पक्षपाती पत्रकारिता लोकशाहीचा खून करती आहे का!

🌱वि४🌿 या व्हॉटसअप ग्रुपवरून…...

(छायाचित्र साभार:गुगल)

पक्षपाती पत्रकारिता लोकशाहीचा खून करती आहे का!

या विषयावरचे निवडकजणांचे  विचार नक्की वाचा.

सिताराम पवार:
आपल्या लोकशाही मध्ये तसेच राज्यघटनेमध्ये दबावगट ही संकल्पना आहे. सरकारवर निरंकुश नियंत्रण ठेवणे तसेच विविध लोकांच्या भावना व्यक्त करणे, लोकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणणे निरपेक्ष, पक्षपाती पत्रकारीता व प्रसारमाध्यमे यांचे खूपच महत्व आहे.स्वातंत्र्यापूर्वी काळात भूमिगत चळवळीतीळ नेत्याना वृत्तपत्राद्वारे माहिती,निर्णय,पक्षाची भूमिका स्पष्ट करणे यात वृत्तपत्रांनी खूप महत्त्वाची भूमिका निभावली आहे,परंतू,आज काही वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे सोडून ,इतर पत्रकार याची भूमिका शंका घ्यावी अशी आहे, electronic media ची तर भूमिका एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधल्यासारखी झाली आहे. राजकीय वातावरनाची दिशा ओळखून त्या दिशेने वळणे हे ,"प्रगल्भ लोकशाही साठी धोक्याची घंटा आहे" प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा खांब आहे परंतु हा डळमळीत होऊ लागला आहे,ही बाब सुधारणे गरजेचे आहे,
काही प्रसारमाध्यमाची मालक त्याच्या संपादकाना काढून टाकण्यात आल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत,हे खुप काळजी वाढवणारी घटना  आहे,
सत्य पत्रकारिता करने हाच एकमेव पत्रकारिताचा आत्माआहे आणि त्यावरच घाला घातला जातो आहे हे लोकशाहीसाठी खूनच आहे.

दत्तात्रय डोईफोडे:
‎प्रसारमाधयमे लोकशाहीचा चौथा खांब आहे असे आपल्याकडे म्हटले जाते कारण आपल्या समाजात त्यांना तेवढे महत्त्व आहे.प्रसार माध्यमांनी मुळातच निरपेक्ष राहिले पाहिजे असं म्हटल जातं, आज जग बदलत आहे ते खूप वेगानं आणि त्याच वेगानं बदलत आहेत प्रसार माध्यमे, दैनिक, टीव्ही, ऑनलाईन मीडिया, पण काही समाजाप्रती जबाबदार माध्यमे सोडली तर बाकीची समाजाशी दूरवर सबंधही नसणाऱ्या बाबींवर उगाच वेळ दवडतात.PAIDNEWS ही प्रसार माध्यमांनी  त्यांच्यविरुध्द ओढवलेली  मोठी समस्या आहे.प्रसारमाध्यमे किती प्रभावी आहे ते भारताच्या प्रत्येक नागरिकांना २०१४ मध्ये अनुभवास आले आणि असाच अनुभव भारतीय सरकार चालवणाऱ्यानाही पुढील काळात येईल असे झाल्यास आश्चर्य नको...

सौदागर काळे:
पत्रकारच पत्रकारितेला आणि लोकशाहीला जिवंत ठेवतो.हे जरा आताच्या काळात म्हणणं खूप कष्टदायक वाटू लागले आहे. करियर म्हणून पत्रकारिता करणारे अन् निस्वार्थपणे,घरदार सोडून पत्रकारिता करणारे असं आजच्या पत्रकारितेचे वर्गीकरण होईल.पत्रकाराची व्याख्या बदलणाऱ्या जगाबरोबर बदलत गेली आहे.आज ती सिटीजन जर्नालिस्ट पर्यंत येऊन ठेपली आहे.
    पत्रकारिता हे क्षेत्र आता खूप व्यापक झाले आहे. प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल आला त्याबरोबर एक डोळस वृत्तीही.पत्रकारिता ही समाजाचा आरसा व लोकशाहीचा चौथा स्तंभ असेल तर तो आता धूसर झाला आहे.
    ‎पत्रकारिता ही सत्य,निस्वार्थ, निर्भीड या तत्त्वांवर उभारली आहे. पण आज ही तत्वेच  भारताला स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर संपुष्टात आले.
    ‎भारताच्या स्वातंत्र्य लढयात देशाला स्वंतत्र करणे,हे साध्य होते. पत्रकारिता साधन होती. इंग्रजांनी अनेक पत्रकारांना तुरुंगात डांबले.तुरुंगात जाणारे पेशाने पत्रकार नव्हते तर देशासाठी पत्रकारितेला साधन बनवणारे देशभक्त सिटीजन होते.
    ‎आपल्या पुढे स्वातंत्र्य लढयातील पत्रकारिता हीच आदर्श चेहरा म्हणून समोर येते.ती आजतागायत आहे. याच आधारावर,निकषावर आजच्या पत्रकारितेकडे पाहिल्यास ती पक्षपाती, व्यावसायिक झालेली दिसते.आज निर्भीड, सत्य बोलणाऱ्या पत्रकारांची हत्या होऊ लागली आहे.त्यात अलीकडील गौरी लंकेश यांचा समावेश आहे. ‎यातून असाही अर्थ निघू शकतो. आम्ही लोकशाहीत जातीसाठी एकत्र येऊ शकतो पण सत्यासाठी नाही.आपण जर अशा पत्रकारांच्या मागे उभे राहत नसू तर कोण तुमच्यासाठी आपला जीव गमावेल. त्यापरीस सुखाला जवळ करेल.
   स्वातंत्रलढ्यात लोक लोकशाही नसताना सुद्धा पत्रकार देशभक्तांच्या पाठीमागे उभी राहत होती.आज लोकशाही असून सुद्धा आपण बलशाहीचे मांडलिक झालू आहोत.
   ‎आपणच प्रथम या लोकशाहीवर चाकू खुपसला आहे अन पक्षपाती पत्रकारिता तो आत जाण्यासाठी जोर देत आहे.
   ‎ _आपल्याला आपला खरा चेहरा आरसा रोज दाखवत असतो.हे जरी खरं असलं तरी डोळे मिटले की, आरसा सुद्धा आपल्यासाठी काहीच कामाचा नसतो._
   ‎ *म्हणून या पत्रकारिता आरशासमोर आपण आपले डोळे सताड उघडे ठेवायला हवे.तरच ती आपला चेहरा व जगाचा चेहरा पारदर्शकपणे  दाखवत राहील.*
    ‎
श्रेयस कराळे: पत्रकारिता म्हणजे एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहचविणे आणि तो काम पत्रकार करत असतो.या माध्यमातून आपण  अन्यायावर न्याय मिळवू शकतो.एखाद्या बातमीला वाचा फोडू शकतो व्यवस्तीत केले तर ते विधायक आहे नाही तर ते विघातक पण आहे....

बालाजी सानप:
सध्या पत्रकारिता ही राजकीय झाली आहे...आज जिल्ह्यातील एखादा न्युज पेपरच नाव घेतलं की लोक समजतात की त्या पक्षाचा तो पेपर आहे, हा पेपर त्या पक्षाचा आहे आणि मग ज्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे जो तो पेपर लावला जातो आणि दुसऱ्या पक्षाला कमी दाखवायला सुरवात होते आणि मुळ मुद्दा हा बाजूलाच राहतो ही अत्यंत दयनीय अवस्था आहे .....
पत्रकार बांधवानी या गोष्टीचा विचार करायला हवा की, "खरेच आपण जनतेसमोर काय दाखवत आहोत, आणि काय दाखवायला हवे...!"

तेजस महापुरे:
पत्रकारिता हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे... परंतु ती जर पक्षपाती असेल.. तर आपला देश अराजकतेकडेच जाईल..

दिगंबर मोरे :
पत्रकारिता हा समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणणे आजकाल थोडे धारिष्ट्याचे ठरेल.आजकाल पत्रकार कुठल्या तरी जातीचा, धर्माचा, विचारसरणीचा म्हणून ओळखला जातो (याला अपवाद आहेत).यामुळे असलेले सत्य नीट न मांडता याला आपल्याला हवा तसा अर्थ काढून लोकांवर लादले जाते आणि यातून आपले इप्सित ध्येय साधले जाते.मुळात पत्रकाराला जात,धर्म,प्रांत,विचारसरणी हवीच कशाला? एखाद्या चांगल्या नेत्याला ,विषयाला निव्वळ दुर्लक्ष करून संपवलेले आपल्याला कितीतरी उदाहरणे पाहायला मिळतील.बरेचसे   tv चॅनेल व वर्तमानपत्र पक्षांच्या  दावणीला बांधलेली दिसतात.समाज माध्यमांमुळे एक फायदा झाला की अशा चॅनेल वर अवलंबून न राहता आपल्याला सत्य परिस्तिथी समजू शकते.एखादी सत्य घटना कितीही दुर्लक्ष केली तरी समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू शकते.उदाहरण द्यायचे झाले तर गुजरातमध्ये दलितांना झालेली मारहाण.समाजासाठी उपयोगी ठरत असलेल्या पत्रकारांवर होत असलेले हल्ले यातून नैतिकतेने पत्रकारिता करणाऱ्याचे मनोबल कमी होत आहे.पत्रकारांवर हल्याच्या निर्देशांकामध्ये आपला क्रमांक मागास देशांच्या वरचा आहे आणि हे महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशाला अजिबात भूषणावह नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************