“मी नेमका कोण आहे- स्वजाणीव” भाग २

शुभम, पंढरपूर


Image result for self realization
      खरेतर आजपर्यंत एखाद्या विषयावरती स्वयंमस्फूर्तिने अस काही लिहिल नाही.  आज पहिल्यादा काही लिखाण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामूळे कृपया काही कमी - जास्त  झाले तर समजून घ्या आणि काही चुकले तर समजावून सागा, सांगचाल ना ?

      निसर्ग अवस्थेत राहणाऱ्या माणसापासून ते उतक्रांतिच्या प्रवासात सध्यस्थितीपर्यंत पोहोचलेल्या मानवाला पडनारा तितकाच सनातन आणि मूलभूत प्रश्न म्हणजे - कोहम ( मी कोण ).      कदाचित या एका प्रश्नांचे उत्तर भेटले तर सबंध मानवी समजाला भेडसावणाऱ्या आणि ग्रहण लावणाऱ्या तितक्याच मुलगामी प्रश्नांची ( जन्म - मृत्यू, पुनर्जन्म, आस्तिक - नास्तिक, स्वर्ग - नर्क, धर्म)  उकल करण्याचे सामर्थ्य असणारा हा पुरातन प्रश्न आहे. त्याचे उत्तर शोधणे प्रत्येकाला क्रमप्राप्त आहे. कारण आपल्यातील प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्याना-कोणत्या टप्प्यावरती आज ना उद्या हा प्रश्न हमखास पडतोच.  आपल्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्याही कळत - नकळत सतत आपल स्वतःच अस वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा किंवा निर्माण केलेले वेगळे अस्तित्व आहे त्यापेक्षा अधिक आनंदी आणि परिपूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते , नेमके आपल्या याच प्रयत्नांवर किबहुना आपल्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित   करनारा हा आदिम प्रश्न म्हणजे - कोहम : मी नेमका कोण, कोठून आलो, कोठे जानार, माझ्या अस्तित्वाचे प्रयोजन काय, जीवनाचा अर्थ काय, मला नक्की काय हवे आहे, माझे अंतिम लक्ष काय? यासारखे कित्येक प्रश्न आपल्याला पडतात, काहीना पडले असतील तर काहीना भविष्यात पडतीलही. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपापल्या पध्दतीने शोधण्याचा प्रयत्न करतो आणि करायलाही हवाच.  कारण वर्तुळामध्ये केंद्रबिंदूला जे महत्व आहे तेच महत्त्व मानवी जीवनामध्ये कोहम या प्रश्नांला आहे. जर आपणाला आपल्या आयुष्यरुपी वर्तुळाचा केंद्रबिंदू समजला तर आपनास आपल्या सुंदर जिवनाचा परिघ आहे त्यापेक्षा अधिक व्यापक आणि समृद्ध करणे सोपे जाईल.

      तस पहिले तर जन्म आणि मृत्यू हा आपल्या सध्याच्या आठवद्याच्या चर्चेचा विषय नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, तरीही संबंधित विषयावर थोडस लिहित आहे कारण हा विषय अप्रत्यक्षपणे कोहमशी निगडित आहे .  मृत्यूबद्दल मला जास्त काही माहिती नाही त्यामुळे त्याबद्दल काही न बोलता आपल्या जन्माबद्दल थोडस वेगळ्यापध्दतीने काही लिहण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या जन्मप्रक्रियेकडे थोडस वैद्न्यानीक आणि सूक्ष्म पातळीवर पाहण्याचा प्रयत्न करु :   वैद्न्यानीकदृष्ट्या प्रत्येक पेशी सजीव असते आणि प्रत्येक सजीव आपल्या जिवनाची सुरुवात एकपेशीय अवस्थेतून करतो तर मग

१.   Ovum / Egg cell : अंडपेशी  : - एकपेशीय, सजीव, निर्मिती - संबंधित स्त्रिच्या जन्माच्या वेळेस तिच्या अंडाशयामध्ये( ovary ) हजारो अविकसीत अंडपेशी जन्म घेतात , परिपक्व  ( तारुण्यावस्थेत) होइपर्यंत त्या निश्क्रीय असतात.
२.   Sperm Cell : शुक्राणू :- एकपेशीय, सजीव, निर्मिती - सबंधित पुरुषांच्या तारुण्यावस्थेपासून ते मृत्यूपर्यंत.
३.    Fartilization :  फलन : -
Ovum + Sperm  = Zygote : युग्मनज/ गर्भ  :- एकपेशीय, सजीव.
     
    जर अनुक्रमे अंडपेशी, शुक्राणू, आणि गर्भ तिन्ही एकपेशीय व सजीव असतील तर मग आपला जन्म नक्की केव्हा होतो ?   खरच जन्म होतो का ? (मी याठिकाणी आपल्या प्रचलित जन्मदिनांकाबद्द्ल न बोलता आपल्या सूक्ष्म पातळीवरील अस्तित्वाबद्दल बोलत आहे)  की उर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार : ऊर्जा निर्माणही करता येत नाही नष्टही करता येत नाही, ती सदैव स्थित असते फक्त एका रुपातून दुसऱ्या रूपात स्थानांतरित होत असते.

मग जर जन्मच नसेल तर मृत्यू होतो का ?
मृत्यूच नसेल तर पुनर्जन्माला काही अर्थ उरतो का ?
मग स्वर्ग - नर्क संकल्पनाचा अर्थ काय ?
मग इश्वर म्हणजे कोण ?
धर्माचे मानावी जिवनातील प्रयोजन काय ?

मग तरीही शेवटी प्रश्न शिल्लक राहतोच की -  कोहम ?(मी कोण)

       मग जर आपण स्वतःबद्दलच एवढे अनभिज्ञ असताना इश्वर, धर्म,  जात, वर्ण, वंश, लिंग इत्यादी बद्दल पोकळ अभिमान बाळगन्यात काय अर्थ आहे.

   विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना ?
*********************************************************************************

जयंत जाधव,लातूर

Image result for self realizationजो इतरांना जाणतो तो शहाणा व
 जो स्वतःला जाणतो तो ज्ञानी असतो

                          - एक चिनी विचारवंत

           वरीलप्रमाणे ज्ञान प्राप्त कसं करायचं? या बाबतीत सर्वात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे स्वजाणीव असणं हे एक कौशल्य आहे, क्षमता नाही. कोणताही माणूस स्वजाणीव घेऊन जन्माला येत नाही. जीवनाच्या  कोणत्याही ही वळणावर स्वतःची ओळख करुन घेऊ शकता.आपण इतक्या जाणीवपूर्वक स्वतःकडे कधी लक्ष दिलेलं नसतं. त्यामुळे हे कठीण आहे पण अशक्य नाही .

          “Self-realization is a continuous process, it is a journey. Do not wait So keep the focus on the journey, not on the move” स्वजाणीव ही एक  निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, तो एक प्रवास आहे. मुक्काम नाही. त्यामुळे लक्ष प्रवासावर असू द्या, मुक्कामावर नाही.उदाहरणार्थ २००१ मध्ये महाविद्यालयात शिकत असताना औरंगाबाद येथे एका थलेसेमियाग्रस्त  चार वर्षाच्या मुलाला रक्त देताना मला स्वजाणीव झाली.मी रक्तदान केले व आजही नॉट आऊट@47 माझे रक्तदानाचे काम अखंड चालू आहे.

         आपल्या स्वतःच्या जीवनाचे किंवा मानवी जीवनाचे  ध्येय काय आहे हे जाणून घेण्यास तुम्ही विचार केलात  का? प्रत्येक दिवसात आनंदासाठी अनन्य शोध असताना, आपल्याला मिळालेला कोणताही  आनंद आपल्याकडून केवळ तात्पुरता राहतो. मग, आनंदाच्या प्रत्येक टप्प्यानंतर आपल्या असे लक्षात येते  की फक्त अंतर्निहित असंतोष आतमध्येच आहे ? हा असंतोष जो पुन्हा पुन्हा येतो, त्याच्या स्वारस्याची पुढची खेळी ही तात्पुरती व  म्हणूनच चक्र चालू असते,याची जाणीव करा, आपण प्रश्न विचारू शकतो की आनंद कायम अस्तित्वात असतो का? आणी जर तसे असेल तर ही जादू कशी मिळवता येईल?

         याचे उत्तर हो असेच आहे,आनंद कायम  अस्तित्वात आहे. कायमस्वरुपी आनंद हेच स्वतःचे  व मानवी जीवनाचे ध्येय आहे आणि आत्मनिश्चयी झाल्यानंतर सतत त्याचा अनुभव घेतला जातो.

         पण स्वजाणीव काय आहे? हे माहित असणे आणी थेट अनुभव असा आहे की आपण खरोखर कोण आहात! "मी कोण आहे" ह्या ख-या शाश्वत स्वभावाचा शोध घेऊन, कायमस्वरूपी आनंद मिळवला जातो.

       "आपण कोण आहात" असे विचारले असता, बहुतेक लोक "मी अमूक  आहे" याचे उत्तर देतात परंतु हे नाव केवळ आपल्या शरीराच्या ओळखण्यासाठी दिले जाते, जसे की बिग-बझार आणि मक्डोनाल्ड सारख्या नावाच्या बिझनेस फर्मची नावे ही दुकाने उपस्थितीचे वर्णन करण्यासाठी दिली जातात. प्रत्यक्षात, "आपण" आपल्या नावाचे मालक आहात आणी स्वतःच नाव नाही. हे खरे नसल्यास, तुमचे नाव किती वेळा बदलता येईल?

*****************************************************************************
Image result for self realizationअक्षय पतंगे, आ. बाळापुर,जि. हिंगोली


वेगवेगळ्या विषयांवर आपण सहजपणे व्यक्त होतो. स्वतः वर बोलायचं तर मात्र प्रश्नार्थक चिन्हाशिवाय काहीचं सुचत नाही. असो.
      Be the change you wish to see in world असं गांधीजींनी म्हणाले. मला वाटतं या विषयाला वरील वाक्य तंतोतंत लागू होतात.
गणितात सीमारेषेवर कॉपीमुक्ती अभियानाच्या पहिल्या वर्षी 150 पैकी 52 मार्क घेऊन 68% पास झालो. माझ्यापेक्षा मित्रांना जास्त आनंद  झाला कारण मी आणि गणिताच कधी जमलंच नाही. त्यानंतर 12वीला कला शाखेत 76.67% घेऊन तालुक्यात प्रथम व नंतर गाव सोडून नांदेडला यशवंत कॉलेज मध्ये BA साठी प्रवेश घेतला. याचं काळात MPSC चे वारे वेगात वाहत होते. याचं काळात Motivation speaker, classes वाले बॅनरबाजी करतांना पहिले. इथं क्लास लावला म्हणजे तुम्ही अधिकारी होणारचं असा आभास निर्माण करताना पहिले. माझे बरेचं मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर होते. पण त्या क्षेत्रात प्रोत्साहन, भविष्याचा सरकारी आधार, पाठबळ न मिळाल्याने त्यांना MPSC चा अभ्यास करावा लागत आहे पण त्यातून एखादा धावपटू, कुस्तीपट्टू, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता बाहेर निघाला असता.
मी कॉलेजला असताना जवळून पहिले की, ग्रामीण भागातून शहरात येणारा विद्यार्थी हा संघटना वगैरेकडे आकर्षित होतो, वेळ देतो, प्रसंगी त्याला कॉलेज पेक्षा नेते, कार्यकर्ते ग्रेट वाटतात तीन वर्षे झाल्यावर डिग्रीचा कागद वगळता हाती काहीचं नसतं.
मी MPSC चा थोडेफार दिवस अभ्यास केला पण आणि आवडीच्या विषयाकडे जायचे ठरवले, सामाजिक क्षेत्र. Gandhi Research Foundation जळगाव ला असताना Dean डॉ.जॉन चेलदुराई यांच्या मार्गदर्शनाखाली Gandhian thought on social work हा 1 वर्षांचा कोर्स पूर्ण करतांना Internation women meet conference on non violence and peace यांत Volunteer म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडताना एकता परिषदचे पी.व्ही. राजगोपाल-जिल कार हॅरिस या दाम्पत्यांचे काम जल, जंगल, जमीन क्षेत्रात किती मोठे आहे हे जवळून पाहता आले. त्यांच्या सहीचे प्रमाणपत्र स्वीकारताना प्रोत्साहन मिळाले, आनंद झाला. गुजरात- राजस्थान सीमारेषेवर रस्ता, वीज कनेक्शन नसतांना आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या तरूण तडफदार धडाडीचे कार्यकर्ते मुस्तुभाई यांना भेटता आले. ज्यांच्यावर नक्षलवादी असल्याच खोटेे निराधार आरोप केल्या गेले. पण त्यांनी कामापासून विचलित न होता आणखी वेगात सुरुवात केली. ग्रेट माणसं आहेत समाजात. खुप शिकलो या लोकांकडून..!
सध्या धान फौंडेशन संचलित The Dhan Academy मदुराई मध्ये अजून नवीन जग जाणून घेत आहे. हे झालं की मग academic शिक्षण संपेल आणि काम चालू करेल,सर्वांच्या आशीर्वादाने..!
आयुष्यात चुकाही भरपूर केल्या, पण त्यातून शिकत आहे, शिकत राहील.
*****************************************************************************

Image result for self realization
श्रीनाथ कासेसोलापूर

विनाशी हे शरीर, नश्वर हा आत्मा, कोण 'मी' आहे ?
थकलेले मन, तुटलेले ह्रुदय, कोण 'मी' आहे ?

तुझ्या मनातला बुद्ध, का तुझ्या वर्तनातला युध्द ?
जगातला मी, माझ्यातला जग, खरं कोण 'मी' आहे?

शिक्षणासाठी सोडलेले गाव, तिच्या डोळ्यातला भाव,
शरीराला ठेवलेले नाव, खरं सांग कोण 'मी' आहे ?

शरमेने झुकलेली गरिबी, माजलेली श्रीमंती,
हिरोशिमा, नागासाकी, सिरीया सांग, कोण 'मी' आहे ?

करतो योग, साधना, तरी होत नाही स्वजाणीव,
तुझ्यातला काम, क्रोध, द्वेष, मत्सर, कोण 'मी' आहे ?                                     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************