.....हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झाले/ झालो.(भाग-2)

🌱 *वि४* 🌿 व्हॉट्सअप ग्रुपवरून
.....हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झाले/ झालो.(भाग-2)

(यातील सर्व पुस्तकांचे छायाचित्रे गुगलवरून घेतले आहेत)
            
बालाजी सानप,बीड:
Dr. A. P. J. Abdul kalam यांचे आत्मचरित्र  *wing's of fire*  म्हणजेच मराठीत अनुवादित *अग्निपंख*  आणि एक अमेरिकन तरुण ते एक भारतीय साधू राधानाथ स्वामी महाराज असा प्रवास करणाऱ्या एका *अमेरिकन साधूचे the journey home* हे आत्मचरित्र हे दोन पुस्तके माझ्या मनाची भूक नेहमी भागवत असतात. माझा  जेव्हा केव्हा self confidence  कमी होतो, माझ्यातली negativity वाढायला लागते तेव्हा मी हे दोन्ही पुस्तके वाचत असतो, आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो.
1) *अग्निपंख*
तमिळनाडु मधील रामेश्वर नावाच्या छोट्याश्या गावात एक नावड्याच्या घरी जन्म झालेला एक मुलगा देशातील सर्वोच्च स्थान राष्ट्रपती बनतो आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळवतो.
त्यांचा हा ध्येयवेडा संघर्षमय जीवन प्रवास त्यांनी या पुस्तक रूपाने आपल्यासमोर ठेवला आहे, जगातील जो कोणी हे पुस्तक वाचेल त्याच्यामध्ये एक प्रकारची स्फुर्ती, उत्साह, नक्कीच निर्माण होतो हा माझा अनुभव आहे.हे आत्मचरित्र मला संपूर्ण पाठ असून सुद्धा मी  काही लीहू  शकत नाही करण मी जितकं लिहिणार तितकं कमीच आहे....
2) *the journey home*
अशांतीने भरलेल्या या जगात एका अमेरिकन तरुणाद्वारा आत्मशांतीचा आणि संतुष्टीचा शोध या आत्मचरित्रामध्ये दिला गेला आहे, रिचर्ड नावाचा एक अमेरिकन तरुणाने केलेला शिकागो(अमेरिका) ते वृन्दावन (मथुरा)पर्यंतचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे...शिकागो ते युरोप व युरोप ते वृन्दावन त्यांनी सुरू केलेली भ्रमंती  तुर्कस्तान,इराण, इराक, अफगानिस्तान, पाकिस्तान मधून जगाची अध्यात्माची राजधनी असणाऱ्या भारत देशात येऊन थांबते, व भगवद्गीतेच्या तत्वनानाने प्रभावीत  होऊन रिचर्ड प्रभूपाद स्वामी महाराजांचा अनुग्रह घेतो व राधानाथ स्वामी बनतो, सध्या महाराज हे संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करत आहेत....हा सारा प्रवास वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही, हे पुस्तक वाचताना मला 8 तास कसे गेले ते सुध्या काळत नाही.वर्षातून कमीत कमी 2 वेळा ही दोन्ही पुस्तके वाचतो व मनाच्या भुकेला शांत करतो.....
जयंत जाधव,लातूर.
माझ्या आयुष्यात मी नेहमीच वाचन हे ठरवून नाही पण विषयानुरूप करत असतो.सामाजिक कार्ये विषयाचे शिक्षण घेताना व सामाजिक संस्थेमध्ये Adoption-दत्तक विधानाचे,Drug addiction centre -व्यसनमुक्ती केंद्रात व HIV/Aids counsellor म्हणून  कार्यरत असताना वाचन खुप करावे लागते.२००५ साली माझ्या वाचनात प्रा.रवी बापटले यांच्या द्वारे संकलित आरोग्य विषयक माहिती पुस्तक "ईच्छाशक्तीःएक संजीवनी" वाचण्यात आले ह्या पुस्तकातुन मला चांगलीच प्रेरणा मिळाली व तेव्हापासून HIV/Aids पिडितांसाठी पुर्णवेळ कार्य करण्याचे ठरवले ते आजपर्यंत चालू आहे.
महेश देशपांडे,पुणे
खरतर वाचलेल्या पुस्तकांबद्दल खुप काही सांगण्यासारख आहे. *खुप* पुस्तक, *विविध* विषयांवर असलेली पुस्तक, आत्मचरित्र, इतिहासपर, वैज्ञानिक, अगदी भयकथा इथपासुन, बालसाहित्य यासह अनेक विषयांवरिल पुस्तके वाचन्यात आली. माझ्याबाबतीत सांगायचं झाल तर, जरी मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरीही, मला छत्रपती शिवरायांवरिल पुस्तकाने मला प्रेरित केले अस मी म्हणेन. कारण , विं. दा च एक काव्य आहे त्यातील ओळ अतिशय सूचक आहे. ती अशी,
*इतिहासाचे घेऊन ओझे डोक्यावर ओझे ना नाचा ।*
*करुनि पदस्थल त्यांचे भविष्य त्यावर वेचा ।*म्हणजे इतिहासातील गोष्टी मार्गदर्शक म्हणून घेतल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपल्या भविष्याविषयी आखणि केली पाहिजे. संपूर्ण मानवजातिसाठी आदर्श राजा कोणी असेल तर ते म्हणजे आपले सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्यावरील पुस्तकाने मि प्रेरित झालो. बऱ्याच लेखकांची शिवरायांवरील पुस्तके वाचली. त्यातून अनेक बोध घेण्यासारखे आहेत. पण, सर्वांचा विचार करत आपले अस्तित्व सिद्ध करण्याची जिद्द , धमक आपल्या मध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. यालाच सारासार विचार असे म्हणतात. काही लेखक, बाबासाहेब पुरंदरे, विश्वास पाटील व पुस्तके श्रीमानयोगी, राजा शिवछत्रपती इत्यादी.
आजही सर्वाना आवाहन की, शिवरायांचे चरित्र वाचा आणि फक्त वाचून न थांबता ते अंगिकारण्याचा त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न नक्की करा....
मराठी, हिंदी, इंग्रजी या तिनही भाषेमधील पुस्तके वाचलित. मराठीत सगळ्यात जास्त. इंग्रजी भाषेत थोड़े आणि इंग्रजी सुद्धा थोडेच वाचले पण, मराठीची गोडी खुप. चेतन भगत लिखित सर्व पुस्तके One night @ call centr शिवाय. तसेच अर्नब रॉय ई. लेखकांची पुस्तके वाचली.

Manjiri karambelkar:
मला सगळ्यात भावलेलं आणि कायम प्रेरणा देणारं पुस्तक म्हणजे रशियन लेखक बरीस पलेवोय यांचं *एका अस्सल माणसाची कहाणी*
युद्धात आपले दोन्ही पाय गमावलेला एक वैमानिक प्रचंड मेहनत आणि जिद्दीने परत सैन्यात जातो आणि कसा लढतो याचं पूर्ण वर्णन या पुस्तकात आहे.ही सत्यकथा आहे.
सिताराम ढगे,मंगळवेढा:
हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झालो.
ते पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही डॉ नरेंद्र जाधव लिखित ...
     हे पुस्तक अगदी अध्श्यासारखं    वाचलं.. ज्या क्षेत्रात असशील त्या क्षेत्रात तू टॉपला असाल पाहिजेस हा त्यांच्या वडिलांचा अट्टाहास ...भले तू चोर जुगारी हो पण अट्टील हो...
      मुलांना शिकवण्याची धडपड   आणि स्व जपण्याची ....शिकवण या सर्व बाबीचा उल्लेख येतो...
      ".खरच पुस्तक मस्तक घडवतात आणि अशी घडलेली मस्तके कुणापुढे नतमस्तक होत नाहीत...."
       
राहुल आनपट,मंगळवेढा
आयुष्यात तुझ्यासारखी नकोय मला
तूच हवीय मला,
साथीला नसली तर चालेल पण,
जगण्याच्या प्रत्येक वळणावरती भेटायला येत ज मला ।
अग कसं जमतं तुला
इतकं सहन करायला
दुसऱ्यांच्या चुकांसाठी जिझायाला ।
होय मित्र हो मी तिच्याबद्दल बोलतो आहे ,जिने माझं आयुष्य तर बदलून टाकलंच पण त्यात स्त्री बद्दल पुन्हा एकदा मनात सन्मानित विचारच ,न मोडणार घर दिल त्या पुस्तकाचं अन तीच नाव  *'श्रावणी'*.
विजया ब्राम्हणकर लिखित पुस्तक *"श्रावणी"*.
होय त्यातील श्रावणी आहेच इतकी कष्टाळू । तिला थोडं मनात घेतलं की माणूस प्रेमात पडल असच तीच वर्णन ।
मला वाटतं प्रत्येक मुलीनं आणि प्रत्येक मुलांनी वाचायला हवं असं ते पुस्तक ।

या पुस्तकातून शिकलो फक्त
*जगणं काय असतं ?*
*जगायचं कस असतं ?*
दुःखाला सामोरे जाऊन यशाचं गड कशे चढायचे असतात ?
*प्रेम कुणावर करावं ?*
*लग्न करावं तर कुणाशी ?*
या सर्वांची उत्तर मला मिळाली ।
तुम्ही ही वाचा *श्रावणी*

हीच श्रावणी जिचं नाव मी माझ्या कॉलेज च्या बॅग वर 4 वर्ष झालं लिहून ठेवले आहे आणि ते अजून पुसलं गेलं नाही । याचं श्रावणाच्या नावावरून मी मित्राच्या मुलीच नाव *श्रावणी* ठेवलंय ।
धन्यवाद ज्यांनी हा विषय निवडला आणि सुचवला । या विषयाला बोलताना मला १२ वित पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले होते ।हीच श्रावणी मी पूर्ण वर्गाला सांगितली होती ।
पुस्तक :- *~श्रावणी~*
लेखिका :- विजया ब्राम्हणकर
वैशाली गोरख सावित्री:
मी आठवीत असताना पहिली कांदबरी माझ्या हातात पडली ती होती
महाश्वेता ~सूधा मूर्ती
ह्या कांदबरीनेही मला खूप प्ररीत केले. मला स्वताःकडे एक स्ञी म्हनून नाही तर माणूस म्हनून बघायला भाग पाडले,मूलींना शिक्षण घेने तर जरुरीचं आहेच पण नूसतं शिक्षण घेवून न थांबता स्वताः आर्थिकस्वतंञ होण महत्वाच अशा बर्रयच गोष्टी त्या वयातही माझ्यामनावर ठासून गेल्या . त्याचप्रमाणे आनंद यादव सरांच्या *झोंबीने* ही तेवढ्याच प्रमाणात खंबीर बनवल . आपल्या आयुष्यात काही दिवस असे असतात की तेव्हा आपण हसणं ही विसरलेलो असतो त्या दिवसात *एकटा जीव सदाशीव *ही दादा कोंडकेवरची कांदबरी वाचून एवडी हसत होती की माझी आज्जी मला विचारायची 'पोरे वेड तर लागलं नाही ना गं' .असचं कादबर्रनीच जगायला शिकवलं ,हसायलाही शिकवलं ,खंबीरही बनवलं .
पण मी ठामपणे म्हणू शकत नाही की एकाच कादंबरीने मला प्रेरीत केलं.प्रत्येक कादंबरीनेच काहीना काही शिकवलेलं आहे प्रेरीत केलं आहे .
सिताराम पवार,पंढरपूर:
आर आर पाटील यांचे"मी कसा घडलो" लहान पुस्तक आहे परंतु खुपचं प्रेरणादायी आहे.यामध्ये त्यांनी आपल्या लहानपणी आलेल्या कटू अनुभवावर कशी मात केली सांगितले आहे.कमवा व शिका या योजनेत काम करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. तेव्हा कमवा व शिका योजनेअंतर्गत पगरवढीसाठी त्यांनी प्रा.पाटील सरांना कसे पटवूनदिल हे मनाला चटका लावून जाते.
वक्तृत्व स्पर्धा धेमध्ये भाग घेऊन बक्षीस महत्वाचं नसून त्यात मिळणार पैसे खूप महत्वाचे होते.वडिलांचे निधन झाल्यावर त्यांनी पेपर दिला आणि त्यातते प्रथम क्रमांक पटकावला.कपडे नसल्याने त्यानी आपल्या वडिलांची जुनी कपडे काढून त्यापासून शर्ट शिवला त्यावेळी ते मनतात"वडील वारल्यानंतर आई जेवढं रडली नाही त्यापेक्षाही जास्त तेव्हा रडली कि जुना वडिलांचेशर्ट कापडवापरले"त्यांनी रोजगार हमी योजनेवरही काम केले, यातून "परस्थिती कशीही येवो आपण धैर्याने सामोरे जावे ही प्रेरणा क्षणोक्षणी मिळत राहते.
वीणा गवाणकर यांच"एक होता कार्व्हर "हे पुस्तक सुद्धा खूपच प्रेरणादायी आहे.

मधुकर लेंगरे:
कोल्हाट्याचे पोर
हे पुस्तक वाचून   मी माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. या पुस्तकाचे वाचन करताना मि समाजातील बऱ्याच पैलूंना जवळून अनुभवले. विचारसरणी कशी आहे त्याच्या आयुष्यात येणारे प्रसंग त्यांच्या आयुष्यातील फरफट होते. हे पुस्तक वाचताना माला माझ्या स्वताची लाज वाटत होती. कि मि एवढे दिवस जे पाहत होतो ते ते सत्य नव्हते. यांना पन समाज का स्थान देत नाही त्याची एवढी हेळसांड करतोय हेच समजत नव्हते
आशितोष तरडे पुणे:
  ‎लहानपणापासून वाचनाची आवड होती म्हणून पुस्तकांशी मी संलग्न होतो पण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आणि प्रेरित करणार पुस्तक वाचनात यायचं अजून बाकी होत.प्रत्येकाच्या वाचनात असं एक पुस्तक नेहमीच येत कि त्यातली एखादी ओळ खूप आवडते व ती ओळ पुन्हा पुन्हा वाचण्याचा किंवा इतरांना ती सांगण्याचा मोह आवारतच नाही.पण प्रत्येक ओळीवर अस्थिर करणारी,भावनिक करणारी,क्षणार्धात डोळे पाणवणारी तर दुसऱ्याच क्षणी त्वेषाने क्रोधीत करणारी,खोल विचारांना उंचवटा देणारी *मृत्युंजय* हि शिवाजी सावंत यांची कादंबरी वाचनात आली आणि मराठीच्या प्रतिभाशाली भाषेचा जणू साक्षात्कार झाला.खर तर कादंबरीच्या पहिल्या पानापासूनच हि मी कधी संपवेन असं वाटायला लागत आणि कळत नकळत जेव्हा तिचा अर्धा पल्ला ओलांडतो तेव्हा ती संपूच नये अस राहून राहून मनाला वाटत.कर्णाच्या जीवनाची परिस्थितीच्या काटेरी कुंपणात गुरफटलेली लक्तर प्रत्येक पानावर उलगडताना आपल्या मनाची गुंतागुंत अधिक वाढत जाते आणि शेवटी लेखक आपल्याला अबोल करून सोडतो...
सौदागर काळे,पंढरपूर:
आपण घरात बसल्यानंतर कोणीतरी खिडकीतून डोकावत राहतं तसंच काही पुस्तक माझ्या मनात डोकावत राहिली.काही पुस्तकं हास्यक्लबला न जाताही मनमुराद हसण्यास शिकवत आली.काही पुस्तकं संस्कारची धडे देत राहिली.तर काही पुस्तकं डोळ्यातून पाणी काढू लागली,मला प्रौढ करू लागली, समाजाबद्दल  चिंता करण्यास भाग पाडू लागली अन स्वतःला चिंतन करण्यास शिकवू लागली.
                             लहानपणापासून पुस्तकासाठी भिकारी बनत आलो.तरीही झोळी रिकामी राहतच आली.अजूनही ती भूक भागू नये व तशी भविष्यात वेळ येऊ नये असं वाटत राहतं.शेवटी पुस्तकाशिवाय जगणं म्हणजे काठीचा आधार घेत जगण्यासारखं, अंधासारखं चाचपडत जगण्यासारखं.
                ‎
      आता इथं एखाद्या पुस्तकावर लिहिणे म्हणजे दुसऱ्या पुस्तकांवर  अन्याय केल्यासारखं,दुसऱ्या मित्राला विसरल्यासारखं.
                ‎
    पण ज्या पुस्तकानं मला आठवी किंवा नववीत(२००८) असेल तेव्हा प्रथम पुस्तकाद्वारे रडवलं होतं. एकाच रात्रीत ते उद्या मिळणार नाही म्हणून वाचून काढलं होतं. ते नंतर मला विद्यापीठासाठी अभ्यासक्रम म्हणुन आलं.ते पुस्तकं म्हणजे व्यंकटेश माडगूळकर यांची " *बनगरवाडी* "
                ‎
    या पुस्तकानं मला काय दिलं तर असा जेव्हा प्रश्न मनात येईल तेव्हा एका वाक्यात उत्तर देण्यासाठी शब्द असतील," *या पुस्तकानं मला माझ्या माणसांच्या व्यथाचं गाठोडं दिलं* "
                 
     या बनगरवाडीत मेंढरे राखणारे धनगर, घोंगडी विणणारे सनगर, शेती करणारे कुणबी व भटकंती करणारे रामोशी यांचा समावेश आहे.ही कादंबरी मानव-निसर्ग असा संघर्ष सांगते.म्हणून  ती वेगळी ठरते.
            
      ' _दशम्यांची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो'_ ,असं जेव्हा कादंबरीमधील मास्तर म्हणतो तेव्हा ते वाक्य तेवढ्यापुरत मर्यादित न राहूं देता आपल्याही जीवनप्रवासाच्या कहाणीची सुरुवात करण्यास भाग पाडतं.
              ‎
     या पुस्तकातील मास्तरकडून मला प्रामाणिकपणा,जबाबदारी पार पाडणं, गावाच्या विकासासाठी नि:स्वार्थ झटणं,प्रत्येकाचं काम आपलं म्हणून करणं, सत्य बोलणे यासारखे साधे संस्कार तो न कळत देत राहतो.
            
     ‎" _एका गावात राहून एकमेकांशी भाषा करायची न्हाई ,हे बरं न्हाई ;मास्तर!_ "असं अगतिक होऊन बोलणारा गावचा कारभारी मला समंजसपणा शिकवतो.
             
‎" _पोरं साळत आली तर त्येसनी शिकव,गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकोस!_ "असा मास्तराला दम भरणारा दादू बालट्या मला समाजातल्या कुप्रवृत्ती व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतो.
             
  गावातल्या तालमीच्या उद्घाटनासाठी राजा येणार असतो.तालीम बनवत असताना "आयबू" उंचावरून पडतो.बेशुद्ध पडतो.तोपर्यंत राजा गावात येऊन उद्घाटन करून जातो.जेव्हा त्याला जाग येते तेव्हा मास्तराला म्हणतो, " _मास्तर,राजा आला का?_ " उत्तर येत ," _येऊन गेला._ "तेव्हा आयबू रडतो अन त्याच्याबरोबर आपण सुद्धा. तेव्हा त्याला आपण तालमीसाठी काम केल्याची शाबासकी नको असती तर दुरून डोळ्याने " *राजा* " कसा दिसतो ही पाहण्याची इच्छा असते.तीही त्याची अपूर्ण राहते.
             
‎या कादंबरीतील आनंदा,रामा, शेकूबा,नानी, अंजी,काकुबा ही पात्र सुध्दा खूप काही शिकवून जातात.
             
  ‎या पूर्ण पुस्तकात निसर्ग ओतप्रोत भरलेला आहे.दुष्काळामुळे बनगरवाडीतील एक एक जण जगण्यासाठी गाव सोडू लागतो तेव्हा ते वर्णन वाचणं असह्य होतं.
              ‎" _झाडे-झुडपे वाळून कोळ झाली. भुकेल्या मेंढरानी चगळ न चगळ वेचले.फुफाटा फार झाला. चक्रीवादळे होऊ लागली, विहिरिंचे पाणी आटले. वाडीचा हेळ आटला_ ." यासारखी दुष्काळाची वर्णने वाचत वाचत स्वतः आपण मूक होऊन जातो.
              ‎
   अन एकाच गोष्टीसाठी कादंबरी  प्रेरित करत राहते , " _तू पाण्याचा प्रत्येक थेंब वाचव","झाड लाव अन ते जगव"_
              ... *पलायन न करण्यासाठी.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************