महाराष्ट्र देशा...की मोर्चाच्या देशा?

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

महाराष्ट्र देशा...की मोर्चाच्या देशा?


Source: INTERNET
-अभिजित गोडसे,
 सातारा

"मंगल देशा, पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा" कवी गोविंदाग्रज यांनी सांगितलेल्या ओव्या सारखा महाराष्ट्र संध्या राहिला आहे का हे खरच विचार करण्यासारखे आहे. अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अलिकडे तिन- चार वर्षीत 'मोर्चा आणि महाराष्ट्र' हे एक समीकरण झालेले पहायला मिळते. आणि तेवढीच धोक्याची घंटा सुध्दा !
महाराष्ट्रातील राजकारणात डोकावले असता. दिसून येईल येथे बेरजेच्या राजकारणाला आपल्याकडे नेहमीच वाव असतो. त्यांच बरोबर महाराष्ट्रातील ठराविक घराणेशाही ही कायमच धगधगत्या राजकारणात राहिली आहेत. ठराविक घरातच महाराष्ट्राची सत्ता असते .हे वेळोवेळी दिसून येते. मागिल निवडणूकीत केंद्रात भिजीपी यांची एकहाती सत्ता आली. तसेच महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आले. आणि भाजप शिवसेणा यांनी युती केली .आणि महाराष्ट्राचा गाडा चालवायला सुरूवात केली. तब्बल पंधरा वर्षीने महाराष्ट्रात भिजीपी आणि शिवसेना सत्तेवर आले. हे सांगण्याच कारण की येथेच मोर्चाची मेक आहे. आत्ता पर्यत झालेल्या कोणत्याही मुख्यमंत्रीनी जेवढे मोर्चे पाहिले नसतील तेवढे मोर्चे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पाहिले ! आणि तेवढ्यात धिराने ते या सर्व मोर्चानां सामोरे गेले. हे नक्की . मोर्चे का निघाले याला जबाबदार सत्तेवर असलेले सरकार आहेच पण त्यांच बरोबर विरोधी पक्ष ही आहे.आणि याला खत पाणी घालायला काही समाजकंटक सुध्दा आहेत. मराठा मोर्चा , शेतकरी मोर्चा , विद्यार्थी मोर्चा , एमपीएससीचा मोर्चा , बेरोजगार मोर्चा , अंगणवाडी सेवीका मोर्चा, शिक्षक मोर्चा , आदिवासी मोर्चा त्याच बरोबर माळी समाज , धनगर समाज , एकाद्या व्यक्तीच्या समर्थनात मोर्चा इ. हे सर्व मोर्चे आणि त्यांच्या मागण्या पाहता यातील बेरोजगार आणि एमपिएससी मोर्चा यांच्याच मागण्या फक्त या सरकार मधे लागू पडतात ! अन्यथा बाकी सर्व मोर्चे आणि तेथील मागण्या कित्येक वर्षी पासून प्रलंबीत आहेत. मग असा विचार करावा हे सर्व प्रश्न मागील सरकारने का सोडवले नाहीत. त्यातील महत्वाच्या मागण्या पाहिल्यास.. शेतकऱ्यांन साठी कर्ज माफी हा तर नेहमीचाच हातखंडा झालाय ! खुप राजकीय पोळ्या भाजल्या या प्रश्नावर. कर्ज माफी पेक्षा कायमचे कर्ज मुक्ती होणे केव्हाही चांगलेच या साठी मोठ्या प्रमाणात हे सरकार काम करत आहे. आरक्षण हा मुद्दा शेवटी न्यायालयच ठरवेल. महत्त्वाचा राहतो तो प्रश्न म्हणजे बेरोजगारी .यासाठी काढलेले मार्चे हे खरच रास्त होते. पण बिजीपी सरकार जेव्हा जेव्हा सत्तेवर येते तेव्हा तेव्हा मिनीमम धोरण आकते. अनावश्यक खर्च टाळते आणि योग्य तेथे खर्च करते. याचाच फटका विद्यार्थी बेरोजगार राहण्यासाठी बसला हे निश्चित.नोकर बंदी केली. करार द्वारे पद भरती चालू केली. पण तो ही आता मुख्यमंत्रीयांनी नोकर बंद काही प्रमाणात उठवूण प्रश्न सोडवण्याच्या मार्गवर आहेत.

मुळात सरकार कोणाचेही असो. काही प्रश्न लवकर सुटतात तर काही प्रश्ननां विलंब लागतो .कोणत्याही पक्षाला वाटते आमचेच सरकार आले पाहिजे . यासाठीच प्रत्येक बाजूने सरकारची कोंडी करायची हा त्यांचा मार्ग ठरला आहेच . पण महत्त्वाचे विकास काम कुणी कुठे केले हा मुद्दा कायमच मागे ठेवला जातो.सत्ता येण्यासाठी जाती- धर्माचा आधार घ्यायचा. समाजात दरी कशी पडेल हे पाहायचे ठराविक समाजातील भावना भडकावायच्या , त्याच्या भावनांन वर मते मिळवायचा प्रयत्न करायचा. यासाठी पुन्हा सामाजिक , आर्थिक , राजकीय , धार्मिक मार्गने यासाठी रंग देत बसायचे ..या सर्व गोष्टीसाठी थताकथीत समाजकंटक जोडीला आहेत .एकूणच सत्ता आणि पैसा या दोन गोष्टीसाठी वाटेल ते करायला तयार असतात. आणि अशा तच मग भरडल जातो तो तरुण वर्ग हाताला काम नाही एकाद्या मोर्चा केला तर थोडे फार मिळेल काही तरी ..अशा डोक्याने रिकाम्या असलेल्या मंडळीची माथे लगचेच भडकतात .समाज माध्यम आहेच यांच्या जोडीला .असो
जेवढे मोर्चे झाले किंवा येणाऱ्या काळात होतील या सर्व मोर्चेत कोणताही दंगा झाला नाही. याचे कारण पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. शांतेच्या मार्गने आंदोलन उभे करणे हे केव्हा ही चांगेलच . लोकांना आपल्या मागण्या मागायचा घटनेने हक्क दिला आहे . तो ते बजावत असतील तर त्यात काही गैर नाही .पण कोणा मुख्यमंञ्याला टारगेट करुण खेळी करत असाल तर ते महाराष्ट्रला नव्हे तर देशालाही शोबनारे नाही. संपूर्ण देशाचे महाराष्ट्रकडे लक्ष लागून आहे .आपला आदर्श बाहेरची राज्ये घेत आहेत .त्याच बरोबर देशाचे भावी नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्रकडे आशेने पाहत आहेत. हे नक्कीच कौस्तुकास्पक आहे. यासाठी आपल्या राज्याची ओळख चांगलीच राहील पाहिजे. मोर्चा आणि महाराष्ट्र हे भूषण नाही. तर महा "राष्ट्र" हे भूषण आहे.


Source: INTERNET
-संदीप बोऱ्हाडे,
 पुणे

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली . मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे " या मागणीतून ' संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६ हुतात्मे होऊन आपला आजचा महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी झालाय.
सर्व उपेक्षित-शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला. महाराष्ट्राचा इतिहास हा अविस्मरणीय असा आहे..पण आमच्या महाराष्ट्राला आजच्या या काळात नक्की झालय तरी काय??
आज सगळीकडं जातीच्या नावावर मोर्चे निघत आहेत फक्त स्वतःची जात बाकी आपण बरोबर आहोत कि चुकीचे याचा विचार कुणीही करताना दिसत नाही. या राज्यात भयंकर बेरोजगारी , कुपोषण , शेतकरी आत्महत्या , बलात्कार , भूकमरी इतक्या भयंकर समस्या असताना आणि हद्द तर तेव्हा होते की आमदार, खासदार, मंत्री, सगळे हे चोर ( अपवाद वगळता ) यांच्या समनार्थ देखील मोर्चे काढले जातात याचतर मला नवल वाटत
महाराष्ट्रातील काही दिवसांपूर्वीचे मोर्चे हे अत्यंत गाजलेले आहेत. कोपर्डी ला एका मराठा भगीणीवर बलात्कार झाला म्हणून लाखोंचे मराठा क्रांती मोर्चे , आदिवासींचा किसान मार्च मोर्चा, संविधान सन्मान मोर्चे , शिक्षक भरती मोर्चे, mpsc मोर्चा , याला अटक करा म्हणून मोर्चा, अनेक प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले..मोर्चा काढून आपल्या समस्या शासनाला मांडणे हे आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो नक्कीच काढला पाहिजे. पण या काळात कोणताही नुकसान न करता. अजून एक सांगू इच्छितो इथे की मोर्चा काढताना कोणत्याही मागण्या करणे हे पण चुकीचाच प्रकार आहे उदाहरण द्यायचे झाले तर मराठा क्रांती मोर्चा यांच्या 2 मागण्या मला न पटणाऱ्या आहेत.
१. अट्रॉसिटी रद्द करा
२. आदिवासींसाठी असलेला पेसा
कायदा रद्द करा
( अहमदनगर मराठा क्रांती मोर्चा )

या दोन मागण्या मी इथे का सांगतोय तर हे दोन्हीही कायदे केंद्र सरकारचे आहेत..आणि एका समाजाने किंवा एका राज्याने विरोध करून काहीही फायदा होणार नाही..किंवा होत नसतो...परंतु याच्या समनार्थ पुन्हा मोर्चे निघाले अट्रोसिटी बचाव किंवा अजून इतर पण अश्या मागण्या करूच नये या असल्या मागण्यांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होते. असल्या या जातीयवादी मोरच्यांसाठी कुणी यांना भडकावतो तर कुणी त्यांना भडकावतो. लोकांच्या भावना भडकावल्या की विकासाला तेल लावणे सोपे जाते. आणि हो सर्वच राजकारणी हे खाणेरडे शस्र वापरतात आणी जनता बळी पडते.
मागे सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर यांचे नाव द्यावे म्हणून लिंगायत समाजाने मोर्चा काढला, प्रतिवाद म्हणून याच विद्यापिठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे म्हणून धनगर समाजाने मोर्चा काढला..
या शहराला या महापुरुषाचे नाव द्या म्हणून मोर्चे , रस्त्याला नाव द्या म्हणून मोर्चे , आरक्षण रद्द करा म्हणून मोर्चे , विदयापिठाला नाव द्या म्हणून मोर्चे, बलात्कार झाला काढा मोर्चे.. मला हे समजत नाही तुम्ही या महापुरुषांचे विचार तरी आत्मसात करता का?? त्यांची शिकवण कधी अंगी लावता का की यांना फक्त जातीत वाटून घेत बसता.
बरे झाले केंब्रिज, ऑक्सफोर्ड, कॅलीफोर्निया सारखी विद्यापीठं आणि न्यूटन, मंडेला, अजूनही विदेशातील खूप महान व्यक्ती आपल्या देशात नाहीत अन्यथा आपल्या लोकांनी त्याचा दर्जा अबाधित राखण्यावर जोर देण्याऐवजी त्याच्या नामांतराच्या टूम काढल्या असत्या, मोर्चे काढले असते, दंगे केले असते, रस्ते जाम केले असते, इतकंच नव्हे तर माणसं ही मेली असती अन मेलेल्या माणसांच्या टाळूंवरचे लोणी आपल्या राजकारण्यांनी खाल्ले असते.

विद्यापीठाचा सुमार शैक्षणिक दर्जा सुधारावा किंवा त्याची खालावलेली कामगिरी उंचावत जावी, रस्त्यांची झालेली दुरवस्था, महागाई , बेरोजगारी , कुपोषण , शेतकरी आत्महत्या , बलात्कार अगदी 2 महिन्याच्या मुलापासून तर वृद्धेपर्यंत हे लिंगपिसाट लोक करतात..
यासाठी माझ्या महाराष्ट्रात कोणत्याही समाजाने, जातीने प्रयत्न केले नाहीत वा त्यास्तव मोर्चा काढला नाही हीच माझ्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
इथे कोणता समाज यासाठी झगडताना दिसत नाही मात्र आपल्या जातीच्या समाजपुरुषाचे नाव द्यावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. शेवटी जाता जात नाही ती जात कोणत्या नालायकाने या जाती निर्माण केल्या आहेत कुणास ठाऊक ??
नेमकं या राज्यात काय सुरू आहे तेच कळत नाही , पुढील एक वर्षात महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोर्चे आणि संप होतील. कारण सरकार विरोधात विरोधकांसमोर इतर कोणतेही मुद्दे नाहीत.



Source: INTERNET
-सौदागर काळे,
 पंढरपूर

कुणाचं म्हातारपण जास्त काळ टिकेल ?

मी मोर्च्यातील म्हातारीच्या फोटोशी बघतो ...
जी चालत आली होती *@180* ...
भूमितीच्या ताठ सरळकोन सारखी
सरकारच्या काठीच्या आधाराशिवाय..
या व्यवस्थेचा बुरखा फाडण्यासाठी.
सरळ बाय सरळ थेट अनवाणी विधानभवनाकडे.....

ती जेव्हा जन्माला आली असेल
तेव्हा.. *मंगल देशा..! पवित्र देशा..!*
*राकट देशा..! कणखर देशा..!*
*........................महाराष्ट्र देशा !!!*
अशा अर्थाची गर्वाने छाती फुगणारी कवने
कुणीतरी ती गाढ झोपेत असताना म्हटली असतील....

ती जेव्हा मोठी होत होत म्हातारी झाली
तेव्हा ही व्यवस्था तिची लक्तरे तोडत राहिली
बंधनाच्या जोखडात बांधू लागली....
फक्त न फक्त तिनं हाडांचा सापळा म्हणून जगण्यासाठी......
काल ती मोर्च्यात दिसली
कुणाची सुटका करण्यासाठी?
तिची की महाराष्ट्राची!

तिच्या ......
पायाचे फोड 'आझाद' मैदानात दिसले
अन महाराष्ट्र *@60* होण्याच्या आतच
थकलेलं मला दिसलं...
आता ती आर्तपणे ओरडत होती ......
*ढोंगी देशा...! शोषक देशा....!*
*असंवेदनशील देशा..! भ्रष्टराष्ट्र देशा!!..महाराष्ट्र देशा.!!*
या साऱ्याला पुरावा होता तिचे रक्ताळलेले पाय...

ती म्हातारी नव्हती....
ती होती गरिबी, भूकबळी,दारिद्र्य, शोषणाचे प्रतिक....
भल्या पहाटे हे दाखवताना ती मुंबईच्या समुद्रात अश्रुंची भर टाकत होती.....

आता ती साठी ओलांडून गेलेली...
आणि हा साठीकडे झुकू लागलेला...
तिला पोट,हृदय आहे जिवंतपणाचं.
म्हणूनच आजही चालत आहे,पुन्हा चालण्यासाठी......

ह्याच्या *"कल्याणकारी राज्य"* च्या फायली उंदरांनी केव्हाच कुरतडल्या आहेत...
दोघेही उंदीर सारखेच...
ते मंत्रालय पोखरतायत....
आपले मोर्च्याचे बिळे खणतायत..

मोरच्यावर मोर्चे ,मोरच्यावर मोर्चे
निघणाऱ्या या मोर्चेराज्यात....
मी ही म्हातारी पाहिली..
ती कदाचित म्हणत असेल का!
*कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?*

आता एकाच उत्तराच्या शोधात आहे........
*कुणाचं म्हातारपण जास्त काळ टिकेल ?*
मोर्चात" _'महा'राष्ट्र_ "शोधणाऱ्या म्हातारीचे की मोर्चेच मोर्चे काढणाऱ्या *महाराष्ट्राचे!*


Source: INTERNET
-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,
 उस्मानाबाद

मंगल देशा, पवित्र देशा असं म्हणत महाराष्ट्राची महती सांगितली जाते मात्र आजकाल निघणाऱ्या मोर्च्यांकडे बघून हे महाराष्ट्र मोर्चाचं राज्य आहे कि काय असं वाटू लागलं आहे आणि ते खरं पण आहे..
एसटी कर्मचारी, स्पर्धा परीक्षा करणारे विध्यार्थी, अंगणवाडी सेविका, शेतकरी बंधू , मराठा आरक्षण ,आशा अनेक क्षेत्रातील लोकांनी गेल्या काही महिन्यात मोर्चाची रांग लावून सबंध देशाचं लक्ष वेधून घेतलं हे खरं आहे..

प्रश्न असा पडतो कि मोर्चा काढणे ही खरंच गरज होती की एका विशिष्ट जातीचा माणूस मुख्यमंत्री झाला म्हणून त्याला जेरीस आणण्यासाठी जर अशी कृत्ये केली जात असतील तर ते निश्चितच लांच्छनास्पद आहे.

एक सामान्य नागरिक म्हणून मला पडलेले प्रश्न मी इथं मांडत आहे..

१. महाराष्ट्र निर्मिती झाल्यापासून जेवढे मोर्चे गेल्या ३-४ वर्षात निघाले तेवढे आजपर्यंत कधी का निघाले नाहीत ?

२. आज इतक्या मोठया प्रमाणात मोर्चे निघाले त्याचा खर्च कोणी केला, याचा कोणी वाली आहे हे का लपवले जाते ?

३. बरेच मोर्चे शिस्तबद्ध निघाले तर काहींनी विध्वंस केला याला जबाबदार कोण ?

४. भडकावू भाषणं देणारांना आमंत्रित करून लोकांची माथी भडकवायची अन पुन्हा त्यांनी मोर्चे काढून समाजाला वेठीस धरायचं यांचा पाठीराखा कोण आहे ?

५. मोर्चाद्वारे आपल्या मागण्या पदरात पाडून घेतल्या जातात मात्र तेच मोर्चेकरी जेंव्हा सत्तेत बसून मलई खात असतात तेव्हा पुरोगामी महाराष्ट्राचा टिळक भाळी लावणाऱ्या योजनांच्या फायली अचानक जळतात कशा ?

६ . आज जे मोर्चे निघाले त्याच सर्व नियोजन विरोधकांनी अतिशय गुप्त पद्धतीने केलं मग हे मोर्चे म्हणजे जनतेच्या नावाने केलेली लोकशाहीची फसवणूक नाही का ?

७. का मोर्चे म्हणजे हा एक राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेला खटाटोप आहे ?
असे अनेक प्रश्न मनात घोंगावत आहेत.
जर त्या मोर्चाचा फायदा होत असेल तर मोर्चे काढण्यात अर्थ आहे नाहीतर विनाकारण लोकांमध्ये असंतोष निर्माण करुन राजकिय वजन वाढवण्यासाठी जर हे कोणी करत असेल तर मग या महाराष्ट्राला दिशाहीन करण्याचं षड्यंत्र चालू आहे असंच म्हणावं लागेल..



Source: INTERNET
-नरेश शिवलिंग बदनाळे,
 लातूर

खरोखरच विचार केलाय का हो,आपण देशाला स्वातंत्र्य का मागितलं ? का मिळवलं का महाराष्ट्र निर्माण केला ? जर, त्याचे मोल कवडी मोल ही नसेल तर.
आज आपण जातिवाद,मनुवाद,धर्मवाद,वर्णवाद यांच्या बेड्यात पारतंत्र्यात जगत आहोत,आणि हे वाद शिगाशी जाऊन मोर्चे आंदोलनं आणि त्याचे रूपांतरण दंगल किंवा हिंसक स्वरूपात होते आणि नुकसान मात्र आम्हा सामान्यांच होत.पण का होतात हे मोर्चे हे आंदोलनं ? तर याचे मुळ रोवले गेले आहे ते आपल्या जातिवादी धर्मवादि अज्ञानी समाजकंटकी मनोवृत्ति मध्ये सरकारचे त्याच्या पाठफिरवणी मुळे. आज जिकडे तिकडे दिवस प्रति दिवस ह्या समाजाचा मोर्चा ह्या धर्माचा मोर्चा ,३६५ दिवसां पैकी ३२० दिवसांच्या मोर्चांच्या नोंदि निघतात.तात्पुर्ते हाताशी धरणाऱ्या राजकारणी लोकांच्या सम्मोहनास वशीभूत होऊन आपण चाललो आहोत मोर्चा आणिआंदोलनाच्या मार्गावर पण त्या मोर्च्यचा उद्देश,ध्येय आणि त्यांचा परिणाम या गोष्टीचा अभ्यास त्यातील 80 % लोकांना नसतो पण आपण निघतो मागे रांगेत हातात राजकारणी लोकांच्या कुबड्या घेउन आणि ते राजकारणी लोक आपल्या खांद्यावर बंदुक ठेउन त्यांचा स्वार्थ साधुन निघतात ,आणि आपण मात्र जिथे होतो आणि जसे होतो तसेच राहातो. खंत येवढीच की आजचा युवक फक्त दाढी वाढवुन शिवरायांच्या वाटचालिवर चालल्याचा गोड गैरसमज बाळगतो पण उराशि बाळगतो मात्र तेच अज्ञानी आणि तुतपुंजे विचार पण मात्र या सर्वात जर आपण दोळे मिटले तर हे द्विमुखी राजकारनि आणि समाजकंटकी लोक महाराष्ट्राला मागासराष्ट्र करायला क्षणमात्र वेळ लावणार नाहीत आणि पिढी वैचारीक झाली नाही तर मात्र प्रश्न उभा राहिल महाराष्ट्र देशा.... की मोर्चांच्या देशा ?......

Source: INTERNET
-सीताराम पवार,
पंढरपूर

महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघाले धर्मासाठी, जातीसाठीआरक्षण,काही सार्वजनिक हितासाठी मागण्या, शेतकरी संघटनेचे, अंगणवाडी सेविका, तरुण बेरोजगार,यातून एक सिद्ध होत "मोरच्याप्रति शासनाची नसलेली संवेदनशीलता, मोर्चे काही नवे नाहीत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आपण मोर्चे पाहत आहोत, पणत्यावेळी राजकीय लोक सुसंस्कृत होती मोर्चाची चाहूल लागताच त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत, पण आज"मोर्चा किती मोठा, लोकांचा प्रतिसाद, समाजाच्या भावना, प्रसारमाध्यमे याला महत्व आलं आहे आणि शेवटी ज्याला ही लोक रयत मनतात त्या रयतेच्या पायाच्या फोडातील पाण्याने रस्ता नाहला की,गडबडीने मोरच्यांच्या मागण्या मान्य करायच्या.
आरक्षनासाठी मोर्चे काढून काय उपयोग, कारण ती एक घटनात्मक बाब आहे पण ती वेळ का अली याचा विचार केला पाहिजे.
कारण मराठा समाजातील मोरच्यात एक बाब स्पष्ट दिसत होती ती म्हणजे विस्थापित मराठा, भूमिहीन शेतमजूर मराठा, अल्पभूधारक मराठा, कोरडवाहू शेती मराठा, यांचा एवढा प्रतिसाद होता की प्रस्थापित मराठा लोक आपणहून यात सामील झाले.भूमिहीन शेतमजूर मराठा साठी शासनाची एकही योजना नाही, त्यांच्या मुलांनी कसं शिकायचं? त्यामुळे शासन आपलं आहे ह्या भावनेला वर्षनुवर्षं तडे गेले.तसं पाहिलं महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला की,हे राज्य मराठी की..... पण त्यांनी आपल्या कार्यातून च उत्तर दिले ती सर्वसमावेशक दृष्टी आज राजकीय लोकांत नाही. आज एका जातीसाठी लोक मोरच्या काढतात पण ते स्वरूप कायम राहीलअस मला वाटत नाही कारण उदा. मराठा समाजात पूर्ण समाज एक नाही त्यात, खालचा, वरचा,96 कुळी,11माशी, असे प्रकार आहेत रोटीबेटी व्यवहार होत नाहीत. त्यामुळे जातीजतीचे मोर्चे हे किती टिकतील हा प्रश्न आहे.
आज खेदाने म्हणावे लागते ज्या गांधींनी सत्याग्रह नावाचे शस्त्र इंग्रजा विरुद्ध वापरलं व त्याला इंग्रजांनी कसा प्रतिसाद दिला, त्याची तुलना आज केली तर वाटते आपल्या राजकीय लोकांनी त्या शास्त्रातील हवाच काढून घेतलीय, कारण मोरच्या असो सत्याग्रह,आंदोलन असो त्याबद्दल असंवेदनशीलता, बघण्याचा दृष्टिकोनबदलून हिणपणा वाढला आहे. याला खालील बाबी लागू होतात
1 असंवेदनशील राजकीय नेते
2 जनतेप्रति आपलेपणा, माणुसकीचा अभाव
3 पूर्वी स्वातंत्र लढ्यातील राजकीय लोकांना जाणीव होती,ती आताच्या नेत्यांना नाही
4 निवडणुका जिंकणे हेच ध्येय बनले आहे
5 सुसंवादाचा अभाव
6  काही नविन राजकीय नेत्यांना अडचणी च माहीत नाही, कारण त्यांच्या जीवनात तसे प्रसंगचयेत नाहीत.

तरी बरे हे मोर्चे शांततेत निघालेत हेच महाराष्ट्रच मोठेपण मानावं लागेल"पण शांतीमध्येच क्रांती असते"हेही लक्षात घेतले पाहिजे
रास्त मागण्या विनंती, अर्ज करून पूर्ण होत नसतील तर जनतेनंतरीकाय करावं?
शेतकरी या एका वर्गाखाली जनता एकत्र आले पाहिजे ही काळाची गरज आहे.



Source: INTERNET
-समीर सरागे,
नेर

महाराष्ट्र हे नाव एकूणच छाती गर्वाने फुगते ,
ऐतिहासिक , साहित्यिक ,औद्योगिक क्षेत्र  ,पर्यटन व्यवसाय आणि एक विकसनशील राज्य म्हणून या महाराष्ट्र राज्याची ओळख आहे. आणि यशस्वी वाटचाल देखील सुरु आहे. अनेक राजे महाराजे, महापुरुष ,स्वातंत्र्य सैनिक या राज्याने या देशाला दिलेले आहेत.

संस्कृति आणि परंपराचा  असा गौरवशाली इतिहास या राज्याचा राहिला आहे.  परंतु अलिकडे ही ऐतिहासिक ओळख आणि महत्व हळू हळू कमी होत आहे. सद्या मागील दोन तीन वर्षा पासून या राज्यात मोर्चे ,आंदोलने ,उपोषण यासारखे चित्र दृष्टिस पड़त आहे.  आपल्या मागण्या मान्य करण्या करिता आंदोलने करणे ,मोर्चे काढणे हे योग्य यात काही दुमत नाही आणि काही वाईट देखील नाही तो संविधान आणि घटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे लोकशाही प्रणाली मध्ये  आपले म्हणने , मागण्या किंवा मूलभूत अधिकार प्राप्त करुण घेण्या करिता, अत्यचारा विरुद्ध आवाज उठविन्या करिता किंवा आपल्या अधिकारा वर गदा येत असेल ,त्याचे हनन होत असेल तर तेव्हा आपण सरकार दरबारी  वा इतर ठिकाणी आपण मोर्चा, उपोषण किंवा आंदोलनाच्या माध्यमातून आपण आपली बाजू शासन दरबारी मांडत असतो।

याचा अर्थ आपण लोकशाहीत घटनेने आणि कायद्याने दिलेल्या मौलिक अधिकाराचे पालन करत असतो,  
चार दोन आंदोलने जसे मराठा मोर्चा , MPSC च्या  व वाढीव रिक्त पदे भरण्या संदर्भातिल विद्यर्थी व तरुणांचा मोर्चा   वैगरे मोर्चे सोडले तर बाकी सगळीकडे कायद्याचे आणि नियमांचे तीन तेरा वाजविलेले आपल्याला दिसून येईल.  

मोर्चे आंदोलने करणे म्हणजे हिंसा करुण, सार्वजनिक संप्पत्तिचे नुकसान करुन आपल्या मागण्या मान्य होईल का? आपल्या सोई -सुविधे करिता असलेल्या वस्तु ,वाहने, दुकान व प्रतिष्ठानें यांचे नुकसान करून आपण कोणता संदेश जगाला किंवा येणाऱ्या भावी पिढीला देत आहो ? एवढेच नव्हे तर आपण रुग्नवाहिकेला देखील जागा करून देत नाही . म्हणजे इतक्या आपल्या संवेदना मेल्या आहेत का? याचे भान आपण राखले पाहिजे!
एकवेळे आपण  शासन व प्रशासन विरुद्ध आपला  राग व्यक्त करतो राग व्यक्त करणे  यात काही गैर नाही परंतु ते शांततेच्या आणि अहींसेच्या मार्गाने करावे त्या करिताच मोर्चे , निदर्शने आणि आंदोलने यांचे महत्व लोकशाहीत अभादित आहे. हिंसा करून आंदोलने , निदर्शने यशस्वी होत नसतात उलट त्याचा विपरीत परिणाम हा लोकशाही व तिच्या  मूल्यावर होत असतो.

परंतु अलीकडे आंदोलने आणि निदर्शने म्हणजे जनतेचे लक्ष वेधने हा हेतु यामागील होऊन बसला आहे.  मग काही व्यक्ति व संघटना यात राजकीय स्वार्थ ठेऊन, जनतेची माथी भड़कावतात(कारण हे एका विशिष्ट अजेंड्या खाली होत असते आणि यात काही संधिसाधुना आपला राजकीय स्वार्थ साध्य कारायचा असतो ) मग शांततेच्या आंदोलनाचे रूपांतर हे हिंसे मध्ये होते. सार्वजनिक मालमत्ता जाळपोळ करणे, त्याचे आतोनात नुकसान करणे, जनतेला वेठिस धरने वैगरे   तेव्हा आपण आपल्याच देशातील सार्वजनिक सम्पत्तिचे नुकसान करतो परंतु पुढे याची भरपाई ही पुढे आपल्याच कर स्वरुपात दिलेल्या पैशातुन वसूल केल्या जाते एकंदरित आपण स्वतःचेच नुकसान केलेले असते. यात सर्वात जास्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन प्रशासनाला हाल सहन करावे लागतात.

या उलट मानवतेच्या दृष्टीने केलेली आंदोलने ही महत्वाची असतात आणि ति कायमची लक्षात राहतात, साणे गुरुजीनी केलेलं आंदोलन असेल , महात्मा गांधीनी मिठाच्या सत्याग्रहा साठी केलेलं आंदोलन किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रेवशासाठी व पाण्यासाठी केलेली आंदोलने असेल अशी आंदोलने  पिढ्यांन पिढ्यां चिरकाल लक्षात राहणारी आहेत कारण ती समाजासाठी व मानवतेच्या दृष्टीने केलेली आंदोलने असतात आणि त्याचा समजमनावर खोलवर परिणाम होत असतो व त्यात स्वार्थ हा हेतु नसतो

परंतु अलीकडे आंदोलने आणि मोर्च्यांचे अमाप पीक आलेले आहे. राजकीय किंवा षडयंत्र ला बळी पडून आंदोलने केली जातात  यामाध्यमातून शासनाच्या विरोधात एक वलय निर्माण करून त्या भावनेचा नैतिक फायदा घेणे आणि प्रसिद्धि मिळविने हा यामागील उदात्त हेतु असतो. मागे असाच एक मोर्चा वीरोधका कडून सरकार विरोधात पाहायला मिळाला चंद्रपुर ते मुंबई अशे या आंदोलनाचे स्वरूप होते, व दिग्गज राजकीय लोक या मध्ये सामील झाली होती  गम्मत अशी की कड़क उन्हात ४८ डिग्री तापमानात कोन या मोर्च्यांचे नेतृत्व करत आहे है कळत नव्हते चार पावले टाकली की वतानुकीलित बस मध्ये जाऊन काही मोर्चेकरी बसत असायची, इतक्या कडकयाच्या उन्हात सभेला कोणी हज़र राहत नसत(ज्याणी अक्खे आयुष्य वातानुकूलित घरात घालविले त्यांच्या कडून क़ाय अपेक्षा ठेवनार जनता) शेवटी  असे निदर्शनास आले की हे आंदोलने जनते करिता नसून आपले राजकीय अस्तित्व टिकविन्या करिता केलेली धड़पड मात्र होती अर्थात राजकीय हेतुने प्रेरित आंदोलने होती.

मागे पाच सहा वर्षा अगोदर ची गोष्ट आहे. रजा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई मध्ये  निदर्शने केली होती. विषय होता बांग्लादेशी मुस्लिमाना भारत देशातुन हाकलूंन लावू नए या करिता ही निदर्शने होती, सुरुवातीला शांततेचा दिखावा करणाऱ्या या निदर्शनाने नंतर हिंसक रूप धारण केले वाहनांची जाळपोळ ,प्रतिष्ठानावर हल्ले , एवढेच नव्हे तर शहीदाच्या  स्मृति करिता असलेले शहीद स्मारकाचा अपमान करुण लाथा ने तोडन्यात आले इथपर्यंत चंडालांची मजल गेली. हे कसले आंदोलन जे आपल्याच देशातील संपत्ति आणि ऐतिहासिक स्मारकाचे नुकसान करत सुटतात आणि ते देखील या करिता ज्याचा आपल्या देशाशी काडी एक संबंध नसताना. देशाच्या सुरक्षेच्या हिता करिता शासनाने उचललेले हे पाऊल होते मग या करिता निदर्शने करण्याची ति क़ाय गरज होती?   ज्याणी या मोर्च्यांचे नेतृत्व केले त्यांनी या हिंसक आंदोलना बद्दल ब्र देखील काढला नाही हे आंदोलन म्हणजे वोटबैंक वाचविन्या करिता धर्मनिर्पेक्षतेचे ढोंग रचवून राजकीय दृष्टया चालविलेले होते हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

नेहमी आक्रमणे सहन करणाऱ्या  आपल्या या भारत देशाने लोकशाहि अस्तित्वात आली तेव्हा व त्या अगोदर पासून अहिंसेचा मार्ग पात्कारला लोकशाहीत आन्दोलनाचे महत्व  खऱ्या अर्थाने तेव्हाच अधोरेखित होईल जेव्हा त्यात अहींसेच्या मार्गाचा व घटनेने दिलेल्या मूलतत्वाचे पालन होईल. तेव्हाच खरे आंदोलने यशस्वी होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************