🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून
Source: INTERNET
अक्षय पतंगेआ बाळापुर, जि हिंगोली
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे वर्णन 'अमृततेही पैजेसी जिंके' असे केलेे. महानुभाव साहित्य आणि संत वाड:मयाने मराठीला भाषाविश्वात अभिजात स्थान मिळवून दिले. ग्रामीण साहित्यातून शेतकरी समाजाच्या सुख-दु:खाला न्याय मिळाला. स्त्रीयांचे योगदान स्त्रीवादी साहित्याने अधोरेखित करत, "शेतात जास्त कष्ट स्त्री घेते पण सातबारा पुरुषांच्या नावे का" ? असा प्रश्न विचारत करत पुरुषसत्ताक व्यवस्थेला आव्हान दिले. 'मी कामगार आहे,तळपती तलवार आहे', असं म्हणतं कामगार चळवळी उभ्या राहिल्या. दलित साहित्यानं जिंदाबादची गर्जना करत सामाजिक न्यायासाठी संघटन उभे केले. शेतकरी साहित्याने इंग्रजांवर आसुड उगारला.
मुंबई कोणाची ? असा वाद सुरू होता, तेव्हा मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य असावं ही मागणी पुढे आली आणि आपल्या राज्याची स्थापना झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं आपल्याला वाटतं. पण काहीचं साध्य होत नाही कारण यासाठी राजकीय इच्छाशक्ती असायला हवी. भाषेवरून राजकारण चालतं हे खरं पण राजकारणाची भाषा मराठीला अभिजात दर्जा देण्यापासून रोखते आहे, असं मला स्पष्ट वाटतं.
मराठी साहित्य दर्जेदार आहे, याबद्दल अजिबात शंका नाही पण साहित्यिकांना सुद्धा रस्त्यावर येण्यापासून कोण रोखतं ? असा माझा सवाल आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलनातून काय साध्य होते ? तर एक इव्हेंट, भेटी गाठी, माध्यमांना बातम्या, खवय्यांची गर्दी तर राजकीय पुढाऱ्यांना मराठी साहित्याविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ अन् वादविवादाला उधाण. मग ही 'साहित्य संमेलने म्हणजे रिकामटेकड्यांचा उदयोग' असं कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांचं विधान थेट वादग्रस्त न ठरवता ते का म्हणत असावेत ? यावरही विचार करणे गरजेचे आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधून साहित्यिकांच्या दर्जेदार लेखणीतून सरकारला पत्र लिहायला हरकत नसावी. नाहीतरी आजकाल पत्रांपेक्षा व्यवहार महत्वाचा आहे...!
Source: INTERNET
साईसागर घोरपडे,अहमदनगर
प्रथमता ज्यांनी हा विषय दिला त्यांचे खूप आभार मानतो , कारण हा खूप महत्वचा विषय आज आहे *मराठी भाषेला अजूनही अभिजात दर्जा नाही* सरळ आणि स्पष्ट सांगतो यात ना राजकीय ना साहित्यक इच्छाशक्ती कमी पडते .... यात कमी पडते ती तुमच्या आणि माझ्या सारख्या लोकांची समाज हा राजकीय लोक नाही घडवत , तो घडवला जातो तो समाजातल्या एक एक व्यक्ती ने , ६ व्या शतकात मराठी भाषेचा उदय झाला यैवडी जुनी आपली भाषा आहे तरी आपण आज मराठी बोलायला लाजतो , आज आपण आपलं गाव सोडून दुसऱ्या एखाद्या शहरात गेला तर हिंदी बोलतो ..समोरचा मराठी जरी असला तरी आपण हिंदी मध्ये बोलतो .... आज आमची पीडी हिंदी काव्य वाचते , हिंदी चित्रपट बघते .... मग काशी ही आपली मराठी भाषा आपल्याला प्रिय वाटलं ... खरं राजकीय व इतर लोकांना दोषी धारण्या पेक्षा आवण जर आग्रह धरला तर आज मराठी भाषेचा हा आपोआपच वाढलं ना हा विचार आपण कधी करणार.. सर्वात आधी तर हा विचार करावा आपण की आपल्या पैकी कीती लोकांना मराठी बाराखडी येते.. आम्हाला ABCD....पूर्ण येते आणि आम्ही नवीन पिटी ला A फॉर APPLE बोलायला लावतो आपण का सांगत नाही *अ* रे *आई* चा पण बोलायला लावला पाहिजेन ...जेव्हा आपण आपल्यात हा बदल घडवण्यासाठी पर्यंत करणार नाही तो पर्यंत हा बदल घडणार नाही , आपण इतर भाषा शिकण्या साठी विविध पदव्या घेतो , का कारण दुसऱ्या देशात जाऊन तिथं काम करण्याची संधी भेटावी.. आपण अस का करू शकत नाही की दुसऱ्या देशातील लोक एक दिवस मराठी शिकण्या
चा आग्रह धरतील . या साठी आदी आपण आपल्या भाषे चा आदर केला पाहिजेन , आपण विविध क्षेत्रात प्रगती केली पाहिजैन ..इतिहास साक्षी आहे मराठी माणूस हा कधीच कमकुवत नव्हता आणि आज ही नाही फक्त तो जोपला आहे आणि त्याला आपल्याला जाग करण्याची गरज आहे ... जेव्हा तो जागा होईल तेव्हा मराठी भाषा ही देशात नाही तर परदेशात ही त्याला दर्जा प्राप्त होईल ...
तर मित्रानो आपण कायम बोलतो शिवाजी जन्मवावा तो दुसऱ्या च्या घरात .. तस न करता जर शिवाजीना ला आवण जर आपल्यात जन्म दिला तर शिवाजी महराजना बरोबर संभाजी ही जन्म घेईल .. सुरवात ही आपल्या पासूनच केली तर दर्जा हा आपोआप भेटलं ..
जय शिवाजी ... जय मराठी
Source: INTERNET
जयंत जाधव,लातूर.
विषय खूपच छान आहे.सर्वप्रथम हा दिवस का साजरा करतात ते पाहू या.आज कविवर्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.दरवर्षी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो.
विषयाला अनुसरून आजच्या मुद्दयाकडे वळू.एक म्हणजे या विषयाची व्याप्ती ही सागराच्या अथांग खोली सारखी आहे.
सध्या आजच्या दिवशी सर्व मराठी भाषिक लोकांच्या तोंडी एकच चर्चा असते ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी मिळणार? याविषयी लातूर येथे एक चालता बोलता लोकांना अभिजात दर्जा म्हणजे काय असे प्रश्न विचारले तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढया कमी लोकांना उत्तरे दिलीत.विशेषतः महाविद्यालयीन युवकांमध्ये देखील याविषयी बोलताना उदासिनता आढळून आली.
अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय ?
- ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं ती भाषा अभिजात
- त्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास हवा
- त्या भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
वरील लिहलेला हा एक लहान असा प्रयत्न होता.
मराठी भाषेला अजूनही अभिजात दर्जा नाही:काय कमी पडत आहे? या गहन चर्चत राजकीय इच्छाशक्ती की साहित्यिकांचा दर्जा अशी तुलना केली तर माझे स्पष्ट मत आहे की राजकीय इच्छाशक्ती मराठी भाषाला अभिजात दर्जा मिळवून देण्यात कमी पडत आहे.कारण चार वर्षापूर्वी प्रा.रंगनाथ पठारे समितीने याविषयीचा अभ्यासपूर्ण अहवाल केंद्र सरकारला पाठविला आहे पण महाराष्ट्र शासनाची उदासिनता,कुचकामी प्रयत्न व दुटप्पी भूमिका कारणीभूत ठरत आहे.मराठी भाषा गौरव दिवस आला की आश्वासननांचा पाऊस पाडला जातो पण कृती मात्र शुन्य. दक्षिणेकडील राज्ये मातृभाषेसाठी ज्या शक्तीने आग्रही भूमिका घेतली आहे त्या प्रमाणात महाराष्ट्र सरकार करत नाही.यासाठी तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर सर्वसमावेशक दबावगट निर्माण केला पाहिजे.
महाराष्ट्रातील सरकार व राजकीय पक्षांनी आपले दूतोंडी धोरणे कटाक्षाने सोडावे.महाराष्ट्र सरकारला मराठी भाषेचा खरी काळजी व प्रेम असते तर २६.२.२०१८ सारखी मराठी भाषेचा अपमान करणारी घटना घडलीच नसती.राज्यपालांच्या अभिभाषणाचे अनवाद सभागृहात मराठी ऐवजी चक्क गुजराथी भाषेतून ऐकू येत होते .ही अत्यंत शरमेची बाब आहे.अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारचे मराठी विषयाचे प्रेम म्हणजे 'खायचे दात वेगळे व दाखवयाचे दात वेगळे '.आपल्या मराठी भाषेचा मान सन्मान आपणच करायला हवा.उदाहरणार्थ भ्रमणध्वनीवर ग्राहक केंद्रातून प्रतिनिधीला मराठीततून बोलण्याचा आग्रह करणे व नाहीच बोलला तर त्यांच्या सेवांवर बंद करा.आपण मागितले तरच आपल्याला मिळेल.यासाठी दक्षिणेकडेचा तमिळ,कन्नड ,तेलगू लोकांचे द्राविडी पराक्रमी गुण मराठी माणसाने अंगिकारला पाहिजेच.
मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही मागणी १९३८ पासून होत आहे.आता कुठे २०१८ मध्ये मराठी भाषा विद्यापीठ बँडस्टँड-वांद्रे,मुंबई उभारण्यात येणार असल्याची मान्यता मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांनी दिली आहे पण पूर्ण होईल तेव्हा खरे ?
दुसरा मुद्दा साहित्यिकांच्या दर्जाबाबत तर माझे स्पष्ट मत आहे की महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर-तुकाराम तसेच संत तुकडोजी,बहिणाबाई ते आधुनिक काळातील कुसुमाग्रज,प्र.के.अञे,वि.स.खांडेकर यांच्या सारख्या महान व अतिशय उत्कृष्ट साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य लाभले आहे.
त्यामुळे मराठी भाषेला अजूनही अभिजात दर्जा मिळण्यास राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे पण प्रत्येकाने आपण स्वतःही आत्मपरिक्षण करावे की मराठी भाषेच्या विकासात मला काय योगदान देता येईल.चला तर मग मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने आपण शपथ घेऊ या की मी आजपासून शक्य होईल तेवढे मराठीत बोलण्याचा व मराठी साहित्य वाचण्याचा,मराठीत काही ना काही लिहण्याचा प्रयत्न करेनच व हे करताना दुसऱ्या भाषांचाही आदर करेन पण माझे पहिले प्रेम मराठी राहिल."चला सुरुवात करुया,एकजुटीनं प्रयत्न जोडूया,बदल घडूया, माय मराठीला गौरुया."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा