"तुरुंगातल्या कैद्यांना जेलर निवडायला लावल्यासारखं लोकशाहीचं आहे",हे लियो टॉलस्टायचे वाक्य आणि आपली वास्तव लोकशाही.

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

विषय:-
"तुरुंगातल्या कैद्यांना जेलर निवडायला लावल्यासारखं लोकशाहीचं आहे",हे लियो टॉलस्टायचे वाक्य आणि आपली वास्तव लोकशाही.

सौदागर काळे:
हे विधान आज आपल्या  लोकशाहीचं रूप दाखवत असेल तर व्यक्तिगतरित्या या विधानाशी मी सहमत होतो. आज भारतातील लोकशाही ही जगातील सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखली जाते.जर आपली लोकशाही न्याय, स्वातंत्र्य, समता,बंधुता या तत्वांचा पुरस्कार करत असेल तर आपण भारतीय म्हणून किती त्याचा संघर्षाशिवाय स्वीकार व उपभोग करतो .
   
   साने गुरुजींनी अनुवादित केलेल्या विल ड्युरंट यांच्या" *The story of philosophy* " या पुस्तकात वाक्य आहे की" *शासन संस्थेचे अंतिम ध्येय माणसांवर सत्ता गाजविणे नसते;त्यांना भीती दाखवून गप्प बसविणे नसते,उलट प्रत्येक माणसाला भीतीपासून मुक्त करणे हे तिचे काम असते"*
  
  आपली लोकशाहीतील सत्ताधारी व  शासनव्यवस्था मुक्त विचार,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,उपभोगण्यास लावण्यासाठी नागरिकांप्रती कटिबद्ध असलेली दिसत नाहीत. भारतीय लोकशाही संविधानाच्या लिखित रूपाने सर्वश्रेष्ठ आहे.पण तिच्या शेवटच्या घटकांपर्यंत होणाऱ्या प्रवासाचे रूपांतर सागरात होण्याऐवजी वरीष्ठशाही,  हुकूमशाही ,धर्मांधशाही  यासारख्या डबक्यात होऊ लागले आहे.
   ‎
प्रत्येकवेळी अधिकारासाठी झगडा करावा लागतो, स्त्रीयांच्या हक्कसाठी, न्यायासाठी आंदोलने करावी लागतात, राजरोस त्यांच्यावर  अत्याचार होत राहतात, दिवसाढवळ्या धर्मांध लोक खून करतात, एखाद्या निर्णयाला विरोध करणे म्हणजे देशद्रोही म्हणणे,समता हे तत्त्व अजूनही महिलेसाठी दूर आहे,न्यायालयावर संशय घेण्याची वृत्ती वाढीस लागणे ...हे सर्व
मी वाचलेल्या लोकशाही संकल्पनेत नाही. पण जर लोकशाहीचा अंत असा होत असेल तर ही लोकशाही मला तर नको.
   ‎
   मी अनुभवत असलेली लोकशाही *जाती-धर्माच्या 'मतशाही'वर अवलंबून असेल तर* तिचं उद्याचं भविष्य व्यक्तीगत अत्याचार,अन्याय व गरिबांची, स्रियांची लूट करणारी पोकळ लोकशाहीच्या खांबावर उभी असलेली नाटकी असेल.
   ‎
    ‎
निलेश पाटील,धुळे :
लोकशाहीची सध्यस्थीती पाहता लियो टॉलस्टॉयचे विधान हे  वास्तव लोकशाहीला तंतोतंत लागू होत आहे. असे मला वाटते. खरं तर लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकून हुकमशाही गाजवण्याचा नवीन प्रकार आपल्या सर्वांसमोर घडतोय. मतदान होइपर्यंतच जनतेचा सहभाग घेतला जातो ,त्या नंतर चालू होते ती हुकूमशाही. एकदा का सरकार स्थापन झाले की त्यानंतर मतदारांचा रोल संपला असे जाणवते. मतदानखेरीज दुसरा अधिकार आहे असे कुठेही आढळत नाही. जेव्हा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रस्त्यावर उतरतात त्यांना निलंबित केलं जातं (19 आमदार निलंबित केले होते), आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातो(मध्यप्रदेश), हक्काचे पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठी चार्ज केला जातो. (अक्कलपाडा आंदोलन धुळे) वरून शेतकऱ्यांवर विविध कलमे लावली जातात. अशी परिस्थिती पाहता सरकार जनतेच्या सेवेसाठी आहे की जनतेला धाक दाखवण्यासाठी आहे? हा प्रश्न उपस्थित होतो . नोटबंदी, GST यासारख्या निर्णयातून सरकारचा मनमानी कारभार सिद्ध होतो. UPA, NDA सगळ्यांनीच जनतेच्या अपेक्षा भंग केलेल्या दिसत आहेत. यावरून जनतेचि परिस्थिती ही "कैद्यांमधून जेलर निवडून दिल्यासारखी झाली आहे".

अक्षय पतंगे,हिंगोली:
तुरूंगातल्या कैद्यांनी जेलरला देण्यासारखी अवस्था आजच्या लोकशाहीची झालेली आहे, या लिओ टॉलस्टॉयच्या विधानाशी मी सहमत आहे. लोकांच्या वेदनेचे भांडवल करत संथ गतीने भारतीय लोकशाहीची वाटचाल चालू आहे. पैसा हा लोकशाहीत राजा झाला. अशिक्षित लोकांपेक्षा डीग्र्यावाल्यांनी अताताईपणा करत देशाला मागे आणले. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचारी कुंभकर्ण गाढ झोपेत आहे. शेत पिकवणारा उपाशी आहे तर आईतखाऊ दलाल तुपाशी आहेत, कारण सरकारचे सर्व कायदे शेतकरीविरोधी आहेत. मी सध्या परभणी जिल्ह्यातील मंगरूळ गावात अभ्यासासाठी आलो आहे, याठिकाणी जि.प.शाळेत ८ वर्गांसाठी ३ शिक्षक, बाजुच्या दुधना नदीतील माफीयांनी गायब केलेली रेती, यामुळे कमी झालेली नदीपात्रातील पाणीपातळी, राज्यकर्ते+कंत्राटदार+ अधिकारी यांची वेगात वाढणारी सरकारी कामातील भागीदारी म्हणजे टक्केवारी यामुळे झालेली रस्त्यांची बिकट अवस्था, गावात वाढलेली सवाई दिढी यामुळे गावच्या विकासाला बसत असलेली अढी. शिक्षकांचा विद्यार्थी घडवण्यापेक्षा प्लाँटींग व्यवसासायात वाढलेला इंटरेस्ट, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी ठोकलेला तळ.अपवाद वगळता यातुन तयार झालेले तळीराम, शासकीय दवाखाने यांच्या धुळखात पडलेल्या मशीन्स, गब्बर झालेले डॉक्टर यांच्यामुळे तर न भरून निघणारे पिढ्यानपिढ्यांचे नुकसान होत आहे. यावर पर्याय यांना घरी बसवणे आणि ज्यांना खरचं काही लोकांसाठी करायचे त्यांची नियुक्ती करणे. नाहीतरी लोकशाहीची आहेचं कि अवस्थातुरूंगायल्या कैद्यांनी जेलरला निवडण्यासारखी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************