🌱 *वि४* 🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून,
विषय :-......हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झाले/ झालो.(भाग-1)
(यातील सर्व पुस्तकांचे छायाचित्रे गुगलवरून घेतली आहेत)
(यातील सर्व पुस्तकांचे छायाचित्रे गुगलवरून घेतली आहेत)
अनिल गोडबोले,सोलापूर:
मी स्वतः मास्टर डिग्री घेतली असल्यामुळे आणि NET झालेला असल्यामुळे मला खूप पुस्तक वाचावी लागली(मनात असो वा नसो)
पण पहिल्यापासून वाचनाचा छंद असल्यामुळे इतर आणि अवांतर वाचन भरपूर आहे. माझ्या कडे असलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे मला घडवत आली आहेत. त्यामुळे एक पुस्तक सांगणे खर तर कठीण आहे परंतु काही पुस्तके आहेत जी जीवनात बदल घडवायला किंवा आपल्या विचारात बदल व्हायला सुरुवात करतात.
1. श्यामची आई:- हे एक पुस्तक आहे ज्याच्याशी मी माझे बालपण आठवू शकतो.बाकीच मी दिलेलं आहेच आधीच्या विषयात.
2. मुसाफिर:- अच्युत गोडबोले यांचं आत्मचरित्र आहे जे खूप प्रेरणादायी वाटलं मला.
3. वपुरझा:- व.पू. काळे यांच वपूरझा हे पुस्तक माणसाला वास्तवदर्शी विचार करायला भाग पाडत.
3. 7 habits of highly effective people:- Stephen covey यांच हे एक पुस्तक अतिशय बदल घडवणार वाटलं मला. माणसाला यशासाठी लागणाऱ्या सवयी सांगितल्या आहेत
पु.ल. देशपांडे यांची तर सर्व पुस्तक आपल्याला अनुभव देऊन जातात
अपूर्वाई, पूर्वरंग, असामी असामी, बटाट्याची चाळ
वपू यांचा पार्टनर
मिरासदारांची मिरासदारी
चेतन भगत यांची one night @call center , five point someone, 3 mistakes of my life
Chicken soup for the soul:- jack Canfield and Mark Viktor सगळे अनुवादित भाग
तर असो.... खूप लिस्ट आहे त्यातली काही महत्वाची आठवलेली...
खूप पुस्तक आहेत जी आता आठवत नाहीत ..
Syllabus च्या बाहेरची खप पुस्तके वाचन संस्कृती शिकवून गेली..
जाता जाता मुक्ता चैतन्य यांच "13 ते 23 मुलीच्या जीवनातील uncensord पाने" हे समुपदेशनाच्या कामाला आलं
राज इनामदार ,पंढरपूर
*अनवानी* हे अंकुश गाजरे सर लिखित पुस्तक मला खूप मनाला भावल. सरांची आणी माझी मैत्री खुप जुनी पण ..सरांनी लिहलेल पुस्तक मी खूप दिवसांनी म्हणजे गेल्या वर्षी वाचल .
वाचताना हे पुस्तक कधी वाचून पूर्ण झाल हे समजलंच नाही. हे पुस्तक विद्यार्थी /विध्यार्थीनी यांना भरपूर असे प्रेरित करणार आहे ..लेखकाची भाषा अगदी सरळ ग्रामीण सोपी असल्याने वाचकाच्या पचनी पड़ते .
आयुष्यात दिवसागनीक संकटे उभी राहत असताना .परिस्थितीच्या आधीन न जाता संकटाचाच्या डोक्यावर पाय देवून आपल शिक्षण पूर्ण करून .ऐक नामवंत लेखक व शाळेचा संस्थापक होण्यापर्यंतचा लेखकाचा प्रवास खूप प्रेरणा देवून जातो ....
निलेश पाटील,जळगांव:
My Experiments with Truths he mahatma Gandhiji che "pustak" vachle va Maze "Mastak" "Natmastak" zale Gandhiji ni tyamadhe te Shakahari kase Zale tyacha kissa sangitala aahe Te lihtat; On that Night I ate Meat &I felt that The Goat was dancing in my stomach and from that night I Became Vegetarian. .... Ha kissa vachun mi suddha prerit zalo
रविराज आकोस्कर,लातूर:
"ही श्री ची इच्छा "हे पुस्तक श्रीनिवास ठाणेदार यांच...याच पुस्तकाने मला खूप प्रेरित केल..
मी सांगली ला शिकायला असताना एका फ्लॅट मधे राहत होतो..सहजच खूप बोर होतय म्हणून अपार्टमेंट च्या गची वर जाऊन टाइम पास करावा असा विचार केला..वर गचि वर जाताना अचानक मला ते पुस्तक एका कोपऱ्यात दिसलं.मी ते उचलून पाहिलं आणि आजुबाजुला कोन आहे ते बघितलं..मग आधी watchmen ला सांगून मी ते माज्या जवळ ठेवलं आणि त्यांना सांगितलं की कोणी विचारल तर सांगा माज्या कडे आहे म्हणून..
पण ते पुस्तक कोणाचं नव्हत पण अचानक ते तिथं कस हा विचार करू लागलो..नंतर जास्त विचार न करता मी वाचू लागलो...खूप सुंदर पुस्तक आहे अस वाटू लागलं..मी किमान 2 दिवसांत 6 वेळेस ते पुस्तक वाचत च राहिलो..खूप खोलवर परिणाम करत गेल ते पुस्तक माझ्यावर..नशीबाने ते पुस्तक मला भेटले म्हणून मी खूप खुष होतो..
खरच त्या पुस्तकाने खूप प्रेरणा दिली..आजही ते पुस्तक माझ्या साठी खूप प्रेरणा दायक आहे..
कठीण परिस्थिती मध्ये मी ते नकळत वाचतो..खूप धन्यवाद त्या पुस्तकाचे...
बर् ठीक आहे..
N.M.Patil,Buldhana:
आज पर्यंत मी अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यापैकी सर्वात खास म्हणजे किशोर शांताबाई काळे यांचे *कोल्हाट्याचं पोरं* ही कादंबरी होय. खूप छान पुस्तक आहे.
अभिजीत गोडसे ,सातारा
"न पाठवलेलं पञ" हे पुस्तक 'महाञया रा' या लेखकांनी लिहल आहे. या पुस्तकाने मला उत्तम आयुष्य कस जगायच हे साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलं . ओघवती आणि सरळ कुणालाही समजेल अशी सोपी भाषा या पुस्तकात आहे. निराशाने ग्रासलेल्या व्यक्तीला हे पुस्तक उठवते, चालायला लावते, येवढेच नव्हे तर आनंदाने त्या व्यक्तीला बोलत करते. मी अवांतर बरीच पुस्तके वाचत असतो. वेगवेगळ्या विषयावर भाष्य करणारी पुस्तके असतात .त्यातुन खुप काही भेटल आहे. भेटत आहे .पन या पुस्तकाने मी प्रेरित झालो .जिवन शिकवल तर याच पुस्तकाने. दोन वर्षी पुर्वी माझ्या मोठ्या भावाने हे पुस्तक मला भेट दिले आणि माझी जगण्याची परिभाषाच बदलुन गेली. हे पुस्तक मी वरचेवर सारखे वाचत असतो . पुस्तकातील कोणताही लेख उघडून वाचतो कोणती ना कोणती घटना या लेखाशी मिळती जुळती असते. खुप मोठ-मोठ्या गोष्टी अगदी सोप्या करुन सांगितल्या आहेत. तुम्ही दुःखा मधे , आनंदामधे , यशस्वी , अयशस्वी काहीही असा हे पुस्तक छानच वाटते..
या पुस्तकातले छोटसे मजकूर देतो -
किती वेळ तुम्ही भिंतीवर टकरा देत राहणार ?
तुम्ही रक्तबंबाळ व्हाल, पण भिंत तुमच्यासाठी कधीच दुभंगणार नाही
किती वेळ तुम्ही तुमच्या नशीबाला बोल लावत
आंब्याच्या झाडाखाली संञ्यांची अपेक्षा करत थांबणार ?तुम्ही मरण जरी पावलात,
तरी आंब्याच्या झाडावरून एकही संञं खाली टपकणार नाही.
जे असतं, ते असतं, जे नसतं,ते नसतं.
विचक्षणा म्हणजे हे समजणं की काय धरुन ठेवणआणि केव्हा सोडून द्यायचं.
राजश्री:
एकच आवडतं पुस्तकं सांगणं तस अवघड.
आतापर्यंत वाचलेल्यातील ,
' तोत्तोचान ' ( खिडकी पासची चिमुरडी ) , मूळ लेखिका - तेत्सुको कुरोयानागी , अनुवाद , चेतना सरदेशमुख गोसावी .. हे अधिक भावले..
शाळेतून काढून टाकलेल्या लहानग्या मुलीला एका जगावेगळ्या शाळेतील जगावेगळे हेडमास्तर किती सुरेख प्रकारे तिच्याही नकळत आकार देतात त्याची सुंदर कथा..
तोत्तोचान सारखेच तर असतो आपण लहानपणी आणि मोठेपणी सोसाकु कोबायशी होऊन आपल्या पेक्षा लहानग्या तोत्तोचानना जपायच असतं..
एका कोबायशिंनी घडवलेल्या एका तोत्तोचान ने जगातल्या कितीतरी अध्यापकांना प्रेरणा दिली.. या प्रत्येकाकडून त्यांच्या कार्यकाळात अजून मुठभर तोत्तोचान तयार झाल्या तर जग अजून सुरेल होईल ... प्रत्येकाला जगणं सुकर करणार असेल...
' स्पीड पोस्ट ' मूळ लेखिका शोभा डे , अनुवाद - अपर्णा वेलणकर ,
आईने मुलांना लिहिलेली पत्रे पण मुले आणि बाबांनी सुद्धा आवर्जून वाचावी अशी...
विजय खिल्लारे,हिंगोली:
कोणतेही पुस्तक वाचल्या नंतर आपल्या त्यांच्यातून काहीतरी शिकायला मिळते.परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात अस एकतरी पुस्तक वाचणत येते .ते वाचल्या नतंर त्यांच्य जीवनाला कलाटणी भेटते,थोडक्यात तो प्रेरित होते. ज्याप्रमाणे मा.फुले थॉमस पेन यांच्य *right of man.*या पुस्तकानी प्रेरित झाले आणि समाज सुधारणा साठी आपले जीवन व्यथीत केले.
मी ज्या पुस्तकांनी 📚प्रेरित झालो ते पुस्तक होते *माझी आत्मकथा.*त्याचे लेखक आहेत *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* हे पुस्तक वाचताना मला जाणवले की परिस्थिति किती ही वाईट असली तरी आपण तीचा सामणा केला पाहिजे .डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रचंड वाचनवेडे होते . त्यानी पुस्तकासाठी राजगृह हि इमारत बांधली. ऐवढ प्रचंड प्रेम बाबासाहेबाचे पुस्तकावर होते ते म्हणाचे मला माणसापेक्षा पुस्तकाचा सहवास फार आवडतो .त्यानी दलित शोषित समाजाच्या व्यथा वेदनांना वाचा फोडली त्यांचे ध्येय मानवमुक्ती हेच होते. अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल *पत्रकार* म्हणून
*मूकनायक* ,
* *बहिष्कृत भारत,*
*प्रबुद्ध भारत* *
व *जनता*
पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले... बाबांसाहेबांसारखा जिद्दी माणूस शोधून ही सापडणार नाही.....
1) शाळेत शिकु देत नव्हते.
बॅरीस्टर झाले.
2) पाणी देत नव्हते.
आख्खे चवदार तळे खुले केले.
3) हिंदू कायद्यात दलित समाजाला कुठेच स्थान नव्हते.भारताचा संपूर्ण कायदाच बाबासाहेबानी लिहीला.
4) त्यांना राहण्यासाठी जागा
दिली नाही.
आज सर्व सरकारी जागेत त्यांच्या कर्तृत्वामुळे
त्यांचे फोटो आणि पुतळे उभे आहेत.
सलाम त्यांच्या जिद्दीला....त्याचे चरित्र वाचणारा कोणताही व्यक्ति नक्कीच प्रेरणा घेईल...
प्रविण, मुंबई:
अनेक पुस्तके वाचनात आली आणि प्रत्येक पुस्तकाने विचारांमध्ये काहीना काही भर घातली आहे. त्यामुळे एखाद्या पुस्तकाविषयी लिहण खरच कठीण आहे. तरीही त्यातील काही पुस्तके खूपच भावली. त. त्यात मानावर कोरलेल आणि आचरणात उतरत असलेल पुस्तक म्हणजे “भगत सिंघ – समग्र साहित्य “.
हे वाचत वाचत समाज धर्म राजकारण इ विषयांवर टीकात्मक विचा करायला लागलो कळलाच नाही.
ह्या पुस्तकातून भागात सिंघ यांचा एक अभ्यासू चेहरा समोर येतो. वयाच्या १७ वर्षी “The Communist Manifesto” चे सखोल वाचन, तसेच रशिअन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती आणि भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास असणारे भागात सिंघ यातून मला समजले. त्यांचे भाविश्यातील भारत कसा असावा हा याबदालाचे मत त्यांची दूरदृष्टी दाखवते. trade dispute bill यावर कोर्टात केलेलं भाषण त्यांचे कायदेज्ञान दर्शविते.
मी नास्तिक का या लेखात त्यानी धर्मांध शक्तीवर केलेला प्रहार तसेच शेवटपर्यंत मतावर ठाम राहिलेले कठोर भगत सिघ पण यातून दिसले. ह्या पुस्तकातले त्यांचे लेखन हे एखादा खूप अनुभवी अशा अभ्यासू विचारवंतासारखे वाटते. पण त्यानी हे सर्व त्यांच्या वयाच्या १६ ते २३ या कोवळ्या तारुण्यात लिहिलेले आहे. त्यांचा हाच गुण त्यांना त्यावेळच्या तात्कालिक विचारवंताच्या पंक्तीत बसवतो.
ह्या संपूर्ण खंडात एक प्रसंग खूपच चित्तथरारक वाटला. तो म्हणजे संसदे मध्ये मोकळ्या जागी बॉम्ब फेकून जाणूनंबुजून करवून घेतलेली अटक, “सरकार बाहीर झालाय त्यांना फक्त धमाक्याचे आवाज ऐकायला येतात” हे घोषणा, कोर्टाचा राजकीय व्यासपीठ म्हणून केलेला वापर......इ
शहीद भगत आणि त्यांचे साथीदार हे खर तर हवा पाणी अन्न यावर जगातच नव्हते. त्यांचे वेड होत भारतमातेचे स्वातंत्र्य आणि रामप्रसाद बिस्मिल यांच्या कविता हेच त्याचं अन्न.
अक्षय पतंगे,हिंगोली:
"एका दिशेचा शोध"
भारताच्या उज्ज्वल उद्यासाठी लिहीलेल्या पुस्तकात लेखक संदीप वासलेकरांनी "एका दिशेचा शोध" घेतला. प्रत्येकांचे जगणे सुंदर व्हावे, हा मानवतेचा संदेश लेखंकानी दिला. भारतीय संस्कृतीचे संस्कार हे सध्याच्या जगासमोरील आव्हानांचा एक चांगला पर्याय आहे, ही सहज जाणिव होते. मूठभर धनिकांचे संपत्तीचे प्रदर्शन, त्यांचा बडेजाव, चंगळवाद, ऐषाराम यामुळे आपला देश भरपूर प्रगतीच्या वाटेवर आहे, असे फसवे चित्र उभे केले जाते, हे स्पष्ट करतानाचं बैलगाडी अर्थव्यवस्थेतील ८० कोटी लोक सापळ्यातच अडकून राहिले, असे लेखक सांगतात. जगातील महत्वाच्या प्रश्न सोडविण्यासाठी वसुधैव कुटुम्बकम् चा संदेश पुर्ण करण्यासाठी लेखकांनी नियती, निश्चय, निर्मीती चा आम्हां युवकांना दिलेला संदेश मला प्रेरणा व दिशा देणारा ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा