🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप
📄आठवडा 24वा📝
14 एप्रिल ते 20 एप्रिल 2018
📄आठवडा 24वा📝
14 एप्रिल ते 20 एप्रिल 2018
बलात्कारी विकृत लोक.. अशा किती निर्भया वर अत्याचार केल्यावर आपण पेटून उठणार? (भाग-2)
१.समीर सरागे,नेर, जि.यवतमाळ
२.पवन खरात,अंबेजोगाई,जि.बीड
३.प्रविण भिकले,मुंबई
४.प्राची कर्वे, पुणे
५. सिमाली भाटकर,रत्नागिरी.
६. सागर राडे,सांगली
७. नितिन लेंडवे पंढरपुर
८.क्षितिज गिरी,सातारा.
९.पूनम देशमुख,अकोला
१०.संगिता देशमुख,हिंगोली
(यातील सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत)
यांचे विचार सविस्तर वाचा:-
समीर सरागे,यवतमाळ
आपल्या देशात बलात्कार, विनयभंग, आणि चिडिमारी(eve Teasing) सारख्या घटना मध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. किंबहुना होत आहे. हे काही सभ्य आणि सुसंस्कृत म्हंणवल्या जाणाऱ्या स्त्रीवादी समाजाचे लक्षण तर मुळीच नाही , सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा असलेल्या ज्या भारत देशाची ओळख सहिष्णु , त्याग , औदार्य आणि आदराचा देश म्हणून ख्याती आहे त्या देशाची ओळख आता बलात्कारी देश म्हणून उदयास येत आहे. ही बाब अतिशय लाजिरवानी आणि प्रत्येक भारतीयाची मान खाली घालणारी आहे. अलीकडे स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याच्यारच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. भारतात दररोज कुठेना कुठे स्त्रियांवर लैंगिक अत्यचाराच्या घटना घडत आहे. त्यातही लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्यचाराचे प्रमाण जास्त आहे.
अलीकडील काळात जितके लैंगिक अत्यचारच्या घटना घडल्या आहेत त्यात सर्वात जास्त अत्यचाराचे प्रमाण हे छोट्या मुलांवर झालेले आहेत.
NCRB च्या ताज्या अहवाला नुसार भारत देशात दरवर्षी 36 हजार बलात्काराच्या घटना घड़तात आणि यात लहान मुलांचे प्रमाण अतिशय जास्त आहे. महत्वाचे म्हणजे बलात्कारच्या घटनेत 80 टक्के प्रकरणात पीडितेच्या जवळच्या ओळखिचा व्यक्ति, नातेवाईक, किंवा शेजारीच अशे कृत्य करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सन 2012 च्या निर्भया केस पासून तर आज 2018 च्या कठुआ घटने पर्यंत भारतात बलात्कारच्या 1,82,850 केसेस रजिस्टर्ड आहेत.
उनाव आणि कठुआ येथील दोन घटना पाहता या घटना फार दुर्दैवी आहेत ,ज्या चिमुकल्याचे खेळन्या, बागड़न्याचे दिवस आहेत त्या चिमुकल्यावर काही पिशाचानी लैंगिक अत्यचार करून खून केला ही बाबच मुळात मन हेलाऊँन टाकनारी आहे. किती ही विकृती ? गुन्हेगार कोणीही असो त्याला जात आणि धर्म नसतो, तो केवळ आणि केवळ गुन्हेगार असतो आसिफा विषयी जे घडले त्या घटने बद्दल सर्वानाच दु:ख आहे यात दुमत नाही. आतंकवद्याचा जसा धर्म नसतो तसाच बलात्कारचा देखील धर्म नसतो आणि त्याला धर्माच्या चष्म्यातुन बघने है देखील योग्य नाही. परंतु ज्या पद्धतीने मीडिया हाऊस कडून हे प्रकरण दाखविल्या जात आहे त्यामुळे समाजात एक वाईट संदेश पसरत आहे. या प्रकरणाला उगाच जातीय आणि धार्मिक रंग दिल्या गेला आहे तेव्हा हे प्रकरण एका षडयंत्रा कड़े इशारा करत असल्याचे चिन्ह दिसत आहे. केवळ आसिफ़ाचा मृतदेह मंदिरात सापडला , त्यामुळे बलात्कार मंदिरात झाला , बलात्कारी हिंदू होते आणि पीड़ित मुलगी विशिष्ट धर्माची होती. याच तीन बिंदु वर हे प्रकरण तापविल्या गेले आहे. हाच बिंदु मीडियाने जास्त ट्रेंड केला ज्यामुळे एका विशीष्ट धर्मावर चिखलफेक करूण त्या अखिल धर्मलाच जनु लक्ष्य केल्या गेले आहे. आणि सोशल मिडीयावर दाखवील्या जाणाऱ्या संदेशा वर विश्वास ठेऊन जनता आपली मते बनवत आहे. सत्यता वेगळीच आहे.
केवळ आंदोलने मेंनबत्ति मोर्चे काढल्याने किंवा #tag वापरल्याने सत्याची जाणीव होऊ शकत नाही त्याकरिता तपास यंत्रणा आहे न्यायव्यवस्था आहे. मीडिया ने सत्यता न पड़ताळता स्वतःच न्याय निवाडा करणे म्हणजे जनतेच्या मनात एकमेकां विरूद्ध द्वेष भावना निर्माण करणे होय, म्हणून सदर प्रकरणात आरोपी कडून CBI चौकशीची मागणी जोर धरत आहे. असो ,इथे कोणाचा पक्ष घेत नाही आहो परंतु देशात जो माहौल आणि वातावरण मीडिया द्वारा तयार करण्यात आलं आहे किंवा करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे त्याविषयी है भाष्य आहे.
ज्याना आतंकवाद्याचा टेलीस्कोप लाऊन देखील धर्म शोधता आला नाही अशाना मात्र बलात्काराचा धर्म शोधन्यास किंचितही वेळ लागला नाही हे येथे विशेष, म्हणजे किती हा दुटप्पी पणा? या अश्या तथाकथित अजेंड्या मुळे जाती- धर्मा मध्ये द्वेश निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. काही महाभाग तर आम्हाला हिंदू असल्याची लाज वाटत आहे असे फलक आणि #tag लाऊन स्वतःची लायकी दाखवत आहे. म्हणजे एका व्यक्तिने गैर कृत्य केल्यास संपूर्ण धर्मलाच दोषी ठरविल्या गेले. यात काही सेलिब्रिटी ज्याणी खुद चित्रपटा मध्ये अश्लील व बोल्ड दृश्ये दाखवून समाज बिघडविन्यात काही अंशी योगदान दिले ते स्वताच आता या प्रकरणात स्वस्त प्रसिद्धि मिळवून घेत आहेत. असिफाचे प्रकरण जानेवारी 2018 मधले आहे याला एप्रिल महिन्यात म्हणजे 3 महिन्या नंतर उचल्ल्या जावे यात काही तरी षड्यंत्र तर नक्कीच आहे. हे वेगळे संगण्याची मुळीच गरज नाही.

