शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने आपले आरोग्य ‘फिट’ आहे का?


🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 22 वा 📝                                   
31मार्च ते 06एप्रिल 2018

शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने आपले आरोग्य "फिट' आहे का?

(या विषयावर  किरण पवार , सत्तार शेख,अनिल गोडबोले यांनी मांडलेले मत सविस्तर वाचा तसेच यातील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)


किरण पवार,औरंगाबाद


     मला वाटत ज्यांनी सध्या स्वतःला तिन्ही अंगांनी आरोग्य फिट ठेवलंय त्यांना खरंच मानल पाहिजे. मला एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ती म्हणजे सध्याच मानसिक स्वास्थ्य फार ढासळलेल आहे ज्याचा शरिरावरही होतो आहे. आणि मानसिक स्वास्थ्य बिघडला मुळ कारण आपला *इंटरनेटला असलेला वापर.* फेसबुक आणि व्हाट्स अॅपच्या आहारी गेलेल्यांना जीवन *पोरखेळ* वाटत चालला आहे. 18 वर्षे हे वय आहे का एखाद्या मुलाला हार्ट अटॅक येण्याच? 

     सामाजिक स्वास्थ्याला घातक गोष्ट आपल *असमजुतदार* वागणं. आजकाल जशीजशी नवीन पिढी मी पाहतो आहे तसतस पिढी दर पिढी हा *समजून घेणे* नावाचा प्रकार लुप्त होत चाललाय. भविष्यात पुर्णच ही गोष्ट नाहीशी झाली तर काय होईल कुणास ठाऊक? सामाजिक स्वास्थ्याला घातक ठरते ती *तल्लक बुद्धीने व योग्य दृष्टीने न विचार करण्याची वृत्ती.*


सत्तार शेख
जामखेड, जि.अहमदनगर

      खरं तर एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जात असतानाच मानवी समुहाला वरिल प्रश्नांचा विसर पडलेला दिसतोय. आपण फिट राहावं या ऐवजी आपली आर्थिक ऐपत फिट ठेवण्यासाठीची सुरू असलेली जिवघेणी स्पर्धा मानवी जगण्याच्या तर्‍हा बदलवत चालली आहे. एकिकडे लाभासाठी एकत्रित येणारा समूह जसा आपला वाटतो तितकाच तो समूह सामाजिक पातळ्यांच्या विधायक अर्थात सामाजिक उत्क्रांतीच्या परिवर्तनीय कृतीशील उपक्रमांच्या अंगिकरणात मागे हटताना दिसतो.. याचा सरळस्पष्ट अर्थ सामाजिक असो अथवा व्यक्तिगत पातळीवर माणूस म्हणून अथवा मानवी समूहाच्या नेणिवा शारीरिक , मानसिक, आणि सामाजिक दृष्ट्या गंभीर आजारी पडू लागल्या आहेत. जर हा आजार असाच बळावत राहिला तर मानवी समूहांच्या जगण्याच्या तर्‍हांचे आरोग्य कायम सलाईनवर असेल यातून बाहेर पडण्याचा मार्ग जोवर मानवी समूह अथवा मानव स्वता:च्या माणूस असल्याच्या परिक्षेपाचा माणूस म्हणून नैतिकच्या बळावर  सामाजिक संरचनेची घडी बसवण्यासाठी कृतीशील होत नाही तोवर आधुनिक जगातील प्रगतशील मानव मानवी संस्कृतीचा विनाशाकडे एक एक पाऊल अतिशय वेगाने पुढे टाकत राहणार. या प्रक्रियेचा भाग बनलेला हरेक माणूस मग जगण्याच्या कलेपासून कायमचा वंचित राहणार हे वास्तव सत्य आहे. याला बदलण्यासाठी मानवता अन माणूसकी याशिवाय सत्य अहिंसा अन प्रामाणिकता या तत्वांचा अंगिकार सर्जनशीलपणे होणे आवश्यक आहे. 

अनिल गोडबोले,सोलापूर
जागतिक आरोग्य संघटनेने आरोफ्याची व्याख्या करताना अस सांगितल आहे कि आरोग्यपूर्ण कोणाला म्हणावे .... तर जो व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सुदृढ आहे तो आरोग्यदायी आहे. नुसता आजारी नाही म्हणजे तो आरोग्यपूर्ण होत नाही. 
तर आता या नुसार आपण आपला विचार करू. दरवर्षी ७ तारिखला जागतिक आरोग्य संघटने तर्फे जागतिक आरोग्य दिवस “साजरा” केला जातो. त्या नुसार ‘सर्वांसाठी आरोग्य’ असे ब्रीद वाक्य घेऊन WHO काम करत आहे. 

सर्वाना आरोग्यदायी राहता यावे या साठी प्रत्येक देश त्यांच्या देश मध्ये आरोग्य धोरण ठरवत असतो, त्यानुसार पैशाची तरतूद अंदाजपत्रकामध्ये केली जाते. एकूण देशाच्या अंदाजपत्रकातील हिशोबाप्रमाणे ५ % कमीतकमी पैसा हा आरोग्य क्षेत्रात दिला गेला पाहिजे परंतु भारतामध्ये २ % एवढा पैसा अंदाजपत्रकामध्ये दिला जातो.


हा झाला देशाचा प्रश्न.... पण आपण आपल्या मुलभूत गरजा मधील एक गरज असलेला प्रश्न म्हणजे आरोग्य. आपण खरोखर आरोग्यवर लक्ष देतो का ? मागील जीवनशैली च्या लेखामध्ये मी या संदर्भात लिहिले होते. फक्त काही प्रश्न आहेत त्यांची उत्तर आपल्याकडे आहेत का तेवध बघू...


मला जिना चढल्यावर धाप लागते का? थोड्या शारीरिक कष्टानी मी थकून जातो का? मी खाताना संतुलित आहार घेतो का? माझी खूप चिडचिड होते का? मला एखाद्याचा खूप राग येतो तेव्हा मला त्रास होतो का? समाजात घडलेल्या घटने कडे मी आपुलकी ने बघतो का? सरकारला संपूर्ण स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव, राष्ट्रीय आरोग्य अभियान राबवून आपल्याला आपली काळजी घेण्याबद्दल सांगण्याची वेळ का येते? 

बाकीकाही फार लिहित नाही.... आपण सगळे सोशल मिडिया तज्ञ आहोत. आरोग्य सारख्या गोष्टीवर देखील आपल्याकडे अर्धवट ज्ञान आहे किवा संपूर्ण अंधश्रद्धा आहेत.. 

मी प्रयत्न करतोय तुम्ही करताय का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************