मला आवडलेली वेबसाइट


शिरीष उमरे यवतमाळ

विषय वाचल्याबरोबर एक च शब्द डोक्यात आला तो म्हणजे गुगल !! तसे मागोमाग युट्युब, विकीपिडीया, लिंकड् इन, फेसबुक, लाइव क्रीकेट स्कोर, डेली हंट वैगेरे धावत आलेच पण माझी आवडती वेबसाइट गुगल च त्यातल्या त्यात गुगल मॅप !!

गुगल च का ? माहीतीच्या महासागरातुन मोती निवडायचे असतील तर गुगल चा ऑक्सीजन मास्क असल्याशिवाय पर्याय नाही. अचुक, अद्यावत, कमी खर्चात व कमी वेळात माहीती मिळवण्याचे ठीकाण म्हणजे गुगल... मग तो लेख असो कींवा इमेज असो वा विडीओ असो... क्षणात तुमच्यासमोर हजर !! अल्लाउदिनच्या जादुच्या दिव्यातला गुलाम जसा !! सदैव तयार.. क्या हुकुम मेरे आका ? म्हणणारा !! 

विशेष म्हणजे गुगल च शिकवते गुगल ला कसे योग्यरित्या वापरायचे ते... त्यांचे ट्युटोरियल वाचले की झाले काम !! हेल्प हा ऑप्शन तर असतोच मदतीला..

गुगल मॅप ही गुगलचीच उप वेबसाइट आणि अतिशय उपयोगी !! मी त्यांचा लेवल ६ चा लोकल गाइड आहे. मी गुगल चा बिझनेस पार्टनर पण आहे. मी खुप फीरतो, खुप फोटो काढतो, स्थानिक लोकांकडुन बरीच उपयोगी माहीती गोळा करुन हे सगळे मॅप वर अपलोड करतो. एका पध्दतीने समाजसेवा ... पण ह्यामुळे प्रभावित होऊन मला गुगलने तिन दिवसाच्या कॉन्फंरस साठी युएसए बोलावले होते. ह्या वर्षी जाणे जमले नाही. पुढल्या वर्षी नक्की जाइन. जाणे येणे खाणे पिणे राहणे फीरणे सगळी व्यवस्था व खर्च गुगल करणार आहे ... 
____________________________

प्रदीप इरकर, वसई

अन्न ,वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत व आता त्यामध्ये इंटरनेट ही गरज मूलभूत गरज म्हणून जाहीर करण्याची वेळ आली आहे.
इंटरनेटच्या या अफाट महासागरातून मोती वेचून काढावे अशा काही वेबसाईट आहेत ,ज्यामध्ये प्रामुख्याने गुगल चा समावेश करावा लागेल.तुमच्या मनात जो विचार येईल त्या विचाराचे उत्तर गुगल वर नक्कीच मिळते, गुगल द्वारे माहितीचे भांडार अगदी सर्वांच्या हातात उपलब्ध आहे.
जर इंटरनेट चा वेग मंदावला तरी मी गुगल चालु करूनच त्याची खात्री करून घेतो.

अजून एक प्रामुख्याने नाव घ्यावे ते म्हणजे यु ट्यूब.जिओ आल्यापासून तर भारतात जणू युट्युब ला नवीन पालवीच फुटली आहे.अगदी द्यानप्राप्ती पासून ते पैसे मिळवण्यापर्यंत सर्व काही यु ट्यूब मुळे शक्य झाले आहे व ह्याचा जाही विध्यार्थी अतिशय चांगला वापर करून घेत आहेत.
__________________________

गणेश वायभासे, अमरावती

  मित्रानो, मी २०१० पासून आवर्जून एक web site पाहतोय. ती म्हणजे फ्लिपकार्ट. होय, मी अगदी २०१० पासून या वेब साईट वरून मला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी सहज आणि मोठ्या प्रमाणत डिस्काउंट नी खरेदी करतोय. सुरवातीला एक ई कॉमर्स असलेली वेबसाईट आज मात्र माझ्या जीवनाचा एक अंग बनली आहे. कालांतराने मी अमेझॉन आणि स्नॅप डि ल सारख्या वेब साईट वापरण्यास सुरुवात केली आहे. पण आजही माझी लाडकी वेब साईट म्हणजे फ्लिपकार्ट होय. याशिवाय मी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेब साईट शासनाचे निर्णय समजून घेण्यासाठी करतो. सोबतच कधी कधी आय आर सी टी सी वेब साईट चां अधून मधून वापर करत असतो. दैनंदिन जीवनात अश्या अनेक वेब साईट आहेत ज्या आपले जीवन सुकर बनवितात. आपण सर्वांनी त्यांच्याशी मैत्री करून आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आस्वाद घ्यावी हीच इच्छा व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. धन्यवाद.

___________________________


किरण पवार
औरंगाबाद.
                 मला वेबसाईटचं नाव ठराविकपणे सांगता येणार नाही कारण साधारण त्यावेळी मी इ. आठवीत होतो. आणि या गोष्टिला आता बराच काळ लोटला आहे. पण त्या वेबसाईटने मला माझ्या हातात जग आणून दिल्याची त्यावेळी अनुभूती दिली होती. मला त्यावेळी नवीनच कविता करण्याचा छंद लागला होता. आणि म्हणून मी घरी आल्यावर संगणकावर गुगलवर फक्त कविता टाकून पुढच्या येतील त्या ठराविक एक-दोन वेबसाईटस् उघडायचो. अर्थात त्यावेळी त्या कविता मला आवडायला कारण त्यांची आकर्षक छायाचित्रेही क्वचित जबाबदार असावीत. मी त्या कविता वाचायचो, न समजलेल्या शब्दांचे अर्थ शोधायचो, हळूहळू मला काही लिहता येतयं का असे प्रयत्नही करून पहायचो. साहजिकचं आजपर्यंतच्या लिखाणातला मोलाचा वाटा तो भक्कम पाया ठरला आहे. मी त्यात फार उत्सुकता दाखवायचो. जे मला अधी भेटेल की नाही किंवा माझ नाव असचं कधीतरी लोक वाचतील त्या संगणकावरती असं मला त्यावेळी आपसुकच वाटायच. त्यामुळे माझ्या अंगातल्या कलेला फुलवणाऱ्या अशा वेबसाईटसचा मी एक प्रकारे ऋणीच आहे. धन्यवाद!
____________________________

सिताराम पवार, पंढरपूर
     सहज असं म्हणतात की गूगल वर आई वडील सोडले तर सर्वकाही भेटते. म्हणजे गुगल पे, गुगल मॅप, गुगल सर्च यावर इत्यभूत माहिती मिळते.शासनाच्यासुद्धा बऱ्याच वेबसाईट आहेत ज्यावर अधिकृत माहिती मिळते. इ-ज्ञानगंगा, इ-मराठी साहित्य, इ-लर्निंग यावरूनही खूप माहिती मिळते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे रेशीम उद्योग , पोल्ट्री, फळ मार्केट याचीही अधिकृत माहिती कृषी विभागामार्फत मिळते. icaer. ही कृषी शिक्षण, विस्तार व संशोधनाची माहिती मिळते ही  व इ-सकाळ आणि ऍग्रोवन ही वेबसाइट मला आवडते.
इंटरनेट मुले खूप माहिती भेटते पण काय घ्यायचं आणि काय नाही हे आपण ठरवलं पाहिजे.

____________________________

  निखिल खोडे, ठाणे.

           मला गुगल ही वेबसाईट सर्वात जास्त आवडली. कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास त्वरित आपल्याला गुगल वरून मिळते. शाळा, कॉलेज साठी तयार करावा लागणारा प्रोजेक्ट पासुन तर कोणत्या एखाद्या विषयाची सखोल माहिती, संशोधन यासाठी सुद्धा फार उपयुक्त आहेत. 
गुगल चे मला इतर आवडणारे फीचर्स:

१)गुगल मॅप - आपल्याला एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचे असल्यास गुगल मॅप मुळे प्रवासाचे योग्य ते अंतर, लागणारा वेळ, वाहतुकीची कोंडी असेल तर लाल रंगा मध्ये दर्शिविल्या जाते. लाईव्ह लोकेशन शेअर करता येणे. यासारखे गुगल मॅप चे फीचर्स मला आवडतात.

२) गुगल ट्रांसलेट- एखादा मजकूर कोणत्याही भाषेत असो तो आपल्याला समजणाऱ्या भाषेत रूपांतरित करू शकतो. गुगल ट्रांसलेट संपूर्ण फाईल सुद्धा आपण ट्रांसलेट करू शकतो.

३) जीमेल- गुगल जीमेल मुळे ऑफिसियल संवाद साधणे सोपे झाले. रेपोर्टींग करणे, परचेस ऑर्डर देणे यांसारखे कामे आपण जीमेल वरून सहजरीत्या करू शकतो. जीमेल वरून संवाद साधल्याने आपल्या जवळ लेखी पुरावा म्हणून उपयोगी येतो.

४) जीबोर्ड- अवघड शब्दाचे स्पेलिंग चुकले तर जीबोर्ड च्या मदतीने आपण दुरुस्त करू शकतो. ऑटो करेक्ट करून शब्दाचे अचूक स्पेलिंग लिहू शकतो. व्हॉईस मेसेज टायपिंग जीबोर्ड च्या साहाय्याने करू शकतो.
युट्युब मुळे सुध्दा आपण बऱ्याच गोष्टी शिकु शकतो. मनोरंजनासोबत ज्ञानवर्धन करु शकतो. 
ह्यामुळे आपण ज्ञान च नव्हे तर इतर सॉफ्ट स्कील विकसित करु शकतो.

____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************