आपल्या देशात सन 2012 मध्ये दिल्ली येथे निर्भया बलात्कार प्रकरणात निर्भयाला न्याय मिळवून देण्या करिता सर्वात मोठे आंदोलन केल्या गेले होते त्यामध्ये निर्भयाचे नाव कोणाला माहिती नव्हते आणि तिला कोणी बघितले देखील नाही. परंतु आसिफाचा फोटो का म्हणून व्हायरल करण्यात आला? महत्वाची गोष्ट म्हणजे पीड़ित मुलीची अश्या प्रकारे फोटो व्हायरल करणे हा कायद्याने गुन्हा आहे. IPC 228 A कायद्या अंतर्गत मीडिया करिता प्रावधान आहे की, कोणत्याच बलात्कार किंवा लैंगिक अत्यचार झालेल्या पीडित मुलीचा फोटो मीडिया किंवा सोशल मिडियावर व्हायरल करता येत नाही तो गुन्हा आहे. परंतु आपल्या देशात यां पीड़ित मुलीचा फोटो सर्रास सोशल मिडियावर लगातार वेगवेगळ्या पोस्टद्वारे व्हायरल केल्या गेला. प्रथम सोशल मिडियावर एका अजेंड्या द्वारे पीड़ित मुलीचा फोटो ,तिचा धर्म आणि नावासह शेअर करण्यात आला एवढेच नव्हे तर नंतर ती राष्ट्रीय मिडिया मध्ये वेगवेगळ्या ऐंगलने रिपोर्ट द्वारे दाखविन्यात आला आणि तिथुनच या घटनेला धार्मिक वळण लागले, कारण यात धार्मिक ऐंगल त्यांना दिसला नव्हे तर त्यांनी तो जोड़ण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
बलात्कारच्या अश्या किती तरी घटना देशात दरवर्षी दरमहा घडत असतात परंतु त्याची बातमी होत नाही तो केवळ आपल्या करिता एक आकड़ा मात्र राहतो व त्याला इतकी प्रसिद्धि देखील मिळत नाही.
याच महिन्यातील दिनांक 6 एप्रिल आणि 10 एप्रिल रोजिच्या गुजरातच्या सूरत आणि बिहारच्या रोहतास मध्ये घड़लेल्या बलात्काराच्या घटनेच्या यांच्या निषेधार्थ कोणी आक्रोश करताना आपल्याला दिसलं ?,सोशल मिडियावर कोणी या पीडित मुलींचे फोटोज व्हायरल केलेत ? कोणी कैंडल मार्च -आंदोलने उभी केलीत ? कोण्या बॉलीवुड सेलिब्रिटिनी आम्ही शर्मिंदा आहोत असे हातात फलक घेऊन #tag लाऊन रस्त्यावर उभे असलेले आपल्याला दिसले.? या इतक्या मोठ्या घटनेची कोण्या मिडियाने साधी दखल तरी घेतली का? उत्तर आहे नाही. कारण या चिमुकल्याच्या घटने मध्ये धार्मिक आणि राजकीय स्वार्थ त्यांना कुठे दिसला नाही. म्हणून
निर्भया च्या घटने नंतर असे वाटले की आता बलात्कारच्या घटना संपुष्टात येतील पुढे घड़नार नाहीत इतके मोठे ते आंदोलन होते. परंतु त्या नंतर देखील काहीच बदल झाला नाही परिस्थिति जशीच्या तशीच आहे. दुसऱ्या देशात बलात्कारा करणाऱ्यास अशी सजा आहै ,तीथे सजा देण्याचे अमुक अमुक कायदे आहेत मग आपल्या कड़े का नाही वैगरे जेव्हा आपण म्हणतो परंतु
जेव्हा अश्या नराधमाना सजा देण्याची वेळ येते तेव्हा काही राजकारणी मानवाधिकार वाले आणि आपल्यातिलच काही लोक याचा प्रथम विरोध करतात एवढेच नव्हे तर तो अल्पवयीन आहे त्याला बालसुधार गृहा मध्ये पाठवा, त्याच्या समर्थनार्थ वृत्तपत्रा मध्ये लेख लिहिल्या जातात , मा.राष्ट्रपती मोहोदया पर्यंत त्या अपराध्याची दया याचिका पाठवींन्याची तसदी घेतली जाते, वेगवेगळ्या माध्यमातून शिफारसी केल्या जातात तो मासूम आहे, विशिष्ट वर्ग आणि धर्माचा आहे. असल्यास काही बघायलाच नको! काही डिज़ायनर पत्रकार आणि न्यूज़ चैनल प्राईम टाइम शो मधून त्यांची मासूमियत ची अक्खी मालिका चालवितात. अमुक अमुक राजकीय पक्ष त्या इसमाला उदरनिर्वाहार्थ शिलाई मशीन भेट देतात
तेव्हा त्या निर्भया सारख्या पीड़िताचा आपण एक प्रकारे अपमानच करत असतो यामुळे तिच्या आत्माला किती दु:ख पोहोचत असेल. याची जाणीव आहे का आपल्याला? हें लक्षात घेतले पाहीजे
मग तेव्हा तुमची आंदोलनकारी आणि मोमबत्ती गैंग कुठे लपुन बसते? तेव्हा त्या इसमाला सजा देण्या करिता का मोमबत्त्या जाळल्या जात नाही?
कोणी सेलिब्रिटी निषेधार्थ फलक घेऊन रस्त्यावर येत नाही ? का मीडिया मध्ये बसलेले या घटनेला ट्रेंड करत नाही ?
चांडाळनो जेव्हा तो कोण्या मुलीवर अत्याचार करतो तेव्हा त्याच्या अल्पवायाचे दाखले देणारे कोणत्या बिळात दडुन बसतात? सजा देताना त्याचे वय तुम्हाला आठवते मग अत्यचार करते वेळी त्याचे वय का आठवत नाही?
मग अश्याने कसा या नराधमावर धाक निर्माण होईल ? केवळ कायदा आहे म्हणून त्याला शिक्षा होईल है गोड़ गैरसमज प्रत्येका मध्ये असतो परंतु काही पिशाच्य या कायद्याच्या जाळयातून यशस्वी पळवाट काढण्यात सफल होतात. जेव्हा एखाद्या मुलीसोबत चिड़ीमार (eve teasing) सारखे , छेड़ छाड़ किंवा अत्यचारा सारखे प्रकार होतात तेव्हा आंदोलनकारी , बॉलीवूड सेलिब्रिटी , मोमबत्ती गैंग पैकी हा प्रकार रोखण्या करिता कोणी गैंग समोर का येत नाही ? कारण यांचे आंदोलन हे सिलेक्टिव आणि पोकळ असते.
केवळ आंदोलने , मोमबत्ती मोर्चे काढ़ल्याणे व #tag वापरल्याने जर बलात्कारच्या घटना थांबल्या असत्या तर कायदे करण्याची गरजच क़ाय असती ?
केवळ ढिगभर कायदे केल्याणे अश्या घटना थांबणार नाहीत उलट प्रत्येकाची मानसिकता ,नियत व स्त्रियांकड़े बघण्याचा दृष्टिकोण बदलने गरजेचे आहे. जेव्हा कुठे आपल्या समक्ष अश्या घटना होताना दिसतील त्याच क्षणी त्या आरोपिला जाळा म्हणजे मग मेंनबत्या जळण्याची वेळ येणार नाही. तेव्हाच खऱ्या अर्थाने निर्भया सरख्या , उनाव सरख्या आणि कोपर्डी सरख्या घटना पुन्हा घड़नार नाहीत.
पवन खरात,अंबाजोगाई
आपला देश हा लोकशाही वर चालतो आणि जर लोकशाही टिकवायची असेल तर न्याय व्यवस्था भक्कम असायला हवी.
आज सद्यस्थितीला भारतीय न्याय व्यवस्था पूर्ण पणे जीर्ण झाली आहे, कारण
" अन्याय अत्याचार कोठेही आज होई
न्यायालयात तरीही आपल्याला न्याय नाही*......"
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात दरदिवशी बलात्काराच्या 50 घटनांची नोंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. संपूर्ण सत्य उलगडत नाही. बरेच खटले आहेत, ज्याची नोंद नाही.
भारतीय लोक हे फक्त जातीयते मध्ये गुरफटलेले आहेत, जर एखाद्या जातीच्या मुलीवर बलात्कार झाला तर त्याला दुसऱ्या जातीच्या लोकांना त्याचा काही फरक पडत नाही, पण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कि आपण माणूस आहोत आणि माणुसकी आपला धर्म. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य तुम्ही करत असाल तर वेळ बदलायला वेळ लागत नसतो.
आज तुमच्या वर वेळ नाही पण कधी येईल हे सांगता येणार नाही, कारण तुम्ही स्वतः या गुन्हेगारी वृत्ती कडे कानाडोळा करत आहात.
काल कोल्हापूर मध्ये असिफा ला न्याय मिळावा यासाठी निघालेल्या मोर्च्या मध्ये एक बॅनर पाहिला , त्यावर लिहलेले होते,
" आज जर आमचे शिवाजी महाराज असते तर,
बलात्कार करणाऱ्याचे शीर आमच्या चौकात टांगलेले असते.
राजे तुमची खूप आठवण येते.
- समस्त मुस्लिम समाज कोल्हापूर. "
हे बॅनर पाहिल्यावर खरंच अंगावर शहारे उमटले आणि क्षणभर वाटले ज्याप्रमाणे शिवाजी महाराज , शाहू महाराज या सारख्या महान राजांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला त्याच प्रमाणे आज ही भारतीय न्याय व्यवस्था बदलने गरजेचे आहे , वेळ आली आहे या बदलाची.
फक्त हातात मेणबत्या घेऊन आणि मोर्चे काढून न्याय मिळावण्यापेक्षा या बलात्कारी विकृत लोकांना कायमस्वरूपी आळा घालणे गरजेचे आहे, खरंच अश्या लोकांची शीर भर चौकात कलम केले पाहिजे तरच अश्या गुन्हेगारांना वचप बसेल.
प्रविण,मुंबई
भावना कशा व्यक्त करू खरच नाही कळत आहे. दुखः आहे, राग आहे आणि लाज ही वाटत आहे. सलग सहा दिवस एका चिमुरडीवर बलत्कार होतो आणि तेही देवीच्या मंदिरात. खरच यापेक्षा भारताला कोणती लाजीरवाणी गोष्ट असेल. त्या सहा दिवसात त्या तिने काय सहन केल असेल? कहर तर तेव्हा झाला जेव्हा राष्ट्रध्वज घेऊन बलात्काराचे समर्थन केल जात आणि तेही सत्ताधारी पक्षांकडून. मनमोहन सिंगना मुका म्हणणारे आज का मुग गिळून आहेत.
या राजकारणात पडन व्यर्थ आहे कारण बलत्कार हा आता राजकीय भांडवलाचा विषय झाला. आज देशात तर ३० मिनिटाला बलात्कार होत आहेत. नक्की कसली विचारसरणी पसरत चालली आहे. आज भारत बलात्कारी देश म्हणून पुढे यायायला लागला कि काय याची भीती वाटू लागली आहे. यावर काय उपाय करायचा? हा प्रश्न फार सोपा वाटतो पण खरच कठीण आहे.
देशातील जर असे बलात्कार थांबवायचे असतील तर बालात्काऱ्याना भयंकर शिक्षा द्या. असा एक मत प्रवाह आपल्या देशात आहे. सौदी सारख्या देशात अशाच शिक्षा आहेत. पण तरीही त्या देशात गुन्हेगारी कमी नाही झाली. मग दुसरा उपाय काय असू शकेल? कदाचित भयंकर शिक्षा देऊन आपण गुन्हेगार संपवून टाकू पण त्याने त्या बालात्क्रर्याला शिक्षा होईल पण असिफ, निर्भायाला न्याय मिळेल का? बलात्कार ही विकृती आहे आणि त्यावर घाव घालन महत्वाच आहे.
महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन:-
मी समाजसेवा क्षेत्रात गेले चार वर्ष आहे. महिलांची मानसिकता किंवा त्याचं समाजातला स्थान आजही तुच्छ आहे. आजही ग्रामीण भागातील महिला आपल्या नवऱ्याला “मालक” म्हणतात. अगदी गेल्या एक दोन वर्षात लग्न झालेल्या मुलीसुद्धा. महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी गावात गेलो कि गावातीलाच नेते मंडळी म्हणतात “या बायकांकडून काय नाही होत हो, यांच काम उबरठ्या पर्यंत” . जितक्या महिला सरपंचाना भेटलो त्यातील सर्वच सरपंच या नामधारी आणि कारभार त्यांचा सो काल्ड “मालक” करत असतो.
अशा बुरसटलेल्या विचारांचा समाज असेल तर इथे निर्भया असिफा बळी जाताच राहणार. कारण कायदा हा शिक्षा देतो पण गुन्हे थांबवण हे त्या समाजाच्या विचारसरणीवर अवलबून आहे. महिला सक्षमीकरण चे कार्यक्रम आता खूप झाले. जर महिलेला सुरक्षित आणि सन्मानित आयुष्य जगयाच असेल तर “पुरुष सक्षमीकरण” व्हायला हव. कोणी समर्थन केल ? का केल ? कोण विरोध करतोय ? हे प्रश्न गौण आहेत. खरा चिंतेत टाकणारा प्रश्न आहे कि “पसरत चाललेली विकृत बलात्कारी मानसिकता”. त्याल बांध घालणे
सामाज माध्यामांचा यात काय भूमिका असेल?
एका रिसर्च नुसार वयवर्ष ३ ते १८ या कालावधीत मुल TV वर ३०००० बलत्कार आणि ७०००० खून पाहतात. म्हणजे जर याला आधार मानल तर जी विकृती या समाजात पसरली आहे ती घरातूनच. आजच्या लोकासात्तालाच बातमी आली होती पोर्न साईट वर “video of katua rape” असे सर्चिंग होत आहे. ही विकृती कॅन्सर सारखी समाज पोखरू लागली आहे. प्रत्येक स्त्री मनात या विकृतीची व्यथा आहे उद्या याची प्रथा नाही व्हायला हवी.
शेवटी एकच म्हणेन हा बलत्कार हा आसिफा वर नाही तर भारतीय संकृतीवर आणि विश्वासावर झाला आहे.
धन्यवाद

प्राची कर्वे (देहूरोड) पुणे
एका चिमुर्डिवर अनेक जण अनेक वेळा बलात्कार करतात किती क्रूरता आहे ही . पाशवी पणाची सीमा आहे. खेळण्या बागडन्या चे वय सरले नव्हते आपण स्त्री आहोत हे कळण्याआधीच तिची विटम्बना केली .
मेणबत्या जाळून आणि आंदोलन करून काय होणार .त्या कोवळ्या जीवाने जे सहन केले त्याची भरपाई कशी करणार ते नुकसान कधीच भरून येणार नाही . फाशीची शिक्षाच मला योग्य वाटते कारण त्या नराधमांना परत समाजात स्थान नको आणि इतराना दहशत बसावी .
यापूर्वीही एका नर्सवर वयाच्या अठराव्या वर्षी बलात्कार झाला. त्या धक्क्याने ती कोमात गेली . त्या बलात्कार्याला सात वर्ष शिक्षा झाली बाहेर आल्यानंतर त्याने नाव बदलले नोकरी लग्न केले . पण ती कोमात गेलेली तिच्या वयाच्या पासष्ट व्या वर्षी कोमातच मरण पावली काय उपयोग झाला न्याय मिळून आणि कोणाला ?
स्त्रीयांकडे पाहण्याचा द्रुष्र्ट्टिकोन बदलला पाहिजे .स्त्री ला सन्मानाने वागवले पहिजे शिवजी महाराजांचे फक्त पोवाडे गाऊन जयंती साजरी न करता त्यांची शिकवण अंगिकारून केली पहिजे .
जेव्हा स्त्री मोकळेपणाने सुरक्षित फिरू शकेल तेव्हाच खरे स्वतंत्र्य मिळाले असे मी म्हणेन .
सिमाली भाटकर,रत्नागिरी
१. “बंधनातील पाखरु”
रखरखीत ऊन खूप झेलले
पावसात मात्र चिंब भिजले
स्वतःसाठी जगायचे राहून गेले
अंगात कला होत्या फार
पण बंधनाच्या जाळ्यात
झाल्या सगळ्या स्वार
मन नेहमी पुस्तकात गुंतलेले
वाटलं शिक्षणाच्या प्रकाशानं
आयुष्य होईल मस्त सजलेलं
कुणास ठावे आपल्याच मनात होत
काळबी पसरलेल
परक्याच धन म्हणे
बरं असत डोइवरच वझ लवकर उतरेल
जबाबदारीच मुल्य होत
लहानपणीच शिकवलं
अन् सहनशिलतेचा तर
दगडान ठेचून अंगी भरलेल
मनाला घालून आळा
जीवन गृहस्थाश्रमात रमल
इथून पुढ आयुष्य असेल
ऐकनच उतरलेल
परंपरेच्या विळख्यात अडकवल
हाती पायी वेसन घातलं
पायदळीची धुळ समजून
हातांनी इकडून तिकडून उडवलं
बदलेल ही स्थिती म्हणत
मनास समजावलं
रोजचा दिन नवा म्हणत
गुदमरत आयुष्य जगलं
बदलाची वाट बघत एक दिवस
श्वासांनी दिशांनाच बदललं
अन् मन अनंतात विलीन झालं
साखळदंडानी जुंपलेलं पाखरु
मुक्त होवूनी आसमंनती विराजलं
आतातरी बदला अन्
कुणीतरी थांबवा अस म्हणत
मुक्या डोळ्यांनी
जगाला सांगून गेलं
जगाला सांगून गेलं........
२.“वेडी आशा”
धुंद होती भावना,वेडी होती आशा….
कधी ना कळली कुणा मनाची भाषा….
मन पाखराचं होतं,आकाशी स्वैर उडणारं
एका बाणात प्राण घेतला
मुक टाहो कुणी न ऐकणारं….
कर्ण असूनी बहिरे झाले….
तेजस्वी नयनाचे आंधळे झाले….
हळव्या मनाचे शब्द मुकेच सगळे….
कंठी होता आवाज परी कुणी ना वदले….
न्यायरुपी देवतेला पैशांत मोजले….
फित काळी नयनावरी तरी
न्यायाची आशा बाळगून ऊरी….
विकली गेली भरल्या बाजारी….
पदरी निराशा तरी मनी विजयाची आशा….
कुणी तरी दाखविल किरणांची दिशा….
धुंद होती भावना, वेडी होती आशा….
कधी ना कळली कुणा मनाची भाषा….
रखरखीत ऊन खूप झेलले
पावसात मात्र चिंब भिजले
स्वतःसाठी जगायचे राहून गेले
अंगात कला होत्या फार
पण बंधनाच्या जाळ्यात
झाल्या सगळ्या स्वार
मन नेहमी पुस्तकात गुंतलेले
वाटलं शिक्षणाच्या प्रकाशानं
आयुष्य होईल मस्त सजलेलं
कुणास ठावे आपल्याच मनात होत
काळबी पसरलेल
परक्याच धन म्हणे
बरं असत डोइवरच वझ लवकर उतरेल
जबाबदारीच मुल्य होत
लहानपणीच शिकवलं
अन् सहनशिलतेचा तर
दगडान ठेचून अंगी भरलेल
मनाला घालून आळा
जीवन गृहस्थाश्रमात रमल
इथून पुढ आयुष्य असेल
ऐकनच उतरलेल
परंपरेच्या विळख्यात अडकवल
हाती पायी वेसन घातलं
पायदळीची धुळ समजून
हातांनी इकडून तिकडून उडवलं
बदलेल ही स्थिती म्हणत
मनास समजावलं
रोजचा दिन नवा म्हणत
गुदमरत आयुष्य जगलं
बदलाची वाट बघत एक दिवस
श्वासांनी दिशांनाच बदललं
अन् मन अनंतात विलीन झालं
साखळदंडानी जुंपलेलं पाखरु
मुक्त होवूनी आसमंनती विराजलं
आतातरी बदला अन्
कुणीतरी थांबवा अस म्हणत
मुक्या डोळ्यांनी
जगाला सांगून गेलं
जगाला सांगून गेलं........
२.“वेडी आशा”
धुंद होती भावना,वेडी होती आशा….
कधी ना कळली कुणा मनाची भाषा….
मन पाखराचं होतं,आकाशी स्वैर उडणारं
एका बाणात प्राण घेतला
मुक टाहो कुणी न ऐकणारं….
कर्ण असूनी बहिरे झाले….
तेजस्वी नयनाचे आंधळे झाले….
हळव्या मनाचे शब्द मुकेच सगळे….
कंठी होता आवाज परी कुणी ना वदले….
न्यायरुपी देवतेला पैशांत मोजले….
फित काळी नयनावरी तरी
न्यायाची आशा बाळगून ऊरी….
विकली गेली भरल्या बाजारी….
पदरी निराशा तरी मनी विजयाची आशा….
कुणी तरी दाखविल किरणांची दिशा….
धुंद होती भावना, वेडी होती आशा….
कधी ना कळली कुणा मनाची भाषा….
मला माझ्या दोन कवितेच्या माध्यमातून ऐवढेच निर्देशनास आणायचे आहे की ह्याला जबाबदार कोण?याचे उत्तर प्रत्येकाची मानसिकता असच आहे.त्याचप्रमाणे आपली शासनव्यवस्था १०-१० वर्षे एक केस चालते कोर्टात,खूपच कमकुवत आहे आपली न्यायव्यवस्था व किव येते न्याय देणाऱ्याच्या बुद्धिमत्तेची.
राहिला प्रश्न स्त्रीचा तिने स्वतःला खंबीर बनविले पाहिजे.आपण घरातून सुरुवात केली पाहिजे.मुळात स्त्रीला काचे ऐवजी दगडाचा दर्जा दिला तर जास्त बरं होईल.कारण काच फुटल्यावर त्याची चर्चा व मार्केटिंग सगळीकडे होते.त्यामुळेच दगडाचा दर्जा द्या म्हणजे फुटण्याचा प्रश्नच येत नाही.अर्थातच मुलींना ऐवढे धीट बनवा कि ती स्वतःचे संरक्षण स्वतः करेल.
एकीकडे नारी मुक्ती नारी शक्ती असे नारे लावले जातात व दुसरीकडे तिच्या शक्तीलाच नहीसे केले जाते.मुळातच ही विकृतीच नष्ट केली पाहिजे.निर्भयांना आपणच न्याय दिला पाहिजे आणी हे करताना त्याला जातीचे लेबल लावून त्यांचे वाभाडे काढू नये.
आता प्रश्न विकृतीचा मानसशास्त्रीय भाषेत सांगायचे म्हणजे माणसाच्या विकृत भावना लगेचच निर्माण होत नाही.हळूहळू निर्माण होते व जेव्हा तिचा स्फोट होतो तेव्हा हे कठुआ व उन्नाव सारखे प्रकरण घडतात.त्यामुळे असे बदल जर आपल्या मुलांमध्ये दिसले तर हसण्यावरी व शांत न राहता गांभीर्याने घ्यावे.त्यावर मानसिक उपचार करुन नाहीसे करता येईल.
म्हणूनच माणसाची प्रवृत्ती,मनोवृत्ती व विकृती याचा अभ्यास करुन आपण ती विकृती नष्ट केली पाहिजे.
आपण स्त्रीयांना खूप त्रास होतो प्रत्येक ठिकाणी पण आपण त्याला लगेच विरोध करत नाही.कदाचित परिस्थिती,भीती यामुळे होत असावे पण आपण विरोध करायला पाहिजे.स्वतःच्या बाबतीत असो वा दुसऱ्या आपण एकत्र येवून सामना केला पाहिजे.मेणबत्ती हाती घेऊन मोर्चा काढण्यापेक्षा न्यायव्यवस्थेला एक खरमरीत पत्र लिहून ठणकावून प्रकरणाचा लवकर छडा लावायला सांगा. अमुक अमुक टक्के आरक्षण मागायला पुढे मग बलात्कार पिडितेला न्याय देण्यात मागे का?
तसेच स्वतःच्या वागण्यात पोशाख करण्यात थोडं धरबंध असावा समोरची व्यक्ती एकदम उसळून उठेल अस वागणं टाळावं, कारण या अशा वागण्यातून केंव्हा केंव्हा अति प्रसंग ओढवतात. एखाद्याने दिलेली स्तुतीपर वाक्य किंवा वागणं हे तिथेच थांबवावं ना की ती गोष्ट हसण्यावारी नेऊन सोडून द्यावे. स्पर्शाची भाषा मनाला कळते त्यामुळे प्रेम आणि वासना यातला फरक समजणे गरजेचे आहे.
विकृती कितीही असली तरी ती थांबवता येते. पुरुषांनी व स्त्रीयांनी प्रत्येकानेच आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.न्यायव्यवस्थे विरुध्द पेटून उठा म्हणजे कागदाच्या ढिगा-याने पडून असलेल्या केसेस पटकन सुटतील.मानसिकता बदला जग आपोआप बदलेल.
R. सागर (सांगली)
आज आपल्या देशात स्त्री सुरक्षित नाही. मग ती कुठल्याही वयाची असो. हल्ली दररोज सकाळी कुठल्याही वर्तमानपत्रात बघा, बलात्काराची कमीतकमी एखादी बातमी तरी असतेच असते. पीडितांच्या यादीत अगदी 6 महिन्यांच्या बालिकेपासून थेट 60-70 वर्षांच्या वृद्धेचाही समावेश होतो. आणि इतकं सगळं घडत असताना आपण काय करतो.? आपण पेटून उठतो का? तर हो. आपण पेटून उठतो.. पण फक्त सोशल मीडियावर.. एखादी निषेधाची पोस्ट केली, एखादा दिवस निषेधाचा dp ठेवला की आपली जबाबदारी संपली.
.
खरंच इतकं केल्यावर आपली जबाबदारी संपते का? गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात 4 हजारपेक्षा जास्त बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीचा आधार घेतला तर एकट्या मुंबईत गेल्या 3 महिन्यात तब्बल 123 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झालाय. ही फक्त नोंद झालेल्या तक्रारींची संख्या आहे. प्रत्यक्षात बदनामीच्या भीतीने म्हणा किंवा अन्य कारणाने, कित्येक प्रकरणांत तक्रार दाखल केलीच जात नाही.
.
इतकं झाल्यावर आपल्याकडे निषेध व्यक्त होतो तोही मेणबत्त्या पेटवून. ठीक आहे निषेध केला पाहिजे. पण ह्या निषेध करणाऱ्यातलेच कित्येक जण जेव्हा त्याच घटनेचा व्हिडिओ google वर शोधतात तेव्हा त्यांची मानसिकता लक्षात येते.
.
बऱ्याच वेळा अशी घटना घडल्यावर मुलींच्या, स्त्रियांच्या कपड्यांबद्दल बोललं जातं. पण त्यांच्या कपड्यांबद्दल बोलण्यापेक्षा लोकांच्या बदलत्या मानसिकतेकडे बघा ना. तसंही याबाबतचे आपल्याकडचे कायदे म्हणावे तितके कडक नाहीतच. त्यासाठी आधी कायद्यात आवश्यक ते बदल व्हायला पाहिजेत. परवा कुठल्यातरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांचं सरकार 12 वर्षांखालील वयाच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद करणार. घोषणेचं नक्कीच स्वागत आहे. पण त्यामध्ये वयाचा प्रश्न येतोच कुठे? पीडितेचं वय कितीही असो आरोपीचा गुन्हा एकच आहे ना? मग शिक्षाही तशीच कठोर पाहिजे. दुसरी गोष्ट आरोपीच्या वयाची. निर्भया प्रकरणामध्ये 1 आरोपी 16 वर्षाचा होता. म्हणून त्याच्या गुन्ह्याची तीव्रता माहीत असूनही त्याला शिक्षा नाही होऊ शकत.
.
अशा घटना घडल्यानंतर आम्ही इतकं पेटून उठतो की आम्हांला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षेची आठवण येते. त्यावेळेसारखीच आरोपीचा चौरंगा करायची शिक्षा असावी असं वाटू लागतं. तशी चर्चाही आपण सोशल मीडियावर करतो. पण परस्त्रीला मातेचा दर्जा देणारे शिवाजी महाराजांचे विचार मात्र आम्ही सोयीस्करपणे विसरतो. जोपर्यंत स्त्री ही एक उपभोग घेण्याची वस्तू आहे हा आपला विचार बदलणार नाही तोपर्यंत स्त्री कितीही योग्य वागली तरी ती सुरक्षित नाही राहू शकणार. आणि म्हणूनच असेल कदाचित पण देशातलं मुलींचं प्रमाण कमी होत असताना तिच्या सुरक्षिततेच्या काळजीमुळेच मुलगी जन्माला यावी पण शेजाऱ्याच्या घरात हाच विचार प्रबळ होतोय..
नितिन लेंडवे पंढरपुर.

"कामातुरा ना भय ना लज्जा" हे जे म्हटले आहे ते सद्यपरिस्थितीत वर्णन चपखल लागु पडते. विकृत लोक हे बलात्कारी नसतात पण बलात्कारी लोक हे हमखास विकृत असतात. कारण सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक संभोग, योनि मार्गात विविध वस्तु टाकणे, देहाची विटंबना काय नि काय.
रोजचे वृत्तपत्र उघडले की हे दोन-चार बातम्या हटकुन असतातच. ( वृत्तपत्र की बलात्कारपत्र म्हणावे हा प्रश्न पडावा)
गुन्हेगाराला जात, धर्म , लिंग, वर्ण असा काही ठराविक आकृतिबंध नाही. एखादा समाज अशा विकृताला समाज संरक्षण देत असेल तर तो समाज लबाडच म्हटला पाहिजे. असे असले तरी काही ठराविक समाज ( उदा.अल्पसंख्यक : [याचा अर्थ ज्या प्रदेशात जो समुदाय अल्प असतो तो. शब्दभ्रम झाला की बुद्धिभ्रम नको] ) जाणीवपुर्वक लक्ष्य केलेले दिसुन येतात.
अशा घटना लोकलज्जास्तव उजेडात येण्याच प्रमाण ही अत्यल्प. यातुन या गुंडापुंडांची हिंमत वाढते. आणि या टोळधाडी नव्या सावजाची शिकार करायला मोकळेच. आणि बलात्कारा विषयक जी विधाने होतात ती देखील लोक फार बेजबाबदारीने करतात. सत्ताधारी पक्षाचे एक लोकप्रतिनिधी म्हणतात की "तीन मुले असलेल्या बाईवर कोण बलात्कार करेल" आता इथे ९० वय वर्षे असणारी आजीबाई सुरक्षित नाही. निर्भयाच्या आईच्या समोर एक डीजीपी असणारा माणुस(?) म्हणतो की, "या वयात निर्भयाची आई एवढी सुंदर दिसते तर निर्भया किती सुंदर दिसत असेल. आता हे बलात्का-यापेक्षा कमी विकृत आहेत का?
यात अजुन एक वेगळाच प्रकार. जातपंचायती. मध्यंतरी नागपुर का कुठे बलात्का-याला या जातपंचायतीने काय शिक्षा दिली तर त्याने सर्व समाजाला "मांसाहारी" जेवण द्यावयाचे म्हणजे त्याच्या दुष्कर्माचे परिमार्जन झाले. दुसरी घटना त्यावर कढी करणारी. बलात्का-याला शिक्षा काय तर प्रती बलात्कार.
आता वरील बाबी पाहिल्या तर समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे. हे सांगायला कशाला भविष्यवेत्ता पाहिजे.
बलात्कार होण्याची कारणे:
याचा विचार करताना अनेक शक्याशक्यता असतात. महिलाविषयक अनादर, महिलेकडे उपभोग्य वस्तु म्हणुन पाहणे, दहशत निर्माण करणे, पुरुषप्रधान संस्कृती, मानसिक खच्चीकरण करण्यासाठी, पुरुषत्व सिध्द करण्यासाठी ( उपमर्दच हे ठरतात),लैंगिक वासना शमविण्यासाठी(दडपलेल्या लैंगिक भावना), लैंगिकविषयक कुतूहल, काही प्रमाणात बीभत्स वा अतिरंजित माहिती इत्यादी.
बलात्कारांचे मिथक: उत्तान कपडे परिधान केल्याने बलात्कार होतात, रात्रि अपरात्री मुलींचे बाहेर भटकणे, अश्लील चित्रपट पाहिल्याने, मुलांशी मैत्री केल्याने इ.
आपल्या पातळीवर यावर निश्चितपणाने पायबंद घालता येऊ शकतो त्याला पुरक गोष्ठी करता येतील. त्या अशा.महिलांचा आदर करणे,मुलगा व मुलगी भेद मानु नये, योग्य ते लैंगिक शिक्षण द्यावे, आपणास जशी आजी, आई, बहिण, बायको, मुलगी हे असतात तसेच इतरांना असतात हे लक्षात असु द्यावे.

क्षितीज गिरी ,सातारा
2013 च्या भारत सरकारच्या आकडेवारी नुसार भारतामध्ये सरासरी दर तासाला 4 स्त्रीयांवर बलात्कार होतात .हे फक्त नोंद झालेले बलात्काराचे गुन्हे आहेत कितीतरी गुन्ह्याची नोंदही होत नाही .त्यामुळे अश्या किती तरी निर्भया श्राद्ध आसिफा .....येतात व जातात .काही प्रकरणे फक्त प्रकाशझोतात येतात ती पण धर्माची आणि जातीची लेबले घेऊन आंदोलने केली जातात त्याचा फायदा घेऊन काही राजकीय पोळ्या पण भाजल्या जातात.प्रत्येक वेळी जखमेवर औषध लावले जाते (काही वेळा मिठ पण चोळले जाते)पण नवीन जखमा होतच राहतात.गरज आहे जखम होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची .
ज्या जातीच्या व धर्माच्या नावाने मोर्चे व आंदोलने झाली.त्याच जातीतले /धर्मातले बलात्कारी निघतात.आणि ते किती देतात आपल्या घरातील स्रियांना समतेचे स्थान हा प्रश्न तर अनुत्तरितच राहतो .अश्या मोर्च्यांनी बलात्कार थांबणार नाही आणि तो थांबलाही नाही .कारण काही अपवाद वगळता या कोणत्याच मोर्च्यांन मध्ये वैचारिक पद्धतीचे विद्रोही बंड नव्हते फक्त जखमेवर मालमपट्टी करा यासाठीच ते मोर्चे.
भारतामध्ये बलात्काराच्या घटना का घडतात यामध्ये बरेचशे विचारप्रवाह पुढे येतात.यामध्ये काही कपड्याना दोष देतात तर काही कायद्याला पण खोलात जाऊन विचार केला तर ज्या देशामध्ये बुरख्या सारख्या प्रथा आहेत. बलात्काराला भर चौकात गोळ्या मारल्या जातात त्या देशात पण कमी अधिक प्रमाणात बलात्काराच्या घटना घडतात.शेवटी बलात्कारासारख्या घटना का घडतात याचे उत्तर मात्र सापडेनासे होते .
माझ्या मते भारतीय स्रियांवर बलात्कार फक्त एकाच कारणामुळे होतात आणि आतापर्यंत होत झालेले आहेत .ते कारण म्हणजे भारतीय स्त्री ही मानसिक गुलाम आहे .हो हो बरोबर ऐकले तुम्ही .भारतीय स्त्री एक मानसिक गुलाम आहे.(काही अपवाद वगळता).स्रियांवर होत असलेल्या शोषणाचे स्रिया उघडपणे समर्थन करतात .रूढी, परंपरा ,संस्कृती ,धर्म या आणि यासारख्या गोंडस नावाखाली.
शनी मंदिरात स्रियांना पुरुषांबरोबर अधिकार मिळावा म्हणून चाललेला लढा हा स्रियांना उधळून लावण्याचा प्रयत्न केला .बुरखा व तिन तलाख सारख्या केलेल्या कायद्याला विरोध हा स्रियांनीच केला .जणू त्या स्व:ता सांगत होत्या आम्हाला काळ्या कपड्या मध्ये कैद करा.आपल्यावर होत असलेल्या शोषणाचे उघडपणे समर्थन करत होत्या .भारतीय इतिहासाकडे पाहिले तरी आपल्याला हीच परिस्थिती बघायला मिळेल .स्रियांना वारसाहक्क, संपत्तीचा ,लग्न करण्याचा ,घटस्फोटाचा अधिकार मिळण्यासाठी बाबासाहेबानी हिंदू कोड बिल संसदेत मांडले व संसदेच्या बाहेर स्रियांनि मोर्चा काडून या बिलाला कडाडून विरोध केला.अमेरिके मध्ये स्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून खुप मोठे आंदोलन केले.पण तेथील कोणत्या स्रियांना या आंदोलनाला विरोध केला नाही .कारण त्या सगळ्यांना आपला इतिहास माहीत होता.

महिलांनी कधी आपला इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला आहे का कारण ज्याला आपला इतिहास माहीत नसतो त्याचा वर्तमान आणि भविष्यकाळ हा अंधारातच असतो .चूल आणि मूल यामध्ये असणाऱ्या महिला एव्हड्या उंचीवर कश्या गेल्या?चार भिंतींच्या आता मधून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत स्रियांच्या झेपेसाठी वेळोवेळी ज्या रनरागिनींनी ,महापुरुष्यानी आपले जीवन वेचले त्यांची थोडीशी तरी जाणीव स्रियांनी ठेवली आहे का.कसा माफ करेल काळ मग तो सूड उगवल्याशिवाय राहणारच नाही.
ज्या सावित्रीबाई फुलेंनी अंगावर शेण ,चिखल ,गटारात घाण ,दगडे ,अपमान सोसून स्रियांना शिकवले .स्त्रीमुक्तीचा गाणे गायल्या.स्रियांवर लिहिले कविता केल्या .स्रियांच्या प्रगतीसाठी आपले जीवन वेचले त्या माऊली साठी स्रियांनी काय केले.त्या सावित्रीची तेवढी आठवण ही तुम्हाला येत नाही जेव्हढी आठवण विद्येची देवता सरस्वतीची येते.फक्त शुभेच्या दिल्या म्हणजे झाले नाही(काही तर त्या पण देत नाहीत).त्यांच्या विचारांचा जागर केला का .वास्तविक प्रत्येक चौका चौकात स्रियांनि या वाघिणीची जयंती साजरी केली पाहिजे.एवढे उदात्त कार्य केले आहे त्यांनी स्त्रीयांसाठी.
ज्यावेळेस एखादया समाजावर प्रसंग ओढवतो तेव्हा त्या समाजाचा प्रतिनिधी त्याची भूमिका स्पष्ट करतो किंवा त्याला विचारले जाते .पण स्रियांवर बलात्कार किंवा तत्सम घटना घडतात तेव्हा कोणाला विचारतात ?जात आणि धर्म प्रतिनिधीला ?का?इथेच मुळात खरी मेख आहे .स्रियांच्या हक्कासाठी कोणती हल्लाबोल करणाऱ्या, जागृत विद्रोही ,पुरोग्रामी,स्त्री पुरुष समानच्या विचारावर चालणाऱ्या संघटना आहेत का .तर उत्तर हो मिळते .नक्की आहेत .स्त्रीयांसाठी महिला आयोग पण आहे.पण स्रिया त्यांच्या हक्का प्रति किती जागृत असतात हा खुप गंभीर व चिंतेचा विषय आहे.
प्रत्येक वेळेस कशाला नुसती सहानभूती मिळवायची प्रत्येकाची .कुणाला तरी आपली दया येईल मग आपल्याला न्याय मिळेल .ही भाबडी आशा तरी का ठेवायची.स्रियांच्या निम्मी लोकसंख्या असूनही संपत्तीचा ,मतदानाचा,बाकी सर्व हक्क असूनही राजकीय दबदबा का कमी आहे .याचे कधी आत्मपरीक्षण केले आहे का?आणि ज्या काही स्रियां प्रमुख पदी बसल्या आहेत त्यांची मानसिकता बघायला हवी.स्त्रीयांच्या विकासासाठी त्या किती तत्परतेने पावले उचलत हे पण बघायला.
स्रियांना जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य भेटत नाही तोपर्यंत हे मानसिक शारीरिक शोषण होतच राहील.त्यासाठी गरज आहे सर्व स्रियांनि एका छताखाली येऊन धर्म ,जात, पंत, भेद बाजूला ठेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची.
प्रत्येक समाजातील महिलांवर बलात्कार झाल्यावर तो समाज विरोध करतो .महिला नाही समाज विरोध करतो .कारण महिलांनी त्यांना तो अधिकार दिलेला असतो किंवा आहे.म्हणजेच स्रिया प्रत्येक वेळी अवलंबून असतात कोना दुसऱ्यावर .का?जोपर्यंत त्या स्व:ता आपल्या छोट्या-छोट्या हक्काचे रक्षण करण्यासाठी एकत्र येणार नाहीत संघर्ष करणार नाही तो पर्यंत या बलात्कायासारख्या घटना कमी होणार नाहीत.नुसते कायदे करून काही एवढा फरक पडणार नाही.
प्रत्येक वेळेला बलात्कार झाल्यानंतर आपण खाडकन जागे होतो.मुळात तसे होऊ नये म्हणून तसेच भविष्यातील धोके ओळखून योग्य ती उपाय योजना का केली जात नाही?कायदा कडक करून लवकरात लवकर निकाल का लावला जात नाही?एखाद्या गोष्टीचा एवढा अंत का बघितला जातो?का असल्या मुद्द्यांनवर घण्यारडे राजकारण केले जाते.कायदा स्रियांना आरक्षण देऊ शकतो मग संरक्षण का नाही देऊ शकत .का यांची अजून तशी मानसिकता होत नाही .यांना फक्त असल्या मुद्द्यांवर राजकारण करायचे असते.लोकांना पेटवण्यासाठी वेळो वेळी हे मुद्दे मुद्दाम उखडून काढले जातात.आणि बाकीच्या विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
शेवटी एवढेच सांगेन समानता ही आपल्या विचारांमध्ये,वागण्या बोलण्यामध्ये दिसली पाहिजे.फक्त आपल्यावर वेळ आली की समानतेचा पुरस्कार करणारे पन महाभाग आहेत.काही स्रिया जातीभेद मानतात पण त्याच तत्वाने स्त्री-पुरुष भेद मानला तर मात्र त्यांना खटकतो.आणि या असमनतेच्या वतावरणामुळेच घडतात बलात्कारा सारख्या घटना.त्यामुळे बदल हा फक्त वरवर नको तो मुळापासून झाला पाहिजे कायमचा .
पूनम देशमुख,अकोला.
आजही आपल्या समाजात महिलांवर रोज अनेक प्रकारचे बलात्कार होत असतात.पावलो पावली वासनागंध नजराना रोज सामोरे जावे. माझे वय लहान आहे.मला एक समजते जिवंत असेपर्यंत तिच्यावर बलात्कार झालेला असतो पण तिच्या मृत्यूनंतर तिच्या चरित्राचे अक्षरशः धिंडवडे काढले जातात. माझी एकच विनंती आहे-
१. भारतातील न्यायव्यवस्थेलाकि जी काही बलात्कार केसेस आहेत त्या सर्व फास्ट ट्रेक कोर्ट द्वारे ९० दिवसाचे निकाली काढावे.मेणबत्ती,मोर्चा काढणे हे प्रकरणाची जाणीव करण्यासाठी ठिक आहे पण अंतिम उपाय नाही. मला अभिमान आहे आमिरखान यांचा.
२. मागे काही वर्षे आधी एका टि.व्ही. मालिकेच्या माध्यमातून त्यांनी लहान मुलांना ‘चुकीचा स्पर्श’म्हणजे काय हे समजावून सांगून त्याचा विरोध कसा करायचा हे शिकवले होते.त्यावेळी मी ५वर्षाची होती.सर्व पालकांनी त्यांच्या मुलांना हे शिकवावे,ही विनंती. आणखी एक मुलींना मेकअप,मेंहदी क्लासेस,ब्युटी पार्लर इ.शिकवण्यापेक्षा शिवाजी महाराज यांच्या काळातील तलवारबाजी,दांडपट्टा,कराटे शिकवा म्हणजे तिच्याकडे कोणी वाईट हेतूने पाहायची हिम्मत करणार नाही.
३ मी शाळेत जात असताना माझे मामा मला शिकवत होता की अनोळखी माणूस चुकीचे स्पर्श करत असेल तर त्याला हाताने बोखारायचे,त्याच्या मेन पाँईटवर लाथ मारणे,मोठ्याने आरोळी मारणे हे शिकवले होते.

संगीता देशमुख,हिंगोली
"हृदयी पान्हा,नयनी पाणी,
जन्मोजन्मीची कहाणी,
स्त्री ही बंदिनी....."
काळ बदलला,युगं बदललीत,अश्मयुगातून विज्ञान आणि तंत्रज्ञानयुगात पोहोचलोत,परंतु स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टिकोन हा समाज बदलू शकला नाही. युगानयुगापासून तिच्या वेदनेला हुंकार फुटले पण ते हुंकार थांबू शकले नाहीत. चार भिंतीच्या आत होती तेव्हा लोकांच्या नजरेला स्त्रीदर्शन हे अतिशय दुर्लभ होते. लोकांना वाटायचे,तिचे दर्शन दुर्मिळ म्हणून ती कधीतरी बाहेर पडल्यावर तिच्याकडे पुरुषाच्या वखवखलेल्या नजरा पडतात. ही विकृत पुरुषी मनाची लंगडी समर्थने आजही कधी ती तोकड्या कपड्यात म्हणून,कधी ती स्वैराचारी म्हणून,कधी तिचा उत्तानपणा म्हणून सांगितली जातात. उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे पहाण्याचा युगानयुगाचा शाप ती स्त्रीत्वासोबत घेऊन आली आहे. ती चार भिंतीत होती तेव्हाही सुरक्षित नव्हती आणि आजही नाही. ती दिल्ली,मुंबईसारख्या महानगरातील निर्भया असो,पत्रकार असो अथवा ग्रामीण भागातील श्रध्दा,असिफा असो,तिच्याकडे माणूस म्हणून न पहाता फक्त स्त्री म्हणूनच पाहिल्या जाते. आणि म्हणूनच ती शिकलेली असो,निरक्षर असो विकृत नजरेला ती बळी पडते. काही दिवस त्याची खरपूस चर्चा होते,वादविवाद घडतात,टीव्ही चॅनेल्सवाल्यांचा टी आर पी वाढतो,वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरून जातातकॅंडल मार्च होतात,मूकमोर्चे होतात. क्षणभर वाटते,ही बलात्काराची देशातील शेवटची घटना असेल पण असे कधी घडलेच नाही. आणि सध्याच्या स्थितीवरून ते भविष्यातही घडेल,असे वाटत नाही. सात वर्षाच्या निरपराध मुली पासून तर सत्तर वर्षाच्या हतबल स्त्रीवरही इथे बलात्कार होतो.
असे का घडत रहाते?बलात्काऱ्याला या बलात्कार करताना कायद्याची,समाजाची भीती वाटत नाही? यात महत्वाचे कारण म्हणजे,आम्ही जनता पेटून उठत नाही. एक दिवस कॅंडल मार्च करून,मोर्चे काढून निषेध नोंदवणे म्हणजे पेटून उठणे नव्हे. जेव्हा एखाद्या चिमुरडीवर बलात्कार होतो,तेव्हा कोणताही वकील आरोपीची ती केस न घेता पेटून का उठत नाही?देशातील प्रत्येक मुलीचा बाप त्यात धर्म,जात, आरोपीचा पक्ष न पहाता का पेटून उठत नाही?देशाच्या कोण्यातरी कोपऱ्यात घडलेली घटना माझ्याही जीवनात,माझ्याही मुलीच्या बाबतीत घडू शकते,हे प्रत्येक मुलीच्या बापाला का वाटत नाही? एखाद्या चिमुरडीवर होणाऱ्या बलात्काराला ती कोणत्या धर्माची आहे,कोणत्या जातीची आहे आणि आरोपी कोणत्या राजकीय पक्षाचा आहे,त्यानुसार त्या घटनेला रंग दिला जातो. अशाही घटनेत राजकारण करण्याइतके राजकीय लोक आणि त्यासोबत आपणही निर्ढावलेले आहोत का? बळी गेलेल्या चिमुरडीचे वय,तिची बलात्कार झाल्यानंतरची निर्घृण अवस्था,तिच्या आईवडिलांची अवस्था काहीच आपल्या डोळ्यासमोर न येण्याइतपत आपण संवेदनाहीन झालेले आहोत का?

पूर्वीपासून कोणाचाही सूड घ्यायचा झाला तर त्यासाठी प्रतिस्पर्ध्याची मुलगी,आई,बहीण किंबहुना त्यासाठी स्त्रीच लक्ष्य केल्या जाते. हा सूड घेतांना माझ्याही घरातील स्त्री अशी कधीकाळी बळी पडू शकते,असा विवेकी विचारही करू न शकण्याइतके आपले भावनिक,सामाजिक पतन झाले आहे का? एखादी स्त्री जेव्हा बलात्काराचा आरोप करते तेव्हा त्यात काही कावा असूही शकतो. तेव्हा त्या घटनेत नक्कीच शहानिशा केल्याशिवाय व्यक्तीवर आरोप ठेवून शिक्षा करणे,धोक्याचेच ठरेल. परंतु जेव्हा एखाद्या निरपराध,कोवळ्या चिमुरडीवर बलात्कार होतो तेव्हाही आपली न्यायव्यवस्था,समाजव्यवस्था त्यात पळवाटा का शोधते? त्यात आरोपीला वाचवण्याचा समाज आणि वकीलही का प्रयत्न करतात? अशावेळी सगळा देश बळी गेलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी का पेटून उठत नाही. दिल्ली ते गल्लीचे हे अमानुष लोण स्वत:च्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत आपण असेच हातावर हात ठेवून, आरोपीला वाचवण्याचे मार्ग शोधत राहूत का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा