🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून
विषय:-मोबाईल व इंटरनेटच्या अतिवापरामुळे जग ऑनलाइन पण मी माझ्यातही ऑफलाइन ! आता यावर उपाय काय?
(यातील सर्व इमेज गुगलवरून घेतल्या आहेत.)
जयंत जाधव,लातूर:
सर्वप्रथम विषयाला सुरूवात करण्यापूर्वी कोणत्याही विषयाच्या दोन बाजू असतात.चांगली व वाईट,चांगले निर्माण होण्यासाठी वेळ लागतो व वाईट घडण्यास काही क्षण पुरेसे ठरतात.इंटरनेट हे दुधारी शस्ञ आहे. विवेकशील व्यक्तीच्या हाती असेल तर नक्कीच त्याचा विधायक कामासाठी उपयोग करता येतो.वाईट माणसाच्या हाती जर असेल तर समाजाच्या व वैयक्तिक दृष्टीने पण घातक ठरते. एका सर्वेक्षण वरुन असे सिद्ध झाले आहे आजचे युवक बहुतांशी इंटरनेटचा वापर हे टाईम पास,नको त्या गोष्टी साठी करत आहेत हे वास्तव आहे.यावर उपाय माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे शेवटी आभासी जगात किती जगावे हे माणसाला ठरवता आले पाहिजे.इंटरनेट व मोबाइलच्या अतिवापर समस्येवर उपाय करताना सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की, इंटरनेट हे सध्याचं सत्य आहे. त्याचे उपयोग खुप आहेत. त्यामुळेच सुरुवातीपासून मुलांवर पालकांचं विवेकी नियंत्रण असणं गरजेच आहे. पहिलीपासूनच संगणक शिकत असलेली, किंवा त्यापेक्षा जाऊन वयाच्या ४-५ वर्षांपासूनच आईवडिलांचा मोबाइल हाताळण्याची मुलांना सवय लागते. त्यातूनच बटणं दाबताना त्यावरील इंटरनेटच्या मोहजाळात ते ओढले जाऊ शकतात. म्हणूनच सुरुवातीपासूनच पीसी वा मोबाइल गेम्स, इंटरनेट वगरे आपल्या उपस्थितीत व ठरावीक वेळच वापरण्याची युक्तीने सवय लावणं जमल्यास वय वाढल्यावरही आईवडिलांचे ऐकण्याची सवय लागते.
Chandu Diwase ,parbhani:
whole world is online through mobile and Internet but I'm offline in myself*
today's life is so fast.to live the smart and good life in this generation mobiles are the most helping media.through these media people connect with each other on this universe at any distance and any time.we can get any information on fingers through internet.we can travel through using GPS,ticke booking,shopping,online payments lot of thing we can do in a very small time without asking anyone...after invention of mobile and internet humans life becomes more luxuries......whenever new things invented there are always some good and also bad side effects come out.Because of the Havy use of mobile and internet people got addicted to them....they have been forgetting lot of thing like playing,face to face contact and lot more..we can't avoid them to use but we can use them in a limit...this the only way to come online our self.we have to keep balance between our other activities and mobile internet.if we use mobile internet and our all activities in balance then there will not any problem come out.
तेजस्विनी जाधव,इंदापूर:
आजचे युग म्हणजे कॉम्पुटरचे युग ,मोबाईल चे युग एका चुटकीसरशी सगळी माहिती हातात, मग कोणता का विषय असो,हे एक चांगलीच गोष्ट आहे पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की काही उपयोग नाही.
आजच्या काळात हेच झाले आहे लोकांमध्ये ऑनलाइन ही एक जगण्याची पुरवणी आहे हे विसरून त्याला तोअस्सल जगणेच समजायला लागला आहे.
ऑनलाईन म्हंटल की आपल्याला पहिलं आठवते व्हाट्सएप.
