मला न समजलेले क्रांतिकारी भगतसिंग
🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून
मला न समजलेले क्रांतिकारी भगतसिंग
Source: INTERNET
प्रवीण ,मुंबई
भगत सिंग हे नाव जरी घेतलं अंगावर शहरे उठतात. एक वेगळाच जोश, उत्साह अंगी येतो. देशभक्ती, त्याग, अभूतपूर्व वाचन, अगाध ज्ञान आणि राजकीय प्रगल्बता याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगतसिंग. पण लहानपणापासून आपल्यलाला जो इतिहास शिकवला त्यात भगतसिंग यांचे “जहाल क्रांतीकारक” अशीच साधारणपणे ओळख करून देण्यात आली. या लेखात माझा प्रयत्न राहील कि जे इतिहास विषयात नव्हते पण इतिहासात होते अशा भगत सिंग ची ओळख करून देणे.
भगतसिंग यांना बालपानापासूनच देशभाक्तीचे बाळकडू त्यांच्या आई-वडिलांकडून मिळत होते. पूर्ण कुटुंब हे स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर होते. ज्यावेळी (१९१९) मध्ये जालियानवाला बाग हत्याकांड झाले त्यावेळी त्यानी भारतमातेच्या स्वतंत्र्याची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांचे वय फक्त ११ वर्षांचे होते.
भगत सिग एक लेखक
भगत सिंग हे एक जहाल क्रांतिकारक होते आणि त्यावेळी ते विविध मासिके साप्ताहिके आणि वर्तमानपत्रे यातुन स्वतःचे विचार पोहचवत असत वयाच्या १७ व्या वर्षी त्यानी दैनिक अर्जुन मधून विविध विषयांवर लेखन चालू केले. मी नास्तिक का ? हे त्यांचे एक गाजलेले पुस्तक जे आजही तरुणाना स्फूर्ती देत आहे. त्यानी लिहिलेल्या पत्रातून त्यांचे लेखन कौशल्य प्रभावी पाणे समोर येते. त्यांच्या पत्रे “शहीद भगत सिघ :समग्र वाड्मय” या नावाने प्रकाशित झाले आहे.
नास्तिकवाद
भगतसिंग लहानपानापासून नास्तिक नव्हते, लहाणपणी ते गायत्री मंत्र पठन करायचे पण याचा अर्थ ते लहानपणी आस्तिक होते असा नाही. वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यानी समाजातील रूढी परंपरा यांवर टीका करण्यास सुरवात केली. प्रचलित विश्वासांवर प्रश्न विचाराण्यस सुरवात केली. त्यांच्या मी नास्तिक का ? या पुस्तिकेत त्यानी नास्तीकाची व्याख्या लिहिली होती. “ जो देवावर विश्वास नाही अस म्हणतो तो नास्तिक नाही कारण ज्या देवावर तो अविश्वास दाखवत आहे अप्रत्यक्ष पणे तो त्याचे अस्तित्व मान्य करत असतो. खरा नास्तिक हा देवच अस्तित्वच नाकारत असतो “ ते स्वतः जरी नास्तिक असले तरी त्यानी कधीही इतर धर्मांचा अनादर नाही केला. ज्यावेळी ते प्रश्न विचारायचे कि देव कुठे असतो तेव्हा त्यांना निरनिराळे उत्तर मिळत त्यावेळी त्यानी त्याला प्रतिउत्तर साठी “Philosophy is the limitation of human knowledge” असे म्हटले होते. (संदर्भ: मी नास्तिक का?)
ज्यावेळी त्यांना फासी देणार होते त्यावेळी पण त्यानी देवासमोर प्रार्थना केली नाही. उलट ते मृत्यू समयी सुद्ध लेनिन यांचे “state and revolution” हे पुस्तक वाचत होते.
राजकीय ज्ञान
भगत सिंग जर शहीद झाले नसते तर नक्कीच एक समाजाचे भले करणारे, मुत्सदी आणि अभ्यासू नेते झले असते. वय वर्ष २१ या वयात त्यानी कोर्टात “trade dispute bill” यावर केलेली सडेतोड टीका, सरकार वर त्यांच्या लेखातून केलेलं प्रहर आणि तात्कालिक कोन्ग्रेस च्या धोरणांवर केलेल्या टीकेतून त्यांची राजकीय समाज किती समृद्ध होती हे समजते.
भगत सिंग यांचे राजकीय ज्ञान हे भारतापुरते मर्यादित नव्हते. रशियन क्रांती, फ्रेंच क्रांती, मार्क्सवाद इ. सारख्या विषयांवर पक्कड होती.
मार्क्सवाद
भगतसिंग यांचे वाचन भरपूर होते, ज्या वयात मुलांना परीक्षेचा अभ्यास म्हंटल तर घाम फुटायचा त्या वयात त्यानी कार्ल मार्क्स, लेनिन आणि बकुनीन यांचे पुस्तके वाचून काढली होती. भारतातले ते जुन्या मार्क्सिस्ट पैकी एक होते. त्यांचं साम्यवाद वर विश्वास होता आणि त्यांच्या स्वप्नातील भारतात अर्थकारण हे विकेंद्रित असायला हव अस त्यांचं दृष्टीकोन असायचा.
भगतसिंग यांनी त्यांच्या आयुष्यातून आपल्याला काही शिकवण देऊ केली आहे .
1. कोणतीही विचारसरणी डोळे झाकून अंगिकारू नका
2. प्रचलित विश्वास आणि प्रथांवर प्रश्न विचारा
3. व्यक्तिपूजा करू नका आणि त्याचे समर्थन हि करू नका
मी थोडक्यात त्यांचे आयुष्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याचे कारण एकाच कि भगत सिंग यांचे चरित्र हे फार प्रगल्ब आणि प्रभावी आहे पण आतापर्यंत त्यांची देशभक्ती लोकांनी पहिली पण त्यांची विचारसरणी, त्यांचं राष्ट्रीय-अनाताराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाची समज, धर्म-जात यांचे ज्ञान आणि भविष्यातील भारताविषयीची भूमिका या गोष्टी कधीच जगासमोर आल्या नाहीत. आज बरेच लोक भेटतात आणि म्हणतात भगत सिंग माझे आदर्श आहेत. पण त्यावेळी विचार येतो कि भगतसिंग यांना आदर्श मानाने जेवेढे सोपे तितकेच त्यांप्रमाणे जगणे कठीण आहे.
ज्या धर्मनिरपेक्ष भारताची भगतसिंग नी स्वप्न पहिली त्या देशात कोणीतरी नारा देतो कि “इस्लाम खतरे मे है किंवा हिंदू खतरे मे है” आणि आपली युवक आंधळे पणे त्यावर विश्वास ठेऊन धोक्यात असलेल्या धर्माला वाचवायला रक्त सांडतात. भगतसिंग यांनी जेव्हा हा धोका त्यांच्या हयातीतच ओळखला होता. यातून एक कळले कि आम्हाला भगत सिंगयांची धर्मनिरपेक्षता खरच कळली का?
आज देश हा भांडवलदाराच्या कचाट्यात अडकला आहे आणि देशात बेरोजगारी चा आकडा वाढत आहे. भांडवलशाही बंद झाली पाहिजे हे आधीच भगतसिंग यानी सांगितले पण आपल्याला त्यांचं विरोध हा डाव्या-विचारांचा विरोध वाटला आणि आज काळात नकळत आपण भांदावालादारीच्या गुलामीत आहोत.
देश सध्या अराजकतेकडे झुकत आहे. या शहीद दिनी कोणीही भगत सिंग यांची आठवण काढू नका पण निदान एक शपथ तरी नक्की घ्या कि “ काहीही झाले तरी इथून पुढे कोणत्याही विचारसरणीवर आंधळाविश्वास ठेवणार नाही आणि धर्म-जात यांसारख्या विषयांवरून रक्तपात करणार नाही “ हीच त्यांसाठी श्रान्धान्जली असेल.

अभिजीत गोडसे, सातारा
आँक्टोबर 2017 मध्ये , आंतरराष्ट्रीय युवा व सांस्कृतिक महोत्सव , कर्णाल ( हरियाणा ) येथे जाण्याची संधी मिळाली. सदरचे पोस्टर वाचून अंगावर शहारे आले होते. तेव्हा हे टिपलेले छायाचिञ... संपूर्ण देशातील 29 घटक राज्ये 7 केंद्रशासीत प्रदेश तसेच जवळपास 15 ईतर देश सहभागी झालेल्या या महोत्सवात..भव्य गेट मधून आत जाताच समोरच लावलेले हे चित्र प्रत्येकालाच आत्मविश्वास वाढवणारे आणि तेवढाच विचार करायला लावणारे होते . संध्याच्या काळात बाँलीवूड मधील भुक्कड सिने अभिनेता ! हाच आपला आर्दश असे मानणाऱ्या तरुणाईला लाजवेल आणि माण खाली घालायला लावेल असे हे शब्द नक्कीच आहेत .या स्वकमाई करणाऱ्या आणि तेवढेच आभासी दुनीयेत गरगर फिरवून सोडून देणाऱ्या अभिनेत्यापेक्षा. भगतसिंह बनून त्या प्रमाणे लढले पाहिजे. त्यावेळीची लढाई ही देश स्वतंत्र होण्यासाठी होती .आत्ताची लढाई ही जात , धर्म , पंत तसेच आर्थिक , सामाजिक , राजकीय आणि या सर्वांन बरोबरच सम्मानाने जगण्याची आहे. हे नक्कीच .
Source: INTERNET
सौदागर काळे, पंढरपूर
जो क्रांतीकारक आणि त्यांचे जोडीदार देशाच्या स्वातंत्र्यसाठी हसत हसत फासावर जातात त्यांचा इतिहास,कर्तृत्व,पराक्रम शालेय पाठयपुस्तकात फक्त चार ते पाच ओळीएवढा असतो,हे न समजण्यासारखे आहे. सर्वच जहाल विचारांच्या व क्रांतिकारकांचा इतिहास दडपण्याचे काम आतापर्यंतच्या सर्वच सरकारने पाठयपुस्तकांतून जाणीवपूर्वक केले आहे.त्यात विशेषतः सुभाषचंद्र बोस यांचं नाव अग्रभागी येईल.
लहानपणापासून भगतसिंग तुटक-तुटक माहितीच्या रुपात भेटू लागले.आता कुठंतरी पुरोगामी संघटना ' *मी नास्तिक का?'* या भगतसिंग यांच्या पुस्तिकाचा प्रचार आणि प्रसार करू लागल्या. माझ्या वाचनात आलेले तेवढंच ते त्यांचं पुस्तकं.
प्रसारमाध्यमातून लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर त्यांच्याशी असलेला संबंध समजतो .अन तेव्हा लेनिनच्या विचारधारेचे असणाऱ्यांना भारतातले फाशीपूर्वीचे भगतसिंग आठवतात. तोपर्यंत मला भगतसिंग समजत नाहीत.
त्याचप्रमाणे लेनिनाचा पुरस्कार करणारे भगतसिंग. लेनिनला नाकारणाऱ्याचा सुद्धा असू शकतो.अशावेळी भगतसिंग नेमके कोणाचे हेच समजत नाहीत.
*valentine डे*(14 फेब्रुवारी)ला भगतसिंग आणि साथीदारांचा हुतात्मा दिन असतो असे खोटे पसरवून तो दिवस साजरा करू नका.असे आवाहन करणारे पाश्चात्य संस्कृतीला विरोध करण्यासाठी भगतसिंगचा वापर करतात ते कितपत योग्य आहे ?
असे देशभक्तीच्या नावावर कृत्य करणाऱ्यांना भगतसिंग समजले असतील का!
'भगतसिंग,सुखदेव,राजगुरु जहाल क्रांतिकारक होते. त्यांनी देशासाठी बलिदान दिले.'एवढीच जुजबी माहिती नव्या पिढीपर्यंत, तरुणांपर्यंत आणून एखाद्या प्रस्तापित शासनाविरोधात तरुणांनी हक्कासाठी लढू नये असा काही सरकारचा यामागे उद्देश असेल का!असं असेल तर भगतसिंग कसे समजणार? भगतसिंग यांच्या नावाने चालणाऱ्या संघटना हिंसेच्या पुरस्कार करणाऱ्या असतील म्हणून आपण दुर्लक्ष करत राहायचे हे सुध्दा आपल्या संशय प्रवृत्तीचे लक्षण नाही का!
सदर जो भगतसिंग यांच्यावरील विषय दिला आहे त्याच्याऐवजी आम्ही *भगतसिंग यांचे विचार घेऊन आजचा तरुण वागू लागला तर.....* या विषयाच्या विचारात होतो.पण हा विषय आम्ही सर्वसंमतीने निवडू शकलो नाही. भगतसिंग आपल्याला अन शासनाला सहजासहजी झेपत नाही ,हेच म्हणावे लागेल दुसरं काय ?
देशाच्या स्वातंत्र्यसाठी भगतसिंग, राजगुरु , सुखदेव यांनी प्राण दिले.तेव्हा ब्रिटीश ही समस्या होती. आजच्या युवकांपुढे दारिद्र्य, अस्वच्छता, भ्रष्टाचार यांसारखे प्रश्न आहेत. ते देशासाठी हसत हसत फासावर जाऊ शकतात आपल्याला फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून हे संपवण्यासाठी नव्या भारतासाठी एक कृती करायची आहे.या अर्थाने जरी भगतसिंग यांचे बलिदान आपल्याला समजले तरी देशभक्तीचे लेबल शोधण्यापासूनची आपली धावपळ थांबेल.ती थांबावी लवकर आपल्या नव्या भारतासाठी.

जयंत जाधव,लातूर
स्वातंत्र्य इतिहासातील भगतसिंग हे निःसंशयपणे सर्वात प्रभावशाली क्रांतिकारकांपैकी एक आहेत. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत केवळ सक्रिय सहभाग घेतला नाही तर इतर अनेक युवकांना त्यात सामील होण्यासदेखील प्रेरित केले ते जिवंत असतानाच पण त्यांच्या मृत्यूनंतरही .
स्वातंत्र्य संग्राम क्रांती:-
भगतसिंह हे अशा प्रकारचे युवक होते जे ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढण्याची गांधीजींच्या शैली विश्वास नव्हता. ते लाल-बाल-पाल यांच्या क्रांतिकारी मार्गांवर विश्वास ठेवत होते. भगतसिंह यांनी युरोपीय क्रांतिकारक चळवळीचा अभ्यास केला कम्युनिझमकडे आकर्षित झाले. अहिंसा पद्धतीच्या वापरण्याऐवजी क्रांती घडवून आणण्यावर विश्वास ठेवणाऱ्यांशी हातभार लावला. काम करण्याच्या त्याच्या पद्धतींमुळे ते नास्तिक, साम्यवादी आणि समाजवादी म्हणून ओळखले जाऊ.
भगतसिंगाचे व्यक्तीमत्व हे अथांग सागरा सारखे आहे.त्यांना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भगतसिंग जन्माला यावे लागतील.मला जेवढे त्यांचे व्यक्तीमत्व समजले ते पुढील प्रमाणे-
१.महात्मा गांधी भगतसिंग बाबत गप्प का राहिले?-
हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगतसिंग यांची पूर्ण स्वातंत्र्य मिळावे ही मागणी होती.त्यासाठी गांधीचा अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा मार्ग वेळकाढूपणाचा व अपूर्ण असा होता. छोट्या छोट्या गोष्टीवर उपोषण करणारे गांधी भगतसिंगाच्या बाबतीत शांत का बसले?का काही प्रयत्न केले नाही? त्यासाठी स्पष्टीकरण दिले जाते की त्या दिवशी गांधीचे मौनव्रत होते. तसेच इतिहासाचा दाखले दिले जातात की जगात जेवढी युद्ध झाली ते सर्व हिंसेच्या मार्गाने जिंकता नाही आली.तेव्हा भारताची ताकद नव्हती म्हणे. गांधीनी जर भगतसिंग बाबतीत क्रियाशील कृती केली असती तर आज भारत अखंड तर असता पण कितीतरी अगोदर स्वातंत्र्य मिळवता आले असते.
२. त्या काळात महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,डॉ.आंबेडकर हे प्रसिद्ध वकील असूनही त्यांनी भगतसिंगाची खटला का नाही लढला?
३.भगतसिंगाच्या मदतीला मोंहमद जिनांच्या पुढाकार घेतला होता- मोहंमद जिना हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध कायदेतज्ञ होते.विशेष म्हणजे ज्या सेंट्रल लेजेस्टिव्ह असेंब्लीमध्ये भगतसिंग व त्यांच्या सोबत्यांनी बाँब फोडला होता त्यावेळी जिना तेथे होते.१९२९ मध्ये एवढे असूनही जिना यांनी असेंब्लीत भाषण करताना भगतसिंगाची बाजू उचलून धरली होती. ते म्हणाले होते की,भगतसिंग यांच्या खटल्यात इंग्रज सरकार एकतर्फी खटला चालवत असून हा न्यायालयीन व्यवस्थेचा खून आहे.पण इंग्रज सरकारने त्यांच्या म्हणणेकडे दुर्लक्ष केले होते.भगतसिंगांच्या या मदतीसाठी जिना यांना इतर कुणी मदत नाही केली.
४.१९३१ ला भगतसिंग यांनी भाकित केले होते की इंग्रज सरकार आता फार १५ पेक्षा अधिक काळ भारतात राहणार नाही.हे अक्षरशः खर ठरल. ३जुलै १९४६ मध्ये इंग्रज सरकारनी संसदेत जाहिर केले होते की भारतीयांनी आता सत्ता घेण्यास तयार राहावे आमची आता भारतावर राज्य करण्याची इच्छा नाही.कारण दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड कमकुवत झाले होते.
भगतसिंगाची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली आहेः-
इंग्रज सरकारने भारतीयांवर दोन प्रकारे राज्य केले.पहिले १०० वर्षे मारा धाक दाखवून लुटा.नंतर कायद्याची व नियमाची भीती दाखवून राज्य केले.त्यासाठी नवीन कायदा तयार करुन इंडियन पोलिस अॕक्टनुसार पोलिस तयार केले व त्यांच्या मदतीने लोकांवर धाक व जरब बसवली. याच कायद्यामुळे लाला लजपतराय यांचा मृत्यू,भगतसिंगाना फाशी व लोकांवर अनेक वर्षे अत्याचार झाला होता. लाहोर येथे तुरुंगात असताना अमृतसर येथील पत्रकार मित्राला झालेल्या भेटीत आपली अंतिम इच्छा सांगितलं होती .भगतसिंगाची इच्छा होती की,भारत स्वतंत्र झाल्यावर इंग्रज काळातील इंडियन पोलिस अॕक्ट रद्द करावा.पण स्वातंत्र्य होऊन ६९ वर्षे झाली तरी आजही हा कायदा अमलात आहे.त्या काळातही अन्याय होता व आजही चालूच आहे.उदाहरणार्थ नंदीग्राम येथे सरकारच्या नियोजित प्रकल्प साठी हुकूमशाही पध्दतीने शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने बळकाविल्या होत्या. शेतकऱ्यांनी विरोध दर्शविण्यासाठी जेव्हा आंदोलन केले तर पोलीसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज व गोळीबार केला होता. महाराष्ट्रात मावळ येथे धरणात जमिनी गेल्या त्याचे थकीत मोबदला मागण्यासाठी निघालेल्या आंदोलकांवरील गोळीबार व लाठीहल्ला.
भगतसिंगानी राजगुरुच्या प्रेम या विषयावर मत व्यक्त केले होते की,सध्याच्या काळ हा पारतंत्र्याचा असून प्रेम,लग्न यासाठी माझ्याकडे वेळ नाही. माझे लग्न हे माझ्या देशाचे स्वातंत्र्य आहे.जर पुढील जन्म मिळाला तर आयुष्यभर प्रेमिकेजवळ घालवेल.ही गोष्ट विशेष करुन यासाठी सांगितले कि काही महाभाग विनाकारण १४ फेब्रुवारी व्हॕलेंटाईन डे व त्यांच्या बलिदान दिवसाचा चुकीचा संबंध दाखवून गैरसमज पसरवत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा