आपल्याला पाण्याची ‘किंमत’ भविष्यात किती मोजावी लागेल?

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

Source: INTERNET
-किरण पवार,औरंगाबाद

                आपल्याला भविष्यात निश्र्चितच पाण्याची किंमत फार मोजावी लागेल जर आपण त्याचा जपून वापर नाही केला तर. पाणी जमिनीत साठवण्यासाठी जेवढ महत्वाच पाऊल महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन ने घेतल त्याचप्रमाणे प्रत्येक माणूसाने वैयक्तिकरित्या पाण्यासाठी काय करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. पाणी भविष्यात फक्त कमी पडेलच असा भाग अजिबातच नाही कारण पाण्याच दुसरं रूप म्हणजे पुर हेसुद्धा आपल्या सर्वांसाठी भविष्यात घातक ठरेल. कारण पृथ्वीच तापमान दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याच कारण मानवनिर्मित प्रदुषण आहे. एसी कार्स तसेच विविध रेफ्रिजरेटर्स मधून बाहेर पडणारा सी.फ.सी.( Carbonflurochloride) यांसारख्या घटकांमुळे पृथ्वीच तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. जर असच चालू राहील तर *ग्लॅशियर्स वितळून पाणीपातळी वाढायला सुरू होईल* आणि मोठ्या पुराच्या आगमनाची ती चाहूल असेल एवढ मात्र नक्की.
           आपण आपल्याला भेटलेल्या साधनसंपत्तीचा अमर्याद वापर करतो. *पण आपल्या लक्षात यायला हवं प्रत्येक गोष्ट ही मर्यादेतच वापरावी.*




Source: INTERNET
-अभिजित गोडसे, सातारा

         *पाणी हा* एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठावर ७० ते ८० टक्के भूभाग पाण्याने आणि १९ ते २० टक्के भाग जमिनीने व्यापला आहे. जमिनीच्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण जास्त असले तरी माणसाला पिण्यासाठी पाणी नाही . हे वास्तव आहे. भविष्यात पाण्याची टंचाई हे सर्वत्र भासनार आहे . या साठी उपाययोजना करण्याची निश्चित गरज आहे . काही प्रमाणात ईतर देशात आंतरराष्ट्रीय लेवला 'पाणी' या  विषयावर चर्चा घडत आहेत. आपल्या देशात ही यावर विविध राज्ये , सामाजिक संस्था , विद्यापीठे यावर मंथन करत आहे . महाराष्ट्राचा विचार करता येत्या काही वर्षीत आलेली 'जलशिवार योजना ' असेल किंवा ईतर काही पाण्या संदर्भात केलेल्या उपाय योजना असतील या नक्कीच कौतुकास्पक आहेत . त्याच जोडीला राज्यात विविध सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात 'पाणी' या विषयावर काम करत आहेत . तसेच पाण्याचे महत्त्व पटवून सांगत आहेत . हे सर्व ठिकच आहे.

         पण सर्वच कळत्या आणि बुद्धीजिवी वर्गाने भविष्यातील पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी पुढे आले पाहिजे . तसेच सर्वाना पाण्याचे महत्त्व पटवून देऊन स्वतः  पासून पाणी वाचवले पाहिजे . सकाळ पासून संध्याकाळ पर्यत रोजच्या दैनंदिन जिवनात जिथे संधी मिळेल तिथे पाणी वाचवले पाहिजे . नाहीतर भविष्यात पाण्यासाठी युद्ध होईलच , पण सरकार पण 'पाणी' या विषयावर निवडणूका लढवेल. आणि त्यांत सरकारी जाहीर नामे हे ...तुमच्या गावाला रोज पाण्याचे दोन टँकर , आठवड्यातून ऐकदा आंगोळ करण्यासाठी गंगा नदीचे पाणी देणार , इयत्ता पहिली  ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रोज एक पाण्याची बाटली देणार , आम्हाला मतदान केले तर आमचे सरकार वर्षीतुन एकदा तुम्हाला तलावाकाटी पर्यटनाला नेहनार ....अशा जर उमेदवारांनी घोषणा केल्या तर आच्छर्य वाटायला नको.

Source: INTERNET
-जयंत जाधव, लातूर

          वसुंधरावरील सजीव सृष्टीला जीवन जगण्यासाठी  पाण्याची आवश्यकता आहे.पुराणातील कथा आहे की भगिरथाला माहित होते वसुंधरेवर पाणीशिवाय जीवन अशक्य आहे म्हणून त्यांनी गंगेला वसुंधरेवर आणले.आपण मात्र त्या गंगेला आटवून टाकलं. पाणी हे जीवन आहे तसेच ते अमूल्य आहे. म्हणून पाणी बचतीचा संदेश सर्वदूर पोहोचवा लागेल.
         "पाणी म्हणजे जीवन
    सध्या मात्र नुसती वणवण"
आज जगात सर्वत्र हेच चित्र आढळून येते.पाण्याचा बाबतीत जगात दोनच सत्य निर्देशनास आल्या आहे.एक फुकट मिळाल्यावर एखाद्या गोष्टीचे मुल्य  राहत नाही. एखाद्या गोष्टीचा पुरवठा कमी प्रमाणात झाला तर ते मिळवण्यासाठी त्याला सोन्याचा भाव मोजावा लागतो .या सुञानुसार पाणी वाचवले नाहीतर  निश्चितच आपल्याला भविष्यात पाण्याची अमाप न मोजता येणारी किंमत मोजावी लागेल.एका बातमीनुसार क्रिकेटर विराट कोहली ६००/- प्रती लिटर किमतीचे पाणी पितो म्हणे,असो हा सध्या अपवाद आहे. पण पाण्याची अशीच नासाडी सुरू राहिली तर आपल्या देखील ६०,०००/- रु.लिटरचे पाणी घ्यावे लागेल.

 पाण्यासाठी भविष्यकाळात आपल्याला किती व कशी किंमत द्यावी लागेल? या प्रश्नाचे उत्तर  आपल्याला जागतिक पाणी परिषदेत सादर करण्यात आलेल्या एका व्यंगचिञात पाहायला मिळते. एका माणसाच्या खांद्यावर कावड आहे  म्हणजे खांद्यावरील काठीच्या दोन्ही टोकावर पाण्याचे खाली पिंप होते. कावड घेवून मनुष्य चालत असतांना अचानक पाऊस सुरू झाला आणि पावसाचे पाणी कावडीच्या पिंपात पडत असल्यामुळे त्याला थांबून टोल भरावा म्हणून सांगण्यात आले कारण त्या भागातील पावसाच्या पाण्याचा लिलाव झालेला होता. ज्या ठेकेदारानी तो लिलाव घेतलेला होता त्याला त्याच्या हद्दीतील टोल वसुल करण्याचे अधिकार प्राप्त झालेले होते - पाण्याचा मुळ स्त्रोत म्हणजे पाऊस आणि पावसाचे खाजगीकरण म्हणजे काय होईल ह्याची कल्पना न केलेलीच बरी.यावरून पाण्याबाबतचा भविष्यातील धोका आपल्याला अस्वस्थ करतो.
(संदर्भ- ३री जागतिक पाणी परिषद,शीगा राज्य ,जपान वर्ष-२००३)
   यक्ष आजच्या काळात असता व त्ने प्रश्न विचारलं असत की या जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते ? उत्तर आहे- पाणी.म्हणून हिंदीत म्हटले जाते कि,
"खाना सब चाहते है,उगाना कोई नहीं चाहता|
दूध सबको चाहिए,गाय कोई नहीं पालना चाहता|
पाणी सबको चाहिए,कुव्वों को कोई नही बचाना चाहता|"
          पाणी वाचवा… पाणी अनमोल आहे… पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा… यातूनच जग वाचेल व भविष्य वाचेल… ही वाक्ये आपण दररोज ऐकत असतो, पण आपण खरंच त्यासाठी आवश्यक पाऊले उचलतो का? निश्चितच आपली मानसिकता तयार केली व आपल्या दैनंदिन जीवनशैलीत   आवश्यक बदल केले तर पाणी वाचवा बद्दल योगदान देता येईल.पुढील उपाय करता येईल.
 १.जलसाक्षरतेची ओळख -
माणसाला जीवनात आर्थिक देवाणघेवाणसाठी अक्षर-ज्ञानाची तोंडओळख असते. तशी सामान्य लोक, शेतकरी यांना  पाण्याची तोंडओळख होणे गरजेचे आहे. तिलाच जलसाक्षरता असे म्हणता येईल.सध्याच्या 'ग्लोबल वार्मींग' काळात याची फार गरज आहे.झाडांचे व मानवी जीवन अगदी सारखे आहे.झाडे व  माणसालाही पाणी लागते. प्यायला पाणी लागते म्हणून आपण तहान लागताच पूर्ण शरीरावर पाणी अंगावर ओतून घेत नाही. पोटात जाईल एवढेच पाणी तोंडाने पितो. अगदी हीच पध्दत शेतातल्या पिकांना पाणी देताना अमलात आणली पाहिजे.
     २.जलदुत म्हणून प्रत्येकाने काम करणे- २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून लोकांमध्ये जनजागृती करुन पाणी बचतीसाठी अधिक प्रमाणात महत्त्व पटवून दिले पाहिजे.प्रत्येक गावात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन नियोजन करावे.या कामात हर एक नागरिकांनी जलदुताची भूमिका पार पाडावी.
 ३.जल जागृती कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी - जलजागृती कार्यक्रम हे फक्त देखावा न राहता लोकचळवळ झाली पाहिजे. याद्वारे जमिनीतील पाणी पातळी कशी वाढेल,पाणी वापराचे नियम ,कायदे लोकांना समजावून सांगितले पाहिजे,असे मत नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अलिकडच्या काळात व्यक्त केले आहे.
      राष्ट्रीय धोरणात खाजगीकरणाचा उल्लेख आहे त्यामुळे  पाण्याचे खाजगीकरण आता केवळ कल्पना राहिलेली नाही. त्या दिशेने पावले सुद्धा पडू लागली आहेत. मध्यंतरी छत्तीसगड राज्यात  शिवनाथ नदीचे पात्र काही काळासाठी विकल्या गेल्याची घटना घडली होती.त्या काळात नदीकाठी राहणाऱ्या गरीब लोकांवर नदीपात्र विकत घेतलेल्या ठेकेदाराने घातलेल्या निर्बंधामुळे नदी परीसरातील जन जीवन विस्कळीत झाले त्यामुळे जन आंदोलनाच्या माध्यमातून झालेला करार रद्द करून न्याय मिळवावा लागला. भविष्यात याची पुर्नरावृत्ती होऊ शकते.ह्या घटना आपल्याला बरेच काही शिकवून जातात. निसर्गाने आपल्याला बरेचसे काही फुकट दिले आहे.कसलीही किंमत मागितली नाही. आपण हवा,पाणी वापरतो.मग आपले पण कर्तव्य ठरते की पाण्याचे मुळ स्ञोतांचे संरक्षण करायला पाहिजे.पूर्वी एक लोटाभर पाणी सहज फुकट मिळत होते.आज हातभर बॉटलला २०-३० रुपये मोजावे लागतात.हा कलयुगातील विकास म्हणता येईल.तर भविष्यात या विकासाला किती किंमत मोजावी लागेल.नो कॉमेंटस्!
     पणजोबाच्या काळात पाणी वीस फुटावर होते आजोबाच्या काळात साठ फुटावर गेले वड़िलांच्या काळात अड़ीचशे फुटावर गेले व आपल्या काळात तर पहात आहोत पाचशे फुट त्यामूळे भविष्य ओळखा मुलांसाठी पैसे कमवून ठेवण्यापेक्षा पाणी कमवून ठेवा तरच भविष्य त्यांच्यासाठी सुखकारक असेल आणी हे करण्यासाठी पाणी व झाडे वाचवण्यासाठीच्या कार्यक्रमात ऊत्साहाने सहभागी व्हावे,ही नम्र विनंती.
     पाणी फांऊडेशनने सर्वांसाठीच उदाहरण ठेवत पाणी वाचवण्याची नुसती वक्तव्ये न करता पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याप्रतीची आपली कटिबद्धता आपल्या कामाद्वारे दाखवून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************