व्हाट्सएप हे एक असें साधन आहे की ,काही लोक दिवस भर फक्त याचासाठीच जगतात काय असे वाटते .स्वतःकडे लक्ष द्यायल त्यांना जास्त time नाही पण व्हाट्सएपच्या मेससेजेस साठी एका पायावर तयार,मी असेच एकदा माझ्या मित्रमैत्रिणीना विचारले की कधी काय लिहले आहे का तर एकच उत्तर असते काही लोकांच, की वेळ नाही मिळत. पण ऑनलाईन बघितलं तर दोन दोन तास कसला तरी फालतूक स्लॅम बुक पुर्ण करत असताना दिसतात, उदाहरण झाले तर मला हा अवॉर्ड द्या आणि तो अवॉर्ड द्या,आणि ते एक गाजलेले तुमचच्या बेस्ट लोकांना हे पाठवा आणि ते पाठवा आणि मला पण पाठवा जर मी बेस्ट असेल तर, आणि असा बराच गोष्टी.............
आपण ऑनलाइन चा उपयोग कशासाठी करायला पाहीजे व किती करायला पाहीजे हेच विसरून गेलो आहोत.
हजारो मैल दुर असणाऱ्याची मने जपता जपता आपण आपल्या जवळच्याच लोकांना तर नाही ना विसरत??..
रोज सकाळी उठल्या उठल्या सर्वाना good मॉर्निंग बोलायचं लक्षात येते पण , आई बाबा च्या पाया पडायला मात्र फक्त परीक्षेची सकाळ आठवते....... यावरून मी स्वतःला कोठे तरी विसरत आहे असे नाही का वाटत????? स्वतःला काय वाटते स्वतःबद्दल? याच्याबद्दल विचार करायचा सोडून दुसऱ्याला काय वाटतेय माझ्याबद्दल हेच आजकाल खुप जनांना वाटते ,आणि या बदलामध्ये, या ऑनलाइन चा थोडा प्रमानात का होईना पण हात आहे असे मला वाटते......
ऑनलाईन च्या सवयी मूळ माणसाची स्वतः विचार करण्याची क्षमता कमी होत आहे, फक्त कॉपी पेस्ट ची सवय लागली आहे ...
या सर्वांवर उपाय म्हणजे ऑनलाईन चा मर्यादीत वापर ,आणि महत्वाचा एक चांगला ऑनलाइन गोष्टी चा वापर म्हनजे वि4 सारखे व्हाट्सएप ग्रुप.......
(प्रत्येक गोष्ट ला एक चांगली आणि वाईट बाजु असते पण माणसे मोबाईल मुळे कशी ऑफलाईन झाली आहेत म्हणजेच माणसातली माणुसकी कशी संपत चाली आहे ,यांच्या बद्दल मी माझे मत मांडले आहे..)
कृष्णकांत राईलकर,पालघर:
खरोखर हा प्रश्न फारच दिवसेंदिवस बिकट होत चाललाय .आपण खरोखरच मोबाईलच्या आहारी गेलो आहोत.
परतीचे दोर पण कापून टाकलेत,कारण मोबाईल बंदचा तर आपण विचारही करु शकत नाही.इंटरनेट, वँटसँप, फेसबुक,इंस्टाग्राम....ही यादी तर हनुमानाच्या शेपटीप्रमाणे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.आज कोणी पाहूणे म्हणून कोणाकडे जाणे म्हणजे त्यांच्या नेट-रुटिनला डिस्टर्बच.सगळी नाती आपापसात संवाद साधतात! पण कशाच्या माध्यमाने ? तर नेटच्या माध्यमाने.कबूल आहे की नेटवर भरपूर माहिती उपलब्ध असते.पण या माहितीच्या मायाजालात जर तुम्ही पण गटांगळ्या खाणार असू,अर्थात आपला बहुतांश वेळ जर त्या मायाजालातच घालणार असू तर दुर्दैवाने आपले आपणच अनहित करत आहोत .
Pradip Erakar:
Kharetar hya topic vr lihan mhnjech ek vegala badal suru zala aahe asa vattey.
jevha apan lahan hoto tevha aplyala gavatun talavavrun groundvarun kuthun tari aai shodhun aanychi karan apn gharich nasayche,khelayche,bagadayche pn aajchi paristhiti agadi viruddha aahe,mulanna baljabarine ground var pathvyla lagtey te karan mhnje Mobile.
June mitraprem aata rahilach nahi asa vattey karan mobile hach aaata *so called best friend* zala aahe.katu asala tri hech satya aahe.
asyla tr social media mule 1000 friend ahet pan jevha manatli ekhadi gosht kiva dukh kiva sukhachi ekhadi batmi kiva kahihi n sangtahi mitrana samzt ase te aata *feeling sad* *feeling happy* *feeling disturbed* ne ghetali aahe.bar hya feelingcha parinam tri hotoy ka konavr to jo bhetun dilela dhir ase to miltoy ka aata?
aaj kal college chya group(group kasala kalap asa mhanav lagel ata) madhe sudha samorasmor aselele mitra ekmekana n bolata social networking var hajaro km dur aslelya anolkhi friend sobat friendship karat astat.
kharch aahe ata yavar upay tasa fakt sath ch asel,te premache don apulkiche shabd astil,te milun misalun ekhadya mitrachi udavleli tar hi asu shakel jenekarun kahi velasathi tari kamit kami *ONLINE VISHWA CHYA MAYAJALATUN OFFILINE VISHWATIL SATYAKDE* yeta yeil..
महेश देशपांडे,पुणे:
एक संख्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून सांगु इच्छितो. माणसाला नेहमी *हाव* असते, मग ती कोणत्याही गोष्टीची असते. हे १००% खरे आहे. ज्यांना नाही ते संत झाले. मोबाईल आणि नंतर इंटरनेट चे जाळे हा त्याच हव्यसापोटि केलेला एक प्रयत्न. *प्रयत्न* यासाठी की, त्याच्या यशस्वितेविषयी सगळेच साशंक. मोबाईल व इंटरनेट मुळे
आपण नक्कीच आत्मकेंद्रित झाले आहोत. कुठलीही गोष्ट *स्वतःला* समजून घ्यायची असेल तर त्यविषयी आपण चिंतन, मनन करणे अत्यावश्यक. मग चिंतन कराच, की आपण मोबाईल मुळे खरच आत्मकेंद्रित झाले आहोत. माझ स्पष्ट मत आहे की, काहीही अगदी काहीही झाले तरी, *जगबुड़ी झाली तरी* आपण या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित केला पाहिजे. याला *मृगजळ* देखील म्हणता येईल. *वेळेच* महत्व प्रत्येकाला खरच समजल आहे का? हा अनुत्तरित प्रश्न आहे. *विचार* या ग्रूपचा मुख्य उद्देश हा वेगवेगळ्या विषयांवर फक्त भाष्य न करता, त्याहीपुढे जाऊन त्यावर सगळ्यांनी चिंतन मनन करून *शाश्वत* कार्यकृति अखावी. मोबाईल वापर किंवा इंटरनेट वापरावर *वैयक्तिक पातळीवर* नियंत्रण आणने हा सध्यातरी उपाय दिसतो आहे. अन्यथा, चीनी सरकार प्रमाणे,आपल्या सरकार ला कार्यवाही करावी लागेल. मग बसा....
कालच्या अहवालानुसार, भारत जगात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे मोबाईल डेटा वापरण्यात...
दूसरा महत्वाचा मुद्दा, फक्त निरिक्षण करा की, किती जणांना *मोबाईल* कसा, का, किती वापरावा हे समजते ?...
श्रेयश कराळे ,पंढरपूर:
अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्याचबरोबर अजून एक वस्तू जीवनावश्यक बनली आहे ती म्हणजे मोबाईल.. आणि पूर्वी लँडलाइन होता फक्त इनकमिग आणि आऊटगोइंग होते आता त्यात प्रगती होत होत वायरलेस फोन आले अजून वेगवेगळे कंपनीचे फोन तयार करू लागले, पाहिजेल तसे Specification वाले मिळू लागले.
आता तर अशी क्रेझ अलीय की प्रत्येकाजवळ Android फोन असला पाहिजे..तसेच आती महत्त्वाचे म्हणजे अनलिमिटेडचा पॅक असला पाहिजे.... त्यामुळे मुले तासनतास बिझी असतात,
ज्यादातर वेळ हा सोशल मीडियावर वाया घालवतात. हाच वेळ तर ऑनलाईन स्टडीसाठी किंवा चांगल्या कामासाठी केला तर...
गुगलवर एका क्लिकद्वारे कोणतीही माहिती चुटकीसरशी मिळते.. माझ्यामते मोबाईल व इंटरनेटचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा उदा.Online Youtube Channels, ऑनलाईन Pdf बुक्स , Telegarm..
खरंच हा विषय गंभीर आहे मोबाईल मुळे लोक एकमेकांपासून दूर चाललाय, माणुसकी हरवत चाललेय, मोबाईलमध्ये नंबर आहे पण फोन करायला वेळ नाही..बोलायला वेळ नाही..
तरीपण मी मोबाइल व इंटरनेट च्या वापरामुळे जग ऑनलाईन पण मी माझ्यातच ऑफलाईन....
डॉ.सितम सोनवणे :
हे सत्य आहे. रिलायन्य च्या जाहिराती नुसार करलो दुनीया मुठ्ठीमे म्हणून सर्वानी हातात स्मार्ट फोन घेऊन जगाशी नाते जोडले पण घरात माणसं अबोल झाली शेजारी आसुन बोलत नाहीत. पण वाॕटस्आप, नेटवर आगदी शुभेच्छा सुध्दा काॕपी पेस्ट करत आसल्या मोबाईल ,इंटरनेट च वापर करत आहोत मी माझ्यात माञ आॕफलाईन आहे . हे सत्य आहे. त्याचा आनुभव मी स्वत: ही घेत आहे.
अनंता गोळे,अमरावती:
“मनुष्य हा समाजशील प्राणी आहे” या वाक्यात मानवी जीवनातील अस्तित्वाच प्रतीक दडलेलं आहे. या समाजाच्या निर्मितीबरोबरच मानवी गरजाआधारित ढळण्याची प्रक्रिया या समाजात सामावलेली आहे. जसजशी मानवी समाजाची प्रकृती बदलत गेली तसतशी या समाजरूपी रचनेने स्वतःची कूसही फेरली. यातूनच नानाविध संकल्पनांना आणि संशोधनाना मान्यता मिळाली. मनुष्य दैनंदिन रहाटगाडग्या व्यतिरिक्त जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधू लागला आणि अशातच त्याला मनाला ताजेतवाने करणाऱ्या , नव्याने ऊर्जा देणाऱ्या मनोरंजनाचा शोध लागला हि पक्रिया तशी खूप विस्तृत! पण स्वतःला आनंद मिळवण्याच्या प्रयत्नातून तो नानाविध साधने तयार करत गेला याचबरोबर हि साधने काम सोपी आणि सरळ करणारी यंत्रेही झाली व मनोरंजनही करू लागली. मग काय माकडाच्या हाती तुपाचा गोळा लागल्या प्रमाणे मनुष्य त्याचा आस्वाद घेऊ लागला. पुस्तके , वृत्तपत्रे,Tv , टेलिफोन, कॉम्पुटर , इत्यादी साधनांद्वारे मनुष्य व्यक्त होऊ लागला, सगळीकडे आनंदीआनंद असताना 21 शतक उजाडले आणि मानवी अस्तित्वावरच प्रश्न या मानवाने निर्माण केलेल्या साधनांद्वारे उपस्थित होऊ लागले .त्यातल्या त्यात मोबाइल आणि इंटरनेटने तर पुरता गोंधळ उडवून दिला, प्रश्न उरतोय याचा मानवी जीवनावर काय परिणाम होतायत……..
तोंडाचा चंबू आणि विस्फारलेले डोळे आणि दोन बोट वर करून फोटो काढण्याच्या नादात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात रोज वाचायला येतात आणि मनावर गर्द काजळी येते. ज्या वयात आनंदाने खेळायचे वय असते त्या वयात काय ते सहा सात इंचाचे खेळणे घेऊन बसायचे. किती अपडेट ठेवायचं स्वतःला? किती जाहीर करायचं? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण किती?. अहो प्रातर्विधी पासून हा कार्यक्रम सुरु होतो तो दुलइत नकळत डोळा लागतो म्हणून बंद होतो. किती मॅसेजेस किती विडिओ; किती ऑडिओ;काय म्हणे सुविचार;काय ते सल्ले ;काय ते नानाविध अजुबे; काय ते जीवघेणे प्रॅन्क; काय ते हास्यकल्लोळ उडवणारे प्रसंग; किती रंग नि किती गंध ! ना प्रांताची सीमा; ना जातीची; ना धर्माची; साधा गावरान भोळसट एखादी दैनंदिन क्रिया दाखवून हजारोंच्या चाहता होतो आणि लाखात लोळणारे मंत्री , नट, नट्या किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्या एखाद्या वाह्यात कृतीने हसणे बनतो. सगळ्यासाठी समता खऱ्या अर्थाने इथेच आली असं जाणवतेय. कोणी उच्च नाही कोणी नीच हि नाही, सगळं कसं क्षणार्धात समोर. जगातला कोणताच विषय आता आमच्या पासून दूर नाही मागितलं कि हजर हि वास्तविकता झालीय. पण याच वास्तविकतेंन आता भयानक रूप धारण केलंय,,,,,,,,,
परवा परवा कोणतातरी ब्लु व्हेल गेम आला होता खूप थैमान माजवला त्याने, हे एक मोबाईल च्या अपयशाच भौतिक मूल्यमापन झालं! मनोरंजपासून सुरु झालेला हा खेळ हा कधी आम्हाला खेळवू लागला आणि आम्ही यातले प्यादे बनून कसे मृत्युमुखी पडू लागलो आमचं आम्हालाही कळलं नाही. आम्ही स्वतःला कधी यात गमावून बसलो हेही आम्हाला कळलं नाही. आम्ही इथून सातशे मैल दूर दक्षिण आफ्रिकेच्या भूकंबळीत सामील झालो पण रस्त्याने भीक मागणाऱ्या पोराला पोटभर खाऊ घालायला विसरलो, आम्ही दुःख व्यक्त केलं सिरीयात होणाऱ्या हत्येवर पण नकळत दहशतवाद असणाऱ्या शेतकऱ्यांचा आत्महत्येवर आम्ही गप्पच. आम्ही आनंदी झालो उरलेलं अन्न फेकू नका असा संदेश देणाऱ्या विडिओ वर पण मेळघाटात हजारो मुले नुसतं एकवेळच अन्न नाही म्हणून मेले याच आम्हाला काहीच सोयरसुतक नाही. मित्रानो आम्ही खूप शेयर केले शिवाजी पण किल्ल्यांचा दगडही जपू शकलो नाही. आम्ही बुद्धाला हि खूप शेयर केलं पण अस्पृश्यता संपवू शकलो नाही, आम्ही शेयर केले गाडगे अन तुकडोजीही, पण किती देश स्वच्छ आणि किती खेडी स्वयंपूर्ण आहेत हा संशोधनाचाच विषय आहे ? आम्ही बाबासाहेबाना खूप शेयर केलं पण आजही आम्ही त्यांना पूर्ण आत्मसात करू शकलो का?आम्ही वंदन केल जिजाऊ अन सवित्रीचेही पण किती अत्याचार आणि बलात्कार कमी झाले हे लक्षात असू द्या. आमच हे आधुनिकतेच ढोंग बेगडी ठरलं. आम्ही विश्वाच्या नादात विषयच विसरलो. आणि नको तेथे नाक खुप्सु लागलो. आम्ही प्रगत हातातल्या मोबाईल न झालो पण मनातली घाण तशीच ठेऊन जगू लागलो. आणि स्वतःच स्वतःला संपवण्याच्या स्पर्धेत अडकून बसलो. मोबाइल , इंटरनेट वाईट आहे असाही भाग नाही पण आमची कृती हि मोबाईल मध्ये वाचलेल्या शब्दाशी प्रामाणिक असते काय याचाही कधी विचार व्हावा. मोबाईल कडे लक्ष देताना आईबाबकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणजे पावलं . अदभुत चित्रपटांच्या दुनियेत आम्ही स्वतःच ध्येयही शाबुतच ठेवायला हवं. प्रत्येक पावलाला आधुनिकतेची जोड असावी पण ती कुणाला चिरडणारी नसावी तर स्वीकारणारी असावी.
मी या विषयाची एकच बाजू मांडली असं नाही प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच ! मी त्या अल्प शब्दात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय बस! प्रत्येकाने राजहंस होऊन जगावे असा हा काळ आलाय, खूप पाहावे आणि मोजकेच घ्यावे हि जगाची रीत झालीय. धन्यवाद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा