ऊसतोड कामगार:जाळातून पैसे काढण्याची रोजची अर्धपोटी कसरत

🌱वि४🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून

विषय:-*ऊसतोड कामगार:जाळातून पैसे काढण्याची रोजची अर्धपोटी कसरत*
(खास या विषयासाठी महादेव घाडगे 9730957820 यांनी फिल्डवर जाऊन फोटोग्राफी केली आहे.यातील सर्व फोटो त्यांचे आहेत.)
रविराज:
तुम्हाला माहीत आहे का या जगण्याला सगळ्यात मोठा शाप कोणता आहे??
तर या प्रश्नाचं खर उत्तर "गरीबी "आहे..हो आजकाल च्या जगण्यात गरीबी हाच खूप मोठा शाप आहे ...हे जग चालत फक्त पैशाच्या जोरावर..
3 दिवसा पुर्वीची गोष्ट आहे;
ऊस तोडी साठी घेतलेली उचल परत न केल्यामुळे एका मुकदमाने पूर्ण कुटुबांचे अपहरण केले.म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारी रक्कम आपण काम करून फेडु अशी त्यांची परीस्थ्ती झाली होती.मग चुकलं कुठं ओ त्यांच ??
हे असल दुःख त्यांना भोगावे लागल.
खूप वाईट वाट्त असले प्रसंग समोर घडले की..इतक काम करून सुधा त्यांना हे सहन कराव लागल..ऊस कामगार अशा किती तरी अवहेलना सोसून जगत आहेत..हे एकच दुःख असेल का ओ त्यांना??
नाही ! ! ! !
अशा किती तरी संकटाचा सामना करत जगत आहेत...
अशा कामगारांना न्याय मिळाला पाहिजे..
आणि तो मिळावा म्हणून प्रयत्न करने गरजेचं आहे...आपण आपल्या परीने काही मदत होत असेल तर नक्की करावी हीच विनंती...
जर मत मांडताना काही चूक झाली असेल तर माफी असावी…
सिताराम पवार:
खरंच हा विषय खूपच महत्वाचा आहे ,आज आपण आपल्या कडे ऊस मजूर बगतो, त्यांना ना कामाचे तास ना कामाचे बंधन, खरं तर सरकार दरबारी म्हणतात ऊसतोड कल्याण मंडळ स्थापन करू पण त्याचा काहीच फरक पडत नाही. इथं कामगार कायधाचे सरास उल्लंघन होत आणि कामगारांना काहिचफायदा नाही.लोक पोटाची खळगी भरण्यासाठी येतात म्हणून त्यांची पिळवणू करावी का??
कारखानदार उसात काटा मारतात त्यामुळे कामगारांचे नुकसान होते,त्यांच्या कामाची वेळ 24 तास चालूच कधीहि वाहन भरण्यासाठी आले तरी वाहनात बसुन जेवणं करावं लागतं तेथे काळोखी रात्र असो अथवा भर दुपारच्या 12 चं ऊन.कधी जेवट्या तटावरून उठाव लागत,
ऊस टोळीतील लहान मुलांना पाहिल्यावर खूप गहिवरून येत कारण त्यांना समजत नसत आणि ते आपल्या आईच्या पाठीमागे लागतात, आईला उशीर झालेला असतो आणि ती मुलं हट्ट धरतात तेव्हा त्या वेळी आई नाइजस्तव मारते तेंव्हा वाटत आपण कधी असा हट्ट धरला असेल का ? आणि वाटत नकोरे तो हट्ट कारण त्या आईची अवस्था च तशी असते.
टोळीमध्ये नवीन जोडपी पाहिलं की  बालविवाहाचि दाहकात समजते,तस बीड,आणखी काही जिल्ह्यात ऊस तोडणी आधी लग्नाची धांदल असतेही सत्य परिस्थिती आहेआणि त्या लहान मुली माना लटपत उसाची मोळी नेतात 😔 खरंच हा जाळतुन पैसे काढण्याची जीवघेणी कसरत आहे,ऊसतोड कामगारांच्या समस्या-
1 त्यांना पाणी,जळणासाठी लाकूड फाटण्याची व्यवस्था, पुरेसा निवारण्यासाठी खूप जीवघेणी कसरत करावी लागते
2 त्यांच्या मुलाच्या शाळेचा प्रश्न, काही लहान मुलांना सांभाळण्यासाठी दुसऱ्या मुलाची शाळा सुटते
3 साखर शाळा बंद आहेत
4 बर्यापैकी टोळीमध्ये महिलांना त्याचा नवरा पैशाचा थांगपत्ताही लागू देत नाहीत, मुकादम पुरूषाला पैसे देताना महिलांचा बिचारही करत नाहीत,
5 रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा त्याच्या उसाचा काटा मारला जातो व प्रत्येक खेपे मागे कामगार कारखान्याला2 टन ऊस फुकटचा तोडून भरून देतो तेथे शेतकऱ्याचाही तोटा आहे,
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेहे कामगारांना कामगार कायद्याच्या चौकटीत बसतच नाही,
आणि स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारी लोक प्रत्येकवेली त्यांची मजुरी वाढवनहासाठी लवाद स्थापन करू, कल्याण मंडळ स्थापन करू, असे मनुन जाळ!तुन पैसे काढण्याची कसरत करणाऱ्या जीवाची चेष्टा करतात.
राज इनामदार:
ज्या जिल्हयात अथवा तालुक्यात साखर कारखाने जास्त असतात .आपोआपच तेथील आर्थिक उलाढाल इतर जिल्हे अथवा तालुक्यापेक्षा  जास्त असते ....साखर कारखाने म्हंटल की ऐक प्रकारे राजकीय आणी आर्थिक उलाढाल होणारा ऐक दुवाच असतो .साखर कारखान्याच्या आजूबाजूच्या परिसरातीत शेतकरी ही सम्रुध्द असे असतात. कारखाना म्हटल की कारखानदार ...आतील कर्मचारी,कामगार ,शेतकरी सर्वांचा विकास होतो पण वर्षानी वर्ष व पिढ्यानी पिढ्या उस तोडून सुधा उस मजूर मात्र आर्थिक स्थैर्य कधी प्राप्त करू शकला नाही .
त्याचेही अनेक कारण आहेत ...एकीकडे  साखर कारखाने साखर निर्माण करतात दुसऱ्या बाजूला आणखी ऐक गोष्ट निर्माण होतेय आणी ती म्हणजे *पिढ्याने पिढ्या उस मजूर निर्माण होतयात* कारण उस मजुरांची मुल उस तोड़नी काळात 4 ते 5 पाँच महीने सीजन चालू असताना आई वडिलांन बरोबर असतात .यामुळे ते शिक्षण घेवु शकत नाही त्यामुळं ते मुख्य प्रवाहात जोडले जात नाहीत .ना शिक्षण ना भांडवल यामुळे त्याच्या आयुष्याचा व मुलांबाळाचा पालापाचोळा होतोय .....पण याकडे कोणी लक्ष देताना दिसतं नाहीये ..कारण हे लोक सुधारली तर त्यांची मुल शिकतील नौकरी व्यवसाय करतील मग उस कोण तोड़नार असच या मागे गणित असाव .......
यांच्या मुलांच्या हातात पेना ऐवजी कोयत आलंय ....दप्तराऐवजी डोक्यावर ऊसाचि मोऴी आहे ...ना विमा कवरेज ना फंड ...ना पेन्शन ....
*सरनावर जळताना मला एवढे कळलें होते*
*मरनाने केली सुटका जगण्याने छळलें होते*
असच जीवन उस मजुरांना जगाव लागतय

अजय ‪+91 86052 75914‬:
मी Medical College चा विद्यार्थी असल्याने Posting करताना ऊसतोड कामगारांच्या व्यथा जवळुन अनुभवतो त्या खुप चिंतनशील आहेत, ऊस तोडताना ऊसतोड कामगार जखमी होतात,l. मला वाटतं प्रत्यक्ष वस्तीवर जाऊन पाहिल्यास आपणास येणारा अनुभव त्यांच्यासाठी प्रत्यक्ष काम करण्यास भाग पाडेल.
बालाजी सानप:
मी स्वतः ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो  त्या बीड जिल्ह्यातील आहे त्यामुळे आपण जे काही लिहीत आहेत ते माझ्या आजूबाजूला प्रत्यक्ष घडत आहे.....
ज्या वेळी ऊस तोडायला टोळी जाते तेव्हा बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच्या सर्व गावे खाली होताना दिसतात...
ऊस तोडायला जाताना काही ऊसतोड कामगार त्यांच्या मुलांना बीड शहरात हॉस्टेल वर ठेऊन जातात तर काही जण सोबत घेऊन जातात...
बीड शहरात सध्या हॉस्टेल चालकांनी थैमान घातलेलं आहे आपण जेव्हा एखाद्या हॉस्टेल वर जाऊ तेव्हा त्या हॉस्टेल मधील 80 ते 90% मुले ही ऊस तोड कामगारांची मुले असतात आणि त्यांना जेवणाची राहण्याची खाण्याची व्यवस्था ही बऱ्याच ठिकाणी बरोबर नाही हे पाहून मन अगदी सुन्न होते...
माझ्या स्वतःच्या गावातील जवळपास 95% लोक सध्या उसतोडणीला कोल्हापूर,सोलापूर,कर्नाटक, वाई, सांगली या परिसरात उसतोडणीला जातात, गावातील इतकी लोकसंख्या कमी झाल्यामुळे गावामध्ये शेतीसाठी मजूर भेटत नाहीत, गावची अर्थव्यवस्था मोडकळीस येते अशी अनेक कारणांनी गावचा विकास खुंटतो आणि गावासोबत तेथील नागरिकांचा पण विकास खुंटतो खुंटतो....
ऊसतोडणीमुळे अनेक ठिकाणी बालविवाह होतात. अनेक ठिकाणी मुकादम मजुरांवर पैशांमुळे व अन्य कारणामुळे अत्याचार करताना दिसतात.
ऊसतोड कामगारांमधील 80-90% पुरुष हे व्यसनाच्या अधीन आहेत, आणि ही वास्थुस्तीती आहे, त्यामुळे त्यांच्या बायका मुलांना असंख्य त्रासाला सामोरे जावे लागत....
ऊसतोड कामगारांना रात्री अपरात्री वेळेचे भान न ठेवता ऊस तोडण्यासाठी जावे लागते, व त्यांना कधी तरी वेळेवर जेवण मिळते...
आज संपूर्ण देशाला ज्यांच्यामुळे सणाला गोड खायला मिळते त्यांना साधं एक वेळच जेवण वेळेवर पण मिळत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे....

तेजस महापुरे:
ऊसतोड कामगारांच्या समस्या अनेक आहेत.... थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणावे लागेल की.... ना त्यांच्या कोयत्यांना धार आहे... ना आधार आहे…

सिताराम ढगे:
ऊसतोडणी मजुरांना ना झोपेचं वेळ नसते ना उठायची वेळ नसते...त्यांचं जीवन म्हणजे काटीवरची कसरत असते.खरच सांगतो त्याचं दुःख कुणी मांडलं नाही जर का मांडलं तरी त्याला योग्य न्याय दिला नाही.
          त्यांच्या मुलांचं भविष्य अंधकारात असत , जर त्यांचं दुःख अनुभवायचं असेल तर फडावर गेलं पाहिजे . सलाम करतो त्यांच्या मेहनतीला......

राहुल अनपट:
🎋 *ऊस तोड कामगार* 🎋

उसन्या सुखाच्या पायी,
काळीज हाती बडवल
त्या चार पैक्यापायी
लेकाच आयुष्य तुडवलं ।

काय आम्हा संसार
आज इथं उद्या तिथं
नुसता जीवाला घोर
घरात आहे बिनलग्नाची पोर।

आमच्या सुखाच्या तुटवड्यात
मुकदमांचा अर्धा वाटा
हातचा घास काढून घेतल्यावर
काळजात टोचतो काटा ।

या उसतोडणी पायी रान जीवाचं वसाड
नाही जीवाला सुख
नाही मनाला शांती
अस बसलं की
मनात येते जनावराची दोर अन
दारापुढच्या झाडाची फांदी ।
महादेव घाडगे:
      महाराष्ट्रात सहकारी सहकारी साखर कारखान्याची संख्या ही २०० पेक्षा जास्त आहे.राज्यातील साखर कारखान्यामधे ऊस तोडनिसाठी हारवेस्टर मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.यामूळे ऊसतोड मजुरावरती उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
       ऊसतोड मजूर आणि कारखानदार या एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत.पण या नाण्याची एक बाजू (कारखानदार)ही आर्थिकदृष्ट्या भक्कम आहे, तर दूसरी बाजू (ऊसतोड मजूर)  आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे.या नाण्यांच्या दोन्ही बाजू
आर्थिकदृष्ट्या परस्पर विरोधी आहेत.
ऊसतोड मजुरांच्या एक न अनेक समस्या  आहेत.यामध्ये ऊस तोडीस स्थलांतर केल्यास मुलांचे शिक्षण, राहण्याची अयोग्य सोय, व्यसनाधिनता यामूळे  धोक्यात येणारे अरोग्य या सारख्या अनेक समस्या आहेत.ऊसतोड़ मजुरांचे कष्ट पाहता, बहिनाबाई चौधरिंची कविता आठवते….
         “ _अरे संसार संसार_
           _जसा तवा चुल्ह्यावर,_
_आधी हाताला चटके मग मिळते भाकर_ ”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************