गोंधळलेली जनता व राजकारण

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 7⃣0⃣वा 📝 
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒✍📖
 10 मार्च 2019  ते  16 मार्च 2019

गोंधळलेली जनता व राजकारण




सिताराम पवार,पंढरपूर

            लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. पण कधी कधी जनताच चुकीच्या लोकांना निवडून देते त्यामुळे डोकं सुन्न होत.त्याला कारणही तशीच असू शकतात. काही लोक पैशाचा वापर, धाक दाखवून, किंवा सक्षम स्पर्धक नसल्यामुळे निवडून येतात.सध्या मात्र खूपच सामाजिक गोंधळ निर्माण झाला आहे.समाजसुधारकानी जीवच रान करून सामाजिक सुधारणेची पायाभरणी केली पण खलील कारणांमुळे सामाजिक एकोप्याला सुरुंग लागत आहे.
1. वाढताजातीअभिमान
2. जातीवर आधारित आरक्षण व त्यामुळे जातीवर आधारित संघटना स्थापन
3. सार्वजनिक हितासाठी आपल्यातला 'मी'पणा न सोडण्याची मानसिकता.
4. सत्ताधारी विरोधात बोललं की लागेचंच विरोधी पक्षाचाच आहेस अस मानण्याची वाढलेली वृत्ती.
5. महापुरुषांच्या विचारांचा केलेला रिंडगुड.
सध्या जनता स्वतःलादोन विचारातच गुंफू पाहती आहे आणि त्यात तटस्थ लोकांनाही ओढते आहे.
सध्या राजकारणावरील गोधळ खूप हीन पातळीवर गेला आहे.आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वसा यशवंतरावानी दिला आजचे महाराष्ट्रातील राजकारणही  गोंधळलेल्या विचारांत सापडले आहे.कळतच नाही कोणता पक्ष व राजकारणी तत्वानुसार वागतोय. कुणाचा मुलगा एका पक्षाचा खासदार तर सून दुसऱ्याच पक्षाच्या पाठींब्यावर जि. प. अध्यक्ष, तर पुतण्या तिसरीच पक्षाचा आमदार. नवल या गोष्टीच आहे की तत्व, विचार यासाठी सत्तेवर न  लाथ मारता सत्तेसाठी नव्हे तर जाणून बुजून सत्ता आपल्याच घरात प्रस्तापित लोकांनाच मिळावी म्हणून राजकारण्यांनी सामाजिक तत्वे धुळीस मिळवली आहेत.विशेष म्हणजे ही लोकं सामाजिक विषमतेच्या वाढीस पूरक भूमिका घेतात. आशा आहे गोंधळलेल्या राजकारण्यांना गोंधळलेली जनताच गोंधळ( मत)  घालून ताळ्यावर आणील.
*==============================*

संगीता देशमुख,वसमत

             आजकाल सोशल मिडियामुळे लोकांचा एवढा गोंधळ उडत आहे की,काय खरं,काय खोटं याचा ताळमेळ कोणालाच नाही. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापरच जास्त होतो आहे. कुठलेही फोटो,विडिओ एडिट करून आपल्यापर्यंत पोहचत आहेत. आता जेव्हा एअर स्ट्राइक झाला तेव्हा त्याचा लाइव्ह विडिओ व्हायरल झाला. तोच अनेक सुशिक्षितानी अजून पुढे पाठवला. बारकाईने पाहिल्यावर त्यावरची वेळ पाहून कळाले हा विडिओ फेक आहे. तसेच राजकीत क्षेत्राबद्दल सुध्दा घडत आहे. मूळ  विडीओ वेगळाच असतो त्यावरचा आवाज वेगळाच असतो. पण सामान्य म्हणण्यापेक्षा आपल्यासारख्या उच्चशिक्षित लोकांचाही काय खरे आणि काय खरे कळत नाही तेव्हा अतिसाधारण शिकलेल्या लोकांचा गोंधळ उडत असेल? जो तो आपापल्या सोयीनुसार पोस्ट तयार करून टाकतात. त्यात मोठ्या दिग्गजांची नावे टाकून तो पसरवतात. विकास आमटे,विश्वास नांगरे यांच्या नावाने ते पाठवलेली असल्याने लोकांचा त्यावर विश्वास असतो. त्यातून अनेकदा चुकीचीही माहिती पसरविल्या जाते. अनेकदा देवाच्या पोस्ट पाठविणे,त्या इतरांना पुढे पाठवायला सांगून दहशत पसरविणे हे म्हणजे लोकांचा गोंधळ उडविणेच  आहे. सध्या निवडणुकीच्या काळातही असेच जनतेचा गोंधळ उडविणारे सर्वच राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते संदेश पसरवत रहातील,यामुळे जनतेचा गोंधळ उडून दिशाभूल होण्याची शक्यता जास्त आहे.
*================================*


दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम


            मानव हा एक सामाजिक प्राणी आहे तसाच तो समाजप्रिय पण आहेच, समाजात राहताना माणसांनी स्वतः ला काही नियम घालून दिलेले आहेत ते यासाठीच की आपला गोंधळ नको व्हायला म्हणून. पण आजच्या सामाजिक वातावरणात वावरताना कुठला अनुभव येतो तर तो म्हणजे सारा गोंधळात गोंधळ दिसतोय.

जनता ही सारी जनता
नुसतीच वाढलीय घनता
नुसता इथं राजकारणाचा गोंधळ,
जनतेच्या हाती देऊन संबळ।

जनता ही आहे बडी डोकेबाज
मतं विकून करते कसला माज
नको ती मतांची किंमत
नेता करतो मग 5 वर्ष गंमत।

समाज म्हणून पाळावी आपण आपली मूल्ये,
तेव्हाच कुठं चांगलं मिळवतील आपली पाल्ये,
आपलाही नको गोंधळ नको तो राजकारणाचा,
एक पाऊल पुढे टाकून साचा बनवू समाजाचा।

नाही व्हावा गोंधळ कुणाचाच यासाठी,
राज्यघटनेला आपल्या धर्मग्रंथ माना,
तीच उंचविल आपला जगामध्ये बाणा।
*===============================*
Image soucre INTERNET

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************