समाजाची पर्यावरण संरक्षणाची उदासिनतता पाहता पुन्हा भोपाळ वायूसारखी दुर्घटना घडू नये ,यासाठी आपण काय करायला हवं?

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

समाजाची पर्यावरण संरक्षणाची उदासिनतता पाहता पुन्हा भोपाळ वायूसारखी दुर्घटना घडू नये ,यासाठी आपण काय करायला हवं?* (3 डिसेंला भोपाळ दुर्घटनेला 33 वर्ष पूर्ण .यानिमित्ताने)

जयंत जाधव ,लातूर:
​समाजाची पर्यावरण संरक्षणाची उदासिनतता पाहता पुन्हा भोपाळ वायूसारखी दुर्घटना घडू नये ,यासाठी आपण काय करायला हवं त्यासाठी पुढील उपाययोजना अंमलात आणल्या पाहिजेत.
१.पर्यावरण विषयाचे कडक कायदे :कोणती ही कंपनी सुरू करण्या पूर्वी पर्यावरण विषयाचे कायदे अगदी कडक स्वरूपात अंमलात आणले पाहिजे यात कोणतीही हलगर्जीपणा झाला नाही पाहिजे.यासाठी स्वतंत् कायदेशीर मंडळ निर्माण करून त्यांना कडक अधिकार दिले पाहिजे.
२.सुरक्षा विषयक मापन धोरणाची कडक अंमलबजावणी :पाश्चिमात्य देशांप्रमाणे सुरक्षा य विषयाला कडक महत्त्व दिले जावून नवीन सुरक्षा विषयक म्हणजे नवीन तांत्रिक बाबींचा विचार करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत 'चालतय' हा दृष्टिकोन टाळावा .विशेषतः सरकारने स्वतः त्यांच्या कार्यालत याची अंमलबजावणी करावी सक्तीने.
३.गॕस गाळती बाबतीत अगोदरच सुचना मिळेल अशा नवीन तंत्रज्ञान अंमलात आणले पाहिजे .
४. पर्यावरणासाठी काय चांगले काय वाईट याविषयी प्राधान्य देवून शालेयजीवना पासून कडक जागृती निर्माण केली जावी.
शेवटी मानवी जीवनासाठी चांगले आरोग्यदायी पर्यावरण अत्यंत गरजेचे आहे.अन्यथा येणारा काळ मानवासाठी विनाशाचा राहिल.

क्षितिज गिरी:
मला वाटते भांडवलशाही उगम झाल्या पासून ही समस्या माणसाला आधिक भेडसावत आहे पेसा हचा माणसाचा केन्द्रबिद्दू बनला आहे यामध्ये पर्यावरणाचा विचार तसा फारसा करत नाही किवा तसे करताना दिसत नाही कारण याच्या परिणामाची आपल्याला थोडीशी कल्पना देखील नाही भोपाळ मधील घटना आपल्याला हेच दर्शवत आहे कारण नेसर्गिक समस्या या काही सांगून येत नाहीत वेळीच त्याचे इशारे आपण समजले पाहिजेत
           तसे पाहिले तर झाडे लावण्याचा खूप गाजावाजा होतो पण तोडण्याचा फारसा होत नाही मुळात झाले लावली किती याचा जसा हिशोब लावला जातो तसा तो झाडे तोडली किती याचा लावला जातो का तर उत्तर नाही असेच मिळेल कोणताही नवीन प्रोजेक्ट करायचा विचार जरी केला तरी पहिला बळी हा झाडांचा जातो आपल्याला त्याचे एेवडे काही वाटेत पण नाही झाडे तर लावली पाहिजेत पण जेथे तोडली जातात तिथे पण दुसरा कोणता पर्याय आहे का याचा विचार करावा नाहीतर तेवढीच झाडे दुसरीकडे लावावीत पण ती जगली पाहिजेत नुसती दोन चार दिवस नाटके नको नंतर जातात ती तशीच कोमेजून
          चीन मध्ये सायकलीचा वापर जास्त होतो थोड्या अंतरावर सायकलच वापरली जाते तसे काही करता येईल का निदान शहरात  तरी
        आपण जर आपल्याला लागेल तेवद्याचा वस्तू घेतल्या पेसा आहे म्हणून नुसते गरज नसताना घेऊन ठेवणे ही जरी सवय बदलली तरी नक्कीच फरक पडेल
       लोकसंख्या नियंत्रणाची सुरावात पण आपण आपल्या पासून करू शकतो

अनिकेत:
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी समाजात असलेली उदासीनता कमी करायची तर  सगळ्यात आधी पर्यावरणाविषयी जबाबदारी पटवून देण्याचा व्यापक प्रयत्न केला जायला हवा...
🔴वैयक्तिक जबाबदारी:
दुसऱ्याने आपल्याला त्रास दिल्यास आपले मन जेवढ हळहळते, तेवढेच ते पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल हळहळलं पाहिजे... त्यावेळी कृती घडेल...

🔴 सामाजिक जबाबदारी :
समाज आपलाच आरसा असतो... बहुतेक वेळी समाज अनुकरण करत असतो त्यामुळे समाजात वावरतानाही आपण आपली पर्यावरणाच्या संरक्षणासाठीचे कोणतेही लहानात लहान काम न लाजता, न दबकता , बिनधास्त करायचं... समाजालाच स्वतःची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही... तो ही तुमच्या सोबत येईल...

डॉ.ऋषीकेश खिलारे : नमस्कार
या तिन्ही विषयाची मेख आपल्या जीवनशैलीत दडली आहे.या तिन्ही विषयात नैराश्य जे दिसते त्याला एक सूत्रात सांगायचे तर 10 वर्षपासून केलेले संशोधनावर आधारित  एक सूत्र म्हणजे

*व्यक्तीची  जीवनशैली  जेवढी वेगवान असेल तेवढी सद्सद विवेकाची  क्षमता कमी, व जीवनशैली जेवढी साधी व निसर्ग प्रिय तेवढी सृजनशीलता ज्यास्त.*
      आज 65%भारतीय वेगवान जीवनशैली जगतात म्हणून How to Think हे सुद्धा आता शिकवण्याची आवशक असल्याचे जाणवत आहे.
जय जोहार

दत्तात्रय डोईफोडे:
आजच्या घडीला माझ्या मते निवडलेले तिन्ही विषय समाज म्हणून आपल्याला अत्यंत महत्वाची आहेत, पहिला पर्यावरणाशी, दुसरा लोकशाही, आणि तिसरा कृत्रिम समस्याशी सबंधित आहे.

आज लोकांनी चालवलेली पर्यावरणाची हेटाळणी, लोकशाहीची केलेली दुरव्यवस्था, आणि रसायनाचा चालवलेला अंधाधुंद वापर यामुळं पेचात सापडलेलं जिवचक्र कधी कधी अडकत चालत आहे आणि त्याचे परिणाम सर्वांनाच सोसावे लागत आहेत त्यासाठीच बिघाड झालेलं जिवचक्र सुरळीत चलण्यासाठी स्वतः त काही बदल करणे आवश्यक झाले असताना अजूनही तिकडे आपले पाहिजे तेवढे लक्ष देण्याची तयारी दिसते का? हा प्रश्न आणि त्याचे उत्तर ह्यातच सर्वांचे हित साधले आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************