“शाहू,फुले आणि आंबेडकर सर्वांसाठी साधन झाले तरीही विचारातून आचार साध्य का नाही?”
🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून
“शाहू,फुले आणि आंबेडकर सर्वांसाठी साधन झाले तरीही विचारातून आचार साध्य का नाही?”
Source: INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर
हा विषय खूप मोठा जटिल आहे असं नाही. आज महाराष्ट्र राज्य शाहू , फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो... अस जर कोण म्हणतं असेल तर तो खूप मोठा जोक होईल.
पुरोगामी महाराष्ट्र किंवा बुद्धिवादी महाराष्ट्र अस ही काही म्हटलं जातं. तो आजचा विषय नाही. शाहू महाराज यांनी काय केलं? फुले यांनी पुण्यात काय कार्य केले? आणि बाबासाहेब यांच्या बद्दल माझ्यासारख्याने बोलणे योग्य नाही.. पण त्यांनी कार्य काय केलं? असे तीन प्रश्न कोणालाही विचारा... ठराविक उत्तर मिळतात... आणि लोक अस्मितेचा प्रश्न बनवून सोडून देतात.
खर तर या सुधारकांचे विचार आम्हाला कळलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यातून नेमका काय अर्थ काढावा हे कळत नाही. व हे न कळल्यामुळे.. आपल्या वर्तनात कधीही बदल होत नाही.
मी बरेच शब्द ऐकतो त्यांचे अर्थ सुद्धा मला कळत नाहीत. परवा वाचलं पेपर मध्ये 'आंबेडकरवादी जनता' ..... कोण आहे ही जनता... मागासवर्गीय लोक ही आंबेडकरवादी जनता.
माळी समाजाच्या obc मागण्याचा एक मोर्चा होता मागे..तेव्हा शब्द ऐकला "फुले समर्थक".
अजूनही शाहू महाराजांनी जनता काही ऐकली नाही ... पण शिवाजी महाराज यांचे मावळे अस ऐकलं आहे..
मग मी कोण नेमका? यांच्यात... तर माझं नाव आणि आडनाव असलेल्या जाती मधले कोण पुढारी आहेत त्यानुसार मी त्यांचा "वादी" होतो.. प्रत्यक्षात मी कोणाचे विचार घेऊन वर्तन करत आहे याचा कोणाला काही सम्बन्ध नाही.
अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे कट्टरता..म्हणजे मी सनातन असो की पुरोगामी .. समोरच्या व्यक्तीला घाबरवून सोडणे हा एक प्रकार आहे... 'गर्वच नाही तर माज आहे मला अमुक अमुक असल्याचा'
हे सर्व आपलं वर्तन हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर निश्चित नाही.
लोकांनी स्वार्थासाठी या महापुरुषांचा राजकारण करून वापर केलेला आहे. गुलामगिरी नावाचे पुस्तक फुले यांनी लिहिले.. पण अजूनही मानसिक गुलामगिरी सम्पली आहे का?तर नाही.
बाबासाहेब यांनी पूर्ण भारताचे संविधान लिहिले पण ते एक विशिष्ठ समाजाचे नेते झाले.
शाहू महाराज हे महाराज असूनही विरोधाला सामना करत वंचीत विकास करत राहिले ... यातील एकही गुणवत्ता सरकार कडे नाही आणि लोकांकडे वर्तनात नाही..
म्हणून दुर्दैवाने हे साधन झाले आहेत.
आपल्या सारख्या तरुणांनी हे विचार अवलंबले पाहिजेत.
जाती निर्मूलन, वर्ण वर्चस्व , आरक्षण आणि सामाजिक न्याय यावर काम करायचं असेल तर
हे विचारातून भावने मध्ये आणि भावनेतून वर्तनामध्ये आणणे गरजेचे आहे.

-संदीप बोऱ्हाडे,
-संदीप बोऱ्हाडे,
पुणे
फुले, शाहू , आणि आंबेडकर यांच्या अगोदर मी एक नाव घेऊ इच्छितो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..
महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर यांच्या घामाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताने पूर्णत्वास आला आहे. गेली अनेक दिवस काही दळभद्री लोक हे विसरूनच गेलेत. काय त्या फेसबुक, व्हाट्सअप्प वर मी आम्ही मराठे, आम्ही भिमाची पोरं अशा टायटल खाली सामाजिक तेढ निर्माण करतायत.
मुळात या मूर्खाना हेच कळत नाही की ज्या महापुरुषांच्या नावावर हे एकमेकां विरोधात बोलतायत ते कधीच जाती पातींच्या मूल्यांवर कधीच लढले नाहीत.
शिवाजी महाराजांच्या सेवेत अनेक मुस्लिम होते. त्यांनी मुस्लिम धर्माचा कधीच द्वेष केला नाही. सर्वसामान्य रयतेचा विचार करून त्यांनी राज्याची निर्मिती केली. शिवाजी राजांनी स्थापन केलेले राज्य हे महाराष्ट्रातील फक्त हिंदुसाठीच नव्हते , तर ते महाराष्ट्रातील मुस्लीमांसाठीही होते. मग महाराष्ट्रातील मुस्लिमांना शिवाजीराजे आपले वाटू नयेत का ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वव्यापी असतानाही त्यांना फक्त दलितांचा नेताच ठरवले , हि फार मोठी शोकांतिका आहे.
दलितसमाजातही कितीजणांना बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव आहे ? कितीजणांनी याचा अभ्यास केला आहे? दलित समाजातही बरेचजण फक्त आरक्षणापुरतेच स्वतः ला मागास ठरवतात. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ,राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी घेतलेल्या परीश्रमाशी काहीच देणे घेणे नाही.
आज धर्माच्या रंगात या महापुरुषांचे विचार पुसत चालले आहेत. जागोजागी ,पावलोपावली धर्माचे झेंडे, फेटे, गळ्यातून स्कार्फ मिरवले जात आहेत. संपूर्ण वातावरण हे त्या त्या धर्माने भारावून जात आहे . यात त्या महापुरुषांच्या शिकवणीचा, त्यांच्या विचारांचे अस्तित्व कोठे दिसतच नाहीये. दिसतो तो फक्त धार्मिक अहंकार ज्याच्यासाठी या महापुरुषांचा वापर केला जात आहे.
हा धार्मिक प्रसार करण्याएवजी या महापुरुषांचे विचार त्याच मेहनतीने प्रसारित केले तर त्याचा परिणाम सामाजिक एकता निर्माण होण्यात दिसून येईल. फक्त आपला धर्म जे सांगतो तेवढ्यापुरतेच मर्यादित न राहता चौफेर अभ्यास केला गेला पाहिजे.
आजचा समाज हा धर्मवाद आणि जातीवाद याने वेढलेला आहे. दिवसेनदिवस माणूस हा आकुंचित बुद्धीचा होत चालला आहे. धर्म आणि जातीच्या नावावर माणसा-माणसात द्वेष निर्माण होत आहे. समाजसुधारकांनी आपले संपूर्ण जीवन या समाजाच्या सुधारणेसाठी अर्पण केले. या महापुरुषानाही धर्माच्या आणि जातीच्या चौकटीत अडकवुन त्यांचे कार्य मर्यादित केले.
या महापुरुषाची जातीजाती मध्ये वाटणी करून त्यांची जयंती साजरी करण्याच्या नावाखाली धर्माचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न अधिक होऊ लागला आहे. या महापुरुषाना खरच आदरांजली वाहायची असेल तर त्यांची शिकवण , तत्व याचे अनुकरण करावे.
महाराष्ट्रासाठी जेवढे महापुरुष झटले ते खरं सोनं आहे आणि त्या सोन्याची किंमत मोजणं कितीही धार्मिक, जाती प्रेमी असला तरी त्याला जमायचं नाही.
पण त्याचं नाव घेऊन जाती धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करणारे खरे समाज कंठक आहेत.
Source: INTERNET
-मयुरी देवकर,
पंढरपूर
' वीरांची भूमी ,साधुसंतांची भूमी, विचारवंतांची भूमी ' या शब्दफुलांनी अनेकांनी या भारतभूमीचा गौरव केला आहे. आपल्या या राष्ट्रामध्ये अनेक थोर संत, विचारवंत होऊन गेले आहेत . प्रत्येकांनीच माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं हेच शिकवलं .चौकस बुद्धीने विचार करायला शिकवलं, पण खरंच आज कोणी चौकसपणे विचार करतोय का हा मोठा प्रश्न आहे आणि कोणी करत असेल तर आचरणात कितीजण आणतात हा त्याहून मोठा प्रश्न आहे . समाजामध्ये असलेल्या अनिष्ठ रूढी, परंपरा घालवून सर्वसामान्य जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी ज्या महात्म्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व तत्वज्ञान सर्वसामान्यांसाठी खुले केले त्या महात्म्यांच्या विचारांचंच ओझं झालं आहे या आजच्या पिढीला..... फुले, शाहू, आंबेडकर यांनी आम्हाला काय शिकवलं याचा प्रत्येकाने वेगळाच ,आपल्या सोयीचा अर्थ काढला आहे. ज्यांनी जातीय विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्याच महान लोकांची आज विभागणी करून पुन्हा जातीय विषमता निर्माण केली जात आहे काय म्हणावे या वेडेपणाला!
आज फुले, शाहू, आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना त्यांनी सांगितलेल्या विचारांना अंगिकारनं खूप महत्वाच झालं आहे. आणि त्या विचारांचं रूपांतर अजूनही आचरणात आणले नाही तर बोलाचाच भात नि बोलाचीच कडी, खावोनिया तृप्त झाला कोणी हीच परिस्थिती पुढे राहील ... आणि ही भविष्यातील स्थिती टाळण्यासाठी नुसतेच फुले, शाहू, आंबेडकर या व्यक्तींचा न्हवे तर त्यांच्या विचारांचा प्रसार व्हायला हवा आणि तो प्रसार व्यक्तींच्या आचरणातून व्यक्त झाला तरंच त्यांच्या विचारांचे साध्य झाले म्हणावे लागेल आणि ही जबाबदारी आता आपल्या सर्वांनाच घ्यावी लागेल हा वास्तवाचा विस्तव हातात घेऊनच इथून पुढची वाटचाल करायची आहे .....
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
जनहितार्थ:-
मी आत्ताच जलमित्र🙋 झालो .1 मे ला श्रमदान करणार आहे.* माझं गाव स्पर्धेत नसलं म्हणून काय झालं.माझ्या तालुक्यातील , जिल्ह्यातील,महाराष्ट्रातील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते माझ्या भारत देशातील आहे.
प्रत्येकाला सीमेवर जाऊन देशभक्ती व्यक्त करता येत नाही म्हणून लाखोंच्या 😥डोळ्यातील पाणी घालवण्यासाठी चला गावात पाणी आणूया.
आणि एक जलसैनिक बनूया....
तुम्ही सुद्धा व्हाल ना मग!!जलमित्र.....💧
त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://jalmitra.paanifoundation.in/
📢 :🌱 वि४ 🌿 *व्हॉट्सअप ग्रुप.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
Source: INTERNET
-जयंत जाधव,
लातूर
"प्राजक्ताचं सांडणं हे प्रारब्धच असतं
तरीही तो फुलणं थांबवत नाही
पायदळी जरी तुडविले कोणी तरी
सुंगधाच देणं तो देणं थांबवत नाही".
(संकलन-आम्ही साहित्यिक,फेसबुक गृप)
वरील विकास पवार यांच्या चारोळी प्रमाणे महापुरुषांच्या विचारांची महती असते.
काळ कुठलाही असो व त्यातील महापुरुष, विचारवंत हा कधीच पूर्ण नसतो.त्यांना मर्यादा असतात .महापुरुषांचे विचार जरी महान असले आज आपण त्यांना एका चौकटीत बंद केले आहे.फुले माळ्यांचे,आंबेडकर हे बुध्दांचे,शिवाजी हे मराठ्यांचे असे वाटून टाकले आहे.त्यांच्या नावाचे व विचारांचे ऐवढ्या प्रमाणात तुकडे केलेत कि 'विचार' म्हणजे काय हे शोधावे लागेल? ईश्वराने सृष्टी निर्माण केली.ती सुंदर दिसावी म्हणून सप्तरंगाची मनसोक्त उधळण केली.किती स्वार्थ रहित विचार व कृती आहे ईश्वराची.पण स्वार्थी मानवाने काय केले जातीचे राजकारण करुन रंग वाटून घेतले.भगवा रंग हिंदूचा,निळा बौद्ध लोकांचा,हिरवा मुसलमान लोकांचा इत्यादी.
शाहू,फुले,आंबेडकर इत्यादी सह अनेक विचारवंत यांनी त्या त्या काळात मौल्यवान विचारांचे योगदान दिलेले आहे.या विचारांचा मुळ उद्देश हा हा मानवी कल्याण व विकास हा होता.पण काही स्वार्थी लोकांनी विचारवंत यांच्या नावाने दुकानदारी चालू केली आहे.याचा अर्थ या महापुरुषांच्या विचारांना आप कमाईचे साधन बनवले.वास्तविक पाहिलं तर स्वतः शाहू,फुले,आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले आहे कि त्यांचे विचार हे साधन आहे.आमची वाटणी करु नका.आमच्यापैकी कुणी एकही मानवी जीवनाचे सत्य सांगू शकत नाही.आपण त्यांचा अभ्यास करुन या विचारांना साध्य बनविले पाहिजे.
चित्रपटात एखादा कलाकार हा आपल्या अभिनयाने लोकांना एक क्षणभर हसवू शकतो पण नेहमी साठी त्यांचे दुःख दूर करु शकत नाही. हा आपण प्रेरणा मात्र घेवू शकतो.तरच विचारातून आचार साध्य होतील.

-नरेश शिवलिंग बदनाळे,
लातूर
भारत हा विवीध कलागुणांनी पारंपारिक संस्कृतींनी आणि विचारवंतांच्या विचारांनी घडलेला देश आहे आज एकशे तीस करोड भारतीयांची विचारधारणा ही वेगवेगळ्या विचारवंतांच्या विचारांवर अवलंबुन आहे पण,खरं पाहता आचरण शून्य आहे..
फुले,शाहु,आंबेडकर साधने कैक झाली,
आचरणाच्या माध्यमांना विसंगति प्राप्त झाली...
आज ही साधने फक्त बुद्धिमत्तेचे व कर्तुत्वाचे स्मृतीदीप म्हणुन आहेत पण त्या स्मृतीदीपाची ज्योत तेवत ठेवणे हे आपल्या आचरणावर अवलंबुन आहे. आज समाज फक्त त्यांच्या राहणीमाणीचे अवलोकन करत आहे आणि
विचारांवर चुकीचे विचार मांडुन पडदा सारत आहेत. समाजाने अज्ञानात राहुन चूकीच्या विचारधारणेला आपलसं केलय पण कधी हा विचार केला नाही की फुले,शाहु,आंबेडकर यांसारख्या लोकांनी कधी स्वतःचा विचार केला नाही आणि आपण मात्र स्वार्थीपणाच्या सीमा ओलांडल्या आहेत.वेगवेगळ्या अज्ञानी विचारांना बढावा देऊन आपण त्याच फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांचे,बलीदानाचे मातीमोल करत आहोत.
नितिमत्ता हरवत आहे तमगुणी,नराधमी विचारधारणेला वाव मिळत आहे, पण यातुन फक्त साध्य होईल तो फक्त विचारांचा विनाश आणि मानवतेचा लिलाव.फुले,शाहु,आंबेडकर यांच्या विचारांना सुद्धा आपण जाती,समाज यांच्या दृष्टिकोणातुन विभागले आहे.पण, त्यांनी त्यांचे विचार हे कोणत्या समाज किंवा जाती धर्मांसाठी मांडले नव्हते हे मात्र समजुन घ्यायला आपण तयार नाही आहोत कारण, आपण फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांना कधी समजुनच घेतले नाही,आपण फक्त समजलाय आणि बाळगलाय तो गोड गैरसमज ,जाती,समाज,धर्माच्या निरर्थक विचारधारणेचा आणि त्यातुन आपल्यालाच बाहेर निघावं लागेल कारण त्यात आपणच दोषी आहोत,
तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल..सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..
समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तेव्हा म्हणता येईल फुले शाहु आंबेडकर.. यांच्या विचारातुन आचार साध्य झाले.
फुले,शाहू,आंबेडकर सर्वांसाठी साधन झाले तरीही विचारातून आचार साध्य का नाही? कारण आजही यांना प्रत्येक समाजाने जातीच्याच दृष्टिकोनातून पाहिले आहे,खरे फुले,शाहू,आंबेडकर हे समजलेच नाहीत कुणाला,खरंतर या व्यक्तींचे कार्य हे सर्वव्यापी होते,पण काही जातीवादी लोकांनी यांना फक्त एका विशिष्ट वर्गाचेच ते होते व त्यांचे कार्य देखील त्याचपूरते मर्यादित होते असा खोटा प्रचार केला,त्यामुळे खरे फुले,शाहू,आंबेडकर कुणाला समजलेच नाहीत,जातीवादी लोक हे फक्त आपल्या सोयीपुरते या महापुरुषांना वापरून घेतात,तसेच प्रत्येकाने ठराविक महापुरुषांचे पेटंट घेऊन ठेवले आहे,म्हणजे फक्त त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क असा काहीजण तोरा बाळगून असतात, म्हणजे नुसते मिरवण्यापूरते त्यांना मानले जाते, विचारांचा वारसा पुढे नेण्याचा विचार येत नाही, अमुक एक महापुरुष आमच्या जातीचे म्हणून आम्ही पण श्रेष्ठ झालो अशी मुर्ख समज हल्ली काहींना झाली आहे,जोपर्यंत हे सर्व थांबत नाही तोपर्यंत तरी काही चांगले साध्य होईल असे मला वाटत नाही......
भारत हा विवीध कलागुणांनी पारंपारिक संस्कृतींनी आणि विचारवंतांच्या विचारांनी घडलेला देश आहे आज एकशे तीस करोड भारतीयांची विचारधारणा ही वेगवेगळ्या विचारवंतांच्या विचारांवर अवलंबुन आहे पण,खरं पाहता आचरण शून्य आहे..
फुले,शाहु,आंबेडकर साधने कैक झाली,
आचरणाच्या माध्यमांना विसंगति प्राप्त झाली...
आज ही साधने फक्त बुद्धिमत्तेचे व कर्तुत्वाचे स्मृतीदीप म्हणुन आहेत पण त्या स्मृतीदीपाची ज्योत तेवत ठेवणे हे आपल्या आचरणावर अवलंबुन आहे. आज समाज फक्त त्यांच्या राहणीमाणीचे अवलोकन करत आहे आणि
विचारांवर चुकीचे विचार मांडुन पडदा सारत आहेत. समाजाने अज्ञानात राहुन चूकीच्या विचारधारणेला आपलसं केलय पण कधी हा विचार केला नाही की फुले,शाहु,आंबेडकर यांसारख्या लोकांनी कधी स्वतःचा विचार केला नाही आणि आपण मात्र स्वार्थीपणाच्या सीमा ओलांडल्या आहेत.वेगवेगळ्या अज्ञानी विचारांना बढावा देऊन आपण त्याच फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांचे,बलीदानाचे मातीमोल करत आहोत.
नितिमत्ता हरवत आहे तमगुणी,नराधमी विचारधारणेला वाव मिळत आहे, पण यातुन फक्त साध्य होईल तो फक्त विचारांचा विनाश आणि मानवतेचा लिलाव.फुले,शाहु,आंबेडकर यांच्या विचारांना सुद्धा आपण जाती,समाज यांच्या दृष्टिकोणातुन विभागले आहे.पण, त्यांनी त्यांचे विचार हे कोणत्या समाज किंवा जाती धर्मांसाठी मांडले नव्हते हे मात्र समजुन घ्यायला आपण तयार नाही आहोत कारण, आपण फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांना कधी समजुनच घेतले नाही,आपण फक्त समजलाय आणि बाळगलाय तो गोड गैरसमज ,जाती,समाज,धर्माच्या निरर्थक विचारधारणेचा आणि त्यातुन आपल्यालाच बाहेर निघावं लागेल कारण त्यात आपणच दोषी आहोत,
तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल..सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..
समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तेव्हा म्हणता येईल फुले शाहु आंबेडकर.. यांच्या विचारातुन आचार साध्य झाले.
Source: INTERNET
-तेजस महापुरे,
कराड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा