात मला काहीही गैर नाही . सध्य परिस्थितीत बेरोजगारीमुळे लग्नाच्या वयाचे प्रमाण वाढत आहे पूर्वी लवकर लग्न व्हायची त्यामुळे योग्य वयात सेक्स ची इच्छा पूर्ण व्हायची आता मात्र तशी परिस्थिती राहीली नाही . सेक्स करण्यासाठी स्त्री आणि पुरुषाची शारीरिक आणि मानसिक तयारी असणे एकमेकांवर विश्वास असणे गरजेचे आहे. सेक्स मधून स्त्री आणि पुरुषाला परमोच्च शारीरिक, मानसिक आनंद मिळतो . मानसिक आणि शारिरीक थकवा घालविण्यासाठी सेक्स सारखी दुसरी उपयुक्त गोष्ट नाही . पती आणि पत्नीमधील नात अधिक गठ्ठ करण्यासाठी सेक्स ही गोष्ट महत्वाची भूमिका बजावते . आपल्या जीवन साथी कडून काही कारणांमुळे सेक्स चा आनंद मिळत नसेल तर साथीदाराला विश्वासात घेऊन इतर व्यक्ती बरोबर संबंध ठेवण्यात काही सुद्धा गैर मला वाटत नाही. आपल्या  समाजात सेक्स या गोष्टीला नैतिकतेच्या बंधनात अडकवले जाते त्यामुळे सेक्स कडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित झालेला आढळून येतो .दुर्देवाने अजूनही आपला समाज स्त्रीच्या योनीत तिचे चारित्र्य शोधतो . बलात्काराचे प्रमाण वाढण्यामध्ये समाजाची सेक्स कडे पाहण्याची संकुचित दृष्टीकोन कारणीभूत आहे . सेक्स ही मानवी शरीराची अभिव्यक्ती आहे सामाजिक बंधनामुळे ती दाबून ठेवणे घातक आहे ती जेवढ्या उत्स्फूर्तपणे बाहेर येईल तेवढे चांगले .
पुरुषप्रधान व्यवस्थेत सेक्स कडे फक्त पुरुषाची मक्तेदारी, गरज म्हणून पाहिले जाते . स्त्री कडे केवळ भोगवादी वस्तू म्हणून बघितले जाते हे अत्यंत चुकीचे आहे यांमुळे अनेक स्त्रियांची कुचंबणा होते . स्त्रियांना देखील सेक्स ची भावना, इच्छा असते  हे आपण समजून घेतले पाहिजे .
   सेक्स ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे प्रत्येकाने  या गोष्टीचा मनापासून कोणताही संकोच न बाळगता आनंद घेतला पाहीजे

अश्लीलता
मासिक पाळी , सेक्स, कंडोम यांविषयी बोलणे म्हणजे काही लोकांना अश्लील वाटते तर काहींना यात काही च अश्लील वाटत नाही म्हणजे व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अश्लीलता ठरते . अश्लीलता ही परिस्थितीजन्य असते कुटुंबात असताना जर आपण शिव्या दिल्या तर त्या अश्लील वाटू शकतात पण त्याच शिव्या जर आपल्या अत्यंत जवळच्या मित्रांमध्ये दिल्या तर त्यात आपल्याला काही च अश्लील वाटत नाही . समाजात राहताना काही सभ्यतेच्या मर्यादा पाळाव्या लागतात त्या मर्यादांचे उल्लंघन केल्यास अश्लीलता निर्माण होते . उदा . सार्वजनिक स्थळी आपण मोठ्या आवाजात शिव्या देणे ही गोष्ट माझ्या दृष्टीने अश्लील आहे . सेक्स ही प्रेमाने एकमेकांना समजून घेऊन करण्याची गोष्ट आहे पण सेक्स जर जबरदस्तीने हिंसक पद्धतीने होत असेल तर माझ्या दृष्टीने तो सेक्स अश्लील आहे . मुलींना पाहून मुलींना संकोच वाटेल असे हावभाव करणे ही अश्लील कृती आहे .

IMAGE SOURCE  INTERNET

जयंत जाधव, लातूर

नारळ हे आतून कसा निघेला हे जसं  सध्याच्या जगात ठोकपणे सांगू शकता नाही अगदी तसं लव म्हणजे प्रेम पुढे  कसे निघेल हे सांगता येत नाही.कारण प्रेमाचे संदर्भ परिस्थिती प्रमाणे सतत बदलत जाताना दिसतात. आजच्या काळात प्रेमात प्रेम कमी कामुकता व अश्लिलतेची भावना अधिक आहे. माझ्या सभोवताली असे बरेच सत्य घडलेले प्रसंग आहेत.लव सेक्स व अश्लिलता या गोष्टी क्रमाने घडणाऱ्या आहेत. एखादी गोष्ट पाहिजेच हा हट्ट देखील या घटना घडण्यास कारणीभूत ठरतात. एखाद्या स्त्रीने तुमचे प्रेम नाकारले तर तिला भावनात्मक पध्दतीने तिला भूरळ पाडून मी तुझ्या साठी काहीही करेल म्हणणारे एकदा की सावज आपल्या पाशात आले की मजा करुन तिला वा-यावर सोडणारे महाभाग गल्लो गल्ली सापडतात. शहाणपण हे कधी पण उशिरा येते पण आपल्याकडे डोळसपणा जर असला तर लव सेक्स व अश्लिलता या गोष्टी काही बिघडवू शकत नाही. सैराट चित्रपटातील सैराटपणाचे आयुष्य क्षणभर असते. वास्तव व चित्रपट यातील गोष्टीत बराच फरक असतो. खर प्रेम असेल तर रानावनात घडते. बाबा आमटे,डॉ.बंग-गडचिरोली,डॉ.कोल्हे- मेळघाट या व्यक्तीनी देखील प्रेम केले ते करताना त्यांनी सर्वच गोष्टी मिळवल्या आहेत. कामावर,पत्नीवर व निसर्गावरही केले.याला खरं प्रेम म्हणता येईल.

रोटी,कपडा व मकान या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तशी सेक्स देखील आहे.पण ते करत असताना दोन्ही जणांच्या नात्यात समजसपणा,आपुलकी,त्याग इत्यादी भावनांचा मेळ असावा. भूक लागल्यावर अधास्या सारख खाल्ले की पोट बिघडत.तस सेक्सला देखील ही गोष्ट लागू पडते. सेक्स करताना समोर च्या जोडीदारची इच्छा महत्त्वाची असते.जबरदस्ती करुन फक्त भूक मिटवता येते पण तृप्ती किंवा संतुष्ट त्याचे काय?

माझी एक मैत्रीण आहे.दिसायला एकदम सुंदर.चार चौघात उठून दिसेल अशी पर्सनॕलिटी.ती नेहमी स्पष्ट म्हणते,एखादी गोष्ट सुंदर असेल तर त्याचे कौतुक नक्कीच करावे किंवा ती गोष्ट पाहाण्यास हरकत नाही पण ते पाहताना त्यात घाणेरडी वासना नसावी व अशा नजरेवाल्यांना ती धडा शिकवायला विसरत नाही.

IMAGE SOURCE  INTERNET

स्वप्नील चव्हाण ,
बुलडाणा

   विषय निघाला तर सर्वप्रथम ज्यांच्याकडे लक्ष जाते ते म्हणजे युवा पिढी...विशेषतः पौगोंडावस्थेत असणारे ......कारण हेच ते वय असतं की ज्या मध्ये तो व्यक्ती लव्ह आणि सेक्स च्या भावनांवर आवर घालतो की वर नमूद केल्याप्रमाणे अश्लीलतेकडे जातो हे ठरते........
प्रेम ...इंग्रजीत लव्ह म्हणूयात ...ही अशी गोष्ट आहे की कोना phd झालेल्या माणसाला ही सर्वस्वी स्पष्ट करता येणार नाही.......कारण प्रत्येक वेळी.... प्रत्येक ठिकाणी..व्यक्ती नुसार ते प्रेम बदलत जात...प्रत्येकासाठी त्याची व्याख्या वेगळी असू शकते....कोणाला टाईमपास करत करत प्रेम मिळत....तर कोणाचा प्रेम करत करत टाईमपास होऊन जातो......कोणासाठी प्रेमच सगळ काही असतं ....तर बरेच जण प्रेम आहे की नाही हेच ठरवू शकत नाहीयेत.....
...तर काय असतं हे प्रेम ...???
आपल्या गरजेसाठी करतो ते खरं प्रेम की प्रेम झाल्यावर आपल्या गरजा पूर्ण होतात ते खरं....??
हेच आणि असे बरेचशे प्रश्न निर्माण होतात या पौगोंडावस्थेत.... मग काय करावं....??
आणि मग ते सेक्स करावं का....लग्नाआधी कराव की लग्न होईपर्यंत थांबावं......

प्रेमाची व्याख्या तर नाही सांगता येणार पण....हे सगळे प्रश्न ज्या वयात पडतात त्याला नक्कीच आपण पौगोंडावस्था म्हणूयात......
थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेम हे देवाचं रूप आहे.....ज्याच्या अस्तित्वावर बरेच जण साशंक आहेत पण जे त्याला मानतात त्यांच्यासाठी ती सर्वोच्च शक्ती आहे.....कुठे आहे माहित नाही पण सदैव आपल्या सोबत असावं असं वाटतं...देव असो की प्रेम.....।।
सेक्स हा एक नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याबद्दल आपण अनेक भ्रम बनवून ठेवलेले आहेत त्यामुळेचं लोकांचे विचार अश्लीलता या प्रकारात मोडतात......

मी जास्त या मुद्द्यावर बोलन्यापेक्षा त्यातुन होणाऱ्या अडचणी आणि निवारण कस होईल याकडे वळतो.....
सर्वात महत्वाचे हे राहील की पालकांनी त्यांच्या पाल्याशी या गोष्टींबाबत बोलणे गरजेचे राहील.......योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टींची माहिती करून देणे त्यांच्याशी चर्चा करणे खूप महत्त्वाचा उपाय होऊ शकतो असे मला वाटतं..... कारण प्रेम प्रकरणामध्ये धोका मिळाला म्हणून जीव देणारे बरेच जण आपण बघतोय....जर अश्या परिस्थितीमध्ये पालकांचा सपोर्ट मिळाला तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी उपयुक्त राहील....कारण माय-बापासाठी त्यांच्या लेकराचा जीव सर्वात महत्वाचा असतो..बाकी सर्व गोष्टींपेक्षा.....
आणि यासोबतच पालक स्वतः बोलतात म्हणून त्यांना हे सर्व नैसर्गीक वाटेल आणि तो अश्लीलतेचा प्रश्न निर्माण होणारच नाही........
आणि हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पालक त्यांच्या मुलांशी बोलताना थोडं फ्री होऊ शकत नाहीत....जर असं झालं असत तर बरेच प्रॉब्लेम्स सोडवण्यात यश आलं असतं....
आणि या बाबतीत तरी थोडं सरळ सरळ बोलणं गरजेचं राहील ...ते इंडिरेक्टली बोलून त्यांना समजेल ही भावना ठेवू नये.....कारण तास इंडिरेक्टली बोलताना आपण बऱ्याच गोष्टी बोलतच नाहीत हे लक्षात राहत नाही....
......आणि एक विशेष म्हणजे आज काल मुलांना पॉर्न चं वाढत आकर्षण....अगदी एखाद्या व्यसनाप्रमाणे चिटाकून बसते ती सवय....आणि सोडणं तेवढचं कठीण होऊन जात....मला तर नेट वर ते उपलब्ध असण्याचं कारणंच आतापर्यंत कळलेलं नाहीये.....कारण त्यामुळेच अनेक जण सेक्स साठी प्रवृत्त होतात...कारण ते आपल्या भावना ताब्यात ठेवण्यात असह्य होऊन जातात......आणि बलात्कार सारखे अडथळे निर्माण होतायेत...... म्हणून पालकांचं मार्गदर्शन जर असेल तर हे आणि अशे बरेच अडथळे दूर होऊ शकतील असे मला वाटते........



IMAGE SOURCE  INTERNET

अनिल गोडबोले
सोलापूर

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रजनन संस्था असते. परंतु त्याचा विकास आणि त्याचे काम हे पौगंडवस्थेमध्ये (teen age) मध्ये चालू होते, हे काही कोणाला वेगळे सांगायला नको.

लव :- प्रेम या गोष्टीबद्दल बोलताना मी आईचे प्रेम, बाबांचे प्रेम, मित्र प्रेम या बद्दल अजिबात बोलत नाही. मी फक्त स्त्री आणि पुरुष या मध्ये होणाऱ्या भावनिक प्रेमाबद्दल बोलत आहे.

माणसाचे वागणे हे त्याच्या भावनेवर अवलंबून आहे त्यामुळे वयात आल्या नंतर प्रजनन होण्यासाठी किंवा आपल्या सारखा जीव जन्माला घालण्यासाठी स्त्री आणि पुरुष एकत्र यावे लागतात..
पण खरी इथंच तर गोची होते.. हे असे एकत्र येऊन जात नाहीत तर आयुष्यभर एकमेकांना आपल्या सोबत राहण्यासाठी बांधून ठेवण्यासाठी मानसिकरित्या एकत्र येतात.
तेव्हा आकर्षणातून सुरू झालेला प्रवास हा प्रेम आणि मग भावनिक गुंतवणूक इथपर्यंत येतो.

प्रेम हे स्त्री आणि पुरुष या मध्ये होत. किंवा समलिंगी संबंध असतील तर त्या जोडप्या मध्ये ही असू शकत. त्याला जात,धर्म, देश,संस्कार, दिसणं किंवा एकूणच अमुक बंधन असेल असं नाही.. पण आपल्याला अस वाढवलेलं आहे की आपण या सगळयांच्या नादात आपलं खर प्रेम विसरून जातो..
आणि मग खूप साऱ्या स्टोर्या चालू होतात


सेक्स:- प्रेम आहे हे दाखवण्याची किंवा अनुभवण्याची उच्च पातळी म्हणजे सेक्स. शारीरिक संबंध हे माणसाला शारीरिक आणि मानसिक सुख देण्यासाठी असतात. आपल्याकडे सगळ्यात जास्त (शक्यतो मुलींना) बंधन घातली जातात कारण लग्न होण्याआधी तिने कोणाशीही शरीर संबंध ठेवू नयेत. असे संबंध असलेली व्यक्ती(शक्यतो मुलगीच काही ठिकाणी मुलांना देखील त्रास असतो.. ) व्यभिचारी, वाईट चाल असलेली(भौतिक शास्त्रात नसलेली चालीची व्याख्या) किंवा वाया गेलेली मानतात.

तरीसुद्धा कधीकधी शारीरिक गरज ही शिकवणुकीच्या बाहेर वर्तन करायला भाग पाडते तेव्हा ते सगळं होत खर... पण नंतर ते खूप मानसिक ताण करून घेतात.

सेक्स फक्त प्रेम केलेले किंवा लग्न केलेले व्यक्ती एकमेकांसोबत करतात, असा खूप मोठा गैरसमज आपल्या संस्कृती मध्ये आहे. ज्याला जशी संधी मिळते तो त्या प्रेमाणे फायदा घेत असतो नाहीतर आपल्या कडे देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची आणि हल्ली तर असे काही तरुण मुलं आहेत जे असा व्यवसाय करतात त्याची खूप मोठी बाजार पेठ भरली नसती.

पॉर्न साईट च मार्केट आहे, गंमत म्हणून चालणारे सेक्स क्लब आहेत(अरेच्या ! हे तर आम्हाला माहीतच नव्हतं .. अस म्हणू नका), कॅज्युअल सेक्स च्या नावाखाली पण बरच काही चाललेलं आहे.. याच एक वेगळं मार्केट आहे पण तो काही आजचा विषय नाही..

आमच्या वेळेला नव्हतं बाबा असलं अस म्हणणाऱ्यांना फक्त त्यांना संधी मिळालेली नसते बाकी एड्स चा प्रसार भारतात झाला तेव्हा.. या एकनिष्ठ असण्याचा बुरखा टराटरा फाटलेला आहे.

या मध्ये कुठेही बलात्कार, अमिश दाखवून किंवा दाखवून केलेलं सेक्स, किंवा नकळत मनाविरुद्ध घेलेला फायदा याला अजिबात पाठिंबा नाही. ते चुकीचेच आहे.

ग्रुप सेक्स हा त्या ग्रुपवर अवलंबून आहे. समलिंगी संबंध हे देखील मान्य समंध आहेत. काहीच नाही तर हस्तमैथुन हा सुरक्षित प्रकार आहे.(जर एका पेक्षा अनेक व्यक्ती सोबत शरीर संबंध असतील तर निरोध चा वापर जरूर करा.. कारण गुप्तरोग आणि एड्स सारखे आजार वरून कळत नाहीत)


अश्लीलता:- सेक्स आणि प्रेम यांच्यामध्ये आलेली विकृती किंवा असंवेदनशीलता आणि माज आल्यामुळे माणूस जे वागतो ना.. ते वर्तन अश्लील वर्तन आहे.

विकृत मनोवृत्ती चे व्यक्तीच अश्लील असू शकतात. मुलांनी मुलींशी कसं वागायला पाहिजे किंवा मुलींनी मुलांशी कस वागायला पाहिजे या पेक्षा कस नाही वागायचं हे शिकवायची गरज आहे.
सामाजिक सभ्यता मोडणे, अश्लील हावभाव करणे हे सुदृढ मन नसलेली लक्षण आहेत. त्यांना मानसोपचार तज्ञाकडे ताबडतोब नेणं गरजेच आहे.

फार काही बोलणं गरजेच नाही फक्त.. कोणी कोणाशी प्रेम करावे कोणी कोणाशी सेक्स करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण एखाद्याच्या सन्मानाला ठेच पोहोचेल अस न वागणं हा मात्र संस्कृतीचा भाग असला पाहिजे.

तर.. प्रेम करा.. सेक्स करा (सुरक्षित करा).. आनंदी रहा पण घाणेरडी हरकत किंवा त्याने एखाद्याला त्रास होईल असे वागलं तर त्याला मानसोपचार देण्यापलीकडे काही उपयोग नाही असं माझं मत आहे.

IMAGE SOURCE  INTERNET

अश्विनी खलिपे,
तोंडोली (सांगली)

          संध्याकाळ होताच रातराणीनं उमलावं, अंधाराच साम्राज्य सगळीकडे पसरलेलं असलं तरी डोळ्यांच्या वाटेने न येता नाकाच्या मार्गाने सुगांधाच्या रूपाने मनात घुसावं आणि त्यावेळी आपल्याला जे सुख, प्रसन्नता मिळते अगदी तीच हळुवार जपण्याजोगी भावना प्रेम झाल्यावर मनाला अनुभवता येते. प्रेम म्हटलं की मन आलंच आणि मन म्हंटल की प्रेम आलंच. प्रेम हे कोणत्या एका नात्यासाठी सिमीत नाही, जिथं नातं तिथं प्रेम असतं. आई-वडील, भाऊ-बहीण, मावशी-काका, आजी-आजोबा अशा अनेक नात्यांमध्ये प्रेम लपलेलं असतं आणि याव्यतिरिक्त म्हणाल तर मग राष्ट्रप्रेम,  पुस्तकप्रेम, मैत्रिप्रेम, प्राणिप्रेम अशा प्रेमाची गणना ही प्रेमातच केली जाते. याचाच अर्थ असा की एखाद्या गोष्टीचा आपल्याला लागलेला ध्यास म्हणजे प्रेम. पण या प्रेमाला ही काहीतरी मर्यादा असतात, मर्यादेपलीकडचे प्रेम हे स्वतःसाठी किंवा इतरांसाठी विनाशकारी ठरतं यात काही शंकाच नाही. प्रेमाची भावना कदाचित आतापर्यंत सर्वांना कळली असेलच आणि प्रेमाबद्दल इतक्या जणांनी लिहिलंय की आता त्याबद्दल लिहायला कदाचित काहीच शब्द उरले असावेत असं मला तरी वाटतंय.
          सध्या प्रेम असा शब्द जरी कानावर पडला तरी प्रत्येकाच्या मनात एकाच प्रेमाचा विचार डोकं वर काढतो आणि सगळ्यांच्या नजरा बदलतात. आताच्या प्रेमात पावित्र्य उरलेलंच नाही असं बोलणं ही वावगं ठरणार नाही, कारण प्रेम फक्त मनाची भूक म्हणून उरलेली नाही. प्रेमात त्याग, ओढ, निस्वार्थपणा, विरह कुठंच दिसत नाही. पूर्वी प्रेम नजरेतून मनात आणि नंतर लग्नाच्या रूपाने जगासमोर यायचं आणि आताच्या प्रेमात नजरा कुठं कुठं घुसतात त्याला सीमाच उरल्या नाहीत. एकंदरीत काय तर, आजचं प्रेम म्हणजे लॉजवरची गेम एवढंच झालंय...
          प्रेमानंतर जी भावना जन्म घेते ती म्हणजे सेक्स. सेक्स म्हणजे शारीरिक संबंध, शरीराला लागलेली भूक. मुलं-मुली वयात येताना शरीरात होण्याऱ्या अंतर्गत बदलांमुळे निर्माण होणारी शरीराची गरज म्हणजे शारीरिक संबंध. वयात येताना या भावना होणं आणि एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक असतं पण त्यालाही काहीतरी मर्यादा असावी लागते; म्हणून वेळीच काळजी घेणं योग्य असतं, कारण वाहणाऱ्या प्रवाहात जर स्वतःला झोकून दिलं तर अंत होणं निश्चित असतं. सेक्स च्या भावना प्रकृती साठी चांगल्या असतात असं डॉक्टरांचं ही म्हणणं आहे पण त्या मर्यादेबाहेर गेल्या तर त्याची विकृती व्हायला वेळ लागत नाही. विकृतीतूनच पुढे बलात्कारासारख्या घटना घडतात. सेक्स हा प्रकार खऱ्या अर्थाने लग्नानंतरचं योग्य असं वैयक्तिक माझं तरी मत आहे. सेक्स हे दोघांच्या सहमतीने करण्याची गोष्ट आहे, कारण यात फक्त शरीराची भूक शमवणं गरजेचं नसून; सुखाची प्रचिती करून देणाऱ्या भावनेला अनुभवणं ही तितकंच गरजेचं असतं. सेक्स हा विषय आजही एकांतात कुजूबुजण्याचा विषय आहे असं मानलं जातं, त्यामुळे याबाबतीतील संपूर्ण ज्ञान योग्य वयात स्पष्टपणे न मिळाल्यामुळे आजची पिढी चुकीच्या दिशेने भरकटत चाललेली दिसते.
          अश्लीलता काल्पनिक आहे असं माझं मत आहे, कारण अश्लील काय आहे व काय नाही हे निश्‍चितपणे ठरवणं शक्य नाही, ज्याच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे ती उदयास येते. अश्लील म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, हे ठरविणे कठीण आहे, कारण अश्लीलता ही लैंगिक गोष्टींशी जरी निगडित असली तरी त्यासाठी इंग्लिश शब्द वापरले तर त्यात अश्लील काहीच वाटतं नाही, पण त्यासाठी जर ग्रामीण बोली भाषेतला शब्द उच्चारला तर तो अश्लील मानला जातो, म्हणून अश्लीलतेचा प्रश्न न काढलेलाच योग्य असं मला तरी वाटतंय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************